17-09-2024
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - हे रहस्य सर्वांना ऐकवा की आबू सर्वात मोठे तीर्थस्थान आहे, स्वयं
ईश्वराने इथूनच सर्वांची सद्गती केली आहे”
प्रश्न:-
कोणती एक
गोष्ट जर लोकांना समजली तर इथे गर्दी होईल?
उत्तर:-
जर लोकांना ही एक मुख्य गोष्ट समजली की, बाबांनी जो राजयोग शिकवला होता, तो आता
पुन्हा शिकवत आहेत, ते सर्वव्यापी नाहीत. बाबा यावेळी आबूमध्ये येऊन विश्वामध्ये
शांती स्थापन करत आहेत, त्याचे जड यादगार (स्थूल स्मृतीस्थळ) दिलवाला मंदिर देखील
आहे. आदि देव इथे चैतन्यमध्ये बसले आहेत, हे चैतन्य दिलवाला मंदिर आहे, ही गोष्ट
समजली तर आबूची महिमा होईल आणि इथे गर्दी होईल. आबूचे नाव प्रसिद्ध झाले तर इथे
भरपूर लोक येतील.
ओम शांती।
मुलांना योग शिकवला. इतर सर्व ठिकाणी सर्वजण आपोआप शिकतात, शिकविणारा पिता असत नाही.
एकमेकांना आपोआप शिकवतात. इथे तर बाबा बसून मुलांना शिकवतात. रात्रं-दिवसाचा फरक आहे.
तिथे तर अनेक मित्र-संबंधी इत्यादींची आठवण येत राहते, इतकी आठवण करू शकत नाहीत
त्यामुळे देही-अभिमानी खूप मुश्किलीने बनतात. इथे तर तुम्हाला खूप लवकर देही-अभिमानी
बनायला हवे, परंतु बरेच आहेत ज्यांना काहीच माहिती नाही आहे. शिवबाबा आमची सेवा करत
आहेत, आम्हाला म्हणतात - ‘स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा’. जे बाबा
यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) विराजमान आहेत, इथे विराजमान आहेत, त्यांची आठवण
करावी लागते. अशी बरीच मुले आहेत ज्यांना हा निश्चयच नाही आहे की शिवबाबा ब्रह्मा
तनाद्वारे आपल्याला शिकवत आहेत; जसे इतर लोक म्हणतात, आम्ही विश्वास कसा ठेवायचा,
इथे देखील असेच आहे. जर पूर्ण निश्चय असता तर अतिशय प्रेमाने बाबांची आठवण करत-करत
आपल्यामध्ये बळ भरले असते, खूप सेवा केली असती; कारण संपूर्ण विश्वाला पावन बनवायचे
आहे ना. योगामध्ये देखील कमजोर आहेत आणि ज्ञानामध्ये देखील कमजोर आहेत. ऐकतात तर खरे
परंतु धारणा होत नाही. धारणा जर असती तर मग इतरांना देखील धारणा करवावी. बाबांनी
समजावून सांगितले होते की, ते (दुनियेतील) लोक कॉन्फरन्स इत्यादी भरवत राहतात,
त्यांना विश्वामध्ये शांती हवी आहे; परंतु विश्वामध्ये शांती केव्हा होती, ती कशी
झाली होती, हे काहीच जाणत नाहीत. कोणत्या प्रकारची शांती होती, तीच हवी आहे ना. हे
तर तुम्ही मुले जाणता विश्वामध्ये सुख-शांतीची स्थापना आता होत आहे. बाबा आलेले
आहेत. हे दिलवाला मंदिर कसे आहे, आदि देव सुद्धा आहेत आणि वर विश्वामधील शांतीचे
दृश्य देखील आहे. कुठेही कॉन्फरन्स इत्यादीला तुम्हाला बोलवतात तर तुम्ही विचारा -
विश्वामध्ये शांती कोणत्या प्रकारची हवी आहे? या लक्ष्मी-नारायणाच्या राज्यामध्ये
विश्वामध्ये शांती होती. ते तर दिलवाला मंदिरामध्ये संपूर्ण यादगार आहे. विश्वामध्ये
शांतीचे सॅम्पल (उदाहरण) तर पाहिजे ना. लक्ष्मी-नारायणाच्या चित्रावरुन सुद्धा समजत
नाहीत. पत्थर-बुद्धी आहेत ना. तर त्यांना सांगितले पाहिजे की, ‘आम्ही सांगू शकतो
विश्वामध्ये शांतीचे उदाहरण एक तर हे लक्ष्मी-नारायण आहेत आणि मग यांची राजधानी
देखील पाहू इच्छित असाल तर ती देखील दिलवाला मंदिरामध्ये येऊन बघा’. मॉडेलच दाखवले
जाईल ना, ते आबूमध्ये येऊन बघा. मंदिर बनविणारे स्वतः जाणत नाहीत, ज्यांनी स्वतःच
बसून हे यादगार बनविले आहे, ज्याला दिलवाला मंदिर नाव दिले आहे. आदि देवाला सुद्धा
बसवले आहे, वरती स्वर्ग देखील दाखवला आहे. जसे ते जड आहेत तसे तुम्ही आहात चैतन्य.
