15-07-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - देह-अभिमान आसुरी कॅरेक्टर (स्वभाव) आहे, त्याला बदलून दैवी स्वभाव धारण करा तर रावणाच्या कैदेतून सुटाल”

प्रश्न:-
प्रत्येक आत्मा आपल्या पाप कर्मांची सजा कशी भोगते, त्यापासून वाचवण्याचे साधन कोणते आहे?

उत्तर:-
प्रत्येक आत्मा आपल्या पापांची शिक्षा एक तर गर्भ जेलमध्ये भोगते, दुसरे रावण जेलमध्ये अनेक प्रकारची दुःखे भोगते. बाबा आलेले आहेत तुम्हा मुलांना या जेल मधून सोडविण्यासाठी. यातून वाचण्यासाठी पवित्र बना.

ओम शांती।
ड्रामा प्लॅन अनुसार बाबा बसून समजावून सांगत आहेत. बाबाच येऊन रावणाच्या जेल मधून सोडवतात कारण सर्व क्रिमिनल (विकारी), पाप-आत्मे आहेत. दुनियेतील सारे मनुष्यमात्र विकारी असल्या कारणाने रावणाच्या जेलमध्ये आहेत. आणि जेव्हा शरीर सोडतात तरी देखील पुन्हा गर्भ जेलमध्ये जातात. बाबा येऊन दोन्ही जेलमधून सोडवतात; नंतर मग तुम्ही रावणाच्या जेलमध्ये सुद्धा नाही आणि गर्भ जेलमध्ये सुद्धा जाणार नाही. तुम्ही जाणता बाबा हळू-हळू पुरुषार्थानुसार आम्हाला रावणाच्या जेल मधून आणि गर्भ जेलमधून सोडवत राहतात. बाबा म्हणतात - ‘रावण राज्यामध्ये तुम्ही सर्व विकारी आहात’. मग राम राज्यामध्ये सर्व पवित्र असतात. कोणत्याही भुताची प्रवेशता होत नाही. देहाचा अहंकार आल्यानेच मग बाकी इतर भुतांची प्रवेशता होते. आता तुम्हा मुलांना पुरुषार्थ करून देही-अभिमानी बनायचे आहे. ज्यावेळी असे (लक्ष्मी-नारायण) बनाल तेव्हाच देवता म्हणून संबोधले जाल. आता तर तुम्हाला ब्राह्मण म्हटले जाते. रावणाच्या जेल मधून सोडविण्यासाठी बाबा येऊन शिकवतात देखील आणि सर्वांची कॅरेक्टर्स (चारित्र्य) जी बिघडली आहेत ती सुधारतात देखील. अर्ध्या कल्पापासून कॅरेक्टर्स बिघडता-बिघडता खूपच बिघडली आहेत. यावेळी आहेत तमोप्रधान कॅरेक्टर्स. दैवी आणि आसुरी कॅरेक्टर्समध्ये खरोखर रात्रं-दिवसाचा फरक आहे. बाबा समजावून सांगत आहेत - ‘आता पुरुषार्थ करून आपले दैवी कॅरेक्टर बनवायचे आहे, तेव्हाच आसुरी कॅरेक्टर पासून सुटका होईल’. आसुरी कॅरेक्टर्समध्ये १ नंबरचा आहे - देह-आभिमान. देही-अभिमानी असणाऱ्याचे कॅरेक्टर्स (चारित्र्य) कधीही बिघडत नाही. सर्व काही चारित्र्यावर अवलंबून आहे. देवतांचे चारित्र्य कसे बिघडते. जेव्हा ते वाममार्गामध्ये जातात अर्थात विकारी बनतात तेव्हा चारित्र्य बिघडते. जगन्नाथाच्या मंदिरामध्ये अशी वाम मार्गातील चित्रे काढली आहेत. हे तर खूप पुरातन मंदिर आहे, ड्रेस इत्यादी देवतांचेच आहेत. देवता वाम मार्गामध्ये कसे जातात ते दाखवतात. सर्वात पहिली विकृती हीच आहे. काम चितेवर चढतात, आणि मग रंग बदलत-बदलत एकदम काळे होतात. सर्वात पहिले गोल्डन एज़मध्ये (सुवर्ण युगामध्ये) आहेत संपूर्ण गोरे, नंतर मग २ कला कमी होतात. त्रेताला स्वर्ग म्हणणार नाही, तो आहे सेमी स्वर्ग. बाबांनी समजावून सांगितले आहे - रावण येताच तुमच्यावर कट चढायला सुरुवात झाली. संपूर्ण विकारी अंतामध्ये बनता. आता १०० टक्के विकारी म्हणणार. १०० टक्के निर्विकारी होता आणि मग पुन्हा १०० टक्के विकारी बनलात. आता बाबा म्हणतात - स्वतःला सुधारत जा, हे रावणाचे जेल खूप मोठे आहे. सर्वांना विकारीच म्हणणार कारण रावणाच्या राज्यामध्ये आहात ना. राम राज्य आणि रावण राज्य याबद्दल त्यांना माहीत सुद्धा नाही आहे. आता तुम्ही पुरुषार्थ करत आहात राम राज्यामध्ये जाण्याचा. संपूर्ण तर कोणीही बनलेला नाहीये. कोणी फर्स्ट, कोणी सेकंड, कोणी थर्डमध्ये आहेत. आता बाबा शिकवत आहेत, दैवी गुण धारण करायला लावतात. देह-अभिमान तर सर्वांमध्ये आहे. जितके तुम्ही सेवेमध्ये व्यस्त रहाल तितका देह-अभिमान कमी होत जाईल. सेवा केल्यानेच देह-अभिमान कमी होईल. देही-अभिमानी मोठ्या-मोठ्या सेवा करतील. बाबा देही-अभिमानी आहेत तर सेवा किती सुंदर करतात. सर्वांना विकारी रावणाच्या जेलमधून सोडवून सद्गती मिळवून देतात; तिथे (सतयुगामध्ये) मग हे दोन्ही जेल असणार नाहीत. इथे डबल जेल आहेत, सतयुगामध्ये ना कोर्ट आहे, ना पाप-आत्मे आहेत, आणि ना काही रावणाची जेल आहे. रावणाचे आहे बेहदचे जेल. सगळे ५ विकारांच्या दोरखंडाने बांधले गेले आहेत. अपार दु:ख आहे. दिवसेंदिवस दुःखामध्ये वाढ होत राहते.

