15-12-24    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   28.02.2003  ओम शान्ति   मधुबन


“सेवेबरोबरच आता संपन्न बनण्याचा प्लॅन बनवा, कर्मातीत बनण्याची धुन लावा”


आज शिव बाबा आपल्या शाळीग्राम मुलांसोबत आपली आणि मुलांच्या अवतरणाची जयंती साजरी करण्यासाठी आले आहेत. ही अवतरणाची जयंती किती वंडरफुल आहे, जी बाबा मुलांना आणि मुले बाबांना पद्मापदम वेळा मुबारक देत आहेत. चोहो बाजूंची मुले आनंदामध्ये नाचत आहेत - ‘वाह बाबा, वाह आम्ही शाळीग्राम आत्मे! वाह! वाह!’ चे गाणे गात आहेत. या आपल्या जन्म दिवसाची यादगार (आठवण) द्वापरपासून आत्तापर्यंत भक्त देखील साजरे करत राहतात. भक्त देखील भावनेमध्ये कमी नाहीत. परंतु भगत आहेत, मुले नाहीत. ते दरवर्षी साजरे करतात आणि तुम्ही साऱ्या कल्पामध्ये एकदाच अवतरणाचे महत्व साजरे करता. ते दरवर्षी व्रत ठेवतात, व्रत ठेवतात देखील आणि व्रत घेतात देखील. तुम्ही एकदाच व्रत घेता, तुमचीच कॉपी केली आहे परंतु तुमचे महत्व आणि त्यांच्या यादगारचे (आठवणीचे) महत्व यामध्ये अंतर आहे. ते देखील पवित्रतेचे व्रत घेतात परंतु दरवर्षी एका दिवसासाठी व्रत घेतात. तुम्ही देखील सर्वांनी जन्म घेताच एकदाच पवित्रतेचे व्रत घेतले आहे ना! घेतले आहे कि घ्यायचे आहे? घेतले आहे. तुम्ही एकदा घेतले आहे, ते वर्षानुवर्षे घेतात. सर्वांनी घेतले आहे का? फक्त ब्रह्मचर्य नाही, संपूर्ण पवित्रतेचे व्रत घेतले आहे. पांडव, संपूर्ण पवित्रतेचे व्रत घेतले आहे का? कि फक्त ब्रह्मचर्या मध्येच ठीक आहे! ब्रह्मचर्य तर फाउंडेशन आहे परंतु फक्त ब्रह्मचर्य नाही सोबत आणखी चार देखील आहेत. चारही गोष्टींचे व्रत घेतले आहे कि फक्त एकाचे घेतले आहे? चेक करा. क्रोध करायची तरी सुट आहे ना? सुट नाही आहे? थोडा-थोडा तरी क्रोध करावा लागतो ना? नाही करावा लागत? बोला पांडव, क्रोध करावा लागत नाही का? करावा तर लागतो! चला, बापदादांनी पाहिले की क्रोध आणि सर्व साथीदार जे आहेत, महाभूताचा तर त्याग केला आहे परंतु जसे मातांना, प्रवृत्ति वाल्यांना मोठ्या मुलांवर इतके प्रेम नसते, मोह नसतो परंतु नातवंडांवर खूप असतो. छोटी-छोटी मुले खूप गोड वाटतात. तर बापदादांनी बघितले की मुलांना देखील ही ५ विकारांची जी महाभूते आहेत, महारूप त्यांच्यावरील प्रेम तर कमी झाले आहे परंतु या विकारांचे जे बालबच्चे आहेत ना, छोटे-छोटे अंश मात्र, वंश मात्र, त्यांच्यावर अजूनही थोडे-थोडे प्रेम आहे. आहे प्रेम! कधी-कधी प्रेम तर होतेच. होते का? मातांनो? डबल फॉरेनर्स, क्रोध येत नाही का? बरीच मुले मोठ्या चतुराईच्या गोष्टी करतात, ऐकवू काय म्हणतात? ऐकवू का? जर ऐकवले तर आज सोडावे लागेल. तयार आहात? तयार आहात, सोडणार? कि फक्त फाईलमध्ये कागद जमा करणार? जसे दरवर्षी करता ना, प्रतिज्ञेच्या फाईल्स बाबांकडे खूप-खूप मोठ्या झाल्या आहेत, तर अजूनही असे तर नाही की, प्रतिज्ञेचा अजून एक कागद फाईल मध्ये ॲड कराल, असे तर नाही ना! फायनल कराल कि फाईल मध्ये टाकाल? काय कराल? बोला, टीचर्स काय करणार? फायनल? हात वर करा. असाच वायदा करू नका. बापदादा मग थोडेसे रूप धारण करतील (धर्मराजाचे रूप धारण करतील). ठीक आहे. डबल फॉरेनर्स - करणार फायनल? जे फायनल करतील त्यांनी हात वर करा. टी. व्ही. मध्ये फोटो काढा. छोटा त्रेतायुगी हात नाही, मोठा हात वर करा. अच्छा, ठीक आहे.

