16-09-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - हा वंडरफुल सत्संग आहे जिथे तुम्हाला जिवंतपणी मरायला शिकवले जाते, जिवंतपणी मरणारेच हंस बनतात”

प्रश्न:-
तुम्हा मुलांना आता कोणती एक चिंता आहे?

उत्तर:-
आपल्याला विनाशापूर्वी संपन्न बनायचे आहे. जी मुले ज्ञान आणि योगामध्ये मजबूत होत जातात, त्यांना मनुष्याला देवता बनविण्याची सवय पडत जाते. ते सेवा केल्या शिवाय राहू शकत नाहीत. जिन्न प्रमाणे पळत राहतील. सेवे सोबतच स्वतःला देखील संपन्न बनविण्याची चिंता लागलेली असेल.

ओम शांती।
रुहानी बाबा बसून रुहानी मुलांना समजावून सांगत आहेत - आता आत्मा साकारमध्ये आहे आणि मग प्रजापिता ब्रह्माची संतान आहे कारण ॲडाप्ट केले आहे (दत्तक घेतले आहे). तुमच्यासाठी सर्वजण म्हणतात, हे बहिण-भाऊ बनवतात. मुलांना बाबांनी समजावून सांगितले आहे - ‘खरे तर तुम्ही आत्मे भाऊ-भाऊ आहात’. आता नवीन सृष्टी बनते तर सर्वप्रथम ब्राह्मण शिखा पाहिजेत. तुम्ही शूद्र होता, आता ट्रान्सफर झाले आहात. ब्राह्मण देखील जरूर पाहिजेत. प्रजापिता ब्रह्माचे नाव तर प्रसिद्ध आहे. या दृष्टीने तुम्ही समजता की आपण सर्व मुले भाऊ-बहिणी झालो. जे पण स्वतःला ब्रह्माकुमार-कुमारी म्हणतात ते जरूर भाऊ-बहिणी झाले. सर्व प्रजापिता ब्रह्माची संतान आहेत तर जरूर भाऊ-बहिणी असले पाहिजेत. हे समजावून सांगायचे आहे - अडाणी असलेल्यांना. अडाणी देखील आहेत आणि मग अंधश्रद्धा सुद्धा आहे. ज्यांची पूजा करतात, विश्वास ठेवतात हा अमका आहे, परंतु त्याला अजिबात जाणत नाहीत. लक्ष्मी-नारायणाची पूजा करतात परंतु ते कधी आले, कसे बनले, मग कुठे गेले? कोणीही जाणत नाहीत. कोणीही मनुष्य नेहरू इत्यादींना जाणतात, तर त्यांच्या हिस्ट्री-जॉग्राफीची देखील सर्व माहिती आहे. जर बायोग्राफी (जीवन चरित्रच) जाणत नसतील तर ते काय कामाचे. पूजा करतात, परंतु त्यांच्या जीवन कहाणीला जाणत नाहीत. मनुष्यांच्या जीवन कहाणीला तर जाणतात परंतु जे मोठे (पूर्वज देवता) होऊन गेले आहेत, त्यातील एकाचीही जीवन कहाणी जाणत नाहीत. शिवाचे किती पुष्कळ पुजारी आहेत. पूजा करतात, आणि मग तोंडाने बोलतात - ‘तो तर दगडा-धोंड्यात आहे, कणा-कणामध्ये