16-07-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड मुलांनो, हे
पुरुषोत्तम बनण्याचे संगमयुग आहे, या काळामध्ये कोणतेही पाप कर्म करायचे नाही”
प्रश्न:-
संगमावर तुम्ही
मुले असे कोणते सर्वात मोठे पुण्य करता?
उत्तर:-
स्वतःला
बाबांच्या हवाली करणे अर्थात संपूर्ण स्वाहा होणे, हे आहे सर्वात मोठे पुण्य. आता
तुम्ही आसक्ती नष्ट करत आहात. तुम्ही मुले-बाळे, घरदार सर्वांना विसरता, हेच तुमचे
व्रत आहे. ‘आप मुये मर गई दुनिया’ (मी मेलो की माझ्यासाठी जग संपले). आता तुम्ही
विकारी नात्यांपासून मुक्त होत आहात.
गीत:-
जले न क्यों
परवाना...
ओम शांती।
ही सर्व
भक्तिमार्गामध्ये बाबांची महिमा करतात. ही आहे परवान्यांची शमे प्रति महिमा (आत्मिक
मुलांची बाबां प्रति महिमा). जर का बाबा आलेले आहेत तर का नाही जिवंतपणीच त्यांचे
बनावे? जिवंतपणी त्यांनाच म्हटले जाते, ज्यांना ॲडॉप्ट केले जाते (दत्तक जातात).
अगोदर तुम्ही आसुरी परिवाराचे होता, आता तुम्ही ईश्वरीय परिवाराचे बनला आहात.
जिवंतपणीच ईश्वराने येऊन तुम्हाला ॲडॉप्ट केले आहे, ज्याला मग शरणागती म्हटले जाते.
गातात ना - ‘शरण पड़ी मैं तेरे…’ आता प्रभूची शरण (आश्रय) तेव्हाच घेतील, जेव्हा ते
येतील, आपली ताकद दाखवतील, जलवा दाखवतील. तेच सर्वशक्तिमान आहेत ना. खरोखर
त्यांच्यामध्ये कशिश (आकर्षित करण्याची शक्ती) देखील आहे ना. सर्व गोष्टींमधून
सोडवतात. खरोखर, जे बाबांचे मुलगे आणि मुली बनतात, ते आसुरी संप्रदायाच्या
नात्यांपासून उद्विग्न होतात. म्हणतात - ‘बाबा, ही नाती कधी सुटतील’? इथे ही जुनी
नाती विसरावी लागतात. आत्मा जेव्हा देहा पासून वेगळी होते तेव्हा सर्व नाती
संपुष्टात येतात. यावेळी तुम्ही जाणता मृत्यू सर्वांची वाट पाहत आहे आणि ही जी बंधने
आहेत ती सर्व विकारी आहेत. आता मुलांना निर्विकारी नाते हवे आहे. निर्विकारी
नात्यामध्ये होतो, मग विकारी नात्यामध्ये गेले, आता पुन्हा आमचे निर्विकारी नाते
असेल. या गोष्टी इतर कोणाच्याच बुद्धीमध्ये नसतात. मुले जाणतात - आपण आसुरी
बंधनातून मुक्त होण्याचा पुरुषार्थ करत आहोत. एका बाबांशी योग ठेवला जातो. त्या
बाजूला आहे एक रावण, या बाजूला आहे एक राम. या गोष्टी दुनिया जाणत नाही. म्हणतात
देखील रामराज्य पाहिजे, परंतु सारी दुनिया रावण राज्यामध्ये आहे, हे कोणालाच समजत
नाही. राम राज्यामध्ये तर पवित्रता, सुख-शांती होती. ती आता नाहीये. परंतु जे
म्हणतात, त्याचा त्यांना अनुभव येत नाही. गायले देखील जाते की, हे सर्व आत्मे सीता
आहेत. काही एकाच सीतेची गोष्ट नाहीये. ना एका अर्जुनाची, ना एका द्रौपदीची गोष्ट आहे.
