16-01-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - आठवणीचा चार्ट ठेवा, जितकी-जितकी आठवणीमध्ये राहण्याची सवय लागेल तितकी पापे नष्ट होत जातील, कर्मातीत अवस्था समीप येत जाईल”

प्रश्न:-
चार्ट ठीक आहे की नाही, याची पारख कोणत्या चार गोष्टींवरून केली जाते?

उत्तर:-
१. व्यक्ती, २. वर्तन, ३. सेवा आणि ४. आनंद. बापदादा या चार गोष्टींना पाहून सांगतात की यांचा चार्ट ठीक आहे की नाही? जी मुले म्युझियम किंवा प्रदर्शनीची सेवा करतात, ज्यांचे वर्तन रॉयल आहे, खूप आनंदात राहतात, तर नक्कीच त्यांचा चार्ट ठीक असणार.

गीत:-
मुखड़ा देख ले प्राणी…

ओम शांती।
मुलांनी गाणे ऐकले, याचा अर्थ देखील आतून जाणून घ्यायला हवा की किती पापे बाकी राहिली आहेत, किती पुण्य जमा झाले आहे अर्थात आत्म्याला सतोप्रधान बनण्यासाठी किती वेळ लागणार आहे? आता कितपत पावन बनलो आहोत - एवढे तर समजू शकता ना? चार्टमध्ये काहीजण लिहितात - आम्ही दोन-तीन तास आठवणीमध्ये राहीलो, कोणी लिहितात एक तास. हे तर खूप कमी झाले. कमी आठवण केलीत तर कमी पापे नष्ट होतील. अजून पापे तर पुष्कळ आहेत ना, जी अजून नष्ट झालेली नाही आहेत. आत्म्यालाच प्राणी म्हटले जाते. तर आता बाबा म्हणतात - हे आत्मा, स्वतःला विचार - या हिशोबाने किती पापे नष्ट झाली असतील? चार्टवरून माहिती होते - मी किती पुण्य आत्मा बनलो आहे? हे तर बाबांनी समजावून सांगितले आहे, कर्मातीत अवस्था शेवटी होणार. आठवण करता-करता सवय झाली तर जास्त पापे नष्ट होऊ लागतील. स्वतःची तपासणी करायची आहे की, मी बाबांच्या आठवणीमध्ये किती राहतो? यामध्ये थापा मारण्याचा प्रश्नच नाही. ही तर स्वतःची तपासणी करायची असते. बाबांना आपला चार्ट लिहून द्याल तर बाबा लगेच सांगतील की हा चार्ट ठीक आहे की नाही? व्यक्ती, वर्तन, सेवा आणि आनंद पाहून बाबा लगेच समजून जातात की यांचा चार्ट कसा आहे! घडो-घडी आठवण कोणाला रहात असेल? जे म्युझियम अथवा प्रदर्शनीच्या सेवेमध्ये असतात. म्युझियममध्ये तर पूर्ण दिवस येणे-जाणे चालूच असते. दिल्लीमध्ये तर खूप येत राहतील. वारंवार बाबांचा परिचय द्यावा लागतो. समजा कोणाला तुम्ही सांगितले की, विनाशाला थोडीच वर्षे बाकी आहेत. तर म्हणतात - असे कसे होऊ शकते? लगेच तुम्ही सांगितले पाहिजे, ‘हे काय आम्ही थोडेच सांगत आहोत’. भगवानुवाच आहे ना. भगवानुवाच तर जरूर सत्यच असणार ना म्हणून बाबा समजावून सांगतात की, तुम्ही वारंवार सांगा - ‘हे शिवबाबांचे श्रीमत आहे. आम्ही म्हणत नाही, त्यांचे श्रीमत आहे. ते आहेतच ट्रुथ’. सर्वात पहिले तर बाबांचा परिचय जरूर द्यावा लागतो म्हणून बाबांनी सांगितले आहे प्रत्येक चित्रामध्ये लिहा - ‘शिव भगवानुवाच’. ते तर ॲक्यूरेटच सांगणार, आम्ही थोडेच जाणत होतो. बाबांनी सांगितले आहे तेव्हाच तर आम्ही सांगत आहोत. कधी-कधी वर्तमानपत्रामध्ये सुद्धा लिहितात - अमक्याने भविष्यवाणी केली आहे की, लवकरच विनाश होणार आहे.

