17-07-2024
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“
गोड मुलांनो - या शरीराला न पाहता आत्म्याला पहा, स्वतःला आत्मा समजून आत्म्याशी
बोला, या अवस्थेला प्राप्त करायचे आहे, हेच उच्च ध्येय आहे.
प्रश्न:-
तुम्ही मुले
बाबांसोबत वर (घरामध्ये) कधी जाणार?
उत्तर:-
जेव्हा अपवित्रतेचा रिंचक मात्र (थोडा देखील) अंशसुद्धा राहणार नाही. जसे बाबा पावन
आहेत तशी तुम्ही मुले देखील पावन बनाल तेव्हा वर (घरी) जाऊ शकाल. आता तुम्ही मुले
बाबांच्या सन्मुख आहात. ज्ञान सागराकडून ज्ञान ऐकून-ऐकून जेव्हा फूल बनाल, बाबांना
ज्ञानातून रिकामे कराल तेव्हा मग ते देखील शांत होतील आणि तुम्ही मुले देखील
शांतीधाममध्ये निघून जाल. तिथे ज्ञान झिरपणे बंद होते. सर्व काही दिल्यानंतर त्यांचा
(शिवबाबांचा) पार्ट आहे शांतीचा.
ओम शांती।
शिव भगवानुवाच. जेव्हा ‘शिव भगवानुवाच’ म्हटले जाते तेव्हा समजले पाहिजे - एक शिवच,
भगवान अथवा परमपिता आहेत. तुम्ही मुले किंवा आत्मे त्यांचीच आठवण करता. परिचय तर
रचता बाबांकडून मिळाला आहे. हे तर नक्की आहे की, नंबरवार पुरुषार्थानुसारच आठवण करत
असणार. सर्वच काही एकरस आठवण करणार नाहीत. हि अतिशय सूक्ष्म गोष्ट आहे. स्वतःला
आत्मा समजून दुसऱ्याला देखील समजणे, हि अवस्था प्राप्त करण्यासाठी वेळ लागतो. ते
लोक तर काहीही जाणत नाहीत. आणि न जाणल्या कारणाने सर्वव्यापी म्हणतात. ज्या प्रमाणे
तुम्ही मुले स्वतःला आत्मा समजता, बाबांची आठवण करता, तशी इतर कोणीही आठवण करू शकत
नसतील. कोणत्याही आत्म्याचा योग बाबांसोबत नाही आहे. या गोष्टी अतिशय गूढ आणि
अतिसूक्ष्म आहेत. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे. म्हणतात देखील कि
आपण भाऊ-भाऊ आहोत तर मग आत्म्यालाच पाहिले पाहिजे, शरीराला बघता कामा नये. हे खूप
मोठे ध्येय आहे. असे बरेच आहेत जे बाबांची आठवण सुद्धा करत नसतील. आत्म्यावर मळ (गंज)
चढला आहे. मुख्य आत्म्याचीच गोष्ट आहे. ‘आत्माच आता तमोप्रधान बनली आहे, जी
सतोप्रधान होती’, हे आत्म्यामध्ये ज्ञान आहे. ज्ञानाचा सागर परमात्माच आहेत. तुम्ही
स्वतःला ज्ञानाचा सागर म्हणणार नाही. तुम्ही जाणता आम्हाला बाबांकडून पूर्णच ज्ञान
घ्यायचे आहे. ते (बाबा) आपल्याजवळ ठेऊन काय करणार आहेत. अविनाशी ज्ञान रत्नांचे धन
तर मुलांना द्यायचेच आहे. मुले नंबरवार पुरुषार्था नुसार धारण करणारे आहेत. जे
जास्ती ज्ञान धारण करतात ते चांगली सेवा करू शकतात. बाबांना ज्ञानाचा सागर म्हटले
जाते. ते देखील आत्मा आहेत तुम्ही देखील आत्मे. तुम्ही आत्मे सारे ज्ञान ग्रहण करता.
जसे ते (शिवबाबा) सदा पवित्र आहेत, तुम्ही देखील सदा पवित्र बनाल. नंतर मग जेव्हा
अपवित्रतेचा रिंचक मात्र (थोडा देखील) अंश राहणार नाही तेव्हा वर निघून जाल. बाबा
आठवणीच्या यात्रेची युक्ती शिकवत आहेत. हे तर जाणता कि संपूर्ण दिवस आठवण राहत नाही.
