17-05-26 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
11.02.2010 ओम शान्ति
मधुबन
“शिवबाबांच्या
जन्मदिवसानिमित्त क्रोध रूपी अकचे फूल बापदादांना अर्पण करून दर्पण बना, पवित्र
प्रवृत्तीच्या प्रत्यक्ष प्रमाणा द्वारे प्रत्यक्षतेला समीप आणा”
आज सर्व मुले सन्मुख
बसलेली आणि देश-विदेशामध्ये बसलेली चोहों बाजूंची मुले अत्यंत आनंदाने बाबांचा आणि
स्वतःचा जन्मदिवस साजरा करण्याच्या अनेकानेक शुभेच्छा, मुबारक देत आहेत. तुम्ही
सन्मुख बसलेले आहात आणि दूरदूरहून सायन्सच्या साधनांद्वारे सर्व मुले खूप आनंदाने
मनापासून मुबारक देत आहेत. तुम्ही सर्व जे पण इथे आला आहात ते बाबांचा जन्मदिवस
साजरा करण्यासाठी आला आहात की स्वतःचा सुद्धा साजरा करण्यासाठी आला आहात? कारण ही
जयंती विचित्र जयंती आहे, ही जयंती विचित्र का आहे? पित्याची आणि मुलांची एकत्र
जयंती आहे. संपूर्ण कल्पामध्ये अशी जयंती होतच नाही. संपूर्ण कल्पामध्ये फेरी मारून
या. विचित्र जयंती आहे. तर बापदादा सर्व मुलांना विचारत आहेत की, तुम्ही सर्व
बाबांना शुभेच्छा देण्यासाठी आला आहात की बाबांकडून शुभेच्छा घेण्यासाठी आला आहात?
बापदादा एकटे काहीच करत नाहीत कारण जन्म घेताच यज्ञ रचला, तर यज्ञामध्ये ब्राह्मण
हवेत. तर तुमचा देखील जन्म बाबांसोबत झाला. याचे यादगार (आठवण) भक्तीमध्ये देखील
शिवरात्री साजरी करतात; आणि सोबत शाळीग्रामांची देखील पूजा होते. अनेकानेक
शाळीग्रामांना पूजतात. म्हणून ही जयंती वंडरफुल जयंती आहे म्हणून या जयंतीला हिरे
तुल्य जयंती म्हटले जाते. तर बापदादा सर्व सोबती मुलांना पद्म-पद्म पटीने बहुरुपी
हारामध्ये पद्म-पद्मपटीने मुबारक देत आहेत. ही देखील बाबा आणि मुलांच्या मनातील
अतूट प्रेमाची निशाणी आहे.
बापदादांचा मुलांसोबत
हा वायदा आहे की, ‘सोबत राहणार, सोबत जाणार’. तर बोला, मुलांचा देखील बाबांसोबत
वायदा आहे ना! की, संगमावर सोबत आहोत, सोबत राहायचे देखील आहे, विश्व सेवा देखील
सोबतच करायची आहे. राहायचे देखील सोबत आहे, उडायचे देखील आहे ते सोबतच. तर बोला,
तुमचा देखील वायदा आहे ना की, सोबत राहणार, सोबत जाणार आणि ब्रह्मा बाबांसोबत
विश्वावर राज्य करणार. वायदा आहे? पक्का वायदा आहे का? हीच विशेषता या शिवजयंतीची
आहे.
बापदादांनी
अमृतवेलेपासून पाहिले की, वेगवेगळ्या ठिकाणची मुले अतिशय आनंदाने मुबारक, शुभेच्छा
पाठवत होती. तुम्ही तर आता सन्मुख शुभेच्छा देतही आहात आणि घेतही आहात. देणे आणि
घेणे सोबतच आहे. भगवंताची किती भाग्यवान मुले आहेत जी सन्मुख बसून बर्थ-डे साजरा
करत आहेत. सर्वांचे चेहरे प्रफुल्लित, आनंदामध्ये उडताना दिसत आहेत. एकीकडे बापदादा
मुलांचे भाग्य पाहत आहेत आणि दुसरीकडे भक्तांना देखील पाहत आहेत. ते अजूनही बोलावत
आहेत - ‘या’ आणि तुम्ही सोबत साजरा करत आहात. बापदादांनी पाहिले की भक्तांची अनुभूती
देखील काही कमी नाहीये. जे प्रॅक्टिकलमध्ये तुम्ही करत आहात त्याची यादगार रूपामध्ये
(प्रतिरूपामध्ये) त्यांनी किती चांगल्या पद्धतीने प्रतिकृती बनविली आहे.
