17-07-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, ही भारतभूमी निराकार बाबांची जन्म-भूमी आहे, बाबा तुम्हाला राजयोग शिकवून राजाई देण्याकरिता, तुमची सेवा करण्याकरिता इथेच येतात”

प्रश्न:-
शिवबाबा आपल्या प्रत्येक मुलाकडून कोणती प्रतिज्ञा करून घेतात?

उत्तर:-
गोड मुलांनो, प्रतिज्ञा करा की, ‘बाबा, आम्ही कोणतेही विकर्म करणार नाही. आम्ही ५ विकारांचे दान देत आहोत’. आतून भीती असली पाहिजे - जर का मी दान देऊन मग परत घेतले तर खूप पाप चढेल, ज्याची कठोर शिक्षा भोगावी लागेल. हरिश्चंद्राची कहाणी देखील याच गोष्टीवर आधारित आहे.

ओम शांती।
मुलांचे हे आहे गॉडली स्टुडंट लाईफ (ईश्वरीय विद्यार्थी जीवन). मुले जाणतात की, आम्ही त्यांच्याकडे आलो आहोत. तेच कल्प-कल्प येऊन भारतवासी मुलांना राज्यभाग्य देतात. भारतातच येतात ना. ही भारतभूमी आहे. आपल्या भूमी विषयी खूप प्रेम, आदर असतो. जसे परदेशातील एखाद्या मोठ्या व्यक्तीचा इथे मृत्यू झाला तर त्यांची बॉडी परदेशात घेऊन जातात अथवा इथल्या एखाद्या मोठ्या व्यक्तीचा परदेशात मृत्यू झाला तर त्यांची बॉडी इथे घेऊन येतात. आपल्या भूमीचा मान राखतात. भारताला भगवंताची जन्म-भूमी म्हटले जाते. तुम्ही हे देखील जाणता - ज्यांना भगवान, अल्ला अथवा परमात्मा म्हणतात त्यांच्या समोर आता तुम्ही बसलेले आहात. नाव तर जरूर पाहिजे ना. अल्ला म्हणतात, तरी देखील पूजा लिंगाचीच करतात. ईश्वर अथवा खुदा म्हणतात तर जरूर त्यांची खूण पाहिजे ना. लिंगाची सर्व ठिकाणी पूजा केली जाते. चित्रांमध्ये देखील आजकाल देवतांच्या पुढ्यात परमपिता परमात्म्याचे चित्र लिंग रूपात दाखवतात. ते सर्वात श्रेष्ठ आहेत, त्यांना आपले शरीर नाहिये म्हणून निराकार म्हटले जाते; साकार नाहीत. आता तुम्ही मुले जाणता आपण त्यांच्यासमोर शिक्षण घेण्यासाठी कल्प-कल्प हजर होतो. भगवानुवाच आहे तर जरूर राजयोग शिकवत असतील. स्टुडंट्सना राजयोग शिकवला होता आणि ते राजा-राणी बनले होते. युद्ध इत्यादीचा तर प्रश्नच नाहीये. या लक्ष्मी-नारायण इत्यादींनी युद्ध करून थोडीच बादशाही मिळवली आहे? अजिबात नाही. दुनिया हे बिलकुल जाणत नाही की यांनी सतयुगामध्ये राज्य कसे प्राप्त केले. आता तुम्ही मुले समजता की आपण बाबांकडून राज्य घेत आहोत. आम्ही त्यांच्या सन्मुख बसलो आहोत. तेच बाबा आहेत, श्रीकृष्ण नाही. श्रीकृष्ण तर छोटा मुलगा आहे, तो तर एक रचना आहे. खरोखर आता श्रीकृष्ण स्वतःचे पद प्राप्त करत आहेत, जेणेकरून भविष्यामध्ये त्यांना ‘श्रीकृष्ण’ म्हणून ओळखले जाईल. हा सर्व शिक्षणाचा विषय आहे.

