16-03-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्हाला सद्गतीचे सर्वात न्यारे मत मिळाले आहे की, देहाचे सर्व धर्म त्यागून आत्म-अभिमानी भव, मामेकम् (मज एकाची) आठवण करा”

प्रश्न:-
जे परमात्म्याला नावा-रूपापासून न्यारा आहे असे म्हणतात, त्यांना तुम्ही कोणता प्रश्न विचारू शकता?

उत्तर:-
त्यांना विचारा - गीतेमध्ये जे दाखवतात की, अर्जुनाला अखंड ज्योती स्वरूपाचा साक्षात्कार झाला, म्हणाला - ‘बस्स करा, मी सहन करू शकत नाही’. तर मग तुम्ही नावा-रुपापासून न्यारा कसे बरे म्हणता. बाबा म्हणतात - ‘मी तर तुमचा पिता आहे. पित्याचे रूप पाहून मुलगा आनंदीत होईल, तो असे कसे म्हणेल की, मी सहन करू शकत नाही’.

गीत:-
तेरे द्वार खड़ा…

ओम शांती।
भक्त म्हणतात, आम्ही खूप गरीब बनलो आहोत. ओ बाबा, आम्हा सर्वांची झोळी भरा. भक्त जन्मोजन्मी गात राहतात. सतयुगामध्ये भक्ती नसते. तिथे पावन देवी-देवता असतात. भक्तांना कधी देवता म्हटले जात नाही. जे स्वर्गवासी देवी-देवता होते ते मग पुनर्जन्म घेत-घेत नरकवासी, पुजारी, भक्त, गरीब बनतात. बाबा बसून मुलांना समजावून सांगत आहेत. बाबांना तर एकही मनुष्य जाणत नाही. बाबा जेव्हा येतील तेव्हा येऊन आपला परिचय देतील. भगवंतालाच पिता म्हटले जाते. सर्व भक्तांचा भगवान एक आहे. बाकी सर्व आहेत भक्त. चर्च इत्यादीमध्ये जातात तर जरूर भक्तच झाले ना. यावेळी सर्व पतित तमोप्रधान आहेत, म्हणून सर्व बोलावतात - ‘हे पतितांना पावन बनविणारे या. ओ बाबा, आम्हा भक्तांची झोळी भरा’. भक्त भगवंताकडे धन मागतात. तुम्ही मुले काय मागता? तुम्ही म्हणता - ‘बाबा, आम्हाला स्वर्गाचे मालक बनवा’. तिथे तर अथाह धन असते. हिरे-माणकांचे महाल असतात. आता तुम्ही जाणता आपण भगवंता द्वारे राजाईचा वारसा प्राप्त करत आहोत. हीच खरी गीता आहे. ती गीता नाही. ती तर पुस्तके इत्यादी भक्ती मार्गासाठी बनविली आहेत. त्यांना भगवंताने ज्ञान दिलेले नाही. भगवान तर यावेळी नरापासून नारायण बनविण्याकरिता राजयोग शिकवत आहेत. राजा सोबत प्रजा देखील जरूर असेल. फक्त लक्ष्मी-नारायणच काही बनणार नाहीत. पूर्ण राजधानी बनते. आता तुम्ही मुले जाणता की भगवान कोण आहेत, इतर कोणीही मनुष्य मात्र जाणत नाहीत. बाबा म्हणतात, तुम्ही जेव्हा म्हणता ‘ओ गॉड फादर’ तर सांगा तुमच्या गॉड फादरचे नाव, रूप, देश, काळ कोणता आहे? ना भगवंताला जाणतात ना त्यांच्या रचनेला जाणतात. बाबा येऊन म्हणतात - मी कल्प-कल्पाच्या संगमावर येतो. साऱ्या रचनेच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य मी ‘रचयिता’च येऊन तुम्हाला समजावून सांगतो. बरेच जण तर म्हणतात की, ते नावा-रुपापासून न्यारे आहेत, ते येऊ शकत नाहीत. तुम्ही जाणता बाबा आलेले आहेत. शिव जयंती देखील निराकाराची गायली जाते, तर श्रीकृष्ण जयंती देखील गायली जाते. आता शिव जयंती केव्हा होते ते माहित असले पाहिजे ना. जसे ख्रिश्चन लोकांना ठाऊक