इथे तुम्हाला बाबा सन्मुख बसून समजावून सांगत आहेत, बाकीची मुले काही सन्मुख ऐकत
नाहीत, मुरली वाचतात; इथे तुम्ही सन्मुख आहात. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा
आणि ज्ञानाची धारणा करा. आपल्याला बाबांप्रमाणे संपूर्ण ज्ञानाचा सागर बनायचे आहे.
एकदा का तुम्हाला पूर्ण ज्ञान समजले की मग जसे काही बाबांना ज्ञान देण्यापासून मोकळे
कराल आणि मग ते शांत होतील. असे नाही कि त्यांच्यामध्ये ज्ञान टपकत असेल. सर्व काही
दिले की त्यानंतर त्यांचा पार्ट आहे शांतीचा. जसे तुम्ही शांतीमध्ये रहाल तर ज्ञान
थोडेच टपकणार आहे. हे देखील बाबांनी समजावून सांगितले आहे आत्मा संस्कार घेऊन जाते.
कोणा संन्याशाची आत्मा असेल तर बालपणीच त्याला शास्त्रे तोंडपाठ होतील. तर मग त्याचे
नाव खूप होते. आता तुम्ही तर आला आहात नवीन दुनियेमध्ये जाण्यासाठी. तिथे काही
तुम्ही ज्ञानाचे संस्कार घेऊन येऊ शकत नाही. हे संस्कार मर्ज होतात. बाकी आत्म्याला
आपली सीट घ्यायची आहे नंबरवार पुरुषार्थानुसार. नंतर मग तुमच्या शरीराला नाव मिळते.
शिवबाबा तर आहेतच निराकार. म्हणतात, ‘मी या शरीराचा आधार घेतो’. ते तर फक्त
ऐकविण्यासाठीच येतात. ते कुणाचे ज्ञान ऐकत नाहीत कारण ते स्वयं ज्ञानाचा सागर आहेत
ना. फक्त मुखा द्वारेच ते मुख्य काम करतात. येतात देखील सर्वांना रस्ता
दाखविण्यासाठी. बाकी ऐकून काय करतील. ते सदैव ऐकवतच राहतात कि, ‘असे-असे करा’.
पूर्ण झाडाचे रहस्य सांगतात. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे कि नवीन दुनिया तर
खूप छोटी असेल. हि जुनी दुनिया तर किती मोठी आहे. साऱ्या दुनियेमध्ये किती लाईट जळते
आहे. लाईट द्वारे काय-काय होते. तिथे (सतयुगामध्ये) तर दुनिया देखील छोटी, लाईट
सुद्धा कमी असणार. जसे काही एक छोटेसे गाव असेल. आता तर किती मोठ-मोठी गावे आहेत.
तिथे इतकी नसणार. थोडेच मुख्य-मुख्य चांगले रस्ते असणार. ५ तत्व देखील तिथे
सतोप्रधान बनतात. कधी चंचलता करत नाहीत. सुखधाम म्हटले जाते. त्याचे नावच आहे
स्वर्ग. जस-जसे पुढे जाल, तुम्ही जितके जवळ येत जाल तितकी वृद्धी होत जाईल. बाबा
देखील साक्षात्कार करवत राहतील. मग त्या वेळी लढाईमध्ये देखील लष्कराची किंवा
एरोप्लेन इत्यादींची गरज भासणार नाही; ते तर म्हणतात - ‘आम्ही इथे बसल्या-बसल्या
सर्वांना नष्ट करू शकतो’. मग हि विमाने इत्यादी थोडीच कामी येणार आहेत. आणि मग हे
चंद्रावर प्लॉट इत्यादी बघायला देखील जाणार नाहीत. हि सर्व सायन्सची फालतू घमेंड आहे.
किती दिखावा करत आहेत. ज्ञानामध्ये किती शांती आहे. याला ईश्वरीय देणगी म्हणतात.
सायन्समध्ये तर कोलाहलच आहे. ते शांतीला जाणतही नाहीत.
तुम्ही समजता की,
विश्वामध्ये शांती तर नवीन दुनियेमध्ये होती, ते आहे सुखधाम. आता तर दुःख-अशांती आहे.
