16-03-25 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
05.03.2004 ओम शान्ति
मधुबन
“कमजोर संस्कारांचा
संस्कार करून खरी होळी साजरी करा तेव्हाच संसार परिवर्तन होईल”
आज बापदादा आपल्या
चोहो बाजूंच्या राज दुलाऱ्या मुलांना बघत आहेत. हा परमात्म दुलार (परमात्म प्रेम)
तुम्हा कोटींमध्ये कोणी श्रेष्ठ आत्म्यांनाच प्राप्त आहे. प्रत्येक मुलाचे तीन राज
तख्त बघत आहेत. हे तीन तख्त साऱ्या कल्पामध्ये या संगमावरच तुम्हा मुलांना प्राप्त
होतात. दिसत आहेत का तीन तख्त? एक तर हे भृकुटी रुपी तख्त, ज्याच्यावर आत्मा चमकत
आहे. दुसरे तख्त आहे - परमात्म हृदय तख्त. हृदय तख्तनशीन आहात ना! आणि तिसरे आहे -
भविष्य विश्व तख्त. सर्वात भाग्यवान बनला आहात हृदय तख्तनशीन बनल्यामुळे. हे
परमात्म हृदय तख्त तुम्हा भाग्यवान मुलांनाच प्राप्त आहे. भविष्य विश्वाचे राज्य
तख्त तर प्राप्त होणारच आहे. परंतु अधिकारी कोण बनतात? जे यावेळी स्वराज्य अधिकारी
बनतात. स्वराज्य नाही तर विश्वाचे राज्य सुद्धा नाही कारण यावेळच्या स्वराज्य
अधिकारद्वारेच विश्व राज्य प्राप्त होते. विश्वाच्या राज्याचे सर्व संस्कार यावेळीच
बनतात. तर प्रत्येकजण स्वतःला सदैव स्वराज्य अधिकारी अनुभव करता का? जे भविष्य
राज्याचे गायन आहे - जाणता ना! एक धर्म, एक राज्य, लॉ ॲण्ड ऑर्डर, सुख-शांती,
संपत्तिने भरपूर राज्य, आठवते का - किती वेळा हे स्वराज्य आणि विश्व राज्य केलेले
आहे? लक्षात आहे किती वेळा केले आहे? क्लीयर आठवते का? की आठवण करून दिल्यानंतर
आठवते? काल राज्य केले होते आणि उद्या राज्य करायचे आहे - अशी स्पष्ट स्मृति आहे?
अशी स्पष्ट स्मृति त्या आत्म्याला असेल जी आत्ता सदैव स्वराज्य अधिकारी असेल. तर
स्वराज्य अधिकारी आहात का? सदैव आहात की कधी-कधी? काय म्हणाल? सदैव स्वराज्य अधिकारी
आहात? डबल फॉरेनर्सचा टर्न आहे ना. तर सदैव स्वराज्य अधिकारी आहात? पांडव सदैव आहात
का? ‘सदैव’ शब्द विचारत आहेत? कशासाठी? जेव्हा या एका जन्मामध्ये, छोटासा तर जन्म
आहे, तर या छोट्याशा जन्मामध्ये जर सदैव स्वराज्य अधिकारी नसाल तर २१ जन्मांचे सदैव
स्वराज्य कसे प्राप्त होईल! २१ जन्मांसाठी राज्य अधिकारी बनायचे आहे की कधी-कधी
बनायचे आहे? काय मंजूर आहे? सदैव बनायचे आहे? सदैव? मान तर हलवा. अच्छा, पूर्ण २१
जन्म राज्य अधिकारी बनायचे आहे? राज्य अधिकारी अर्थात रॉयल फॅमिलीमध्ये सुद्धा
राज्य अधिकारी. तख्तावर तर थोडेजण बसणार ना, परंतु तिथे जितका तख्त अधिकारीला
स्वमान आहे, तितकाच रॉयल फॅमिलीला सुद्धा आहे. त्यांना देखील राज्य अधिकारी म्हणणार.