तुम्ही व्रत घेतले आहे,
तर त्यांनी देखील व्रताचे यादगार (अनुकरण) केले आहे. ते एक दिवस किंवा थोड्या
काळासाठी व्रत घेतात, परंतु तुम्ही कोणते व्रत घेतले आहे? सर्वांनी बाबांसमोर व्रत
घेण्याचे वचन दिले आहे ना! तुम्ही बाबांकडून आनंदाने व्रत घेतले आहे की, बाबा आम्ही
या संपूर्ण जन्मासाठी, ब्राह्मण जन्मासाठी व्रत धारण करू, व्रत धारण केले आहे ना!
कोणते व्रत? पवित्रतेचे. एका जन्मासाठी व्रत घेतले आहे, परंतु एका जन्माचे
पवित्रतेचे व्रत २१ जन्म चालेल. ते (भक्त) थोड्या वेळासाठी खाण्या-पिण्याचे व्रत
घेतात आणि जागरणाचे कार्य करतात. परंतु आता तुमच्या एका जन्माच्या जागरणामुळे
सर्वजण अंधारातून प्रकाशामध्ये आले आहेत आणि हे जागरण देखील तुमचे २१ जन्म चालेल.
आता तुम्ही असे जागरण केले आहे ज्यामुळे सारे विश्व तुमच्या जागरणामुळे प्रकाशमय
बनून राहील. दुःख, अशांतीचा कोणताही अंधार राहणार नाही. तर बोला, तुम्ही संपूर्ण
विश्वाला अंधारातून प्रकाशामध्ये आणले आहे, हे बेहदचे व्रत चांगले वाटते ना? मेहनत
तर वाटत नाही? सोपे आहे की कठीण आहे? सोपे वाटते! ज्यांना सोपे वाटते त्यांनी हात
वर करा. कधी-कधी कठीण तर वाटत नाही ना? कधी वाटते का? नाही, कारण तुम्ही जाणता की
पवित्रता हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे; त्यामुळे पवित्रता केवळ ब्रह्मचर्य नाही
परंतु मन-वाणी-कर्म आणि संबंध-संपर्कामध्ये देखील पवित्रता. पवित्रतेचे संस्कार
सहजपणे धारण करणारे आहात. मग पवित्रतेचा संकल्प तर केला आहे परंतु आता समयानुसार
बापदादा वेळेची वॉर्निंग तर देत आहेत. तर जसे पवित्रतेचे व्रत हिंमत ठेवून आपला
स्वधर्म समजून धारण केले आहे, तसेच दुसरे जे भूत (विकार) आहे ते म्हणजे - क्रोध; तर
आज बापदादा हे विचारत आहेत की एका महाभूताचे (काम विकाराचे) व्रत घेऊन वृत्ती
बदललीत परंतु दुसरे जे भूत आहे क्रोधाचे, तर क्रोधाच्या भूतावर देखील विजय मिळविणे,
याचा देखील संकल्प केला आहे का? की दुसरा विकार आहे म्हणून सूट आहे? कारण क्रोध
सर्वांच्या कनेक्शनमध्ये येतो. तर आजच्या दिवशी, जेव्हाही जन्मदिवस साजरा करतात
तेव्हा एकमेकांना गिफ्ट सुद्धा देतात. तर आज बापदादांची हीच इच्छा आहे की, जसे
हिंमतीने आणि बाबांच्या मदतीने पहिल्या नंबरवर (काम विकारावर) मेजॉरिटी विजय
प्राप्त करून चालत आहात, मग त्याचप्रमाणे क्रोधावर देखील विजय मिळवता येईल का? कारण
कोणतेही भूत हैराण तर करतेच आणि क्रोधाचे भूत दुसऱ्यांच्या कनेक्शनमध्ये गेल्यावर
येते (दुसऱ्यांच्या संबंध-संपर्कात गेल्यावर येते), संपर्कामध्ये आल्यावर येते.
