16-07-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - ड्रामाच्या यथार्थ ज्ञानानेच तुम्ही अचल, अडोल आणि एकरस राहू शकता, मायेची वादळे तुम्हाला हलवू शकत नाहीत”

प्रश्न:-
देवतांचा कोणता एक मुख्य गुण तुम्हा मुलांमध्ये सदैव दिसला पाहिजे?

उत्तर:-
हर्षित राहणे. देवतांना सदैव आनंदी हर्षितमुख दाखवतात. असे तुम्हा मुलांना देखील सदैव हर्षित रहायचे आहे, कोणतीही गोष्ट असो, हसत रहा. कधीही उदासीनता किंवा राग येऊ नये. जसे बाबा तुम्हाला योग्य आणि अयोग्य याची समज देतात, कधीही रागवत नाहीत, उदास होत नाहीत. असे तुम्हा मुलांना देखील उदास व्हायचे नाहीये.

ओम शांती।
बेहदच्या मुलांना बेहदचे बाबा समजावून सांगत आहेत. लौकिक पिता तर असे म्हणणार नाही. त्यांची फार-फार तर ५-७ मुले असतील. हे तर जे काही सर्व आत्मे आहेत, आपसामध्ये भाऊ-भाऊ आहेत. त्या सर्वांचा जरूर पिता असेलच. म्हणतात सुद्धा आपण सारे भाऊ-भाऊ आहोत. सर्वांसाठी म्हणतात. जे कोणी येईल, त्यांच्यासाठी म्हणतील आपण भाऊ-भाऊ आहोत. ड्रामामध्ये तर सर्व बांधील आहेत, ज्याला कोणीही जाणत नाही. हे न जाणणे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे. जे बाबाच येऊन सांगतात; जेव्हा कथा-पुराण इत्यादी बसून ऐकवतात तेव्हा म्हणतात - ‘परमपिता परमात्माए नमः’. आता ते कोण आहेत - हे जाणत नाहीत. असे म्हणतात - ब्रह्मा देवता, विष्णू देवता, शंकर देवता परंतु अर्थ लक्षात घेऊन म्हणत नाहीत. ब्रह्माला वास्तविक देवता म्हणणार नाही. देवता, विष्णूला म्हटले जाते. ब्रह्मा बद्दल कोणालाही माहित नाही. ‘विष्णू देवता’, ठीक आहे, शंकराचा तर काहीही पार्ट नाही आहे. त्यांची काही बायोग्राफी (जीवन चरित्र) नाहीये, शिवबाबांची तर बायोग्राफी आहे. ते येतातच पतितांना पावन बनविण्यासाठी, नवी दुनिया स्थापन करण्यासाठी. आता, एका आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना आणि इतर सर्व धर्मांचा विनाश होतो. सर्वजण कुठे जातात? शांतीधाम. शरीरे तर सर्वांची विनाश होणार आहेत. नव्या दुनियेमध्ये फक्त तुम्हीच असणार. जे काही मुख्य धर्म आहेत, त्यांना तुम्हीच जाणता. सर्वांची तर नावे घेऊ शकणार नाहीत. छोट्या-छोट्या शाखा-उपशाखा तर अनेक आहेत. सुरवातीला आहेत डीटीजम (देवता धर्म) नंतर मग इस्लामी. या गोष्टी तुम्हा मुलांशिवाय इतर कोणाच्याही बुद्धीमध्ये नाहीत. आता तो आदि सनातन देवी-देवता धर्म प्रायःलोप झाला आहे म्हणून वडाच्या झाडाचे उदाहरण देतात. संपूर्ण झाड उभे आहे, मूळच नाहीये. सर्वात जास्त आयु या वडाच्या झाडाची असते. तर यामध्ये सर्वात मोठी आयु आहे आदि सनातन देवी-देवता धर्माची. तो जेव्हा प्राय:लोप होतो तेव्हाच तर बाबा येऊन म्हणतील की आता एका धर्माची स्थापना आणि अनेक धर्मांचा विनाश होणार आहे, यासाठी त्रिमूर्तीचे चित्र देखील बनवले आहे. परंतु अर्थ समजत नाहीत. तुम्ही मुले जाणता उच्च ते उच्च भगवान आहेत मग ब्रह्मा-विष्णू-शंकर, आणि मग सृष्टीवर येता तर देवी-देवतांव्यतिरिक्त इतर कोणताही धर्म नाही. भक्ती मार्गाची देखील ड्रामामध्ये नोंद आहे. प्रथम शिवाची भक्ती करतात मग देवतांची. भारताचीच तर गोष्ट आहे. बाकीचे तर समजतात - आपला धर्म, मठ, पंथ कधी स्थापन होतो. जसे आर्य लोक म्हणतात - ‘आम्ही खूप जुने आहोत’. वास्तविक सर्वात जुना तर आहेच मुळी आदि सनातन देवी-देवता धर्म. तुम्ही जेव्हा झाडाच्या चित्रावर समजावून सांगता तर आपणच समजतील कि आमचा धर्म अमुक वेळेस येईल. सर्वांना जो अनादि अविनाशी पार्ट मिळालेला आहे तो बजावायचाच आहे, यामध्ये कोणाचा दोष अथवा चूक आहे असे म्हणता येणार नाही. हे तर फक्त समजावून सांगितले जाते की पाप-आत्मा का बनले आहेत. मनुष्य