16-12-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - हे पावन बनण्याचे शिक्षण बाकी सर्व शिक्षणापेक्षा सोपे आहे, हे शिक्षण लहान, तरुण, वृद्ध सर्वजण शिकू शकतात, फक्त ८४ जन्मांना जाणून घ्यायचे आहे”

प्रश्न:-
प्रत्येक लहान अथवा मोठ्यांना कोणती एक प्रॅक्टिस नक्कीच केली पाहिजे?

उत्तर:-
प्रत्येकाने मुरली चालविण्याची प्रॅक्टिस जरूर केली पाहिजे कारण तुम्ही मुरलीधराची मुले आहात. जर मुरली चालवत नसाल तर उच्च पद प्राप्त करू शकणार नाही. कोणाला ऐकवत रहाल तर मुख उघडेल (ज्ञान ऐकवण्याचा आत्मविश्वास येईल). तुम्हा प्रत्येकाला बाप समान टीचर जरूर बनायचे आहे. जे शिकता ते शिकवायचे आहे. लहान मुलांना देखील हे शिक्षण शिकण्याचा अधिकार आहे. ते देखील बेहदच्या बाबांचा वारसा घेण्यासाठी पात्र आहेत.

ओम शांती।
आता येत आहे शिवबाबांची जयंती. त्यावर कशा पद्धतीने समजावून सांगितले पाहिजे? बाबांनी तुम्हाला समजावून सांगितले आहे तसे तुम्हाला मग इतरांना समजावून सांगायचे आहे. असे तर नाही, बाबा जसे तुम्हाला शिकवतात तसे बाकी सर्वांना पण बाबांनीच शिकवायचे आहे. शिवबाबांनी तुम्हाला शिकवले आहे, जाणता या शरीराद्वारे शिकवले आहे. बरोबर आम्ही शिवबाबांची जयंती साजरी करतो. आम्ही नाव देखील शिवाचे घेतो, ते तर आहेतच निराकार. त्यांना शिव म्हटले जाते. ते लोक म्हणतात - ‘शिव तर जन्म-मरण रहित आहेत’. त्यांची मग जयंती कशी असेल? हे तर तुम्ही जाणता कसे नंबरवार साजरी करत येतात. साजरी करतच राहतील. तर त्यांना समजावून सांगावे लागेल. बाबा येऊन, या तनाचा आधार घेतात. मुख तर जरूर हवे, म्हणून गोमुखाचीच महिमा आहे. हे रहस्य जरा अवघड आहे. शिवबाबांच्या ऑक्युपेशनला (कार्यप्रणालीला) समजून घ्यायचे आहे. आमचे बेहदचे बाबा आलेले आहेत, त्यांच्याकडूनच आम्हाला बेहदचा वारसा मिळतो. बरोबर भारताला बेहदचा वारसा होता इतर कोणालाच नसतो. भारतालाच सचखंड म्हटले जाते आणि बाबांना देखील ट्रूथ (सत्य) म्हटले जाते. तर या गोष्टी समजावून सांगाव्या लागतात. कोणाला मग इतक्या लगेच समजत नाही आणि काहींना तर लगेच समजते. हा योग आणि शिक्षण दोन्ही बुद्धीतून निसटून जाणाऱ्या गोष्टी आहेत. त्यातही योग जास्त निसटतो. नॉलेज तर बुद्धीमध्ये राहतेच बाकी आठवणच क्षणो-क्षणी विसरतात. नॉलेज तर तुमच्या बुद्धीमध्ये आहेच की, आपण कसे ८४ जन्म घेतो, ज्यांना हे नॉलेज आहे तेच बुद्धीद्वारे समजू शकतात की, जे पहिल्या नंबरमध्ये येतात तेच ८४ जन्म घेतील. पहिले उच्च ते उच्च लक्ष्मी-नारायणाला म्हणणार. नरापासून नारायण बनण्याची कथा देखील प्रसिद्ध आहे. पौर्णिमेच्या दिवशी अनेक ठिकाणी सत्यनारायणाच्या कथेचे पारायण चालते. आता तुम्ही जाणता - आपण खरोखरच बाबांद्वारे नरापासून नारायण बनण्याचे शिक्षण शिकत आहोत. हे आहे पावन बनवण्याचे शिक्षण, आणि आहे देखील इतर सर्व शिक्षणापेक्षा अगदी सोपे. ८४ जन्मांच्या चक्राला जाणून घ्यायचे आहे शिवाय हे शिक्षण मग सर्वांसाठी एकच आहे. वृद्ध, लहान, तरुण जे कोणी असेल सर्वांसाठी एकच शिक्षण आहे. लहान मुलांना देखील अधिकार आहे. जर आई-वडील छोट्यांना थोडे-थोडे शिकवत राहिल्यास, वेळ तर भरपूर आहे. मुलांना देखील हे शिकवले जाते की, शिवबाबांची आठवण करा. आत्मा आणि शरीर दोघांचे पिता वेगवेगळे आहेत. आत्मा संतान निराकारी आहे तर पिता देखील निराकारी आहेत. हे देखील तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे ते निराकार शिवबाबा आपले पिता आहेत, किती सूक्ष्म आहेत. हे चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे आहे. विसरता कामा नये. आपण आत्मा देखील बिंदू प्रमाणे सूक्ष्म आहोत. असे नाही, वरती (परमधाममध्ये) गेलो तर मोठी दिसेल, खाली छोटी होईल. नाही, ती तर आहे बिंदू. वर जाल तर तुम्हाला दिसूनही येणार नाही. बिंदू आहे ना. बिंदू कशी काय दिसून येणार. या गोष्टींवर मुलांनी चांगल्या प्रकारे विचारही करायचा आहे. मी आत्मा वरून (परमधामवरून) आले आहे, शरीराद्वारे पार्ट बजावण्याकरिता. आत्मा लहान-मोठी होत नाही. अवयव आधी लहान, नंतर मोठे होतात.