आपल्या मनामध्ये देखील जेव्हा क्रोध येतो तेव्हा स्वतः देखील क्रोधापुढे लाचार होता.
तर बाबांचा बर्थ-डे साजरा करायला आला आहात, तर आज बापदादा भले मग भारतीय असो किंवा
परदेशातील असो, सर्व मुलांकडून क्रोधाची गिफ्ट घेऊ इच्छित आहेत. होऊ शकते? होऊ शकते
का? जे समजतात की, आजच्या दिवशी बाबांना हा क्रोध गिफ्टमध्ये देऊ शकतो; मनात सुद्धा
राहणार नाही आणि स्वप्नात सुद्धा येणार नाही, असा स्वतःसाठी संकल्प ठेवून हिंमतीने
पुढे जाण्याइतकी शक्ती आहे का? आहे? आहे तर मग बाबांच्या समोर हिंमतीने संकल्प करू
शकता का? कराल आणि बाबांकडून गिफ्ट घ्याल? गिफ्टमध्ये द्या आणि मग गिफ्ट घ्या. जर
क्रोधावर विजय प्राप्त केलात तर इतरांवर (इतर विकारांवर) देखील विजय प्राप्त
करण्याची हिंमत येईल. तर कोणाला असे वाटते की आपण ही गिफ्ट देणार आणि बाबांकडून
गिफ्ट घेणार? ज्यांना असे वाटते त्यांनी हात वर करा. छान, झेंडे हालवत आहेत. कुमारी
सुद्धा! बघा, सांभाळून रहा.
बापदादांना मुलांची
हिंमत पाहून खूप चांगले वाटत आहे. तुम्ही सीन बघत आहात ना! मग फोटो काढा, हात वर करा.
हो, सर्वांचा फोटो काढा. बापदादा या हिंमतीबद्दल, तुम्हाला रोज अमृतवेलेला जेव्हा
मिलन साजरे करता त्या वेळी विशेष ‘सहज अनुभवी आत्मा’, बनण्याची शुभेच्छा देतील.
कारण इतके सर्व आपापल्या ठिकाणी राहून देखील, लोक जेव्हा बघतील की, हे इतके सगळे
राहतात, एकत्र राहतात, प्रवृत्ती सांभाळतात, घरदार सोडून गेलेले नाहीत, परंतु
पवित्र प्रवृत्ती बनविली आहे; तर काय होईल? जी तुमच्या सर्वांच्या मनामध्ये
शुभ-भावना आहे की आत्म्यांची रांग लागावी, ती रांग तुम्हाला दिसून येईल; कारण क्रोध
प्रत्यक्ष दिसून येतो. परंतु प्रत्यक्षात लोक जेव्हा बघतील की, हे तर केवळ
पवित्रतेबद्दल बोलत नाहीत परंतु पवित्र राहून दाखवतात, प्रत्यक्षता हवी असेल तर हे
प्रत्यक्ष प्रमाण आहे; यानेच सर्वजण आकर्षित होऊन स्वतःहून येतील. परंतु ऐकवू का?
