15-10-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - आत्मारुपी बॅटरी ८४ मोटारींमध्ये गेल्यामुळे डिम झाली आहे, आता तिला
आठवणीच्या यात्रेने भरपूर करा (फुल करा)”
प्रश्न:-
बाबा कोणत्या
मुलांना अत्यंत भाग्यशाली समजतात?
उत्तर:-
ज्यांच्या मागे कोणतेही व्याप नाहीत, जे निर्बंधन आहेत, अशा मुलांना बाबा म्हणतात
तुम्ही अत्यंत भाग्यशाली आहात, तुम्ही आठवणीमध्ये राहून आपली बॅटरी पूर्णपणे चार्ज
करू शकता. जर योग नसेल, फक्त ज्ञान ऐकवाल तर तो तीर लागू शकत नाही (ते ज्ञान काळजाला
भिडणार नाही). भले कोणी कितीही ऐटीत आपला अनुभव ऐकवेल, परंतु स्वतःमध्ये धारणा नसेल
तर मन खात राहील.
ओम शांती।
गोड-गोड रुहानी मुलांना बाबा समजावून सांगत आहेत. रुहानी बाबांचे नाव काय आहे?
शिवबाबा. ते आहेतच भगवान, बेहदचे पिता. मनुष्याला कधी बेहदचा पिता अथवा ईश्वर किंवा
भगवान म्हटले जाऊ शकत नाही. नाव भले खूप जणांचे शिव आहे, परंतु ते सर्व देहधारी
आहेत, त्यामुळे त्यांना भगवान म्हटले जाऊ शकत नाही. हे बाबा बसून मुलांना समजावून
सांगत आहेत. मी ज्याच्यामध्ये प्रवेश केला आहे, त्याचा हा अनेक जन्मांतील शेवटचा
जन्म आहे. तुम्हा मुलांना कितीतरी जण विचारतात - तुम्ही यांना भगवान का म्हणता? बाबा
अगोदरच समजावून सांगतात - कोणत्याही स्थूल अथवा सूक्ष्म देहधारीला भगवान म्हणू शकत
नाही. सूक्ष्म देहधारी सूक्ष्मवतनवासीच आहेत. त्यांना देवता म्हटले जाते. उच्च ते
उच्च आहेतच भगवान, परमपिता. उच्च ते उच्च त्यांचे नाव आहे. त्यांच्या राहण्याच्या
ठिकाणी उच्च ते उच्च परमधाम आहे, बाबा सर्व आत्म्यांसहित तिथे निवास करतात. बैठक
देखील उच्च आहे. वास्तविक कोणती बसण्याची जागा नाहीये. जसे तारे कुठे बसले आहेत का?
उभे आहेत ना. तुम्ही आत्मे सुद्धा आपल्या ताकदीने तिथे उभे आहात. अशी ताकद मिळते की
तिथे जाऊन उभे राहता. बाबांचे नांवच आहे सर्वशक्तिवान, त्यांच्याकडून शक्ती मिळते.
आत्मा त्यांची आठवण करते, बॅटरी चार्ज होते. जशी मोटारीमध्ये बॅटरी असते, त्याच्या
जोरावरच मोटार चालते. बॅटरीमध्ये करंट भरलेला असतो, मग चालता-चालता तो संपून जातो
तर पुन्हा बॅटरी मेन पॉवरने चार्ज करून मोटारीमध्ये घालतात. त्या आहेत हदच्या गोष्टी.
ही आहे बेहदची गोष्ट. तुमची बॅटरी तर ५ हजार वर्षे चालते. चालता-चालता मग डिम होते.
