15-09-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड मुलांनो, तुम्ही
आपले भाग्य भविष्य नवीन दुनियेकरिता बनवत आहात, हा तुमचा राजयोग आहेच मुळी नवीन
दुनियेकरिता”
प्रश्न:-
भाग्यवान
मुलांची मुख्य लक्षणे कोणती असतील?
उत्तर:-
१) भाग्यवान
मुले नियमानुसार श्रीमतावर चालतील. कोणतेही कार्य कायद्याविरुद्ध करून स्वतःला अथवा
बाबांना फसवणार नाहीत. २) त्यांना अभ्यास करण्याची खूप आवड असेल. ज्ञान समजावून
सांगण्याची देखील आवड असेल. ३) ते पास विद् ऑनर बनून स्कॉलरशिप घेण्याचा पुरुषार्थ
करतील. ४) कधीही कोणाला दुःख देणार नाहीत. कधीही कोणते उलटे कर्म करणार नाहीत.
गीत:-
तकदीर जगाकर
आई हूँ…
ओम शांती।
गोड-गोड रूहानी
मुलांनी गाणे ऐकले. नवीन असणाऱ्यांनी देखील ऐकले, तसेच जुने असणाऱ्यांनी देखील ऐकले,
कुमारींनी देखील ऐकले. ही पाठशाळा आहे. पाठशाळेमध्ये कोणते ना कोणते भाग्य
बनविण्याकरिता जातात. तिथे (लौकिक दुनियेमध्ये) तर अनेक प्रकारचे भाग्य आहे, कोणी
सर्जन बनवण्याचे, कोणी बॅरिस्टर बनवण्याचे भाग्य बनवतात. भाग्याला एम ऑब्जेक्ट
म्हटले जाते. भाग्य बनविण्याशिवाय पाठशाळेमध्ये काय शिकणार. आता इथे मुले जाणतात
की, आम्ही देखील भाग्य बनवून आलो आहोत, नवीन दुनियेसाठी आपले राज्यभाग्य घेण्यासाठी
आलो आहोत. हा आहे नवीन दुनियेकरिता राजयोग. ते (दुनियावाले) जुन्या दुनियेकरिता
बॅरिस्टर, इंजिनीयर, सर्जन इत्यादी बनतात. ते बनता-बनता, आता जुन्या दुनियेचा वेळ
फार थोडा राहिला आहे, त्याचा तर अंत निश्चित आहे. ते भाग्य आहे या मृत्यूलोक करिता,
या जन्माकरिता. तुमचे शिक्षण आहे नवीन दुनियेकरिता. तुम्ही नवीन दुनियेकरिता भाग्य
बनवून आला आहात. नवीन दुनियेमध्ये तुम्हाला राज्य-भाग्य मिळेल. कोण शिकवत आहेत?
बेहदचे बाबा, ज्यांच्याकडूनच वारसा प्राप्त करायचा आहे. जसे डॉक्टर लोकांना
डॉक्टरीचा वारसा आपल्या शिक्षणाद्वारे मिळतो. ठीक आहे, जेव्हा वृद्ध होतात तेव्हा
मग गुरूकडे जातात. काय इच्छा असते? म्हणतात - आम्हाला शांतीधाममध्ये जाण्याची शिकवण
द्या, आम्हाला सद्गती द्या. इथून बाहेर काढून शांतीधाममध्ये घेऊन जा. पित्याकडूनच
या जन्मासाठी वारसा मिळतो. बाकी गुरु कडून तर काहीही मिळत नाही. टीचरकडून काही ना
काही वारसा प्राप्त करतात कारण आजीविका तर पाहिजे ना. वडिलांचा वारसा असताना देखील
शिकतात की आपण देखील कमाई करावी. गुरु कडून तर काहीच कमाई होत नाही. होय, काहीजण
गीता इत्यादीचा चांगल्या प्रकारे अभ्यास करून मग गीतेवर भाषण इत्यादी करतात. हे
सर्व आहे अल्पकालीन सुखाकरिता. आता तर या मृत्यूलोकाचा अंत जवळ आला आहे. तुम्ही
जाणता, आपण नवीन दुनियेसाठीचे भाग्य बनविण्याकरिता आलो आहोत. ही जुनी दुनिया नष्ट
होणार आहे. वडिलांची अथवा आपली संपत्ती देखील सर्व भस्म होणार आहे. रिकाम्या
हातांनीच जातील. आता तर कमाई पाहिजे नवीन दुनियेकरिता. जुन्या दुनियेतील मनुष्य तर
ती करू शकणार नाहीत. नवीन दुनियेची कमाई करवून देणारे आहेतच मुळी शिवबाबा. इथे
तुम्ही नवीन दुनियेसाठी भाग्य बनविण्याकरिता आला आहात. ते बाबा तुमचे पिता देखील
आहेत, टीचर देखील आहेत, गुरु देखील आहेत. आणि ते, भविष्यासाठी कमाई कशी करावी हे
शिकविण्याकरिता संगमावरच येतात. आता या जुन्या दुनियेमध्ये तर फार थोडे दिवस आहेत.
