15-07-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, योगबलानेच आत्म्यावरील कट (गंज) निघेल, त्यामुळे ‘योग’च्या बाबतीत कधीही निष्काळजीपणा करू नका”

प्रश्न:-
बाबांनी मुलांना बेहदचा वारसा मिळवण्याची कोणती युक्ती सांगितली आहे ज्यामध्ये माया चारी बाजूंनी विघ्न उत्पन्न करते?

उत्तर:-
बाबांनी युक्ती सांगितली आहे की मुलांनो, तुम्ही ब्रह्माकुमार-कुमारी एकाच पित्याची मुले आपसामध्ये भाऊ-बहिणी आहात, तुम्ही कधीही क्रिमिनल एसॉल्ट (अनैतिक कृत्य) करू शकत नाही. भाऊ-बहीण विकारामध्ये जाऊ शकत नाहीत, तुम्हाला शिवबाबांच्या मतावर चालून बेहदचा वारसा घ्यायचा आहे. परंतु माया काही कमी नाहीये, चारी बाजूंनी यातच विघ्न उत्पन्न करत राहते. आपण भाऊ-बहीण आहोत, एका बाबांकडून वारसा घेत आहोत, हे विसरून जातात.

गीत:-
तुम्हें पाके हमने...

ओम शांती।
गाण्याचा एक शब्दच पुरेसा आहे. मुले जाणतात बेहदच्या बाबांकडून बेहदचा वारसा मिळतो आणि कल्प-कल्प मिळतो. हे देखील मुले जाणतात की बेहदचा वारसा बरोबर भारताला मिळाला होता. आता तो नाहीये पुन्हा मिळत आहे. तुम्ही पाहता - आता तर स्वर्गाचा वारसा नाहीये, रावणाद्वारे नरकाचा शाप मिळत आहे. शापामुळे माणसे दुःखी होतात. वर अर्थात वारशामुळे सुखी होतात. आता ब्राह्मण मुले जाणतात ते आहेत बेहदचे निराकार बाबा आणि प्रजापिता ब्रह्मा आहेत बेहदचे साकार बाबा. बेहदचे साकार बाबा, प्रजापिता ब्रह्माशिवाय इतर कोणीही असू शकत नाही. जरी गांधीजींना ‘बापूजी’ म्हणत होते परंतु नियमानुसार संपूर्ण मानव सृष्टीचे ते बापूजी असू शकत नाहीत. संपूर्ण निराकारी जगाचे बापूजी आहेत - शिव. आता तुम्ही मुले जाणता आपण शिवबाबांचे बनलो आहोत. शिवबाबांनी येऊन आम्हाला आपले बनवले आहे - वारसा देण्यासाठी. मधुबनला येतात कशासाठी? शिवबाबांना भेटण्यासाठी, परंतु ते निराकार आहेत. फक्त शिवबाबा म्हटल्याने समजणार नाही म्हणून म्हटले जाते बाप-दादा. शिवबाबा आणि ब्रह्मा दादा. दादांचे नाव वेगळे आहे, बाबांचे नाव वेगळे आहे. ते निराकार, सर्वांचे पिता देखील आहेत, तर सर्वांचे आजोबा देखील आहेत. सर्व मुलांना बापदादांकडून जरूर वारसा मिळतो. बेहदच्या बाबांकडून सर्वांना वारसा मिळतो. ते बाबाच सर्वांचे दुःख हर्ता, सुख कर्ता आहेत. सतयुगामध्ये कोणताही मनुष्य दुःखी असू शकत नाही. नाव आहे स्वर्ग, ते आहेत हेवन (स्वर्ग) स्थापन करणारे गॉड फादर. भारत सर्वात जुना आहे तर जरूर सर्वात नवीन होता तेव्हाच तर आता सर्वात जुना झाला आहे. सतयुग, कलियुग भारतालाच म्हटले जाते. खरोखर भारत स्वर्ग होता. हे लक्ष्मी-नारायण राज्य करत होते. हे बुद्धीमध्ये आहे. आता तुम्ही लक्ष्मी-नारायणच्या मंदिरामध्ये जाल तेव्हा लगेच बुद्धीमध्ये येईल की यांना हा वारसा कसा मिळाला! हे पूजनीय कसे बनले! कधी राज्य केले? कोणाद्वारे राज्य मिळवले? हे सर्व बुद्धीमध्ये येईल. पूर्वी लक्ष्मी-नारायणाच्या मंदिरात जात होते, माळा जपत होते. ऑक्यूपेशन बद्दल काहीच माहिती नव्हती. आता फक्त तुमच्या बुद्धीमध्ये आहे ते देखील नंबरवार. तुम्ही आता लक्ष्मी-नारायणाच्या मंदिरात जाऊन उभे राहाल तर आनंदीत व्हाल. बुद्धीमध्ये आहे यांनी हे प्रारब्ध कसे मिळवले होते. संगमयुगावरच मिळवले कारण संगमावरच जुनी दुनिया परिवर्तीत होणार आहे. संगमावरच बाबांनी येऊन राजयोग शिकवला होता. तुम्ही हे देखील जाणता की, अनेक जन्मांतील शेवटच्या जन्मामध्ये खरोखर हे ब्रह्मा होते. ब्रह्मा द्वारे विष्णूपुरीची स्थापना होते. हे लक्ष्मी-नारायणच मागच्या जन्मामध्ये बरोबर ब्रह्मा-सरस्वती होते. ब्रह्मासोबत ब्राह्मण-ब्राह्मणी देखील असतील. सतयुगामध्ये लक्ष्मी-नारायणाची राजधानी होती ना. जरूर प्रजापिता देखील असेल. तुम्ही जाणता आपण पुरुषार्थ करत आहोत, ज्यांनी कल्पापूर्वी पुरुषार्थ केला आहे तो आपण साक्षी होऊन पाहतो. एक असते राजघराणे, दुसरे असते प्रजा घराणे. त्यांच्यामध्ये देखील कोणी खूप श्रीमंत असतात कोणी कमी. राजांमध्ये देखील कोणी खूप श्रीमंत, कोणी कमी श्रीमंत असतात. तुम्ही लक्ष्मी-नारायणाच्या मंदिरात कोणालाही समजावून सांगू शकता की यांनी हे राज्य कसे मिळवले. आता पुन्हा तेच आपले राज्य भाग्य घेत आहेत, राजधानी स्थापन होत आहे. किती सोपे आहे. ‘अंबा’ कोण आहे - हे देखील जाणत नाहीत. तुम्ही म्हणाल ही तर ‘जगत-अंबा’ आहे. कल्पापूर्वी देखील जगत-अंबा, जगत-पिता होते. त्यांची आपण संतान होतो. संगमावर बाबा राजयोग शिकवत आहेत. जगत-अंबाची मुले देखील भरपूर आहेत. परंतु इतक्या सर्वांना तर बसवू शकत नाही.