ऐका, बाबांच्या आणि मुलांच्या काय गोष्टी होतात? बापदादा हसत राहतात. बाबा म्हणतात - ‘क्रोध का केलास?’ तर म्हणतात - ‘मी नाही केला, परंतु क्रोध करायला लावला गेला. केला नाही, माझ्याकडून करवला गेला.’ आता बाबा काय म्हणणार? मग काय म्हणतात, तुम्ही जरी असता ना तर तुम्हाला देखील आला असता. गोड-गोड गोष्टी करतात ना! मग म्हणतात निराकार ऐवजी साकार शरीर घेऊन बघा. आता सांगा अशा गोड मुलांना बाबा काय सांगणार! बाबांना तरी देखील दयाळु बनावेच लागते. म्हणतात अच्छा, आता माफ करत आहे परंतु पुन्हा कधी क्रोध करायचा नाही. परंतु उत्तरे तर खूप छान-छान देतात.

तर पवित्रता तुम्हा ब्राह्मणांचा सर्वात मोठ्यात मोठा शृंगार आहे, म्हणून तुमच्या चित्रांचा किती शृंगार करतात. हे पवित्रतेचे यादगार (प्रतीक) शृंगार आहे. पवित्रता, संपूर्ण पवित्रता, कामचलाऊ पवित्रता नाही. संपूर्ण पवित्रता तुम्हा ब्राह्मण जीवनाची सर्वात मोठ्यात मोठी प्रॉपर्टी आहे, रॉयल्टी आहे, पर्सनॅलिटी आहे. म्हणूनच तर भक्त लोक देखील एक दिवस पवित्रतेचे व्रत ठेवतात. ही तुमची कॉपी केली आहे. दुसरे व्रत घेतात - खाण्या-पिण्याचे. खाण्या-पिण्याचे व्रत देखील आवश्यक आहे. कशासाठी? तुम्ही ब्राह्मणांनी देखील खाण्या-पिण्याचे पक्के व्रत घेतले आहे ना! जेव्हा मधुबन येण्यासाठी सर्वांकडून फॉर्म भरून घेता, तेव्हा हे देखील फॉर्ममध्ये भरून घेता ना - ‘खाणे-पिणे शुद्ध आहे?’ भरून घेता ना! तर खाण्या-पिण्याचे व्रत पक्के आहे? पक्के आहे कि कधी-कधी कच्चे होते? डबल विदेशींचे तर डबल पक्के असेल ना! डबल विदेशींचे तर डबल पक्के आहे ना कि कधी थकून जाता तर म्हणता अच्छा आज थोडेसे खाऊया. थोडे ढिले करता, नाही. खाण्या-पिण्याचे पक्के आहे, म्हणून भक्त लोक देखील खाण्या-पिण्याचे व्रत घेतात. तिसरे व्रत घेतात जागरणाचे - रात्री जागतात ना! तर तुम्ही ब्राह्मण देखील अज्ञान निद्रेमधून जागण्याचे व्रत घेता. मधे-मधे अज्ञानरुपी झोप तर नाही येत ना! भक्त लोक तुम्हाला कॉपी करत आहेत, तर तुम्ही पक्के आहात म्हणून तर कॉपी करत आहेत. कधीही अज्ञान अर्थात दुर्बलतेची, निष्काळजीपणाची, आळशीपणाची झोप येऊ नये. कि थोडी-थोडी डुलकी आली तरी काही हरकत नाही? डुलकी काढता का? असे अमृतवेलेला देखील बरेचजण डुलक्या काढतात. परंतु हा विचार करा की, आमच्या यादगारमध्ये (स्मृतीरूपामध्ये) भक्त लोक काय-काय कॉपी करत आहेत! ते इतके पक्के राहतात, काहीही होऊ दे, परंतु व्रत तोडत नाहीत. आजच्या दिवशी भक्त लोक व्रत ठेवणार खाण्या-पिण्याचे देखील आणि तुम्ही आज काय करणार? पिकनिक करणार? ते व्रत ठेवणार आणि तुम्ही पिकनिक करणार, केक कापणार ना! पिकनिक करणार कारण तुम्ही जन्मापासूनच व्रत घेतले आहे म्हणून आजच्या दिवशी पिकनिक करणार.

