17-01-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - तुम्ही भारताचे सर्वात बहुमूल्य सेवक आहात, तुम्हाला आपल्या तन-मन-धनाने
श्रीमत अनुसार याला रामराज्य बनवायचे आहे”
प्रश्न:-
खरी अलौकिक
सेवा कोणती आहे, जी तुम्ही मुले आत्ता करता?
उत्तर:-
तुम्ही मुले गुप्तपणे श्रीमतावर पावन भूमी सुखधामची स्थापना करत आहात - हीच भारताची
खरी अलौकिक सेवा आहे. तुम्ही बेहदच्या बाबांच्या श्रीमतानुसार सर्वांची रावणाच्या
जेलमधून सुटका करत आहात. त्यासाठी तुम्ही पावन बनून दुसऱ्यांना पावन बनवत आहात.
गीत:-
नयन हीन को
राह दिखाओ...
ओम शांती।
‘हे प्रभू’, ‘ईश्वर’, ‘परमात्मा’ म्हणणे आणि ‘पिता’ शब्द म्हणणे यामध्ये किती फरक
आहे! ‘हे ईश्वर’, ‘हे प्रभू’ म्हटल्याने किती आदर वाटतो. आणि मग त्यांना पिता
म्हणतात, तर पिता शब्द खूप सर्वसाधारण आहे. पिता तर भरपूर आहेत. प्रार्थनेमध्ये
देखील म्हणतात - ‘हे प्रभू’, ‘हे ईश्वर’. मग ‘बाबा’ का म्हणत नाहीत? आहेत तर परमपिता
ना. परंतु ‘बाबा’ शब्द अगदी साधारण वाटतो, ‘परमात्मा’ शब्द श्रेष्ठ होतो. बोलावतात
- ‘हे प्रभू, नैन हीन को राह बताओ’. आत्मे म्हणतात - ‘बाबा, आम्हाला
मुक्ती-जीवनमुक्तीचा मार्ग दाखवा’. ‘प्रभू’ शब्द किती मोठा आहे. ‘बाबा’ शब्द साधारण
आहे. इथे तुम्ही जाणता बाबा येऊन समजावून सांगतात. लौकिक दृष्ट्या तर भरपूर पिता
आहेत, बोलावतात देखील - ‘तुम मात-पिता…’ किती साधारण शब्द आहे. ईश्वर किंवा प्रभू
म्हटल्याने समजतात ते काय करू शकणार नाहीत. आता तुम्ही मुले जाणता की बाबा आलेले
आहेत. बाबा मार्ग अतिशय श्रेष्ठ आणि सोपा सांगतात. बाबा म्हणतात - ‘माझ्या मुलांनो,
तुम्ही रावणाच्या मतामुळे काम-चितेवर चढून भस्मीभूत झाला आहात. आता मी तुम्हाला
पावन बनवून घरी घेऊन जाण्यासाठी आलो आहे. बाबांना बोलवतात देखील याच करिता की, येऊन
पतितापासून पावन बनवा. बाबा म्हणतात मी आलो आहे तुमच्या सेवेकरिता. तुम्ही सर्व मुले
देखील भारताच्या अलौकिक सेवेमध्ये आहात. जी सेवा तुमच्याशिवाय इतर कोणीही करू शकत
नाही. तुम्ही भारतासाठीच करता, श्रीमतावर पावन बनता आणि भारताला पावन बनवता. बापू
गांधीजींची इच्छा होती की रामराज्य व्हावे. आता कोणी मनुष्य काही रामराज्य बनवू शकत
नाही. नाहीतर मग प्रभूला ‘पतित-पावन’ असे म्हणून कशाला बोलावले असते? आता तुम्हा
मुलांचे भारतावर किती प्रेम आहे! तर खास भारताची आणि साधारण सर्व दुनियेची खरी सेवा
तुम्ही करता.
तुम्ही जाणता भारताला
पुन्हा रामराज्य बनवता, जी बापूजींची इच्छा होती. ते हदचे बापूजी होते, हे मग बेहदचे
बापूजी आहेत. हे बेहदची सेवा करतात. हे तुम्ही मुलेच जाणता. तुमच्यामध्ये देखील
नंबरवार ही नशा असते की आम्ही रामराज्य बनवणार आहोत. गव्हर्मेंटचे तुम्ही नोकर आहात.