आहे की क्राइस्टचा जन्म कधी झाला, ख्रिश्चन धर्म कधी स्थापन झाला. ही तर आहे भारताची गोष्ट. भगवान भारताची झोळी केव्हा भरतात? भक्त बोलावतात - ‘हे भगवंता झोळी भरा. सद्गती मध्ये घेऊन जा कारण आम्ही दुर्गतीमध्ये पडलो आहोत, तमोप्रधान आहोत’. आत्माच शरीरा द्वारे भोगते. अनेक मनुष्य, साधु-संत इत्यादी म्हणतात की, आत्मा निर्लेप आहे. म्हणतात देखील की, चांगले किंवा वाईट संस्कार आत्म्यामध्येच असतात. त्या आधारावर आत्मा जन्म घेते. आणि मग म्हणतात की, आत्मा तर निर्लेप आहे. इथे कोणीही असा बुद्धिवान मनुष्य नाही जो समजावून सांगू शकेल. यामध्ये देखील अनेक मते आहेत. जे घर सोडून निघून जातात ते शास्त्र बनवतात. श्रीमद् भगवद्गीता एकच आहे. व्यासांनी जे श्लोक इत्यादी बनवले आहेत ते काही भगवंताने गायलेले नाहीत. निराकार भगवान जे ज्ञानाचा सागर आहेत तेच बसून मुलांना समजावून सांगत आहेत की भगवान एक आहेत. भारतवासीयांना हे ठाऊक नाही आहे. गातात देखील - ईश्वराची गत मत न्यारी आहे. अच्छा, कोणती गत मत न्यारी आहे? ईश्वराची गत मत न्यारी आहे हे कोणी म्हटले? आत्मा म्हणते, तिच्या सद्गतीसाठी जे मत देतात त्याला श्रीमत म्हटले जाते. कल्प-कल्प येऊन तुम्हाला सांगतो - मनमनाभव. देहाचे सर्व धर्म त्यागून आत्म-अभिमानी भव. मामेकम् (मज एकाची) आठवण करा. आता तुम्ही मनुष्यापासून देवता बनत आहात. या राजयोगाचे एम आब्जेक्ट आहेच मुळी लक्ष्मी-नारायण बनणे. त्या शिक्षणाने कोणी राजा बनत नाही. असे कोणते स्कूल नाही आहे. गीतेमध्येच आहे, तुम्हा मुलांना राजयोग शिकवतो. येतो देखील तेव्हा जेव्हा कोणत्याही राजाचे राज्य नसते. मला एकही मनुष्य अजिबात जाणत नाही. बाबा म्हणतात की तुम्हा मुलांनी एवढे मोठे लिंग जे बनवले आहे, असे काही माझे रूप नाही आहे. मनुष्य म्हणतात की अखंड ज्योती रूप परमात्मा, तेजोमय आहे. अर्जुनाने पाहून म्हटले - ‘बस्स करा, मी सहन करू शकत नाही’. अरे, मुलगा पित्याचे रूप पाहून सहन करू शकत नाही, असे कसे होऊ शकते. मुलगा तर पित्याला पाहून आनंदीत होईल ना. बाबा म्हणतात की, माझे काही असे रूप थोडेच आहे. मी आहेच परमपिता अर्थात परे ते परे राहणारा परम आत्मा अर्थात परमात्मा. आणि मग गातात परमात्मा मनुष्य सृष्टीचे बीजरूप आहेत. भक्त त्यांची महिमा करतात. सतयुग-त्रेतामध्ये कोणीही महिमा करत नाहीत कारण तिथे तर सुख आहे. गातात देखील - ‘दुःख में सिमरण सब करें, सुख में करे ना कोई’. याचा देखील अर्थ समजत नाहीत. पोपटा प्रमाणे सर्वजण फक्त बोलत राहतात. सुख कधी असते, दुःख कधी असते. भारताचीच तर गोष्ट आहे ना. ५ हजार वर्षांपूर्वी भारत स्वर्ग होता, मग त्रेतामध्ये दोन कला कमी झाल्या. सतयुग-त्रेतामध्ये दुःखाचे नाव सुद्धा राहत नाही. आहेच सुखधाम. स्वर्ग म्हटल्यानेच तोंड गोड होते, मग हेवनमध्ये दुःख कुठून आले. म्हणतात की, तिथे देखील कंस, जरासंधी इत्यादी होते, परंतु असे होऊ शकत नाही.