बापदादांना आता मुलांकडून काय पाहिजे आहे? माहित तर आहे. संकल्प खूप चांगले करता, इतके चांगले संकल्प करता जे ऐकून-ऐकून खुश होतात. संकल्प करता परंतु नंतर काय होते? संकल्प कमजोर का होतात? जर इच्छा देखील आहे कारण बाबांवर प्रेम खूप आहे, बाबा देखील जाणतात की बापदादांवर सर्व मुलांचे हृदयापासून प्रेम आहे आणि प्रेमामध्ये सगळे बोट वर करतात की, १०० टक्केच तर काय परंतु १०० टक्क्या पेक्षाही जास्त प्रेम आहे आणि बाबा देखील मानतात प्रेमामध्ये सगळेच उत्तीर्ण आहेत. परंतु काय आहे? ‘परंतु’ आहे कि नाही? ‘परंतु’ येते कि नाही येत? पांडव, मधून-मधून ‘परंतु’ येते का? ‘नाही’ म्हणत नाही आहेत, म्हणजे ‘होय’ आहे. बापदादांनी मेजॉरिटी मुलांची एक गोष्ट नोट केली आहे, प्रतिज्ञा कमजोर होण्याचे एकच कारण आहे, एकच शब्द आहे. विचार करा, तो एक शब्द कोणता आहे? टीचर्स बोला, तो एक शब्द कोणता आहे? पांडव बोला, तो एक शब्द कोणता आहे? लक्षात तर आला आहे ना! तो एक शब्द आहे - “मी”. अभिमानाच्या रूपामध्ये देखील “मी” येतो आणि कमजोर करण्यामध्ये देखील “मी” येतो. ‘मी’ जे बोलले, ‘मी’ जे केले, ‘मी’ जे वाटते, तेच राइट आहे. तसेच व्हायला हवे. हा अभिमानाचा “मी”. “मी” जेव्हा पूर्ण होत नाही ना तेव्हा मन निराश सुद्धा होते - ‘मी करू शकत नाही, चालू शकत नाही, खूप कठीण आहे’. एक बॉडी-कॉन्शसवाला (देह-अभिमानवाला) “मी” बदलावा; “मी” स्वमान देखील आठवण करून देतो आणि “मी” देह-अभिमानामध्ये देखील घेऊन येतो. “मी” मनाला दुःखी सुद्धा करतो आणि “मी” मनाला आनंदीत देखील करतो आणि अभिमानाचे लक्षण जाणता का काय असते? कधीही कोणामध्येही जर बॉडी-कॉन्शसचा अभिमान अंश मात्र जरी असेल तर त्याची निशाणी काय असेल? तो आपला अपमान सहन करू शकणार नाही. अभिमान अपमान सहन करू देणार नाही. जरा देखील कोणी म्हटले ना की, हे बरोबर नाही, थोडे निर्माण बना, तर अपमान वाटेल, हे अभिमानाचे लक्षण आहे.

