17-04-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड मुलांनो - पावन
बना तेव्हाच तुम्ही रूहानी सेवेच्या लायक बनाल, देही-अभिमानी मुलेच रूहानी यात्रेवर
राहतील आणि इतरांना देखील हीच यात्रा करायला सांगतील”
प्रश्न:-
संगमावर तुम्ही
मुले जी कमाई करता, हीच खरी कमाई आहे - ती कशी?
उत्तर:-
आताची जी कमाई आहे ती २१ जन्मांपर्यंत चालते, या कमाईचे कधीही दिवाळे निघत नाही.
ज्ञान ऐकणे आणि इतरांनाही ऐकविणे, आठवण करणे आणि करविणे - हीच आहे खरी-खरी कमाई, जी
सच्चे बाबाच तुम्हाला शिकवतात. अशी कमाई साऱ्या कल्पामध्ये कोणीही करू शकत नाही.
इतर कोणतीही कमाई सोबत येत नाही.
गीत:-
हमें उन राहों
पर चलना है…
ओम शांती।
भक्ती मार्गामध्ये तर मुलांनी खूप खस्ता खाल्ल्या आहेत. भक्तिमार्गामध्ये अतिशय
भावनेने यात्रा करण्यासाठी जातात, रामायण इत्यादी ऐकतात. इतक्या प्रेमाने बसून कथा
ऐकतात की रडायला देखील येते. आमच्या भगवंताची सीता भगवतीला रावण डाकूने पळवून नेले.
मग ऐकत असताना रडत बसतात. या आहेत सर्व दंतकथा, ज्यामुळे फायदा काहीच नाही.
बोलावतात देखील - ‘हे पतित-पावन या, येऊन आम्हा दुःखी आत्म्यांना सुखी बनवा’. हे
समजत नाहीत की आत्मा दु:खी होते कारण ते तर आत्मा निर्लेप आहे असे म्हणतात. समजतात
की, आत्मा सुख-दुःखा पासून न्यारी आहे. असे का बरे म्हणतात? कारण समजतात की परमात्मा
सुख-दुःखा पासून न्यारे आहेत, तर मग मुले सुख दुःखामध्ये कशी बरे येतील? आता या
सर्व गोष्टी मुलांना समजल्या आहेत. या ज्ञान मार्गामध्ये देखील कधी ग्रहचारी बसते,
तर कधी काय होते. कधी प्रफुल्लीत असतात, कधी कोमजलेला चेहरा असतो. असे मायेशी युद्ध
चालू असते. मायेवरच विजय प्राप्त करायचा आहे. जेव्हा कोणी बेशुद्ध पडतात तर तेव्हा
संजीवनी बुटी दिली जाते - मनमनाभव. भक्तीमार्गामध्ये दिखावा खूप आहे. देवतांच्या
मुर्त्यांचा किती शृंगार करतात, खरे दागिने घालतात. ते दागिने तर ठाकूरची प्रॉपर्टी
झाली. ठाकूरची प्रॉपर्टी सो पुजारी किंवा ट्रस्टची होते. तुम्ही मुले जाणता की आपण
चैतन्यमध्ये खूप हिरे-माणकांनी सजलेले होतो. मग जेव्हा पुजारी बनतो तेव्हा देखील
खूप दागिने घालतो. आता काहीच नाही आहे. चैतन्य रूपामध्ये देखील घातले आणि जड
रूपामध्ये देखील घातले. आता अजिबात दागिने नाहीत. एकदम साधारण आहोत. बाबा म्हणतात -
मी साधारण तनामध्ये येतो. कोणताच राजाई इत्यादीचा थाट-माट नाही आहे. संन्याशांचा
देखील खूप थाट-माट असतो. आता तुम्हाला समजले आहे - खरोखर सतयुगामध्ये आपण आत्मे कसे
पवित्र होतो. आमची शरीरे देखील पवित्र होती. त्यांचा शृंगार देखील खूप सुंदर असायचा.
कोणी खूप सुंदर असतात तर त्यांना शृंगार करण्याची देखील आवड राहते. तुम्ही देखील
सुंदर होता तेव्हा खूप चांगले-चांगले दागिने घालत होता, हिऱ्यांचे मोठ-मोठे हार
इत्यादी घालत होता. इथे प्रत्येक वस्तू काळी (पतित) आहे. आता बघा, गायी देखील काळ्या
होत गेल्या आहेत. बाबा (ब्रह्मा बाबा) जेव्हा श्रीनाथद्वारेला गेले होते तेव्हा खूप
सुंदर गायी होत्या. श्रीकृष्णाच्या गाई खूप सुंदर दाखवतात. इथे तर पहा कोणी कसे,
कोणी कसे आहेत कारण कलियुग आहे. अशा गाई तिथे नसतात. तुम्ही मुले विश्वाचे मालक बनता.