याला ‘चैतन्य दिलवाला’ असे नाव ठेवू शकता. परंतु माहित नाही किती गर्दी होईल.
मनुष्यच हरवून जातील हे तर मग काय आहे. समजावून सांगण्यासाठी खूप मेहनत करावी लागते.
बरीच मुले देखील हे समजत नाहीत. जरी दारात, जवळ बसले आहेत परंतु समजत काहीच नाहीत.
प्रदर्शनीमध्ये अनेक प्रकारचे मनुष्य जातात, अनेक मठ-पंथ आहेत, वैष्णव धर्माचे लोक
देखील आहेत. त्यांना वैष्णव धर्माचा अर्थच कळत नाही. श्रीकृष्णाचे राज्य कोठे आहे,
हेच जाणत नाहीत. श्रीकृष्णाच्या राज्याला सुद्धा स्वर्ग, वैकुंठ म्हटले जाते.
बाबांनी सांगितले होते
जिथे बोलावले असेल, तिथे जाऊन तुम्ही समजावून सांगा - ‘विश्वामध्ये शांती केव्हा
होती? हे आबू सर्वात उच्च ते उच्च तीर्थस्थान आहे कारण इथे बाबा विश्वाची सद्गती
करत आहेत, आबू पर्वतावर त्याचे सॅम्पल (नमुना) पाहू इच्छित असाल तर येऊन दिलवाला
मंदिर बघा. विश्वामध्ये शांती कशी स्थापन केली होती - त्याचे सॅम्पल आहे. ऐकून खूप
खुश होतील. जैनलोक सुद्धा खुश होतील. तुम्ही म्हणाल हे प्रजापिता ब्रह्मा आमचे पिता
आहेत आदि देव. तुम्ही समजावून सांगता तरीही समजत नाहीत. म्हणतात - ‘ब्रह्माकुमारी
माहित नाही काय बोलतात’. तर आता तुम्ही मुलांनी आबूची अति श्रेष्ठ महिमा करून
समजावून सांगितले पाहिजे. आबू आहे मोठ्यात मोठे तीर्थस्थान. बॉम्बेमध्ये देखील
समजावून सांगू शकता की, आबू पर्वत मोठ्यात मोठे तीर्थस्थान आहे कारण परमपिता
परमात्म्याने आबूमध्ये येऊन स्वर्गाची स्थापना केली आहे. कशी स्वर्गाची रचना रचली
आहे - त्या स्वर्गाचे आणि आदि देवाचे सर्व मॉडेल आबूमध्ये आहे, जे कोणताही मनुष्य
समजू शकत नाही. आम्ही आता जाणतो, तुम्ही जाणत नाही म्हणून आम्ही तुम्हाला समजावून
सांगतो. आधी तर तुम्ही हे विचारा की, तुम्हाला विश्वामध्ये शांती कशी हवी आहे, कधी
पाहिली आहे का? विश्वामध्ये शांती तर यांच्या (लक्ष्मी-नारायणाच्या) राज्यामध्ये
होती. एकच आदि सनातन देवी-देवता धर्म होता, यांच्या घराण्याचे राज्य होते. चला, तर
तुम्हाला यांच्या राजधानीचे मॉडेल आबूमध्ये दाखवतो. ही तर आहेच जुनी पतित दुनिया.