म्हणतील आम्ही सारे बेहदच्या बाबांची संतान आहोत, तर मग सतयुगामध्ये सर्वजण भाऊ-भाऊ का नाहीत? परंतु ड्रामामध्ये पार्टच नाही आहे. हा अनादि ड्रामा पूर्व नियोजित आहे, यावर विश्वास ठेवा, बाकी काहीच बोलू नका. चक्र देखील दाखवले आहे - हे कसे फिरते. कल्पवृक्षाचे देखील चित्र आहे. परंतु हे कोणीही जाणत नाही कि याची आयु किती आहे. बाबा कोणाचीही निंदा करत नाहीत. हे तर समजावून सांगितले जाते, तुम्हाला देखील समजावून सांगतात तुम्ही किती पावन होता, आता पतित बनले आहात तर बोलावता - ‘हे पतित-पावन या’. आधी तर तुम्हाला सर्वांना पावन बनायचे आहे. मग नंबरवार पार्ट बजावण्यासाठी यायचे आहे. सर्व आत्मे वरती राहतात. बाबा देखील वरती राहतात. मग त्यांना बोलावतात की, ‘या’. ते असे बोलावल्याने येत नाहीत. बाबा म्हणतात - ‘माझा सुद्धा ड्रामामध्ये पार्ट नोंदलेला आहे’. जसे हदच्या ड्रामामध्ये देखील मोठ-मोठ्या मुख्य ॲक्टर्सचा पार्ट असतो, हा मग आहे बेहदचा ड्रामा. सर्वजण ड्रामाच्या बंधनामध्ये बांधले गेले आहेत; याचा अर्थ असा नाही की, धाग्यामध्ये बांधले गेले आहात. नाही. हे बाबा समजावून सांगतात. ते आहे जड झाड. जर बीज चैतन्य असते तर त्याला माहीत असले असते ना की, हे झाड कसे मोठे होऊन मग फळ देईल. हे तर आहेत या मनुष्य सृष्टी रुपी झाडाचे चैतन्य बीज, याला उलटे झाड म्हटले जाते. बाबा तर आहेत नॉलेजफुल, त्यांना साऱ्या झाडाचे नॉलेज आहे. ते तेच गीतेचे ज्ञान आहे. कोणती नवीन गोष्ट नाहीये. इथे बाबा काही श्लोक इत्यादी म्हणत नाहीत. ते लोक ग्रंथ वाचून मग अर्थ बसून समजावून सांगतात. बाबा समजावून सांगत आहेत - ‘हे शिक्षण आहे, यामध्ये श्लोक इत्यादीची गरजच नाही. त्या शास्त्रांच्या अभ्यासामध्ये कोणतेही एम ऑब्जेक्ट नसते’. म्हणतात देखील ज्ञान, भक्ती आणि वैराग्य. ही जुनी दुनिया नष्ट होते. संन्याशांचे आहे हदचे वैराग्य, तुमचे आहे बेहदचे वैराग्य. शंकराचार्य येतात तेव्हा ते बसून घरा-दारापासून वैराग्य करायला शिकवतात. ते देखील सुरुवातीला शास्त्र इत्यादी शिकवत नाहीत. जेव्हा खूप वृद्धी होते तेव्हा शास्त्रे बनवायला सुरूवात करतात. सुरुवातीला तर धर्म स्थापन करणारा एकच असतो मग हळूहळू वृद्धी होत जाते. हे देखील समजावून सांगायचे आहे - सृष्टीवर सर्वात पहिला कोणता धर्म होता. आता तर अनेक धर्म आहेत. आदि सनातन देवी-देवता धर्म होता, ज्याला स्वर्ग, हेवन म्हणतात. तुम्ही मुले रचयिता आणि रचनेला जाणल्याने आस्तिक बनता. नास्तिकपणाचे किती दुःख असते, अनाथ बनतात, आपसात भांडण-तंटे करत राहतात. असे म्हणतात ना - ‘तुम्ही आपसात भांडत राहता, तुमचा कोण धनी-धोणी (मालक-स्वामी) नाही आहे का?’ यावेळी सर्वजण अनाथ बनतात. नव्या दुनियेमध्ये पवित्रता, सुख, शांती सर्व होते, अपार सुख होते. इथे अपरंपार दुःख आहे. ते आहेत सतयुगाचे, हे आहेत कलियुगाचे आता तुमचे आहे पुरुषोत्तम संगमयुग. हे पुरुषोत्तम संगम युग एकच असते. सतयुग-त्रेताच्या संगमाला पुरुषोत्तम म्हणणार नाही. इथे आहेत ‘असुर’, तिथे आहेत ‘देवता’. तुम्ही जाणता हे रावण राज्य आहे. रावणाच्या डोक्यावर गाढवाचे डोके दाखवतात. गाढवाला कितीही स्वच्छ करून त्यावर कपडे ठेवा, गाढव तरीही मातीमध्ये लोळून कपडे खराब करून टाकेल. बाबा तुमचे कपडे (आत्मा) स्वच्छ आणि सुंदर बनवतात, मग रावण राज्यामध्ये लडबडून अपवित्र बनता. आत्मा आणि शरीर दोन्ही अपवित्र बनतात. बाबा म्हणतात - ‘तुम्ही तुमचा सारा शृंगार गमावला आहे’. बाबांना पतित-पावन म्हणतात, तुम्ही भर सभेमध्ये म्हणू शकता की आम्ही गोल्डन एजमध्ये किती सुशोभित होतो, किती फर्स्टक्लास राज्य भाग्य होते. मग माया रुपी धुळीमध्ये लडबडून मळले आहात.