सतयुगाला म्हटले जाते गोल्डन एज्ड (स्वर्णिम युग), त्रेताला सिल्व्हर एज्ड (चांदीचे युग). सतयुगातील सुख त्रेतामध्ये असू शकत नाही कारण आत्म्याच्या २ कला कमी होतात. आत्म्याच्या कला कमी झाल्याने शरीरे देखील अशी होतात, तर हे समजावून सांगितले पाहिजे कि खरोखर आम्ही रावणाच्या राज्यामध्ये देह-अभिमानी बनलो आहोत. आता बाबा आले आहेत रावणाच्या जेलमधून सोडविण्यासाठी. अर्ध्या कल्पाचा देह-अभिमान निघण्यासाठी वेळ तर लागतो. खूप मेहनत करावी लागते. जे लवकर शरीर सोडून गेले आहेत ते पुन्हा मोठे होऊन येऊन थोडे-फार ज्ञान घेऊ शकतात. जितका उशीर होत जाईल तितका मग पुरुषार्थ काही करू शकणार नाही. कोणी मरेल आणि मग पुन्हा येऊन पुरुषार्थ करेल; ते तर जेव्हा शरीर मोठे होईल, हुशार होईल तेव्हा काहीतरी करू शकेल. उशिराने जाणारे तर काहीच शिकू शकणार नाहीत. जितके शिकले तितके शिकले; त्यामुळे मरण्यापूर्वी पुरुषार्थ केला पाहिजे, जितके होऊ शकेल या बाजूला येण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. अशा परिस्थितीमध्ये खूप येतील. झाडाची वृद्धी होत जाईल. स्पष्ट करून सांगणे तर खूप सोपे आहे. बॉम्बेमध्ये बाबांचा पारिचय देण्यासाठी खूप चांगली संधी आहे - हे आम्हा सर्वांचे पिता आहेत, बाबांकडून वारसा तर जरूर स्वर्गाचाच पाहिजे. किती सोपे आहे. हृदयातून गदगदून आले पाहिजे की हे (शिवबाबा) आम्हाला शिकविणारे आहेत. हे (लक्ष्मी-नारायण) आमचे एम ऑब्जेक्ट आहे. आपण पहिले सद्गतीमध्ये होतो मग दुर्गतीमध्ये आलो आता पुन्हा दुर्गती मधून सद्गतीमध्ये जायचे आहे. शिवबाबा म्हणतात - ‘मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर तुमची जन्म-जन्मांतरीची पापे नष्ट होतील’.

