16-02-25    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   02.02.2004  ओम शान्ति   मधुबन


“पूर्वज आणि पुज्यच्या स्वमानामध्ये राहून विश्वातील प्रत्येक आत्म्याची पालना करा, आशीर्वाद द्या, आशीर्वाद घ्या”


आज चोहोबाजूच्या सर्व श्रेष्ठ मुलांना पहात आहेत. प्रत्येक बच्चा पूर्वज देखील आहे आणि पूज्य सुद्धा आहे म्हणून तुम्ही सर्व या कल्पवृक्षाची मुळे आहात, खोड सुद्धा आहात. खोडाचे कनेक्शन संपूर्ण वृक्षाच्या फांद्या-फांद्यांशी, पानांशी आपोआप असते. तर सर्वजण स्वतःला संपूर्ण वृक्षाचे आपण पूर्वज आहोत अशी श्रेष्ठ आत्मा समजता का? जसे ब्रह्मा बाबांना ग्रेट-ग्रेट ग्रँड फादर म्हटले जाते, त्यांचे सोबती तुम्ही देखील मास्टर ग्रेट ग्रँड फादर आहात. पूर्वज आत्म्यांचा केवढा स्वमान आहे! त्या नशेमध्ये राहता? संपूर्ण विश्वाच्या आत्म्यांशी भले मग ते कोणत्याही धर्माचे आत्मे असोत परंतु सर्व आत्म्यांचे तुम्ही खोडाच्या रूपामध्ये आधारमूर्त पूर्वज आहात त्यामुळे पूर्वज असल्याकारणाने पूज्य देखील आहात. पूर्वज द्वारे प्रत्येक आत्म्याला सकाश आपोआप मिळत राहते. झाडाला पहा, खोडाद्वारे, मुळाद्वारे शेवटच्या पानाला देखील सकाश मिळत राहते. पूर्वज असणाऱ्याचे कार्य काय असते? पूर्वजांचे कार्य आहे सर्वांची पालना करणे. लौकीकमध्ये देखील पूर्वजांद्वारेच भले मग शारीरिक शक्तीची पालना, स्थूल भोजनाद्वारे अथवा शिक्षणाद्वारे शक्ती भरण्याची पालना केली जाते. तर तुम्हा पूर्वज आत्म्यांना बाबांद्वारे मिळालेल्या शक्तींद्वारे सर्व आत्म्यांची पालना करायची आहे.

