17-02-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - बाबा तुमचे पाहुणे बनून आले आहेत तर तुम्ही आदर केला पाहिजे, जसे प्रेमाने बोलावले आहे तसा आदर देखील करायचा आहे, अनादर व्हायला नको”

प्रश्न:-
कोणता नशा तुम्हा मुलांना सदैव चढलेला असला पाहिजे? जर नशा चढत नसेल तर काय म्हणणार?

उत्तर:-
सर्वश्रेष्ठ असामी या पतित दुनियेमध्ये आमचा पाहुणा बनून आली आहे, हा नशा सदैव चढलेला असला पाहिजे. परंतु हा नशा नंबरवार चढतो. बरेचजण तर बाबांचे बनून देखील संशयबुद्धी बनून हात सोडून जातात तर मग म्हणणार - त्यांचे नशीब.

ओम शांती।
ओम् शांती. दोन वेळा म्हणावे लागते. हे तर मुले जाणतात की एक आहेत बाबा, दुसरे आहेत दादा. दोघेही एकत्र आहेत ना. भगवंताची महिमा देखील किती महान करतात परंतु शब्द किती साधा आहे - ‘गॉड फादर’. फक्त ‘फादर’ म्हणत नाहीत, ‘गॉड फादर’. ते आहेत सर्वोच्च. त्यांची महिमा देखील खूप श्रेष्ठ आहे. त्यांना बोलावतात देखील पतित दुनियेमध्ये. स्वतः येऊन सांगतात की मला पतित दुनियेमध्येच बोलावतात परंतु ते पतित-पावन कसे आहेत, केव्हा येतात, हे कोणालाच माहीत नाही. अर्धेकल्प सतयुग-त्रेतामध्ये कोणाचे राज्य होते, कसे झाले, कोणालाच हे माहीत नाहीये. पतित-पावन बाबा येतातही नक्कीच, त्यांना कोणी पतित-पावन म्हणतात, कोणी लिबरेटर (मुक्तीदाता) म्हणतात. पुकारतात की स्वर्गामध्ये घेऊन चला. सर्वात उच्च ते उच्च आहेत ना. त्यांना पतित दुनियेमध्ये बोलावतात की येऊन आम्हा भारतवासीयांना श्रेष्ठ बनवा. त्यांची पोझिशन किती मोठी आहे. हाईएस्ट ऑथॉरिटी (सर्वोच्च अधिकारी) आहेत. जेव्हा रावण राज्य असते तेव्हा त्यांना बोलावतात, नाहीतर मग या रावण राज्यातून कोण सोडवेल? या सर्व गोष्टी तुम्ही मुले ऐकता तर नशा देखील चढलेला राहिला पाहिजे. परंतु इतका नशा चढत नाही. दारूची नशा सर्वांना चढते, हा नशा चढत नाही. यामध्ये आहे धारणेची गोष्ट, नशिबाची गोष्ट आहे. तर बाबा खूप मोठी असामी आहेत. तुमच्यामध्ये देखील काहीजणांना पूर्ण निश्चय आहे. सर्वांना जर निश्चय असता तर संशयामध्ये येऊन पळाले का असते? बाबांना विसरून जातात. बाबांचा बनला, आणि मग बाबांच्या बाबतीत कोणी संशयबुद्धी होऊ शकत नाही. परंतु हे बाबा वंडरफुल आहेत. गायन देखील आहे - ‘आश्चर्यवत् बाबा को जानन्ती, बाबा कहन्ती, ज्ञान सुनन्ती, सुनावन्ती, अहो माया फिर भी संशय बुद्धि बनावन्ती’. बाबा सांगतात या भक्तीमार्गातील शास्त्रांमध्ये काहीच सार (अर्थ) नाही. बाबा म्हणतात - ‘मला कोणीही ओळखत नाहीत’. तुम्हा मुलांमध्ये देखील मुश्किलीनेच कोणी टिकू शकतात. तुम्ही देखील अनुभव करता की ती आठवण स्थायी (कायम) रहात नाही. मी आत्मा बिंदू आहे, बाबा देखील बिंदू आहेत, ते आमचे पिता आहेत, त्यांना स्वतःचे शरीर काही नाही आहे. म्हणतात - मी या तनाचा (ब्रह्मा बाबांच्या शरीराचा) आधार घेतो. माझे नाव ‘शिव’ आहे. मज आत्म्याचे नाव कधी बदलत नाही. तुमच्या