आता तुम्ही तर आहात बेहदच्या बाबांची मुले. प्रजापिता ब्रह्माकुमार-कुमारी तर बेहदचे आहेत ना. तुम्ही सांगाल आम्ही बेहद बाबांची मुले आहोत. तेच पतित-पावन ज्ञानाचे सागर आहेत. पहिली ही गोष्ट समजावून सांगून, पक्के बनवून मग पुढे गेले पाहिजे. शिवबाबांनी हे सांगितले आहे - यादव, कौरव इत्यादी विनाश काले विपरीत बुद्धी. शिवबाबांचे नाव घेत राहिलात तर यामध्ये मुलांचे देखील कल्याण आहे, शिवबाबांची आठवण करत रहाल. बाबांनी जे तुम्हाला समजावून सांगितले आहे, ते तुम्ही मग इतरांना समजावून सांगत रहा. तर सेवा करणाऱ्यांचा चार्ट चांगला रहात असेल. पूर्ण दिवस ८ तास सेवेमध्ये बिझी राहतात. फार-फार तर एक तास रेस्ट घेत असतील. तरी सुद्धा ७ तास तर सेवेमध्ये राहतात ना. तर समजले पाहिजे त्यांची जास्त विकर्म नष्ट होत असतील. खूप जणांना वारंवार बाबांचा परिचय देतात तर जरूर अशी सेवाभावी मुले बाबांना देखील प्रिय वाटतील. बाबा बघतात हे तर अनेकांचे कल्याण करतात, रात्रंदिवस यांचे हेच चिंतन आहे - आपल्याला अनेकांचे कल्याण करायचे आहे. अनेकांचे कल्याण करणे अर्थात स्वतःचे करतात, स्कॉलरशिप देखील त्यांना मिळेल जे अनेकांचे कल्याण करतात. मुलांना तर हाच धंदा आहे. टीचर बनून अनेकांना मार्ग दाखवायचा आहे. पहिल्यांदा तर हे नॉलेज व्यवस्थित धारण करावे लागेल. कोणाचे कल्याण करत नसतील तर समजले जाते की यांच्या नशिबात नाही आहे. मुले म्हणतात - बाबा, आम्हाला नोकरीतून सोडवा, आम्ही या सेवेला लागतो. बाबा देखील बघतील की हे सेवेच्या लायक आहेत, बंधनमुक्त सुद्धा आहेत, तेव्हा म्हणतील भले ५००-१००० कमावण्यापेक्षा तर या सेवेमध्ये लागून अनेकांचे कल्याण करा. जर बंधनमुक्त असाल तर. ते देखील सेवाभावी बघतील तरच बाबा सल्ला देतील. सेवाभावी मुलांना तर जिकडे-तिकडे बोलावत राहतात. स्कुलमध्ये स्टुडंट शिकतात ना, हे देखील शिक्षण आहे. हे काही सामान्य मत नाही आहे. सत् म्हणजेच सत्य बोलणारा. आम्ही श्रीमतावर तुम्हाला हे सांगतो. ईश्वराचे मत तुम्हाला आताच मिळते.