पुढे ऐकवू का? क्रोध येण्याचे कारण बहुतांशी असे दिसून आले आहे की, कुठे ना कुठे
ईर्ष्या आणि त्याच सोबत काहीही पाहिल्यानंतर चालणारे वेस्ट थॉट (व्यर्थ विचाराचे)
बीज देखील क्रोधाला उत्पन्न करते. कारण वेस्ट थॉट आहे बीज, या बीजातून क्रोध सुद्धा
उत्पन्न होतो आणि यासाठी एक शब्द निमित्त बनतो, त्या एका शब्दाच्या बीजाला जर नष्ट
केलेत तर सोपे होईल. तो एक शब्द आहे ‘का’, ‘हे का?’, ‘हे का झाले?’ ‘हे का केले?’,
‘हे का करतात?’ या ‘का’ शब्दाचा खूप मोठा क्यू (रांग) आहे. आणि बघा, ‘क्यू’ अक्षर
इंग्रजीमध्ये लिहा, तर लिहिताना किती कठीण जाते आणि ‘ए’ लिहा, तर किती सहज आहे. तर
बापदादांची आज हीच इच्छा आहे की, या ‘का’ शब्दाच्या क्यू ला नष्ट करा. तर तुमची
सर्वांची जी इच्छा आहे की, आता लवकरात लवकर बाबांची प्रत्यक्षता व्हावी,
प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये बाबांच्या प्रेमाचा झेंडा फडकावा आणि हृदयाने गाणे गावे,
अंतःकरणामध्ये गाणे गायले जावे की, ‘हमारा बाबा आ गया, मीठा बाबा आ गया’. हेच हवे
आहे ना तुम्हाला! की लवकरात लवकर प्रत्यक्षतेचा झेंडा सर्वांच्या हृदयामध्ये फडकावा.
तर त्यासाठी ‘का, काय, कसे होईल’, ही ‘क-क’ ची भाषा संपवून ‘क’ बोलायचे असेल तर
‘कमाल’ बोला. ‘क-क’ करू नका. जेव्हा बापदादांनी मुलांचे बोर्डिंग उघडले,
पाकिस्तानातील गोष्ट आहे, सुरुवातीला तर जगत-अंबा मुलांना हेच सांगत असे - आता
‘क-क’ ची भाषा बोलू नका. हे ‘क-क’ जास्त कोण करते? ते चांगले वाटते का? तर ‘का-का’
ची आता क्यू लावू नका. हां जी, अच्छा जी, खूप छान, आम्ही मिळून करू, उडू असे शब्द
बोला. भाषेचे परिवर्तन होऊ शकते का? ‘क-क’ नाही, हा क्यू सोडून द्या, तर तो क्यू
लागेल (त्या शब्दांची रांग लागेल).
पहा, शिवावर अक ची (रुई
ची) फुलेच वाहतात, तर आज शिवरात्री साजरी करत आहात, शिवाचा जन्मदिवस साजरा करत आहात
तर सर्वांनी हे क्रोध रूपी रुईचे फूल बापदादांना अर्पण करा म्हणजे तुम्ही दर्पण (आरसा)
बनाल. पसंत आहे ना! आहे पसंत? अच्छा. तर आता होळीला बापदादा येतील, तेव्हा रिझल्ट
घेतील. थकून जाऊ नका. झाले नाही, निश्चय-बुद्धी बनून करा, करायचेच आहे. आणि हात वर
केला, हात वर करणे अर्थात बाबांना देऊन टाकले. दिले ना! पुन्हा हात वर करा. सर्व
दीदी बघत आहात, बघत आहात ना? टाळ्या वाजवा. कधीही हिंमत हारू नका. जर थोडासा अभ्यास
कमी जरी झाला तरी पुढच्या वेळेसाठी हिंमत ठेवा, सोडून देऊ नका. पुढे जात राहा.
बापदादा कंबाइंड आहेत, म्हणता ना सोबत आहेत, कंबाइंड आहेत. तर अशा वेळी जर काहीही
झाले तरी बापदादा कंबाइंड आहेत त्यांना समोर आणून मग अर्पण करून टाका. परंतु
बापदादांची इच्छा आहे की सर्व मुले नंबर वन असावीत, दिलेली वस्तू अमानत झाली. हात
वर केला अर्थात देऊन टाकले तर आता तुमचे राहिलेले नाही. अमानत आहे. तर जर
संकल्पामध्ये जरी आले तरी समजायचे अमानत मध्ये ख्यानत (बेईमानी), हे वाईट मानले जाते.
दिलेली वस्तू कधी परत घेतली जात नाही, कारण आता ती माझी राहिलेली नाही.