शरीराची नावे बदलतात. शरीरालाच नाव दिले जाते. लग्न होते तेव्हा नाव बदलते. मग ते नाव कायम करतात. तर आता बाबा म्हणतात - तुम्ही हे पक्के करा की आपण आत्मा आहोत. हा बाबांनीच परिचय दिला आहे की, जेव्हा-जेव्हा अत्याचार आणि निंदा केली जाते तेव्हा मी येतो. कोणत्या शब्दांनासुद्धा धरून ठेवायचे नाही. बाबा स्वतः सांगतात - मला दगड-धोंड्यामध्ये आहेत असे म्हणून किती निंदा करतात, ही देखील काही नवीन गोष्ट नाहीये. कल्प-कल्प असे पतित बनून वर आणि निंदा करतात, तेव्हाच मी येतो. कल्प-कल्पाचा माझा पार्ट आहे. याच्यामध्ये अदला बदली होऊ शकत नाही. ड्रामामध्ये नोंदलेलेच आहे ना. तुम्हाला कित्येकजण विचारतात की, ‘फक्त भारतातच येतात! फक्त भारतच स्वर्ग बनेल का?’ होय. हा तर अनादि-अविनाशी पार्ट झाला ना. बाबा किती उच्च ते उच्च आहेत. पतितांना पावन बनविणारे बाबा म्हणतात - मला बोलावतातच मुळी या पतित दुनियेमध्ये. मी तर सदैव पावन आहे. मला तर पावन दुनियेमध्ये बोलावले पाहिजे ना! परंतु नाही, पावन दुनियेमध्ये बोलावण्याची आवश्यकताच नाही. पतित दुनियेमध्येच बोलावतात की येऊन पावन बनवा. मी किती मोठा पाहुणा आहे. अर्ध्या कल्पापासून माझी आठवण करत आला आहात. इथे कोणा मोठ्या व्यक्तीला बोलावतात, फार-फार तर एक-दोन वर्षे बोलवतील. अमका या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी येईल. यांची (शिवबाबांची) तर अर्ध्या कल्पापासून आठवण करत आला आहात. यांच्या येण्याचा पार्ट तर निश्चित झालेला आहे. हे कोणालाच माहीत नाहीये. अति सर्वोच्च असे बाबा आहेत. मनुष्य तर एकीकडे बाबांना प्रेमाने बोलावतात आणि दुसरीकडे मग त्यांच्या महिमेला डाग लावतात (त्यांच्या गुणांनाच कलंक लावतात). खरे तर हे सर्वात मोठे गेस्ट ऑफ ऑनर (सन्माननीय पाहुणे) आहेत, ज्यांच्या महिमेला ‘हे दगडा-धोंड्यात सर्वांमध्ये आहेत’ असे म्हणून कलंक लावला आहे. किती हाईएस्ट ऑथॉरिटी (सर्वोच्च अधिकारी) आहेत, बोलावतात देखील अतिशय प्रेमाने, परंतु आहेत एकदम बुद्धू. मीच येऊन माझा परिचय देतो की, मी तुमचा पिता आहे. मला गॉडफादर म्हणतात. जेव्हा रावणाच्या कैदेत अडकतात तेव्हाच बाबांना यावे लागते कारण सर्व आहेत भक्तीणी किंवा ब्राइड्स - सीता. बाबा आहेत ब्राईडग्रुम - राम. ही काही एकाच सीतेची गोष्ट नाहीये, सर्व सीतांना रावणाच्या जेलमधून सोडवतात. ही आहे बेहदची गोष्ट. ही आहे जुनी पतित दुनिया. हिचे जुने होणे आणि मग नवीन होणे अगदी ॲक्युरेट आहे, ही शरीरे इत्यादी तर काही लवकर जुनी होतात, काही जास्त काळ चालतात. हे ड्रामामध्ये ॲक्युरेट नोंदलेले आहे. पूर्ण ५ हजार वर्षांनंतर पुन्हा मला यावे लागते. मीच येऊन माझा परिचय देतो आणि सृष्टी चक्राचे रहस्य समजावून सांगतो. कोणालाही ना माझी ओळख आहे, ना ब्रह्मा, विष्णू, शंकराची, ना लक्ष्मी-नारायणाची, ना राम-सीतेची ओळख आहे. ड्रामामध्ये उच्च ते उच्च ॲक्टर्स तर हेच आहेत. आहे तर मनुष्याचीच गोष्ट.