बापदादा वतनमध्ये हसत होते - ही मुले शिवरात्रीला जिकडे-तिकडे भाषणे करतात ना, आता खूप भाषणे करत आहात ना. त्यामध्ये म्हणतात, बापदादांना मुलांचा एक पॉईंट आठवला. तर त्यामध्ये म्हणतात की, शिवरात्रीला बकऱ्याचा बळी दिला जातो - तो बकरा में-में खूप करतो ना, तर असे शिवरात्रीला या “मी” “मी” चा बळी द्या. तर बाबा ऐकून-ऐकून हसत होते. तर या “मी” चा तुम्ही देखील बळी द्या. सरेंडर करू शकता? करू शकता ना? पांडव करू शकता का? डबल फॉरेनर्स करू शकता का? संपूर्ण सरेंडर का फक्त सरेंडर? संपूर्ण सरेंडर. आज बापदादा झेंडा फडकवताना अशीच प्रतिज्ञा करून घेणार नाहीत. आज प्रतिज्ञा करा आणि फाईल मध्ये कागद जमा करावा लागेल, अशी प्रतिज्ञा करून घेणार नाहीत. काय विचार करता, दादी आज देखील अशीच प्रतिज्ञा करवून घ्यायची का? फायनल करणार कि फाईल मध्ये जमा करणार? बोला, (फायनल करा) हिंमत आहे? हिंमत आहे ना? ऐकण्यामध्ये मग्न झाले आहेत, हात वर करत नाहीत. उद्या तर काही होणार नाही! नाही ना! उद्या माया फेरी मारायला येईल. मायेचे देखील तुमच्यावर प्रेम आहे ना कारण आजकाल तर सर्वजण धुमधडाक्यात सेवेचे प्लॅन बनवत आहात ना. जेव्हा सेवा जोमाने करत आहात तर सेवा जोमाने करणे म्हणजेच संपूर्ण समाप्तीच्या वेळेला समीप आणणे आहे. असे समजू नका भाषण करून आलो परंतु समयाला समीप आणत आहात. सेवा चांगली करत आहात. बापदादा खुश आहेत. परंतु बापदादा बघत आहेत की, वेळ जवळ येत आहे, घेऊन येत आहात तुम्ही, असेच लाख-दीड लाख एकत्र नाही केलात, हे समयाला समीप आणले आहे. आता गुजरातने केले, मुंबई करेल, बाकीचे देखील करत आहेत. चला लाख नाही तर किमान ५० हजार तरी, परंतु संदेश देत आहात तर संदेशा सोबतच संपन्नतेची देखील तयारी आहे? तयारी आहे का? विनाशाला बोलावत आहात म्हणजे तयारी आहे? दादीने प्रश्न केला होता की, ‘आता कोणता असा प्लॅन बनवू ज्यामुळे लवकरात-लवकर प्रत्यक्षता होईल?’ तर बापदादा म्हणत आहेत - ‘प्रत्यक्षता तर सेकंदाची गोष्ट आहे परंतु प्रत्यक्षतेच्या अगोदर बापदादा विचारत आहेत स्थापना करणारे एव्हररेडी आहेत? पडदा उघडू? का कोणी कानाचा शृंगार करत असेल, कोणी मस्तकाचा? तयार आहात? होणार, कधी होणार? डेट सांगा. जशी आता डेट फिक्स केली ना! या महिन्यामध्ये संदेश द्यायचा आहे, असे सर्व एव्हररेडी, कमीतकमी १६००० तर एव्हररेडी असावेत, ९ लाख सोडा, त्याला देखील सोडा. १६ हजार तरी तयार व्हावेत? आहेत तयार? टाळी वाजवू? असेच ‘होय’ म्हणायचे नाही. एव्हररेडी व्हा तर बापदादा टच करेल, टाळी वाजवेल, प्रकृती आपले काम सुरू करेल. सायन्स वाले आपले काम सुरु करतील. उशीर कशाला, सर्व रेडी आहेत. १६ हजार तयार आहेत? आहेत तयार? होतील. (तुम्हाला जास्ती माहिती आहे) हे उत्तर तर सुटका करून घेणारे आहे. १६ हजाराचा रिपोर्ट आला पाहिजे - एव्हररेडी, संपूर्ण पवित्रतेने संपन्न झाले. बापदादांना टाळी वाजवायला काही वेळ लागत नाही. डेट सांगा. (तुम्ही डेट द्या) सर्वांना विचारा. पहा, होणार तर आहेच परंतु जे ऐकवले एक “मी” शब्दाचे संपूर्ण परिवर्तन, तेव्हाच बाबांसोबत जाणार. नाहीतर मागे-मागे चालावे लागेल. बाप-दादा म्हणून आता अजून गेट उघडत नाहीत कारण सोबत जायचे आहे.