आज बापदादा चोहो
बाजूंचे जे स्क्रीनवर देखील पाहत आहेत, तिथे बसून सर्वजण आनंदाने पाहत आहेत आणि
संकल्प देखील करत आहेत, तर मधुबन किंवा सर्व सेंटर्स काय बनतील? काय बनतील? सर्व
सेंटर्स ‘निर्विघ्न भव’ ची वरदानी बनतील. पसंत आहे ना! पसंत आहे? कारण आता दुःख आणि
अशांतीमुळे परिस्थिती अचानक अशी बनेल जे तुम्हा सर्वांना आत्म्यांची दया येईल, कारण
तुम्ही पूर्वज आहात, पूज्य देखील आहात आणि पूर्वज देखील आहात. तर पूर्वज कोणत्याही
आत्म्याचे दुःख किंवा डिस्टर्बन्स पाहू शकत नाहीत, ज्याच्यावर प्रेम असते, दया वाटते,
त्याचे दुःख पाहू शकत नाहीत. तर बाबांना वाटते की, समयाने तुमचे परिवर्तन करावे,
त्याच्या अगोदर तुम्ही पुरुषार्थाच्या प्राप्तीचे प्रारब्ध आतापासूनच अनुभव करा,
कारण तुम्हाला शिकवणारा समय नाही, समय तुमचा टीचर नाही. तर बापदादांची इच्छा आहे की
होळीला प्रत्येकाने आपला रिझल्ट लिहावा, जास्त मोठा लिहू नका, वाचायलाही सवड नसते.
परंतु बापदादांनी यापूर्वी देखील सांगितले आहे की, जशी तुम्हाला वरदानाची चिठ्ठी
मिळते ना, किती छोटीशी असते, त्यावर ओ.के. लिहा. ओ.के. शब्द लिहा. जर तुमच्याकडून
पुरुषार्थ करताना काहीही झाले असेल, तर त्या ओ.के.च्या मध्ये एक रेघ ओढा. सोपे आहे
ना! जास्त कागद वाया घालवू नका. जर जास्त वेळा झाले असेल, एकदा, दोनदा, तीनदा तर
रेघा ओढत जा आणि होळीच्या अगोदर मधुबनला पाठवून द्या. भले सर्वांचे एकत्र करून पाठवा,
टीचर पाठवतील. तर बापदादांकडे रिझल्ट पोहोचेल, यामध्ये नंबर वन कोण? मग बापदादा
तुम्हाला पद्म-पद्मपटीने अंतःकरणापासून प्रेमाची सौगात देतील. अच्छा.
डबल फॉरेनर्स आहेत
ना! हात वर करा. नंबर घेणार ना! पाहुया फॉरेन वाले नंबर घेतात की भारतवाले. चांगले
आहे. बापदादा तर सर्वांकडे उमेदवार म्हणून पाहत नाहीत परंतु बाबांच्या आशांना पूर्ण
करणारे, बाबांच्या आशेचे दीपक या रूपामध्ये पाहू इच्छित आहेत. अच्छा, मधुबन काय
करणार? मधुबनवाले हात वर करा. खाली-वर सर्व मधुबन. वर असणारे ही उंच हात वर करा.
हालवा. अच्छा. मधुबनने नंबर तर मिळवायला हवा. मिळवायला हवा ना! मिळवायला हवा कारण
मधुबनला सर्वजण खूप लवकर कॉपी करतात. अच्छा.
चोहो बाजूंचे कंबाइंड
राहणारे पाहत देखील आहेत, आणि ऐकतही आहेत परंतु बाकीचे जे जरी ऐकत नाहीत, ते
मुरलीद्वारे तर ऐकतीलच. तर चोहो बाजूंच्या बाबांच्या स्नेही, सहयोगी, गोड-गोड,
लाडक्या-प्रिय मुलांना बापदादा पद्म-पद्मपटीने शुभेच्छा देखील देत आहेत, मुबारक
सुद्धा देत आहेत आणि त्याच सोबत प्रत्यक्षतेचा झेंडा लवकरात लवकर फडकवण्याचा संकल्प
देखील देत आहेत. जेव्हा की बाबा तुमचे पिता, शिक्षक आणि सद्गुरू आहेत तर मग समयावर
अवलंबून नका राहू, समयाला टीचर बनवू नका. तर जसे तुमच्या जगत-अंबेने (मम्माने) केले
दोन शब्दांमध्ये नंबर मिळवला. बाबांचे सांगणे आणि जगत-अंबेचे करणे - असा तीव्र
पुरुषार्थ केला आणि नंबर घेतला. तुम्ही देखील सर्वजण मानता ना, मग तुम्ही देखील फॉलो
मदर जगत-अंबा. अच्छा. सर्वांना प्रेमपूर्वक आठवण आणि अंतःकरणापासून खूप-खूप
आशीर्वाद स्वीकार असो. सोबतच, बाबा मुलांना मालकाच्या रूपामध्ये पाहून नमस्ते करत
आहेत.