भक्त समजतात की आपण नौधा भक्ती करतो तर साक्षात्कार होतो. साक्षात्कार होणे अर्थात आपल्याला भगवान भेटला असे समजतात. लक्ष्मीची पूजा केली, तिचे दर्शन झाले, बस्स, समजतात की, मी तर पार झालो; यामध्येच आनंदित होतात. परंतु असे काहीही नाही आहे. अल्पकाळाकरिता सुख मिळते. दर्शन झाले संपले. असे तर नाही मुक्ती-जीवनमुक्तीला प्राप्त केले, काहीच नाही. बाबांनी शिडीच्या चित्रावर देखील समजावून सांगितले आहे - भारत उच्च ते उच्च (सर्वश्रेष्ठ) होता. भगवान देखील उच्च ते उच्च आहेत. भारतामध्ये उच्च ते उच्च वारसा आहे या लक्ष्मी-नारायणाचा. जेव्हा स्वर्ग होता तेव्हा सतोप्रधान होते; मग कलियुगाच्या अंतामध्ये सर्व तमोप्रधान असतात. बोलावतात की, आम्ही एकदम पतित झालो आहोत. बाबा म्हणतात की, तुम्हाला राजयोग शिकविण्याकरिता मी कल्पाच्या संगमयुगावर येतो. मी जो आहे जसा आहे, मला यथार्थ रीतीने कोणीही जाणत नाही. तुमच्यामध्ये देखील नंबरवार पुरुषार्थानुसार जाणतात. शिडीचे चित्र दाखवायचे आहे. ही भारताची शिडी आहे. सतयुगामध्ये देवी-देवता होते. ५ हजार वर्षांपूर्वी भारत असा होता. शास्त्रांमध्ये लाखो वर्षांचे कल्प लिहून ठेवले आहे. बाबा म्हणतात की, कल्प लाखो वर्षांचे नाही परंतु कल्प तर ५ हजार वर्षांचे आहे. सतयुग-त्रेता नवीन दुनिया, द्वापर-कलियुग जुनी दुनिया. अर्धे-अर्धे आहे ना. नवीन दुनियेमध्ये तुम्ही भारतवासीच होता. बाबा समजावून सांगत आहेत - गोड मुलांनो, आता तुम्ही आपल्या जन्मांना जाणता; बाकी रथ इत्यादीची गोष्ट नाही आहे. श्रीकृष्ण सतयुगाचा प्रिन्स आहे. श्रीकृष्णाचे ते रूप दिव्य दृष्टी शिवाय पाहू शकत नाही. या चैतन्य रूपामध्ये तर सतयुगामध्ये होते, तर पुन्हा तेच रूप कधीही मिळू शकत नाही. मग पुढच्या जन्मामध्ये तर नाव, रुप, देश, काळ सर्व काही बदलते. ८४ जन्म घेतात. ८४ जन्मांमध्ये ८४ आई-वडील मिळतात. भिन्न-भिन्न नाव, रूप, ऑक्युपेशन असते. आता ही भारताचीच शिडी आहे. तुम्ही आता आहात ब्राह्मण कुलभूषण. बाबांनी कल्पापूर्वी देखील येऊन तुम्हाला देवी-देवता बनविले होते. तिथे तुम्ही सर्वोत्तम कर्म करत होता. तुम्ही २१ जन्म कायमचे सुखी होता. आणि मग तुम्हाला या दुर्गतीमध्ये कोणी पोहोचवले? मी कल्पापूर्वी तुम्हाला सद्गती दिली होती, मग ८४ जन्म घेत जरूर उतरावे लागेल. सूर्यवंशीमध्ये ८ जन्म, चंद्रवंशीमध्ये १२ जन्म, असे मग उतरत आला आहात. तुम्हीच सो पूज्य देवता होता, तुम्हीच पुजारी पतित बनले आहात. भारत आता गरीब आहे. भगवानुवाच, तुम्ही तर १०० टक्के पवित्र आणि संपन्न, एव्हरहेल्दी, एव्हरवेल्दी होता. कोणताही आजार, दुःखाची गोष्टच नव्हती, सुखधाम होते. त्याला म्हटले जाते गार्डन ऑफ अल्लाह. अल्लाहने बगीचा स्थापन केला. जे देवी-देवता होते ते आता काटे बनले आहेत. आता जंगल बनले आहे. जंगलामध्ये काटे लागतात. बाबा म्हणतात - काम महाशत्रू आहे, याला जिंका. यानेच तुम्हाला आदि-मध्य-अंत दु:ख दिले आहे. एकमेकांवर कामकटारी चालविणे हे सर्वात मोठे पाप आहे. बाबा बसून आपला परिचय देतात की, मी परमधाममध्ये राहणारा परम आत्मा आहे. मला म्हटले जाते - मी सृष्टीचा बीज रूप परमात्मा आहे, मी सर्वांचा पिता आहे. सर्व आत्मे पित्याला बोलावतात की, ‘हे परमपिता परमात्मा’. ज्याप्रमाणे तुमची आत्मा स्टार प्रमाणे आहे, तसेच बाबा देखील परम आत्मा स्टार आहेत. लहान-मोठे नाहीत. बाबा म्हणतात - मी अंगठ्याप्रमाणे देखील नाहीये. मी परम आत्मा आहे. तुम्हा सर्वांचा पिता आहे. त्याला म्हटले जाते सुप्रीम सोल, नॉलेजफुल. बाबा समजावून सांगत आहेत - मी नॉलेजफुल, मनुष्य सृष्टीच्या झाडाचे बीज रूप आहे. मला भक्त लोक म्हणतात की, ‘परमात्मा सत् चित् आनंद स्वरूप आहेत, ते ज्ञानाचा सागर आहेत, सुखाचा सागर आहेत. महिमा किती आहे. जर नाव, रूप, देश, काळ नसेल तर मग बोलावणार कोणाला. साधु-संत इत्यादी सर्व तुम्हाला भक्तिमार्गाची शास्त्रे ऐकवतात. मी येऊन तुम्हाला राजयोग शिकवतो.