आजच्या काळानुसार सर्व आत्म्यांना शक्तींद्वारे पालनेची गरज आहे. जाणता आजकाल आत्म्यांमध्ये अशांती आणि दुःखाची लाट पसरलेली आहे. तर तुम्हा पूर्वज आणि पूज्य आत्म्यांना आपल्या वंशावळीची दया येते ना? जसे, जेव्हा कोणते विशेष अशांतीचे वायुमंडळ असते तेव्हा विशेष रूपाने मिलेट्री किंवा पोलीस अलर्ट होतात. असेच आजकालच्या वातावरणामध्ये तुम्ही पूर्वज देखील विशेष सेवार्थ स्वतःला निमित्त समजता! संपूर्ण विश्वाच्या आत्म्यांसाठी निमित्त आहात, ही स्मृती राहते का? संपूर्ण विश्वाच्या आत्म्यांना आज तुमच्या सकाशची (शक्तीची) गरज आहे. अशी बेहदच्या विश्वाची पूर्वज आत्मा असल्याचे स्वतःला अनुभव करता का? विश्वाच्या सेवेची आठवण येते की आपल्या सेंटर्सच्या सेवेची आठवण येते? आज आत्मे तुम्हा पूर्वज देव आत्म्यांना बोलावत आहेत. प्रत्येकजण आपापल्या भिन्न-भिन्न देवी अथवा देवतांना बोलावत आहेत - ‘या, क्षमा करा, कृपा करा’. तर भक्तांचा आवाज ऐकू येतो आहे का? ऐकायला येतो आहे की नाही? कोणत्याही धर्माचे आत्मे असोत, जेव्हा त्यांना भेटता तेव्हा स्वतःला सर्व आत्म्यांचे पूर्वज समजून भेटता? असा अनुभव होतो का की हे देखील आम्हा पूर्वजांच्या फांद्या आहेत! यांना सकाश देणारे तुम्ही पूर्वज आहात. आपले कल्पवृक्षाचे चित्र समोर आणा, स्वतःला बघा तुमचे स्थान कुठे आहे! मुळामध्ये सुद्धा तुम्ही आहात, खोड सुद्धा तुम्ही आहात. त्याचसोबत परमधाममध्ये देखील पहा तुम्हा पूर्वज आत्म्यांचे स्थान बाबांसोबत समीप आहे. जाणता ना! याच नशेने कोणत्याही आत्म्याला भेटता तेव्हा प्रत्येक धर्माची आत्मा तुम्हाला हे आपले आहेत, आमचे आहेत, या दृष्टीने बघते. जर त्या पूर्वजच्या नशेने, स्मृतीने, वृत्तीने, दृष्टीने भेटता, तर त्यांना देखील आपलेपणाचा आभास होतो कारण तुम्ही सर्वांचे पूर्वज आहात, सर्वांचे आहात. अशा स्मृतीने सेवा केल्याने प्रत्येक आत्मा अनुभव करेल की हे आमचेच पूर्वज अथवा इष्ट पुन्हा आम्हाला भेटले आहेत. त्या नंतर पूज्य देखील पहा किती मोठी पूजा आहे, कोणत्याही धर्मात्मा, महात्म्याची अशी तुम्हा देवी-देवतांसारखी विधीपूर्वक पूजा होत नाही. पूज्य बनतात परंतु तुमच्यासारखी विधीपूर्वक पूजा होत नाही. गायन देखील पहा किती विधिपूर्वक कीर्तन करतात, आरती करतात. असे पूज्य तुम्ही पूर्वजच बनता. तर स्वतःला असे समजता का? असा नशा आहे? आहे नशा? जे समजतात आम्ही पूर्वज आत्मे आहोत, हा नशा राहतो, ही स्मृती राहते त्यांनी हात वर करा. राहते आठवण? अच्छा. ही स्मृती राहते त्यांनी तरी हात वर केला का? खूप छान. आता दुसरा प्रश्न कोणता असतो? सदैव स्मृती असते का?

बापदादा सर्व मुलांना प्रत्येक प्राप्ती मध्ये अविनाशी बघू इच्छितात. कधी-कधी नाही, का? उत्तर खूप चतुराईने देतात, काय म्हणतात? राहतो तर आहोत..., चांगले राहतो. आणि मग हळूच म्हणतात - थोडेसे कधी-कधी होऊन जाते. बघा बाबा देखील अविनाशी, तुम्ही आत्मे देखील अविनाशी आहात ना! प्राप्ति देखील अविनाशी, ज्ञान अविनाशीद्वारे अविनाशी ज्ञान आहे. तर धारणा देखील काय कशी असली पाहिजे? अविनाशी असली पाहिजे की कधी-कधी?

बापदादा आता सर्व मुलांना काळाच्या परिस्थितीनुसार बेहदच्या सेवेमध्ये सदैव बिझी पाहू इच्छितात कारण त्यामुळे अनेक प्रकारच्या अशांततेपासून वाचतात. परंतु जेव्हा पण सेवा करता, प्लॅन बनवता आणि प्लॅन अनुसार प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा येता, सफलता देखील प्राप्त करता. परंतु बापदादा इच्छितात की एकाच वेळी तीनही सेवा एकत्र व्हाव्यात, केवळ वाचा नाही, मनसा सेवा देखील व्हावी, वाचा देखील व्हावी आणि कर्मणा अर्थात संबंध-संपर्कामध्ये येत असताना देखील सेवा व्हावी. सेवेचा भाव, सेवेची भावना असावी. यावेळी वाचेच्या सेवेची परसेंटेज जास्त आहे, मनसा आहे परंतु वाचेची परसेंटेज जास्त आहे. एकाच वेळी तीनही सेवा एकत्र झाल्यामुळे सेवेमध्ये सफलता अजून जास्त होईल.