आहे’. ही जीवन कहाणी झाली काय? ही काही शहाणपणाची गोष्ट नाही. स्वतःला देखील पतित म्हणतात. ‘पतित’ शब्द किती समर्पक आहे. पतित अर्थात विकारी. तुम्ही समजावून सांगू शकता की आम्हाला ब्रह्माकुमारी म्हणून का संबोधले जाते? कारण ब्रह्माची संतान आहोत आणि ॲडॉप्टेड आहोत. आपण कुख-वंशावळी नाही, मुख-वंशावळी आहोत. ब्राह्मण-ब्राह्मणी आहोत तर भाऊ-बहिणी झालो ना. तर त्यांची आपसामध्ये विकारी दृष्टी होऊ शकत नाही. खराब विचार मुख्य आहेतच काम विकाराचे. तुम्ही म्हणता - ‘हो, आम्ही प्रजापिता ब्रह्माची संतान भाऊ-बहिणी बनतो’. तुम्ही समजता आपण सर्व शिवबाबांची संतान भाऊ-भाऊ आहोत. हे देखील पक्के आहे. दुनियेला काहीच माहित नाही. असेच फक्त म्हणतात. तुम्ही समजावून सांगू शकता की, ‘सर्व आत्म्यांचा पिता तो एकच आहे’. त्यांना सर्वजण बोलावतात. तुम्ही चित्र सुद्धा दाखवले आहे. मोठ-मोठे धर्मवाले देखील या निराकार पित्याला मानतात. ते आहेत निराकार आत्म्यांचे पिता आणि मग साकारमध्ये सर्वांचे पिता प्रजापिता ब्रह्मा आहेत ज्यांच्या द्वारे मग वृद्धी होत राहते, झाड वाढत जाते. विभिन्न धर्मांमध्ये येत जातात. आत्मा तर या शरीरा पासून वेगळी आहे. शरीराला पाहून म्हणतात - हा अमेरिकन आहे, हा अमका आहे. आत्म्याला तर म्हणत नाहीत. सर्व आत्मे शांतीधाममध्ये राहतात. तिथून इथे पार्ट बजावण्यासाठी येतात. तुम्ही कोणत्याही धर्माच्या व्यक्तीला ऐकवा, पुनर्जन्म तर सर्वच घेतात आणि वरून देखील नवीन आत्मे येत राहतात. तर बाबा समजावून सांगतात - तुम्ही सुद्धा मनुष्य आहात, मनुष्यालाच तर सृष्टीच्या आदि-मध्य-अंता विषयी माहित असायला हवे की हे सृष्टी चक्र कसे फिरते, याचा रचयिता कोण आहे, हे चक्र फिरण्यासाठी किती वेळ लागतो? हे तुम्हीच जाणता, देवता तर जाणत नाहीत. मनुष्यच जाणून मग देवता बनतात. मनुष्याला बनविणारे आहेत बाबा. बाबा आपला आणि रचनेचा देखील परिचय करून देतात. तुम्ही जाणता - आपण बीजरूप पित्याची बीजरूप मुले आहोत. ज्याप्रमाणे बाबा या उलट्या वृक्षाला जाणतात, तसे आपण देखील जाणले आहे. हे मनुष्य मनुष्याला कधीच समजावून सांगू शकणार नाही. परंतु तुम्हाला बाबांनी समजावून सांगितले आहे.

