16-06-24    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   03.03.20  ओम शान्ति   मधुबन


“शुभ भावना आणि प्रेमाच्या भावनेला इमर्ज करून क्रोध महा शत्रूवर विजयी बना”


आज बापदादा आपल्या जन्माच्या साथीदारांना, त्याचसोबत सेवेच्या साथीदारांना पाहून हर्षित होत आहेत. आज तुम्हा सर्वांना देखील बापदादांचा अलौकिक जन्म, त्याचसोबत जन्माच्या साथीदारांच्या जन्म दिवसाची खुशी आहे, का? असा न्यारा आणि अति प्यारा अलौकिक जन्म आणखी कोणाचाही असू शकत नाही. असे कधीही ऐकले नसेल कि पित्याचा सुद्धा जन्म-दिवस तोच आणि मुलांचा देखील जन्म-दिवस तोच. हा न्यारा आणि प्यारा अलौकिक हिरे तुल्य जन्म आज तुम्ही साजरा करत आहात. त्या बरोबरच सर्वांना हि अनोखी आणि सुंदर गोष्ट देखील लक्षात आहे कि हा अलौकिक जन्म असा विचित्र आहे जो स्वयं भगवान पिता, मुलांचा साजरा करत आहेत. परम आत्मा, मुलांचा, श्रेष्ठ आत्म्यांचा जन्म-दिवस साजरा करत आहेत. दुनियेमध्ये बरेच लोक म्हणायचे म्हणून म्हणतात कि, ‘आम्हाला निर्माण करणारे भगवान आहेत, परम आत्मा आहेत’. परंतु त्यांना जाणतही नाहीत आणि त्या स्मृतिमध्ये चालत देखील नाहीत. तुम्ही सर्व अनुभवांती म्हणता - आम्ही परमात्म वंशी आहोत, ब्रह्मा वंशी आहोत. परम आत्मा आमचा जन्म-दिवस साजरा करतात. आम्ही परमात्म्याचा जन्म-दिवस साजरा करतो.

आज सर्व बाजूंचे इथे पोहोचले आहेत, कशासाठी? मुबारक देण्यासाठी आणि मुबारक घेण्यासाठी. तर बापदादा विशेष आपल्या जन्म सोबतींना मुबारक देत आहेत. सेवेच्या साथीदारांना देखील मुबारक देत आहेत. मुबारक देण्यासोबतच परम प्रेमाच्या मोत्यांनी, हिरे-माणकांनी वर्षा करत आहेत. प्रेमाचे मोती पाहिले आहेत ना. प्रेमाच्या मोत्यांना जाणता ना? फुलांची वर्षा, सोन्याची वर्षा तर सर्व करतात, परंतु बापदादा तुम्हा सर्वांवर परम प्रेमाची, अलौकिक स्नेहाच्या मोत्यांची वर्षा करत आहेत. एक गुणा नाही तर पद्म-पद्म-पद्म गुणा हृदयापासून मुबारक देत आहेत. तुम्ही देखील सर्व हृदयापासून मुबारक देत आहात, ती देखील बापदादांपर्यंत पोहोचत आहे. तर आज साजरा करण्याचा आणि मुबारक देण्याचा दिवस आहे. साजरा करण्याच्या वेळी काय करता? बँड वाजवता. तर बापदादा सर्व मुलांच्या मनातील खुशीचा बँड म्हणा, ढोल-ताशे म्हणा ऐकत आहेत. भक्त लोक बोलावत राहतात आणि तुम्ही मुले बाबांच्या प्रेमामध्ये सामावून जाता. सामावून जाता येते ना? हे सामावून जाणेच ‘समान’ बनवते.

