17-01-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - जेव्हा हा भारत स्वर्ग होता तेव्हा तुम्ही लख्ख प्रकाशामध्ये होता, आता अंधार आहे, पुन्हा प्रकाशामध्ये चला”

प्रश्न:-
बाबा आपल्या मुलांना कोणती एक कहाणी ऐकवण्यासाठी आले आहेत?

उत्तर:-
बाबा म्हणतात - गोड मुलांनो, मी तुम्हाला ८४ जन्मांची कहाणी ऐकवतो. तुम्ही जेव्हा पहिल्या जन्मामध्ये होता तेव्हा एकच दैवी धर्म होता मग तुम्ही दोन युगानंतर मोठ-मोठी मंदिरे बनवली आहेत. भक्ती सुरू केली आहे. आता तुमचा हा अंताच्या देखील अंताचा जन्म आहे. तुम्ही बोलावले - ‘दुःख हर्ता, सुख कर्ता या…’ आता मी आलो आहे.

गीत:-
आज अन्धेरे में है इन्सान…

ओम शांती।
तुम्ही मुले जाणता आता ही कलियुगी दुनिया आहे, सर्व अंधारामध्ये आहेत. अगोदर प्रकाशामध्ये होते, जेव्हा भारत स्वर्ग होता. हेच भारतवासी जे आता स्वतःला हिंदू म्हणवून घेतात ते खरे तर देवी-देवता होते. जेव्हा भारतामध्ये स्वर्गवासी होते. तेव्हा इतर कोणताही धर्म नव्हता. एकच धर्म होता. स्वर्ग, वैकुंठ, बहिश्त, हेवन - ही सर्व भारताची नावे होती. भारत पवित्र आणि प्राचीन अति श्रीमंत होता. आता तर भारत गरीब आहे कारण आता कलियुग आहे. तुम्ही जाणता आपण अंधारामध्ये आहोत. जेव्हा स्वर्गामध्ये होतो तेव्हा प्रकाशामध्ये होतो. स्वर्गाचे राज-राजेश्वर, राज-राजेश्वरी श्री लक्ष्मी-नारायण होते. त्याला सुखधाम म्हटले जाते. बाबांकडूनच तुम्हाला स्वर्गाचा वारसा घ्यायचा आहे, ज्याला जीवनमुक्ती म्हटले जाते. आता तर सर्व जीवन-बंध मध्ये आहेत. खास भारत आणि आम दुनिया रावणाच्या जेलमध्ये, शोक वाटिकेमध्ये आहेत. असे नाही की रावण केवळ लंकेमध्ये होता आणि राम भारतामध्ये होता, त्याने येऊन सीतेला चोरून नेले. या तर सर्व आहेत दंतकथा. गीता आहे मुख्य, ‘सर्व शास्त्रमई शिरोमणी श्रीमत’ अर्थात भगवंताने भारतामध्ये ऐकवली आहे. मनुष्य तर कोणाची सद्गती करू शकत नाहीत. सतयुगामध्ये होते जीवनमुक्त देवी-देवता, ज्यांनी हा वारसा कलियुगाच्या अंतिम काळामध्ये मिळवला होता. भारतवासीयांना देखील हे माहीत नाही आहे आणि ना कोणत्या शास्त्रांमध्ये आहे. शास्त्रांमध्ये आहे भक्तिमार्गाचे ज्ञान. मनुष्यमात्रांमध्ये सद्गती मार्गाचे ज्ञान तर अजिबातच नाही आहे. सगळे भक्ती शिकवणारे आहेत. म्हणतील - शास्त्र वाचा, दान-पुण्य करा. ही भक्ती द्वापर पासून चालत आली आहे. सतयुग आणि त्रेतामध्ये आहे ज्ञानाचे प्रारब्ध. असे नाही की तिथे देखील हे ज्ञान चालू राहते. हा जो वारसा भारताला मिळाला होता तो बाबांकडून संगमयुगावरच मिळाला होता जो पुन्हा आता तुम्हाला मिळत आहे. भारतवासी जेव्हा नरकवासी दु:खी बनतात तेव्हाच बोलावतात - ‘हे पतित-पावन दु:ख हर्ता, सुख कर्ता’. कोणाचा? सर्वांचा, कारण भारत खास आणि आम दुनिया सर्वांमध्ये ५ विकार आहेत. बाबाच पतित-पावन आहेत. बाबा म्हणतात - मी कल्प-कल्प, कल्पाच्या संगमावर येतो. सर्वांचा सद्गती दाता बनतो. अहिल्या, गणिका आणि जे गुरु लोक आहेत त्या सर्वांचा उद्धार मलाच करावा लागतो कारण ही तर आहेच पतित दुनिया. पावन दुनिया सतयुगाला म्हटले जाते. भारतामध्ये या लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते. भारतवासी हे जाणत नाहीत की हे स्वर्गाचे मालक होते. पतित खंड अर्थात झुठ-खंड, पावन खंड अर्थात सच-खंड. भारत पावन खंड होता, हा भारत अविनाशी खंड आहे, ज्याचा कधीही विनाश होत नाही. जेव्हा यांचे (लक्ष्मी-नारायणाचे) राज्य होते तेव्हा इतर कोणताही खंड नव्हता. ते सर्व नंतर येतात. लोकांनी तर कल्प लाखो वर्षांचे असल्याचे लिहिले आहे. बाबा म्हणतात - कल्पाचा कालावधी ५ हजार वर्षे आहे. ते मग म्हणतात मनुष्य ८४ लाख जन्म घेतात. मनुष्याला कुत्रा, मांजर, गाढव इत्यादी सर्व बनवले आहे. परंतु