जोपर्यंत तुम्ही ब्रह्माची मुले बनत नाही तोपर्यंत इथे येऊ शकत नाही. जोपर्यंत पूर्ण कोर्स करून समजून घेत नाही तोपर्यंत तुम्ही ब्राह्मणांच्या सभेमध्ये बसू कसे शकता. याला इंद्रसभा देखील म्हणतात. इंद्र काही तो पाण्याचा पाऊस पाडत नाहीत. ‘इंद्रसभा’ म्हटले जाते. परी देखील तुम्हाला बनायचे आहे. अनेक प्रकारच्या पऱ्या गायल्या गेल्या आहेत. काही मुले सुंदर देखणी असतात तर म्हणतात ना - ही तर जशी परी आहे. पावडर इत्यादी लावून सुंदर बनतात. सतयुगामध्ये तुम्ही पऱ्या आणि परीजादे बनता. आता तुम्ही ज्ञान सागरामध्ये ज्ञान स्नान केल्याने पऱ्या (देवी-देवता) बनता. तुम्ही जाणता आपण कोणापासून कोण बनत आहोत. जे सदा पावन बाबा आहेत, सदैव सुंदर आहेत, ते प्रवासी तुम्हाला असे बनविण्यासाठी सावळ्या तनामध्ये (पतित शरीरामध्ये) प्रवेश करतात. आता गोरे (पावन) कोण बनवणार? बाबांनाच बनवावे लागेल ना. सृष्टीचे चक्र तर फिरणारच आहे. आता तुम्हाला गोरे बनायचे आहे. शिकविणारे ज्ञान सागर एक बाबाच आहेत. ज्ञानाचा सागर, प्रेमाचा सागर आहेत. त्या पित्याची जी महिमा गायली जाते, ती लौकिक पित्याची थोडीच होऊ शकते. बेहदच्या पित्याचीच महिमा आहे. त्यांनाच सर्वजण बोलावतात की, येऊन आम्हाला असे महिमावाले बनवा. आता तुम्ही बनत आहात ना, नंबरवार पुरुषार्था नुसार. शिक्षणामध्ये सगळेच काही एकसारखे नसतात. रात्रं-दिवसाचा फरक असतो ना. तुमच्याकडे देखील भरपूर येतील. ब्राह्मण जरूर बनायचे आहे. मग कोणी चांगल्या प्रकारे शिकतात, कोणी कमी. जे अभ्यासामध्ये सर्वात चांगले असतील ते इतरांना देखील शिकवू शकतील. तुम्ही समजू शकता, इतकी कॉलेजेस् उघडत राहतात. बाबा देखील म्हणतात - ‘असे कॉलेज बनवा जेणेकरून कोणीही समजू शकेल की, या कॉलेजमध्ये रचता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताचे नॉलेज मिळते’. बाबा भारतामध्येच येतात तर भारतामध्येच कॉलेज उघडत राहतात. पुढे चालून विदेशामध्ये देखील उघडत जातील. भरपूर कॉलेजेस् युनिव्हर्सिटी पाहिजेत ना. जिथे पुष्कळजण येऊन शिकतील; आणि जेव्हा शिक्षण पूर्ण होईल तेव्हा देवी-देवता धर्मामध्ये सर्व ट्रान्सफर होतील अर्थात मनुष्या पासून देवता बनतील. तुम्ही मनुष्या पासून देवता बनता ना. गायन देखील आहे - ‘मनुष्य से देवता किये…’. इथे ही आहे मनुष्यांची दुनिया, ती आहे देवतांची दुनिया. देवता आणि मनुष्यांमध्ये रात्रं-दिवसाचा फरक आहे! दिवसामध्ये आहेत देवता, रात्रीमध्ये आहेत मनुष्य. सर्व भक्तच भक्त आहेत, पुजारी आहेत. आता तुम्ही पुजारी पासून पूज्य बनता. सतयुगामध्ये शास्त्र, भक्ती इत्यादीचे नाव सुद्धा असत नाही. तिथे आहेत सर्व देवता. मनुष्य आहेत भक्त. मनुष्यच मग देवता बनतात. ती आहे दैवी दुनिया, याला म्हटले जाते आसुरी दुनिया. राम राज्य आणि रावण राज्य. अगोदर तुमच्या बुद्धीमध्ये हे थोडेच होते की रावण राज्य कशाला म्हटले जाते? रावण कधी आला. काहीच माहित नव्हते. म्हणतात - ‘लंका समुद्रामध्ये बुडाली’. असेच मग द्वारकेसाठी देखील म्हणतात. आता तुम्ही जाणता ही संपूर्ण लंका बुडणार आहे, संपूर्ण दुनिया सुद्धा बेहदची लंका आहे. हे सर्व बुडून जाईल, पाणी येईल. बाकी स्वर्ग काही बुडतो थोडाच. किती अथाह धन होते. बाबांनी समजावून सांगितले आहे - मुसलमानांनी एका सोमनाथाच्याच मंदिराला किती लुटले. आता पहा काहीच राहिलेले नाहीये. भारतामध्ये किती अथाह धन होते. भारतालाच स्वर्ग म्हटले जाते. आता याला स्वर्ग म्हणता येईल का? आता तर नरक आहे, नंतर स्वर्ग बनेल. स्वर्ग कोण बनवतो आणि नरक कोण बनवतो? हे आता तुम्ही जाणले आहे. रावण राज्य किती वेळ चालते, ते देखील सांगितले आहे. रावण राज्यामध्ये किती अथाह धर्म होतात. राम राज्यामध्ये तर केवळ सूर्यवंशी-चंद्रवंशी राहतात. आता तुम्ही शिकत आहात. हे शिक्षण इतर कोणाच्याही बुद्धीमध्ये नाही आहे. ते तर आहेतच रावण राज्यामध्ये. राम राज्य असते सतयुगामध्ये. बाबा म्हणतात - ‘मी तुम्हाला लायक बनवतो आणि मग तुम्ही ना-लायक बनता’. ना-लायक का म्हणतात? कारण पतित बनता. देवतांच्या लायकीची महिमा आणि स्वतःच्या ना-लायकपणाची महिमा गातात.