ब्रह्मा बाबा सर्व मुलांना विचारत आहेत की, गेट उघडण्याची तारीख सांगा. गेट उघडायचे आहेत ना! यायचे आहे ना! आज साजरे करणे अर्थात बनणे. फक्त केक कट करायचा नाही परंतु ‘मी’ला नष्ट करायचे. विचार करत आहात कि विचार केलेला आहे? कारण की बापदादांपाशी अमृतवेलेला सर्वांचे खूप व्हरायटी संकल्प पोहोचतात. तर आपसामध्ये विचार-विमर्श करा आणि बाबांना डेट सांगा. जोपर्यंत डेट फिक्स करत नाही ना, तोपर्यंत कोणतेही कार्य होत नाही. पहिल्यांदा महारथी आपसामध्ये डेट फिक्स करा मग सर्वजण फॉलो करतील. फॉलो करणारे तयार आहेत आणि तुमच्या हिंमतीमुळे आणखी बळ मिळेल. जसे बघा आत्ता उमंग-उल्हास दिला तर तयार झाले ना! असा संपन्न बनण्याचा प्लॅन बनवा. ध्यास घ्या (धुन लावा) की, कर्मातीत बनायचेच आहे. काहीही होवो, बनायचेच आहे, करायचेच आहे, व्हायचेच आहे. सायन्सवाल्यांचा देखील आवाज, विनाश करणाऱ्यांचा सुद्धा आवाज बाबांच्या कानापर्यंत येतो, ते देखील म्हणतात - ‘थांबवता कशाकरिता, थांबवता कशाकरिता…’ ॲडव्हान्स पार्टी देखील म्हणते डेट फिक्स करा, डेट फिक्स करा. ब्रह्मा बाबा देखील म्हणतात डेट फिक्स करा. तर ही मिटिंग करा. बापदादांना आता इतके दुःख पहावत नाही आहे. पहिल्यांदा तर तुम्हा शक्तींना, देवता रूप पांडवांना दया आली पाहिजे. किती धावा करत आहेत. आता तुमच्या कानांमध्ये हाका मारण्याचा आवाज घुमला पाहिजे. ‘समय की पुकार’ कार्यक्रम करता ना! आता भक्तांची हाक देखील ऐका, दुःखी असणाऱ्यांची हाक देखील ऐका. सेवेमध्ये नंबर चांगला आहे, हे तर बापदादा सुद्धा सर्टिफिकेट देतात, उमंग-उत्साह चांगला आहे, गुजरातने पहिला नंबर लावला, तर पहिल्या नंबरसाठी मुबारक आहे. आता थोडीशी हाक सुद्धा ऐका तर खरी, बिचारे खूप हाका मारत आहेत, अंतःकरणापासून बोलावत आहेत, तळमळत आहेत. विज्ञानवाले देखील खूप ओरडत आहेत - ‘कधी करायचे, कधी करायचे, कधी करायचे’, अशी हाक मारत आहेत. आज भले केक कापा, परंतु उद्यापासून हाक ऐका. स्वहेज (उत्सव) तर संगमयुगातील साजरे करायचे आहेत. एका बाजूला साजरे करायचे दुसऱ्या बाजूला आत्म्यांना तयार करायचे. अच्छा. तर काय ऐकलेत?