८-१० भुजावाले मनुष्य काही नाही आहेत. विष्णूला ४ भुजा का दाखवतात? रावणाची १० डोकी काय आहेत? हे कोणालाच माहीत नाही आहे. बाबाच येऊन संपूर्ण विश्वाच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान सांगतात. म्हणतात - ‘मी मोठ्यात मोठा पाहुणा आहे, परंतु गुप्त आहे’. हे देखील फक्त तुम्ही जाणता. परंतु जाणत असून देखील मग विसरून जाता. त्यांचा किती मान ठेवला पाहिजे, त्यांची आठवण केली पाहिजे. आत्मा देखील निराकार, परमात्मा सुद्धा निराकार, यामध्ये फोटोची सुद्धा गरज नाही. तुम्हाला तर स्वतःला आत्मा निश्चय करून बाबांची आठवण करायची आहे, देह-अभिमान सोडायचा आहे. तुम्हाला कायम अविनाशी वस्तूला बघितले पाहिजे. तुम्ही विनाशी देह का बघता? देही-अभिमानी बना, यातच मेहनत आहे. जितके आठवणीमध्ये रहाल तितके कर्मातीत अवस्थेला प्राप्त करून उच्च पद मिळवाल. बाबा अतिशय ‘सोपा योग’ अर्थात ‘आठवण’ शिकवतात. ‘योग’ तर अनेक प्रकारचे आहेत. ‘आठवण’ शब्दच योग्य आहे. परमात्मा-बाबांची आठवण करण्यातच मेहनत आहे. कोणी विरळेच खरे सांगतात की, मी इतका वेळ आठवणीमध्ये राहिलो. आठवण करतच नाहीत त्यामुळे सांगताना लाज वाटते. लिहितात - ‘पूर्ण दिवसामध्ये १ तास आठवणीमध्ये राहिलो’, तर लाज वाटली पाहिजे ना. असे बाबा ज्यांची रात्रं-दिवस आठवण केली पाहिजे आणि मी मात्र फक्त एक तास आठवण करतो! यामध्ये खूप गुप्त मेहनत आहे. बाबांना बोलावतात तर फार दुरून येणारा पाहुणा झाले ना! बाबा म्हणतात - मी नवीन दुनियेचा पाहुणा बनत नाही. मी येतोच जुन्या दुनियेमध्ये. येऊन नवीन दुनियेची स्थापना करतो. ही जुनी दुनिया आहे हे देखील कोणी यथार्थपणे जाणत नाहीत. नवीन दुनियेचे आयुर्मानच जाणत नाहीत. बाबा म्हणतात - हे नॉलेज मीच येऊन देतो मग ड्रामा अनुसार हे नॉलेज लुप्त होते. मग कल्पानंतर हा पार्ट रिपीट होईल. मला बोलावतात, वर्षानुवर्षे शिवजयंती साजरी करतात. जे होऊन जातात त्यांची वर्षानुवर्षे पुण्यतिथी साजरी करतात. शिवबाबांची देखील १२ महिन्यानंतर जयंती साजरी करतात, परंतु कधीपासून साजरी करत आले आहेत हे कोणालाही माहीत नाही. फक्त म्हणतात की, लाखो वर्षे झाली. कलियुगाचा कालावधीच लाखो वर्षांचा लिहिला आहे. बाबा म्हणतात - ही तर आहे ५ हजार वर्षांची गोष्ट. खरोखर भारतामध्ये या देवी-देवतांचे राज्य होते ना. तर बाबा म्हणतात - मी भारताचा खूप मोठा पाहुणा आहे, मला अर्ध्या कल्पापासून निमंत्रण देत आला आहात. जेव्हा खूप दुःखी होतात, तेव्हा म्हणतात - ‘हे पतित-पावन या’. मी आलो देखील आहे पतित दुनियेमध्ये. मला रथ तर पाहिजे ना. आत्मा आहे अकाल मूर्त, तिचे हे तख्त (सिंहासन) आहे. बाबा देखील अकालमूर्त आहेत, येऊन या तख्तावर विराजमान होतात. या अतिशय मनोरंजक गोष्टी आहेत. दुसरे कोणी ऐकतील तर चक्रावून जातील. आता बाबा म्हणतात - ‘मुलांनो, माझ्या मतानुसार चाला. असेच समजा की, शिवबाबा मत देत आहेत, मुरली चालवत आहेत’. हे (ब्रह्मा बाबा) म्हणतात - मी देखील त्यांची मुरली ऐकून मग वाजवेन (इतरांना समजावून सांगेन). ऐकविणारे तर ते (शिवबाबा) आहेत ना. हा (ब्रह्मा) नंबरवन पूज्य सो नंबरवन पुजारी बनला. आता हा पुरुषार्थी आहे. मुलांनी नेहमी असेच समजले पाहिजे की, आम्हाला शिवबाबांकडून श्रीमत मिळाले आहे. एखादी गोष्ट उलटी जरी झाली तरीही ती सुलटी करतील. असा अतूट निश्चय असेल तर शिवबाबा जबाबदार आहेत. हे ड्रामामध्ये नोंदलेले आहे. विघ्न तर येणारच आहेत, खूप कठीण-कठीण विघ्न येतात. आपल्या मुलांकडूनही विघ्न येतात. तर नेहमी समजा की शिवबाबा सांगत आहेत म्हणजे मग आठवण राहील. किती तरी मुले समजतात हे ब्रह्मा मत देतात, परंतु नाही. शिवबाबा जबाबदार आहेत. परंतु देह-अभिमान असेल तर घडोघडी यांनाच (ब्रह्मालाच) बघत राहतात. शिवबाबा किती मोठा पाहुणा आहे तरी देखील रेल्वे इत्यादी वाले थोडेच जाणतात, निराकारला कसे ओळखणार किंवा समजणार? ते काही आजारी पडू शकत नाहीत. तर आजारी इत्यादी असल्याचे कारण यांचे सांगतात. ते कसे जाणणार यांच्यामध्ये कोण आहे? तुम्ही मुले देखील नंबरवार जाणता. ते सर्व आत्म्यांचे पिता आणि हे मग प्रजापिता मनुष्यांचे पिता आहेत. तर हे दोघेही (बाप-दादा) किती मोठे पाहुणे झाले.