कुत्र्याचा, मांजराचा जन्म वेगळा आहे, ८४ लाख व्हरायटी (जाती) आहेत. मनुष्यांची तर एकच जात आहे. त्यांचेच ८४ जन्म आहेत. बाबा म्हणतात - भारतवासी आपल्या धर्माला ड्रामा प्लॅन अनुसार विसरले आहेत. कलियुगाच्या अंतामध्ये एकदमच पतित बनले आहेत. मग बाबा संगमावर येऊन पावन बनवतात, याला म्हटले जाते दुःख धाम, मग पुन्हा भारत सुख धाम होईल. बाबा म्हणतात - माझ्या मुलांनो, तुम्ही भारतवासी, स्वर्गवासी होता आणि मग तुम्ही ८४ जन्मांची शिडी उतरता. सतो पासून रजो-तमोमध्ये जरूर यायचे आहे. तुम्हा देवतांसारखे श्रीमंत, एव्हरहॅप्पी, एव्हरहेल्दी, वेल्दी दुसरे कोणीच नाही. भारत किती श्रीमंत होता, हिरे-माणके तर दगडांप्रमाणे होते. दोन युगा नंतर भक्तिमार्गामध्ये इतकी भव्य मंदिरे बनवतात. ती देखील किती जबरदस्त मंदिरे बनवली आहेत. सोमनाथाचे मंदिर सर्वात मोठे होते. फक्त एकच मंदिर तर नसेल ना. इतरही राजांची मंदिरे होती. किती लुटून घेऊन गेले आहेत. बाबा तुम्हा मुलांना आठवण करून देत आहेत. तुम्हाला किती श्रीमंत बनवले होते. तुम्ही सर्वगुण संपन्न, १६ कला संपूर्ण होता यथा महाराजा-महाराणी. त्यांना भगवान-भगवती देखील म्हणू शकता. परंतु बाबांनी सांगितले आहे - भगवान एक आहेत, ते पिता आहेत. केवळ ईश्वर अथवा प्रभू म्हटल्याने देखील हे लक्षात येत नाही की ते सर्व आत्म्यांचे पिता आहेत. बाबा बसून कथा सांगत आहेत. आता तुमच्या अनेक जन्मांतील हा शेवटचा जन्म आहे. एकाचीच गोष्ट नाहीये, ना कोणते युद्धाचे मैदान इत्यादी आहे. भारतवासी हे विसरले आहेत की त्यांचे राज्य होते. सतयुगाचा कालावधी प्रदीर्घ केल्याने खूप दूर घेऊन गेले आहेत. बाबा येऊन समजावून सांगतात - मनुष्याला भगवान म्हणू शकत नाही. मनुष्य कोणाचीही सद्गती करू शकत नाही. एक म्हण आहे - ‘सर्वांचा सद्गती दाता, पतितांना पावन करणारा एकच आहे’. एकच खरे बाबा आहेत जे सचखंडाची स्थापना करणारे आहेत. पूजा देखील करतात परंतु भक्तीमार्गामध्ये तुम्ही ज्यांची पूजा करत आला आहात, एकाच्याही बायोग्राफीला (जीवन चरित्राला) जाणत नाही म्हणून बाबा म्हणतात, तुम्ही शिवजयंती तर साजरी करता ना. बाबा आहेत नवीन दुनियेचे रचयिता, हेवनली गॉड फादर. बेहद सुख देणारे. सतयुगामध्ये खूप सुख होते. ते कसे आणि कोणी स्थापन केले? हे बाबाच बसून समजावून सांगतात. नरकवासींना येऊन स्वर्गवासी बनविणे किंवा भ्रष्टाचारींना श्रेष्ठाचारी देवता बनविणे, हे तर बाबांचे काम आहे. बाबा म्हणतात - मी तुम्हा मुलांना पावन बनवतो. तुम्ही स्वर्गाचे मालक बनता. तुम्हाला पतित कोण बनवतो? हा रावण. मनुष्य तर म्हणतात दुःख सुद्धा ईश्वरच देतात. बाबा म्हणतात - मी तर सर्वांना इतके सुख देतो जे मग अर्धाकल्प तुम्ही बाबांची आठवणही करणार नाही. मग जेव्हा रावण राज्य होते तेव्हा तुम्ही सर्वांची पूजा करायला सुरूवात करता. हा आहे तुमचा अनेक जन्मांतील शेवटचा जन्म. म्हणतात - ‘बाबा, आम्ही किती जन्म घेतले आहेत?’ बाबा म्हणतात - ‘गोड-गोड भारतवासीयांनो, माझ्या आत्म्यांनो, आता तुम्हाला बेहदचा वारसा देतो. मुलांनो, तुम्हीच ८४ जन्म घेतले आहेत. आता तुम्ही २१ जन्मांसाठी बाबांकडून वारसा घेण्यासाठी आला आहात. सगळेच काही एकत्र येणार नाहीत. तुम्हीच सतयुगाचे सूर्यवंशी पद पुन्हा घेता अर्थात सत्य बाबांकडून नरापासून सत्य नारायण बनण्याचे ज्ञान ऐकता. हे आहे ज्ञान, ती आहे भक्ती. शास्त्र इत्यादी सर्व आहेत भक्तीमार्गासाठी. ती ज्ञान मार्गासाठी नाही आहेत. हे आहे रूहानी स्पिरिच्युअल नॉलेज. सुप्रीम रूह बसून नॉलेज देतात. मुलांना देही-अभिमानी बनावे लागेल. स्वतःला आत्मा निश्चय करून मामेकम् (मज एकाची) आठवण करा. बाबा समजावून सांगतात - आत्म्यामध्येच चांगले किंवा वाईट संस्कार असतात, त्यानुसारच मनुष्याला चांगला अथवा वाईट जन्म मिळतो. बाबा