आता तुम्हाला ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे. बाबा ज्ञानाचा सागर आहेत तर जरूर मुलांना ज्ञानच देतील. त्यांना ना मनुष्य, ना देवता म्हटले जाते. त्यांना परमात्माच म्हटले जाते. तुम्ही कोणाच्याही मंदिरामध्ये जाल तर त्यांची बायोग्राफी (जीवन चरित्र) सांगू शकता. रामाबद्दलही तुम्ही समजावून सांगू शकता. चंद्रवंशी घराणे आता स्थापन होत आहे. ब्रह्मा द्वारे ब्राह्मणांचा देखील धर्म स्थापन होतो. ब्रह्मांचे नाव किती प्रसिद्ध आहे. ब्रह्मा द्वारे बाबा, ब्राह्मणांना रचतात. तुम्ही ब्रह्माकुमार-कुमारी असल्यामुळे जाणता आपण एकाच पित्याची मुले आपसामध्ये भाऊ-बहिणी आहोत. मग आपण क्रिमिनल एसॉल्ट (अनैतिक कृत्य) करू शकत नाही. भाऊ-बहीण विकारामध्ये जाऊ शकत नाहीत. बाबांनी ही युक्ती रचली आहे - ड्रामानुसार तुम्ही देखील ब्रह्माकुमार, आम्ही सुद्धा ब्रह्माकुमारी. खरेतर संपूर्ण दुनिया बी. के. (ब्रह्माकुमार-कुमारी) आहे. परंतु जाणत नाहीत. आपण शिवबाबांच्या मताने बेहदचा वारसा घेत आहोत. माया सुद्धा काही कमी नाही. चारी बाजूंनी विघ्न उत्पन्न करत राहते. आपण भाऊ-बहिणी आहोत, एकाच पित्याकडून वारसा घेत आहोत, हे विसरून जातात. हे तर व्यवस्थित समजता, सतयुगामध्ये एकच धर्म असतो. बाकी सर्व धर्म नष्ट होणार आहेत. हे देखील मुले जाणतात, ही काही नवीन गोष्ट नाहीये. दर ५ हजार वर्षांनंतर हे चक्र फिरते. तिथी-तारीख देखील लिहिलेली आहे. हे देखील बुद्धीमध्ये राहिले पाहिजे की, आपण शिवबाबांकडून या युक्तीने वारसा घेत आहोत. लक्ष्य तर मिळाले आहे ना. बाबांची आठवण करून बाबांकडून वारसा घ्यायचा आहे. आठवण अर्थात योगबलानेच आत्म्यावरील कट (गंज) निघेल. यात कोणतीही चूक होऊ नये, म्हणून मुरल्या मिळतात. पक्का निश्चय-बुद्धी असेल तर मग तो कुठेही गेला तरी चालेल. समजा मुरली मिळाली नाही, तरी देखील बुद्धीमध्ये तर आहे ना - आपण बाबांचे बनलो आहोत. बाबांनी समजावून सांगितले आहे, तुमची आत्मा तमोप्रधान बनली आहे, आता तुम्ही बाबांची आठवण करा तर तमोप्रधानापासून सतोप्रधान बनाल. हा महामंत्र एक बाबाच सांगतात इतर कोणीही सांगू शकणार नाही. बाबाच म्हणतात, ‘गोड-गोड मुलांनो, आठवणीच्या बळाद्वारेच तुम्हाला तमोप्रधाना पासून सतोप्रधान बनायचे आहे. हे शब्द आहेत परंतु कोणाच्याच लक्षातही येत नाही. आता तुम्ही समजता - खरोखर, कल्पापूर्वी देखील बाबांनी हेच शब्द म्हटले होते की, ‘देहाच्या सर्व धर्मांना सोडून स्वतःला आत्मा समजा’. हे सर्व देहाचे धर्म आहेत ना. सर्वांचे पिता एकच आहेत. सर्व आत्मे त्या एका बाबांना बोलावतात. पोप देखील गॉडची आठवण करतात. म्हणतात - ‘ओ गॉडफादर, दया करा. या मनुष्यांच्या क्रोधी बुद्धीला परिवर्तित करा म्हणजे मग हे आपसामध्ये भांडणार नाहीत’. आठवण तर त्या पित्याचीच करणार ना, दुसऱ्या कोणाची आठवण करत नाहीत. शिवबाबांनाच बोलावतात की, येऊन पतितांना पावन बनवा. पावन बनले तर मग या छी-छी (पतित) रावणाच्या दुनियेमध्ये राहू शकणार नाहीत, मग जरूर नवीन दुनिया पाहिजे. कलियुग बदलून सतयुग तर होणारच ना. परंतु एवढे सुद्धा समजत नाही. एक डॉक्टर आला होता - म्हणत होता कलियुग तर कलियुगच चालत राहील. अरे, सदैव कलियुगच कसे चालेल? कलियुग काही चांगले आहे का! समजतात थोडेच फक्त भावना आहे तर इतरांना घेऊन येतात. त्यांना तीर लागत नाही आणि त्यांच्यासोबत येणाऱ्या दुसऱ्या कोणाला तीर लागला तरीही काही ना काही दलाली मिळेलच. स्वर्गामध्ये तर जातील. बाबांकडून येऊन थोडे जरी ऐकले तरी देखील स्वर्गामध्ये जरूर जातील. तरीही हेवनली गॉड फादरच्या सन्मुख येऊन बसले आहेत. बाबा समजावून सांगत आहेत - मी सर्वांचा पिता आहे ना. शिवबाबा कसे येतील, यावर कोणाचाच विश्वास बसत नाही. अरे, आत्मा येऊ शकते तर मी का येणार नाही? आत्मा एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरामध्ये जाऊ शकते, तर मी येऊ शकत नाही काय? नाहीतर मी कसा येणार! बोलावतात देखील - ‘हे पतित-पावन बाबा, येऊन पतितापासून पावन बनवा’. बाबा म्हणतात, मी येतोच भारतामध्ये. कल्प-कल्पाच्या संगमावर एकदाच येतो. तुम्ही जेव्हा ८४ जन्म पूर्ण करता तेव्हा मी येतो. तुम्हा मुलांना निश्चय आहे की, बाबा पुन्हा वारसा देण्यासाठी आलेले आहेत. बाबा म्हणतात - माझा धंदाच आहे - जुन्या दुनियेला परिवर्तित करून नवीन दुनिया स्थापन करणे, म्हणून गायले गेले आहे - नवीन दुनियेची स्थापना, जुन्या दुनियेचा विनाश, आणि नंतर मग तुम्ही पालना कराल. ज्ञानाचा प्रकाश मिळाला आहे ना. कालीचे मंदिर पाहाल तर कळेल हे खोटे चित्र आहे. काली बरोबर जगदंबा आहे. परंतु असे भयानक रूप नाहीये. बंगालमध्ये काली समोर बळी देतात, परंतु जाणत काहीच नाहीत. जगत-अंबेच्या मंदिरामध्ये लाखोंनी येतात. नेहमी जणू जत्राच असते. छोटीशी मूर्ती ठेवली आहे ना. नाव ठेवले आहे जगत-अंबा. आता जगत-अंबा तर एकच असायला हवी. सिंधमध्ये कालीचे मंदिर कसे बनवले होते. एकदा किल्ल्यात बॉम्बस्फोट झाला तेव्हा फकिराने सांगितले की, काली माता कोपली आहे; बस्स, त्याने जाऊन तिथे कालीचे मंदिर बांधले. आता काली आहे कोण! काहीच जाणत नाहीत. तुम्हाला आता नॉलेज मिळाले आहे, अशी कोणतीही गोष्ट नाही ज्याला तुम्ही जाणत नाही. तुम्ही समजता, बाबांकडून वारसा घेत आहोत तर पूर्ण पुरुषार्थ केला पाहिजे ना.