हे देखील समजावून सांगायचे आहे की, ‘तुम्हाला शांती हवी आहे, कधीच अशांती असू नये,
ती तर आहे शांतीधाम आणि सुखधाममध्ये’. स्वर्ग तर सर्वांनाच हवा आहे. भारतवासीच
वैकुंठ, स्वर्गाची आठवण करतात. इतर धर्मवाले वैकुंठाची आठवण करत नाहीत. ते फक्त
शांतीची आठवण करतात. सुखाची तर आठवण करू शकणार नाहीत. तसा कायदा नाही आहे. सुखाची
तर तुम्हीच आठवण करता म्हणूनच बोलावता कि, ‘आम्हाला दुःखातून मुक्त करा’. आत्मे खरे
तर शांतीधाम मध्ये राहणारे आहेत. हे देखील कोणी जाणतात थोडेच. बाबा समजावून सांगत
आहेत - तुम्ही बुद्धू होता. कधीपासून बुद्धू बनलात? १६ कलेपासून १२-१४ कला बनत जाता,
जणू बुद्धू बनत जाता. आता एकही कला राहिलेली नाही. कॉन्फरन्स करत राहतात -
‘महिलांना दुःख का आहे?’ अरे दुःख तर साऱ्या दुनियेमध्ये आहे. अथाह दुःख आहे. आता
विश्वामध्ये शांती कशी होईल? आता तर अनेक धर्म आहेत. साऱ्या विश्वामध्ये आता शांती
तर होऊ शकत नाही. सुखा विषयी तर जाणतही नाहीत. तुम्ही मुली बसून समजावून सांगाल की,
या दुनियेमध्ये अनेक प्रकारची दुःखे आहेत, अशांती आहे! जिथून आपण आत्मे आलो आहोत ते
आहे शांतीधाम आणि जिथे हा आदि सनातन देवी-देवता धर्म होता, ते होते सुखधाम. आदि
सनातन हिंदू धर्म म्हणणार नाही. आदि अर्थात ‘प्राचीन’. तो तर सतयुगामध्ये होता.
तेव्हा सर्व पवित्र होते. ती आहेच निर्विकारी दुनिया, विकाराचे नाव सुद्धा नाही.
फरक आहे ना. सर्व प्रथम तर निर्विकारीपणा पाहिजे ना म्हणून बाबा म्हणतात - ‘गोड-गोड
मुलांनो, काम विकारावर विजय प्राप्त करा. स्वतःला आत्मा समजा. आता आत्मा अपवित्र आहे,
आत्म्यामध्ये भेसळ पडली आहे त्यामुळे दागिने (शरीरे) देखील असे बनले आहेत. आत्मा
पवित्र तर दागिना सुद्धा पवित्र असणार, त्यालाच संपूर्ण निर्विकारी दुनिया म्हटले
जाते. वडाच्या झाडाचे देखील तुम्ही उदाहरण देऊ शकता. पूर्ण झाड उभे आहे, परंतु
फाऊंडेशन (पाया) नाही आहे. हा आदि सनातन देवी-देवता धर्म राहिलेला नाही बाकी सर्व
अस्तित्वात आहेत. सगळे अपवित्र आहेत, यांना म्हटले जाते मनुष्य. ते आहेत देवता. मी
मनुष्याला देवता बनविण्यासाठी आलो आहे. ८४ जन्म देखील मनुष्यच घेतात. शिडीचे चित्र
दाखवायचे आहे कि तमोप्रधान बनतात तेव्हा ते स्वतःला हिंदू म्हणतात. देवता म्हणू शकत
नाहीत कारण पतित आहेत. ड्रामामध्ये हे रहस्य आहे ना. अन्यथा हिंदू धर्म काही नाही
आहे. आदि सनातन आम्हीच देवी-देवता होतो. भारतच पवित्र होता आता अपवित्र आहे. तर
स्वतःला हिंदू म्हणतात. हिंदू धर्म तर कोणीही स्थापन केलेला नाही आहे. हे मुलांनी
चांगल्या पद्धतीने धारण करून मग इतरांना समजावून सांगायचे आहे. आजकाल तर इतका वेळ
सुद्धा देत नाहीत. कमीत-कमी अर्धा तास जरी दिला तरी पॉईंट्स ऐकवले जातील. पॉईंट तर
पुष्कळ आहेत. मग त्यातून मुख्य-मुख्य सांगितले जातात. शिक्षणामध्ये देखील जस-जसे
शिकत जातात तेव्हा मग सोपा अभ्यास ‘अल्फ-बे’ इत्यादी थोडाच लक्षात राहतो. तो विसरला
जातो. तुम्हाला देखील म्हणतील की, आता तुमचे ज्ञान आता बदलले आहे. अरे, अभ्यासामध्ये
पुढे शिकत जातात तेव्हा सुरवातीचा अभ्यास विसरायला होतो ना. बाबा सुद्धा आम्हाला
रोज नवीन-नवीन गोष्टी सांगतात. सुरवातीला सोपा अभ्यास होता, आता बाबा अजूनच गूढ
गोष्टी सांगत राहतात. ज्ञानाचा सागर आहेत ना. सांगता-सांगता मग शेवटी दोन शब्द
म्हणतात कि ‘अल्फ’ला समजलात तरी पुष्कळ आहे. ‘अल्फ’ला जाणल्याने ‘बे’ ला जाणालच.
