17-03-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - शिक्षण हीच कमाई आहे, शिक्षण हे सोर्स ऑफ इन्कम (उत्पन्नाचा स्रोत) आहे, या शिक्षणानेच तुम्हाला २१ जन्मांकरिता खजिना जमा करायचा आहे”

प्रश्न:-
ज्या मुलांवर बृहस्पतीची दशा असेल त्यांची लक्षणे कोणती दिसून येतील?

उत्तर:-
त्यांचे लक्ष पूर्णपणे श्रीमतावर असेल. चांगल्या प्रकारे अभ्यास करतील. कधीही नापास होणार नाहीत. श्रीमताचे उल्लंघन करणारेच अभ्यासामध्ये नापास होतात. त्यांच्यावर मग राहूची दशा बसते. आता तुम्हा मुलांवर वृक्षपती बाबांद्वारे बृहस्पतीची दशा बसली आहे.

गीत:-
इस पाप की दुनिया से...

ओम शांती।
ही पापात्म्यांची हाक आहे. तुम्हाला तर असे बोलवायचे नाही आहे कारण तुम्ही पावन बनत आहात. ही धारण करण्याची गोष्ट आहे. हा खूप जबरदस्त खजिना आहे. जसे शाळेचे शिक्षणसुद्धा खजिना आहे ना. शिक्षणामुळे उदरनिर्वाह चालतो. मुले जाणतात भगवान शिकवत आहेत. ही खूप श्रेष्ठ कमाई आहे कारण एम ऑब्जेक्ट समोर उभे आहे. हा खरा-खरा सत्संग पूर्ण कल्पामध्ये एकदाच होतो, जेव्हा बोलावतात - ‘पतित-पावन या’. आता ते हाका मारत राहतात आणि इथे तुमच्या समोर बसले आहेत. तुम्ही मुले जाणता - आम्ही नवीन दुनियेकरिता पुरुषार्थ करत आहोत, जिथे दुःखाचे नामो-निशाण सुद्धा असणार नाही. तुम्हाला चैन (शांती) मिळते स्वर्गामध्ये. नरकामध्ये थोडीच शांती आहे. हा तर विषय सागर आहे, कलियुग आहे ना. सर्वजण दुःखीच दुःखी आहेत. भ्रष्टाचारातून जन्म घेणारे आहेत म्हणून आत्मा बोलावते - ‘बाबा, आम्ही पतित बनलो आहोत’. पावन बनण्याकरिता गंगेमध्ये स्नान करण्यासाठी जातात. अच्छा, स्नान केले तर पावन झाले पाहिजे ना. मग पदोपदी ठोकरा का खाता? ठोकरा खात-खात शिडी उतरता-उतरता पाप-आत्मा बनतात. ८४ चे रहस्य तुम्हा मुलांना बाबाच बसून समजावून सांगतात इतर धर्माचे तर ८४ जन्म घेत नाहीत. तुमच्याजवळ हे ८४ जन्मांच्या शिडीचे चित्र खूप चांगले बनलेले आहे. गीतेमध्ये कल्पवृक्षाचे सुद्धा चित्र आहे. परंतु भगवंताने गीता कधी ऐकवली, येऊन काय केले, हे काहीच जाणत नाहीत. इतर धर्मांचे आपापल्या धर्मशास्त्राला जाणतात, भारतवासी मात्र अजिबात जाणत नाहीत. बाबा म्हणतात - मी संगमयुगावरच स्वर्गाची स्थापना करण्यासाठी येतो. ड्रामामध्ये बदल होऊ शकत नाही. जे काही ड्रामामध्ये नोंदलेले आहे, ते हुबेहूब होणारच आहे . असे नाही की होऊन पुन्हा बदलून जाणार आहे. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये ड्रामाचे चक्र व्यवस्थित पक्के झाले आहे. या ८४ च्या चक्रातून तुम्ही कधी सुटू शकत नाही अर्थात ही दुनिया कधी नष्ट होऊ शकत नाही. जगाचा इतिहास-भूगोल रिपीट होतच रहातो. हे ८४ चे चक्र (शिडीचे चित्र) खूप आवश्यक आहे. त्रिमूर्ती आणि गोळा (सृष्टीचक्र) ही तर मुख्य चित्रे आहेत. गोळ्यामधे स्पष्ट दाखवलेले आहे - प्रत्येक युग १२५० वर्षांचे आहे. हा जणू आंधळ्यांसमोर आरसा आहे. ८४ जन्मांच्या जन्म-पत्रिकेचा आरसा. बाबा तुम्हा मुलांच्या दशेचे (अवस्थेचे) वर्णन करतात. बाबा तुम्हाला बेहदच्या दशे विषयी सांगतात. आता तुम्हा मुलांवर बृहस्पतीची अविनाशी दशा बसली आहे. बाकी आहे अभ्यासावर अवलंबून. कोणावर बृहस्पतीची, कोणावर फेऱ्याची, कोणावर राहूची दशा बसली आहे. नापास झाले तर राहूची दशा म्हणणार. इथेसुद्धा असे आहेत. श्रीमतानुसार चालत नाहीत त्यामुळे राहूची अविनाशी दशा बसते. ती बृहस्पतीची अविनाशी दशा, तर ही मग राहूची दशा होते. मुलांनी अभ्यासावर पूर्ण लक्ष दिले पाहिजे, यामध्ये बहाणे करता कामा नयेत. ‘सेंटर दूर आहे, असे आहे…’ चालत जाण्यासाठी ६ तास जरी लागले तरी देखील गेले पाहिजे. मनुष्य यात्रांना जातात, किती त्रास सहन करतात. पूर्वी बहुतांशी चालत जात असत, बैलगाडीतून सुद्धा जात होते. ही तर एका शहराची गोष्ट आहे. ही बाबांची किती मोठी युनिव्हर्सिटी आहे, ज्याच्यामुळे तुम्ही हे लक्ष्मी-नारायण बनता. अशा श्रेष्ठ शिक्षणासाठी जर कोणी म्हणेल - ‘दूर पडते, वेळच मिळत नाही!’ तर बाबा काय म्हणतील? हा मुलगा काही लायक नाही. बाबा मुलांची उन्नती करण्यासाठी येतात आणि हे आपलाच सत्यानाश करतात.

