15-11-2024
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - आपले निरीक्षण करा की, मला किती वेळ बाबांची आठवण राहते, कारण
आठवणीमध्येच फायदा आहे, विस्मृती मध्ये तोटा आहे”
प्रश्न:-
या पाप
आत्म्यांच्या दुनियेमध्ये कोणती गोष्ट अगदीच असंभव आहे आणि का?
उत्तर:-
इथे जर कोणी म्हटले की, ‘आम्ही पुण्य आत्मा आहोत’, तर ही गोष्ट अगदीच असंभव आहे
कारण दुनिया कलियुगी तमोप्रधान आहे. मनुष्य ज्या कामाला पुण्याचे काम समजतात ते
देखील पाप होऊन जाते कारण प्रत्येक कर्म विकारांच्या अधीन होऊन करतात.
ओम शांती।
हे तर मुले समजत असतील की, आता आपण ब्रह्माची मुले ब्रह्माकुमार-कुमारी आहोत. नंतर
मग बनतो देवी-देवता. हे तर तुम्ही मुलेच समजता, दुसरे कोणीही समजू शकत नाही. तुम्ही
जाणता आपण ब्रह्माकुमार-कुमारी बेहदचे शिक्षण शिकत आहोत. ८४ जन्मांविषयीचे शिक्षण
देखील शिकतो, सृष्टी चक्राचे शिक्षण देखील शिकतो. त्यानंतर तुम्हाला ही शिकवण मिळते
की पवित्र बनायचे आहे. इथे बसून तुम्ही मुले पावन बनण्यासाठी बाबांची आठवण तर जरूर
करता. स्वतःच्या मनाला विचारा - खरोखर आपण बाबांच्या आठवणीमध्ये बसलो होतो की माया
रावण बुद्धीला दुसरीकडे घेऊन गेली’. बाबांनी सांगितले आहे - ‘मामेकम् (मज एकाची)
आठवण करा तर पापे नष्ट होतील’. आता स्वतःला विचारायचे आहे - मी बाबांच्या आठवणीमध्ये
होतो की बुद्धी इतर ठिकाणी गेली? हे लक्षात राहिले पाहिजे की, किती वेळ मी बाबांच्या
आठवणीमध्ये राहिलो? किती वेळ माझी बुद्धी कुठे-कुठे गेली? आपल्या अवस्थेला बघा.
जितका वेळ बाबांची आठवण कराल, त्यानेच पावन बनाल. नफ्याचा आणि तोट्याचा देखील हिशोब
ठेवायचा आहे. सवय असेल तर आठवण देखील राहील. लिहित राहतील. डायरी तर सर्वांच्या
खिशामध्ये असतेच. जे व्यापार करणारे असतात, त्यांची आहे हदची डायरी. तुमची आहे
बेहदची डायरी. तर तुम्हाला स्वतःचा चार्ट नोट करायचा आहे. बाबांचा आदेश आहे - ‘धंदा
इत्यादी सर्वकाही करा परंतु थोडा वेळ काढून माझी आठवण करा’. आपला पोतामेल (हिशोब)
पाहून फायदा वाढवत रहा. नुकसान करून घेऊ नका. तुमचे युद्ध तर आहे ना. सेकंदामध्ये
फायदा, सेकंदामध्ये नुकसान. लगेच लक्षात येते, मी फायदा केला की तोटा? तुम्ही
व्यापारी आहात ना. कोणी विरळाच हा व्यापार करेल. स्मृतीमध्ये आहे फायदा,
विस्मृतीमुळे आहे तोटा. हे स्वतःला तपासून पहायचे आहे, ज्यांना उच्च पद मिळवायचे आहे
त्यांना तर काळजी असते - बघू, आम्ही किती वेळ विस्मृतीमध्ये राहिलो? हे तर तुम्ही
मुले जाणता - आम्हा सर्व आत्म्यांचे पिता पतित-पावन आहेत. आपण खरे तर आत्मे आहोत.