बाबा समजावून सांगत आहेत की, तुम्ही मज ज्ञान सागर पित्याला, ‘पतित-पावन’ म्हणता. तुम्ही देखील मास्टर ज्ञान सागर बनता. ज्ञाना द्वारेच सद्गती मिळते. भारताला सद्गती बाबाच देतात. सर्वांचा सद्गती दाता एक आहे. मग सर्वांची दुर्गती कोण करतो? रावण. आता तुम्हाला हे कोण सांगत आहे? हे आहेत परम आत्मा. आत्मा तर एक स्टार प्रमाणे अति सूक्ष्म आहे. परमात्मा देखील ड्रामामध्ये पार्ट बजावतात. क्रियेटर, डायरेक्टर, मुख्य ॲक्टर आहेत. बाबा म्हणतात की, उच्च ते उच्च पार्टधारी कोण आहेत? उच्च ते उच्च भगवान. ज्यांच्या सोबत तुम्ही सर्व आत्मे अर्थात मुले राहता. म्हणतात देखील की, परमात्मा सर्वांना पाठविणारा आहे. ही देखील समजून घेण्यासारखी गोष्टी आहे. ड्रामा तर अनादि बनलेला आहे. बाबा म्हणतात की, तुम्ही मला ज्ञानाचा सागर, साऱ्या सृष्टीच्या आदि-मध्य-अंताला जाणणारा आहे, असे म्हणता. आता ही जी शास्त्रे इत्यादी वाचतात, त्यांना बाबा जाणतात. बाबा म्हणतात की, मी येऊन प्रजापिता ब्रह्माच्या द्वारे सर्व शास्त्रांचे सार सांगतो. असे दाखवतात की विष्णूच्या नाभीतून ब्रह्मा निघाले. तर कुठून निघाले? मनुष्य तर जरूर इथेच असतील ना. यांच्या नाभीतून ब्रह्मा निघाले आणि मग भगवंताने बसून यांच्या द्वारे सर्व वेद-शास्त्रांचे सार ऐकवले. आपले देखील नाव, रूप, देश, काळ सांगितले. मनुष्य सृष्टीचे बीज रूप आहेत ना. या वृक्षाची उत्पत्ती, पालना, विनाश कसा होतो ते कोणीही जाणत नाही. याला व्हरायटी झाड म्हटले जाते. सर्व नंबरवार आपल्या वेळेवर येतात. सर्वात पहिले देवी-देवता धर्माची स्थापना करतो, जरी तो धर्म आता नाही आहे. बाबा म्हणतात की, किती तुच्छ-बुद्धी बनले आहेत. देवतांची लक्ष्मी-नारायणाची पूजा करतात परंतु त्यांचे राज्य सृष्टीवर कधी होते ते काहीच जाणत नाहीत. आता भारताचा तो देवता धर्मच राहिलेला नाहीये, फक्त चित्रेच राहिली आहेत. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) मास्टर ज्ञान सागर बनून पतितापासून पावन बनविण्याची सेवा करायची आहे. बाबांनी जे सर्व शास्त्रांचे सार ऐकवले आहे ते बुद्धीमध्ये ठेवून सदैव हर्षित राहायचे आहे.