बाबा समजावून सांगत आहेत - ‘तुम्ही जेव्हा पूज्य होता तेव्हा नवीन दुनिया होती. फार थोडे मनुष्य होते. साऱ्या विश्वाचे मालक तुम्हीच होता’. आता तुम्हाला खूप आनंद झाला पाहिजे. भाऊ-बहिणी तर बनता ना. ते (दुनियावाले) म्हणतात हे तर घरामध्ये अशांती निर्माण करतात. तेच मग येऊन जेव्हा ज्ञान घेतात तर इथे आल्यावर समजतात की ज्ञान तर खूप चांगले आहे. अर्थ समजतो ना. भाऊ-बहिणी बनल्याशिवाय पवित्रता कोठून येईल. सर्व काही पवित्रतेवर अवलंबून आहे. बाबा येतात मगध देशामध्ये, जो की खूप अधोगती झालेला देश आहे, खूप पतित आहे, खाणे-पिणे देखील घाणेरडे आहे. बाबा म्हणतात - ‘मी अनेक जन्मांच्या अंतिम शरीरामध्येच प्रवेश करतो. हेच (ब्रह्मा बाबाच) ८४ जन्म घेतात. लास्ट सो मग फर्स्ट, फर्स्ट सो लास्ट. उदाहरण तर एकाचेच सांगतील ना. तुमची डिनायस्टी (घराणे) बनणार आहे. जितके चांगल्या रीतीने समजत जाल, तितके मग तुमच्याकडे भरपूरजण येतील. आता हे खूप छोटे झाड आहे. वादळे देखील खूप लागतात. सतयुगामध्ये वादळांची (संकटांची) गोष्टच नाही. वरून नवीन-नवीन आत्मे येत राहतात. इथे (ज्ञानामध्ये) वादळ येताच कोसळून पडतात (अधोगती होते). तिथे तर मायेचे वादळ असतच नाही. इथे तर बसल्या जागी मृत्युमुखी पडतात आणि तुमचे मग आहे मायेशी युद्ध, तर ती सुद्धा हैराण करते. सतयुगामध्ये असे होणार नाही. इतर कोणत्याही धर्मामध्ये अशी गोष्ट होत नाही. रावण राज्य आणि राम राज्याला इतर कोणीही समजत सुद्धा नाहीत. भले सत्संगामध्ये जातात, तिथे जीवन-मरणाच्या गोष्टी करत नाहीत. इथे तर मुले ॲडाप्ट होतात. म्हणतात - ‘आम्ही शिवबाबांची मुले आहोत, त्यांच्याकडून वारसा घेतो’. वारसा घेता-घेता मग कोसळून पडतात (अधोगती होते) तर वारसा देखील खलास होतो. हंसा पासून बदलून बगळा बनतात. तरी देखील बाबा दयाळू आहेत तर समजावून सांगत राहतात. कोणी मग पुन्हा चढतात. जे टिकून राहतात त्यांना म्हटले जाईल - महावीर, हनुमान. तुम्ही आहात महावीर-महावीरणी. नंबरवार तर आहेतच. मोठ्या पैलवानाला महावीर म्हटले जाते. आदि देवाला सुद्धा महावीर म्हटले जाते, ज्यांच्या द्वारेच हे महावीर जन्माला येतात जे विश्वावर राज्य करतात. नंबरवार पुरुषार्थानुसार रावणावर विजय प्राप्त करण्यासाठी पुरुषार्थ करत राहतात. रावण आहे ५ विकार. ही तर समजून घेण्याची गोष्ट आहे. आता तुमच्या बुद्धीचे कुलूप बाबा उघडतात. नंतर मग कुलूप एकदम बंद होते. इथे देखील असेच आहे, ज्यांचे कुलूप उघडते ते मग जाऊन सेवा करतात. बाबा म्हणतात जाऊन सेवा करा, जे गटारामध्ये (विकारामध्ये) पडले आहेत त्यांना बाहेर काढा. असे नाही की तुम्हीसुद्धा गटारामध्ये पडाल. तुम्ही बाहेर निघून इतरांना देखील काढा. विषय वैतरणी नदीमध्ये अपार दुःख आहे. आता अपार सुखामध्ये जायचे आहे. जे अपार सुख देतात, त्यांची महिमा गायली जाते. रावण जो दुःख देतो त्याची महिमा असेल काय? रावणाला म्हटले जाते असुर. बाबा म्हणतात तुम्ही रावण राज्यामध्ये होता, आता अपार सुख प्राप्त करण्यासाठी तुम्ही इथे आले आहात. तुम्हाला किती अपार सुख मिळते. किती आनंदात राहिले पाहिजे आणि सावध देखील राहिले पाहिजे. पोझिशन तर नंबरवार असते. प्रत्येक ॲक्टरची पोझिशन वेगळी आहे. सर्वांमध्ये काही ईश्वर असू शकत नाही. बाबा बसून प्रत्येक गोष्ट समजावून सांगतात. तुम्ही बाबांना आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताला जाणता नंबरवार पुरुषार्थानुसार. अभ्यासानुसारच क्रमवारीने मार्क असतात. हे आहे बेहदचे शिक्षण, यामध्ये मुलांचे खूप अटेन्शन असले पाहिजे. अभ्यास (मुरली क्लास) तर एकही दिवस चुकवायचा नाही. आपण स्टुडंट आहोत, गॉडफादर आम्हाला शिकवत आहेत हा नशा मुलांना चढलेला असला पाहिजे. भगवानुवाच, फक्त त्यांचे नाव बदलून श्रीकृष्णाचे नाव टाकले आहे. चुकून ‘श्रीकृष्ण भगवानुवाच’ समजले आहेत कारण श्रीकृष्ण झाले नेक्स्ट टू गॉड. बाबा जो स्वर्ग स्थापन करतात त्यामध्ये नंबरवन हे (ब्रह्मा बाबा) आहेत ना. हे ज्ञान आता तुम्हाला मिळाले आहे. नंबरवार पुरुषार्थानुसार आपले देखील कल्याण करतात आणि इतरांचे देखील कल्याण करत राहतात, त्यांना सेवा केल्याशिवाय कधी चैन पडणार नाही.