बसून सांगत आहेत - हे (ब्रह्मा बाबा) जे पावन होते, अंतिम जन्मामध्ये पतित आहेत, तत् त्वम्. मज पित्याला या जुन्या रावणाच्या दुनियेमध्ये, पतित दुनियेमध्ये यावे लागते. यायचे देखील त्याच शरीरामध्ये आहे ज्यांना मग पहिल्या नंबर मध्ये जायचे आहे. सूर्यवंशीच पूर्ण ८४ जन्म घेतात. हे आहेत ब्रह्मा आणि ब्रह्मावंशी ब्राह्मण. बाबा दररोज सांगतात. पत्थर-बुद्धींना पारस-बुद्धी बनविणे काही मावशीचे घर नाहीये (इतकी साधी गोष्ट नाहीये). हे आत्म्यांनो, आता देही-अभिमानी बना. हे आत्म्यांनो, एका बाबांची आठवण करा आणि आपल्या राज्याची आठवण करा. देहाच्या सर्व नात्यांना सोडा. मरायचे तर सर्वांनाच आहे. सर्वांची वानप्रस्थ अवस्था आहे. एका सद्गुरु शिवाय सर्वांचा सद्गती दाता कोणी असूच शकत नाही. बाबा म्हणतात - माझ्या भारतवासी मुलांनो, तुम्ही सर्वात पहिले माझ्या पासून दुरावले आहात. गायले जाते - ‘आत्मायें-परमात्मा अलग रहे बहुकाल…’ सर्वप्रथम तुम्ही देवी-देवता धर्माचे भारतवासी खाली आला आहात. इतर धर्मवाल्यांचे जन्म कमीच असतात. सारे चक्र कसे फिरते ते तर बाबाच बसून समजावून सांगतात. जे धारण करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी देखील खूप सोपे आहे. आत्मे धारण करतात, पुण्य-आत्मा, पाप-आत्मा बनते ना. तुमचा हा ८४ वा अंतिम जन्म आहे. तुम्ही सर्व वानप्रस्थ अवस्थेमध्ये आहात. वानप्रस्थ अवस्था असणारे मंत्र घेण्यासाठी गुरु करतात. तुम्हाला तर आता देहधारी गुरू करण्याची गरज नाही आहे. तुम्हा सर्वांचा मी पिता, टीचर, गुरु आहे. मला म्हणता देखील - ‘हे पतित-पावन शिवबाबा’. आता स्मृती आली आहे. सर्व आत्म्यांचे पिता आहेत, आत्मा सत्य आहे, चैतन्य आहे कारण अमर आहे. सर्व आत्म्यांमध्ये पार्ट भरलेला आहे. बाबा देखील सत्य, चैतन्य आहेत. ते मनुष्य सृष्टीचे बीज रूप असल्या कारणाने म्हणतात - ‘मी संपूर्ण झाडाच्या आदि-मध्य-अंताला जाणतो म्हणून मला नॉलेजफुल म्हटले जाते’. तुम्हाला देखील सगळे नॉलेज आहे. बीजा पासून झाड कसे तयार होते. झाड वाढण्यासाठी वेळ लागतो ना. बाबा म्हणतात - मी बीजरूप आहे, शेवटी संपूर्ण झाड जडजडीभूत अवस्थेची फेरी मारते. आता पहा देवी-देवता धर्माचे फाउंडेशनच राहिलेले नाहीये. प्राय: लोप झाले आहे. जेव्हा देवता धर्म लोप होतो तेव्हा बाबांना यावे लागते - एक धर्माची स्थापना करून इतर धर्मांचा विनाश करवतात. प्रजापिता ब्रह्मा द्वारे बाबा, आदि सनातन देवी-देवता धर्माची स्थापना करत आहेत. हा देखील सर्व ड्रामा पूर्व नियोजित आहे. याचा कधीही अंत होत नाही. बाबा येतात अंतामध्ये. जेव्हा सृष्टीला आदि-मध्य-अंताचे नॉलेज ऐकवायचे असते, तर जरूर संगमावरच येतील. तुमचा एकच पिता आहे. बाकी सर्व आत्मे बांधव आहेत, मूलवतनमध्ये राहणारे आहेत. त्या एका पित्याची सर्वजण आठवण करतात. ‘दुःख में सिमरण सब करें…’ रावण राज्यामध्ये दुःख आहे ना. इथे आठवण करतात तर सर्वांचे सद्गती दाता एक बाबाच आहेत. त्यांचीच महिमा आहे. बाबा जर आले नाहीत तर मग भारताला स्वर्ग कोण बनवेल! इस्लामी इत्यादी जे कोणी आहेत सर्व यावेळी तमोप्रधान आहेत. सर्वांना पुनर्जन्म तर जरूर घ्यायचा आहे. आता पुनर्जन्म मिळतो नरकामध्ये. असे नाही की स्वर्गामध्ये निघून जातात. जसे हिंदू लोक म्हणतात - ‘स्वर्गवासी झाला’, तर जरूर नरकामध्ये होता ना. आता स्वर्गामध्ये गेला. तुमच्या तोंडामध्ये गुलाब. स्वर्गवासी झाला तर मग तुम्ही त्याला नरकामध्ये आसुरी मिष्टान्न का खाऊ घालता? बंगालमध्ये मासे इत्यादी देखील खाऊ घालतात. अरे, त्यांना या सर्व गोष्टी खाण्याची गरजच काय आहे! म्हणतात - अमका पार निर्वाणधाममध्ये गेला, बाबा म्हणतात - या सर्व आहेत थापा. असे कोणीही परत जाऊ शकत नाही. जेव्हा की पहिल्या नंबरवाल्यांनाच ८४ जन्म घ्यावे लागतात.