परंतु हिशोब आत्ताच्या कनेक्शनशी आहे. जर आता कधी-कधी तर तिथे सुद्धा कधी-कधी. आत्ता
सदैव तर तिथे सुद्धा सदैव. तर बापदादांकडून संपूर्ण अधिकार घेणे अर्थात वर्तमान आणि
भविष्यामध्ये पूर्णपणे २१ जन्म राज्य अधिकारी बनणे. तर डबल फॉरेनर्स पूर्ण अधिकार
घेणारे आहात की अर्धा की थोडासा? काय? पूर्ण अधिकार घ्यायचा आहे? पूर्ण. एक जन्म
देखील कमी नाही. तर काय करावे लागेल?
बापदादा तर प्रत्येक
मुलाला संपूर्ण अधिकारी बनवतात. बनला आहात ना? पक्के? की बनणार अथवा नाही बनणार असा
प्रश्न पडला आहे? कधी-कधी प्रश्न पडतो - माहित नाही बनणार, नाही बनणार? बनायचेच आहे.
पक्के? ज्याला बनायचेच आहे त्यांनी हात वर करा. बनायचेच आहे? अच्छा, हे सर्व कोणत्या
माळेचे मणी बनणार? १०८ चे? इथे तर किती आलेले आहेत? सर्व जण १०८ मध्ये येणार आहेत?
हे तर १८०० आहेत. तर १०८ च्या माळेला वाढवायचे का? अच्छा. १६ हजार तर चांगले वाटत
नाही. १६ हजार मध्ये जाणार का? नाही जाणार ना! हा निश्चय आहे आणि निश्चित आहे, असा
अनुभव व्हावा. आम्ही नाही बनणार तर कोण बनणार. आहे नशा? तुम्ही नाही बनलात तर आणखी
कोणी बनणार नाही, बरोबर ना. तुम्हीच बनणारे आहात ना! बोला, तुम्हीच आहात ना! पांडव
तुम्हीच बनणारे आहात? अच्छा. आपला आरशामध्ये साक्षात्कार केला आहे? बापदादा तर
प्रत्येक मुलाचा निश्चय बघून बलिहार जातात. वाह! वाह! प्रत्येक बच्चा वाह! ‘वाह वाह’
वाले आहात ना! वाह! वाह! की व्हाई. व्हाई तर नाही? कधी-कधी व्हाई होतो का? एक तर आहे
‘व्हाई’ आणि ‘हाय’ आणि तिसरा आहे ‘क्राय’. मग तुम्ही तर वाह! वाह! वाले आहात ना!
बापदादांना डबल
फॉरेनर्सचा विशेष अभिमान आहे. का? भारतवासीयांनी तर बाबांना भारतामध्ये बोलावले.
परंतु डबल फॉरेनर्सच्या बाबतीत अभिमान यासाठी आहे की डबल फॉरेनर्सनी बापदादांना
आपल्या सत्यतेच्या प्रेमाच्या बंधनामध्ये बांधले आहे. मेजॉरिटी सत्यतेने राहणारे
आहेत. काहीजण लपवतात देखील परंतु मेजॉरिटी आपली कमजोरी सच्चाईने बाबांसमोर ठेवतात.
तर बाबांना सर्वात सुंदर गोष्ट वाटते - ती म्हणजे सच्चाई म्हणून भक्तीमध्ये देखील
म्हटले जाते - ‘गॉड इज ट्रुथ’. सर्वात आवडती चीज आहे सच्चाई कारण ज्यांच्यामध्ये
सच्चाई असते त्यांच्यामध्ये सफाई असते. क्लीन आणि क्लियर राहतात म्हणून बापदादांना
डबल फॉरेनर्सच्या सच्चाईच्या प्रेमाचा धागा खेचतो. थोडेफार कोणी ना कोणी मिक्स तर
असतातच. परंतु डबल फॉरेनर्स तुमच्या या सत्यतेच्या विशेषतेला कधीही सोडू नका.
सत्यतेची शक्ती एक लिफ्टचे काम करते. सर्वांना सत्यता आवडते ना! पांडव आवडते ना? तशी
तर मधुबनवाल्यांना सुद्धा आवडते. सर्व चोहोबाजूचे मधुबनवाले हात वर करा. दादी म्हणते
ना भुजा आहेत. तर मधुबन, शांतीवन सर्वांनी हात वर करा. हात पूर्ण उंच करा.