तिथे तुमचे सौंदर्य देखील इतके सुंदर असते. विचार करा - गाई तर जरूर असायला हव्यात.
तिथल्या गाईंचे शेण देखील कसे असेल. किती ताकद असेल. जमिनीला खत पाहिजे ना. खत
टाकतात तेव्हाच सुपीक धान्य तयार होते. तिथे सर्व वस्तू चांगल्या ताकदवाल्या असतात.
इथे तर कुठल्याच वस्तूमध्ये ताकद राहिलेली नाहीये. प्रत्येक वस्तू अगदीच शक्तिहीन
झाली आहे. मुली सूक्ष्मवतनमध्ये जात होत्या. तर तिथे किती खूप चांगली मोठी फळे खात
होत्या, शुबीरस इत्यादी पीत होत्या. हा सर्व साक्षात्कार घडवत होते. तिथे माळी फळे
इत्यादी कशी तोडून देत होते. सूक्ष्मवतनमध्ये काही फळे इत्यादी असू शकत नाहीत. हा
फक्त साक्षात्कार होतो. वैकुंठ तर तरीही इथेच असणार ना. मनुष्य समजतात वैकुंठ वर
कुठेतरी आहे. वैकुंठ ना सूक्ष्मवतनमध्ये असतो, ना मूलवतनमध्ये असतो. इथेच असतो. इथे
मुलींना जो साक्षात्कार होत असे तो मग प्रत्यक्षात या डोळ्यांनी पहाल. जशी पोझीशन (जशी
प्रतिष्ठा) तशीच त्यांची साधने देखील असतात. राजांचे महाल बघा कसे सुंदर-सुंदर
असतात. जयपुरमध्ये खूप सुंदर-सुंदर महाल बनलेले आहेत. केवळ महाल बघण्यासाठी लोक
जातात तरी देखील तिकीट असते. खास महाल बघण्यासाठी तो जतन करून ठेवतात. स्वतः मग
दुसरीकडे महालांमध्ये राहतात, ते देखील आता कलियुगामध्ये. ही आहेच पतित दुनिया. कोणी
स्वतःला असे पतित समजतात थोडेच. तुम्ही आता समजता - आपण तर पतित होतो, काहीच कामाचे
नव्हतो, आता मग आम्ही गोरे बनणार. ते दुनियाच फर्स्ट क्लास असेल. इथे भले अमेरिका
इत्यादी ठिकाणी फर्स्ट क्लास महाल आहेत. परंतु तिथल्या (स्वर्गातील महालांच्या)
तुलनेत हे तर काहीच नाहीत, कारण हे तर अल्प काळाचे सुख देणारे आहेत. तिथे तर फर्स्ट
क्लास महाल असतात. फर्स्ट क्लास गाई असतात. तिथे गोपाळ (गायींची राखण करणारे) देखील
असतात. श्रीकृष्णाला ‘गोपाळ’ म्हणतात ना. इथे जे गायींची राखण करणारे आहेत ते
म्हणतात आम्ही गुर्जर (गोपाळ) आहोत. श्रीकृष्णाचे वंशज आहोत. वास्तविक श्रीकृष्णाचे
वंशज म्हणणार नाही. श्रीकृष्णाच्या राजधानीचे म्हणता येईल. श्रीमंतांकडे गाई असतील
तर गुर्जर (गुरे राखणारे) देखील असतीलच. हे गुर्जर नाव सतयुगातील आहे. कालचीच गोष्ट
आहे. कालच आपण आदि सनातन देवी-देवता धर्माचे होतो; मग पतित बनलो आहोत तर स्वतःला
हिंदू संबोधतो. जिज्ञासूंना विचारा, तुम्ही आदि सनातन देवी-देवता धर्माचे आहात की
हिंदू धर्माचे आहात? आजकाल तर सगळेच हिंदू लिहितात. हिंदू धर्म कोणी स्थापन केला?
देवी-देवता धर्म कोणी स्थापन केला? हे देखील कोणीही जाणत नाहीत. बाबा हा प्रश्न
विचारत आहेत - ‘सांगा, आदि सनातन देवी-देवता धर्म कोणी स्थापन केला? शिवबाबा ब्रह्मा
द्वारे करत आहेत. राम अथवा शिवबाबांच्या श्रीमतावर आदि सनातन देवी-देवता धर्म
स्थापन झाला. नंतर मग रावण राज्य होते तर विकारांमध्ये जातात. भक्तिमार्ग सुरू होतो
तेव्हा हिंदू म्हणण्यास सुरूवात करतात. आता स्वतःला कोणीही देवता म्हणू शकत नाहीत.