आता जसे तुम्हाला समजले आहे तसे मग इतरांना समजावून सांगायचे आहे. हे तर नक्की आहे नंबरवार ज्याने जितका अभ्यास केला आहे तेवढेच शिकवतात; सर्वांना टीचर देखील जरूर बनायचे आहे, इतरांना शिकविण्याकरिता. बाबांमध्ये तर नॉलेज आहे, ते अति सूक्ष्म परम-आत्मा आहेत, कायम परमधामामध्ये राहतात. इथे एकदाच संगमावर येतात. बाबांना बोलावतात देखील तेव्हाच जेव्हा अतिशय दुःखी होतात. म्हणतात - ‘येऊन आम्हाला सुखी बनवा’. मुले आता जाणतात आम्ही बोलावत राहतो - ‘बाबा, येऊन आम्हाला पतित दुनियेमधून नव्या सतयुगी सुखी पावन दुनियेमध्ये घेऊन चला किंवा तिथे जाण्याचा रस्ता सांगा’. ते देखील जेव्हा स्वतः येतील तेव्हाच तर रस्ता सांगतील. ते येणार तेव्हाच जेव्हा दुनियेला बदलायचे असेल. या अतिशय सोप्या गोष्टी आहेत, नोटडाऊन करून ठेवायचे आहे. बाबांनी आज हे समजावून सांगितले आहे, आम्ही देखील असे समजावून सांगतो. अशी प्रॅक्टिस करता-करता तुमचे मुख उघडेल (ज्ञान चांगले समजावून सांगू लागाल). तुम्ही मुरलीधराची मुले आहात, तुम्हाला जरूर मुरलीधर बनायचे आहे. जेव्हा इतरांचे कल्याण कराल तेव्हाच तर नवीन दुनियेमध्ये उच्च पद मिळवाल. ते शिक्षण (लौकिक शिक्षण) तर आहे इथल्यासाठी. हे आहे भविष्य नवीन दुनियेकरिता. तिथे तर कायम सुखच सुख आहे. तिथे ५ विकार त्रास देणारे असतच नाहीत. इथे रावणराज्य अर्थात परक्या राज्यामध्ये आपण आहोत. तुम्हीच आधी आपल्या राज्यामध्ये होता. तुम्ही म्हणाल - नवीन दुनिया, आणि मग भारतालाच जुनी दुनिया म्हटले जाते. गायन देखील आहे - ‘नव्या दुनियेमध्ये भारत…’ असे म्हणणार नाही की, नव्या दुनियेमध्ये इस्लामी, बौद्धी. नाही. आता तुमच्या बुद्धीमध्ये आहे की, बाबा येऊन आम्हा मुलांना जागृत करतात. ड्रामामध्ये पार्टच त्यांचा असा आहे. भारतालाच येऊन स्वर्ग बनवतात. भारतच पहिला देश आहे. भारतच पहिला देश आहे ज्याला स्वर्ग म्हटले जाते. भारताचे आयुर्मान देखील लिमिटेड (सीमित) आहे. लाखो वर्षे म्हणणे हे तर अनलिमिटेड होते. लाखो वर्षांची कोणती गोष्ट आठवूच शकणार नाही. भारत नवा होता, आता जुना भारत असेच म्हणणार. नवीन दुनिया भारतच असेल. तुम्ही जाणता - आपण आता नवीन दुनियेचे मालक बनत आहोत. बाबांनी मत दिले आहे - ‘माझी आठवण करा तर तुमची आत्मा नवीन पावन बनेल मग शरीर देखील नवीन मिळेल. आत्मा आणि शरीर दोन्ही सतोप्रधान बनतात. तुम्हाला राज्य मिळतेच सुखाकरिता. हा देखील ड्रामा अनादि बनलेला आहे. नवीन दुनियेमध्ये सुख आणि शांती आहे. तिथे कोणती वादळे इत्यादी नसतात. बेहदच्या शांतीमध्ये सर्व शांत होऊन जातात. इथे आहे अशांती तर सर्व अशांत आहेत. सतयुगामध्ये सर्व शांत असतात. वंडरफुल गोष्टी आहेत ना. हा अनादि पूर्व नियोजित खेळ आहे. या आहेत बेहदच्या गोष्टी. ती हदची बॅरिस्टरी, इंजीनियरिंग इत्यादी शिकतात. आता तुमच्या बुद्धीमध्ये बेहदचे नॉलेज आहे. एकदाच बाबा येऊन बेहदच्या ड्रामाचे रहस्य समजावून सांगतात. पूर्वी तर हे नाव देखील ऐकले नव्हते की बेहदचा ड्रामा कसा चालतो. आता समजता सतयुग-त्रेता जरूर ते होऊन गेले आहे, त्यामध्ये यांचे (लक्ष्मी-नारायणाचे) राज्य होते. त्रेतामध्ये राम-राज्य होते, मागाहून मग अजून इतर धर्म आले आहेत. इस्लामी, बौद्धी, ख्रिश्चन… सर्व धर्मांविषयी संपूर्ण माहिती आहे. हे सर्व गेल्या २५०० वर्षांमध्ये आले आहेत. त्यामध्ये १२५० वर्षे कलियुग आहे. सर्व हिशोब आहे ना. असे तर नाही, सृष्टीचे आयुर्मानच २५०० वर्षे आहे. नाही. अच्छा, मग अजून कोण होते, विचार केला जातो. यांच्या आधी बरोबर देवी-देवता… ते देखील होते तर मनुष्यच परंतु दैवी गुणवाले होते. २५०० वर्षांमध्ये सूर्यवंशी-चंद्रवंशी. बाकी अर्ध्या मध्ये ते (इतर धर्माचे) सर्व होते. यापेक्षा जास्तीचा तर काही हिशोब निघू शकत नाही. पूर्ण, पाऊण, अर्धा, एक चतुर्थांश. चार भाग आहेत. नियमानुसार समान भाग करणार