तुम्ही दैवी गव्हर्मेंट बनवता. तुम्हाला भारताचा अभिमान आहे. तुम्ही जाणता की,
सतयुगामध्ये ही पावन भूमी होती, आता तर पतित आहे. तुम्ही जाणता - आता आम्ही
बाबांद्वारे पुन्हा पावन भूमी अथवा सुखधाम बनवत आहोत, तेही गुप्तपणे. श्रीमत देखील
गुप्तपणे मिळते. भारतीय गव्हर्मेंटसाठीच तुम्ही करत आहात. श्रीमतानुसार तुम्ही
भारताची सर्वश्रेष्ठ सेवा आपल्या तन-मन-धनाने करत आहात. काँग्रेसवाले लोक किती जेल
वगैरे मध्ये गेले. तुम्हाला तर जेल इत्यादी मध्ये जाण्याची गरजच नाही. तुमची तर
आहेच रूहानी गोष्ट (आत्मिक गोष्ट). तुमचे युद्ध देखील ५ विकार रूपी रावणासोबत आहे,
ज्या रावणाचे संपूर्ण पृथ्वीवर राज्य आहे. तुमची ही सेना आहे. लंका तर एक छोटे बेट
आहे. ही सृष्टी बेहदचे बेट आहे. तुम्ही बेहदच्या बाबांच्या श्रीमतावर सर्वांची
रावणाच्या जेलमधून सुटका करता. हे तर तुम्ही जाणता की या पतित दुनियेचा विनाश तर
होणारच आहे. तुम्ही शिवशक्ती आहात. शिवशक्ती हे गोपसुद्धा आहेत. तुम्ही गुप्तपणे
भारताची खूप मोठी सेवा करत आहात. पुढे चालून सर्वांना कळून येईल. तुमची आहे
श्रीमतानुसार रूहानी सेवा. तुम्ही गुप्त आहात. सरकार तर जाणतच नाही की हे बी. के.
तर भारताला आपल्या तन-मन-धनाने सर्व श्रेष्ठ सचखंड बनवत आहेत. भारत सचखंड होता, आता
झूठ खंड आहे. सत्य तर एक बाबाच आहेत. म्हटले देखील जाते - ‘गॉड इज ट्रुथ’. तुम्हाला
नरापासून नारायण बनण्याचे खरे शिक्षण देत आहेत. बाबा म्हणतात - ‘कल्पापूर्वी देखील
तुम्हाला नरापासून नारायण बनवले होते’. रामायणामध्ये तर काय-काय कथा बसून लिहिल्या
आहेत. म्हणतात - रामाने मदतीला वानर सेना घेतली. तुम्ही आधी वानरासारखे होतात. एकाच
सीतेची काही गोष्ट नाही. बाबा समजावून सांगतात की, कसे आम्ही रावणराज्याचा विनाश
करून रामराज्य स्थापन करतो, यामध्ये काहीच त्रासाची गोष्ट नाही. ते तर किती खर्च
करतात. रावणाचा पुतळा बनवून मग त्याला जाळतात. समजत काहीच नाहीत. मोठ-मोठ्या व्यक्ती
सर्व जातात, परदेशी लोकांना सुद्धा दाखवतात, समजत काहीच नाहीत. आता बाबा समजावून
सांगतात तर तुम्हा मुलांच्या मनामध्ये उत्साह आहे की, आम्ही भारताची खरी रूहानी सेवा
करत आहोत. बाकीची सर्व दुनिया रावणाच्या मतावर आहे, तुम्ही आहात रामाच्या श्रीमतावर.
राम म्हणा, शिव म्हणा, नावे तर खूप ठेवली आहेत.
तुम्ही मुले
श्रीमतावर भारताचे सर्वात बहुमूल्य सेवक आहात. म्हणतात देखील - हे पतित-पावन, येऊन
पावन बनवा. तुम्ही जाणता सतयुगामध्ये आम्हाला किती सुख मिळते. कुबेराचा खजिना मिळतो.
तिथे सरासरी आयुर्मान सुद्धा सर्वात जास्त असते. ते आहेत योगी, इथे आहेत सर्व भोगी.