ही तर सर्वांचीच गोष्ट आहे. दृष्टांत एकाचा देतात. तुम्हाला देखील म्हटले जाते,
तुम्ही सर्व अर्जुना समान आहात. तुम्ही म्हणाल, अर्जुन तर हा भागीरथ (ब्रह्मा बाबा)
झाला. बाबा सांगतात - मी सामान्य वृद्ध तनाचा हा रथ घेतो. त्यांनी (दुनियावाल्यांनी)
मग चित्रांमध्ये घोडा-गाडी दाखवली आहे, याला अज्ञान म्हटले जाते. मुले समजतात ही
शास्त्रे इत्यादी जी काही आहेत ती सर्व भक्तिमार्गाची आहेत. जोपर्यंत ७ दिवसांचा
कोर्स करत नाही तोपर्यंत या गोष्टी कोणीही समजू शकणार नाही. भक्ती वेगळी आहे. ज्ञान,
भक्ती आणि वैराग्य म्हणतात. वास्तविक संन्याशांचे वैराग्य काही खरे वैराग्य नाहीये,
ते तर जंगलामध्ये जाऊन मग परत शहरांमध्ये येऊन निवास करून, मोठ-मोठे बंगले इत्यादी
बांधतात. केवळ म्हणतात की, आम्ही घरदार सोडले आहे. तुमचे आहे साऱ्या जुन्या दुनिये
पासून वैराग्य. यथार्थ गोष्ट ही आहे, ती आहे हदची गोष्ट म्हणून त्यांना हठयोग, हदचे
वैराग्य म्हटले जाते.
तुम्ही मुले जाणता की
ही जुनी दुनिया आता नष्ट होणार आहे, त्यामुळे जरूर तिच्या पासून वैराग्य आले पाहिजे.
बुद्धी देखील म्हणते, नवीन घर बांधले जात आहे त्यामुळे जुने तोडले जात आहे. तुम्ही
जाणता आता तयारी सुरु आहे. कलियुगानंतर मग सतयुग जरूर येईल. आता हे आहे पुरुषोत्तम
संगमयुग. पुरुषोत्तम मास देखील असतो. तुमचे आहे पुरुषोत्तम युग. पुरुषोत्तम
महिन्यामध्ये दान-पुण्य इत्यादी करतात. तुम्ही या पुरुषोत्तम युगामध्ये सर्वस्व
स्वाहा करता. तुम्ही जाणता - ही सारी दुनियाच स्वाहा होणार आहे. तर साऱ्या दुनियेचे
सर्वस्व स्वाहा होण्यापूर्वी आपण स्वतःला का नाही स्वाहा करावे? याचे तुम्हाला
कितीतरी पुण्य मिळेल. तो आहे हदचा पुरुषोत्तम महिना, ही तर बेहदची गोष्ट आहे.
पुरुषोत्तम महिन्यामध्ये खूप कथा ऐकतात, व्रत-वैकल्ये करतात. तुमचे तर खूप जबरदस्त
व्रत आहे. तुमची भले मुले-बाळे, घरदार इत्यादी सर्व आहे, परंतु मनातून आसक्ती नाहीशी
झाली आहे. ‘आप मुये मर गई दुनिया’. तुम्ही जाणता - हे सर्व नष्ट होतील. आपण बाबांचे
बनलो आहोत - पुरुषोत्तम बनण्याकरिता. सर्व पुरुषांमध्ये अर्थात मनुष्यांमध्ये उत्तम
पुरुष हे लक्ष्मी-नारायण समोर उभे आहेत. यांच्यापेक्षा उत्तम कोणताही मनुष्य असू
शकत नाही. लक्ष्मी-नारायण विश्वाचे मालक होते. तुम्ही आला आहात - असे पुरुषोत्तम
बनण्याकरिता. सर्व मनुष्य मात्र सद्गतीला प्राप्त होतात. मनुष्यांची आत्मा
पुरुषोत्तम बनते तर मग त्यांचे राहण्याचे स्थान देखील असेच उत्तम असले पाहिजे. जसे
प्रेसिडेंट सर्वात उच्च पदावर आहेत तर त्यांना राहण्यासाठी राष्ट्रपती भवन मिळाले
आहे. किती मोठा राजवाडा, बगीचा इत्यादी आहे. ही झाली इथली गोष्ट. राम राज्याला तर
तुम्ही जाणता. तुम्ही सतयुगी पुरुषोत्तम बनता, नंतर मग हे कलियुगी पुरुषोत्तम
राहणार नाहीत. तुम्ही सतयुगी पुरुषोत्तम बनण्यासाठी पुरुषार्थ करत आहात. तुम्ही
जाणता आपले महाल कसे असतील. उद्या रामराज्य असेल. तुम्ही राम राज्यामध्ये
पुरुषोत्तम असाल. तुम्ही चॅलेंज करता की, आम्ही रावण राज्याला परिवर्तित करून राम
राज्य स्थापन करणार. आता चॅलेंज केले आहे तर भविष्यातील २१ जन्मांसाठी एकमेकांना
पुरुषोत्तम बनवायचे आहे. देवतांची महिमा गातात - ‘सर्वगुण संपन्न... अहिंसा परमो
देवी-देवता धर्म’. तुम्हीच जाणता इतर कोणीही मनुष्य जाणत नाहीत. तुम्ही दुसऱ्या
जन्मामध्ये पुरुषोत्तम बनाल, मग या रावण राज्यातील कोणीच राहणार नाही. आता तुम्हाला
संपूर्ण ज्ञान आहे. आता रावण राज्यच नष्ट होणार आहे.