मधुबनवाल्यांना सत्यता आवडते? ज्याच्यामध्ये सत्यता असेल ना, त्याला बाबांची आठवण
करणे खूप सोपे वाटेल. का? बाबा सुद्धा सत्य आहेत ना! तर सत्य बाबांची आठवण जे सत्य
आहेत त्यांना लवकर येते. मेहनत करावी लागत नाही. जर अजूनही आठवण करण्यामध्ये मेहनत
करावी लागत असेल तर समजा कोणता ना कोणता सूक्ष्म संकल्प मात्र, स्वप्न मात्र
कोणत्यातरी सत्यतेची कमी आहे. जिथे सत्यता आहे तिथे संकल्प केला बाबा, हजूर हाजीर
आहेत त्यामुळे बापदादांना सत्यता खूप प्रिय आहे.
तर बापदादा सर्व
मुलांना हाच इशारा देत आहेत की, पूर्ण २१ जन्मांचा वारसा घ्यायचा असेल तर आता
स्व-राज्याला चेक करा. आत्ताचे स्वराज्य अधिकारी बना, जितके जसे बनाल तितकाच अधिकार
प्राप्त होईल. तर चेक करा - जसे गायन आहे - ‘एक राज्य…’ एकच राज्य असेल, दोन नाहीत.
तर वर्तमान स्वराज्याच्या स्थितीमध्ये सदैव एक राज्य आहे? स्व-राज्य आहे का कधी-कधी
पर-राज्य देखील बनते? जर कधी-कधी मायेचे राज्य असेल तर पर-राज्य म्हणणार की
स्वराज्य म्हणणार? तर सदैव एक राज्य आहे, पर-अधीन तर होत नाही ना? कधी मायेचे, कधी
स्व चे? यावरून समजा की संपूर्ण वारसा अजून प्राप्त होत आहे, झालेला नाहीये, होत आहे.
तर चेक करा सदैव एक राज्य आहे? एक धर्म - धर्म अर्थात धारणा. तर विशेष धारणा कोणती
आहे? पवित्रतेची. तर एक धर्म आहे म्हणजे संकल्प, स्वप्नामध्ये देखील पवित्रता आहे?
संकल्पामध्ये, स्वप्नामध्ये देखील जर अपवित्रतेची सावली असेल तर काय म्हणायचे? एक
धर्म आहे? पवित्रता संपूर्ण आहे? तर चेक करा, (pause घेणे) कशासाठी? वेळ खूप वेगाने
पुढे जात आहे. तर वेळ फास्ट जात आहे आणि स्वतः जर स्लो असाल तर मग वेळेवर
ध्येयापर्यंत पोहोचू शकणार नाही ना? म्हणून वारंवार चेक करा. एक राज्य आहे? एक धर्म
आहे? लॉ आणि ऑर्डर आहे? की माया आपली ऑर्डर चालवते? परमात्म्याची मुले श्रीमताच्या
लॉ आणि ऑर्डर वर चालणारी. मायेच्या लॉ आणि ऑर्डर वर नाही. तर चेक करा - सर्व
भविष्याचे संस्कार आता दिसून यावेत कारण संस्कार आता भरायचे आहेत. तिथे भरायचे नाही
आहेत, इथेच भरायचे आहेत. सुख आहे? शांती आहे? संपत्तीवान आहात? सुख आता साधनांच्या
आधारावर तर नाही आहे? अतींद्रिय सुख आहे? साधने, इंद्रियांचा आधार आहे. अतींद्रिय
सुख साधनांच्या आधारावर नाही आहे. अखंड शांती आहे? खंडित तर होत नाही ना? कारण
सतयुगाच्या राज्याची महिमा काय आहे? अखंड शांती, अटल शांती. संपन्नता आहे? संपत्तीने
काय होते? संपन्नता येते. सर्व संपत्ती आहे? गुण, शक्ती, ज्ञान ही संपत्ती आहे.
त्याची निशाणी काय असेल? जर मी संपत्तीने संपन्न आहे - तर त्याची निशाणी काय?
संतुष्टता. सर्व प्राप्तीचा आधार आहे संतुष्टता, असंतुष्टता अप्राप्तीचे साधन आहे.