नवी दुनिया तर म्हणणार नाही ना. नव्या दुनियेचे मॉडेल तर इथे आहे, नवीन दुनिया आता
स्थापन होत आहे. तुम्ही जाणता तेव्हाच तर सांगत आहात. सगळेच काही जाणत नाहीत, सांगू
देखील शकणार नाहीत आणि लक्षातही येणार नाही. गोष्ट आहे अतिशय सोपी. ‘वरती स्वर्गाची
राजधानी उभी आहे, खाली आदि देव बसले आहेत ज्याला ॲडम देखील म्हणतात. ते आहेत
ग्रेट-ग्रेट ग्रँड फादर’. अशी तुम्ही महिमा ऐकवाल तर ऐकून खुश होतील. आहे देखील
एकदम ॲक्युरेट; बोला, ‘तुम्ही श्रीकृष्णाची महिमा करता परंतु तुम्ही जाणत तर काहीच
नाही. श्रीकृष्ण तर वैकुंठाचा महाराजा, विश्वाचा मालक होता. त्याचे तुम्ही मॉडेल
पाहू इच्छिता तर चला आबूमध्ये, तुम्हाला वैकुंठाचे मॉडेल दाखवू’. ते कसे पुरुषोत्तम
संगमयुगावर राजयोग शिकतात, ज्याद्वारे मग विश्वाचे मालक बनले आहेत, ते देखील मॉडेल
दाखवा. संगमयुगातील तपस्या देखील दाखवा. प्रॅक्टिकल जे झाले होते त्याचे यादगार
दाखवा. शिवबाबा, ज्यांनी लक्ष्मी-नारायणाचे राज्य स्थापन केले, त्यांचे देखील चित्र
आहे, अंबेचे देखील मंदिर आहे. अंबेला काही १०-२० भुजा नाही आहेत. भुजा तर दोनच
असतात. तुम्ही याल तर आम्ही तुम्हाला दाखवू. वैकुंठ देखील आबूमध्ये दाखवू.
आबूमध्येच बाबांनी येऊन साऱ्या विश्वाला हेवन बनवले आहे. सद्गती दिली आहे. आबू
सर्वात मोठे तीर्थ आहे, सर्वधर्मवाल्यांची सद्गती करणारे एक बाबाच आहेत, आबूमध्ये
चला तर त्यांचे यादगार तुम्हाला दाखवतो. आबूची तर तुम्ही भरपूर महिमा करू शकता.
तुम्हाला सर्व यादगार दाखवतो. ख्रिश्चन लोक देखील जाणू इच्छितात - प्राचीन भारताचा
राजयोग कोणी शिकवला, अशी कोणती गोष्ट होती? बोला, चला आबूमध्ये दाखवतो. वरच्या
छतामध्ये वैकुंठ देखील अगदी ॲक्युरेट बनवला आहे. तुम्ही असा बनवू शकणार नाही. तर हे
चांगल्या रीतीने सांगायचे आहे. टुरिस्ट एवढी भटकंती करत असतात, त्यांनी देखील येऊन
समजून घ्यावे. तुमच्या आबूचे नाव मोठे झाले तर भरपूर लोक येतील. आबू खूप प्रसिद्ध
होईल. जेव्हा कोणी विचारतात की, विश्वामध्ये शांती कशी होईल? संमेलन इत्यादीचे
निमंत्रण देतात तर विचारले पाहिजे - ‘विश्वामध्ये शांती केव्हा होती, ते जाणता का?