तुम्ही जाणता बाबा आम्हाला राजयोग शिकवत आहेत. जसे मनुष्य मनुष्याला बॅरिस्टर, इंजिनियर इत्यादी बनवतात. आहेत तर मनुष्यच ना. तुम्ही समजता आम्ही देखील मनुष्य आहोत, परंतु आम्ही पतित आहोत. आता बाबा आम्हाला पावन देखील बनवतात आणि वारसा देखील देतात. पावन दुनिया तर नवी दुनियाच असेल. नवीन दुनियेमध्ये आहेच मुळी राजाई. आता तुम्ही बाबांच्या सन्मुख बसला आहात. जसा लौकिक पिता मुलांना बसून प्रेमाने समजावून सांगतो, हे आहेत पारलौकिक विचित्र बाबा; ज्यांच्याकरिता तुम्ही गात आला आहात - ‘त्वमेव माताश्च पिता…’ याचा अर्थ यावेळी तुम्ही जाणता; हे आता आपला पार्ट बजावत आहेत, ज्याचे भक्तिमार्गामध्ये आपण गायन करतो. तुम्ही म्हणता आम्ही शिवबाबांकडे आलो आहोत. चिठ्ठी देखील लिहिता - शिवबाबा केअर ऑफ ब्रह्मा. कोणाला तुम्ही चिठ्ठी दाखवली तर आश्चर्य वाटेल की, ‘शिवबाबा केअर ऑफ ब्रह्मा’ असे तर कधी ऐकलेले नाही. शिवबाबा ब्रह्मामध्ये येऊन विष्णुपुरीची स्थापना करत आहेत. समोर उभे आहेत. वरती आहेत शिवबाबा. शिवबाबांनी ब्रह्माद्वारे स्थापना केली होती, आता पुन्हा करत आहेत. हा प्रवृत्ती मार्ग आहे. अगदी कायद्याच्या शिक्षणामध्ये देखील बॅरिस्टर्स शिकवतात तर स्त्री-पुरुष दोघेही शिक्षण घेतात. स्त्री देखील जज, बॅरिस्टर, डॉक्टर इत्यादी बनते. हा देखील प्रवृत्ती मार्ग आहे. संन्याशांचा आहे निवृत्ती मार्ग, तो वेगळा आहे. बाबांनी हे देखील समजावून सांगितले आहे - जर शंकराचार्य आले नसते तर पवित्रतेचा अंश सुद्धा राहिला नसता. भारत एकदमच जळून खाक झाला असता. भारताला थोपवून धरण्यासाठी हे ड्रामामध्ये अगोदरच नोंदलेले आहे. भारत खूप पवित्र होता नंतर मग अपवित्र बनला आहे. आता भारत किती गरीब बनला आहे. म्हणतात - सोन्याची लंका समुद्राच्या खाली निघून गेली. आता लंका तर सोन्याची असू शकत नाही. या सर्व कहाण्या बसून लिहिल्या आहेत ज्याचा काहीही फायदा नाही.