ना. अर्ध्या मध्ये तर हे (देवी-देवता) आहेत. म्हणतात देखील - सतयुगामध्ये सूर्यवंशी राज्य, त्रेतामध्ये चंद्रवंशी रामराज्य - हे तुम्ही सिद्ध करून सांगता. तर जरूर सर्वात जास्त आयुर्मान त्यांचे असेल, जे सर्वप्रथम सतयुगामध्ये येतात. कल्पच मुळी ५ हजार वर्षांचे आहे. ते लोक ८४ लाख योनी म्हणतात आणि कल्पाची आयु देखील लाखो वर्षे म्हणतात. कोणी मानणार सुद्धा नाही. एवढी मोठी दुनिया असू देखील शकत नाही. तर बाबा बसून समजावून सांगत आहेत - ते सर्व आहे अज्ञान आणि हे आहे ज्ञान. ज्ञान कुठून आले - हे देखील कोणालाच माहित नाही आहे. ज्ञानाचा सागर तर एक बाबाच आहेत, तेच ज्ञान देतात मुखाद्वारे. म्हणतात गो-मुख. या गो-मातेद्वारे (ब्रह्मा द्वारे) तुम्हा सर्वांना ॲडॉप्ट करतात. या थोड्याशा गोष्टी समजावून सांगणे तर खूप सोपे आहे. एक दिवस सांगून मग सोडून द्याल तर बुद्धी मग दुसऱ्या-दुसऱ्या गोष्टींमध्ये गुंतून जाईल. शाळेमध्ये एक दिवस शिकतात की नियमित शिक्षण घेतले जाते! ज्ञान काही एका दिवसामध्ये समजू शकत नाही. बेहदचे बाबा आपल्याला शिकवत आहेत तर जरूर बेहदचे शिक्षण असेल. बेहदचे राज्य देतात. भारतामध्ये बेहदचे राज्य होते ना. हे लक्ष्मी-नारायण बेहदचे राज्य करत होते. या गोष्टी कोणाच्या स्वप्नामध्ये देखील नाही आहेत, ज्यामुळे विचारतील की, यांनी कसे राज्य घेतले? त्यांच्यामध्ये प्युरीटी (पवित्रता) जास्त होती, योगी आहेत ना म्हणून आयुर्मान देखील जास्त असते. आम्हीच योगी होतो. मग ८४ जन्म घेऊन भोगी देखील जरूर बनायचे आहे. मनुष्य जाणत नाहीत की हे देखील जरूर पुनर्जन्मा मध्ये आले असतील. यांना भगवान-भगवती म्हटले जात नाही. यांच्या आधी तर कोणीच नाहीये ज्याने ८४ जन्म घेतले असतील. सर्वप्रथम जे सतयुगामध्ये राज्य करतात तेच ८४ जन्म घेतात मग नंबरवार खाली येतात (पतन होते). मी आत्मा सो देवता बनणार मग हम सो क्षत्रिय… डिग्री (कला) कमी होईल. गायले देखील जाते पूज्य सो पुजारी. सतोप्रधानापासून मग तमोप्रधान बनतात. असे पुनर्जन्म घेत-घेत रसातळाला जातील. हे किती सोपे आहे. परंतु माया अशी आहे जी सर्व गोष्टींचा विसर पाडते. हे सर्व पॉईंट्स एकत्र करून पुस्तक इत्यादी बनवावे, परंतु ते तर काही राहणार नाही. हे टेम्पररी आहे. बाबांनी काही गीता ऐकवली नव्हती. बाबा तर जसे आता समजावून सांगत आहेत, असेच आधी देखील समजावून सांगितले होते. वेद-शास्त्र इत्यादी ही सर्व नंतर बनतात. हा सर्व होल लॉट (वेद-शास्त्रे-पुराणे इत्यादी) जी आहेत, तर जेव्हा विनाश होईल तेव्हा हे सर्व जळून जाईल. सतयुग-त्रेतामध्ये कोणता धर्मग्रंथ असत नाही नंतर भक्ती मार्गामध्ये बनतात. किती गोष्टी बनतात. रावणाला देखील बनवतात परंतु समजून न घेता. काहीही सांगू शकत नाहीत. बाबा म्हणतात - हा रावण दरवर्षी बनवतात आणि जाळतात, तर जरूर हा मोठा शत्रू आहे. परंतु शत्रू कसा आहे, हे कोणीही जाणत नाहीत. ते (दुनियावाले) समजतात सीतेला चोरून घेऊन गेला म्हणून कदाचित शत्रू आहे. रामाच्या सीतेला चोरून घेऊन जात असेल तर मोठा डाकू झाला ना! मग ही चोरी कधी केली! त्रेतामध्ये म्हणा किंवा त्रेताच्या शेवटी. या गोष्टींवर देखील विचार केला जातो. अशी कधी चोरीला गेली पाहिजे! कोणत्या रामाची सीता चोरीला गेली? राम-सीतेचे देखील राज्य चालले का? एकच राम-सीता चालत आले आहेत का? ही तर शास्त्रांमध्ये जशी एक कहाणी लिहिलेली आहे. विचार केला जातो - कोणती सीता? १२ राम-सीता (१२ गाद्या) असतात ना. तर कोणत्या सीतेला चोरले? जरूर शेवटची असेल. हे जे म्हणतात - रामाची सीता चोरली गेली. आता रामाच्या राज्यामध्ये सर्वकाळ एकाचेच तर राज्य नसेल. जरूर घराणी असतील. तर कोणत्या नंबरची सीता चोरीला गेली? या सर्व खूप समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. तुम्ही मुले अतिशय शांतीने कोणालाही हे सर्व रहस्य समजावून सांगू शकता.