तुम्ही मुले जाणता, जेव्हा द्वापरमध्ये रावण राज्य असते तेव्हा ५ विकार रुपी रावण सर्वव्यापी होतो. जिथे विकार सर्वव्यापी आहेत तिथे बाबा सर्वव्यापी कसे होऊ शकतात. सगळे मनुष्य पाप-आत्मे आहेत ना. बाबा सन्मुख आहेत म्हणूनच तर सांगतात की मी असे म्हटलेच नाही, उलटेच समजले आहेत. उलटे समजून, विकारामध्ये जाता-जाता, शिव्या देता-देता भारताचे हे हाल झाले आहेत. ख्रिश्चन लोक सुद्धा जाणतात कि ५ हजार वर्षांपूर्वी भारत स्वर्ग होता, सर्व सतोप्रधान होते. भारतवासी तर लाखों वर्षे म्हणतात कारण तमोप्रधान बुद्धी बनले आहेत. ते मग ना इतके उच्च बनले, ना इतके नीच बनले. ते (दुनियावाले) तर समजतात खरोखर स्वर्ग होता. बाबा म्हणतात - ‘हे बरोबर बोलत आहेत - ५ हजार वर्षांपूर्वी देखील मी तुम्हा मुलांना रावणाच्या जेलमधून सोडविण्यासाठी आलो होतो, आता पुन्हा सोडविण्यासाठी आलो आहे’. अर्धा कल्प आहे राम राज्य, अर्धा कल्प आहे रावण राज्य. मुलांना संधी मिळत असेल तर इतरांना समजावून सांगितले पाहिजे.

बाबा देखील तुम्हा मुलांना समजावून सांगतात - ‘मुलांनो, अशा पद्धतीने समजावून सांगा. इतके अपार दुःख का वाढले आहे? सुरुवातीला तर अपार सुख होते जेव्हा या लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते. हे सर्वगुण संपन्न होते, आता हे नॉलेज आहेच मुळी नरा पासून नारायण बनण्याचे. शिक्षण आहे, याद्वारे दैवी कॅरेक्टर्स (दैवी चारित्र्य) बनते. यावेळी रावणाच्या राज्यामध्ये सर्वांचे चारित्र्य बिघडलेले आहे. सर्वांचे चारित्र्य सुधारणारे तर एक रामच आहेत. यावेळी किती धर्म आहेत, लोकसंख्येमध्ये किती वाढ होत आहे, अशीच वाढ होत राहिली तर अन्न तरी कुठून मिळणार! सतयुगामध्ये तर अशा गोष्टी असत नाहीत. तिथे दुःखाची काही गोष्टच नाही. हे कलियुग आहे दुःख धाम, सर्वजण विकारी आहेत. ते आहे (सतयुग) सुखधाम, सर्व संपूर्ण निर्विकारी आहेत. त्यांना वारंवार हे सांगितले पाहिजे तेव्हा कुठे समजतील. बाबा म्हणतात - ‘मी पतित-पावन आहे, माझी आठवण केल्याने तुमची जन्म-जन्मांतरीची पापे नष्ट होतील’. आता बाबा कसे सांगतील! जरूर शरीर धारण करूनच बोलतील ना. पतित-पावन सर्वांचे सद्गती दाता एक बाबाच आहेत, जरूर ते कोणाच्यातरी रथामध्ये (तनामध्ये) आले असतील. बाबा म्हणतात - ‘मी या रथामध्ये येतो, जो आपल्या जन्मांना जाणत नाही’. बाबा समजावून सांगतात कि, हा ८४ जन्मांचा खेळ आहे, जे सर्वात पहिले आले असतील तेच येतील, त्यांचेच जास्त जन्म होतील मग कमी होत जातील. सर्वात पहिले देवी-देवता आले. बाबा मुलांना भाषण करायला शिकवत आहेत - कि अशा प्रकारे समजावून सांगायचे आहे. चांगल्या रीतीने बाबांच्या आठवणीमध्ये रहाल, देह-अभिमान नसेल तर चांगले भाषण कराल. शिवबाबा देही-अभिमानी आहेत ना. म्हणत राहतात - ‘मुलांनो, देही-अभिमानी भव’. कोणताही विकार राहू नये, आतमध्ये कोणतीही सैतानी असू नये. तुम्ही कोणालाही दुःख द्यायचे नाही, कुणाची निंदा करायची नाही. तुम्हा मुलांनी कधीही ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवता कामा नये. बाबांना विचारा कि, ‘हा असे म्हणतो, हे खरे आहे का?’ तर बाबा सांगतील. नाहीतर असे पुष्कळ आहेत जे खोट्या गोष्टी बनविण्यामध्ये वेळ लावत नाहीत - ‘अमक्याने तुझ्याविषयी असे-असे म्हटले’, असे काहीतरी सांगून त्यांनाच संपवून टाकतील. बाबा जाणतात, असे बरेचदा होते. उलट्या-सुलट्या गोष्टी सांगून मन कलुषित करतात, म्हणून खोट्या गोष्टी ऐकून कधीही आतून त्रास करून घ्यायचा नाही. तुम्ही विचारा - ‘अमक्याने माझ्याबद्दल असे म्हटले आहे का?’ आतून सफाई असली पाहिजे. कितीतरी मुले ऐकीव गोष्टींवरून देखील आपसामध्ये वैर भाव ठेवतात. बाबा मिळाले आहेत तर बाबांना विचारले पाहिजे ना. ब्रह्मा बाबांवर देखील बऱ्याच जणांचा विश्वास बसत नाही. शिवबाबांना सुद्धा विसरून जातात. बाबा तर आले आहेत सर्वांना श्रेष्ठ बनविण्यासाठी. प्रेमाने सावरून घेत राहतात. ईश्वरीय मत घेतले पाहिजे. निश्चयच नसेल तर विचारणारसुद्धा नाहीत मग प्रतिसाद तरी कसा मिळणार. बाबा जे समजावून सांगतात ते धारण केले पाहिजे.