कळून येते एकदम संपत नाही, थोडी फार राहते. जशी टॉर्चमध्ये डिम होते ना. आत्मा तर
आहेच या शरीराची बॅटरी. ही सुद्धा डिम होते. बॅटरी या शरीरातून निघून सुद्धा जाते
आणि मग दुसऱ्या, तिसऱ्या मोटारीमध्ये (शरीरामध्ये) जाऊन पडते. ८४ मोटारींमध्ये तिला
टाकले जाते; तर आता बाबा म्हणतात - तुम्ही किती डलहेड, पत्थर-बुद्धी बनले आहात. आता
पुन्हा आपल्या बॅटरीला भरा. बाबांच्या आठवणीशिवाय आत्मा कधीही पवित्र होऊ शकणार नाही.
एकच सर्वशक्तिमान बाबा आहेत, ज्यांच्याशी योग लावायचा आहे. बाबा स्वतः आपला परिचय
देतात की मी काय आहे, कसा आहे. कशी तुमच्या आत्म्याची बॅटरी डल होते. आता तुम्हाला
सल्ला देतो - माझी आठवण करा तर बॅटरी फर्स्ट क्लास सतोप्रधान बनेल. पवित्र
बनल्यामुळे आत्मा २४ कॅरेट बनते. आता तुम्ही मुलाम्याचे (खोट असलेले) बनले आहात.
ताकद अगदी संपून गेली आहे. ती शोभा (पवित्रता) राहिलेली नाही आहे. आता बाबा तुम्हा
मुलांना समजावून सांगत आहेत - ‘मुलांनो, मुख्य गोष्ट आहे योगामध्ये राहण्याची,
पवित्र बनण्याची. नाही तर बॅटरी भरणार नाही. योग लागणार नाही’. भले कुक्कड ज्ञानी (दुसऱ्यांना
शिकवून स्वतः झोपी जाणारे) खूप आहेत. ज्ञान भलेही देतात, परंतु ती अवस्था नाहीये.
इथे खूप ऐटीत अनुभव ऐकवतात. मन आतून खात असते, मी जे वर्णन करत आहे तशी काही माझी
अवस्था नाही आहे. बरीच मग योगी तू आत्मा मुले देखील आहेत. बाबा तर मुलांची खूप महिमा
करतात. बाबा म्हणतात - मुलांनो, तुम्ही अत्यंत भाग्यशाली आहात. तुम्हाला तर इतके
व्याप नाहीत. ज्यांना जास्त मुले असतात त्यांना बंधन सुद्धा असते. बाबांना किती
असंख्य मुले आहेत! सर्वांचा सांभाळ करून देखरेख करावी लागते, बाबांची आठवण सुद्धा
करायची आहे. माशूकची आठवण तर अगदी पक्की झाली पाहिजे. भक्तीमार्गामध्ये तर तुम्ही
बाबांची किती आठवण करत आला आहात, हे भगवान; सर्वात पहिली पूजा देखील त्यांचीच सुरु
करता. सुरुवातीला निराकार भगवंताचीच पूजा करता. असे नाही की त्या वेळी तुम्ही
आत्म-अभिमानी बनता. आत्म-अभिमानी मग पूजा थोडीच करतील?
बाबा समजावून सांगतात
सर्वप्रथम जेव्हा भक्ती सुरू होते तेव्हा सुरुवातीला एका बाबांची पूजा करतात. एका
शिवाचीच पूजा करतात. यथा राजा-राणी तथा प्रजा. उच्च ते उच्च आहेतच भगवान, त्यांचीच
आठवण करायची आहे. दुसरे जे पण सर्व त्यांच्या खाली आहेत - ब्रह्मा-विष्णू-शंकर यांची
देखील आठवण करण्याची आवश्यकता नाही . उच्च ते उच्च बाबांचीच आठवण करायची आहे. परंतु
ड्रामाचा पार्ट असा आहे की तुम्ही खाली उतरण्यासाठी बांधील आहात. तुम्ही कसे खाली
उतरता ते बाबा समजावून सांगतात. प्रत्येक गोष्ट आदिपासून अंता पर्यंत, वरपासून
खालपर्यंत बाबा समजावून सांगतात. भक्ती देखील आधी सतोप्रधान मग सतो-रजो-तमो असते.