बाबा समजावून सांगतात की, भक्ति मार्गामध्ये मनुष्य भटकून-भटकून किती दुःखी झाले आहेत. जेव्हा अति दुःखी होतात तेव्हा आक्रोश करतात - ‘बाबा, या दुःखातून सोडवा’. रावण काही कोणती वस्तू तर नाही आहे ना. जर आहे तर मग आपल्या राजाला दरवर्षी मारता कशासाठी! आणि मग रावणाची जरूर पत्नी देखील असेल. मंदोदरी दाखवतात. मंदोदरीचा पुतळा बनवून जाळला, असे कधीच पाहिलेले नाही. तर बाबा बसून समजावून सांगतात - ही आहेच ‘झूठी माया, झूठी काया…’ आता तुम्ही खोट्या मनुष्यापासून सच्चे देवता बनण्यासाठी बसले आहात. फरक तर झाला ना! तिथे तर नेहमी सत्य बोलाल. तो आहे सचखंड. हा आहे झूठखंड. त्यामुळे खोटेच बोलत राहतात. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) ज्ञान सागर बाबा जे रोज बेहदचे शिक्षण देतात, त्यावर विचार सागर मंथन करायचे आहे. जे शिकले आहात ते इतरांना देखील जरूर शिकवायचे आहे.