बापदादा मुलांना स्वतःपासून वेगळे करू शकत नाहीत. मुले देखील वेगळे होऊ इच्छित नाहीत; परंतु कधी-कधी मायेच्या खेळामध्ये थोडेसे दूर जातात. बापदादा म्हणतात - मी तुम्हा मुलांचा आधार आहे, परंतु मुले खोडकर असतात ना. माया खोडकर बनवते, खरे तसे नाही आहेत, परंतु माया बनवते. आणि मग आधारा पासून दूर घेऊन जाते. तरी देखील बापदादा आधार बनून जवळ घेऊन येतात. बापदादा सर्व मुलांना विचारत आहेत कि, ‘तुम्हा प्रत्येकाला जीवनामध्ये काय हवे आहे?’ फॉरेनर्स दोन गोष्टींना खूप पसंत करतात. डबल फॉरेनर्सवाल्यांचे कोणते दोन शब्द आवडते आहेत (कंपेनियन आणि कंपनी) हे दोन्ही पसंत आहेत. जर पसंत असतील तर एक हात वर करा. भारतीयांना पसंत आहे? कंपेनियन (जोडीदार) देखील जरुरी आहे आणि कंपनी (दोस्त) सुद्धा जरुरी आहे. मित्रा शिवाय सुद्धा राहू शकत नाही आणि जोडीदारा शिवाय सुद्धा राहू शकत नाही. तर तुम्हा सर्वांना कोण मिळाला आहे? कंपेनियन (जोडीदार) मिळाला आहे? बोला होय कि नाही? (होय) कंपनी मिळाली आहे? (होय). अशी कंपनी आणि असा कंपेनियन (दोस्त आणि जोडीदार) साऱ्या कल्पामध्ये मिळाला होता? कल्पापूर्वी मिळाला होता? असा कंपेनियन जो कधीही दूर करत नाही, कितीही खोडकर व्हाल परंतु तरीदेखील तो आधारच बनतो आणि तुमच्या मनातील ज्या इच्छा आहेत, त्या सर्व इच्छा पूर्ण करतो. काही अप्राप्ती आहे? सर्वजण मनापासून म्हणता का आदर ठेवायचा म्हणून होय म्हणत आहात? गाणे तर म्हणता - ‘जो पाना था वह पा लिया’, कि मिळायचे बाकी आहे? मिळाले आहे? आता मिळवायचे काहीही नाही ना की थोड्या-थोड्या इच्छा अजूनही बाकी राहील्या आहेत? सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत कि काही बाकी राहिल्या आहेत? बापदादा म्हणतात की एक इच्छा राहिली आहे. (बाबांना प्रत्यक्ष करण्याची इच्छा राहिली आहे) हि तर बाबांची इच्छा आहे कि सर्व मुलांना माहिती होऊ दे. बाबा आले आणि कोणाला कळायचे राहिले!... तर हि बापदादांची विशेष इच्छा आहे कि सर्वांना कमीत-कमी माहिती तरी होऊ दे कि आमचे सदाकाळचे बाबा आलेले आहेत. परंतु मुलांच्या हदच्या इतर इच्छा पूर्ण झाल्या आहेत, प्रेमाच्या इच्छा आहेत. प्रत्येकाला वाटते की स्टेजवर यावे, हि इच्छा आहे? (आता तर बाबा स्वतः सर्वांच्या जवळ येतात) हि देखील इच्छा पूर्ण झाली ना? संतुष्ट आत्मे आहात, मुबारक असो कारण सर्व मुले हुशार आहेत. समजतात कि जशी वेळ तसे स्वरूप बनवायचेच आहे म्हणून बापदादा सुद्धा ड्रामाच्या बंधनामध्ये तर आहेत ना! तर सर्व मुले प्रत्येक समयानुसार संतुष्ट आहेत आणि सदैव संतुष्टमणी बनून चमकत राहतात. का? तुम्ही स्वतःच म्हणता - ‘पाना था वो पा लिया’. हे ब्रह्मा बाबांचे सुरुवातीचे अनुभवाचे बोल आहेत, तर जे ब्रह्मा बाबांचे बोल तेच सर्व ब्राह्मणांचे बोल. तर बापदादा सर्व मुलांकडून हेच रिवाइज (उजळणी) करून घेत आहेत कि नेहमी बाबांच्या कंपनीमध्ये (सोबत) रहा. बाबांनी सर्व संबंधांचा अनुभव करून दिला आहे. म्हणता देखील कि, सर्व नाती बाबांसोबतच आहेत. जर सर्व नाती आहेत तर जशी वेळ तसे नाते कार्यामध्ये का उपयोगात आणत नाही! आणि हाच सर्व नात्यांचा वेळोवेळी अनुभव करत रहाल तर कंपेनियन देखील असेल, कंपनी सुद्धा असेल (जोडीदार सुद्धा असेल आणि दोस्त सुद्धा असेल). दुसऱ्या कोणत्या साथीदारांकडे मन आणि बुद्धी जाऊ शकणार नाही. बापदादा ऑफर करत आहेत - जेव्हा सर्व नाती ऑफर करत आहेत तर सर्व नात्यांचे सुख घ्या. त्या नात्यांना कार्यामध्ये लावा.

