16-04-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - केवळ योगाद्वारेच आत्म्यामधील भेसळ निघून जाईल, बाबांकडून पूर्ण वारसा मिळेल, म्हणून जितके शक्य होईल तितके योगबल वाढवा”

प्रश्न:-
देवी-देवतांची कर्म श्रेष्ठ होती, आता सर्वांची कर्म भ्रष्ट का बनली आहेत?

उत्तर:-
कारण आपल्या खऱ्या धर्माला विसरले आहेत. धर्म विसरल्यामुळेच जी काही कर्म करतात ती भ्रष्ट असतात. बाबा तुम्हाला आपल्या सत् धर्माची ओळख करून देतात, त्याबरोबरच पूर्ण जगाचा इतिहास-भूगोल ऐकवतात, जो सर्वांना ऐकवायचा आहे, बाबांचा सत्य परिचय द्यायचा आहे.

गीत:-
मुखड़ा देख ले प्राणी…

ओम शांती।
हे कोणी म्हटले आणि कोणाला म्हटले? बाबांनी मुलांना म्हटले, ज्या मुलांना पतितापासून पावन बनवत आहेत. मुलांनी हे जाणले आहे की, आम्ही भारतवासी, जे देवी-देवता होतो; ते आता आपण ८४ जन्मांचे चक्र फिरून सतोप्रधान स्टेज पार करून सतो, रजो, तमो आणि आता तमोप्रधान बनलो आहोत. आता पुन्हा पतितांना पावन बनविणारे बाबा म्हणत आहेत - आपल्या मनाला विचारा की, आपण कोठपर्यंत पुण्यात्मा बनलो आहोत? तुम्ही सतोप्रधान पवित्र आत्मा होतात, इथे जेव्हा सर्वप्रथम तुम्हाला देवी-देवता म्हटले जात होते, ज्याला आदि सनातन देवी-देवता धर्म म्हटले जात होते. आता कोणताही भारतवासी स्वतःला देवी-देवता धर्माचा म्हणत नाही. हिंदू तर कोणता धर्मच नाहीये, परंतु पतित असल्यामुळे स्वतःला देवता म्हणवून घेऊ शकत नाहीत. सतयुगामध्ये देवता पवित्र होते, पवित्र प्रवृत्ती मार्ग होता, यथा राजा-राणी तथा प्रजा पवित्र होते. बाबा भारतवासीयांना आठवण करून देत आहेत की, तुम्ही पवित्र प्रवृत्तीमार्गवाले आदि सनातन देवी-देवता धर्मवाले होता, त्याला स्वर्ग म्हटले जात होते. तिथे एकच धर्म होता. पहिल्या नंबरचे महाराजा-महाराणी, लक्ष्मी-नारायण होते. त्यांची देखील वंशावळ होती आणि भारत अतिशय श्रीमंत होता, ते सतयुग होते. मग त्रेतामध्ये आले तेव्हा देखील पूज्य देवी-देवता किंवा क्षत्रिय म्हटले जात होते. ते लक्ष्मी-नारायणाचे राज्य, ते राम-सीतेचे राज्य, त्यांची देखील वंशावळ चालली. जसे ख्रिश्चनांमध्ये एडवर्ड पहिला, दुसरा… असे चालते. भारतामध्ये देखील असे होते. ५ हजार वर्षांची गोष्ट आहे अर्थात ५ हजार वर्षांपूर्वी भारतावर या लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते. परंतु यांनी हे राज्य कधी आणि कसे मिळवले - हे कोणीही जाणत नाहीत. तेच सूर्यवंशी राज्य नंतर मग चंद्रवंशीमध्ये आले कारण पुनर्जन्म घेता-घेता शिडी उतरायची आहे. हा भारताचा इतिहास-भूगोल कोणीही जाणत नाही. बाबा रचयिता आहेत तर जरूर सतयुगी नव्या दुनियेचे रचयिता झाले. बाबा म्हणतात - मुलांनो, तुम्ही आजपासून ५ हजार वर्षांपूर्वी स्वर्गामध्ये होता. हा भारत स्वर्ग होता, नंतर मग नरकामध्ये आला आहात. दुनिया काही या जगाच्या इतिहास-भूगोलाला जाणत नाही. ते तर अर्धवट फक्त नंतरचा इतिहास