17-03-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्ही सच्च्या-सच्च्या सत्य बाबांकडून सत्य कथा ऐकून नरापासून नारायण बनत आहात, तुम्हाला २१ जन्मांकरिता बेहदच्या बाबांकडून वारसा मिळतो”

प्रश्न:-
बाबांच्या कोणत्या आज्ञेचे पालन करणारी मुलेच पारस-बुद्धी बनतात?

उत्तर:-
बाबांची आज्ञा आहे - देहाच्या सर्व नात्यांना विसरून बाबांची आणि राजाईची आठवण करा. हेच सद्गतीसाठी सद्गुरूचे श्रीमत आहे. जे या श्रीमताचे पालन करतात अर्थात देही-अभिमानी बनतात तेच पारस-बुद्धी बनतात.

गीत:-
आज अन्धेंरे में हम इन्सान…

ओम शांती।
ही कलियुगी दुनिया आहे. सर्व अंधारामध्ये आहेत, हाच भारत प्रकाशामध्ये होता. जेव्हा हा भारत स्वर्ग होता. हेच भारतवासी जे आता स्वतःला हिंदू संबोधत आहेत, हे मूळ देवी-देवता होते. भारतवासी स्वर्गवासी होते. जेव्हा इतर कोणताच धर्म नव्हता, एकच धर्म होता. स्वर्ग, वैकुंठ, बहिश्त, हेवन ही सर्व भारताचीच नावे होती. भारत अतिशय प्राचीन, पवित्र, अतिशय श्रीमंत होता. आता तर भारत कंगाल आहे कारण आता कलियुग आहे. ते सतयुग होते. तुम्ही सर्व भारतवासी आहात. तुम्ही जाणता आपण अंधारामध्ये आहोत, परंतु जेव्हा स्वर्गामध्ये होतो तर प्रकाशामध्ये होतो. स्वर्गाचे राज-राजेश्वर, राज-राजेश्वरी लक्ष्मी-नारायण होते. त्याला सुखधाम म्हटले जाते. नवीन-नवीन मुले येतात तर बाबा पुन्हा-पुन्हा समजावून सांगतात. बाबांकडूनच तुम्हाला स्वर्गाचा वारसा घ्यायचा आहे, ज्याला जीवनमुक्ती म्हटले जाते. आता सर्व जीवनबंधन मध्ये आहेत. खास भारत आम दुनिया, रावणाचे जेल - शोक वाटिकेमध्ये आहेत. असे नाही की, रावण काही फक्त लंकेमध्येच होता आणि राम भारतामध्ये होते आणि त्याने येऊन सीता चोरली. या सर्व आहेत दंतकथा. गीता आहे मुख्य, सर्व शास्त्रांमध्ये शिरोमणी श्रीमत अर्थात भगवंताने ऐकवलेली गीता. मनुष्य तर कोणाची सद्गती करू शकत नाहीत. सतयुगामध्ये होते जीवनमुक्त देवी-देवता, ज्यांनी हा वारसा कलियुग अंतामध्ये प्राप्त केला होता. भारताला हे माहीत नव्हते, ना कोणत्या शास्त्रामध्ये आहे. शास्त्र तर सर्व आहेत भक्तिमार्गासाठी. ते सर्व भक्तिमार्गाचे ज्ञान आहे. सद्गतीमार्गाचे ज्ञान मनुष्य मात्रामध्ये नाही आहे. बाबा म्हणतात की मनुष्य, मनुष्यांचे गुरु बनू शकत नाहीत. गुरु काही सद्गती देऊ शकत नाही. ते गुरु म्हणतील भक्ती करा, दान-पुण्य करा. भक्ती द्वापरयुगापासून चालत आली आहे. सतयुग-त्रेतामध्ये आहे ज्ञानाचे प्रारब्ध. असे नाही तिथे हे ज्ञान सुरू राहते. हा वारसा जो भारताला मिळाला होता, तो बाबांकडून संगमावरच मिळाला होता. जो आता पुन्हा तुम्हाला मिळत आहे. भारतवासी, नरकवासी महान दु:खी बनतात तेव्हाच बोलावतात - ‘हे पतित-पावन दुःख हर्ता, सुख कर्ता’, परंतु कोणाचा? सर्वांचा, कारण खास भारत आणि आम दुनियेमध्ये ५ विकार आहेतच आहेत. बाबा आहेत पतित-पावन. बाबा म्हणतात मी कल्प-कल्प कल्पाच्या संगमावर येतो आणि सर्वांचा सद्गती दाता बनतो. अबलांचा, अहिल्यांचा, गणिकांचा आणि गुरु लोक जे आहेत त्यांचा देखील उद्धार मलाच करायचा आहे, कारण ही तर आहेच पतित दुनिया. पावन दुनिया सतयुगाला म्हटले जाते. भारतामध्ये या लक्ष्मी-नारायणाचे राज्य होते. हे भारतवासी जाणत नाहीत की हे स्वर्गाचे मालक होते. पतित खंड अर्थात झुठ खंड, पावन खंड अर्थात सच खंड. भारत पावन खंड होता. या लक्ष्मी-नारायणाची सूर्यवंशी डिनायस्टी होती. हा भारत आहे अविनाशी खंड, जो कधी विनाश होत नाही. जेव्हा यांचे राज्य होते तेव्हा इतर कोणताच खंड नव्हता. ते सर्व नंतर येतात. शास्त्रांमध्ये सर्वात मोठी चूक तर हीच केली आहे जे कल्प लाखो वर्षांचे लिहिले आहे. बाबा म्हणतात की, ना कल्प लाखो वर्षांचे असते, ना सतयुग लाखो वर्षाचे असते. कल्पाचा कालावधी ५ हजार वर्षांचाच आहे. ते मग म्हणतात की मनुष्य ८४ लाख जन्म घेतात. मनुष्याला कुत्रा-मांजर इत्यादी बनवले आहे. परंतु त्यांचा जन्म वेगळा आहे. ८४ लाख व्हरायटी आहेत. मनुष्यांची व्हरायटी एकच आहे. त्यांचेच ८४ जन्म आहेत.