आपल्या घरून इथे आलो आहोत, हे शरीर घेऊन पार्ट बजावतो. शरीर विनाशी आहे, आत्मा
अविनाशी आहे. संस्कार देखील आत्म्यामध्येच असतात. बाबा विचारतात - ‘हे आत्म्यांनो
आठवा, या जन्माच्या बालपणी कोणते उलटे काम तर केले नाहीत ना? आठवा. तीन-चार वर्षाचे
असल्यापासूनची स्मृती तर असते की, आपण बालपण कसे घालवले, काय-काय केले? कोणतीही
गोष्ट मनामध्ये खात तर नाही ना? आठवा’. सतयुगामध्ये पाप कर्म होतच नाहीत तर
विचारण्याचा प्रश्नच येत नाही. इथे तर पापे होतातच. मनुष्य ज्याला पुण्याचे काम
समजतात ते देखील पापच आहे. ही आहेच पाप आत्म्यांची दुनिया. तुमची देवाण-घेवाण देखील
आहे पाप आत्म्यांसोबत. पुण्य आत्मे इथे अस्तित्वातच नाहीत. पुण्य आत्म्यांच्या
दुनियेमध्ये मग एकही पाप आत्मा नसते. पाप आत्म्यांच्या दुनियेमध्ये एकही पुण्य आत्मा
असू शकत नाही. ज्या गुरूंच्या चरणावर लोटांगण घालतात ते देखील काही पुण्य आत्मा
नाहीत. हे तर आहेच कलियुग ते देखील तमोप्रधान. तर यामध्ये कोणी पुण्य आत्मा असणेच
असंभव आहे. पुण्य आत्मा बनण्यासाठीच बाबांना बोलावतात की, ‘येऊन आम्हाला पावन आत्मा
बनवा’. असे नाही, कोणी खूप दान-पुण्य इत्यादी करतात, धर्मशाळा इत्यादी बनवतात तर ते
कोणी पुण्य आत्मा आहेत. नाही लग्न इत्यादींसाठी हॉल वगैरे बनवतात हे काही पुण्य
थोडेच आहे. या समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. हे आहे रावण राज्य, पाप आत्म्यांची
आसूरी दुनिया. या गोष्टींना तुमच्या शिवाय इतर कोणीही जाणत नाही. भले इथे रावण आहे
परंतु त्याला ओळखतात थोडेच. शिवाचे चित्र देखील आहे परंतु ओळखत नाहीत. मोठ-मोठी
शिवलिंग इत्यादी बनवतात, तरी देखील म्हणतात नावा-रूपा पासून न्यारा आहे, सर्वव्यापी
आहे; म्हणूनच बाबांनी म्हटले आहे - ‘यदा यदा हि धर्मस्य…’ भारतामध्येच शिवबाबांची
ग्लानी होते. जे बाबा तुम्हाला विश्वाचे मालक बनवतात, त्यांची तुम्ही मनुष्य मतावर
चालून किती निंदा करता. ‘मनुष्य मत आणि ईश्वरीय मत’ असे एक पुस्तक देखील आहे ना. हे
तर तुम्हीच जाणता आणि समजावून सांगता - आम्ही श्रीमतावर देवता बनतो. रावण मतावर मग
आसूरी मनुष्य बनतो. मनुष्य मताला आसूरी मत म्हटले जाईल. आसूरीच कामे करत राहतात.
मुख्य गोष्ट आहे - ईश्वराला सर्वव्यापी म्हणतात; कच्छ अवतार, मच्छ अवतार… तर किती
आसूरी घाणेरडे बनले आहेत. तुमची आत्मा कच्छ-मच्छ अवतार घेत नाही, मनुष्य तनामध्येच
येते. आता तुम्ही समजता आम्ही काही कच्छ-मच्छ थोडेच बनतो, ८४ लक्ष योनी थोडेच घेतो.
आता तुम्हाला बाबांचे श्रीमत मिळते - ‘मुलांनो, तुम्ही ८४ जन्म घेता’. ८४ आणि ८४
लाखचे परसेंटेज किती म्हणणार! खोटे ते खोटेच, खरे रत्ती भर सुद्धा नाही. याचा देखील
अर्थ समजून घेतला पाहिजे. भारताची हालत बघा काय झाली आहे. भारत सचखंड होता ज्याला
स्वर्गच म्हटले जात होते. अर्धा कल्प आहे राम राज्य, अर्धा कल्प आहे रावण राज्य.