बापदादा जेव्हा बघतात - काही-काही मुले काही वेळा स्वतःला एकटे आणि थोडेसे नीरस अनुभव करतात तर बाप-दादांना दया येते कि अशी श्रेष्ठ कंपनी असताना, कंपनीला कार्यामध्ये का आणत नाहीत? मग काय म्हणतात? ‘व्हाय-व्हाय’ (‘का, का’) बापदादांनी म्हटले ‘व्हाय’ म्हणू नका, जेव्हा हा शब्द येतो ‘व्हाय’ निगेटिव्ह आहे आणि पॉझिटिव्ह आहे ‘फ्लाय’ (‘उडणे’), तर ‘व्हाय-व्हाय’ कधीही करू नका, ‘फ्लाय’ लक्षात ठेवा. बाबांना सोबती बनवून फ्लाय करा तर खूप मज्जा येईल. ही कंपनी आणि कंपेनियन (हा दोस्त आणि जोडीदार) दोन्ही रूपाने संपूर्ण दिवस कार्यामध्ये आणा. असा जोडीदार पुन्हा कधी मिळणार आहे? बापदादा इथपर्यंतही सांगतात की जर तुम्ही मनाने आणि शरीराने दोन्ही प्रकारे थकून जरी गेलात तरी कंपेनियन (हा जोडीदार) तुमची दोन्ही प्रकारे मसाज करण्यासाठी देखील तयार आहे. मनोरंजन करण्यासाठी देखील एव्हररेडी आहे. मग हदच्या मनोरंजनाची आवश्यकताच भासणार नाही. असे यूज करता येते का समजता मोठ्यात मोठे बाबा आहेत, टीचर आहेत, सद्गुरु आहेत…? परंतु सर्व संबंध (नाती) आहेत. समजले! डबल विदेशींना?