जाणतात. सतयुग-त्रेताच्या इतिहास-भूगोलाला कोणीही जाणत नाहीत. ऋषि-मुनी देखील असे म्हणून गेले - ‘आम्ही रचता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताला जाणत नाही’. जाणतील तरी कसे, बाबाच बसून तुम्हाला समजावून सांगतात. शिवबाबा भारतामध्येच दिव्य जन्म घेतात, ज्यांची शिवजयंती देखील असते. शिवजयंती नंतर पाहिजे गीता जयंती. त्याच्या बरोबरच असायला हवी श्रीकृष्ण जयंती. परंतु या जयंतीचे रहस्य भारतवासी जाणत नाहीत की शिवजयंती केव्हा झाली! बाकीच्या धर्माचे लोक तर लगेच सांगतील - बुद्ध जयंती, ख्रिस्त जयंती केव्हा झाली. भारतवासीयांना विचारा शिवजयंती केव्हा झाली, तर कोणीही सांगू शकणार नाही. शिवबाबा भारतात आले, येऊन काय केले? कोणीही जाणत नाही. शिव तर आहेत सर्व आत्म्यांचे पिता. आत्मा आहे अविनाशी. आत्मा एक शरीर सोडून दुसरे घेते. हे ८४ चे चक्र आहे. शास्त्रांमध्ये तर ८४ लाख जन्मांची थाप मारलेली आहे. बाबा येऊन सत्य माहिती सांगतात. बाबांव्यतिरिक्त बाकी सर्व रचता आणि रचनेच्या बाबतीत खोटेच बोलतात, कारण हे आहेच मुळी मायेचे राज्य. आधी तुम्ही पारस-बुद्धी होतात, भारत पारसपुरी होती. सोने, हिरे, माणकांचे महाल होते. बाबा बसून रचता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताचे रहस्य अर्थात दुनियेचा इतिहास-भूगोल सांगत आहेत. भारतवासी हे जाणत नाहीत की, आधी आम्हीच सो देवी-देवता होतो, आता पतित, गरीब, अधर्मी बनलो आहोत, आपल्या धर्माला विसरलो आहोत. हे देखील ड्रामा अनुसार होणारच आहे. तर हा जगाचा इतिहास-भूगोल लक्षात आला पाहिजे ना. उच्च ते उच्च सर्व आत्म्यांचे पिता मूलवतनमध्ये राहतात, त्या नंतर आहे सूक्ष्मवतन, हे आहे स्थूलवतन. सूक्ष्मवतनमध्ये फक्त ब्रह्मा-विष्णू-शंकर राहतात. त्यांचा वेगळा कोणता इतिहास-भूगोल नाहीये. हे तीन तबके (लोक) आहेत. गॉड इज वन. त्यांची रचना देखील एक आहे, जे चक्र फिरत राहते. सतयुगानंतर त्रेता, मग द्वापर, कलियुगामध्ये यावे लागते. ८४ जन्मांचा हिशोब पाहिजे ना, जो कोणीही जाणत नाही. ना कोणत्या शास्त्रामध्ये आहे. ८४ जन्मांचा पार्ट तुम्ही मुलेच बजावता. बाबा काही या चक्रामध्ये येत नाहीत. मुलेच पावनपासून पतित बनतात म्हणूनच त्यांना बोलावतात - ‘बाबा, येऊन आम्हाला पुन्हा पावन बनवा’. सर्वजण एकालाच बोलावतात. रावणराज्यामध्ये जे सर्व दुःखी झालेले आहेत, त्यांना येऊन मुक्त करा, आणि मग रामराज्यामध्ये घेऊन जा. अर्धे कल्प आहे राम-राज्य. अर्धे कल्प आहे रावण-राज्य. भारतवासी जे पवित्र होते तेच पतित बनतात. वाममार्गामध्ये गेल्याने पतित व्हायला सुरुवात होते. भक्तिमार्ग सुरू होतो. आता तुम्हा मुलांना ज्ञान ऐकवले जाते, ज्यामुळे अर्धे कल्प तुम्ही २१ जन्मांसाठी सुखाचा वारसा प्राप्त करता. अर्धा कल्प ज्ञानाचे प्रारब्ध चालते, नंतर मग रावणराज्य असते. घसरण्यास सुरुवात होते (पतन होते). तुम्ही दैवी राज्यामध्ये होता, मग आता आसुरी