आजकाल तर वेळेचा
सुद्धा काही भरोसा नाही, अकाली मृत्यू होतो किंवा कोणाशी दुश्मनी झाली तर उडवूनच
टाकतात (ठार मारून टाकतात). तुम्हाला काही कोणी उडवू शकत नाही. तुम्ही अविनाशी
पुरुषोत्तम आहात, हे (दुनियावाले) आहेत विनाशी, तेही रावण राज्यामध्ये. यांना
तुमच्या दैवी-राज्याविषयी माहीतच नाहीये. तुम्ही जाणता - आपण श्रीमतावर आपले
दैवी-स्वराज्य स्थापन करत आहोत. ज्यांची पूजा होते ते जरूर चांगले कर्तव्य करून गेले
आहेत. हे तुम्ही जाणता, बघा जगदंबेची किती पूजा होते. आता ही आहे ज्ञान-ज्ञानेश्वरी.
तुम्ही जगत-अंबेच्या मुली आहात ज्ञान-ज्ञानेश्वरी आणि राज-राजेश्वरी. दोघींमध्ये
उत्तम कोण? ज्ञान-ज्ञानेश्वरीकडे जाऊन अनेक प्रकारच्या मनोकामना ऐकवतात. अनेक गोष्टी
मागतात. जगदंबेचे मंदिर आणि लक्ष्मी-नारायणाचे मंदिर यामध्ये खूप फरक आहे. जगदंबेचे
मंदिर खूप छोटे असते. छोट्या जागेमध्ये गर्दी मनुष्यांना आवडते. श्रीनाथच्या
मंदिरामध्ये देखील खूप गर्दी असते, गर्दी हटविण्यासाठी कपड्याचा फटका मारत राहतात.
कलकत्त्यामध्ये कालीचे मंदिर किती छोटे आहे, आतमध्ये खूप तेल आणि पाणी असते. आत खूप
काळजी पूर्वक जावे लागते. खूप गर्दी असते. लक्ष्मी-नारायणाचे मंदिर तर खूप मोठे असते.
जगदंबेचे छोटे का? गरीब आहे ना. तर मंदिर देखील गरीबी असलेले आहे. ते (लक्ष्मी-नारायण)
श्रीमंत आहेत, तर मंदिरामध्ये कधी जत्रा भरत नाही. जगदंबेच्या मंदिरामध्ये खूप जत्रा
भरतात. बाहेरून खूप लोक येतात. महालक्ष्मीचे मंदिर देखील आहे, हे देखील तुम्ही जाणता,
या चित्रामध्ये लक्ष्मी देखील आहे तर नारायण देखील आहेत. त्यांच्याकडे फक्त धन
मागतात कारण ती श्रीमंत बनली आहे ना. इथे तर आहेत अविनाशी ज्ञान रत्न. धनासाठी
लक्ष्मीकडे जातात, बाकी अनेक इच्छा-आकांक्षा घेऊन जगदंबेकडे जातात. तुम्ही जगत
अंबेची मुले आहात. सर्वांच्या मनोकामना २१ जन्मांसाठी तुम्ही पूर्ण करता. एकाच
महामंत्राने सर्व मनोकामना २१ जन्मांसाठी पूर्ण होत आहेत. बाकीचे जो काही मंत्र
इत्यादी देतात, त्यामध्ये काहीच अर्थ नाहीये. बाबा समजावून सांगत आहेत, हा मंत्र मी
देखील तुम्हाला का देत आहे, कारण तुम्ही पतित आहात ना. ‘मामेकम् (मज एकाची) आठवण
कराल तेव्हाच पावन बनाल’ - हे बाबांशिवाय, आत्म्यांना इतर कोणीही सांगू शकत नाही.
यावरून सिद्ध होते की, हा सहज राजयोग एक बाबाच शिकवतात. मंत्र देखील तेच देतात. ५
हजार वर्षांपूर्वी देखील मंत्र दिला होता. ही स्मृती आली आहे. आता तुम्ही सन्मुख
बसला आहात. क्राइस्ट होऊन गेले, मग त्यांचे बायबल वाचत राहतात. ते काय करून गेले?