अच्छा - सगळे बर्थ डे साजरा करण्यासाठी आला आहात ना! साजरा करायचा आहे ना! अच्छा, जेव्हा बर्थ डे साजरा करता, तर ज्याचा बर्थ डे साजरा करता त्याला गिफ्ट देता कि नाही देत? (देतो) तर आज तुम्ही सगळे बाबांचा बर्थ डे साजरा करण्यासाठी आले आहात. नाव तर ‘शिवरात्री’ आहे, तर बाबांचा खास बर्थ डे साजरा करण्यासाठी आले आहात. साजरा करण्यासाठी आले आहात ना? तर बर्थ डे ची आजची गिफ्ट काय दिलीत? का केवळ मेणबत्ती पेटवणार, केक कट करणार… असे साजरे करणार का? आज काय गिफ्ट दिलीत? का उद्या देणार? भले छोटी द्या, अथवा मोठी द्या, परंतु गिफ्ट तर देतात ना! तर काय दिली? विचार करत आहेत. अच्छा, द्यायची आहे का? देण्यासाठी तयार आहात का? जे बापदादा सांगतील ते देणार का तुम्ही तुमच्या इच्छेने देणार? काय करणार? जे बापदादा सांगणार ते देणार का स्वतःच्या इच्छेने देणार? (जे बापदादा सांगतील ते देणार) बघा, थोडी हिम्मत ठेवावी लागेल. हिम्मत आहे? मधुबनवाले हिम्मत आहे? डबल फॉरेनर्समध्ये हिम्मत आहे? हात तर खूप छान वर करत आहेत. अच्छा - शक्तींमध्ये, पाण्डवांमध्ये हिम्मत आहे? भारतवासियांमध्ये हिम्मत आहे? खूप छान. हीच बाबांना मुबारक मिळाली. अच्छा, सांगू. असे तर म्हणणार नाही ना की याचा तर विचार करावा लागेल? गा-गा (लागेल) म्हणू नका. एक गोष्ट बापदादांनी मेजॉरिटीमध्ये पाहिली आहे. मायनॉरिटी नाही मेजॉरिटी आहे. काय पाहिले? जेव्हा काही परिस्थिती समोर येते तेव्हा मेजॉरिटींमध्ये एक, दोन, तीन नंबर मध्ये क्रोधाचा अंश इच्छा नसताना देखील इमर्ज होतो. काहींमध्ये महान क्रोधाच्या रूपात इमर्ज होतो, काहींमध्ये जोशाच्या रूपामध्ये होतो, काहींमध्ये तिसरा नंबर चिडचिडेपणाच्या रूपामध्ये होतो. चिडचिडेपणा समजता? तो देखील क्रोधाचाच अंश आहे, हलका आहे. तिसरा नंबर आहे ना तर तो हलका आहे. पहिला जोरात आहे, दुसरा त्याहून थोडा. मग भाषा तर आजकाल सर्वांची रॉयल झाली आहे. तर रॉयल रूपामध्ये काय म्हणतात? ‘’गोष्टच अशी आहे ना, जोश तर येणारच’. तर आज बापदादा सर्वांकडून ही गिफ्ट घेऊ इच्छितात की क्रोध तर सोडा परंतु क्रोधाचा अंश मात्र सुद्धा राहू नये. का? क्रोधामध्ये येऊन डिस-सर्विस करतात कारण क्रोध येतो तो दोघांमधे येतो. एकटा नसतो, दोघांमधे असतो त्यामुळे दिसून येतो. भले मग मन्सामध्ये देखील कोणाप्रती घृणाभावाचा अंश जरी असला तर मनामध्ये देखील त्या आत्म्याप्रती जोश जरूर येतो. तर बापदादांना हे डिस-सर्विसचे कारण चांगले वाटत नाही. तर क्रोधाचा भाव अंश मात्रही उत्पन्न होऊ नये. जसे ब्रह्मचर्यावर अटेन्शन देता, तसेच काम महा शत्रू, क्रोध महा शत्रू म्हणून ओळखला जातो. शुभ भाव, प्रेम भाव हा इमर्ज होत नाही. मग मूड ऑफ करणार. त्या आत्म्यापासून दूर जाणार. समोर येणार नाहीत, बोलणार नाहीत. त्यांनी बोललेल्या गोष्टींना नकार देतील. पुढे जाऊ देणार नाहीत. हे सगळे बाहेर वाल्यांनासुद्धा समजते, मग असंच म्हणतात, ‘आज यांची तब्बेत ठीक नाही, बाकी काही नाही’. तर जन्म-दिवसाची ही गिफ्ट देऊ शकता काय? जे समजतात प्रयत्न करणार, त्यांनी हात वर करा. भेट देण्यासाठी ‘विचार करणार’, ‘प्रयत्न करणार’ त्यांनी हात वर करा. सच्च्या दिलावर देखील साहेब राजी होतात (खरेपणावर देखील बाबा संतुष्ट होतात). (बरेच भाऊ-बहीणी उभे राहिले) हळू-हळू उठत आहेत. खरे बोलण्याची मुबारक आहे. अच्छा, ज्यांनी म्हटले प्रयत्न करणार, ठीक आहे प्रयत्न जरूर करा परंतु प्रयत्नासाठी किती वेळ पाहिजे? एक महिना पाहिजे, ६ महिने पाहिजेत, किती पाहिजे? सोडणार का सोडण्याचे लक्ष्यच नाहीये? ज्यांनी म्हटले प्रयत्न करणार ते परत उठा. जे समजतात कि आम्ही दोन-तीन महिन्यांमध्ये प्रयत्न करून सोडणार ते बसा. आणि जे समजतात ६ महिने पाहिजेत, जरी ६ महिने पूर्ण लागले तरी कमी करा, या गोष्टीला सोडून देऊ नका कारण हे अत्यंत गरजेचे आहे. हि डिस-सर्विस दिसून येते. मुखावाटे बोलला नाहीत तरी चेहरा बोलतो म्हणून ज्यांनी हिम्मत ठेवली आहे त्या सर्वांवर बापदादा ज्ञान, प्रेम, सुख, शांतीच्या मोत्यांची वर्षा करत आहेत. अच्छा.