राज्यामध्ये आला आहात, याला नरक सुद्धा म्हणतात. तुम्ही स्वर्गामध्ये होता आणि मग ८४ जन्म घेऊन नरकामध्ये येऊन पडला आहात. ते होते सुखधाम. हे आहे दुःखधाम, १०० टक्के इनसॉल्व्हेंट (दिवाळखोर) आहे. ८४ जन्मांचे चक्र फिरत, तेच भारतवासी पूज्यपासून पुजारी बनले आहेत. यालाच जगाचा इतिहास-भूगोल म्हटले जाते. हे सर्व आहे तुम्हा भारतीयांचे चक्र, इतर धर्माचे काही ८४ जन्म घेत नाहीत. ते सतयुगामध्ये असतच नाहीत. सतयुग-त्रेतामध्ये फक्त भारतच होता. सूर्यवंशी, चंद्रवंशी नंतर वैश्यवंशी, शूद्रवंशी… आता पुन्हा तुम्ही येऊन देवतावंशी बनण्यासाठी ब्राह्मणवंशी बनला आहात. हे आहेत भारताचे वर्ण. आता तुम्ही ब्राह्मण बनल्यामुळे शिवबाबांकडून वारसा घेत आहात. बाबा तुम्हाला ५ हजार वर्षांपूर्वी प्रमाणे शिकवत आहेत. कल्प-कल्प तुम्ही पावन बनून मग पुन्हा पतित बनता. सुखधाम मध्ये जाऊन मग दुःखधाम मध्ये येता. पुन्हा शांतीधाममध्ये जायचे आहे, जिला निराकार दुनिया म्हटले जाते. आत्मा काय आहे, परमात्मा काय आहे, हे कोणीही मनुष्य जाणत नाहीत. आत्मा देखील एक स्टार बिंदू आहे. म्हणतात - भृकुटीच्या मध्यभागी तारा चमकतो आहे, छोटासा बिंदू आहे, ज्याला दिव्य दृष्टीनेच पाहू शकतो. खरे तर स्टार देखील म्हणता येणार नाही. स्टार तर खूप मोठा आहे, फक्त दूर असल्यामुळे छोटा दिसतो. हे फक्त एक उदाहरण दिले जाते. आत्मा इतकी छोटी आहे जसा वरती स्टार छोटा दिसून येतो. बाबांची आत्मा देखील जशी एका बिंदू प्रमाणे आहे. त्यांना सुप्रीम आत्मा म्हटले जाते. त्यांची महिमा वेगळी आहे. मनुष्य सृष्टीचे चैतन्य बीज रूप असल्यामुळे त्यांच्यामध्ये सर्व ज्ञान आहे. आता तुमच्या आत्म्याला देखील ज्ञान मिळत आहे. आत्माच नॉलेज ग्रहण करत आहे, इतक्या छोट्याशा बिंदूमध्ये ८४ जन्मांचा पार्ट नोंदलेलाच आहे. तो सुध्दा अविनाशी, ८४ जन्मांचे चक्र फिरत आला आहात. याचा अंत होऊ शकत नाही. तुम्ही देवता होता, दैत्य बनलात पुन्हा सो देवता बनायचे आहे. हे चक्र चालत आलेले आहे. बाकीचे तर सर्व आहेत नाटकातील उपकथानके. इस्लामी, बौध्द इत्यादी काही ८४ जन्म घेत नाहीत. हाच भारत सतयुगामध्ये रायटीयस, सॉल्व्हन्ट (धार्मिक, संपन्न) होता आणि मग ८४ जन्म घेत विशश (विकारी) बनले आहेत. ही विकारी दुनिया आहे. ५ हजार वर्षांपूर्वी पवित्रता होती, शांती सुध्दा होती, तर समृद्धी देखील होती. बाबा मुलांना आठवण करून देत आहेत. मुख्य आहे - पवित्रता; म्हणूनच म्हणतात - विकारीला निर्विकारी बनविणारे तुम्ही या. तेच सद्गती देणारे आहेत, म्हणून तेच सद्गुरु आहेत. आता तुम्ही बाबांद्वारे बेगर टू प्रिन्स बनत आहात किंवा नरा पासून नारायण, नारी पासून लक्ष्मी बनत आहात. तुमचा हा राजयोग आहे. बाबांकडून आता भारतालाच राजाई मिळते. आत्माच ८४ जन्म घेते. आत्माच देहाद्वारे शिकते, शरीर शिकत नाही. आत्मा संस्कार घेऊन जाते. मी आत्मा या शरीराद्वारे शिकत आहे - याला देही-अभिमानी म्हटले जाते.