श्रीमत सांगते - पवित्र बना, दैवी गुण धारण करा. एकत्र राहून सुद्धा विकारामध्ये जाऊ नका. मध्ये ज्ञान-योगाची तलवार आहे, आम्हाला तर पवित्र दुनियेचे मालक बनायचे आहे. आता तर पतित दुनियेचे मालक आहोत ना. ते देवता डबल मुकुटधारी होते, मग अर्ध्याकल्पानंतर लाईटचा (पवित्रतेच्या प्रकाशाचा) मुकुट नाहीसा होतो. यावेळी कोणावरही लाईटचा मुकुट नाही आहे. फक्त जे धर्म संस्थापक आहेत त्यांच्यावर असू शकतो कारण ते पवित्र आत्मे वरून येऊन शरीरामध्ये प्रवेश करतात. भारत तोच आहे, जिथे डबल मुकुटधारी सुद्धा होते, सिंगल मुकुटधारी सुद्धा होते. अजूनपर्यंत सुद्धा डबल मुकुटधारींसमोर सिंगल मुकुटधारी डोके टेकतात कारण ते पवित्र महाराजा-महाराणी आहेत. महाराजा, राजांपेक्षाही मोठे असतात, त्यांच्याकडे मोठ-मोठ्या जहागिरी असतात. सभेमध्ये महाराजे पुढे आणि राजे नंबरानुसार मागे बसतात. नियम प्रमाण त्यांचा दरबार भरतो. हा देखील ईश्वरीय दरबार आहे, याला इन्द्रसभा असे देखील म्हटले जाते. तुम्ही ज्ञानामुळे पऱ्या बनता. सुंदर असणाऱ्याला परी म्हटले जाते ना. राधे-कृष्णाचे नैसर्गिक सौंदर्य आहे ना, म्हणून सुंदर म्हटले जाते. मग जेव्हा कामचितेवर बसतात तेव्हा ते देखील वेगवेगळ्या नावा-रूपामध्ये येऊन सावळे बनतात. शास्त्रांमध्ये अशा गोष्टी दिलेल्या नाही आहेत. ज्ञान, भक्ती आणि वैराग्य तीन गोष्टी आहेत. ज्ञान सर्वश्रेष्ठ आहे. आता तुम्ही ज्ञान प्राप्त करत आहात. तुम्हाला वैराग्य आहे भक्तीचे. ही सर्व तमोप्रधान दुनिया नष्ट होणार आहे, त्याच्या पासून वैराग्य आहे. जेव्हा नवीन घर बांधतात तेव्हा जुन्याचे वैराग्य येते ना. ती आहे हदची गोष्ट, ही आहे बेहदची गोष्ट. आता बुद्धी नवीन दुनियेकडे आहे. ही आहे जुनी दुनिया नरक, सतयुग-त्रेताला म्हटले जाते शिवालय. शिवबाबांनी स्थापन केले आहे ना. आता या वेश्यालयाची तुम्हाला घृणा येते. खूप जणांना घृणा येत नाही. शादी-बरबादी करून गटारामध्ये कोसळू इच्छितात. सर्व मनुष्य तर आहेत विषय वैतरणी नदीमध्ये, घाणीमध्ये (विकारामध्ये) पडलेले आहेत. एकमेकांना दुःख देत राहतात. गायले देखील जाते - ‘अमृत छोड विष काहे को खाये’. जे काही म्हणतात त्याचा अर्थच समजत नाहीत. तुम्हा मुलांमध्ये देखील नंबरवार आहेत. समजूतदार टीचर तर बघताच क्षणी समजून जाईल की यांची बुद्धी कुठे भटकत आहे, क्लासमध्ये कोणी जांभई देत असतील, डुलक्या काढत असतील तर समजले जाते यांची बुद्धी कुठे घरादाराकडे किंवा धंद्यामध्ये भटकत आहे. जांभई थकल्याचे देखील लक्षण आहे. धंद्यामध्ये मनुष्यांची कमाई होत रहाते तेव्हा तर रात्री १-२ वाजेपर्यंत सुद्धा बसून राहतात, कधीच जांभई येत नाही. इथे बाबा किती