फक्त एवढे जरी समजावून सांगाल तरी देखील ठीक आहे. जे जास्ती ज्ञान धारण करू शकत
नाहीत ते उच्च पद सुद्धा प्राप्त करू शकणार नाहीत. पास विद ऑनर होऊ शकणार नाहीत.
कर्मातीत अवस्थेला प्राप्त करू शकणार नाहीत, यासाठी खूप मेहनत पाहिजे. आठवणीसाठी
देखील मेहनत आहे. ज्ञान धारण करण्यासाठी देखील मेहनत आहे. दोन्हीमध्ये सर्वजण हुशार
होतील ते तर होऊ शकणार नाही. राजधानी स्थापन होत आहे. सर्वच नरा पासून नारायण कसे
बनतील. या गीता पाठशाळेचे एम ऑब्जेक्ट तर हे आहे. तेच गीता ज्ञान आहे. ते देखील कोण
देतात, हे तर तुमच्याशिवाय कोणीही जाणत नाहीत. आता आहे कब्रस्तान नंतर मग परीस्तान
होणार आहे.
आता तुम्हाला ज्ञान
चितेवर बसून पुजारी पासून पूज्य जरूर बनायचे आहे. वैज्ञानिक देखील किती हुशार होत
जात आहेत. नव-नवीन शोध लावत राहतात. भारतवासी प्रत्येक गोष्टीचे कौशल्य तिथून शिकून
येतात ते देखील शेवटी येतील त्यामुळे तितकेसे ज्ञान घेऊ शकणार नाहीत. मग तिथे देखील
येऊन हेच इंजिनिअरिंग इत्यादीचे काम करतील. राजा-राणी तर बनू शकणार नाहीत,
राजा-राणीसमोर सेवेमध्ये राहतील. असे काही शोध लावत राहतील. राजा-राणी बनतातच
सुखासाठी. तिथे तर सर्व सुख मिळणार आहे. तर मुलांनी पूर्ण पुरुषार्थ केला पाहिजे.
फुल पास होऊन कर्मातीत अवस्थेला प्राप्त करायचे आहे. लवकर जाण्याचा विचार येता कामा
नये. आता तुम्ही आहात ईश्वरीय संतान. बाबा शिकवत आहेत. हे मिशन आहे मनुष्यांना
बदलण्याचे. जशी बुद्धांची, ख्रिश्चनांची मिशन असते ना. कृष्ण आणि क्रिश्चियन यांची
रास देखील जुळते. त्यांच्या देवाण-घेवाणीचा देखील बराच संबंध आहे. जे इतकी मदत
करतात त्यांची भाषा इत्यादी सोडणे हा देखील एक अपमानच आहे. ते तर येतातच मागाहून.
ना फार सुख आणि ना फार दुःख भोगत. सारे संशोधन ते लोक करतात. इथे भले प्रयत्न करतात
परंतु कधीही ॲक्युरेट बनवू शकणार नाहीत. विदेशातल्या वस्तू चांगल्या असतात.
प्रामाणिकपणे बनवतात. इथे तर अप्रामाणिकपणाने बनवतात, खूप दुःख आहे. सर्वांची दुःखे
दूर करणारे एका बाबांशिवाय इतर कोणीही मनुष्य असू शकत नाही. भले कितीही कॉन्फरन्स
करतात, विश्वामध्ये शांती व्हावी, त्रास सहन करत राहतात.. फक्त मातांच्या दुःखाची
गोष्ट नाहीये, इथे तर अनेक प्रकारची दुःखे आहेत. साऱ्या दुनियेमध्ये भांडणे
मारामारीच्याच गोष्टी आहेत. दीड-दमडीच्या गोष्टी वरून मारामाऱ्या करतात. तिथे तर
दुःखाची गोष्टच असत नाही. हा देखील हिशोब काढला पाहिजे. लढाई कधीही सुरु होऊ शकते.