तुम्ही मुले जाणता - खरोखर, बाबा आम्हाला अगदी सोप्या आठवणीच्या बळाद्वारे किती श्रेष्ठ बनवत आहेत. बाबा प्रतिज्ञा करतात - जर निरंतर आठवण करण्याचा पुरुषार्थ कराल तर विकर्म विनाश होतील. भक्तिमार्गामध्ये देखील तुम्ही आठवण करण्याचा पुरुषार्थ केला आहे ना? कशासाठी आठवण करतात? की आम्हाला साक्षात्कार घडावा. अशी आठवण करत नाहीत की कृष्णपुरीमध्ये आम्हाला बादशाही मिळावी अथवा आम्ही नरापासून नारायण बनावे, नाही. तुम्ही देखील ही अपेक्षा केली नव्हती की आपण मनुष्यापासून देवता बनावे. गातात देखील - ‘मनुष्य से देवता किये…’ तुम्ही बघता खरोखर कलियुगानंतर सतयुग येईल. कलियुगामध्ये इतके मनुष्य आहेत. सतयुगामध्ये एक धर्म असेल. आत्ता तुम्हाला आत्मा आणि परमात्म्याचे सुद्धा ज्ञान मिळाले आहे. दुनियेमध्ये एकही असा मनुष्य नाही ज्याला आत्म्याचे ज्ञान असेल. आत्म्यामध्ये ८४ जन्मांचा पार्ट कसा नोंदलेला आहे हे कोणीही जाणत नाही. हे शब्द सुद्धा कधी कोणाकडून ऐकलेले नाहीत. बाबा तर आहेत ज्ञानाचे सागर, पतित-पावन, निराकार. तुम्ही जाणता आता आमची आत्मा पाप-आत्म्यापासून पुण्यात्मा बनत आहे. सतयुगामध्ये तर सर्व पुण्य-आत्मे असतात. इथे आहेत पाप-आत्मे. असे नाही की खूप दान-पुण्य करणाऱ्यांना पुण्य-आत्मा म्हटले जाते. नाही. पुण्यात्मे असतातच सतयुगामध्ये. इथे जे मनुष्य दान-पुण्य करतात त्यांना पुण्य-आत्मा समजतात. तिथे तुम्हाला दान-पुण्य इत्यादी करण्याची आवश्यकता राहात नाही. तिथे कोणी गरीब असतच नाही. तुम्ही तिथे कायमचे पुण्य-आत्माच असता. तुम्ही तन-मन-धन सर्व बेहदच्या बाबांसाठी देता, ज्याला बलिहार जाणे म्हटले जाते. बाबा म्हणतात - पहिले मी बलिहार जातो की तुम्ही? बाबा म्हणतात - पहिले तुम्ही बलिहार जाता. तेव्हा मग २१ जन्मांसाठी बलिहारी मिळेल. या गोष्टी आता तुम्ही चांगल्या प्रकारे समजता, डायरेक्ट ऐकता. घरी राहता तर तिथे मुरली येते. दुरून ऐकता. आता तर बाबांच्या सन्मुख बसले आहात. बाबा म्हणतात - ‘मुलांनो, मी तुमचा पिता सुद्धा आहे. इथे अंधश्रद्धेची काही गोष्टच नाही. पिता देखील आहेत तर टीचर सुद्धा आहेत. बाबांचे बनल्यावर ते शिकवण देतात; तुमच्या बुद्धीमध्ये आता सर्व ज्ञान आहे. ८४ चे चक्र देखील तुम्हाला समजावले जाते. जे ८४ जन्म घेणारे नसतील त्यांना समजणार नाही. तुम्ही समजता खरोखर आम्ही ८४ चा फेरा पूर्ण करून आता परत जात आहोत. बाबा म्हणतात - तुम्ही आत्मे अशरीरी आला होतात, मग अशरीरी होऊन परत जायचे आहे. तुम्ही पवित्र आत्मा होऊन जाता. पवित्र बनण्यासाठी तुम्ही पुरुषार्थ करत आहात. योगबलाने अर्थात आठवणीच्या बलाने तुम्ही पवित्र बनाल. ‘योग’ शब्द शास्त्रांमधला आहे. योग्य शब्द आहे - (याद) आठवण. पत्नीला पतीची अथवा पतीला पत्नीची आठवण असते ना. योग याचा अर्थच आहे - आठवण. बाबा देखील म्हणतात - मामेकम् (मज एकाची) आठवण करा, इतरांशी असलेला बुद्धीयोग तोडून मज आपल्या पित्या सोबत बुद्धीयोग जोडा. आठवण करा. जितकी आठवण कराल तितकी तुमची विकर्म विनाश होतील. बरोबर भारताला कल्प-कल्प वारसा मिळतो. शिवजयंती देखील प्रसिद्ध आहे. जसे बुद्ध, क्राईस्ट इत्यादींची जयंती आहे, तशी निराकार शिवबाबांची जयंती आहे. ते सर्वोच्च आहेत. कृष्ण जयंती देखील प्रसिद्ध आहे, परंतु ते येऊन काय करतात हे कोणालाच ठाऊक नाहीये. श्रीकृष्ण सतयुगाचा राजकुमार होता. जरूर त्याला कोणीतरी अशी कर्मे शिकवली असतील, ज्यामुळे सतयुगाचा राजकुमार बनला. छोटा मुलगा तर पवित्रच आहे. तिथे विकाराची गोष्टच नसते. छोटा मुलगा शुद्ध असतो. भगवान तर एकच निराकार आहेत, गॉड इज वन. बाकी सर्व आहे रचना. रचनेला कधी रचनेकडून वारसा मिळू शकत नाही. वारसा वडिलांकडून मिळतो. भावाला भावाकडून वारसा मिळू शकत नाही. तुम्ही सर्व भाऊ-भाऊ आहात. ब्रदरहुड म्हणतात ना. बाबा तर एकच आहेत, वारसा पित्याकडून मिळेल. सर्व भावांचे सद्गती दाता एक बाबाच आहेत. सर्व आत्म्यांना बाबांकडून वारसा मिळत आहे. बाबा म्हणतात - मी येऊन आत्म्यांना शिकवतो, आत्म्यांना सद्गती देतो. बाबा बसून राजयोग शिकवत आहेत. या शिक्षणाद्वारे प्राप्त होणारे पद तुम्हाला इथे मिळवायचे नाहीये. ते बॅरिस्टर इत्यादी या जन्मात बनतात, मग दुसरा जन्म घेऊन पुन्हा नव्याने शिकतील.