बाबा म्हणतात - ‘जे काही घडते, ते सर्व ड्रामामध्ये नोंदलेलेच आहे, मी देखील ड्रामाच्या बंधनामध्ये बांधला गेलो आहे. नोंद असल्या शिवाय काहीच करू शकत नाही. माया देखील अतिशय वाईट आहे. राम आणि रावण दोघांचाही पार्ट आहे. ड्रामामध्ये रावण जर चैतन्य असता तर म्हणाला असता - ‘मी सुद्धा ड्रामा अनुसार येतो’. हा दुःख आणि सुखाचा खेळ आहे. सुख आहे नवीन दुनियेमध्ये, दुःख आहे जुन्या दुनियेमध्ये. नव्या दुनियेमध्ये फार थोडे मनुष्य असतात, जुन्या दुनियेमध्ये किती भरमसाठ मनुष्य आहेत. पतित-पावन बाबांनाच बोलावतात की, येऊन पावन दुनिया बनवा कारण पावन दुनियेमध्ये अथाह सुख होते म्हणूनच तर कल्प-कल्प बोलावतात. बाबा सर्वांना सुख देऊन जातात. आता पुन्हा पार्ट रिपीट होतो. दुनिया कधीही नष्ट होत नाही. नष्ट होणे अशक्य आहे. दुनियेमध्ये समुद्र सुद्धा आहेच ना. हा तिसरा मजला तर आहे ना. म्हणतात सर्वत्र जलमय, पाणीच-पाणी होते, तरीही पृथ्वीचा मजला तर आहे ना. पाणी सुद्धा आहे ना. पृथ्वीचा मजला काही नष्ट होऊ शकत नाही. पाणी देखील याच मजल्यावर असते. दुसऱ्या आणि पहिल्या मजल्यावर, सूक्ष्मवतन आणि मूलवतनमध्ये तर पाणी असतही नाही. हे बेहद सृष्टीचे ३ मजले आहेत, ज्यांना तुम्हा मुलांशिवाय इतर कोणीही जाणत नाही. ही आनंदाची गोष्ट सर्वांना आनंदाने सांगायची आहे. जे पूर्ण पास होतात, त्यांच्याच अतींद्रिय सुखाचे गायन केले गेले आहे. जे रात्रंदिवस सेवेमध्ये तत्त्पर आहेत, सेवाच करत राहतात त्यांना खूप आनंद वाटत असतो. काही-काही असेही दिवस येतात ज्यामुळे मनुष्य रात्रीचे देखील जाग्रण करतात परंतु आत्मा थकते तेव्हा झोपावे लागते. आत्मा झोपल्यावर शरीरही झोपी जाते. आत्मा झोपली नाही तर शरीरही झोपत नाही. थकते आत्मा. ‘आज मी थकून गेलो आहे’, हे कोणी म्हटले? आत्म्याने. तुम्हा मुलांना आत्म-अभिमानी होऊन रहायचे आहे, यामध्येच मेहनत आहे. बाबांची आठवण करत नाहीत, देही-अभिमानी रहात नाहीत, त्यामुळे देहाचे नातलग इत्यादी आठवत राहतात. बाबा म्हणतात - तुम्ही नंगे आला होता तर नंगे जायचे आहे. ही देहाची नाती इत्यादी सर्वकाही विसरून जा. या शरीरामध्ये राहून माझी आठवण करा तरच सतोप्रधान बनाल. बाबा किती मोठी ऑथॉरिटी आहेत. तुम्हा मुलांव्यतिरिक्त इतर कोणीही जाणत नाहीत. बाबा म्हणतात - ‘मी आहे गरीब निवाज (गरीबांचा वाली), सर्वजण साधारण आहेत’. पतित-पावन बाबा आले आहेत, हे जर समजले तर माहित नाही किती गर्दी होईल. मोठ-मोठ्या व्यक्ती येतात तेव्हा किती गर्दी होते. तर ड्रामामध्ये यांचा पार्टच गुप्त राहण्याचा आहे. पुढे चालून हळूहळू प्रभाव पडेल आणि विनाश होईल. सगळे थोडेच भेटू शकतात. आठवण करतात ना तर त्यांना बाबांचा परिचय मिळेल. परंतु पोहोचू शकणार नाहीत. जशा बंधनात असणाऱ्या मुली भेटू शकत नाहीत, किती अत्याचार सहन करतात. मनुष्य विकाराला सोडू शकत नाहीत. म्हणतात - सृष्टी कशी चालेल? अरे सृष्टीचे ओझे बाबांवर आहे की तुमच्यावर? बाबांना जाणले तर मग असे प्रश्न विचारणार नाही. बोला, ‘अगोदर बाबांना तर जाणून घ्या मग सर्वकाही जाणाल’. समजावून सांगण्याची देखील युक्ती पाहिजे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) सदैव ‘हाइएस्ट ऑथॉरिटी’ (सर्वोच्च अधिकारीच्या) बाबांच्या आठवणीमध्ये रहायचे आहे. विनाशी देहाला न बघता देही-अभिमानी बनण्याची मेहनत करायची आहे. आठवणीचा खरा-खरा चार्ट ठेवायचा आहे.