बाबा म्हणतात - ‘मुलांनो, तुम्ही आदि सनातन देवी-देवता धर्माचे होता. भारतवासी आपल्या धर्माला ड्रामा प्लॅन अनुसार विसरलेले आहेत. कलियुगाच्या अंतामध्ये अगदीच पतित बनले आहेत. मग बाबा येऊन संगमावर पावन बनवतात, याला म्हटले जाते दुःखधाम. मग पुन्हा सुखधाममध्ये पार्ट असेल. बाबा म्हणतात - ‘माझ्या मुलांनो, तुम्ही भारतवासीच स्वर्गवासी होता. नंतर मग तुम्ही ८४ जन्मांची शिडी उतरता. सतो पासून रजो, तमोमध्ये जरूर यायचे आहे. तुम्हा देवतांइतके श्रीमंत, एव्हरहॅप्पी, एव्हरहेल्दी इतर कोणीच नसतात. भारत किती श्रीमंत होता. हिरे-माणके तर मोठ-मोठ्या दगडांप्रमाणे होते. कित्येक तर तुटून गेले आहेत. बाबा तुम्हा मुलांना आठवण करून देत आहेत की, तुम्हाला किती श्रीमंत बनविले होते. तुम्ही सर्वगुण संपन्न, १६ कला संपूर्ण होता. यथा राजा-राणी… यांना भगवान-भगवती देखील म्हणू शकता. परंतु बाबांनी समजावून सांगितले आहे की, भगवान एक आहेत, ते पिता आहेत. फक्त ईश्वर अथवा प्रभू म्हटल्याने देखील लक्षात येत नाही की ते सर्व आत्म्यांचे पिता आहेत. हे तर आहेत बेहदचे पिता. ते समजावून सांगत आहेत की, तुम्ही भारतवासी शिव जयंती साजरी करता परंतु प्रत्यक्षात बाबा कधी आले होते, ते कोणीही जाणत नाही. आहेतच मुळी आइरन एज्ड, पत्थर-बुद्धी. तुम्ही पारसनाथ होता, यावेळी पत्थरनाथ आहात. नाथ देखील म्हणता येणार नाही कारण राजा-राणी तर नाही आहात. पहिले इथे दैवी राजस्थान होते नंतर मग आसुरी राज्य बनते. हा खेळ आहे. तो आहे हदचा ड्रामा. हा आहे बेहदचा ड्रामा. दुनियेचा इतिहास-भूगोल आदि पासून अंता पर्यंत तुम्ही आता जाणता आहात इतर कोणीही जाणत नाहीत. भारतामध्ये जेव्हा देवी-देवता होते तर साऱ्या सृष्टीचे मालक होते आणि भारतामध्येच होते. बाबा भारतवासीयांना आठवण करून देत आहेत. सतयुगामध्ये आदि सनातन देवी-देवता होते, त्यांचा श्रेष्ठ धर्म, श्रेष्ठ कर्म होते, नंतर मग ८४ जन्मांमध्ये उतरावे लागेल. हे बाबा बसून कथा ऐकवत आहेत की, आता तुमच्या अनेक जन्मांच्या अंताचा जन्म आहे. ही काही एका जन्माची गोष्ट नाहीये. ना युद्धाचे मैदान इत्यादी आहे. भारतवासी हे देखील विसरले आहेत की यांचे (लक्ष्मी-नारायणाचे) राज्य होते. सतयुगाचा कालावधी जास्त वाढविल्याने खूप दूर घेऊन गेले आहेत.