आत्मा जेव्हा शरीरापासून वेगळी होते तेव्हा शरीर काहीच कामाचे राहत नाही. आत्मा म्हणते - ‘आता मी पुण्यात्मा बनत आहे’. मनुष्य देह-अभिमानामध्ये येऊन म्हणतात - ‘मी हे करतो…’ तुम्ही आता समजता की, मी आत्मा आहे, हे माझे शरीर मोठे आहे. परमात्मा बाबांकडून मी आत्मा शिकत आहे. बाबा म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा. तुम्ही गोल्डन एज्डमध्ये सतोप्रधान होता नंतर तुमच्यामध्ये गंज पडली आहे. गंज पडून-पडून तुम्ही पावनचे पतित बनला आहात. आता पुन्हा पावन बनायचे आहे; म्हणून म्हणतात - ‘हे पतित-पावन या, येऊन आम्हाला पावन बनवा’. तर मग बाबा सल्ला देत आहेत - ‘हे पतित आत्मा, मज पित्याची आठवण कर तर तुझ्यातील भेसळ निघून जाईल आणि तुम्ही पावन बनाल’. याला प्राचीन योग म्हटले जाते. या आठवणीद्वारे अर्थात योग अग्नीद्वारे भेसळ भस्म होऊन जाईल. मूळ गोष्ट आहे - पतितापासून पावन बनणे. साधू-संत इत्यादी सर्व पतित आहेत. पावन बनण्याचा उपाय बाबाच सांगतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा. हा अंतिम जन्म पवित्र बना. खाता-पिता, चालता-फिरता मामेकम् (मज एकाची) आठवण करा कारण तुम्हा सर्व आत्म्यांचा (आशिकांचा) माशूक, मी आहे. तुम्हाला आम्ही पावन बनवले होते मग पुन्हा पतित बनला आहात. सर्व भक्तिणी आशिक आहेत. माशूक (बाबा) म्हणतात - भले कर्म सुद्घा करा. बुद्धीने माझी आठवण करत रहा तर विकर्म विनाश होतील. ही मेहनत करायची आहे. तर वारसा मिळविण्यासाठी बाबांची आठवण केली पाहिजे ना. जे जास्त आठवण करतील त्यांना वारसा देखील जास्त मिळेल. ही आहे आठवणीची यात्रा. जे जास्त आठवण करतील तेच पावन बनून येऊन माझ्या गळ्यातील हार बनतील. सर्व आत्म्यांचा निराकारी दुनियेमध्ये एक सिजरा (वंश-वृक्ष) बनलेला आहे. त्याला इन्कारपोरियल ट्री (निराकारी झाड) म्हटले जाते. हे आहे कारपोरियल ट्री (निराकारी झाड), निराकारी दुनियेतून सर्वांना नंबरवार यायचे आहे, येतच राहायचे आहे. झाड किती मोठे आहे. आत्मा इथे येते पार्ट बजावण्याकरिता. जे काही सर्व आत्मे आहेत, सर्व या ड्रामा मधील ॲक्टर्स आहेत. आत्मा अविनाशी आहे, तिच्यामध्ये पार्ट देखील अविनाशी आहे. ड्रामा केव्हा बनला, हे सांगू शकत नाही. हा चालूच राहतो. भारतवासी सुरुवातीला सुखामध्ये होते, नंतर मग दुःखामध्ये आले, मग आता शांतीधामला जायचे आहे. मग बाबा सुखधाम मध्ये पाठवतील. बाबा राज्य स्थापन करत आहेत, त्याच्यात जो जितका पुरुषार्थ करेल तितके उच्च पद मिळवेल. त्यामध्ये पुरुषार्थानुसार राज्यात पद प्राप्त कराल. सतयुगामध्ये तर जरूर फार थोडे मनुष्य असतील. आदि सनातन देवी-देवता धर्माचे झाड छोटे आहे, इतर सर्वांचा विनाश होईल. हा आदि सनातन देवी-देवता धर्म स्थापन होत आहे अर्थात स्वर्गाचे द्वार उघडत आहे. ५ हजार वर्षांपूर्वी देखील या युद्धानंतर स्वर्गाची स्थापना झाली होती. अनेक धर्मांचा विनाश झाला होता. आत्ता नरकाचे द्वार उघडे आहे, मग स्वर्गाचे द्वार उघडेल. स्वर्गाचे द्वार बाबा उघडतात, नरकाचे द्वार रावण उघडतो. बाबा वारसा देतात, रावण शाप देतो. दुनिया या गोष्टी जाणत नाही, तुम्हा मुलांना समजावून सांगतो. शिक्षण-मंत्र्याला देखील बेहदचे ज्ञान हवे आहे. ते तर तुम्हीच देऊ शकता. परंतु तुम्ही गुप्त आहात. तुम्हाला ओळखतच नाहीत. तुम्ही आपल्या योगबलाने आपले राज्य घेत आहात. लक्ष्मी-नारायणाने हे राज्य कसे मिळवले ते तर तुम्हीच जाणता. याला म्हटले जाते ऑस्पिसिअस (शुभ) कल्याणकारी युग, जेव्हा बाबा येऊन पावन बनवतात. श्रीकृष्णाला काही सर्वजण बाबा म्हणणार नाहीत. बाबा निराकारला म्हटले जाते, त्या बाबांची आठवण करायची आहे, पावन देखील बनायचे आहे. विकारांना जरूर सोडावे लागेल. भारत वाईसलेस (निर्विकारी) सुखधाम होता, आता विशश (विकारी) दुःख धाम आहे. वर्थ नॉट ए पेनी आहे (कौडी तुल्य) आहे. हा ड्रामाचा खेळ आहे, जो बुद्धीमध्ये धारण करून इतरांना देखील धारण करायला लावायचा आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) आठवणीद्वारे पावन बनून बाबांच्या गळ्यातील हार बनायचे आहे. कर्म करत असताना देखील बाबांच्या आठवणीमध्ये राहून विकर्माजीत बनायचे आहे.