बाबा म्हणतात या ज्ञानमार्गामध्ये कोणताच त्रास नाहीये. भक्तीमार्गामध्ये किती त्रास आहे. राम-राम जपता-जपता अंगावर आनंदाने रोमांच उभे राहतात. तो सर्व आहे भक्तिमार्ग. हे सूर्य-चंद्र देखील तुम्ही जाणता की, हे फक्त प्रकाश देणारे आहेत. हे काही देवता थोडेच आहेत. वास्तविक ज्ञान सूर्य, ज्ञान चंद्रमा आणि ज्ञान सितारे आहेत. त्यांची महिमा आहे. ते मग म्हणतात - सूर्य देवताए नम:. त्यांना देवता समजून अर्ध्य देतात. तर बाबा समजावून सांगत आहेत हा सर्व आहे भक्तिमार्ग, जो तरीही पुन्हा घडेल. सुरुवातीला पहिली आहे अव्यभिचारी भक्ती एका शिवबाबांची, नंतर मग देवतांची, आणि मग उतरता-उतरता आता तर पहा तिठ्यावर देखील (जिथे तीन रस्ते एकत्र मिळतात तिथे देखील) मातीचा दिवा लावून, तेल इत्यादी घालून त्याची सुद्धा पूजा करतात. तत्वांची देखील पूजा करतात. मनुष्यांच्या देखील मुर्त्या बनवून त्यांची पूजा करतात. आता यातून प्राप्ती तर काहीच होत नाही, या गोष्टीला तुम्ही मुलेच समजता. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) आत्म्यामधून वाईट संस्कारांना काढण्यासाठी देही-अभिमानी होऊन राहण्याचा अभ्यास करायचा आहे. हा अंतिम ८४ वा जन्म आहे, वानप्रस्थ अवस्था आहे म्हणून पुण्य-आत्मा बनण्याची मेहनत करायची आहे.