बापदादांनी सर्व झोनला
सांगितले आहे की, वारसदार आणि माईक काढा, प्रभावशाली माईक ज्यांचे अनुभव ऐकून
इतरांना प्रेरणा मिळेल की, आपण देखील असे बनावे, कोणालाही संतुष्ट करू शकतील. तर
सर्व झोन वाल्यांनी आपली लिस्ट पाठवा. आज बापदादांनी पाहिले की दिल्ली वाल्यांनी
लिस्ट पाठवली आहे. बापदादा मुबारक देत आहेत. जेव्हा सर्व झोन वाले पाठवतील तेव्हा
तुम्हाला देखील रिझल्ट ऐकवू की, किती वारस तयार झाले आहेत. चेकिंग केली जाईल, असे
नाही की, लिस्ट आली म्हणजे मान्य केली जाईल. गुप्त चेकिंग केली जाईल. अच्छा,
सुरुवातीला देखील मुबारक आणि शुभेच्छा मिळाल्या, आता देखील बापदादा प्रत्येक मुलाचे
मनामध्ये नाव घेऊन पद्म-पद्मपटीने मुबारक देत आहेत. बाबांपाशी तर सर्व मुलांचे
चित्र वतनमध्ये इमर्ज आहे. तर बापदादांनी मुलांचा बर्थ-डे साजरा केला आणि मुलांनी
बाबांचा बर्थ-डे साजरा केला, दोघांनाही मुबारक. अच्छा!
वरदान:-
सर्वांना
रिगार्ड देत स्वतःचे रेकॉर्ड उत्तम ठेवणारे सर्वांचे स्नेही भव
जो जितका सर्वांना
रिगार्ड देतो, तितकाच तो स्वतःचे रेकॉर्ड चांगले ठेवू शकतो. दुसऱ्यांचा रिगार्ड
ठेवणे अर्थात स्वतःचे रेकॉर्ड बनविणे आहे. जसे यज्ञाचे मददगार बनणे अर्थातच मदत
मिळविणे आहे, तसेच रिगार्ड देणे म्हणजेच रिगार्ड घेणे आहे. एकदा द्या आणि अनेकदा
मिळविण्याचे अधिकारी बना. तसेही म्हटले जाते - छोट्यांना प्रेम द्या आणि मोठ्यांना
रिगार्ड द्या; परंतु जे सर्वांना मोठे समजून रिगार्ड देतात ते सर्वांचे स्नेही
बनतात. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये - ‘पहिले तुम्ही’, हा धडा पक्का करा.
सुविचार:-
बापदादांकडून मिळालेली
शिकवण गरजेनुसार वेळेवर आठवणे हाच तीव्र पुरुषार्थ आहे.
हे अव्यक्त इशारे -
सदैव अचल, अडोल एकरस स्थितीचा अनुभव करा.
जे ऑलराऊंड सेवा
करणारे आहेत त्यांनी विशेष या गोष्टीवर लक्ष ठेवायचे आहे की, कोणत्याही
परिस्थितीमध्ये आपली स्थिती एकरस रहावी तेव्हाच सफलता मिळेल. श्रीमतामध्ये जेव्हा
मनमत, देह-अभिमानाचे मत, शूद्रपणाचे मत मिक्स करता तेव्हा स्थिती एकरस राहत नाही.
मन जर भिन्न-भिन्न रसांमध्ये राहत असेल तर स्थिती देखील भिन्न-भिन्न राहील. एकाच
रसामध्ये राहिली तर स्थिती एकरस राहील.