ते पावन, हे पतित. किती रात्रं-दिवसाचा फरक आहे. श्रीकृष्णाला सुद्धा योगी म्हणतात,
महात्मा सुद्धा म्हणतात. परंतु ते तर खरे महात्मा आहेत. त्यांची तर महिमा गायली जाते
की, सर्वगुण संपन्न... आत्मा आणि शरीर दोन्ही पवित्र आहेत. संन्यासी तर गृहस्थींच्या
घरी विकारातून जन्म घेऊन मग संन्यासी बनतात. या गोष्टी आत्ता तुम्हाला बाबा समजावून
सांगतात. यावेळी तर मनुष्य अधार्मिक, दुःखी आहेत. सतयुगामध्ये कसे होते? धार्मिक
वृत्तीचे, नीतिमत्ता असणारे होते. १०० टक्के पवित्र होते. सदैव आनंदात राहत होते.
रात्रं-दिवसा इतका फरक आहे. हे तुम्हीच अचूकपणे जाणता. हे कोणाला थोडेच कळून येते
की भारत स्वर्गाचा नरक कसा बनला आहे? लक्ष्मी-नारायणाची पूजा करतात, मंदीर बनवतात,
समजत काहीच नाहीत. बाबा समजावून सांगत राहतात - चांगल्या-चांगल्या पदावर जे आहेत,
बिर्लाला देखील समजावून सांगू शकता, या लक्ष्मी-नारायणाने हे पद कसे मिळवले, त्यांनी
काय केले ज्यामुळे यांची मंदिरे बनवली आहेत? त्यांचे जीवन-चरित्र जाणल्याशिवाय पूजा
करणे म्हणजे देखील दगडाची पूजा किंवा बाहुल्यांची पूजा झाली. बाकीच्या धर्माचे लोक
तर जाणतात की, क्राईस्ट अमूक वेळी आला, पुन्हा येईल.
तर तुम्हा मुलांना
किती रूहानी गुप्त नशा असला पाहिजे. आत्म्याला आनंद झाला पाहिजे. अर्धा कल्प
देह-अभिमानी बनले आहात. आता बाबा म्हणतात - अशरीरी बना, स्वतःला आत्मा समजा. आमची
आत्मा बाबांकडून ऐकत आहे. इतर सत्संगांमध्ये कधी असे समजणार नाहीत. हे रूहानी बाबा
आत्म्यांना बसून समजावून सांगतात. आत्माच सर्व काही ऐकते ना. आत्मा म्हणते मी
पंतप्रधान आहे, अमूक आहे. आत्म्याने या शरीराद्वारे सांगितले की, मी पंतप्रधान आहे.
आता तुम्ही म्हणता - ‘आम्ही आत्मे पुरुषार्थ करून स्वर्गातील देवी-देवता बनत आहोत.
मी आत्मा आहे, माझे शरीर आहे. देही-अभिमानी बनण्यासाठीच खूप मेहनत करावी लागते.
क्षणोक्षणी स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करत रहा तर विकर्म विनाश होतील. तुम्ही
सर्वात आज्ञाधारक सेवाधारी आहात. गुप्तपणे कर्तव्य करता. तर नशासुद्धा गुप्त पाहिजे.
आम्ही गव्हर्मेंटचे रूहानी सर्व्हंट आहोत. भारताला स्वर्ग बनवत आहोत. बापूजींची
सुद्धा इच्छा होती नवीन दुनियेमध्ये नवा भारत असावा, नवीन दिल्ली असावी. आता नवी
दुनिया तर नाहीये. ही जुनी दिल्ली कब्रस्तान बनते नंतर मग परिस्तान बनणार आहे. आत्ता
हिला परिस्तान थोडेच म्हणणार. नवीन दुनियेमध्ये परिस्तान नवीन दिल्ली तुम्ही बनवत
आहात. या खूप समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. या गोष्टी विसरता कामा नये. भारताला
पुन्हा सुखधाम बनविणे किती श्रेष्ठ कार्य आहे. ड्रामा प्लॅन अनुसार सृष्टी जुनी
होणारच आहे. दुःखधाम आहे ना. दुःखहर्ता, सुखकर्ता एका बाबांनाच म्हटले जाते. तुम्ही
जाणता बाबा ५ हजार वर्षांनंतर येऊन दुःखी भारताला सुखी बनवतात. सुख सुद्धा देतात,