बाबा म्हणतात ही अंधेरी नगरी आहे. ईश्वराला सर्वव्यापी म्हटले आहे, जे काही झाले त्याची हुबेहूब पुनरावृत्ती होईल, यामध्ये गोंधळून जाण्याची गरज नाही. ५ हजार वर्षांमध्ये किती मिनिटे, तास, सेकंद आहेत; एका मुलाने सर्व धर्मवाल्यांचा हिशोब काढून पाठवला होता, यात देखील बुद्धी व्यर्थ घालवली असेल. बाबा तर असेच समजावून सांगतात की दुनिया कशी चालते.

प्रजापिता ब्रह्मा आहेत ग्रेट-ग्रेट ग्रँड फादर. त्यांचे ऑक्युपेशन कोणीही जाणत नाही. विराट रूप बनवले आहे आणि त्यातून प्रजापिता ब्रह्माला काढूनच टाकले आहे. बाबांना आणि ब्राह्मणांना यथार्थपणे जाणत नाहीत. त्यांना (ब्रह्मा बाबांना) म्हणतात देखील ‘आदि देव’. बाबा समजावून सांगत आहेत - ‘मी या झाडाचे चैतन्य बीजरूप आहे. हे उलटे झाड आहे’. बाबा जे सत्य आहेत, चैतन्य आहेत, ज्ञानाचे सागर आहेत, त्यांचीच महिमा केली जाते. शरीरामध्ये आत्माच जर नसेल तर चालता-फिरता देखील येणार नाही. गर्भामध्ये देखील ५-६ महिन्यानंतर आत्मा प्रवेश करते. हा देखील ड्रामा बनलेला आहे. आणि मग आत्मा निघून जाते तर संपला. आत्मा अविनाशी आहे, ती पार्ट बजावते, बाबा येऊन याची जाणीव करून देतात. आत्मा इतका छोटा बिंदू आहे, त्यामध्ये अविनाशी पार्ट भरलेला आहे. परमपिता देखील आत्मा आहेत, त्यांना ज्ञानाचा सागर म्हटले जाते. तेच आत्म्याचे रीअलायझेशन करवतात (साक्षात्कार घडवतात). ते (दुनियावाले) तर फक्त म्हणतात की, परमात्मा सर्व शक्तिमान, हजारो सूर्यांपेक्षा देखील तेजोमय आहे. परंतु समजत काहीच नाहीत. बाबा म्हणतात - ‘हे सारे भक्तीमार्गामध्ये वर्णन केलेले आहे आणि शास्त्रांमध्ये लिहिले आहे’. अर्जुनाला साक्षात्कार झाला तर म्हणाला, ‘मी इतके तेज सहन करू शकत नाही’, तर ती गोष्ट मनुष्यांच्या बुद्धीमध्ये पक्की झाली आहे. इतका तेजोमय जर कोणामध्ये प्रवेश करेल तर स्फोट होईल. ज्ञानच नाही आहे ना. तर समजतात परमात्मा तर हजार सूर्यांपेक्षाही तेजोमय आहे, आम्हाला त्यांचा साक्षात्कार व्हावा. भक्तीची भावना बसलेली आहे तर त्यांना तसा साक्षात्कार देखील होतो. अगदी सुरुवातीला तुमच्याकडे देखील असे अनेकांना साक्षात्कार घडत होते, डोळे लाल होत असत. साक्षात्कार तर झाला मग आज ते कुठे आहेत. त्या सर्व आहेत भक्ती मार्गाच्या गोष्टी. तर हे सर्व बाबा समजावून सांगतात, यामध्ये निंदा करण्याची कोणती गोष्टच नाही. मुलांना सदैव हर्षित रहायचे आहे. हा तर ड्रामा पूर्व नियोजित आहे. मला इतक्या शिव्या देतात, मग मी काय करतो? राग येतो का! मी समजतो ड्रामा अनुसार