२) दिवस-रात्र सेवेमध्ये तत्पर राहून अपार आनंदामध्ये रहायचे आहे. तिन्ही लोकांचे रहस्य सर्वांना आनंदाने समजावून सांगायचे आहे. शिवबाबा जे श्रीमत देतात त्यावर अतूट निश्चय ठेवून चालायचे आहे, कोणतेही विघ्न आले तरीही घाबरायचे नाही, जबाबदार शिवबाबा आहेत, त्यामुळे संशय येऊ नये.

वरदान:-
श्रेष्ठ वेळेच्या आधारे सर्व प्राप्तींच्या अधिकाराचा अनुभव करणारे पद्मा-पदम भाग्यशाली भव जी श्रेष्ठ वेळी जन्माला येणारी भाग्यशाली मुले आहेत, ती कल्पापूर्वीच्या टचिंगच्या आधारावर जन्मत:च आपलेपणाचा अनुभव करतात. ती जन्मत:च सर्व प्रॉपर्टीचे अधिकारी असतात. जसे बीजामध्ये साऱ्या वृक्षाचे सार सामावलेले असते तसे नंबरवन वेळेवाले आत्मे सर्व स्वरूपाच्या प्राप्तीच्या खजिन्याचे येताच क्षणी अनुभवी बनतात. ते कधी असे म्हणणार नाहीत की सुखाचा अनुभव होतो, शांतीचा नाही; शांतीचा होतो, सुखाचा आणि शक्तीचा नाही. सर्व अनुभवांनी संपन्न असतात.

बोधवाक्य:-
आपल्या प्रसन्नतेच्या सावलीने शीतलतेचा अनुभव करविण्याकरिता निर्मळ आणि निर्मान बना.

अव्यक्त इशारे - एकांतप्रिय बना आणि एकाग्रतेला धारण करा:- सर्व संबंध, सर्व रसना एकाकडून घेणाराच एकांत-प्रिय असू शकतो, जेव्हा एकाकडूनच सर्व रसना प्राप्त होऊ शकतात तर अनेकांकडे जाण्याची गरजच काय आहे? फक्त ‘एक’ शब्द जरी लक्षात ठेवला तरी त्यामध्ये सर्व ज्ञान येते, स्मृती देखील येते, नाते सुद्धा येतो, स्थिती सुद्धा येते आणि त्याचबरोबर जी प्राप्ती होते ती देखील त्या ‘एक’ शब्दातून स्पष्ट होते. एकाची आठवण, स्थिती एकरस आणि ज्ञान देखील सर्व एकाच्या आठवणी विषयीचेच मिळते. प्राप्ती देखील जी होते ती देखील एकरस राहते.