या दुनियेतील मनुष्य हे जाणत नाहीत.
तुम्ही मुले जाणता - नवीन दुनियेकरिता हे आमचे पिता, टीचर, सद्गुरु आहेत. बाबा
येतातच शांतीधाम, सुखधाममध्ये घेऊन जाण्याकरिता. जे भाग्य बनवत नाहीत, ते जणू काहीही
समजत नाहीत. एकाच घरामध्ये पत्नी शिकते (ज्ञान घेते) आणि पती शिकत नाही, मुले
शिकतील आई-वडील शिकणार नाहीत; असे होत राहते. सुरुवातीला परिवारच्या परिवार आले.
परंतु मायेची वादळे लागल्याने आश्चर्यवत् सुनन्ती, कथन्ती आणि बाबांना सोडून निघून
गेले. गायले देखील आहे - ‘आश्चर्यवत् सुनन्ती, कथन्ती बाबांचे बनन्ती, ज्ञान
शिकवन्ती आणि तरी देखील… अरेरे, ड्रामाचा चमत्कार! ड्रामाचीच गोष्ट झाली ना. बाबा
स्वतः म्हणतात - ‘अहो ड्रामा, अहो माया’. कोणाला सोडचिठ्ठी दिली! पती-पत्नी
एकमेकांना सोडचिठ्ठी देतात. मुले वडिलांना सोडचिठ्ठी देतात. परंतु इथे तसे नाहीये.
इथे तर सोडचिठ्ठी देऊ शकत नाही. बाबा तर आले आहेत मुलांना
खरी कमाई करवून
देण्याकरिता. बाबा थोडेच कोणाला खड्ड्यात घालतील. बाबा तर आहेतच पतित-पावन, दयाळू.
बाबा येऊन दुःखातून लिबरेट करतात आणि गाईड बनून सोबत घेऊन जाणारे आहेत. असे कोणी
लौकिक गुरु म्हणणार नाहीत की, मी तुम्हाला सोबत घेऊन जाईन. मच्छरांसदृश्य सर्व
जाणार आहेत. तुम्ही मुले चांगल्या प्रकारे जाणता की आता आपल्याला घरी जायचे आहे. हे
शरीर सोडायचे आहे; ‘आप मुये मर गई दुनिया’. फक्त स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण
करायची आहे. हे तर जुने वस्त्र, छी-छी आहे (विकारी आहे). ही दुनिया देखील जुनी आहे.
जसे जुन्या घरामध्ये बसलेले असतात आणि समोर नवीन घर बनत असते तेव्हा वडील देखील
समजतात आणि मुले देखील समजतात की आमच्यासाठी नवीन घर बनत आहे. बुद्धी नवीन घराकडे
निघून जाईल - ‘याठिकाणी हे बनवा, असे करा’. बुद्धी त्याच्यामध्येच गुंतून राहील आणि
मग जुने घर पाडून टाकतात. सर्व आसक्ती जुन्या घरातून निघून नवीन घराशी जोडली जाते.
ही तर आहे बेहद दुनियेची गोष्ट. जुन्या दुनियेमधील मोह काढून टाकायचा आहे आणि नवीन
दुनियेमध्ये मन लावायचे आहे. जाणता ही जुनी दुनिया नष्ट होणार आहे. नवीन दुनिया आहे
- स्वर्ग. त्यामध्ये आपण राज्यपद प्राप्त करतो. जितके योग मध्ये राहाल, ज्ञानाची
धारणा कराल, इतरांना हे ज्ञान समजावून सांगाल तितका आनंदाचा पारा चढेल. खूप मोठी
परीक्षा आहे. २१ जन्मांकरिता वारसा प्राप्त करत आहात. श्रीमंत बनणे तर चांगले आहे
ना. दीर्घायुष्य मिळाले तर चांगले आहे ना. सृष्टी चक्राची जितकी आठवण कराल, जितक्या
जणांना आपसमान बनवाल तितका फायदा आहे. राजा बनायचे असेल तर प्रजा देखील बनवायची आहे.