बापदादांनी समाचार ऐकला आहे की, या ग्रुपमध्ये देखील विविध विंग्जवाले आलेले आहेत आणि सेवेचे प्लॅन चांगले बनवत आहेत. चांगले करत आहेत, परंतु तीनही सेवा एकत्र झाल्यामुळे सेवेचा स्पीड आणखी वाढेल. सर्व चोहो बाजूंनी मुले पोहोचलेली आहेत, हे पाहून बापदादांना देखील आनंद होतो. नवीन-नवीन मुले उमंग-उत्साहाने पोहोचतात.

आता बापदादा सर्व मुलांना ‘सदा निर्विघ्न स्वरूपा’मध्ये बघू इच्छितात, का? जेव्हा तुम्ही निमित्त बनलेले निर्विघ्न स्थितीमध्ये स्थित रहाल तेव्हा विश्वातील आत्म्यांना सर्व समस्यांपासून निर्विघ्न बनवू शकाल. यासाठी विशेष दोन गोष्टींवर अंडरलाईन करा. करता देखील परंतु आणखी अंडरलाईन करा. एक तर प्रत्येक आत्म्याला आपल्या आत्मिक दृष्टीने बघा. आत्म्याच्या ओरिजिनल संस्काराच्या स्वरूपामध्ये बघा. भले कोणत्याही प्रकारचे संस्कारवाली आत्मा आहे परंतु तुमची प्रत्येक आत्म्याप्रति शुभ भावना, शुभ कामना, परिवर्तनाची श्रेष्ठ भावना, त्यांच्या संस्कारांना थोड्या वेळासाठी परिवर्तन करू शकते. आत्मिक भाव इमर्ज करा. जसे सुरुवातीला बघितले तर संघटनामध्ये राहून आत्मिक दृष्टी, आत्मिक वृत्ति, आत्मा-आत्म्याला भेटत आहे, बोलत आहे, या दृष्टीने फाउंडेशन किती पक्के झाले. आता सेवेच्या विस्तारामध्ये, सेवेच्या विस्ताराच्या संबंधामध्ये आत्मिक भाव ठेवून चालणे, बोलणे, संपर्कामध्ये येणे मर्ज (लोप) झाले आहे. नष्ट झालेले नाहीये परंतु मर्ज झाले आहे. आत्मिक स्वमान, आत्म्याला सहज सफलता देतो कारण की तुम्ही सर्व कोण येऊन एकत्र झाला आहात. तेच कल्पापूर्वीचे देव आत्मे, ब्राह्मण आत्मे एकत्र झाले आहात. ब्राह्मण आत्म्याच्या रूपामध्ये देखील सर्व श्रेष्ठ आत्मे आहात, देव आत्म्यांच्या हिशोबाने देखील श्रेष्ठ आत्मे आहात. त्याच स्वरूपात संबंध-संपर्कामध्ये या. प्रत्येक वेळी चेक करा - मज देव आत्मा, ब्राह्मण आत्म्याचे श्रेष्ठ कर्तव्य, श्रेष्ठ सेवा कोणती आहे? “आशीर्वाद देणे आणि आशीर्वाद घेणे”. तुमची जड चित्रे कोणती सेवा करत आहेत? कशीही आत्मा असो परंतु आशीर्वाद घ्यायला जातात आणि आशीर्वाद घेऊन परत येतात. आणि कोणीही जर पुरुषार्थामध्ये मेहनत समजत असतील तर सर्वात सोपा पुरुषार्थ आहे, पूर्ण दिवस दृष्टी, वृत्ति, बोल, भावना सर्वांमधून आशीर्वाद द्या, आशीर्वाद घ्या. तुमचे टायटल आहे, वरदानच आहे - महादानी, सेवा करताना, कार्यामध्ये संबंध-संपर्कामध्ये येताना फक्त हेच कार्य करा - आशीर्वाद द्या आणि आशीर्वाद घ्या. हे कठीण आहे काय? की सोपे आहे? जे समजतात सोपे आहे, त्यांनी हात वर करा. कोणी तुम्हाला विरोध केला तर? तरी सुद्धा आशीर्वाद द्याल? देणार? तुमच्याकडे इतका आशीर्वादांचा स्टॉक आहे का? अपोझिशन (विरोध) तर होणारच कारण अपोझिशनच पोझिशन पर्यंत पोहोचवते. बघा, सर्वात जास्त विरोध ब्रह्मा बाबांना झाला. झाला ना? आणि नंबर वन पोझिशन कोणी मिळवली? ब्रह्मा बाबांनी मिळवली ना! काहीही होवो परंतु मला ब्रह्मा बाबांसारखे आशीर्वाद द्यायचे आहेत. ब्रह्मा बाबांसमोर व्यर्थ बोलणारे, व्यर्थ करणारे नव्हते काय? परंतु ब्रह्मा बाबांनी आशीर्वाद दिले, आशीर्वाद घेतले, सामावण्याची शक्ति धारण केली. बच्चा आहे, हळू-हळू बदलेल. अशीच तुम्ही देखील हीच वृत्ति दृष्टी ठेवा - हे कल्पापूर्वीचे आपल्याच परिवारातील, ब्राह्मण परिवारातील आहेत. मला बदलून यांना देखील बदलायचे आहे. ‘हे बदलतील तर मी बदलेन’, असे नाही. मला बदलून बदलायचे आहे, माझी जबाबदारी आहे. तेव्हा आशीर्वाद निघतील आणि आशीर्वाद मिळतील.