भारतामध्ये जेव्हा पासून रावण येतो तर सर्वात आधी घरामध्ये भांडणे सुरु होतात.
वेगवेगळे होतात, आपापसात भांडतात आणि मग बाहेरचे लोक येतात. पूर्वी ब्रिटिश थोडेच
होते, नंतर ते येऊन मध्येच लाच वगैरे देऊन राज्य बळकावतात. किती रात्रं-दिवसाचा फरक
आहे. नवीन कोणीही समजू शकणार नाही. नवीन नॉलेज आहे ना, जे मग प्राय: लोप होते. बाबा
ज्ञान देतात आणि नंतर ते नाहीसे होते. हे एकच शिक्षण, एकदाच, एकाच बाबांकडून मिळते.
पुढे जाऊन तुम्हा सर्वांना साक्षात्कार होत राहतील कि तुम्ही हे बनणार. परंतु
त्यावेळी तुम्ही करू तरी काय शकणार. प्रगती साधता येणार नाही. निकाल लागला कि मग
ट्रान्सफर होण्याच्या गोष्टी होतील. मग रडाल, उर बडवाल. आपली नवीन दुनियेमध्ये बदली
होईल. तुम्ही मेहनत करता कि लवकरात लवकर चोहो बाजूला आवाज पसरावा. मग आपणच सेंटरवर
पळत सुटतील. परंतु जितका उशीर होत जाईल, टू लेट होत राहतील. मग काहीच जमा होणार नाही.
पैशांची गरज भासणार नाही. तुम्हाला समजावून सांगण्यासाठी हा बॅजच पुरेसा आहे. हे
‘ब्रह्मा सो विष्णु, विष्णु सो ब्रह्मा’.हा बॅज असा आहे ज्यामध्ये सर्व शास्त्रांचे
सार यामध्ये आहे. बाबा बॅजची खूप महिमा करतात. ती सुद्धा वेळ येईल जे या तुमच्या
बॅजचा सर्वजण आपल्या डोळ्यांना स्पर्श करत राहतील. मनमनाभव, यामध्ये आहे - माझी
आठवण करा तर हे बनाल. मग हेच ८४ जन्म घेतात. पुनर्जन्म न घेणारे एक बाबाच आहेत.
अच्छा !
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) आठवणीची
मेहनत आणि ज्ञानाच्या धारणेद्वारे कर्मातीत अवस्थेला प्राप्त करण्याचा पुरुषार्थ
करायचा आहे. ज्ञान सागराचे संपूर्ण ज्ञान आपल्यामध्ये धारण करायचे आहे.
२) आत्म्यामध्ये जी
खाद (भेसळ) पडली आहे त्याला काढून टाकून संपूर्ण निर्विकारी बनायचे आहे. रिंचक
मात्र (थोडा देखील) अपवित्रतेचा अंश राहता कामा नये. आपण आत्मे भाऊ-भाऊ आहोत… हा
अभ्यास करायचा आहे.
वरदान:-
समय आणि
संकल्प रुपी खजिन्यावर अटेंशन देऊन जमेचे खाते वाढविणारे पदमापदमपति भव
तसे खजिने तर पुष्कळ
आहेत परंतु विशेष करून ‘समय’ आणि ‘संकल्प’ या दोन खजिन्यांवर अटेंशन द्या. प्रत्येक
‘क्षण’ तसेच ‘संकल्प’ श्रेष्ठ आणि शुभ असेल तर जमेचे खाते वाढत जाईल. यावेळी एक जमा
कराल तर पदम मिळेल, हिशोब आहे. एकाचे पदमगुणा करून देण्याची हि बँक आहे, त्यामुळे
काहीही होवो, त्याग करावा लागला, तपस्या करावी लागली, निर्मान बनावे लागले, काहीही
होऊ दे… या दोन गोष्टींवर अटेंशन द्याल तर पदमापदमपति बनाल.
बोधवाक्य:-
मनोबलाने सेवा
करा तर त्याचे प्रारब्ध अनेक पटीने जास्त मिळेल.