तुम्ही जाणता या अभ्यासामुळे आपण २१ जन्मांकरिता प्रारब्ध मिळवतो. तिथे सतयुगामध्ये डॉक्टर इत्यादी कोणीही असत नाहीत. तिथे कोणताही आजारच नसतो. तिथे तुम्ही गर्भ-महालामध्ये राहाता. इथे गर्भ-जेलमध्ये राहाता, जिथे खूप सजा मिळते, तेव्हाच तर बोलावतात - या जेलमधून बाहेर काढा, आम्ही पुन्हा कोणतीही चूक करणार नाही. धर्मराजासोबत प्रतिज्ञा करतात. इथे तुम्हाला शिवबाबांसोबत प्रतिज्ञा करायची आहे. बाबा आम्ही कधीही विकर्म करणार नाही. ५ विकार आम्ही तुम्हाला देऊन टाकत आहोत. बाबा हे सुद्धा जाणतात की, विकार काही असे पटकन सुटणार नाहीत. आतमध्ये भीती पाहिजे, मी विकारांचे दान देऊन मग पुन्हा घेतले तर खूप मोठे पाप होईल. जसे राजा हरिश्चंद्राचे उदाहरण आहे. बाबा जाणतात, असे नाही की ५ विकार पटकन सुटतील. नाही, वेळ लागतो. तुमची कर्मातीत अवस्था होईल तेव्हा युद्ध सुरू होईल. हे ५ विकार खूप मोठे शत्रू आहेत, त्यापैकी एक मुख्य आहे - देह-अभिमान. त्याचे दान देणे किती कठीण आहे. वारंवार बाबा सांगतात - ‘स्वतःला आत्मा समजून मज पित्याची आठवण करा’. परंतु हे होत नाही. देह-अभिमानी बनल्यामुळे मग काम-विकाराचा फटका बसतो. देह-अभिमान सर्वात जास्त प्रबळ आहे. देही-अभिमानी बनण्यासाठी मेहनत लागते. मुख्य देह-अभिमान आल्यामुळेच पापे घडली आहेत. ५ विकारांचे दान द्यावे लागेल, यामध्ये वेळ लागतो. साजन शिवाय सजणी तर जाऊ शकत नाहीत. पहिले साजनला जायचे आहे, मग सजणी जातील. साजनला येऊन सर्व आत्म्यांना घेऊन जायचे आहे. जोपर्यंत कर्मातीत अवस्था होईल तोपर्यंत पुरुषार्थ करायचा आहे. देह-अभिमान आल्यामुळेच मग चुका होतात. म्हणतात - ‘बाबा, देह-अभिमानामध्ये येऊन विकाराच्या अधीन झालो’. वादळे तर खूप येतील. विकाराचा संकल्प येईल परंतु तरीही कर्मेंद्रियांकडून कधीही कोणतेही पाप करू नका. मायेला जिंकण्यासाठी किती मेहनत करावी लागते. बाबा म्हणतात - ‘तुम्ही जर विवाहित असाल तर पवित्र राहून दाखवा, तर मग संन्यासी देखील बघतील’. तुमची कमाई बघा किती जबरदस्त आहे. पवित्र राहून दाखवाल तर खूप उच्च पद प्राप्त कराल. तुमच्यावर तर सर्वजण कुर्बान जातील. बाबा देखील महिमा करतात. भले पवित्र देखील राहिले तरीही योग देखील पाहिजे ना. योगमध्ये देखील वारंवार विघ्न पडतात. देह-अभिमान येतो. पवित्र राहतात ते तर ठीक आहे, पवित्रतेने पवित्र दुनियेचा वारसा प्राप्त कराल. परंतु मग माया देखील ताकद लावेल, माया खूप वार करते. बाबा समजावून सांगतात - हे सर्व होणार. बहादुरी दाखवतात परंतु त्याच सोबत निरंतर आठवण देखील राहावी तेव्हाच विकर्म विनाश होतील. जे पैलवान बनतात त्यांना माया देखील खूप सतावते. फार मुश्किलीने आठवणीमध्ये राहू शकतात. जे राहू शकतात त्यांना अनुभव विचारला पाहिजे - काय वाटते, कसे राहता. आठवणीमध्ये राहिल्याने विकर्म विनाश होतील. ही गोष्ट देखील एकदम वेगळी आणि नवीन आहे. इथे बसला आहात तर नशा चढलेला आहे. हे देखील समजता - भगवान एकच निराकार आहेत, ना की श्रीकृष्ण. वास्तविक श्रीकृष्णासाठी शास्त्रांमध्ये गोष्टी लिहिल्या आहेत - उखळीला बांधले, असे केले… अशा काही गोष्टी नाहीयेत. ही देखील त्याची निंदा करतात, इन्सल्ट करतात. श्रीकृष्णामध्ये तर कोणताही अवगुण नव्हता, चंचलता करणे हा देखील एक अवगुण आहे ना. श्रीकृष्ण तर खरोखरच मर्यादा पुरुषोत्तम आहेत. त्यांची महिमा गातात - ‘सर्वगुण संपन्न…’ गायले जाते - ‘गुरु ब्रह्मा, गुरु विष्णु…’