२) हा बेहदचा ड्रामा कसा चालत आहे, हा अनादि पूर्व नियोजित वंडरफुल ड्रामा आहे, या रहस्याला चांगल्या रीतीने समजून घेऊन मग इतरांना समजावून सांगायचे आहे.

वरदान:-
पवित्रतेच्या श्रेष्ठ धारणे द्वारा एका धर्माचे संस्कारवाले समर्थ सम्राट भव

तुमच्या स्वराज्याचा धर्म अर्थात धारणा आहे “पवित्रता”. एक धर्म अर्थात एक धारणा. स्वप्न अथवा संकल्प मात्र देखील अपवित्रता अर्थात दुसरा धर्म असू नये कारण जिथे पवित्रता आहे तिथे अपवित्रता अर्थात व्यर्थ किंवा विकल्पाचे नामोनिशाण असणार नाही. असे संपूर्ण पवित्रतेचे संस्कार भरणारेच ‘समर्थ सम्राट’ आहेत. आत्ताच्या श्रेष्ठ संस्कारांच्या आधारावर भविष्य संसार बनतो. आत्ताचे संस्कार भविष्य संसाराचे फाउंडेशन आहे.

बोधवाक्य:-
विजयी रत्न तेच बनतात ज्यांचे सच्चे प्रेम एका परमात्म्यावर आहे.