रावण राज्याला आसूरी संप्रदाय म्हणणार. किती कडक शब्द आहे. अर्धा कल्प देवतांचे
राज्य चालते. बाबांनी समजावून सांगितले आहे - लक्ष्मी-नारायण दी फर्स्ट, दी सेकंड,
दी थर्ड म्हटले जाते. जसे एडवर्ड फर्स्ट, सेकंड असतो ना. पहिली पिढी, मग दुसरी पिढी
असे चालते. तुमचे देखील पहिले असते सूर्यवंशी राज्य मग चंद्रवंशी. बाबांनी येऊन
ड्रामाचे रहस्य देखील व्यवस्थित समजावून सांगितले आहे. तुमच्या शास्त्रांमध्ये या
गोष्टी नव्हत्या. काही-काही शास्त्रांमध्ये थोड्याफार ओळी बरोबर लिहिल्या आहेत परंतु
त्यावेळी ज्यांनी ही पुस्तके लिहिली त्यांना काहीच समजलेले नाही.
बाबा (ब्रह्मा बाबा)
देखील जेव्हा बनारसला गेले होते त्यावेळी ही दुनिया चांगली वाटत नव्हती, तिथे बसून
सर्व भिंतींवर रेषा ओढत बसायचे. ब्रह्मा बाबा बोलले - ‘बाबा हे सर्व करवून घेत होते
परंतु मी त्यावेळी लहान होतो ना. नीटसे लक्षातही येत नव्हते. बस कोणीतरी आहे जो
माझ्याकडून हे करून घेत आहे. विनाश पाहिला तरीही आतून आनंदच वाटत होता. रात्री
झोपायचो तेव्हाही जसा उडत रहायचो परंतु काही समजत नव्हते. अशा-अशा रेषा ओढत रहायचो.
कोणती तरी ताकद आहे जिने प्रवेश केला आहे. मला आश्चर्य वाटत होते. आधी तर धंदा
इत्यादी करायचो मग काय झाले, कोणाला पाहायचो आणि लगेच ध्यानामध्ये जायचो’. शिवबाबा
ब्रह्मा बाबांसाठी बोलले - ‘म्हणत होता हे काय होत आहे, ज्याला पाहतो त्याचे डोळे
बंद होतात. विचारायचो काय पाहिले तर म्हणायचे - वैकुंठ पाहिला, कृष्ण पाहिला. या
सर्व गोष्टी समजून घ्यायच्या होत्या ना म्हणून सर्वकाही सोडून बनारसला निघून गेला
जाणून घेण्यासाठी. पूर्ण दिवस बसून राहत असे. पेन्सिल आणि भिंत दुसरे कुठले कामच
नाही. छोटे होते ना (बाबांच्या पधरामणीची सुरुवातच होती). तर अशी-अशी दृश्ये जेव्हा
पाहिली तेव्हा समजला आता हे काहीच करायचे नाही. धंदा इत्यादी सोडावा लागेल. आनंद
होत होता हा गाढवपणा सोडायचा आहे’. रावण राज्य आहे ना. रावणावर गाढवाचे डोके
दाखवतात ना, तर विचार आला की राजाई नाही, गाढवपणा आहे. गाढव सारखे-सारखे मातीमध्ये
लोळून धोब्याचे सर्व कपडे खराब करून टाकते. बाबा देखील म्हणतात - ‘तुम्ही काय होता,
आता तुमची काय अवस्था झाली आहे’. हे बाबाच बसून समजावतात आणि हे दादा देखील समजावून
सांगतात. दोघांचे काम चालत राहते. ज्ञानामध्ये जे चांगल्या प्रकारे समजावून सांगतात
त्यांना हुशार म्हणणार. नंबरवार तर आहेत ना. तुम्ही मुले देखील समजावून सांगता, ही
राजधानी स्थापन होत आहे. जरूर नंबरवार पद मिळवतील. कल्प-कल्प आत्माच आपला पार्ट
बजावते. सर्वजण एकसमान ज्ञान आत्मसात करणार नाहीत. ही स्थापनाच वंडरफुल आहे. दुसरे
कोणी स्थापनेचे ज्ञान थोडेच देतात. समजा शीख धर्माची स्थापना झाली. शुद्ध आत्म्याने
प्रवेश केला, काही वेळानंतर शीख धर्माची स्थापना झाली. त्यांचे मुख्य कोण? गुरुनानक.
त्यांनी येऊन जप साहेब ग्रंथ बनवला. सुरुवातीला तर नवे आत्मेच असतील कारण पवित्र
आत्मे असतात. पवित्रला महान आत्मा म्हणतात. सुप्रीम तर एका बाबांनाच म्हटले जाते.