खजिने देतात. जांभई येणे नुकसानाचे लक्षण आहे. ज्यांचे दिवाळे निघते ते डुलक्या काढत खूप जांभया देतात. तुम्हाला तर खजिन्या मागून खजिने मिळत राहतात तर किती अटेंशन असले पाहिजे. अभ्यासाच्या वेळी कोणी जांभई दिली तर समजूतदार टीचर समजून जाईल की यांचा बुद्धीयोग दुसरीकडे भटकत आहे. इथे बसलेले असताना देखील घरादाराची आठवण येईल, मुलांची आठवण येईल. इथे तर तुम्हाला भट्टीमध्ये रहायचे असते, इतर कोणाचीही आठवण येता कामा नये. समजा कोणी ६ दिवस भट्टीमध्ये राहिला, आणि शेवटी जर कोणाची आठवण आली, चिठ्ठी लिहिली तर नापास म्हणणार, पुन्हा ७ दिवस भट्टी सुरू करा. ७ दिवस भट्टीमध्ये ठेवतात जेणेकरुन सारे आजार (विकार) निघून जावेत. तुम्ही अर्ध्या कल्पाचे महारोगी आहात. बसल्या-बसल्या अकाली मृत्यू होतो. सतयुगामध्ये असे कधी होत नाही. इथे तर कोणता ना कोणता आजार नक्की होतो. मरतेवेळी यातना झाल्याने ओरडत राहतात. स्वर्गामध्ये जरा सुद्धा दुःख होत नाही. तिथे तर वेळ झाली की समजतात - आता वेळ पूर्ण झाला आहे, आपण हे शरीर सोडून बाळ बनणार. इथे देखील तुम्हाला साक्षात्कार होणार की, आपण हे बनणार. असे खूप जणांना साक्षात्कार होतात. ज्ञानाच्या आधारे सुद्धा ओळखतात की, आम्ही बेगर टू प्रिन्स बनत आहोत. आपले एम ऑब्जेक्टच हे राधे-कृष्ण बनण्याचे आहे. लक्ष्मी-नारायण नाही, राधे-कृष्ण; कारण पूर्ण ५ हजार वर्षे तर यांचेच म्हणणार. लक्ष्मी-नारायणाचे मग तरीही २०-२५ वर्षे कमी होतात त्यामुळे श्रीकृष्णाची, महिमा जास्त आहे. हे देखील कोणाला माहित नाही आहे की, राधे-कृष्णच पुन्हा सो लक्ष्मी-नारायण बनतात. आता तुम्ही मुले समजता, हे शिक्षण आहे. प्रत्येक गावा-गावामध्ये सेंटर्स उघडत जातात. तुमचे हे आहे युनिव्हर्सिटी कम हॉस्पिटल. यासाठी केवळ ३ पावले पृथ्वी पाहिजे. आश्चर्य आहे ना. ज्याच्या भाग्यात असेल तर ते आपल्या रूममध्ये सुद्धा सत्संग चालू करतात. इथे जे खूप पैसेवाले आहेत, त्यांचे पैसे तर सारे मातीत मिसळून जाणार आहेत. तुम्ही बाबांकडून वारसा घेत आहात भविष्य २१ जन्मांकरिता. बाबा स्वतः सांगतात - या जुन्या दुनियेला बघत असतानाही बुद्धीचा योग तिथे लावा, कर्म करत असताना ही प्रॅक्टिस करा. प्रत्येक गोष्ट तपासून पहायची असते ना. तुमची आता प्रॅक्टिस होत आहे. बाबा समजावून सांगत आहेत - नेहमी शुद्ध कर्म करा, कोणतेही अशुद्ध कर्म करू नका. कोणताही आजार (विकार) असेल तर सर्जन बसले आहेत, त्यांच्याशी सल्लामसलत करा. प्रत्येकाचा आजार आपला-आपला आहे, सर्जनकडून तर उत्तम सल्ला मिळेल. विचारू शकता - अशा परिस्थितीमध्ये काय करावे? लक्ष ठेवायचे आहे की, आपल्या कडून कोणतेही विकर्म होणार नाही.