हे सारे भक्तिमार्गामध्ये अडकलेले आहेत. नाराज होण्याची गोष्टच नाही. ड्रामा असा बनलेला आहे. स्पष्टीकरण प्रेमाने द्यायचे असते. बिचारे अज्ञान अंधारामध्ये पडलेले आहेत, त्यांना समजत नाही तर दया देखील येते. कायम हसत राहिले पाहिजे. हे बिचारे स्वर्गामध्ये येऊ शकणार नाहीत. हे सर्वजण शांतीधाम मध्ये जाणार आहेत. सर्वांना शांतीच हवी आहे. तर बाबाच सत्य समजावून सांगतात. आता तुम्ही जाणता की हा खेळ पूर्व नियोजित आहे. ड्रामामध्ये प्रत्येकाला पार्ट मिळालेला आहे, यामध्ये अतिशय अचल आणि स्थिर बुद्धी पाहिजे. जोपर्यंत अचल, अडोल, एकरस अवस्था होत नाही तोपर्यंत पुरुषार्थ कसा करणार. काहीही होवो, भले वादळ आले तरीही स्थेरियम (स्थिर) रहायचे आहे. मायेची वादळे तर अनेक येतील आणि शेवटपर्यंत येतील. अवस्था मजबूत हवी. ही आहे गुप्त मेहनत. कितीतरी मुले पुरुषार्थ करून वादळाला उधळून लावत असतात. जितका जो उत्तीर्ण होईल तितके उच्च पद प्राप्त करेल. राजधानीमध्ये पदे तर अनेक आहेत ना.

सर्वात चांगली चित्रे आहेत त्रिमूर्ती, गोळा आणि झाड. हि अगदी सुरुवातीला बनविलेली आहेत. विदेशामध्ये देखील सेवा करण्यासाठी ही दोन चित्रे घेऊन जायची आहेत. यावरच ते चांगल्या प्रकारे समजू शकतील. हळूहळू हि चित्रे कपड्यावर देखील बनवावीत असे बाबांना वाटते, ती सुद्धा बनतील. तुम्ही समजावून सांगाल की, ‘ही कशी स्थापना होत आहे, तुम्ही देखील हे समजून घ्याल तर तुम्ही तुमच्या धर्मामध्ये उच्च पद प्राप्त कराल. ख्रिश्चन धर्मामध्ये तुम्ही उच्च पद मिळवू इच्छिता तर हे व्यवस्थित समजून घ्या’. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
या ड्रामाला यथार्थपणे समजून घेऊन आपली अवस्था अचल, अडोल, स्थेरियम (स्थिर) बनवायची आहे. कधीही गोंधळून जायचे नाही, सदैव हर्षित रहायचे आहे.

वरदान:-
विचार करून प्रत्येक कर्म करणारे पश्चातापा पासून मुक्त ज्ञानी तू आत्मा भव दुनियेमध्ये देखील म्हणतात

आधी विचार करा नंतर कृती करा. जे विचारपूर्वक करत नाहीत, आधी करून नंतर विचार करतात तर ते पश्चातापाचे रूप बनते. नंतर विचार करणे, हे पश्चातापाचे रूप आहे आणि आधीच विचार करणे - हा ज्ञानी तू आत्म्याचा गुण आहे. द्वापर-कलियुगामध्ये तर अनेक प्रकारचे पश्चातापच करत राहिले आहात परंतु आता संगमावर असे विचारपूर्वक संकल्प किंवा कर्म करा जेणेकरून कधी मनामध्ये सुद्धा, एक सेकंद देखील पश्चाताप होऊ नये, तेव्हाच म्हणणार ज्ञानी तू आत्मा.

बोधवाक्य:-
दयाळू बनून सर्व गुण आणि शक्तींचे दान देणारेच मास्टर दाता आहेत.