ते देखील धर्माची स्थापना करतात तर महान म्हटले जाईल. परंतु नंबरवार मागोमाग येतात.
५०० वर्षांपूर्वी एक आत्मा आली, येऊन शीख धर्म स्थापन केला, त्यावेळी ग्रंथ कुठून
येईल. जरूर ‘सुखमणी जप साहेब’ इत्यादी नंतर बनवले असतील ना! कोणती शिकवण देतात.
उमंग येतो तर बाबांची बसून महिमा करतात. बाकी हे ग्रंथ इत्यादी तर नंतर बनतात.
जेव्हा त्यांची लोकसंख्या वाढते. वाचणारे देखील हवेत ना. सर्वांची धर्म-शास्त्रे
मागाहून बनली असतील. जेव्हा भक्ती मार्ग सुरू होईल तेव्हा शास्त्र वाचतील. ज्ञान हवे
ना. सुरुवातीला सतोप्रधान असतील मग सतो, रजो, तमोमध्ये येतात. जेव्हा खूप वृद्धी
होईल तेव्हा महिमा होईल आणि शास्त्र इत्यादी बनतील. नाहीतर वृद्धी कोण करेल.
फॉलोअर्स बनले ना. शीख धर्माचे आत्मे यावे लागतील जे येऊन फॉलो करतील. त्यासाठी खूप
वेळ हवा.
जी नवीन आत्मा येते
तिला दुःख तर असू शकत नाही. कायदा सांगत नाही. आत्मा सतोप्रधानापासून सतो, रजो,
तमोमध्ये येईल तेव्हा दुःख होईल. कायदा देखील असा आहे ना! इथे तर सगळे मिक्स आहेत,
रावण संप्रदाय देखील आहे तर राम संप्रदाय देखील आहे. अजून काही संपूर्ण बनलेले
नाहीत. संपूर्ण बनतील तर मग शरीर सोडतील. कर्मातीत अवस्था असणाऱ्यांना कोणतेही दुःख
होऊ शकत नाही. ते या घाणेरड्या दुनियेमध्ये राहू शकत नाहीत. ते निघून जातील बाकी जे
राहतील ते कर्मातीत बनलेले नसतील. सर्वच काही एकाचवेळी कर्मातीत होऊ शकत नाहीत. भले
विनाश होईल तरी देखील काहीजण वाचतील. प्रलय (संपूर्ण विनाश) होत नाही. गातात देखील
- ‘राम गयो रावण गयो…’ रावणाचा खूप मोठा परिवार होता. आपला परिवार तर छोटा आहे. ते
किती अनेक धर्म आहेत. वास्तविक सर्वात मोठा परिवार आपला असला पाहिजे कारण देवी-देवता
धर्म सर्वात पहिला आहे. आता तर सर्व मिक्सअप झाले आहेत त्यामुळे ख्रिश्चन लोकांची
जास्त वाढ झाली आहे. जिथे मनुष्य सुख पाहतात, पोझिशन पाहतात तर मग त्या धर्मामध्ये
सामील होतात. जेव्हा-जेव्हा पोप येतो तेव्हा पुष्कळजण ख्रिश्चन बनतात. मग वृद्धी
देखील खूप होते. सतयुगामध्ये तर आहेच एक मुलगा, एक मुलगी. बाकी दुसऱ्या कोणत्या
धर्माची अशी वृद्धी होत नाही. आता बघा ख्रिश्चन सर्वात हुशार आहेत. जे जास्त मुलांना
जन्म देतात त्यांना बक्षीस मिळते कारण त्यांना तर माणसे हवी आहेत ना. ज्यांचा लष्करी
सेनेसाठी उपयोग होईल. आहेत तर सर्व ख्रिश्चन. रशिया, अमेरिका सर्व ख्रिश्चन आहेत,
एक कहाणी आहे - दोन माकडे भांडली, लोणी बोक्याने खाल्ले. हा देखील ड्रामा बनलेला आहे.