पहिल्या नंबरचे दुःख तेव्हा सुरू होते जेव्हा कुमार-कुमारी लग्न करतात. तुम्हाला तर लग्न करण्याचा कधी विचार सुद्धा येता कामा नये. आता बाबा म्हणतात - हे रावण राज्य नष्ट होणार आहे. हा आहे विकारी गृहस्थ-व्यवहार. देवी-देवतांसाठी गायन करत राहतात. हे कोणालाच ठाऊक नाही की या देवतांना निर्विकारी बनविणारा कोण आहे! सतयुग आहे संपूर्ण निर्विकारी दुनिया. शास्त्रांमध्ये मग असे दाखवले आहे की तिथेही विकार होते. परंतु ते तर आहेच व्हाइसलेस वर्ल्ड (निर्विकारी दुनिया); विकारी दुनिया आणि निर्विकारी दुनिया यामध्ये किती अंतर आहे. या गोष्टी दुसऱ्या कोणाच्याही बुद्धीमध्ये नाहीत. तुम्ही जाणता या लक्ष्मी-नारायणाचे जेव्हा राज्य होते तेव्हा किती थोडे मनुष्य होते. एकच धर्म होता नंतर मग त्याची वृद्धी झाली आहे. चक्र (प्रदक्षिणा) देखील पूर्ण फिरावे लागेल, तेव्हाच म्हणणार की पूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घातली. समुद्राला काही प्रदक्षिणा घालू शकत नाही. सतयुगामध्ये फार थोडे असतात, तर किती कमी जमीन व्यापतात. आता मनुष्य सृष्टीची हद पूर्ण होणार आहे. वर (परमधाम मध्ये) थोडे आत्मे जे आहेत - ते देखील येत राहतात. लोकसंख्या वाढतच राहते. जेव्हा तिथून आत्मे येणे सुद्धा बंद होईल, तुम्ही कर्मातीत अवस्थेला प्राप्त कराल त्यानंतर मग आत्म्यांना शरीर सोडून जायचे आहे. त्यांचे येणे आणि तुमचे जाणे एकाच वेळी घडेल. ते थोडे-थोडे येत राहतात. समजून घेण्यासारखी गोष्ट आहे ना. सर्वात आधी आपण तिथे जाऊन राहणार. आपण असताना तिथे दुसरे कोणीही असता कामा नये. या विस्तृत गोष्टी आहेत. तरीही बाबा मुलांना सांगतात - अच्छा, आपल्या लाडक्या बाबुलची आठवण करा. तुमचा फायदा आहे बाबांची आठवण करण्यामध्ये. हा (या दुनियेतील) इतिहास-भूगोल तर मनुष्य खूप वाचतात. खूप दूरपर्यंत जातात. चंद्रावर देखील जातात. ही आहे विज्ञानाची घमेंड. अति मध्ये जात आहेत. चंद्रावर काही अस्तित्व थोडेच आहे. तुम्ही तर सूर्य-चंद्राच्याही पलीकडे निघून जाता. हे नॉलेज तुमच्या बुद्धीमध्ये आता आहे. तुम्ही समजता - ड्रामा प्लॅन अनुसार बाबा हे सर्व सांगत आहेत. बाबाच म्हणतात - मी तुम्हाला पतितापासून पावन बनवतो. हा माझा पार्ट आहे. भक्तिमार्गामध्ये देखील आमचा हा पार्ट आहे. आहे तर ड्रामाच ना. जसे तुम्ही पार्टधारी आहात, मी सुद्धा पार्टधारी आहे. माझे काम आहे तुम्हाला पतितापासून पावन बनवणे. जे काही करतात तर त्याची महिमा होते ना. या लक्ष्मी-नारायणाची किती महिमा आहे. परंतु यांना असे लायक कोणी बनवले. हे सुखधामचे मालक होते. आता तर अनेक प्रकारची कितीतरी दुःखं आहेत. आज कोणी मेले, भांडण झाले, जरी कोणाकडे लाख, करोड, अब्ज आहेत, परंतु जर एखादा आजार वगैरे झाला, तर काय करतील! बिर्ला कडे किती पैसा आहे! एका जन्मामध्ये पैसा पाहायला मिळतो, परंतु असा कोणीही नाही ज्याला काहीच दुःख नाही. कोणत्या ना कोणत्या प्रकारचे दुःख सर्वांनाच असते. आता तर हे पैसे इत्यादी सर्व मातीमोल होणार आहेत. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) कर्मातीत अवस्थेला प्राप्त करून परत घरी जायचे आहे परंतु जाणार तेव्हाच जेव्हा आत्म्यांचे येणे बंद होईल, या विस्तृत गोष्टी लक्षात ठेवून एका बाबुलची प्रेमाने आठवण करायची आहे.