आता वेळ वेगाने परिवर्तनाच्या दिशेने जात आहे, अतिमध्ये जात आहे परंतु समय परिवर्तनाच्या आधी तुम्ही विश्व परिवर्तक श्रेष्ठ आत्म्यांनो स्व परिवर्तनाद्वारे सर्वांच्या परिवर्तनाचे आधारमुर्त बना. तुम्ही देखील विश्वाचे आधारमुर्त, उद्धारमूर्त आहात. प्रत्येक आत्म्याने लक्ष्य ठेवा की, मला निमित्त बनायचे आहे. स्वतःमध्ये फक्त तीन गोष्टी संकल्प मात्रसुद्धा नसाव्यात, हे परिवर्तन करा. एक - पर-चिंतन. दुसरे - पर-दर्शन. स्वदर्शनच्या ऐवजी पर-दर्शन नको. तिसरे - पर-मत कींवा पर-संग, कुसंग. श्रेष्ठ संग करा कारण संगदोष खूप नुकसान करतो. यापूर्वी देखील बापदादांनी सांगितले होते - एक पर-उपकारी बना आणि हे तीन ‘पर’ छाटून टाका. पर-दर्शन, पर-चिंतन, पर-मत अर्थात कुसंग, परक्याचा फालतू संग. पर-उपकारी (परोपकारी) बना तेव्हाच आशीर्वाद मिळतील आणि आशीर्वाद द्याल. कोणी काहीही देवो परंतु तुम्ही आशीर्वाद द्या. इतकी हिंमत आहे? आहे हिंमत? तर बापदादा चोहो बाजूच्या सर्व सेंटर्सवरील मुलांना म्हणतात - जर तुम्ही सर्व मुलांनी हिंमत ठेवलीत, कोणी काहीही देऊ देत परंतु आम्हाला आशीर्वाद द्यायचे आहेत, तर बापदादा या वर्षी तुम्हाला एक्स्ट्रा हिंमतीचे, उमंगामुळे मदत देतील. एक्स्ट्रा मदत देतील. परंतु आशीर्वाद दिलात तर. मिक्स करायचे नाही. बापदादांकडे तर सर्व रेकॉर्ड (रिपोर्ट) येते ना! संकल्पामध्ये देखील आशीर्वादांशिवाय दुसरे काहीही नसावे. एवढी हिंमत आहे? असेल तर हात वर करा. करावा लागेल. फक्त हात वर करू नका. करावे लागेल. करणार? मधुबन वाले, टीचर्स करणार? अच्छा, एक्स्ट्रा मार्क्स जमा करणार? मुबारक असो. का? वारंवार ॲडव्हान्स पार्टी बापदादांकडे येते. ती म्हणते आहे की, ‘आम्हाला तर ॲडव्हान्स पार्टीचा पार्ट दिला, तो बजावत आहोत परंतु आमचे साथीदार ॲडव्हान्स स्टेज का बनवत नाहीत?’ आता काय उत्तर देऊ? उत्तर काय देऊ? ॲडव्हान्स स्टेज आणि ॲडव्हान्स पार्टीचा पार्ट, जेव्हा दोन्ही समान होईल तेव्हा तर समाप्ति होईल. तर ते विचारतात तेव्हा काय उत्तर देऊ? किती वर्षात बनणार? सर्व साजरे केले, सिल्व्हर जुबली, गोल्डन जुबली, डायमंड जुबली सर्व साजरे केले. आता ॲडव्हान्स स्टेजचा उत्सव साजरा करा. त्याची डेट फिक्स करा. पांडव सांगा, डेट असेल का त्याची? पहिल्या लाईनमधले तुम्ही बोला. डेट फिक्स असेल की अचानक होईल? काय होईल? अचानक होईल की होऊन जाईल? बोला, काहीतरी बोला. विचार करत आहात का? निर्वैर भाईंना विचारत आहेत? सेरेमनी होईल की अचानक होईल? तुम्ही दादींना विचारत आहात? हे दादींना बघत आहेत की दादी काही बोलेल. तुम्ही सांगा, रमेश भाईंना म्हणत आहेत सांगा? (शेवटी तर हे होणारच आहे) शेवट देखील कधी? (तुम्ही डेट सांगा, त्या डेट पर्यंत करू) अच्छा - बापदादांनी एक वर्षाची एक्स्ट्रा डेट दिली आहे. हिंमत केल्यास एक्स्ट्रा मदत मिळेल. हे तर करू शकता ना, हे करून दाखवा म्हणजे मग बाबा डेट फिक्स करतील. (तुमचे डायरेक्शन पाहिजे तेव्हा या २००४ ला असे साजरे करू) याचा अर्थ असा आहे की अजून इतकी तयारी नाही आहे. तर ॲडव्हान्स पार्टीला अजून एक वर्ष तर रहावे लागेल ना. अच्छा कारण आतापासून लक्ष्य ठेवाल - करायचेच आहे, तर जास्त वेळ ॲड होईल कारण जास्त कालावधीचा देखील हिशोब आहे ना! जर शेवटी कराल तर जास्त कालावधीचा हिशोब बरोबर होणार नाही त्यामुळे आत्तापासूनच अटेंशन प्लिज. अच्छा.