तर चेक करा - एकाही विशेषतेची कमी असता कामा नये. तर इतके चेक करता? सारा संसार
तुम्ही आताच्या संस्काराद्वारे बनविणारे आहात. आताच्या संस्कारानुसार भविष्याचा
संसार बनेल. तर तुम्ही सर्व काय म्हणता? कोण आहात तुम्ही? विश्व परिवर्तक आहात ना!
विश्व परिवर्तक आहात? तर विश्व परिवर्तक होण्या अगोदर स्व-परिवर्तक. तर हे सर्व
संस्कार स्वतःमध्ये चेक करा. यावरून ओळखा की मी १०८ च्या माळेमध्ये आहे की मागे-पुढे
आहे? हे चेकिंग एक आरसा आहे, या आरशामध्ये आपल्या वर्तमानाला आणि भविष्याला पहा.
पाहू शकता?
आता तर होळी साजरी
करण्यासाठी आला आहात ना! होळी साजरी करण्यासाठी आला आहात, ठीक आहे. होळीच्या अर्था
विषयी स्पष्ट करून सांगितले आहे ना! तर बापदादा आज विशेष डबल फॉरेनर्सना म्हणत आहेत,
मधुबनवाले सोबत आहेत, हे खूप चांगले आहे. मधुबनवाल्यांना देखील सोबत आहेत असे म्हणत
आहेत. जे कोणी आले आहेत, भले मग मुंबईहून आलेले आहेत, किंवा दिल्लीहून आलेले आहात,
परंतु यावेळी तर मधुबन निवासी आहात. डबल फॉरेनर्स देखील यावेळी कुठले आहात? मधुबन
निवासी आहात ना! मधुबन निवासी बनणे चांगले आहे ना! तर सर्व मुलांना भले मग समोर बसले
आहेत, नाहीतर आपापल्या चारी बाजूंच्या स्थानांवर बसले आहेत, बापदादा एक परिवर्तन
पाहू इच्छितात - जर हिंमत असेल तर बापदादा सांगतील. हिंमत आहे? हिंमत आहे? हिंमत आहे?
करावे लागेल. असे नाही हात वर केला म्हणजे झाले, असे नाही. हात वर करणे खूप चांगले
आहे परंतु मनाचा हात वर करा. आज केवळ हाच हात वर करू नका, मनाचाही हात वर करा.
डबल फॉरेनर्स जवळ बसले
आहेत ना, तर जवळ असणाऱ्यांना मनातील गोष्टी ऐकवल्या जातात. मेजॉरिटी बघण्यात येते,
की सर्वांचे बापदादांवर, सेवेवर खूप चांगले प्रेम आहे. बाबांच्या प्रेमाशिवाय सुद्धा
राहू शकत नाहीत आणि सेवेशिवाय देखील राहू शकत नाहीत. हे (मेजॉरिटी मुलांचे)
बहुसंख्य मुलांचे सर्टिफिकेट चांगले आहे. बापदादा चोहो बाजूंना बघतात परंतु…,
‘परंतु’ आले. मेजॉरिटींचा (बऱ्याच जणांचा) हाच आवाज येतो की, असा कोणता ना कोणता
संस्कार, जुना संस्कार जो नको आहे परंतु तो जुना संस्कार अजून पर्यंत सुद्धा
आकर्षित करतो. तर जेव्हा होळी साजरी करण्यासाठी आला आहात तर होळीचा अर्थ आहे -
‘झाले ते झाले’. ‘हो ली’, होऊन गेले. त्यामुळे कोणताही संस्कार थोडाजरी असेल, मग तो
५ परसेंट असेल, १० परसेंट असेल, ५० परसेंट देखील असेल, काहीही असो. कमीत कमी ५
परसेंट जरी असला तरी आज संस्कारांची होळी पेटवा. जो संस्कार सर्वजण समजतात की थोडासा
हा संस्कार मला मधे-मधे डिस्टर्ब करतो. प्रत्येकाला समजते. समजते ना? तर होळी एक
म्हणजे पेटवली जाते, दुसरी रंगवली जाते. दोन प्रकारची होळी असते आणि होळीचा अर्थ
देखील आहे - झाले ते झाले. तर बापदादांची इच्छा आहे की, जो कोणता असा संस्कार
राहिलेला आहे, ज्या कारणाने संसार परिवर्तन होत नाही आहे, तर आज त्या कमजोर
संस्काराला जाळा अर्थात अंतिम संस्कार करा. जाळण्याला देखील संस्कार म्हणतात ना.