प्रदर्शनीमध्ये इतकी असंख्य माणसे येतात, ती सर्व प्रजा बनत जाईल कारण या अविनाशी
ज्ञानाचा विनाश होत नाही. बुद्धीमध्ये येईल - पवित्र बनून पवित्र दुनियेचा मालक
बनायचे आहे. रामराज्याची स्थापना होत आहे, रावण राज्याचा विनाश होईल. सतयुगामध्ये
असणारच मुळी देवता.
बाबांनी समजावून सांगितले होते की, लक्ष्मी-नारायणाचे जे चित्र बनवता त्यामध्ये हे
लिहिले पाहिजे की, ‘मागील जन्मामध्ये हे तमोप्रधान दुनियेमध्ये होते आणि आता या
पुरुषार्थाद्वारे तमोप्रधान दुनियेतून सतोप्रधान विश्वाचे मालक बनतील’. राजा-प्रजा
सर्वजण मालक असतात ना. प्रजा देखील म्हणेल - ‘आमचा भारत सर्वात महान आहे’. खरोखर
भारतच सर्वात महान होता. आता नाहीये, परंतु होता जरूर. आता तर अगदीच गरीब बनला आहे.
प्राचीन भारत सर्वात श्रीमंत होता. आपण भारतवासी सर्वात उच्च देवता कुळाचे होतो.
दुसऱ्या कोणालाही देवी-देवता म्हटले जात नाही. आता तुम्ही मुली देखील शिकता तर मग
इतरांना देखील हे ज्ञान समजावून सांगायचे आहे, बरोबर ना. बाबांनी डायरेक्शन दिले आहे
ना. प्रदर्शनी इत्यादीसाठी तार इत्यादी कशी पाठवावी, ते लिहून आणा. तुमच्याकडे
चित्र देखील आहेत, तुम्ही सिद्ध करून सांगू शकता की, त्यांनी (लक्ष्मी-नारायणाने)
हे पद कसे प्राप्त केले. आता पुन्हा शिवबाबांकडून हे पद प्राप्त करत आहेत. त्यांचे
चित्र देखील आहे. ‘शिव’ आहेत - परमपिता परमात्मा. ब्रह्मा, विष्णू, शंकराची देखील
चित्रे आहेत. परमपिता परमात्मा ब्रह्मा द्वारे स्थापना करत आहेत. विष्णुपुरी समोर
उभी आहे, विष्णू द्वारा नव्या दुनियेची पालना होते. विष्णू आहे राधे-कृष्णाची दोन
रूपे. आता गीतेचा भगवान कोणाला म्हणणार? पहिले तर हे लिहा की, गीतेचा भगवान निराकार
शिव आहेत, श्रीकृष्ण नाही. ब्रह्मा सो विष्णु, विष्णु सो ब्रह्मा कसे बनतात. एकाच
चित्रावर समजावून सांगण्यासाठी किती वेळ लागतो. जेव्हा बुद्धीमध्ये ती गोष्ट पक्की
होईल. सर्वप्रथम तर हे समजावून सांगून नंतर मग लिहिले पाहिजे.
बाबा म्हणतात - ब्रह्मा द्वारा तुम्हाला योगबलाने २१ जन्मांचा अधिकार प्राप्त होतो.
शिवबाबा ब्रह्मा द्वारे वारसा देत आहेत. सर्वप्रथम यांची (ब्रह्मा बाबांची) आत्मा
ऐकते. आत्माच धारण करते. मुख्य गोष्ट हीच आहे. चित्र तर शिव बाबांचे दाखवतात. हे
आहेत परमपिता परमात्मा शिव आणि मग प्रजापिता ब्रह्मा तर जरूर पाहिजे. इथे प्रजापिता
ब्रह्माची ब्रह्माकुमार-कुमारी संख्या आहेत. जोपर्यंत ब्रह्माची मुले बनत नाही,
ब्राह्मण बनत नाही तोपर्यंत शिवबाबांकडून वारसा कसा घ्याल. पोटातून जन्म तर होऊ शकत
नाही. हे देखील गायले जाते - मुख-वंशावळी. तुम्ही म्हणाल - आम्ही प्रजापिता
ब्रह्माची मुखवंशावळी आहोत. ते (दुनियावाले) गुरूंचे चेले अथवा फॉलोअर्स असतात. इथे
तर तुम्ही एकालाच पिता, टीचर, सद्गुरु म्हणता. ते देखील त्यांना म्हणता जे निराकार
शिवबाबा ज्ञानाचा सागर, नॉलेजफुल आहेत. सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान देतात. ते
टीचर देखील आहेत. निराकार येऊन साकारद्वारा ऐकवतात. आत्माच बोलते ना. आत्मा म्हणते
- माझ्या शरीराला त्रास देऊ नका. आत्मा दुःखी होते. यावेळी आहे - पतित-आत्मा.