रावणाने विशश (विकारी) बनवले आहे, बाबा येऊन वाईसलेस (निर्विकारी) बनवतात. आता
तुम्ही ईश्वरीय मताद्वारे देवता बनता. बाबाच येऊन तुम्हा ब्राह्मणांना देवता बनवतात.
शिडी कशी उतरतो, हे तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये नंबरवार लक्षात येते. तुम्ही जाणता
इतर सर्व मनुष्य आसुरी मतावर चालत आहेत आणि तुम्ही ईश्वरीय मतावर चालत आहात.
रावणाच्या मता द्वारे शिडी उतरत आला आहात. ८४ जन्मा नंतर मग पहिल्या नंबरचा जन्म
होईल. ईश्वरीय बुद्धीद्वारे तुम्ही साऱ्या सृष्टीच्या आदि-मध्य-अंताचे ज्ञान जाणता.
हे तुमचे जीवन खूप अमूल्य आहे, यांची बहाद्दुरी आहे. जेव्हा की बाबा येऊन आपल्याला
इतके पावन बनवतात. आपण रूहानी सेवेच्या लायक बनतो. ते आहेत जिस्मानी सोशल वर्कर (भौतिक
समाज सेवक), जे देह-अभिमानामध्ये राहतात. तुम्ही देही-अभिमानी आहात. आत्म्यांना
रूहानी यात्रेवर घेऊन जाता. बाबा समजावून सांगत आहेत - तुम्ही सतोप्रधान होता, आता
तमोप्रधान बनले आहात. सतोप्रधान असणाऱ्याला पावन, तमोप्रधान असणाऱ्याला पतित म्हटले
जाते. आत्म्यामध्येच भेसळ पडली आहे. आत्म्यालाच सतोप्रधान बनवायचे आहे. जितके
आठवणीमध्ये रहाल तितके पवित्र बनाल. नाही तर कमी पवित्र बनाल. पापांचे ओझे डोक्यावर
तसेच राहील. सर्व आत्मे तर पवित्रच असतात आणि मग प्रत्येकाचा पार्ट वेगळा आहे.
सर्वांचा एक सारखा पार्ट असू शकत नाही. सर्वात श्रेष्ठ बाबांचा पार्ट आहे, आणि मग
ब्रह्मा-सरस्वतीचा किती मोठा पार्ट आहे. जे स्थापना करतात, तेच पालना देखील करतात.
मोठा पार्ट त्यांचा आहे. पहिले आहेत शिवबाबा नंतर आहेत ब्रह्मा-सरस्वती, जे
पुनर्जन्मामध्ये येतात. शंकर तर केवळ सूक्ष्म रूप धारण करतात. असे नाही की शंकर
कोणाच्या शरीराचे लोन घेतात. श्रीकृष्णाला त्यांचे स्वतःचे शरीर आहे. इथे फक्त
शिवबाबा शरीराचे लोन (आधार) घेतात. पतित शरीर, पतित दुनियेमध्ये येऊन
मुक्ती-जीवनमुक्ती मध्ये घेऊन जाण्याची सेवा करतात. पहिले मुक्तीमध्ये जावे लागेल.
नॉलेजफुल एक बाबाच पतित-पावन आहेत, त्यांनाच म्हटले आहे - शिवबाबा. शंकराला बाबा
म्हणणे शोभणार नाही. ‘शिवबाबा’ शब्द खूप गोड आहे. शिवबाबांवर कोणी धोत्र्याचे फुल
वाहतात, कोणी काय वाहतात. कोणी दूध सुद्धा वाहतात.
बाबा मुलांना अनेक
प्रकारे ज्ञान स्पष्ट करून सांगत राहतात. मुलांसाठीच समजावून सांगितले जाते, सर्व
काही योगावर अवलंबून आहे. योगाद्वारेच विकर्म विनाश होतील. योग असणाऱ्याला ज्ञानाची
धारणा देखील चांगली होईल. आपल्या धारणेवर चालत राहतील कारण मग इतरांना देखील हे
ज्ञान ऐकवावे लागते. ही आहे नवीन गोष्ट - भगवंताने ज्यांना डायरेक्ट ऐकवले आहे,
त्यांनीच ऐकले नंतर मग हे ज्ञान राहतही नाही. आता बाबा तुम्हाला जे ऐकवत आहेत ते आता
तुम्ही ऐकत आहात. धारणा होते त्यानंतर मग प्रारब्धाचा पार्ट बजावायचा असतो. ज्ञान
ऐकणे आणि इतरांना ऐकविणे हे आताच होते. हा पार्ट सतयुगामध्ये असणारही नाही. तिथे तर
आहेच प्रारब्धाचा पार्ट. मनुष्य बॅरिस्टरी शिकतात मग बॅरिस्टर बनून कमाई करतात. ही
किती मोठी कमाई आहे, याला दुनियावाले जाणत नाहीत. तुम्ही जाणता खरे बाबा आपल्याला
खरी कमाई करून देत आहेत. यांचे कधीही दिवाळे निघू शकत नाही. आता तुम्ही खरी कमाई
करत आहात. ही मग २१ जन्म तुमच्यासोबत राहते. ती कमाई काही साथ देत नाही. ही साथ
देणारी आहे तर अशा कमाईला आपणही साथ दिली पाहिजे. या गोष्टी तुमच्याशिवाय इतर
कोणाच्याच बुद्धीमध्ये नाहीत. तुमच्यामध्ये देखील कोणी वारंवार विसरून जातात.