जेव्हा मनुष्य मरतो तेव्हा म्हणतात - संस्कार करायचा आहे अर्थात कायमसाठी नष्ट
करायचे आहे. तर आज संस्काराचा देखील संस्कार करू शकता का? तुम्ही म्हणाल की आमची तर
इच्छा नाहीये की संस्कार यावा, परंतु येतो, काय करणार? असा विचार करता का? अच्छा.
येतो, चुकून. जर कोणाला दिलेली वस्तू, चुकून तुमच्याकडे आली तर काय करता? सांभाळून
कपाटामध्ये ठेवता का? ठेवाल? तर मग असा नको असलेला संस्कार आला जरी तरी अंतःकरणात
ठेवू नका कारण अंतःकरणामध्ये बाबा बसले आहेत ना! तर अंतःकरणामध्ये बाबांसोबतच जर तो
संस्कार देखील ठेवलात, तर चांगले वाटेल का? नाही वाटणार ना! त्यामुळे चुकून जरी आला,
तर अंतःकरणापासून म्हणा - ‘बाबा, बाबा, बाबा’, बस्स. संपला. बिंदू लागेल. बाबा काय
आहेत? बिंदू. तर बिंदू लागेल. जर अंतःकरणापासून म्हणाल तर. परंतु असेच स्वार्थ भाव
ठेवून आठवण कराल - ‘बाबा, घ्या ना, घ्या ना’, ठेवतात आपल्या जवळ आणि म्हणतात -
‘घ्या ना, घ्या ना’. तर कसे घेणार? तुमची वस्तू कशी घेणार? पहिले तर अशा संस्काराला
तुम्ही आपली वस्तू समजू नका तेव्हाच घेईन. अशी थोडीच दुसऱ्याची वस्तू घेतील. तर काय
कराल? होळी साजरी करणार? हो ली, हो ली. अच्छा, जे समजतात की दृढ संकल्प करत आहोत
त्यांनी हात वर करा. तुम्ही वेळो-वेळी काढून टाकाल ना, तर निघून जाईल. आतमध्ये ठेऊन
देऊ नका, ‘काय करू, कसे करू, निघतच नाही’. असे नाही, काढायचाच आहे. तर दृढ संकल्प
करणार? जे करणार त्यांनी मनापासून हात वर करा, बाहेरून करायचा म्हणून करू नका.
मनापासून. (काहीजण हात वर करत नाही आहेत) हे हात वर करत नाही आहेत. (सर्वांनी हात
वर केला) खूप छान, मुबारक असो, मुबारक असो. काय आहे की एका बाजूला ॲडव्हान्स पार्टी
बापदादांना सारखे-सारखे विचारत आहे की - कधी पर्यंत, कधी पर्यंत, कधी पर्यंत? दुसरे
- प्रकृति सुद्धा बाबांना अर्ज करते, आता परिवर्तन करा. ब्रह्मा बाबा देखील म्हणतात
की आता परमधामचा दरवाजा केव्हा उघडणार? सोबत यायचे आहे ना, राहायचे तर नाही आहे ना!
सोबत येणार ना! सोबत गेट उघडणार! भले चावी ब्रह्मा बाबा लावतील, परंतु सोबत तर
असणार ना! तर आता हे परिवर्तन करा. बस्स, येऊच द्यायची नाही आहे. माझी वस्तूच नाही
आहे, दुसऱ्याची, रावणाची वस्तू का ठेवली आहे! दुसऱ्याची वस्तू ठेवून घेतली जाते काय?
तर ही कोणाची आहे? रावणाची आहे ना! त्याची वस्तू तुम्ही का ठेवून घेतली आहे? ठेवायची
आहे? ठेवायची नाही आहे ना, पक्के? अच्छा. तर रंगाची होळी भले साजरी करा परंतु पहिली
ही होळी साजरी करा. तुम्ही बघता, तुमचे गायन आहे - मर्सीफुल. तुम्ही मर्सीफुल देवी
आणि देवता आहात ना! तर दया येत नाही का? आपले भाऊ-बहीणी इतके दुःखी आहेत, त्यांचे
दुःख बघून दया येत नाही? येते दया? तर संस्कार बदला, तर संसार बदलून जाईल. जोपर्यंत
संस्कार बदलत नाहीत, तोपर्यंत संसार बदलू शकणार नाही. तर काय करणार?