बाबा समजावून सांगत आहेत की, मनुष्याला भगवान म्हणू शकत नाही. मनुष्य, मनुष्याची सद्गती करू शकत नाही. एक म्हण आहे की, ‘सर्वांचा सद्गती दाता पतितांना पावन करणारा एकच आहे’. हा आहे झूठ खंड. सत्य बाबा सचखंड स्थापन करणारे आहेत. भक्त पूजा करतात परंतु भक्तीमार्गामध्ये ते ज्यांची पण पूजा करत आले आहेत, त्यापैकी एकाचीही बायोग्राफी (जीवन चरित्र) जाणत नाहीत. शिव जयंती तर साजरी करतात. बाबा आहेत नवीन दुनियेचे रचयिता, हेविनली गॉडफादर, सुख देणारे. सतयुगामध्ये सुख होते. ते कोणी आणि कसे स्थापन केले? नरकवासींना स्वर्गवासी बनविले. भ्रष्टाचारींना श्रेष्ठाचारी देवता बनविले. हे तर बाबांचेच कार्य आहे. तुम्हा मुलांना पावन बनवतो. तुम्ही स्वर्गाचे मालक बनता. आणि मग तुम्हाला पतित कोण बनवतो? हा रावण. मनुष्य म्हणतात - सुख-दुःख ईश्वर देतात. बाबा म्हणतात - मी तर सर्वांना सुख देतो. मग अर्धा कल्प तुम्ही बाबांची आठवण करणार नाहीत; आणि मग जेव्हा रावण राज्य सुरू होते तेव्हा मग सर्वांची पूजा करु लागतात. हा तुमचा अनेक जन्मांतील अंताचा जन्म आहे. म्हणतात - ‘बाबा, आम्ही किती जन्म घेतले आहेत?’ बाबा म्हणतात - ‘मुलांनो, तुम्ही तुमच्या जन्मांना जाणत नाही. तुम्ही पूर्ण ८४ जन्म घेतले आहेत. तुम्ही २१ जन्मांकरिता बेहदच्या बाबांकडून वारसा घेण्याकरिता आला आहात अर्थात सच्च्या-सच्च्या सत्य बाबांकडून सत्य कथा, नरा पासून नारायण बनण्याचे ज्ञान ऐकत आहात’. हे आहे ज्ञान, ती आहे भक्ती. हे स्पिरिच्युअल नॉलेज सुप्रीम रुह येऊन देतात. मुलांना देही-अभिमानी बनावे लागेल. स्वतःला आत्मा निश्चय करून मामेकम् (मज एकाची) आठवण करा. शिवबाबा तर सर्व आत्म्यांचे पिता आहेत. सर्व आत्मे परमधामहून पार्ट बजावण्याकरिता शरीरामध्ये येतात. याला कर्मक्षेत्र म्हटले जाते. अतिशय जबरदस्त खेळ आहे आत्म्यामध्ये चांगले अथवा वाईट संस्कार असतात. ज्यानुसारच मनुष्याला चांगला किंवा वाईट जन्म मिळतो. हे (ब्रह्मा बाबा) जे पावन होते, आता पतित आहेत, ततत्वम्. मज पित्याला या रावणाच्या परक्या दुनियेमध्ये, परक्या शरीरामध्ये यावे लागते. मी येतो देखील त्याच्यामध्येच जो पहिल्या नंबरमध्ये जाणार आहे. सूर्यवंशी पूर्ण ८४ जन्म घेतात. हे आहेत ब्रह्मा आणि ब्राह्मण. बाबा दररोज समजावून सांगतात, परंतु पत्थर-बुद्धीला पारस-बुद्धी बनविणे काही मावशीचे घर नाहीये. माझ्या आत्म्यांनो, आता देही-अभिमानी बना; माझ्या आत्म्यांनो, एका बाबांची आठवण करा आणि राजाईची आठवण करा. देहाच्या नात्यांना सोडा तेव्हाच पारस-बुद्धी बनाल. मरायचे तर सर्वांनाच आहे. आता सर्वांची वानप्रस्थ अवस्था आहे. सर्वांचा सद्गती दाता एका सद्गुरुशिवाय इतर कोणीही असू शकत नाही.