२) प्रत्येक क्षणी फक्त एका बाबांच्या श्रीमताचे पालन करायचे आहे. देहाचे सर्व धर्म त्यागून आत्म-अभिमानी बनण्याची मेहनत करायची आहे.

वरदान:-
विस्ताराला सार रूपामध्ये सामावून आपली श्रेष्ठ स्थिती बनविणारे बाप समान लाईट-माईट हाऊस भव

बाप समान लाईट-माईट हाऊस बनण्याकरिता कोणतीही गोष्ट बघता किंवा ऐकता तर त्याचे सार जाणून एका सेकंदामध्ये सामावून टाकण्याचा अथवा परिवर्तन करण्याचा अभ्यास करा. ‘का’, ‘काय’, च्या विस्तारामध्ये जाऊ नका; कारण कोणत्याही गोष्टीच्या विस्तारामध्ये गेल्याने वेळ आणि शक्ती व्यर्थ जाते. तर विस्ताराला सामावून सार रूपामध्ये स्थित होण्याचा अभ्यास करा - यामुळे अन्य आत्म्यांना देखील एका सेकंदामध्ये साऱ्या ज्ञानाचे सार अनुभव करवू शकाल.

बोधवाक्य:-
आपल्या वृत्तीला पॉवरफुल बनवा म्हणजे मग सेवेमध्ये आपोआप वृद्धी होईल.

हे अव्यक्त इशारे - “निश्चयाच्या फाउंडेशनला मजबूत करून सदैव निर्भय आणि निश्चिंत रहा” जर निश्चयरुपी फाउंडेशन पक्के असेल तर सहज योगी, निर्मळ स्वभाव, शुभ भावनेची वृत्ती आणि आत्मिक दृष्टी असणारे बनाल. वर्तनातून आणि चेहऱ्यावरून नेहमीच साधेपणाची झलक अनुभव होत राहील. त्यामुळे प्रत्येकाची विशेषता लक्षात ठेवून एकमेकांशी फेथफुल (विश्वासू) बनून राहा, म्हणजे मग त्यांच्या बोलण्याचा भाव बदलून जाईल.