तुम्ही मुले योग आणि ज्ञानामध्ये मजबूत (पक्के) बनत जाल तेव्हा मग असे कार्य कराल जसे जिन्न. मनुष्याला देवता बनविण्याची सवय लागेल. मृत्यू येण्यापूर्वी पास व्हायचे आहे. भरपूर सेवा करायची आहे. शेवटी तर युद्ध सुरु होईल. नैसर्गिक आपत्ती सुद्धा येतील. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) लास्ट सो फास्ट जाण्यासाठी महावीर बनून पुरुषार्थ करायचा आहे. मायेच्या वादळांना घाबरायचे नाही. बाप समान दयाळू बनून मनुष्यांच्या बुद्धीचे कुलूप उघडण्याची सेवा करायची आहे.

२) ज्ञान सागरामध्ये रोज ज्ञान स्नान करून परीजादा बनायचे आहे. एकही दिवस अभ्यास (मुरली क्लास) चुकवायचा नाही. भगवंताचे आपण स्टुडंट आहोत - या नशेमध्ये रहायचे आहे.

वरदान:-
गंभीरतेच्या गुणाद्वारे फुल मार्क्स घेणारे गंभीरतेचे देवी किंवा देवता भव

वर्तमान वेळी गंभीरतेच्या गुणाची अतिशय आवश्यकता आहे कारण बोलण्याची सवय खूप झाली आहे, जे येते ते बोलता. कोणी एखादे चांगले काम केले आणि बोलले तर अर्धे नष्ट होते. अर्धेच जमा होते आणि जो गंभीर असतो त्याचे पूर्ण मार्क्स जमा होतात म्हणून गंभीरतेची देवी किंवा देवता बना आणि आपले फुल मार्क्स जमा करा. वर्णन केल्याने मार्क्स कमी होतील.

बोधवाक्य:-
बिंदू रुपामध्ये स्थित रहा तर समस्यांना सेकंदामध्ये बिंदू लावू शकाल.