बाबा म्हणतात - ‘माझ्या भारतवासी मुलांनो, तुम्ही अगोदर पारस-बुद्धी होता. गायले गेले आहे की, ‘आत्मा परमात्मा अलग रहे…’ तर सर्वप्रथम तुम्ही भारतवासी देवी-देवता धर्माचे आला आहात; इतर धर्माचे नंतर आले आहेत त्यामुळे त्यांचे जन्म देखील थोडेच असतात. साऱ्या सृष्टीचे झाड कसे फिरते ते बाबा बसून सांगत आहेत. जे धारणा करू शकतात त्यांच्यासाठी खूप सोपे आहे. आत्मा धारण करते. पुण्य-आत्मा आणि पापा-आत्मा तर आत्माच बनते. तुमचा अंतिम ८४ वां जन्म आहे. तुम्ही वानप्रस्थ अवस्थेमध्ये आहात. वानप्रस्थ अवस्था असणारे मंत्र घेण्याकरिता गुरू करतात. तुम्हाला आता बाहेरचा मानवी गुरु करायचा नाही आहे. तुम्हा सर्वांचा मी पिता, टिचर, सद्गुरु आहे. मला म्हणतातच मुळी - ‘हे पतित-पावन शिवबाबा’. आता स्मृती आली आहे, सर्व आत्म्यांचे हे पिता आहेत. आत्मा सत्य आहे, चैतन्य आहे कारण अमर आहे. सर्व आत्म्यांमध्ये पार्ट भरलेला आहे. बाबा देखील सत्य चैतन्य आहेत. ते मनुष्य सृष्टीचे बीज रूप असल्या कारणाने म्हणतात की, मी संपूर्ण झाडाच्या आदि-मध्य-अंताला जाणतो, म्हणून मला नॉलेजफुल म्हटले जाते. तुम्हाला देखील सारे नॉलेज आहे की बीजातून झाड कसे उगवते. झाड वाढण्यासाठी वेळ तर लागतो. बाबा म्हणतात की, मी बीजरुप आहे. शेवटी मग सारे झाड जडजडीभुत अवस्थेला प्राप्त होते. आता पहा देवी-देवता धर्माचे फाउंडेशनच राहिलेले नाही आहे. प्राय: लोप झाले आहे. जेव्हा देवी-देवता धर्म नष्ट होतो होतो तेव्हा बाबांना यावे लागते. एका धर्माची स्थापना करून बाकी सर्वांचा विनाश करवतात. प्रजापिता ब्रह्माद्वारे बाबा स्थापना करत आहेत - आदि सनातन देवी-देवता धर्माची. तुम्ही आला आहात भ्रष्टाचारी पासून श्रेष्ठाचारी देवता बनण्याकरिता. हा ड्रामा बनलेला आहे, याचा कधीही शेवट होत नाही. बाबा येतात. सर्व आत्मे ब्रदर्स आहेत, मूलवतनमध्ये राहणारे आहेत. जे त्या एका पित्याची सर्व जण आठवण करतात. ‘दुःख में सिमरण सब करें…’ रावण राज्यामध्ये दुःख आहे त्यामुळे इथे त्यांचे स्मरण करतात; तर बाबा सर्वांचा सद्गुती दाता एक आहे. त्यांची महिमा आहे. बाबा जर आले नाहीत तर पावन कोण बनवणार. ख्रिश्चन, इस्लामी इत्यादी जे कोणी मनुष्य आहेत ते सर्व यावेळी तमोप्रधान आहेत. सर्वांना पुनर्जन्म जरूर घ्यायचा आहे. आता पुनर्जन्म मिळतो नरकामध्ये. असे नाही की सुखामध्ये निघून जातात. जसे हिंदू धर्माचे म्हणतात की स्वर्गवासी झाला, तर जरूर नरकामध्ये होता ना. आता स्वर्गामध्ये गेला, तुमच्या मुखांमध्ये गुलाब. जर का स्वर्गवासी झाला तर मग त्याला नरकातील आसुरी पक्वान्ने का खाऊ घालता! पित्र खाऊ घालतात ना. बंगालमध्ये मासे, अंडी इत्यादी खातात. अरे त्यांना हे सर्व खाण्याची काय गरज आहे! असे परत आपल्या घरी कोणीही जाऊ शकत नाही. जेव्हा की पहिल्या नंबर वाल्यांना ८४ जन्म घ्यावे लागतात. या ज्ञानामध्ये अजिबात त्रास नाही. भक्तिमार्गामध्ये किती मेहनत करावी लागते. राम-राम जपता-जपता अंग रोमांचीत होते. हा सर्व आहे भक्तिमार्ग. हे सूर्य-चंद्र इत्यादी प्रकाश देणारे आहेत, हे देवता थोडेच आहेत! वास्तविक ज्ञान सूर्य, ज्ञान चंद्रमा आणि ज्ञान सितारे ही सारी इथलीच महिमा आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) या अंतिम ८४ व्या जन्मामध्ये कोणतेही पाप कर्म (विकर्म) करायचे नाही. पुण्य आत्मा बनण्याचा पूर्णतः पुरुषार्थ करायचा आहे. संपूर्ण पावन बनायचे आहे.