शांती सुद्धा देतात. मनुष्य म्हणतात देखील की, मनाची शांती कशी मिळेल? आता शांती तर
शांतीधाम स्वीट होम मध्येच असते. त्याला म्हटले जाते शांतीधाम, जिथे आवाज नाही,
दुःख नाही. सूर्य चंद्र इत्यादी सुद्धा असत नाहीत. आता तुम्हा मुलांना हे सर्व
ज्ञान आहे. बाबा सुद्धा येऊन आज्ञाधारक सेवक बनले आहेत ना. परंतु बाबांना तर अजिबात
जाणतही नाहीत. सर्वांना महात्मा म्हणतात. आता महान आत्मा तर स्वर्गाशिवाय कधी असू
शकत नाही. तिथे आत्मे पवित्र आहेत. पवित्र होते तर शांती समृद्धी सुद्धा होती. आता
पवित्रता नाही त्यामुळे काहीच राहिलेले नाही आहे. पवित्रतेलाच मान आहे. देवता
पवित्र आहेत म्हणूनच तर त्यांच्या पुढे डोके टेकतात. पवित्रला - पावन आणि अपवित्रला
- पतित म्हटले जाते. हे आहेत साऱ्या विश्वाचे बेहदचे बापूजी, तसे तर मेयरला देखील (महापौरना
सुद्धा) शहराचे पिता म्हणता येईल. तिथे थोड्याच अशा गोष्टी असतील. तिथे तर कायदेशीर
राज्य चालते. बोलावतात देखील - ‘हे पतित-पावन या’. आता बाबा म्हणतात - पवित्र बना,
तर म्हणतात हे कसे शक्य आहे, मग मुले कशी जन्माला येतील? सृष्टीची वृद्धी कशी होईल?
त्यांना हे माहीत नाही आहे की लक्ष्मी-नारायण संपूर्ण निर्विकारी होते. तुम्हा
मुलांना किती विरोध सहन करावा लागतो.
ड्रामामध्ये जे
कल्पापूर्वी घडले आहे त्याची पुनरावृत्ती होते. असे नाही की ड्रामाच्या नावाने
थांबून रहायचे आहे - ड्रामामध्ये असेल तर मिळेल! शाळेमध्ये असे बसून राहिल्याने कोणी
पास होतील का? प्रत्येक गोष्टीसाठी मनुष्याला पुरुषार्थ तर करावा लागतो. पुरुषार्था
शिवाय पाणी सुद्धा मिळू शकत नाही. प्रत्येक सेकंदा-सेकंदाला जो पुरुषार्थ चालतो, तो
प्रारब्ध मिळवण्यासाठी असतो. हा बेहदचा पुरुषार्थ बेहदच्या सुखासाठी करायचा आहे. आता
आहे ब्रह्माची रात्र सो ब्राह्मणांची रात्र नंतर मग ब्राह्मणांचा दिवस असेल.
शास्त्रांमध्ये देखील वाचत होता परंतु काहीच समजत नव्हते. हे बाबा (ब्रह्मा बाबा)
स्वतः बसून रामायण, भागवत वगैरे ऐकवत होते, पंडित बनून बसत होते. आता समजले आहे तो
तर भक्तीमार्ग आहे. भक्ती वेगळी आहे, ज्ञान वेगळी गोष्ट आहे. बाबा म्हणतात -
‘तुम्ही सगळे काम-चितेवर बसून काळे बनले आहात’. श्रीकृष्णाला देखील श्याम-सुंदर
म्हणतात ना. पुजारी लोक अंधश्रद्धाळू आहेत. किती भूतपूजा आहे. शरीराची पूजा म्हणजे
५ तत्त्वांची पूजा झाली. याला म्हटले जाते - व्यभिचारी पूजा. सुरुवातीला भक्ती
अव्यभिचारी होती, एका शिवाचीच होत होती. आता तर बघा कशा-कशाची पूजा करत राहतात. बाबा
चमत्कारही दाखवतात आणि नॉलेज देखील समजावून सांगत आहेत. काट्यांपासून फुल बनवत आहेत.
त्याला म्हटलेच जाते फुलांचा बगीचा. कराचीला एक पठाण पहारेकरी होता, तोही
ध्यानामध्ये जात होता, म्हणायचा मी स्वर्गात गेलो, ईश्वराने मला फूल दिले. त्याला
खूप मजा वाटायची. आश्चर्य आहे ना. ते तर सेव्हन वंडर्स (७ आश्चर्य) म्हणतात. खरे तर
जगातले आश्चर्य तर स्वर्ग आहे हे कोणालाच माहिती नाही आहे.