२) तुम्हाला ज्ञानाचा प्रकाश मिळाला आहे त्यामुळे निश्चयबुद्धी बनून बाबांकडून पूर्ण वारसा घ्यायचा आहे. कुठेही राहत असताना आठवणीच्या बळाद्वारे आत्म्याला तमोप्रधानापासून सतोप्रधान बनविण्याचा पुरुषार्थ करायचा आहे.

वरदान:-
स्वमानामध्ये स्थित राहून विश्वाद्वारे सन्मान प्राप्त करणारे, देह-अभिमान मुक्त भव

शिक्षणाचा मूळ उद्देश आहे - देह-अभिमानापासून न्यारे होऊन देही-अभिमानी बनणे. या देह-अभिमानापासून न्यारे अथवा मुक्त होण्याची विधी हीच आहे - सदैव स्वमानामध्ये स्थित राहणे. संगमयुगाचे आणि भविष्यातील जे अनेक प्रकारचे स्वमान आहेत त्यापैकी कोणत्याही एका स्वमानामध्ये स्थित राहिल्याने देह-अभिमान नष्ट होत जाईल. जो स्वमानामध्ये स्थित राहतो त्याला स्वतःहून मान प्राप्त होतो. सदा स्वमानामध्ये राहणारेच विश्व महाराजन बनतात आणि विश्व त्यांना सन्मान देते.

बोधवाक्य:-
जशी वेळ तसे स्वतःला मोल्ड करणे (स्वतःला घडवणे) - हेच रीयल गोल्ड बनणे आहे.

हे अव्यक्त इशारे - ज्वालास्वरूप स्थितीमध्ये राहून शक्तिशाली आठवणीचा अनुभव करा.

आता निर्भय ज्वालामुखी बनून प्रकृती आणि आत्म्यांमध्ये जे तमोगुण आहेत त्याला भस्म करा. तपस्या अर्थात ज्वाला स्वरूप आठवण, या आठवणीद्वारेच माया अथवा प्रकृतीचे विक्राळ रूप शीतल होईल. तुमचा तिसरा नेत्र, ज्वालामुखी नेत्र मायेला शक्तिहीन करेल.