बापदादा सर्वांना रिटर्न गिफ़्टमध्ये हे विशेष वरदान देत आहेत - जेव्हापण चुकून जरी, नको असताना देखील जरी कधी क्रोध आला तर मनापासून फक्त “मीठा बाबा” हा शब्द बोला, तर बापदादांची एक्स्ट्रा मदत हिम्मतवाल्यांना अवश्य मिळत राहील. ‘मीठा बाबा’ म्हणा, फक्त ‘बाबा’ म्हणू नका, “मीठा बाबा” तर मदत मिळेल, नक्कीच मिळेल कारण लक्ष्य ठेवले आहे ना. तर लक्ष्याद्वारे लक्षण येणारच आहेत. मधुबनवाले हात वर करा. अच्छा - करायचेच आहे ना! (हां जी) मुबारक असो. खूप छान. आज खास मधुबनवाल्यांना टोली देणार. मेहनत खूप करता. क्रोधासाठी देत नाही, मेहनतीसाठी देत आहे. सर्वांना वाटेल हात वर केला, म्हणून टोली देणार. मेहनत खूप छान करतात. सर्वांना सेवेने संतुष्ट करणे, हे तर मधुबनचे उदाहरण आहे म्हणून आज तोंड गोड करणार. तुम्ही सर्व यांचे तोंड गोड पाहून, तोंड गोड करून घ्या, खुशी होणार ना. हे देखील एक ब्राह्मण परिवाराचे कल्चर (संस्कृती) आहे. आजकाल तुम्ही लोक ‘कल्चर ऑफ पीस’चा प्रोग्राम बनवत आहात. तर हे देखील पहिल्या नंबरचे कल्चर आहे - “ब्राह्मण कुळाची सभ्यता”. बापदादांनी पाहिले आहे, या दादी जेव्हा सौगात देतात ना. त्यामध्ये एक ज्यूटची पिशवी असते. त्यावर लिहिलेले असते - “कम बोलो, धीरे बोलो, मीठा बोलो”. तर आज बापदादा ही सौगात देत आहेत, ज्यूटची पिशवी देत नाहीत, वरदानामध्ये हे शब्द देत आहेत. प्रत्येक ब्राह्मणाच्या चेहऱ्यामध्ये आणि चलनमध्ये ब्राह्मण कल्चर प्रत्यक्ष व्हावे. प्रोग्रामही करणार, भाषण देखील करणार परंतु आधी स्वतःमध्ये ही सभ्यता जरुरी आहे. प्रत्येक ब्राह्मण हसतमुखाने प्रत्येकाच्या संपर्कामध्ये यावा. कोणाशी कसे, कोणाशी कसे, असे नको. कोणाला पाहून आपले कल्चर सोडू नका. होऊन गेलेल्या गोष्टी विसरून जा. नवीन संस्कार सभ्यतेच्या जीवनामध्ये दाखवा. आता दाखवायचे आहे, ठीक आहे ना! (सर्वांनी म्हटले हां जी)

हे खूप छान आहे, डबल फॉरेनर्स मेजॉरिटी ‘हां जी’ करण्यामध्ये खूप चांगले आहेत. चांगले आहे - भारतवासीयांची तर हि एक मर्यादाच आहे - “हां जी करणे”. फक्त मायेला ‘ना जी’ करा, बस इतर आत्म्यांना ‘हां जी, हां जी’ करा. मायेला ‘ना जी, ना जी’ करा. अच्छा. सर्वांनी जन्म-दिवस साजरा केला? साजरा केला, गिफ्ट दिली, गिफ्ट घेतली.

अच्छा - तुमच्या बरोबरच इतर ठिकाणी देखील सभा होत आहेत. कुठे छोट्या सभा आहेत, कुठे मोठ्या सभा आहेत, सर्व ऐकत आहेत, पाहत आहेत. त्यांना देखील बापदादा हेच सांगत आहेत कि, आजच्या दिवसाची तुम्ही सुद्धा सर्वांनी गिफ़्ट दिली कि नाही? सर्व म्हणत आहेत - ‘हां जी बाबा’. चांगले आहे, दूर बसलेले असूनही जसे समोरच ऐकत आहेत कारण सायन्सवाले जी इतकी मेहनत करतात, मेहनत तर खूप करतात ना. तर सर्वात जास्त फायदा ब्राह्मणांना झाला पाहिजे ना! म्हणूनच जेव्हापासून संगमयुगाचा आरंभ झाला आहे तेव्हापासून ही सायन्सची साधने देखील वाढत चालली आहेत. सतयुगामध्ये तर तुमच्या देवता रूपामध्ये हे सायन्स सेवा करेल परंतु संगमयुगामध्ये देखील सायन्सची साधने तुम्हा ब्राह्मणांना मिळत आहेत आणि सेवेमध्ये देखील, प्रत्यक्षता करण्यातही ही सायन्सची साधने खूप विशाल रूपाने सहयोगी बनणार; म्हणून सायन्सच्या निमित्त बनणाऱ्या मुलांना देखील बापदादा मेहनतीची मुबारक देत आहेत.