आज खुशखबर ऐकली होती
की सर्वांना दृष्टी घ्यायची आहे. चांगली गोष्ट आहे. बापदादा तर मुलांचे आज्ञाधारक
आहेत परंतु... ‘परंतु’ ऐकूनच हसत आहेत. भले हसा. दृष्टीसाठी म्हणतात - दृष्टीने
सृष्टी बदलते. तर आजच्या दृष्टीने सृष्टी परिवर्तन करायचेच आहे, कारण संपन्नता अथवा
ज्या काही प्राप्त्या झालेल्या आहेत, त्याचा खूप काळचा अभ्यास पाहिजे. असे नाही वेळ
येईल तेव्हा होऊन जाईल, नाही. खूप काळचे राज्यभाग्य घ्यायचे आहे, तर संपन्नता सुद्धा
खूप काळापासून पाहिजे. तर ठीक आहे? डबल फॉरेनर्स खुश आहात? अच्छा.
चोहो बाजूंच्या सर्व
तीन तख्त नशीन विशेष आत्म्यांना, सदैव स्वराज्य अधिकारी विशेष आत्म्यांना, सदैव
दयाळू बनून आत्म्यांना सुख-शांतीची ओंजळ देणाऱ्या महादानी आत्म्यांना, सदैव दृढता
आणि सफलतेचा अनुभव करणाऱ्या बाप समान आत्म्यांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि
नमस्ते.
वरदान:-
संकल्प आणि
बोलाच्या विस्ताराला सारमध्ये आणणारे अंतर्मुखी भव
व्यर्थ संकल्पांच्या
विस्ताराला समेटून सार रूपामध्ये स्थित होणे तथा वाणीच्या आवाजाच्या व्यर्थला
समेटून समर्थ अर्थात सार रूपामध्ये आणणे - हीच आहे अंतर्मुखता. अशी अंतर्मुखी मुलेच
सायलेन्सच्या शक्तिद्वारे भटकणाऱ्या आत्म्यांना योग्य ठिकाण दाखवू शकतात. ही
सायलेन्सची शक्ति अनेक रुहानी रंगत दाखवते. सायलेन्सच्या शक्तिने प्रत्येक
आत्म्याच्या मनाचा आवाज इतका जवळ ऐकू येतो जसे कोणी समोर बोलत आहे.
सुविचार:-
स्वभाव, संस्कार,
संबंध, संपर्कामध्ये लाइट (हलके) रहाणे अर्थात फरिश्ता बनणे.
अव्यक्त इशारे -
सत्यता आणि सभ्यता रुपी कल्चरला धारण करा:-
सच्च्या दिलाची
सत्यवादी मुले, सत्यतेच्या महानतेमुळे सेकंदामध्ये बिंदू बनून बिंदू स्वरूप बाबांची
आठवण करू शकतात. सच्चे दिल असणाऱ्या मुलांनी सच्च्या साहेबांना राजी केल्यामुळे,
बाबांच्या विशेष आशीर्वादांच्या प्राप्तीमुळे वेळेनुसार त्यांची बुद्धी युक्तियुक्त,
यथार्थ कार्य स्वतः करते कारण की बुद्धीवानांची बुद्धी (बाबांना) संतुष्ट केले आहे.
सूचना:- आज
आंतरराष्ट्रीय योग दिवस महिन्याचा तिसरा रविवार आहे, सायंकाळी ६.३० ते ७.३० वाजे
पर्यंत सर्व भाऊ-बहिणी संगठीत रूपामध्ये एकत्रित होऊन योग अभ्यासामध्ये सर्व
आत्म्यांप्रति हीच शुभ भावना ठेवावी - की सर्व आत्म्यांचे कल्याण होऊ दे, सर्व आत्मे
सत्य मार्गावर चालून परमात्म वारशाचा अधिकार प्राप्त करू देत. मी बाप समान सर्व
आत्म्यांना मुक्ति-जीवनमुक्तीचे वरदान देणारी आत्मा आहे.