हे देखील गायन आहे - ‘जसे अन्न तसे मन’. मांस खरेदी करणाऱ्यावर, विकणाऱ्यावर, खाऊ घालणाऱ्यावर देखील पाप चढते. पतित-पावन बाबांपासून कोणतीही गोष्ट लपवता कामा नये. सर्जनपासून लपवाल तर आजार बरा कसा होईल. हे आहेत बेहदचे अविनाशी सर्जन. या गोष्टींना दुनिया तर जाणत नाही. तुम्हाला देखील आता नॉलेज मिळत आहे तरी देखील योगामध्ये खूप कमी आहेत. अजिबात आठवण करत नाहीत. हे तर बाबा जाणतात - अशी एका फटक्यात काही आठवण पक्की होणार नाही. नंबरवार तर आहेत ना. जेव्हा आठवणीची यात्रा पूर्ण होईल तेव्हा म्हणणार कर्मातीत अवस्था पूर्ण झाली, मग सर्वबाजूंनी युद्ध सुद्धा सुरु होईल, तोपर्यंत काही ना काही होत राहील आणि बंद होत राहील. युद्ध तर कधीही छेडू शकते. परंतु विवेक सांगतो जोपर्यंत राजाई स्थापन होत नाही तोपर्यंत मोठे युद्ध सुरु होणार नाही. थोडे-थोडे युद्ध होऊन बंद होईल. हे तर कोणीही जाणत नाहीत की राजाई स्थापन होत आहे. सतोप्रधान, सतो, रजो, तमो बुद्धी आहे ना. तुमच्यामध्ये देखील सतोप्रधान बुद्धीवाले चांगल्या रीतीने आठवण करत राहतील. ब्राह्मण तर आता लाखोंच्या संख्येमध्ये असतील परंतु त्यामध्ये देखील सख्खे आणि सावत्र तर आहेत ना. सख्खे चांगली सेवा करतील, आई-वडिलांच्या मतावर चालतील. सावत्र रावणाच्या मतावर चालतील. काही रावणाच्या मतावर, काही रामाच्या मतावर असे लंगडत चालतील. मुलांनी गाणे ऐकले. म्हणतात - ‘बाबा, अशा ठिकाणी घेऊन चला जिथे चैन असेल (शांती असेल)’. स्वर्गामध्ये चैनच चैन आहे, दुःखाचे नाव नाही. स्वर्ग म्हटलेच जाते सतयुगाला. आता तर आहे कलियुग. इथे मग स्वर्ग कुठून आला. तुमची बुद्धी आता स्वच्छ बनत जाते. स्वच्छ बुद्धीवाल्यांना म्लेंछ बुद्धी नमस्कार करतात. पवित्र राहणाऱ्यांचा मान आहे. संन्यासी पवित्र असतात तर गृहस्थी त्यांच्यासमोर डोके टेकवतात. संन्यासी तर विकारातून जन्म घेऊन नंतर मग संन्यासी बनतात. देवतांना तर म्हटलेच जाते संपूर्ण निर्विकारी. संन्याशांना कधी संपूर्ण निर्विकारी म्हणणार नाही. तर तुम्हा मुलांना आतून आनंदाचा पारा खूप चढला पाहिजे. म्हणूनच म्हटले जाते - ‘अतींद्रिय सुख विचारायचे असेल तर गोप-गोपींना विचारा’; ते बाबांकडून वारसा घेत आहेत, शिकत आहेत. इथे सन्मुख ऐकल्यामुळे नशा चढतो मग कोणाचा कायम राहतो, कोणाचा लगेच उडून जातो. संग दोषामुळे नशा स्थायी रहात नाही. तुमच्या सेंटर्सवर असे भरपूर येतात. थोडा नशा चढला मग पार्टी इत्यादीला कुठे गेले, दारू, विडी इत्यादी प्यायला आणि संपला. संगदोष अतिशय वाईट आहे. हंस आणि बगळे एकत्र राहू शकत नाहीत. पती हंस बनतो तर पत्नी बगळा बनते. कुठे मग स्त्री हंस बनते, पती बगळा बनतो. पवित्र बना म्हणाली तर मार खाईल. काही-काही घरांमध्ये सगळे हंस असतात आणि मग चालता-चालता हंसापासून बगळा बनतात. बाबा तर म्हणतात - स्वतःला सर्व सुखदायी बनवा. मुलांना देखील सुखदायी बनवा. हे तर दुःख धाम आहे ना. आता तर खूप संकटे येणार आहेत मग बघा कसे त्राही-त्राही करतील. अरे, बाबा आले, आणि मी बाबांकडून वारसा घेतला नाही मग तर टू लेट होणार. बाबा स्वर्गाची बादशाही देण्यासाठी येतात, ते गमावून बसतात. म्हणून बाबा म्हणतात - बाबांकडे नेहमी मजबूत असणाऱ्यांना घेऊन या. जो स्वतः समजून घेऊन दुसऱ्यांना देखील समजावून सांगू शकेल. बाकी बाबा तर काही फक्त बघण्याची गोष्ट तर नाही आहे. शिवबाबा कुठे दिसून येतात का! स्वतःच्या आत्म्याला बघितले आहे का? फक्त जाणता. तसेच परमात्म्याला देखील जाणायचे आहे. दिव्य दृष्टी शिवाय त्यांना कोणीही पाहू शकत नाही. दिव्य दृष्टीने आता तुम्ही सतयुग बघता मग तिथे प्रत्यक्षामध्ये जायचे आहे. कलियुगाचा विनाश तेव्हा होईल जेव्हा तुम्ही मुले कर्मातीत अवस्थेला पोहोचाल. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) या जुन्या दुनियेला बघत असताना बुद्धीचा योग बाबा आणि नवीन दुनियेकडे लावायचा आहे. कर्मेंद्रियांद्वारे कोणतेही विकर्म होणार नाही यावर लक्ष ठेवायचे आहे. नेहमी शुद्ध कर्म करायची आहेत, आतमध्ये कोणता आजार असेल तर सर्जन कडून सल्ला घ्यायचा आहे.

