15-09-24    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   31.12.2001  ओम शान्ति   मधुबन


“या नवीन वर्षामध्ये ‘सफलता भव’च्या वरदानाद्वारे बाबा आणि स्वत:च्या प्रत्यक्षतेला समीप आणा”


आज नवयुगाचे रचता आपल्या मास्टर नवयुग रचता मुलांसोबत नवीन वर्ष साजरे करण्यासाठी आले आहेत. नवीन वर्ष साजरे करणे, हे तर विश्वामध्ये सर्वजण साजरे करतात. परंतु तुम्ही सर्व नवीन युग बनवत आहात. नवीन युगाचा आनंद प्रत्येक मुलाला आहे. जाणता की नवीन युग आता आले की आले. दुनियावाल्यांचे नवीन वर्ष एक दिवस साजरा करण्यासाठी असते आणि तुम्हा सर्वांचे नवीन युग संपूर्ण संगमयुगभर साजरे करण्यासाठी आहे. दुनियावाले नवीन वर्षामध्ये आनंद साजरा करतात, एकमेकांना गिफ्ट देतात. ते गिफ्ट देखील काय आहे! थोड्यावेळासाठी ते गिफ्ट असते. नवयुग रचता बाबा तुम्हा सर्व मुलांसाठी कोणती गिफ्ट आणतात? गोल्डन गिफ्ट, ज्या गोल्डन गिफ्टमुळे अर्थात गोल्डन युगामध्ये सर्वकाही स्वतःच गोल्डन बनते, नवीन बनते. थोड्या वेळानंतर नवीन वर्ष सुरू होईल परंतु सर्व नवीन होणार नाही. तुमच्या नवीन युगामध्ये प्रकृती देखील नवीन बनेल. आत्मा देखील नवीन वस्त्र (शरीर) धारण करेल. प्रत्येक वस्तू नवीन अर्थात सतोप्रधान गोल्डन एजवाली असेल. तर नवीन वर्ष साजरे करत असताना तुमच्या मनामध्ये, बुद्धीमध्ये नवीन युगाचीच आठवण येत आहे. नवीन युग लक्षात आहे ना, आजच्या दिवशी नवीन वर्ष आठवते आहे?

बापदादा आधी मुबारक देतात नवीन युगाची आणि त्यासोबत मुबारक देतात नवीन वर्षाची, कारण तुम्ही सर्व नवीन वर्ष साजरे करण्यासाठी आला आहात ना! साजरे करा, खूप साजरे करा. अविनाशी गिफ्ट जी बापदादांकडून मिळाली आहे, त्याची अविनाशी मुबारक (शुभेच्छा) साजरी करा. सदैव एकमेकांना शुभ भावनेची मुबारक द्या. हीच खरी मुबारक आहे. मुबारक जेव्हा देता तेव्हा स्वतः देखील खुश होता आणि दुसरे देखील खुश होतात. तर खऱ्या मनाची मुबारक (शुभेच्छा) आहे - एकमेकांप्रति हृदयापासून शुभ भावना, शुभकामनेची मुबारक. ‘शुभ भावना’ ही एक अशी श्रेष्ठ मुबारक आहे जी कोणत्याही आत्म्याची कशीही भावना असेल, चांगली भावना अथवा चांगला भाव नसेलही, परंतु तुमची ‘शुभ भावना’ त्यांचा भाव देखील बदलू शकते, स्वभाव सुद्धा बदलू शकते. तसेही ‘स्वभाव’ शब्दाचा अर्थच आहे - स्व (आत्म्याचा) भाव अर्थात ‘शुभ भाव’. सदैव प्रत्येक आत्म्याला हीच अविनाशी मुबारक देत चला. कोणी तुम्हाला काहीही देवो परंतु तुम्ही सर्वांना शुभ भावना द्या. अविनाशी आत्म्याच्या अविनाशी आत्मिक स्थितीमध्ये स्थित झाल्यामुळे आत्म्याचे परिवर्तन नक्कीच होईल. तर या नवीन वर्षामध्ये कोणती विशेषता करणार? स्वतःमध्ये देखील, सर्वांमध्ये देखील आणि सेवेमध्ये देखील. जेव्हा नावच ‘नवीन वर्ष’ आहे तर काहीतरी नवीनता कराल ना! तर काय नवीनता करणार? प्रत्येकाने आपल्या नवीनतेचा प्लॅन बनविला आहे का आता फक्त नवीन वर्ष साजरे करणार आहात? मिलन साजरे केलात, नवीन वर्ष साजरे केलात, परंतु नवीनतेचा कोणता प्लॅन बनवलात का?