तुम्ही बोला - गुरु तर आमचा कोणी नाही. आम्ही यांना ना गुरु, ना ईश्वर मानतो. पतित-पावन तर एकच निराकार आहेत ना. साकार गुरु काही पतित-पावन असू शकत नाही. यावेळी तुम्ही परमपिता परमात्म्याची संपूर्ण जीवन कहाणी जाणता. ५ हजार वर्षांमध्ये शिवबाबांचा कोणता पार्ट बजावला जातो - हे तुम्हीच बाबांद्वारे जाणता. नॉलेजफुल तर बाबा आहेत ना. सुख-शांती आनंदाचा सागर… ही महिमा त्यांची आहे. बाबांकडे खजिना आहे तर जरूर मुलांना देखील देत असतील ना. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) कर्मातीत अवस्थेला प्राप्त करण्याकरिता या कर्मेंद्रियांद्वारे कोणतीही चूक करायची नाही. पवित्र राहण्यासोबतच आठवणीमध्ये देखील मजबूत बनायचे आहे (दृढ राहायचे आहे).

२) कायमचा पुण्य-आत्मा बनण्याकरिता तन-मन-धनाने बाबांवर बलिहार जायचे आहे. एकदा बलिहार गेल्याने २१ जन्मांकरिता पुण्य-आत्मा बनाल.

वरदान:-
‘सहजयोग’ला नेचर आणि नॅचरल (स्वाभाविक आणि नैसर्गिक) बनविणारे प्रत्येक सब्जेक्टमध्ये परफेक्ट भव

जशी बाबांची मुले आहात - यामध्ये कोणतेही पर्सेंटेज नाहीये, तसेच निरंतर सहजयोगी अथवा योगी बनण्याच्या स्टेजमध्ये आता हे पर्सेंटेज संपले पाहिजे. नैसर्गिक आणि स्वाभाविक झाले पाहिजे. जसे एखाद्याचा विशेष स्वभाव असतो त्या स्वभावाच्या वश होऊन इच्छा नसताना देखील चालत राहतात. तसेच हा स्वभाव बनवा. ‘काय करू, कसा योग लावू’ - या गोष्टी आता संपल्या पाहिजेत तेव्हाच प्रत्येक सब्जेक्टमध्ये परफेक्ट बनाल. परफेक्ट अर्थात इफेक्ट आणि डिफेक्ट पासून दूर.

बोधवाक्य:-
सहन करायचे असेल तर आनंदाने करा, मजबुरीने नको.

हे अव्यक्त इशारे - ज्वालास्वरूप स्थितीमध्ये राहून शक्तिशाली आठवणीचा अनुभव करा.

शक्तिशाली योग अर्थात निष्ठेचा प्रखर अग्नी, ज्वाला रूपातील आठवणच भ्रष्टाचाराच्या, अत्याचाराच्या अग्नीला विझवेल आणि सर्व आत्म्यांना सहयोग देईल; याद्वारेच बेहदची वैराग्यवृत्ती जागृत होईल. एका बाजूला आठवणीचा अग्नी त्या अग्नीला समाप्त करेल आणि दुसऱ्या बाजूला आत्म्यांना परमात्म संदेशाची, शीतल स्वरूपाची अनुभूती करवेल, याद्वारेच आत्मे पापांच्या आगीतून मुक्त होऊ शकतील.