२) आपल्या बुद्धीला पारस-बुद्धी बनविण्याकरिता देहाच्या सर्व नात्यांना विसरून देही-अभिमानी बनण्याचा अभ्यास करायचा आहे.

वरदान:-
जुन्या संस्कारांपासून अथवा विघ्नांपासून मुक्ती प्राप्त करणारे सदा शक्तिसंपन्न भव

कोणत्याही प्रकारच्या विघ्नांपासून, कमजोरींपासून किंवा जुन्या संस्कारांपासून मुक्ती हवी असेल तर शक्ती धारण करा अर्थात अलंकारी रूप होऊन राहा. जे अलंकारांनी नेहमी सजलेले राहतात ते भविष्यामध्ये विष्णू वंशी बनतात, परंतु आता वैष्णव बनतात. त्यांना कोणताही तमोगुणी संकल्प अथवा संस्कार टच करू शकत नाही. ते जुनी दुनिया अथवा दुनियेतील कोणतीही वस्तू आणि व्यक्तींपासून सहजच किनारा करतात (दूर राहतात), त्यांना कारणे अकारणे सुद्धा कोणीही टच करू शकत नाही.

बोधवाक्य:-
प्रत्येकवेळी प्रत्येक कर्मामध्ये बॅलन्स ठेवणे हेच सर्वांचे आशीर्वाद प्राप्त करण्याचे साधन आहे.

हे अव्यक्त इशारे - “निश्चयाच्या फाउंडेशनला मजबूत करून सदैव निर्भय आणि निश्चिंत रहा” जसे दोन जिवलग मित्र असतात तर त्यांच्यामध्ये जर कोणी त्यांची निंदा करण्यासाठी येतो तर ते त्याच्या भावाला बदलून टाकतात. जिथे निश्चय असतो तिथे शब्दाचा भाव बदलून साधारण गोष्ट होते. तर प्रत्येकाच्या विशेषतेला पहा, तेव्हाच अनेक असून देखील एक असल्याचे दिसून याल. एकमत संघटन होईल. कोणी कोणाच्या निंदात्मक गोष्टी ऐकवत असतील तर त्याला पुष्टी देण्याऐवजी ऐकविणाऱ्याचे रूप परिवर्तन करा.