धर्माची स्थापना करून गेले. तुम्ही जाणता - शिवबाबा काय करून गेले, श्रीकृष्ण काय
करून गेले! श्रीकृष्ण तर सतयुगाचा प्रिन्स होता, तोच मग नारायण बनला, आणि मग
पुनर्जन्म घेत आले आहेत. शिवबाबा देखील काहीतरी करून गेले आहेत, तेव्हाच तर त्यांची
इतकी पूजा इत्यादी होते. आता तुम्ही जाणता, ते राजयोग शिकवून गेले आहेत, भारताला
स्वर्ग बनवून गेले आहेत, ज्या स्वर्गाचा पहिल्या नंबरचा मालक स्वतः बनले नाहीत, तो
तर श्रीकृष्ण बनला. जरूर श्रीकृष्णाच्या आत्म्याला शिकवले, तुम्हाला समजले आहे.
तुम्ही श्रीकृष्णाची वंशावळ बसला आहात. राजा-राणीला मात-पिता, अन्न दाता म्हणतात.
राजस्थानमध्ये देखील राजाला अन्न-दाता म्हटले जाते. राजांचा किती मान असतो. पूर्वी
सर्व तक्रारी राजाकडे येत असत, दरबार भरत असे. कोणी चूक करत होते तर खूप पश्चात्ताप
करत होते. आजकाल तर जेल-बर्ड्स खूप आहेत. वारंवार जेलमध्ये जातात. आता तुम्हा
मुलांना गर्भ-जेलमध्ये जायचे नाहीये. तुम्हाला तर गर्भ-महालामध्ये यायचे आहे,
म्हणून बाबांची आठवण करा तर विकर्म विनाश होतील, म्हणजे मग तुम्ही कधी गर्भ-जेलमध्ये
जाणार नाही. तिथे (सतयुगामध्ये) पाप असत नाही. सर्व गर्भ-महालामध्ये राहतात, फक्त
कमी पुरुषार्थ केल्यामुळे कमी दर्जाचे पद प्राप्त करतात. उच्च पद असणाऱ्यांना सुख
देखील भरपूर असते. इथे तर फक्त ५ वर्षांसाठी गव्हर्नर, प्रेसिडेंट नियुक्त करतात.
तुम्ही समजावून सांगू शकता की, भारतच दैवी राजस्थान बनला होता. आता तर ना राजस्थान
आहे आणि ना राजा-राणी आहेत. पूर्वी जर कोणी गव्हर्मेंटला पैसे देत असत तर त्यांना
महाराजा-महाराणीचे टायटल मिळत असे. इथे तर तुमचे आहे शिक्षण. राजा-राणी कधी
शिक्षणाने बनत नाहीत. तुमचे एम-ऑब्जेक्ट आहे, या शिक्षणाने तुम्ही विश्वाचे
महाराजा-महाराणी बनता. राजा-राणी सुद्धा नाही. ‘राजा-राणी’चे टायटल त्रेता पासून
सुरू होते.
तुम्ही आता
ज्ञान-ज्ञानेश्वरी बनता, मग राज-राजेश्वरी बनाल. कोण बनवतील? ईश्वर. ते कसे? राजयोग
आणि ज्ञानाद्वारे. राजाईसाठी बाबांची आठवण करायची आहे. बाबा तुम्हाला स्वर्गाचा
मालक बनवत आहेत, हे तर खूप सोपे आहे ना. हेवन स्थापन करणारे आहेतच गॉड फादर.
हेवनमध्ये काही हेवनची स्थापना करणार नाहीत. जरूर त्यांना संगमावरच पद मिळते,
म्हणूनच याला सुंदर, कल्याणकारी संगमयुग म्हटले जाते. बाबा, मुलांचे किती कल्याण
करतात, जे स्वर्गाचे मालक बनवतात. म्हणतात देखील परमपिता परमात्मा नवीन दुनिया
रचतात, परंतु त्यामध्ये कोण राज्य करतात, हे कोणालाही माहीत नाही. तुम्ही समजता -
रामराज्य कशाला म्हटले जाते. त्यांनी तर राम राज्याला लाखो वर्षे दिली आहेत.
कलियुगाला ४० हजार वर्षे दिली आहेत. बाबा म्हणतात - मी येतोच मुळी संगमावर. येऊन
ब्रह्मा द्वारे विष्णुपुरीची स्थापना करतो. सत्य नारायणाची कथा देखील हीच आहे.