२) पुण्य-आत्मा बनण्याचा पूर्णत: पुरुषार्थ करायचा आहे. देह-अभिमान सोडून देही-अभिमानी बनायचे आहे.

वरदान:-
आपल्या बुद्धी रूपी डोळ्यांना क्लिअर आणि केअरफुल ठेवणारे मास्टर नॉलेजफुल, पॉवरफुल भव

जसे ज्योतिषी आपल्या ज्योतिषाच्या नॉलेज द्वारे, ग्रहांच्या नॉलेज द्वारे येणाऱ्या आपत्तींना ओळखतात, तशी तुम्ही मुले मायेद्वारे येणाऱ्या पेपरांना अगोदरच पारखून पास विथ ऑनर बनण्यासाठी आपल्या बुद्धी रूपी नेत्राला क्लिअर बनवा आणि केअरफुल रहा. दिवसेंदिवस आठवणीच्या अथवा शांतीच्या शक्तीला वाढवा म्हणजे मग अगोदरच माहित होईल की, आज काहीतरी होणार आहे. मास्टर नॉलेजफुल, पॉवरफुल बना म्हणजे मग कधीही हार होणार नाही.

बोधवाक्य:-
पवित्रताच नवीनता आहे आणि हेच ज्ञानाचे फाउंडेशन आहे.

हे अव्यक्त इशारे - महान बनण्याकरिता मधुरतेचा आणि नम्रतेचा गुण धारण करा.

तुम्हा मुलांच्या वर्तनामध्ये मधुरता आणि मनसामध्ये बेहदची वैराग्य वृत्ती असावी. जर दोन्हीची स्मृती राहिली तर पास विथ ऑनर बनाल. मधुरता आणि नम्रता या विशेष दोन धारणांमुळे सदा विश्व कल्याणकारी, महादानी, वरदानी बनाल आणि सहजच स्नेहाचा पुरावा देऊ शकाल.