आता तुम्ही पुन्हा सतोप्रधान बनत आहात, यामध्येच मेहन आहेत! पवित्र बनायचे आहे.
स्वतःला बघायचे आहे, माया कुठे धोका तर देत नाही ना? माझी क्रिमिनल आय (विकारी
दृष्टी) तर बनत नाही ना? कोणता पापी विचार तर येत नाही ना? गायन आहे प्रजापिता
ब्रह्मा, तर त्यांची मुले ब्राह्मण-ब्राह्मणी बहीण-भाऊ झालात ना. इथले ब्राह्मण लोक
सुद्धा स्वतःला ब्रह्माची संतान म्हणवतात. तुम्ही देखील ब्राह्मण भाऊ-बहीणी झालात
ना. मग विकारी दृष्टी का ठेवता? ब्राह्मणांना तुम्ही चांगल्या प्रकारे दृष्टी देऊ
शकता. आता तुम्ही मुलेच जाणता की, ब्रह्माची संतान ब्राह्मण-ब्राह्मणी बनून मग देवता
बनतात. म्हणतात देखील बाबा येऊन ब्राह्मण आणि देवी-देवता धर्माची स्थापन करतात. ही
समजून घेण्याची गोष्ट आहे ना. आपण ब्रह्माची संतान भाऊ-बहीणी झालो तर कधीही कु-दृष्टी
जाता कामा नये. त्याला थांबवायचे आहे. ही देखील आमची गोड-बहीण आहे. ते प्रेम असले
पाहिजे. जसे रक्ताच्या नात्यामध्ये प्रेम असते, ते बदलून रुहानी बनावे. यामध्ये
खूप-खूप मेहनत आहे. आहे देखील सहज आठवण. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची
आहे. विकारी-दृष्टी ठेवू शकत नाही. बाबांनी समजावून सांगितले आहे - हे डोळे खूप धोका
देणारे आहेत, त्यांना बदलायचे आहे. मी आत्मा आहे. आता तर आपण शिवबाबांची मुले आहोत.
ॲडॉप्ट केलेले भाऊ-बहिणी आहोत. आपण स्वतःला बी. के. म्हणतो. चलनमध्ये (वर्तनामध्ये)
फरक तर असतो ना. टीचर्सचे काम आहे क्लासमध्ये सर्वांना विचारणे की, तुम्ही हे समजता
का की आपली दृष्टी भावा-बहिणीची असते का काही चंचलता होत असते? खऱ्या बाबांसमोर खरे
सांगितले नाहीत, खोटे बोललात तर खूप सजा खावी लागेल. कोर्टामध्ये शपथ घ्यायला
लावतात ना - ‘खऱ्या ईश्वर पित्यासमोर खरे सांगेन’. खऱ्या पित्याचा मुलगा देखील खरा
असेल. बाबा ट्रुथ आहेत ना. ते खरे तेच सांगतात. बाकी सर्व आहेत गपोडे (थापा).
स्वतःला श्री श्री १०८ म्हणवतात, वास्तविक ही तर माळा आहे ना, जिचा जप केला जातो.