आता रुहानी ड्रिल लक्षात आहे का? एका सेकंदामध्ये आपल्या पूर्वज स्टेजमध्ये येऊन परमधाम निवासी बाबांच्या सोबत लाइट हाऊस बनून विश्वाला लाईट देऊ शकता का? तर एका सेकंदामध्ये सर्व चोहो बाजूचे देश-विदेशामध्ये ऐकणारे, बघणारे लाइट हाऊस बनून विश्वाच्या चोहो बाजूला सर्व आत्म्यांना लाइट द्या, सकाश द्या, शक्ती द्या. अच्छा.

चोहो बाजूच्या विश्वाच्या पूर्वज आणि पूज्य आत्म्यांना, सदैव दाता बनून सर्वांना आशीर्वाद देणाऱ्या महादानी आत्म्यांना, सदैव दृढतेद्वारे स्व-परिवर्तनाने सर्वांचे परिवर्तन करणाऱ्या विश्व परिवर्तक आत्म्यांना, सदैव लाइट हाऊस बनून सर्व आत्म्यांना लाइट देणाऱ्या समीप आत्म्यांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि अंतःकरणपूर्वक आशीर्वादांसह नमस्ते.

दादी जी, दादी जानकी जी सोबत संवाद:- छान आहे, दोन्ही दादी खूप चांगली पालना करत आहात. पालना छान होत आहे ना! खूप छान. सेवेच्या निमित्त बनलेल्या आहात ना! तर तुम्हा सर्वांना देखील दादींना पाहून आनंद होतो. आनंद होतो ना! जबाबदारीचे तर सुख सुद्धा मिळते ना! सर्वांचे आशीर्वाद किती मिळतात. सर्वांना आनंद होतो, (दोन्ही दादींनी बापदादांना गळाभेट केली) जसे हे पाहून आनंद होत आहे तर मग यांच्यासारखे बनून किती आनंद होईल कारण बापदादांनी निमित्त बनवले आहे तर काही विशेषता आहे तेव्हाच तर निमित्त बनवले आहे. आणि त्याच विशेषता तुम्हा प्रत्येकामध्ये आल्या तर काय होईल? आपले राज्य येईल. बापदादा जी डेट म्हणतात ना, ती येईल. आता लक्षात आहे ना डेट फिक्स करायची आहे. प्रत्येकाने असे समजा की, ती डेट मला फिक्स करायची आहे. म्हणजे मग सगळे निमित्त बनतील तर मग विश्वाचे नवनिर्माण नक्कीच होईल. ‘निमित्त भाव’, ही गुणांची खाण आहे. फक्त निरंतर निमित्त भाव आला तर बाकीचे सर्व गुण सहजच येऊ शकतात कारण निमित्त भावामध्ये कधी ‘मी’पणा नसतो आणि हा ‘मी’पणाच अशांतीमध्ये घेऊन येतो. निमित्त बनल्याने ‘माझे’पणा देखील संपतो आणि ‘तुमचे, तुमचे’ होते. सहजयोगी बनतात. तर सर्वांचे दादींवर प्रेम आहे, बापदादांवर प्रेम आहे, तर प्रेमाचे रिटर्न आहे - विशेषतांना समान बनविणे. तर असे लक्ष्य ठेवा. विशेषतांना समान बनवायचे आहे. कोणामध्ये पण कोणती विशेषता दिसली, विशेषतेला भले फॉलो करा. आत्म्याला फॉलो केल्याने दोन्ही दिसून येतील. विशेषतेला बघा आणि त्यामध्ये समान बना. अच्छा.

वरदान:-
निश्चयाच्या अखंड रेषेद्वारे नंबरवन भाग्य बनविणारे विजयाचे तिलकधारी भव

जी मुले निश्चयबुद्धी आहेत ते कधीही ‘कसे’ आणि ‘असे’ च्या विस्तारामध्ये जात नाहीत. त्यांच्या निश्चयाची अतूट रेषा अन्य आत्म्यांना देखील स्पष्ट दिसून येते. त्यांच्या निश्चयाची अखंड रेषा मधे-मधे खंडीत होत नाही. अशी रेषा असणाऱ्यांच्या डोक्यामध्ये अर्थात स्मृतीमध्ये सदैव विजयाचा तिलक दिसून येईल. ते जन्मत:च सेवेच्या जबाबदारीचे ताजधारी असतील. सदैव ज्ञान-रत्नांशी खेळणारे असतील. सदैव आठवण आणि आनंदाच्या झोपाळ्यामध्ये झोके घेत जीवन व्यतीत करणारे असतील. हीच आहे नंबर वन भाग्याची रेषा.

सुविचार:-
बुद्धी रुपी कॉम्प्युटरमध्ये फुलस्टॉपची मात्रा येणे अर्थात प्रसन्नचित्त राहणे.

अव्यक्त इशारे - एकांतप्रिय बना एकता आणि एकाग्रतेला धारण करा:-

एकांतप्रिय तो असेल ज्याचा अनेक बाजूंनी बुद्धियोग तुटलेला असेल आणि एकावरच प्रेम करणारा असेल, एकावरच प्रेम असल्याकारणाने एकाच्याच आठवणीमध्ये राहू शकतो. अनेकांवर प्रेम असल्याकारणाने एकाच्याच आठवणीमध्ये राहू शकत नाही; अनेक बाजूंनी बुद्धियोग तुटलेला असावा, एकीकडे जोडलेला असावा अर्थात एका शिवाय दुसरा कोणीही नाही - अशी स्थिती असणारा जो असेल तोच एकांत प्रिय असू शकतो.

सूचना:- आज आंतरराष्ट्रीय योग दिवस महिन्याचा तिसरा रविवार आहे, सायंकाळी ६:३० ते ७:३० वाजे पर्यंत सर्व ब्रह्मावत्स संगठीत रूपामध्ये एकत्रित होऊन योग अभ्यासामध्ये हेच शुभ संकल्प करा की, मज आत्म्याद्वारे पवित्रतेची किरणे निघून साऱ्या विश्वाला पावन बनवत आहेत. मी मास्टर पतित पावनी आत्मा आहे.