बाबा म्हणतात - तुम्हाला परत जायचे आहे. आता बेहद सुखाचा वारसा घ्या. कल्प-कल्प तुम्हाला वारसा मिळत आलेला आहे कारण स्वर्गाची स्थापना तर कल्प-कल्प होते ना. हे कोणालाच माहिती नाही की, हे सृष्टिचक्र ५ हजार वर्षांचे आहे. मनुष्य तर अगदीच घोर अंधारामध्ये आहेत. तुम्ही आता लख्ख प्रकाशामध्ये आहात. स्वर्गाची स्थापना तर बाबाच करणार. हे तर गायन आहे - साऱ्या दुनियेला आग लागली तरीही अज्ञान झोपेमध्ये झोपून राहीले. तुम्ही मुले जाणता बेहदचे बाबा ज्ञानाचे सागर आहेत. सर्व श्रेष्ठ बाबांचे कर्तव्य देखील श्रेष्ठ आहे. असे नाही, ईश्वर तर समर्थ आहेत, जे पाहिजे ते करतील. नाही, हा ड्रामा देखील अनादि बनलेला आहे. सर्व काही ड्रामा अनुसारच चालते. युद्धामध्ये तर किती मरतात. हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे. यामध्ये भगवान काय करू शकतात. भूकंप इत्यादी होतो तर किती टाहो फोडून ओरडतात - ‘हे भगवान’, परंतु भगवान काय करू शकणार. भगवंताला तर तुम्ही बोलावले आहे - येऊन विनाश करा. पतित दुनियेमध्ये बोलावले आहे. स्थापना करून सर्वांचा विनाश करा. मी करत नाही, हे तर ड्रामामध्ये नोंदलेले आहे. रक्तरंजित खेळ होतो. यामध्ये वाचवण्याची तर काही गोष्टच नाही. तुम्ही सांगितले आहे - पावन दुनिया बनवा तर जरूर पतित आत्मे जातील ना. काहीजण तर बिलकुल समजत नाहीत. श्रीमताचा अर्थ देखील समजत नाहीत, भगवान काय आहेत, काहीही समजत नाहीत. एखादा मुलगा नीट शिकत नसेल तर आई-वडील म्हणतात - तू तर पत्थर-बुद्धी आहेस. सतयुगामध्ये तर असे म्हणत नाहीत. कलियुगामध्ये तर आहेतच पत्थर-बुद्धी. पारस-बुद्धीचे इथे कोणी असू शकत नाहीत. आजकाल तर बघा मनुष्य काय-काय करत असतात, एक हार्ट काढून दुसरे बसवतात. अच्छा, एवढी मेहनत करून हे केले परंतु याने फायदा तो काय? फार-फार तर आणखी थोडे दिवस जिवंत राहील. खूप रिद्धी-सिद्धी शिकून येतात, फायदा तर काहीच नाही. भगवंताची आठवणच यासाठी करतात की, येऊन आम्हाला पावन दुनियेचा मालक बनवा. आम्ही पतित दुनियेमध्ये राहून खूप दुःखी झालो आहोत. सतयुगामध्ये तर कोणताही आजार इत्यादी दुःखाची गोष्ट नसते. आता बाबांकडून तुम्ही किती उच्च पद प्राप्त करता. इथे देखील मनुष्य शिक्षणामुळेच उच्च डिग्री प्राप्त करतात. अतिशय आनंदात असतात. तुम्ही मुले समजता हे तर थोडेच दिवस जगतील. डोक्यावर पापांचे ओझे तर खूप आहे. खूप सजा भोगतील. स्वतःला पतित तर म्हणतात ना. विकारामध्ये जाणे पाप समजत नाहीत. पाप आत्मा तर बनतात ना. म्हणतात गृहस्थ आश्रम तर अनादि चालत आला आहे. समजावले जाते सतयुग-त्रेतामध्ये पवित्र गृहस्थ आश्रम होता. पाप आत्मे नव्हते. इथे पाप आत्मे आहेत म्हणून दुःखी आहेत. इथे तर अल्पकाळाचे सुख आहे, आजारी पडला आणि हा मेला. मृत्यु तर तोंड आवासून उभा आहे. अचानक हार्ट फेल होते. इथे आहेच कागविष्ठे समान सुख. तिथे तर तुम्हाला अथाह सुख आहे. तुम्ही साऱ्या विश्वाचे मालक बनता. कोणत्याही प्रकारचे दुःख होत नाही. ना गरमी, ना थंडी असेल, सदैव बहारदार मौसम असेल. तत्व देखील ऑर्डरमध्ये राहतात. स्वर्ग तर स्वर्गच आहे, रात्रं-दिवसाचा फरक आहे. तुम्ही स्वर्गाची स्थापना करण्यासाठी बाबांना बोलावता, येऊन पावन दुनियेची स्थापना करा. आम्हाला पावन बनवा.