हे देखील जाणत नाहीत की ही माळा आपण कशासाठी जपतो. बौद्धी लोकांची देखील माळा,
ख्रिश्चन लोकांची देखील माळा असते. प्रत्येक जण आपल्या पद्धतीने माळा जपतात. तुम्हा
मुलांना आता ज्ञान मिळाले आहे. बोला, १०८ ची जी माळा आहे त्यामध्ये वरती फूल तर आहे
निराकार. त्यांचीच सर्वजण आठवण करतात. त्यांच्या आठवणीद्वारेच आम्ही स्वर्गाची
पट्टराणी अर्थात महाराणी बनतो. नरापासून नारायण, नारीपासून लक्ष्मी बनणे - हे आहे
सूर्यवंशी मखमलीची पट्टराणी बनणे; त्यानंतर मग खादीची होते. तर अशा प्रकारचे
पॉईंट्स बुद्धीमध्ये ठेवून मग समजावून सांगितले पाहिजे. तेव्हा तुमचे नाव खूप
प्रसिद्ध होईल. बोलण्यामध्ये शेरणी बना. तुम्ही शिव-शक्ती सेना आहात ना. अनेक
प्रकारची सेनादल आहेत ना. तिथे देखील तुम्ही जाऊन बघा काय शिकवतात ते. लाखो लोक
जातात. बाबांनी समजावून सांगितले आहे क्रिमिनल आय (विकारी दृष्टी) खूप धोका देणारी
आहे. आपल्या अवस्थेचे वर्णन केले पाहिजे. अनुभव ऐकवला पाहिजे - आपण घरामध्ये कसे
राहतो? अवस्थेवर काय परिणाम होतो? डायरी ठेवा - किती काळ या अवस्थेमध्ये राहतो? बाबा
म्हणतात - पैलवाना सोबत माया देखील पैलवान होऊन लढते. हे युद्धाचे मैदान आहे ना.
माया खूप बलवान आहे. माया अर्थात ५ विकार. धनाला संपत्ती म्हटले जाते, ज्याच्याकडे
जास्ती संपत्ती असते, अजामील देखील तेच जास्त बनतात.
बाबा म्हणतात -
सर्वप्रथम तुम्ही वेश्यांना वाचवा. तर त्या मग आपली असोसिएशन (संघटना) बनवतील.
आम्हाला तर बाबांकडून वारसा घ्यायचा आहे. बाबा म्हणतात - मी तुम्हाला शिवालयाचा
मालक बनविण्यासाठी आलो आहे. हा अंतिम जन्म आहे. वेश्यांना समजावून सांगितले पाहिजे
- तुमच्यामुळे भारताची इतकी अब्रू गेली आहे. आता बाबा आले आहेत शिवालयामध्ये घेऊन
जाण्यासाठी. आम्ही तुमच्याकडे श्रीमतानुसार आलो आहोत. आता तुम्ही विश्वाचे मालक बना.
आमच्याप्रमाणे भारताचे नाव मोठे करा. आम्ही देखील बाबांची आठवण केल्याने पवित्र बनत
आहोत. तुम्ही देखील हा एक जन्म हे छी-छी काम (घाणेरडे काम) सोडून द्या. दया तर
करायची आहे ना. मग तुमचे नाव खूप प्रसिद्ध होईल. म्हणतील - यांच्यामध्ये तर एवढी
ताकद आहे जे अशा घाणेरड्या धंद्यातून यांची सुटका केली. सर्वांची असोसिएशन (संघटना)
आहे. तुम्ही तुमची संघटना बनवून गव्हर्मेंटकडून जी पाहिजे ती मदत घेऊ शकता. तर आता
असे घाणेरडे काम करणाऱ्या ज्यांनी भारताचे नाव बदनाम केले आहे, त्यांची सेवा करा.
तुमची देखील युनियन खूप मजबूत पाहिजे. जे दहा-बारा आपसामध्ये मिळून जाऊन समजावून
सांगतील. माता देखील चांगल्या हुशार असाव्यात. कोणी नवीन जोडपे असेल, बोला - आम्ही
पवित्र राहतो. पवित्र राहिल्यानेच विश्वाचे मालक बनतो. तर का नाही पवित्र बनणार.
सारी झुंडच्या झुंड मिळून जावी. जाऊन अतिशय नम्रतेने सांगायचे आहे - आम्ही तुम्हाला
परमपिता परमात्म्याचा संदेश देण्यासाठी आलो आहोत. आता विनाश समोर उभा आहे. बाबा
म्हणतात - मी सर्वांचा उद्धार करण्यासाठी आलो आहे. तुम्ही देखील हा एक जन्म
विकारामध्ये जाऊ नका. तुम्ही समजावून सांगू शकता - आम्ही ब्रह्माकुमार-ब्रह्माकुमारी
आमच्याच तन-मन-धनाने सेवा करत आहोत. आम्ही भीक तर मागत नाही. ईश्वराची मुले आहोत.