आधी तर हिंदू, मुसलमान एकत्र राहत होते. जेव्हा फाळणी झाली तेव्हा पाकिस्तानचे नवीन
राज्य उभे राहिले. हा देखील ड्रामा पूर्व नियोजित आहे. दोघेजण युद्ध करतील तर
दारूगोळा घेतील, धंदा होईल. यांचा सर्वात मोठा धंदा हा आहे. परंतु ड्रामामध्ये
विजयाची भावी तुमची आहे. शंभर टक्के निश्चित आहे, तुमच्यावर कोणीही विजय प्राप्त करू
शकत नाही. बाकी सर्वजण नष्ट होतील. तुम्ही जाणता नवीन दुनियेमध्ये आपले राज्य असेल,
यासाठीच तुम्ही शिकता. लायक बनता. तुम्ही लायक होता आता ना-लायक बनले आहात तर पुन्हा
लायक बनायचे आहे. गातात देखील - ‘पतित-पावन या’. परंतु अर्थ थोडाच समजतात. हे आहेच
सर्व जंगल. आता बाबा आले आहेत, येऊन काट्यांच्या जंगलाला गार्डन ऑफ फ्लॉवर (फुलांचा
बगीचा) बनवतात. ते आहे डीटी वर्ल्ड (दैवी दुनिया). हे आहे डेव्हिल वर्ल्ड (आसूरी
दुनिया). सर्व मनुष्य सृष्टीचे रहस्य समजावून सांगितले आहे. तुम्ही आता समजता आपण
आपल्या धर्माला विसरून धर्म भ्रष्ट झालो आहोत. त्यामुळे सर्व कर्म विकर्मच होतात.
कर्म, विकर्म, अकर्माची गती बाबाच तुम्हाला समजावून सांगून गेले होते. तुम्ही समजता
बरोबर काल आपण असे होतो आणि आज आपण हे बनत आहोत. जवळ आहे ना. बाबा म्हणतात - ‘काल
तुम्हाला देवता बनवले होते. राज्य-भाग्य दिले होते मग सर्व गेले कुठे?’ तुम्हाला
स्मृती आली आहे - भक्ती मार्गामध्ये आपण किती धन गमावले आहे. कालचीच गोष्ट आहे ना.
बाबा तर येऊन तळहातावर स्वर्ग देतात. हे ज्ञान बुद्धीमध्ये राहिले पाहिजे.
बाबांनी हे देखील
समजावून सांगितले आहे - हे डोळे किती धोका देतात, विकारी दृष्टीला ज्ञानाद्वारे
पवित्र दृष्टी बनवायची आहे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) आपल्या
बेहदच्या डायरीमध्ये चार्ट नोट करायचा आहे की, मी आठवणीमध्ये राहून किती फायदा
वाढवला? तोटा तर झाला नाही ना? आठवणीच्या वेळी बुद्धी कुठे-कुठे गेली?
२) या जन्मामध्ये
बालपणापासून माझ्याकडून कोणती उलटी कर्म अथवा पापे झाली आहेत, ते नोट करायचे आहे.
ज्या गोष्टींमुळे मन खात राहते त्या गोष्टी बाबांना सांगून हलके व्हायचे आहे. आता
कोणतेही पाप कर्म करायचे नाही.
वरदान:-
कर्म बंधनाला
सेवेच्या बंधनामध्ये परिवर्तन करून सर्वांपासून न्यारे आणि परमात्मा प्यारे भव
परमात्मा प्रेम
ब्राह्मण जीवनाचा आधार आहे परंतु ते तेव्हा मिळेल जेव्हा न्यारे बनाल. जरी
प्रवृत्तीमध्ये राहता ते देखील सेवेकरिता राहता. कधीही असे समजू नका की, हिशोब आहे,
कर्मबंधन आहे… परंतु सेवा आहे. सेवेच्या बंधनामध्ये बांधल्यामुळे कर्मबंधन संपून
जाते. सेवाभाव नसेल तर कर्मबंधन खेचत राहते. जिथे कर्मबंधन आहे तिथे दुःखाची लाट आहे,
आणि सेवेच्या बंधनामध्ये आनंद आहे त्यामुळे कर्म बंधनाला सेवेच्या बंधनामध्ये
परिवर्तन करून न्यारे-प्यारे (अलिप्त आणि प्रेमळ बनून) रहा तर परमात्म प्रिय बनाल.
बोधवाक्य:-
श्रेष्ठ आत्मा
ती आहे जी स्वस्थिती द्वारे प्रत्येक परिस्थितीला पार करेल.