तर प्रत्येक चित्रावर शिव भगवानुवाच लिहिलेले असावे. यामुळे क्षणो-क्षणी शिवबाबांची आठवण येईल. ज्ञान सुद्धा देत राहतील. म्युझियम अथवा प्रदर्शनीच्या सेवेमध्ये ज्ञान आणि योग दोन्ही एकत्र चालतात. आठवणीमध्ये राहिल्याने नशा चढेल. तुम्ही पावन बनून साऱ्या विश्वाला पावन बनवता. जेव्हा तुम्ही पावन बनता तर जरूर सृष्टी देखील पावन पाहिजे. शेवटी महाविनाशाची वेळ असल्याकारणाने सर्वांचा हिशोब चुकता होतो. तुमच्यासाठी मला नवीन सृष्टीचे उद्घाटन करावे लागते. मग शाखा उघडत राहतात. पवित्र बनविण्यासाठी नवीन दुनिया सतयुगाचे फाउंडेशन तर बाबांव्यतिरिक्त इतर कोणीही घालू शकत नाही. तर अशा बाबांची आठवण देखील केली पाहिजे. तुम्ही म्युझियम इत्यादीचे उद्घाटन मोठ्या व्यक्तींकडून करून घेता तर आवाज पसरेल. मनुष्य समजतील - इथे हे देखील येतात. कोणी म्हणतात तुम्ही लिहून द्या, आम्ही बोलतो. ते देखील चुकीचे आहे. चांगल्या रीतीने समजून घेऊन तोंडी बोला, तर खूप चांगले होईल. काहीजण तर लिहिलेले वाचून ऐकवतात, ज्यामुळे भाषण अचूक होईल. तुम्हा मुलांना तर तोंडी समजावून सांगायचे आहे. तुमच्या आत्म्यामध्ये सर्व नॉलेज आहे ना. मग तुम्ही इतरांना देता. प्रजेची वृद्धी होत राहते. लोकसंख्या देखील वाढत जाते ना. सर्व गोष्टी वाढत राहतात. पूर्ण झाड जडजडीभूत झाले आहे. जे आपल्या धर्माचे असतील ते निघून येतील. नंबरवार तर आहेत ना. सर्वच काही एकसमान शिकू शकत नाहीत. कोणी १०० मधून एक मार्क देखील घेणारे आहेत, थोडे जरी ऐकले, एक मार्क मिळाला तरी स्वर्गामध्ये येतील. हे आहे बेहदचे शिक्षण, जे बेहदचे बाबाच शिकवतात. जे या धर्माचे असतील ते निघून येतील. पहिले तर सर्वांना मुक्तिधाम आपल्या घरी जायचे आहे नंतर मग नंबरवार येत राहतील. कोणी तर त्रेताच्या शेवटी सुद्धा येतील. भले ब्राह्मण बनतात परंतु सर्वच ब्राह्मण काही सतयुगामध्ये येत नाहीत, त्रेताच्या अंतापर्यंत येतील. या समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. बाबा जाणतात राजधानी स्थापन होत आहे, सर्व एकसमान असू शकत नाहीत. राजाईमध्ये तर सर्व व्हरायटी पाहिजे. प्रजेला बाहेरचे म्हटले जाते. बाबांनी सांगितले होते तिथे मंत्री इत्यादींची गरज नसते. त्यांना श्रीमत मिळाली, ज्याद्वारे हे बनले. मग हे थोडेच असा कोणाचा सल्ला घेतील. मंत्री इत्यादी कोणीही नसतात. मग जेव्हा पतित होतात तेव्हा एक मंत्री, एक राजा-राणी असतात. आता तर किती मंत्री आहेत. इथे तर पंचायती राज्य आहे ना. एकाचे मत दुसऱ्याच्या मताशी जुळून येत नाही. एकासोबत मैत्री ठेवा, समजावून द्या, तर काम करतील. आणि त्याजागी जर दुसरा आला, त्याला समजले नाही तर आणखीनच काम बिघडवून ठेवतील. एकाची बुद्धी दुसऱ्याच्या बुद्धीशी जुळून येत नाही. तिथे तर तुमच्या सर्व कामना पूर्ण होतात. तुम्ही किती दुःख भोगले आहे, याचे नावच आहे दुःखधाम. भक्तीमार्गामध्ये किती त्रास सहन केला आहे. हा सुद्धा ड्रामा. जेव्हा दुःखी होतात तेव्हा बाबा येऊन सुखाचा वारसा देतात. बाबांनी तुमची बुद्धी खूप चांगली केली आहे. मनुष्य तर म्हणतात श्रीमंताकरिता स्वर्ग आहे, गरीब नरकामध्ये आहेत. तुम्ही खऱ्या अर्थाने जाणता - स्वर्ग कशाला म्हटले जाते. सतयुगामध्ये थोडेच कोणी दयाळू असे म्हणून बोलावणार आहेत. इथे बोलावतात - दया करा, लिबरेट करा. बाबाच सर्वांना शांतीधाम, सुखधाममध्ये घेऊन जातात. अज्ञान काळामध्ये तुम्ही देखील काहीच जाणत नव्हता. जे नंबरवन तमोप्रधान, तेच पुन्हा नंबरवन सतोप्रधान बनतात. हे आपली बढाई करत नाहीत. बढाई तर एकाचीच आहे. लक्ष्मी-नारायणाला देखील तसे बनवणारे तर तेच आहेत ना. उच्च ते उच्च भगवान. ते बनवतात देखील उच्च. बाबा जाणतात, सर्वच काही उच्च बनणार नाहीत. तरीही पुरुषार्थ करावा लागेल. इथे तुम्ही येताच नरापासून नारायण बनण्याकरिता. म्हणतात - ‘बाबा, आम्ही तर स्वर्गाची बादशाही घेणार. आम्ही सत्यनारायणाची सत्य कथा ऐकायला आलो आहोत’. बाबा म्हणतात - ‘अच्छा, तुमच्या मुखात गुलाब, मेहनत करा. सगळेच काही लक्ष्मी-नारायण बनणार नाहीत. ही राजधानी स्थापन होत आहे. राजाई घराण्यामध्ये, प्रजा घराण्यामध्ये हवेत तर भरपूर ना. आश्चर्यवत सुनन्ती, कथन्ती, फारकती देवन्ती… मग पुन्हा परत देखील येतात. जी मुले आपली काही ना काही उन्नती करतात तर वर चढू लागतात. गरीबच सरेंडर (समर्पित) होतात. देहा सहित इतर कोणाचीही आठवण राहू नये, ध्येय मोठे आहे. जर नाते जुळलेले असेल तर त्याची आठवण जरूर येईल. बाबांना कोणाची आठवण येईल? संपूर्ण दिवस बेहदमध्येच बुद्धी राहते. किती मेहनत करावी लागते. बाबा म्हणतात - माझ्या मुलांमध्ये देखील उत्तम, मध्यम, कनिष्ठ आहेत. दुसरे कोणी येतात तर ते देखील समजतात हे पतित दुनियेतील आहेत. तरीही यज्ञाची सेवा करत आहेत तर रिगार्ड द्यावा लागतो. बाबा युक्तिबाज (हुशार) तर आहेत ना. नाहीतर हे टॉवर ऑफ सायलेन्स, होलीएस्ट ऑफ होली टॉवर आहेत, जिथे होलीएस्ट ऑफ होली बाबा साऱ्या विश्वाला बसून होली (पवित्र) बनवतात. इथे कोणीही पतित येऊ शकत नाही. परंतु बाबा म्हणतात मी आलोच आहे सर्व पतितांना पावन बनविण्यासाठी, या खेळामध्ये माझा देखील पार्ट आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) आपल्या चार्टला पाहून तपासणी करायची आहे की किती पुण्य जमा आहे? आत्मा किती सतोप्रधान बनली आहे? आठवणीमध्ये राहून सर्व हिशोब चुकते करायचे आहेत.