सतयुगामध्ये तुम्ही लक्ष्मी-नारायण, सर्वगुण संपन्न... बनता. नंतर मग कला कमी होत
जातात. नवीन झाड तेव्हाच म्हटले जाते जेव्हा स्थापना होते. नवीन घर बांधले जाते
तेव्हा त्याला नवीन म्हटले जाईल. तुम्ही देखील सतयुगामध्ये याल तेव्हा नवीन राजधानी
असेल, नंतर मग कला कमी होत जातात. स्थापना इथे होते. या वंडरफुल गोष्टी कोणाच्याही
बुद्धीमध्ये नाहीत. तर बाबांनी समजावून सांगितले आहे की, सर्व आत्म्यांसाठी हे युग,
पुरुषोत्तम बनण्याचे युग आहे. जीवनमुक्तीला पुरुषोत्तम म्हटले जाते. जीवनबंधला
पुरुषोत्तम म्हणता येणार नाही. यावेळी सर्व जीवनबंध मध्ये आहेत. बाबा येऊन सर्वांना
जीवनमुक्त बनवतात. तुम्ही अर्धा कल्प जीवनमुक्त असाल, नंतर मग जीवनबंध. हे तुम्हीच
समजता. तुमचे व्रत-नियम काय आहेत? बाबांनी येऊन तुम्हाला व्रत घ्यायला लावले आहे,
खाण्या-पिण्याची गोष्ट नाहीये. सर्व काही करा, फक्त एका बाबांची आठवण करा आणि
पवित्र बना. पुरुषोत्तम महिन्यामध्ये जास्त करून पवित्र देखील राहत असतील. वास्तविक
या पुरुषोत्तम युगाचा मान आहे, तर तुम्हाला किती आनंद, किती नशा असला पाहिजे. आता
तुमच्या कडून कोणतेही पाप कर्म होता कामा नये कारण तुम्ही पुरुषोत्तम बनत आहात.
अच्छा.
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) या
पुरुषोत्तम युगामध्ये जीवनमुक्त बनण्यासाठी पुण्यकर्म करायची आहेत. पवित्र जरूर
राहायचे आहे. घरदार इत्यादी सर्व काही असतानाही मनातून आसक्ती काढून टाकायची आहे.
२) श्रीमतावर आपल्या
तन-मन-धना द्वारे दैवी राज्य स्थापन करायचे आहे. पुरुषोत्तम बनविण्याची सेवा करायची
आहे.
वरदान:-
सहयोगा द्वारे
स्वतःला सहजयोगी बनविणारे निरंतर योगी भव
संगमयुगावर बाबांचे
सहयोगी बनणे - हीच सहजयोगी बनण्याची विधी आहे. ज्यांचा प्रत्येक संकल्प, शब्द आणि
कर्म बाबांच्या किंवा आपल्या राज्याच्या स्थापनेच्या कर्तव्यामध्ये सहयोगी असणारा
आहे, त्याला ज्ञानी तू आत्मा, योगी तू आत्मा, निरंतर सच्चा सेवाधारी म्हटले जाते.
मनाने नाही तर तनाने, तनाने नाही तर धनाने, धनाने सुद्धा नसेल तर ज्यामध्ये सहयोगी
बनू शकता त्यामध्ये सहयोगी बना, तर हा देखील योग आहे. जेव्हा आहातच बाबांचे, तर बाबा
आणि तुम्ही, तिसरा कोणीही नसावा - याद्वारे निरंतर योगी बनाल.
बोधवाक्य:-
संगमावर सहन
करणे अर्थात मरणे हेच स्वर्गाचे राज्य घेणे आहे.
हे अव्यक्त इशारे -
ज्वालास्वरूप स्थितीमध्ये राहून शक्तिशाली आठवणीचा अनुभव करा.
समयानुसार राहिलेले
जे काही मनाचे, संबंध-संपर्काचे हिशोब आहेत, त्यांना ज्वाला स्वरूप आठवणीमध्ये भस्म
करा. लगन (अतीव प्रेम) आहे, यामध्ये बापदादा देखील पास करतात, परंतु आता त्या
प्रेमाला अग्निचे रूप द्या. विश्वामध्ये चोहो बाजूंना भ्रष्टाचार, अत्याचाराची जी
आग पेटत आहे, ती तुम्हा मुलांच्या योग अग्नीद्वारे, ज्वाला रूप आठवणीद्वारे विझेल.