बापदादा प्रत्येक मुलाला या वर्षासाठी विशेष हाच इशारा देत आहेत की समयानुसार आता सर्व मुलांना भले मग इथे साकारमध्ये सन्मुख बसले आहेत किंवा देश-विदेशामध्ये विज्ञानाच्या साधनांद्वारे ऐकत आहेत, बघत आहेत, बापदादा देखील सर्वांना बघत आहेत. सर्वजण खूप आरामात, मजेत बघत आहेत. तर साऱ्या विश्वातील, बापदादांच्या अतिप्रिय अतिगोड मुलांना बापदादा हाच इशारा देत आहेत की “आता आपल्या या ब्राह्मण जीवनामध्ये अमृतवेलेपासून रात्रीपर्यंत बचतीचे खाते वाढवा, जमेचे खाते वाढवा.” प्रत्येकाने आपल्या कामाप्रमाणे आपला प्लॅन बनवा, ब्राह्मण जीवनामध्ये जे काही खजिने मिळाले आहेत, त्या प्रत्येक खजिन्याच्या बचतीचे अथवा जमेचे खाते वाढवा; कारण बापदादांनी आज चारी बाजूंच्या मुलांचा पूर्ण वर्षभराचा रिझल्ट पाहीला. काय बघितले, समजले तर आहे ना. टीचर्सना देखील समजले आहे. डबल फॉरेनर्सना सुद्धा समजले आहे. महारथींना देखील समजले आहे. जमेचे खाते जितके असले पाहिजे तितके… काय म्हणावे? तुम्ही स्वतःच सांगा, कारण बापदादा जाणतात की सर्व खजिने जमा करण्याची वेळ फक्त हा आत्ताचा संगम आहे. या छोट्याशा युगामध्ये जितके जमा केले आहे त्यानुसार सारे कल्प प्रारब्ध प्राप्त करत रहाल. जे तुम्हा सर्वांचे स्लोगन आहे ना - कोणते स्लोगन आहे? ‘अब नहीं तो…’ पुढे काय आहे? ‘अब नहीं तो कब नहीं’. हे स्लोगन डोक्यामध्ये तर चांगलेच लक्षात आहे. परंतु अंतःकरणामध्ये, स्मृतीमध्ये विसरायला देखील होते आणि लक्षात देखील असते. सर्वात मोठ्यात मोठा खजिना या ब्राह्मण जीवनातील श्रेष्ठतेचा आधार आहे - संकल्पाचा खजिना, वेळेचा खजिना, शक्तींचा खजिना, ज्ञानाचा खजिना, बाकी स्थूल धनाचा खजिना तर कॉमन आहे. तर बापदादांनी पाहिले की, तुम्ही प्रत्येक ब्राह्मण जितके श्रेष्ठ संकल्पाच्या खजिन्याद्वारे स्वतःला आणि सेवेला श्रेष्ठ बनवू शकता, त्याला आता आणखी अंडरलाईन करावी लागेल (अजून जास्त लक्ष द्यावे लागेल).