तुमचे एक गाणे आहे - ‘दु:खियों पर कुछ रहम करो’. तुमच्या शिवाय कोणीही दया करू शकत नाहीत म्हणून आता समयानुसार दयेचे मास्टर सागर बना. स्वतःवर देखील दया, अन्य आत्म्यांप्रति देखील दया. आता आपले हेच स्वरूप लाईट हाऊस बनून विविध लाईट्सची किरणे द्या. साऱ्या विश्वातील अप्राप्त आत्म्यांना प्राप्तीच्या ओंजळीची किरणे द्या. अच्छा.

सर्व साक्षात् बाप मूर्त श्रेष्ठ आत्म्यांना, सदैव उमंग-उत्साहामध्ये राहणाऱ्या बाबांच्या समीप आत्म्यांना, सदैव सर्व पावले बाप समान करणाऱ्या मुलांना, चोहो बाजूंच्या ब्राह्मण जन्मातील मुबारक पात्र मुलांना, सदैव एकाग्रतेच्या शक्ति संपन्न आत्म्यांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि पद्मा-पदम वेळा जन्म मुबारक असो, मुबारक असो, मुबारक असो आणि नमस्ते.

प्रिय अव्यक्त बापदादांनी आपल्या हातांनी शिव ध्वज फडकवला आणि सर्वांचे अभिनंदन केले:-

आजच्या दिवशी सर्वांनी आपल्या जन्म दिवसाची मुबारक दिली आणि घेतली आणि झेंडा देखील फडकवला. परंतु आता तो दिवस लवकर आणायचा आहे जो विश्वाच्या ग्लोबवर सर्व आत्मे उभे राहून तुम्हा सर्वांच्या चेहऱ्यामध्ये बाबांचा झेंडा पाहतील. कपड्याचा झेंडा तर निमित्त मात्र आहे परंतु प्रत्येक मुलाचा चेहरा बाबांचे चित्र दाखवू दे. असा झेंडा फडकवायचा आहे. तो दिवस देखील खूप-खूप-खूप लवकर आणायचा आहे, येणार आहे, येणार आहे. ओम् शांति.

वरदान:-
हदच्या रॉयल इच्छां पासून मुक्त राहून सेवा करणारे नि:स्वार्थ सेवाधारी भव

जसे ब्रह्मा बाबांनी कर्माच्या बंधनापासून मुक्त, न्यारे बनण्याचा पुरावा दिला. सेवेच्या आणि स्नेहाच्या व्यतिरिक्त इतर कोणतेही बंधन नाही. सेवेमध्ये ज्या हदच्या रॉयल इच्छा असतात त्या देखील कर्माच्या हिशोबाच्या बंधनामध्ये बांधतात, खरे सेवाधारी या हिशोबा पासून देखील मुक्त राहतात. जसे देहाचे बंधन, देहाच्या संबंधाचे बंधन आहे, तसे सेवेमध्ये स्वार्थ - हे देखील बंधन आहे. या बंधनापासून अथवा रॉयल हिशोबा पासून देखील मुक्त निःस्वार्थ सेवाधारी बना.

सुविचार:-
वायद्यांना फाईलमध्ये ठेवू नका, फायनल बनून दाखवा.

सूचना:- आज महिन्याचा तिसरा रविवार आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे, सर्व ब्रह्मा वत्स संगठीत रूपामध्ये सायंकाळी ६.३० ते ७.३० वाजे पर्यंत विशेष मूलवतनच्या गहन शांतीचा अनुभव करा. मन-बुद्धीला एकाग्र करून ज्वाला स्वरूपामध्ये स्थित व्हा, संपन्नता आणि संपूर्णतेचा अनुभव करा.