अशा प्रकारे प्लान बनवा. असे नाही की तुम्ही मदत करू शकत नाही. असे काम करा ज्यामुळे
वाह-वाह होईल. मदत देणारे हजारो समोर येतील. असे आपले संघटन बनवा. मुख्य असणाऱ्यांना
सिलेक्ट करा, सेमिनार करा. मागे मुलांना सांभाळणारे खूप मिळू शकतील. तुम्ही ईश्वरीय
सेवेला लागा. असे फ्राकदिल (उदार चित्त) असले पाहिजेत जे लगेच सेवेला बाहेर पडतील.
एका बाजूला ही सेवा आणि दुसरी गोष्ट गीतेची, या गोष्टींना एकत्रितपणे उचलून धरा.
तुम्ही शिकताच मुळी हे लक्ष्मी-नारायण बनण्याकरिता. तर इथे तुम्हा मुलांचा आपसामध्ये
मतभेद असता कामा नये. जर कोणती गोष्ट बाबांपासून लपवत असाल, खरे सांगत नसाल तरी
देखील आपलेच नुकसान करता, अजूनच १०० पटीने पाप चढते. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) आपण गोड
बाबांची मुले आहोत, आपसामध्ये गोड बहिण-भाऊ बनून रहायचे आहे. कधीही विकाराची दृष्टी
ठेवायची नाही. दृष्टीमध्ये कोणतीही चंचलता असेल तर रुहानी सर्जनला खरे काय ते
सांगायचे आहे.
२) कधीही आपसामध्ये
मतभेद करू नका. फ्राकदिलाने (उदार मनाने) सेवा करायची आहे. आपल्या तन-मन-धनाने
अतिशय नम्रतेने सेवा करून सर्वांना बाबांचा परिचय (संदेश) द्यायचा आहे.
वरदान:-
प्रत्येक कर्म
चरित्राच्या रूपामध्ये गायन योग्य बनविणारे महान आत्मा भव
महान आत्मा तो आहे
ज्याचा प्रत्येक संकल्प, प्रत्येक कर्म महान असेल एकही संकल्प साधारण अथवा व्यर्थ
नसेल. कोणतेही कर्म साधारण किंवा निरर्थक (निरुपयोगी) नसावे. कर्मेंद्रियांद्वारा
जे काही कर्म होईल ते अर्थ सहित असावे, वेळ देखील महान कार्यामध्ये सफल होत रहावा,
तेव्हाच प्रत्येक चरित्र गायन योग्य होईल. महान आत्म्यांचे यादगार - हर्षित मूर्त,
आकर्षण मूर्त आणि अव्यक्त मूर्त या रूपामध्येच आहेत.
बोधवाक्य:-
मान आणि इच्छा
सोडून स्वमानामध्ये स्थिर व्हा. तेव्हाच मान सावलीप्रमाणे तुमच्या मागून येईल.
अव्यक्त इशारे:- स्वयं
प्रति आणि सर्वांप्रती मनसा द्वारे योगाच्या शक्तींचा प्रयोग करा.
कोणतेही स्थूल कार्य
करत असताना मनसाद्वारे व्हायब्रेशन्स पसरविण्याची सेवा करा. जसा कोणी बिझनेसमॅन असतो
तर तो स्वप्नामध्ये देखील आपला बिझनेसच बघत असतो, तसे तुमचे काम आहे - विश्व-कल्याण
करणे. हेच तुमचे ऑक्युपेशन आहे, या ऑक्युपेशनला ध्यानात ठेवून सदैव सेवेमध्ये बिझी
रहा. जरी सेवेचे फळ मिळाले तरी सहज मायाजीत बनाल म्हणून जेव्हा पण बुद्धीला फुरसत
मिळेल तेव्हा सेवेमध्ये व्यस्त होऊन रहा.