तुम्हा ब्राह्मणांच्या एका श्रेष्ठ संकल्पामध्ये, शुभ संकल्पामध्ये इतकी शक्ती आहे ज्याद्वारे आत्म्यांना भरपूर सहयोग देऊ शकता. संकल्प शक्तीचे महत्व आता आणखी जितके पाहिजे तितके वाढवू शकता. जर सायन्सचे साधन रॉकेट, दूर बसल्या जिथे पाहिजे, जेव्हा पाहिजे, ज्या ठिकाणी पाहिजे तिथे एका सेकंदामध्ये पोहोचवू शकतात. तुमच्या शुभ श्रेष्ठ संकल्पांच्या पुढे हे रॉकेट काय आहे! रिफाईन (श्रेष्ठ) विधीद्वारे कार्यामध्ये लावून तर बघा, तुमच्या विधीची सिद्धी अति श्रेष्ठ आहे. परंतु आता अंतर्मुखतेच्या भट्टीमध्ये बसा. तर या नवीन वर्षामध्ये आपली आपण सर्व खजिन्यांच्या बचतीची स्कीम बनवा. जमेचे खाते वाढवा. पूर्ण दिवसभरामध्ये आपणच आपल्यासाठी अंतर्मुखतेच्या भट्टी करिता वेळ फिक्स करा. आपले आपणच करू शकता, दुसरा करू शकणार नाही.

बापदादा या वर्षाला ‘प्रत्यक्षता वर्षा’च्या आधी ‘सफलता भव’चे वर्ष म्हणतात. सफलतेचा आधार प्रत्येक खजिन्याला सफल करणे. सफल करा, सफलता प्राप्त करा. सफलता प्रत्यक्षतेला स्वतःच प्रत्यक्ष करेल. वाचेची सेवा खूप चांगली केलीत परंतु आता सफलतेच्या वरदानाद्वारे बाबांच्या आणि स्वतःच्या प्रत्यक्षतेला समीप आणा. प्रत्येक ब्राह्मणाच्या जीवनामध्ये सर्व खजिन्यांच्या विपुलतेचा आत्म्यांना अनुभव व्हावा. आजकालचे आत्मे तुमच्या अनुभवी स्वरूपा द्वारे अनुभूती करू इच्छित आहेत. ऐकण्याची अपेक्षा कमी करतात, ते अनुभूतीची जास्त अपेक्षा करतात. ‘अनुभूतीचा आधार आहे - खजिन्यांचे जमेचे खाते’. आता पूर्ण दिवसभरामध्ये अधून-मधून हा आपला चार्ट चेक करा की, सर्व खजिने किती जमा केले? जमेचे खाते पहा, हिशोब काढा. एका मिनिटामध्ये किती संकल्प चालतात? संकल्पाची गती फास्ट आहे ना. किती सफल झाले, किती व्यर्थ गेले? किती समर्थ होते, किती साधारण होते? चेक करण्याची मशीन तर तुमच्याजवळ आहे का नाही? सर्वांकडे चेक करण्याची मशीन आहे? टीचर्सकडे आहे? तुमच्या सेंटर्सवर जसा कम्प्युटर आहे, ई-मेल आहे तसे हे चेकिंग मशीन आहे? डबल फॉरेनर्सकडे आहे? चालू आहे का बंद पडले आहे? पांडवांकडे चेकिंग मशीन आहे? सर्वांकडे आहे, कोणाकडे नसेल तर तसे ॲप्लिकेशन (अर्ज) करा. जसे कुठे ऑफिस उघडतात तेव्हा अगोदरच विचार करतात की ऑफिस बनविण्यापूर्वी, आजकालच्या जमान्यामध्ये कम्प्युटर पाहिजे, ई-मेल पाहिजे, टायपिंग मशीन पाहिजे, झेरॉक्स मशीन पाहिजे. पाहिजे ना? तर ब्राह्मण जीवनामध्ये, तुमच्या अंतःकरणाच्या ऑफिसमध्ये या सर्व मशीन्स आहेत का नाहीत?