बाकी बापदादांनी पाहिले मधुबनमध्ये सुद्धा देश-विदेशातून अतिशय शोभिवंत कार्ड, पत्रे आणि कोणाद्वारे प्रेमपूर्वक आठवणीचे मेसेज पाठवले आहेत. बापदादा त्यांना देखील विशेष प्रेमपूर्वक आठवण आणि जन्म दिवसाची पदम-पदम-पदम-पदम-पदम गुणा मुबारक देत आहेत. सर्व मुले बापदादांच्या नजरे समोर येत आहेत. तुम्ही लोकांनी तर फक्त कार्ड पाहिलीत, परंतु बापदादा मुलांना देखील नजरेने पहात आहेत. अतिशय प्रेमाने पाठवतात आणि त्याच प्रेमाने बापदादांनी स्विकार केले आहे. कितीतरीजणांनी आपल्या अवस्था देखील लिहिल्या आहेत तर बापदादा म्हणतात - ‘उडा आणि उडवा’. उडाल्याने बाकी सर्व गोष्टी खालीच राहतील आणि तुम्ही सदैव उच्च ते उच्च बाबांसोबत उंचावर रहाल. सेकंदामध्ये स्टॉप आणि स्टॉक शक्तींचा, गुणांचा इमर्ज करा. अच्छा.

चोहो बाजूंच्या सर्व श्रेष्ठ ब्राह्मण आत्म्यांना, सदैव बाबांच्या कंपनीमध्ये राहणाऱ्या, बाबांना कंपेनियन बनविणाऱ्या स्नेही आत्म्यांना, सदैव बाबांच्या गुणांच्या सागरामध्ये सामावणाऱ्या समान बापदादांच्या श्रेष्ठ आत्म्यांना, सदैव सेकंदामध्ये बिंदू लावणाऱ्या मास्टर सिंधु स्वरूप आत्म्यांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि खूप-खूप मुबारक असो, मुबारक असो, मुबारक असो. नमस्ते तर बापदादा प्रत्येक वेळी, प्रत्येक मुलाला करतात, आज सुद्धा नमस्ते.

वरदान:-
पवित्रतेच्या शक्तिशाली दृष्टी, वृत्तीद्वारे सर्व प्राप्ति करून देणारे दुःख हर्ता सुख कर्ता भव

सायन्सच्या औषधामध्ये अल्पकाळाची शक्ति आहे जी दुःख, वेदनेला नाहीसे करते; परंतु पवित्रतेची शक्ति अर्थात सायलेन्सच्या शक्तिमध्ये आशीर्वादांची शक्ति आहे. हि पवित्रतेची शक्तिशाली दृष्टी अथवा वृत्ती सदाकाळासाठी प्राप्ती करून देणारी आहे म्हणून तुमच्या जड चित्रांसमोर ‘ओ दयाळू, दया करा’ असे म्हणून दया अथवा आशीर्वाद मागतात. तर जेव्हा चैतन्यामध्ये असे मास्टर दुःख हर्ता सुख कर्ता बनून दया केली आहे तेव्हाच तर भक्तीमध्ये पुजले जाता.

सुविचार:-
वेळेच्या समीपतेनुसार खरी तपस्या अथवा साधना आहेच बेहदचे वैराग्य.

सूचना:- आज महिन्याचा तिसरा रविवार, आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे, सर्व ब्रह्मावत्स संगठीत रूपामध्ये सायंकाळी ६.३० ते ७.३० वाजेपर्यंत विशेष आपल्या ‘मास्टर दाता’ स्वरूपामध्ये स्थित होऊन, सर्व आत्म्यांना मन्सा द्वारे सर्व शक्तींचे दान देऊन, वरदान देऊन, भरपुरतेचा अनुभव करवा.