तुम्ही मुले श्रीमतावर विश्वामध्ये शांती स्थापन करण्यासाठी निमित्त बनले आहात. एका बाबांशिवाय इतर कोणाचेही मत उच्च ते उच्च असू शकत नाही. उच्च ते उच्च मत आहेच मुळी भगवंताचे. ज्यामुळे पद देखील किती उच्च मिळते. बाबा म्हणतात - ‘आपले कल्याण करून उच्च पद प्राप्त करा, महारथी बना. अभ्यासच केला नाहीत तर पद काय मिळवणार!’ ही आहे कल्प-कल्पांतराची गोष्ट. सतयुगामध्ये दास-दासी सुद्धा नंबरवार असतात. बाबा तर आलेले आहेत तुम्हाला श्रेष्ठ बनविण्यासाठी परंतु अभ्यासच करत नाहीत तर काय पद मिळवणार. प्रजेमध्ये सुद्धा उच्च-निच पदे असतात ना, हे बुद्धीने समजून घ्यायचे आहे. लोकांना समजतही नाही की आपण कुठे जातो. वरती जातो की खाली उतरत जातो. बाबा येऊन तुम्हा मुलांना समजावून सांगत आहेत - कुठे तुम्ही गोल्डन, सिल्व्हर एजमध्ये (सोन्या-चांदीच्या युगामध्ये) होता, आणि कुठे आयर्न एज (लोहयुगामध्ये) आले आहात. या समयी तर मनुष्य, मनुष्याला खातात. आता या सर्व गोष्टी जेव्हा समजतील तेव्हा म्हणतील की, ज्ञान कशाला म्हटले जाते. बरीच मुले एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देतात. चांगल्या-चांगल्या सेंटर्सवरील चांगल्या-चांगल्या मुलांची क्रिमिनल दृष्टी (विकारी दृष्टी) असते. त्यांना फायदा, नुकसान, इज्जतिची पर्वा थोडीच वाटते. मुख्य गोष्ट आहे पवित्रतेची, यावरूनच किती भांडणे होतात. बाबा म्हणतात - ‘हा काम महाशत्रू आहे याच्यावर विजय मिळवा तेव्हाच जगतजीत बनाल.’ देवता संपूर्ण निर्विकारी आहेत ना. पुढे गेल्यावर समजेलच. स्थापना तर होणारच आहे. अच्छा !

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) कधीही ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवून आपली स्थिती खराब करायची नाही. आपल्यामध्ये सफाई ठेवायची आहे. खोट्या गोष्टी ऐकून जळफळाट करायचा नाही, ईश्वरीय मत घ्यायचे आहे.

२) देही-अभिमानी बनण्याचा पूर्ण पुरुषार्थ करायचा आहे, कोणाचीही निंदा करायची नाही. फायदा, नुकसान, इज्जत या गोष्टी लक्षात घेऊन विकारी दृष्टीला नष्ट करायचे आहे. बाबा जे सांगतात ते एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायचे नाही.

वरदान:-
त्रिकालदर्शीच्या सीटवर सेट होऊन प्रत्येक कर्म करणारे शक्तिशाली आत्मा भव

जी मुले त्रिकालदर्शीच्या सीटवर सेट होऊन प्रत्येक वेळी, प्रत्येक कर्म करतात, ते जाणतात कि गोष्टी तर खूप येणार आहेत, होणार आहेत, भले मग स्वतः द्वारे, किंवा इतरांद्वारे, किंवा माये द्वारे नाहीतर प्रकृती द्वारे सर्व प्रकारे परिस्थिती तर येतीलच आणि येणारच आहेत परंतु स्व-स्थिती शक्तिशाली असेल तर त्यापुढे पर-स्थिती काहीच नाही. फक्त प्रत्येक कर्म करण्या अगोदर त्याचे आदि-मध्य-अन्त तिन्ही काळ चेक करून, समजून घेऊन नंतर मग काहीही करा तर शक्तिशाली बनून परिस्थितीला पार कराल.

बोधवाक्य:-
सर्वशक्ति सम्पन्न आणि ज्ञान सम्पन्न बनणे हेच संगमयुगाचे प्रारब्ध आहे.