२) स्कॉलरशिप घेण्यासाठी सेवाभावी बनून अनेकांचे कल्याण करायचे आहे. बाबांचे प्रिय बनायचे आहे. टीचर बनून अनेकांना मार्ग सांगायचा आहे.

वरदान:-
आपल्या फरिश्ता स्वरुपाद्वारे सर्वांना वारशाचा अधिकार देणारे आकर्षण-मूर्त भव

फरिश्ते स्वरूपाचा असा चमकणारा ड्रेस धारण करा जो दूर-दूर पर्यंत आत्म्यांना आपल्याकडे आकर्षित करेल आणि सर्वांना भिकारी पणापासून सोडवून वारशाचे अधिकारी बनवेल, यासाठी ज्ञान मूर्त, आठवण मूर्त आणि सर्व दिव्य गुण मूर्त बनून उडत्या कलेमध्ये स्थित राहण्याचा अभ्यास वाढवत चला. तुमची उडती कलाच सर्वांना चालता-फिरता फरिश्ता सो देवता स्वरूपाचा साक्षात्कार घडवेल. हीच विधाता, वरदाता पणाची स्टेज आहे.

बोधवाक्य:-
इतरांच्या मनातील भावाला जाणण्यासाठी सदैव मनमनाभवच्या स्थितीमध्ये स्थित रहा.

आपल्या शक्तीशाली मनसा द्वारे सकाश देण्याची सेवा करा:-

मनसा शक्तीचा आरसा आहे - बोल आणि कर्म. भले अज्ञानी आत्मे असोत, किंवा ज्ञानी आत्मे असोत - दोघांच्याही संबंध-संपर्कामध्ये बोल आणि कर्म शुभ-भावना, शुभ-कामनावाले असावेत. ज्यांची मनसा शक्तीशाली किंवा शुभ असेल त्यांची वाचा आणि कर्मणा आपोआपच शक्तीशाली शुद्ध असेल, शुभ-भावनावाली असेल. मनसा शक्तीशाली अर्थात आठवणीची शक्ती श्रेष्ठ असेल, शक्तीशाली असेल, सहजयोगी असतील.