बापदादांनी यापूर्वी देखील सांगितले आहे की, बापदादांकडे ‘प्रकृती’ सुद्धा सांगण्यासाठी येते की मी एवररेडी आहे, ‘समय’ देखील ब्राह्मणांना वारंवार बघत राहतो की ब्राह्मण तयार आहेत का? समय पुन्हा-पुन्हा ब्राह्मणांकडे चक्कर मारतो. तर बापदादा विचारत आहेत, हात तर खूप चांगले वर करता, बापदादा देखील खुश होतात. आता असे एव्हररेडी बना जेणेकरून प्रत्येक संकल्प, प्रत्येक सेकंद, प्रत्येक श्वास जो निघून गेला तो ‘वाह-वाह’ असेल. ‘व्हाय’ म्हणणारा नसेल, ‘वाह-वाह’ असेल. आता कधी ‘वाह-वाह’ होते, कधी ‘वाह’च्या ऐवजी ‘व्हाय’ होते. कधी बिंदू लावता, कधी क्वेश्चन मार्क आणि आश्चर्याची मात्रा लागते. तुम्हा सर्वांच्या मनाने देखील म्हणावे की, ‘वाह’! आणि ज्यांच्यापण संबंध-संपर्कामध्ये येता, भले मग ब्राह्मणांच्या असो, नाहीतर सेवा करणाऱ्यांच्या असो नेहमी ‘वाह! वाह!’ शब्दच निघावा. अच्छा.

आज ग्रेट-ग्रेट ग्रँड फादर ब्रह्मा बाबांची एक शुभ आशा होती, ब्रह्माबाबा म्हणाले की, माझ्या ग्रेट-ग्रेट ग्रँड मुलांना एक विशेष गोष्ट सांगायची आहे, ती कोणती? ती आहे, सदैव प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर, एक म्हणजे नेहमी रूहनियतचे (आत्मिक) हास्य असावे, ऐकलेत! व्यवस्थित कान उघडे ठेवून ऐका आणि दुसरे आहे - वाणीमध्ये सदैव मधुरता असावी. एकही शब्द मधुरते शिवाय नसावा. चेहऱ्यावर रूहानियत असावी, वाणीमध्ये मधुरता असावी आणि मन-बुद्धीमध्ये सदैव शुभ भावना, दयाळूपणाची भावना, दातापणाची भावना असावी. प्रत्येक पावलामध्ये फॉलो फादर असावे. तर हे करू शकता का? टीचर्स हे करू शकता? युथ तुम्ही हे करू शकता? (ज्ञानसरोवरमध्ये देश-विदेशच्या युथची रिट्रीट चालली आहे) बापदादांकडे युथ ग्रुपचा रिझल्ट खूप चांगला आला आहे. पद्मगुणा मुबारक. चांगला रिझल्ट आहे. त्यांना अनुभव सुद्धा चांगले झाले आहेत, बापदादा खुश झाले. बापदादांनी अनुभव देखील ऐकले. कोणी ऐकवलेल्या गोष्टी नाहीत, डायरेक्ट बापदादांनी तुमचे अनुभव ऐकले, परंतु आता या अनुभवांना ‘अमर भव’च्या वरदानाने अविनाशी ठेवा. काहीही झाले तरी तुमच्या रुहानी अनुभवांना सदैव पुढे वाढवत चला. कमी करू नका. तीन महिन्यानंतर मधुबनमध्ये या किंवा नका येऊ. तीन महिन्यानंतर परदेशातून तर येणार नाहीत परंतु आपले अकाऊंट (पोतामेल) ठेवा आणि बापदादांकडे पाठवा, बापदादा ठीक करतील. किंवा जे असेल ते पर्सेंटेज देतील. ठीक आहे? हां, एका हाताची टाळी वाजवा. अच्छा.