पतितांना पावन बनविणारे परमपिता परमात्मा आहेत. आत्मा बोलावते - ‘हे पतित-पावन’,
‘हे गॉडफादर’. आता एक फादर तर बसलेला आहे तरी देखील मग आठवण कोणाची करतात. आत्मा
म्हणते - हे, मज आत्म्याचे फादर आहेत. ते आहेत शरीराचे फादर. समजावून सांगितले जाते
- आता आत्म्यांचे पिता जे निराकार आहेत ते मोठे की या देहाचा रचयिता साकार पिता जो
आहे तो मोठा? साकार तर निराकारची आठवण करतो. आता जेव्हा विनाश समोर उभा आहे तेव्हा
सर्वांना स्पष्टीकरण दिले जात आहे. पारलौकिक पिता सर्वांना परत घेऊन जाण्यासाठी
अंतालाच येतात. बाकी जे काही आहे ते सर्व नष्ट होणार आहे, याला म्हटलेच जाते -
मृत्यू-लोक. जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा म्हणतात - अमका परलोकमध्ये,
शांतीधाममध्ये गेला. मनुष्यांना हेच ठाऊक नाही की, ‘परलोक’ सतयुगाला म्हटले जाते की
शांतीधामला म्हटले जाते? सतयुग तर इथेच असते परलोक तर शांतीधामला म्हणणार. समजावून
सांगण्यासाठी खूप चांगली युक्ती पाहिजे. मंदिरांमध्ये जाऊन समजावून सांगितले पाहिजे.
हे शिवबाबांचे यादगार आहे, जे शिवबाबा आम्हाला शिकवत आहेत. वास्तविक शिव आहेत -
बिंदू. परंतु बिंदूची पूजा कशी करणार. फळे, फुले इत्यादी कशी वाहता येतील, म्हणून
मग मोठे रूप बनवले आहे. इतके मोठे रूप काही असत नाही. गायले देखील जाते - ‘भ्रकुटी
के बीच चमकता है अजब सितारा…’ मोठी वस्तू असेल तर वैज्ञानिक लगेच त्याला पकडतील.
बाबा म्हणतात - त्यांना परमपिता परमात्म्याचा पूर्ण परिचय मिळालेला नाही आहे; जेव्हा
भाग्य उजळेल, अजून भाग्य उजळलेले नाहीये. जोपर्यंत बाबांना जाणत नाहीत, हे समजत
नाहीत की, आपली आत्मा बिंदू समान आहे. शिवबाबा देखील बिंदू आहेत, मी बिंदूची आठवण
करत आहे. असे समजून आठवण करतील तेव्हा विकर्म विनाश होतील. बाकी, ‘हे दिसते, ते
दिसते…’ याला मायेचे विघ्न म्हटले जाते. आता तर खुशी आहे की, आपल्याला परमात्मा
भेटला आहे, परंतु ज्ञान देखील पाहिजे ना. कोणाला श्रीकृष्णाचा साक्षात्कार होतो
तेव्हा खूप आनंदीत होतात. बाबा म्हणतात - श्रीकृष्णाचा साक्षात्कार करून खूप
आनंदामध्ये डान्स इत्यादी करतात परंतु त्याने काही सद्गती होत नाही. हा साक्षात्कार
अनायासेच होतो. जर व्यवस्थित अभ्यास केला नाही तर प्रजेमध्ये निघून जातील. थोडे जरी
ऐकले असेल तरी कृष्णपुरीमध्ये साधारण प्रजा इत्यादी जाऊन बनतील. आता तुम्ही मुले
जाणता शिवबाबा आम्हाला हे नॉलेज ऐकवत आहेत. ते आहेतच नॉलेजफुल.
बाबांचा आदेश आहे की, पवित्र जरूर बनायचे आहे. परंतु कोणी पवित्रसुद्धा राहू शकत
नाहीत. कधी-कधी पतित देखील इथे लपून येतात. ते आपलेच नुकसान करतात. स्वतःला फसवतात.
बाबांना फसवण्याची गोष्टच नाही. बाबांशी फसवणूक करून काही पैसा कमवायचा आहे का!