२) संगदोष अतिशय वाईट आहे, यापासून आपला खूप-खूप सांभाळ करायचा आहे. स्वतःला आणि परिवाराला सुखदायी बनवायचे आहे. अभ्यासाच्या बाबतीत कधीही बहाणा द्यायचा नाही.

वरदान:-
श्रेष्ठ भावनेच्या आधारे सर्वांना शांती, शक्तीची किरणे देणारे विश्वकल्याणकारी भव

जसे बाबांच्या संकल्प आणि बोलमध्ये, नयनांमध्ये सदैव कल्याणाची भावना आणि कामना असते; तसे तुम्हा मुलांच्या संकल्पामध्ये विश्वकल्याणाची भावना आणि कामना भरलेली असावी. कोणतेही कार्य करत असताना विश्वातील सर्व आत्मे इमर्ज व्हावेत. मास्टर ज्ञान सूर्य बनून शुभ भावना आणि श्रेष्ठ कामनेच्या आधारे शांती आणि शक्तीची किरणे देत रहा तेव्हा म्हणणार विश्व कल्याणकारी. परंतु त्यासाठी सर्व बंधनांपासून मुक्त, स्वतंत्र बना.

बोधवाक्य:-
‘मी’पणा आणि ‘माझे’पणा - हाच देह-अभिमानाचा दरवाजा आहे. आता या दरवाजाला बंद करा.

अव्यक्त इशारे - सत्यता आणि सभ्यता रुपी कल्चरला धारण करा:-

सत्यतेची परख आहे संकल्प, बोल, कर्म, संबंध-संपर्क सर्वांमध्ये दिव्यतेची अनुभूती होणे. काहीजण तर म्हणतात मी तर नेहमी खरे बोलतो परंतु बोल आणि कर्मामध्ये जर दिव्यता नसेल तर दुसऱ्यांना तुमचे सत्य, खरे वाटणार नाही त्यामुळे सत्यतेच्या शक्तीद्वारे दिव्यतेला धारण करा. काहीही सहन करावे लागेल, घाबरू नका. सत्य समया नुसार आपोआप सिद्ध होईल.