आज मुबारक देण्याचा दिवस आहे तर आणखी एक खुशखबरी बापदादांनी ऐकली, पाहिली देखील. छोटी-छोटी मुले ताजधारी बनून बसली आहेत. तुम्हाला तर ताज मिळणार, यांना आता मिळाला आहे. उभे रहा. बघा, ताजधारी ग्रुप बघा. ‘बच्चे सदा दिल के सच्चे’. सच्च्या दिलाचे आहात ना! चांगले आहे, मुलांचा रिझल्ट देखील बापदादांना चांगला दिसला. मुबारक आहे. अच्छा.

डबल फॉरेनर्स - यांची पत्रे आणि चिठ्ठ्या देखील पाहिल्या. उत्साहाच्या चिठ्ठ्या आहेत. परंतु एक गोष्ट बापदादांनी बघितली, जी काही-काही चिठ्ठ्यांमध्ये आहे. काहींनी तर खूप चांगल्या उमंग-उत्साहाने परिवर्तन सुद्धा लिहिले आहे, उत्साह देखील लिहिला आहे; परंतु काहीजणांनी आपला थोडासा निष्काळजीपणा दाखवला आहे. कधीही निष्काळजी बनायचे नाही. अलर्ट. बापदादांना एक तर हा निष्काळजीपणा आवडत नाही आणि दुसरे निराश होणे आवडत नाही. काहीही होवो मन मोठे करा. निराश असणाऱ्यांचे मन छोटे असते. आनंदी असणाऱ्यांचे मन मोठे असते. तर निराश व्हायचे नाही, निष्काळजी बनायचे नाही. सदैव उमंग-उत्साहामध्ये उडत रहा. बापदादांना डबल विदेशींमध्ये अरब-खरब इतक्या आशा आहेत. डबल फॉरेनर्स असा प्रभाव दाखवतील की इंडियातील आत्मे चकित होतील. येणार आहे, तो देखील दिवस येणार आहे, लवकर येणार आहे. येणार आहे ना? तो दिवस येणार आहे ना? तो दिवस येणार? (लवकरात लवकर येणार) होय तरी म्हणा. बापदादा ॲडव्हान्स मुबारकच्या थाळ्या भरभरून देत आहेत. इतकी हिम्मत बापदादा डबल फॉरेनर्समध्ये बघत आहेत, असे आहे ना? फॉरेनमध्ये खूप आशा आहेत. चांगले आहे. युथ देखील चांगले आहेत, प्रवृत्तीवाले सुद्धा भरपूर आहेत, कुमारी देखील खूप आहेत, चमत्कारच चमत्कार आहे. ठीक आहे. हा सिंधी परिवार तुम्ही बोला, कोणता चमत्कार करणार? निमित्त मात्र सिंधी आहेत परंतु आहेत ब्राह्मण. काय करणार, बोला? (बाबांचे नाव प्रसिद्ध करणार) केव्हा करणार? (या वर्षामध्ये) तुमच्या मुखामध्ये गुलाबजामुन. हिम्मतवाले आहात. (तुमचे वरदान सोबत आहे). वरदाता सोबत आहे तर वरदानाची काय मोठी गोष्ट आहे. अच्छा.

जे या कल्पामध्ये पहिल्यांदा आले आहेत, ते उभे रहा. जे पहिल्यांदा आले आहेत, त्या मुलांना बापदादा म्हणतात की मागून आला आहात परंतु पुढे जायचे आहे, इतके पुढे जा जेणेकरून सर्व तुम्हाला बघून खुश होतील आणि सर्वांच्या मुखातून हाच शब्द निघेल - ‘कमाल आहे, कमाल आहे, कमाल आहे’, अशी हिम्मत आहे? पहिल्यांदा येणाऱ्यांमध्ये हिम्मत आहे ना! नवीन वर्ष साजरे करण्यासाठी आला आहात, तर नवीन वर्षामध्ये काही कमाल करणार ना! तरी देखील बापदादांना सर्व मुले अतिप्रिय आहेत. तरी देखील खूप हुशारीचे काम केले आहे, टू लेटच्या अगोदर आला आहात. आता तरीदेखील या हॉलमध्ये बसण्याची सीट तर मिळाली आहे ना! राहण्यासाठी पलंग किंवा जमीन तर मिळाली आहे ना! आणि जेव्हा टू लेट चा बोर्ड लावला जाईल तेव्हा रांगेमध्ये उभे करावे लागेल, म्हणूनच तर चांगल्या वेळेला बापदादांना ओळखले, हे हुशारीचे काम केले. अच्छा.