२) देहाच्या सर्व नात्यांना सोडून एका बाबांची आणि आपल्या राज्याची आठवण करायची आहे, बीज आणि झाडाचे ज्ञान स्मृतीमध्ये ठेवून नेहमी हर्षित रहायचे आहे.

वरदान:-
उपराम आणि एव्हररेडी बनून बुद्धीद्वारे अशरीरीपणाचा अभ्यास करणारे सर्व कलांमध्ये संपन्न भव

जसे सर्कसमध्ये कला दाखवणाऱ्या कलाबाजचे प्रत्येक कर्म एक कला बनते. ते कलाबाज शरीराच्या कोणत्याही अवयवाला जसे पाहिजे, जिथे पाहिजे, जितका वेळ पाहिजे तितके मोल्ड करू शकतात, हीच कला आहे. तुम्ही मुले बुद्धीला जेव्हा पाहिजे, जेवढा वेळ पाहिजे, जिथे स्थित करायचे आहे तिथे स्थित करा - हीच सर्वात मोठी कला आहे. या एका कलेद्वारे १६ कला संपन्न बनाल. यासाठी असे उपराम आणि एव्हररेडी बना जेणेकरून ऑर्डर प्रमाण एका सेकंदामध्ये अशरीरी बनाल. युद्ध करण्यामध्ये वेळ जाऊ नये.

बोधवाक्य:-
सरळ स्वभाव आणि सहनशीलतेच्या गुणाला धारण करणारेच खरे स्नेही आणि सहयोगी आहेत.

अव्यक्त इशारे:- या अव्यक्ती महिन्यामध्ये बंधनमुक्त राहून जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करा.

जी परमात्म ज्ञानी मुले आहेत, त्यांना ज्ञानाचे फळ - मुक्ती आणि जीवनमुक्तीचा वारसा संगमावरच प्राप्त होतो. ज्ञान अर्थात समज (बुद्धी). समजदार असणाऱ्याला (बुद्धिमान असणाऱ्याला) प्रत्येक कर्म करत असताना नेहमी स्वतःला बंधनमुक्त, सर्व आकर्षणांपासून मुक्त बनविण्याची समज असते. त्यांच्या प्रत्येक संकल्प, बोल, कर्म, संबंध आणि संपर्कामध्ये मुक्ती-जीवनमुक्तीची स्टेज असते, ज्याला न्यारा आणि प्यारा म्हटले जाते.