तुम्हाला किती
फर्स्टक्लास ज्ञान मिळाले आहे. तुम्हाला किती आनंद झाला पाहिजे. किती सर्वोच्च
बापदादा आहेत आणि किती साधे राहतात, बाबांची महिमा गायली जाते - ते निराकार,
निरहंकारी आहेत. बाबांना तर येऊन सेवा करायची आहे ना. बाबा नेहमी मुलांची सेवा करून,
त्यांना धन-दौलत देऊन स्वतः वानप्रस्थ अवस्थेत जातात. मुलांना डोक्यावर बसवतात.
तुम्ही मुले विश्वाचे मालक बनता. स्वीट होममध्ये जाऊन मग येऊन स्वीट बादशाही घ्याल;
बाबा म्हणतात मी काही बादशाही घेत नाही. खरेखुरे निष्काम सेवाधारी तर एक बाबाच आहेत.
तर मुलांना किती आनंद झाला पाहिजे. परंतु माया विसरायला लावते. इतक्या श्रेष्ठ
बापदादांना थोडेच विसरायचे असते. दादांच्या (आजोबांच्या) संपत्तीचा किती अभिमान असतो.
तुम्हाला तर शिवबाबा मिळाले आहेत, त्यांची संपत्ती आहे. बाबा म्हणतात - ‘माझी आठवण
करा आणि दैवीगुण धारण करा’. आसुरी गुणांना काढून टाकले पाहिजे. गातात देखील - ‘मुझ
निर्गुण हारे में कोई गुण नाही’. ‘निर्गुण’ नावाची संस्था सुद्धा आहे. आता अर्थ तर
कोणाला समजत नाही. निर्गुण अर्थात काहीच गुण नाहीत. परंतु ते समजतात थोडेच. तुम्हा
मुलांना बाबा एकच गोष्ट समजावतात - बोला, आम्ही तर भारताच्या सेवेवर आहोत. जे
सर्वांचे बापूजी आहेत, आम्ही त्यांच्या श्रीमतानुसार चालतो. श्रीमत भगवत गीता गायली
गेली आहे ना. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) जसे
सर्वश्रेष्ठ बापदादा साधे राहतात तसे अतिशय साधे, निराकारी आणि निरहंकारी बनून
रहायचे आहे. बाबांकडून जे फर्स्टक्लास ज्ञान मिळाले आहे, त्याचे चिंतन करायचे आहे.
२) ड्रामा जो हुबेहूब
रिपीट होत आहे, त्यामध्ये बेहदचा पुरुषार्थ करून बेहद सुखाची प्राप्ती करायची आहे.
कधी ड्रामा म्हणून थांबून रहायचे नाही. प्रारब्धा करिता अवश्य पुरुषार्थ करायचा आहे.
वरदान:-
अव्यक्त
स्वरूपाच्या साधनेद्वारे शक्तीशाली वायुमंडळ बनवणारे अव्यक्त फरिश्ता भव
वायुमंडळाला शक्तिशाली
बनवण्याचे साधन आहे - आपल्या अव्यक्त स्वरूपाची साधना. यावर वारंवार लक्ष द्या,
कारण ज्या गोष्टीची साधना केली जाते, त्याच गोष्टीकडे लक्ष राहते. तर अव्यक्त
स्वरूपाची साधना अर्थात वारंवार लक्ष देण्याची तपस्या पाहिजे, म्हणून अव्यक्त
फरिश्ता भव हे वरदान लक्षात ठेवून शक्तीशाली वायुमंडळ बनविण्याची तपःश्चर्या करा,
तर तुमच्या समोर जो कोणी येईल तो व्यक्त आणि व्यर्थ गोष्टींपासून दूर होईल.
बोधवाक्य:-
सर्वशक्तिमान
बाबांना प्रत्यक्ष करण्याकरिता एकाग्रतेच्या शक्तीला वाढवा.
आपल्या शक्तीशाली
मन्साद्वारे सकाश देण्याची सेवा करा:-
जसा आपल्या स्थूल
कामांचा कार्यक्रम दिनचर्येनुसार सेट करता, तसा आपल्या मन्सा समर्थ स्थितीचा
कार्यक्रम सेट करा. जितके आपल्या मनाला समर्थ संकल्पांमध्ये गुंतवून ठेवाल तेवढे
मनाला अपसेट होण्यासाठी वेळच मिळणार नाही. मन सदैव सेट अर्थात एकाग्र असेल तर चांगली
व्हायब्रेशन्स आपोआप पसरतात. सेवा होते.