विश्वातील चारी बाजूंच्या सर्व सफलता मूर्त मुलांना, सर्व सफल करणाऱ्या तीव्र पुरुषार्थी मुलांना, सदैव आपल्या अकाऊंटला (पोतामेलला) चेक करणाऱ्या चेकर आणि भविष्यातील मेकर अशा श्रेष्ठ आत्म्यांना, सदैव आपल्या प्रत्येक पावलामध्ये बाबांना प्रत्यक्ष करणाऱ्या ग्रेट-ग्रेट ग्रँडफादरच्या सर्व ग्रँड सन्सना बाप आणि दादांची खूप-खूप-खूप-खूप प्रेमपूर्वक आठवण, मुबारक आणि नमस्ते.

बापदादांनी देश-विदेशातील सर्व मुलांना नवीन वर्षाची मुबारक दिली:-

चारही बाजूंच्या सफलतेच्या तारकांसाठी हा संगमाचा काळ म्हणजे जुन्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा, संगमाचा काळ अर्थात निरोप घेणे देखील आहे, तर शुभेच्छा देणे देखील आहे. तर नेहमीच यशस्वी आहात आणि यशस्वी रहाल. कधीही अपयशाचे नामोनिशाण राहणार नाही. बापदादांचे अति सिकीलधे, अतिप्रिय, अति गोड, नयनांचे नूर आहात. सर्वांनी नंबरवन बनायचेच आहे, या दृढ संकल्पाने प्रत्येक पाऊल बापदादांसमान उचलत रहा, पदम गुणा, अरब-खरब पटीने मुबारक आहे, मुबारक आहे मुबारक आहे. बापदादांच्या अति अमूल्य डायमंड्सना, डायमंड मॉर्निंग, डायमंड मॉर्निंग, डायमंड मॉर्निंग. ओम् शांती.

वरदान:-
सेवेच्या उमंग-उत्साहाद्वारे सेफ्टीचा अनुभव करणारे मायाजीत भव

जी मुले स्थूल कामासोबत रूहानी सेवेसाठी धावपळ करतात, एव्हररेडी राहतात तर हा सेवेचा उमंग-उत्साह देखील सेफ्टीचे साधन बनते. जे सेवेमध्ये मग्न असतात ते मायेपासून वाचतात. माया देखील बघते यांच्याकडे फुरसतच नाही आहे, तर ती देखील परत निघून जाते. ज्या मुलांचे बाबांवर आणि सेवेवर प्रेम आहे त्यांना एक्स्ट्रा हिम्मतीची मदत मिळते, ज्यामुळे सहजच मायाजीत बनतात.

सुविचार:-
ज्ञानाला आणि योगाला आपल्या जीवनाचे नेचर बनवा तर जुने नेचर बदलून जाईल

सूचना:- आज महिन्याचा तिसरा रविवार आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे, सर्व ब्रह्मावत्स संघटित रूपामध्ये सायंकाळी ६.३० ते ७.३० वाजेपर्यंत विशेष संतुष्टमणी बनून वायुमंडळामध्ये संतुष्टतेची किरणे पसरवा. असंतुष्ट आत्म्यांना संतुष्ट राहण्याची शक्ती द्या, मनसा सेवा करा.