शिवबाबांच्या श्रीमतावर कायद्यानुसार चालत नाहीत तर त्यांचे काय हाल होतील. खूप सजा
खावी लागेल, दुसरे म्हणजे पद देखील भ्रष्ट होईल. कायद्याविरुद्ध कोणतेही काम करता
कामा नये. बाबा तर समजावून सांगतील ना की, ‘तुझे वर्तन ठीक नाही आहे’. बाबा तर कमाई
करण्याचा मार्ग सांगतात, मग कोणी करो अथवा न करो, त्यांचे नशीब. सजा तर खाऊन परत
शांतीधाममध्ये जायचेच आहे, पद भ्रष्ट झाले तर काहीही मिळणार नाही. येतात तर पुष्कळ,
परंतु इथे बाबांकडून वारसा घेण्याची गोष्ट आहे. मुले म्हणतात - बाबांकडून तर आम्ही
स्वर्गाचे सूर्यवंशी राजाईपद प्राप्त करणार. राजयोग आहे ना. स्टुडंट स्कॉलरशिप
देखील घेतात ना. चांगल्या मार्कांनी पास होणाऱ्यांना स्कॉलरशिप मिळते ना. ही माळा
त्यांची बनलेली आहे ज्यांनी स्कॉलरशिप घेतली आहे. जितका-जितका जसा पास होईल तशी
स्कॉलरशिप मिळेल, वृद्धी होत-होत हजारो बनतात. राजाई पद आहे - स्कॉलरशिप. जे
चांगल्या रीतीने अभ्यास करतात ते गुप्त राहू शकत नाहीत. बरेच नवीन असणारे जुने
असणाऱ्यांपेक्षा पुढे निघून जातील. हिऱ्या समान जीवन बनवतील. आपली सच्ची कमाई करून
२१ जन्मांसाठी वारसा घेतील. किती आनंद होतो. तुम्ही जाणता - हा वारसा आता नाही घेतला
तर पुन्हा कधीही घेऊ शकणार नाही. शिकण्याची आवड असते ना. काहींना तर जरा सुद्धा
ज्ञान समजावून सांगण्याची आवड नाहीये. ड्रामा अनुसार भाग्यामध्येच नसेल तर भगवान तरी
काय करणार. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक
आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) कोणतेही
कार्य श्रीमताच्या विरुद्ध करायचे नाही. चांगल्या प्रकारे अभ्यास करून श्रेष्ठ
भाग्य बनवायचे आहे. कोणालाही दुःख द्यायचे नाही.
२) या जुन्या
दुनियेमधून आसक्ती काढून टाकायची आहे. बुद्धियोग नवीन दुनियेमध्ये लावायचा आहे.
आनंदामध्ये राहण्यासाठी ज्ञानाला धारण करून इतरांना धारण करवायचे आहे.
वरदान:-
विचार करणे,
बोलणे आणि करणे तिघांनाही एक समान बनविणारे सर्वोत्तम पुरुषार्थी भव
संपूर्ण शिकवणींचे
सार आहे की, पाहणे, उठणे, बसणे, चालणे, झोपणे कोणत्याही कर्मामधून फरिश्तेपणा दिसून
यावा, प्रत्येक कर्मामध्ये अलौकिकता असावी. कर्म अथवा संस्कारांमध्ये कोणत्याही
प्रकारची लौकिकता नसावी. विचार करणे, कृती करणे, बोलणे सर्व एक समान असावे. असे नाही
की, विचार तर करत होतो की असे करायचे नाही, परंतु केले. जेव्हा तीनही कृती एक समान
आणि पित्या समान होतील तेव्हा म्हणणार श्रेष्ठ अथवा सर्वोत्तम पुरुषार्थी.
बोधवाक्य:-
जबाबदारी उचलणे
अर्थात एक्स्ट्रा आशीर्वादांचे अधिकारी बनणे.
व्यक्त इशारे - आता
आपल्या ‘दाता’ स्वरूपाला प्रत्यक्ष करा.
वर्तमान समयी सर्व
आत्म्यांना शांती आणि शक्तीचीच आवश्यकता आहे. आपल्या शक्तिशाली शांत मनसा द्वारे
आत्म्यांना मनाच्या शांतीचा अनुभव करवा. वाणी आणि मनसा दोन्ही सेवा एकत्र करा.
विश्वमहाराजनला विश्वाचा दाता म्हटले जाते. तर आता जेव्हा तुम्ही सर्वांना सुख-शांती
आणि शक्तीचे दान द्याल तेव्हाच तर सर्व तुम्हाला सुखदाता मानतील.