बाबांना आणि वारशाला विसरता कामा नये. बस्स, गोष्ट एकच आहे. बाबांची आठवण करा. ज्या
बाबांकडून २१ जन्मांचा वारसा मिळतो, २१ जन्म निरोगी काया राहते. वृद्ध अवस्थे
पर्यंत अकाली मृत्यू होत नाही. मुलांना किती आनंद झाला पाहिजे. बाबांची आठवण आहे
मुख्य, यामध्येच माया विघ्न टाकते. वादळे घेऊन येते. अनेक प्रकारची वादळे येतात.
तुम्ही म्हणाल - बाबांची आठवण करावी, परंतु करू शकणार नाही. आठवणीमध्येच खूपजण
नापास होतात. भरपूर जणांमध्ये योगाची कमी आहे. जितके शक्य होईल, योगामध्ये मजबूत
बनले पाहिजे. बाकी बीज आणि झाडाचे ज्ञान काही मोठी गोष्ट नाहीये.
बाबा म्हणतात - माझी
आठवण करा. माझी आठवण केल्याने, मला जाणल्याने तुम्ही सर्व काही जाणू शकाल. आठवणी
मध्येच सर्व काही भरलेले आहे. स्वीट बाबा, शिवबाबांची आठवण करायची आहे. उच्च ते
उच्च आहेत भगवान. श्रेष्ठ ते श्रेष्ठ तेच आहेत. २१ जन्मांकरिता उच्च ते उच्च वारसा
देतात. कायमचे सुखी अमर बनवतात. तुम्ही अमरपुरीचे मालक बनता. तर अशा बाबांची खुप
आठवण केली पाहिजे. बाबांची आठवण केली नाहीत तर बाकीचे सर्व काही आठवेल. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) हे ईश्वरीय
जीवन खूप-खूप अमूल्य आहे, या जीवनामध्ये आत्मा आणि शरीर दोन्हीला पावन बनवायचे आहे.
रुहानी यात्रेमध्ये राहून इतरांनाही हीच यात्रा शिकवायची आहे.
२) जितके शक्य होईल -
खऱ्या कमाईला लागायचे आहे. निरोगी बनण्याकरिता आठवणीमध्ये मजबूत बनायचे आहे.
वरदान:-
शरीराला अमानत
समजून ईश्वरीय सेवेसाठी कार्यामध्ये वापरणारे नष्टोमोहा भव
जसे कोणाची अमानत असते,
तर अमानतमध्ये ‘माझे’पणा नसतो, मोह देखील नसतो. तर हे शरीर देखील ईश्वरीय सेवेसाठी
एक अमानत आहे. हीच अमानत रूहानी बाबांनी दिली आहे तर जरूर रुहानी बाबांची आठवण
राहील. अमानत समजल्याने रूहानियत येईल. ‘माझे’पणाचा मोह राहणार नाही. हाच निरंतर
योगी, नष्टोमोहा बनण्याचा सोपा उपाय आहे. तर आता रुहानियतच्या स्थितीला प्रत्यक्ष
करा.
बोधवाक्य:-
वानप्रस्थ
स्थितीमध्ये जायचे असेल तर दृष्टी-वृत्तीमध्ये देखील पवित्रतेला अंडरलाईन करा.
हे अव्यक्त इशारे -
महान बनण्याकरिता मधुरतेचा आणि नम्रतेचा गुण धारण करा.
तुमचा प्रत्येक शब्द
महान असावा. प्रत्येक मनसा संकल्प प्रत्येक आत्म्याप्रति मधुर असावा. प्रत्येकाला
पुढे नेण्याचा स्वभाव, मधुरतेचा स्वभाव, निर्माणतेचा स्वभाव असावा. माझा स्वभाव असा
आहे, असे कधीही बोलायचे नाही. ‘माझे’ कुठून आले! ‘माझा जोरात बोलण्याचा स्वभाव आहे,
माझा आवेशामध्ये येण्याचा स्वभाव आहे’. स्वभावाच्या आधीन होणे हीच माया आहे. आता
मायाजीत बना. अभिमान किंवा दिल शिकस्त होण्याच्या, ईर्ष्या किंवा आवेशामध्ये
येण्याच्या स्वभावाला परिवर्तन करा.