विश्वामध्ये शांती कशी होती - चला आम्ही समजावून सांगतो, मॉडेल्स इत्यादी सर्व
दाखवतो’. असे मॉडेल इतर कुठेही नाही आहे. आबूच सर्वात मोठे सर्वश्रेष्ठ तीर्थ आहे,
जिथे बाबांनी येऊन विश्वामध्ये शांती, सर्वांची सद्गती केली आहे. या गोष्टी इतर
कोणीही जाणत नाहीत. तुमच्यामध्ये देखील नंबरवार आहेत, जरी मोठे महारथी, म्युझियम
इत्यादी सांभाळणारे आहेत, परंतु योग्य प्रकारे कोणाला समजावून सांगतात की नाही, बाबा
चेक तर करतात ना. बाबा सर्व काही जाणतात, जे कोणी जिथे कुठे आहेत, त्यांची बाबांना
माहिती आहे. कोण-कोण पुरुषार्थ करतात, कोणते पद मिळवतील? यावेळी जर मृत्यु झाला तर
काहीच पद प्राप्त करू शकणार नाहीत. आठवणीच्या यात्रेची मेहनत ते समजू शकत नाहीत.
बाबा रोज-रोज नवीन गोष्टी समजावून सांगतात की, अशा पद्धतीने त्यांना समजावून सांगून
इथे घेऊन या. इथे तर यादगार कायम आहे.
बाबा म्हणतात - ‘मी
देखील इथेच आहे, आदि देव देखील इथेच आहेत, वैकुंठ देखील इथेच आहे’. आबूची खूप मोठी
महिमा होईल. माहित नाही आबू काय होईल. जसे बघा, कुरुक्षेत्र अजून चांगले
बनविण्यासाठी करोडो रुपये खर्च करत राहतात. कित्येक मनुष्य तिथे जाऊन एकत्रित होतात,
इतकी दुर्गंधी घाण होते, काही विचारू नका. किती गर्दी होते. बातमी आली होती की, भजनी
मंडळींची एक बस नदीमध्ये बुडाली. हे सर्व दुःख आहे ना. अकाली मृत्यू होत राहतात.
तिथे (सतयुगामध्ये) तर असे काही होत नाही, या सर्व गोष्टी तुम्ही समजावून सांगू शकता.
बोलणारा अतिशय हुशार असायला हवा. बाबा ज्ञानाची उधळण करीत आहेत, बुद्धीमध्ये पक्के
करत आहेत. या गोष्टींना दुनिया थोडीच समजते. ते समजतात नव्या दुनियेचा फेरफटका
मारण्यासाठी जात आहेत. बाबा म्हणतात - ‘ही जुनी दुनिया आता गेली की गेली’. ते (दुनियावाले)
तर म्हणतात अजून ४० हजार वर्षे बाकी आहेत. तुम्ही तर सांगता की संपूर्ण कल्पच ५
हजार वर्षांचे आहे. जुन्या दुनियेचा मृत्यू तर समोर उभा आहे. याला म्हटले जाते घोर
अंध:कार. कुंभकर्णाच्या निद्रेमध्ये झोपून पडले आहेत. कुंभकर्ण अर्धा कल्प झोपत होता,
अर्धा कल्प जागा राहत होता. तुम्ही कुंभकर्ण होता. हा खेळ अतिशय अद्भुत आहे. या
गोष्टींना सर्वजण थोडेच समजू शकतात. बरेचजण तर असेच भावनेपोटी येतात. सर्वजण जात
आहेत हे ऐकतात तर आपणही चालू लागतात. त्यांना सांगितले की, ‘आम्ही शिवबाबांकडे जात
आहोत, शिवबाबा स्वर्गाची स्थापना करत आहेत. त्या बेहदच्या बाबांची आठवण केल्याने
बेहदचा वारसा मिळतो’, बस्स. तर ते देखील म्हणतात - ‘शिवबाबा, आम्ही तुमची मुले आहोत,
तुमच्याकडून वारसा जरूर घेणार’. बस्स, बेडा (जीवनरूपी नाव) तर पार आहे. भावनेचे भाडे
बघा किती मिळते. भक्तिमार्गामध्ये तर आहे अल्पकाळाचे सुख. इथे तुम्ही मुले जाणता
बेहदच्या बाबांकडून बेहदचा वारसा मिळतो. ते (भक्तिमार्गामध्ये) तर आहे भावनेचे,
अल्पकालीन सुखाचे भाडे. इथे तुम्हाला मिळाले आहे २१ जन्मांसाठी भावनेचे भाडे. बाकी
साक्षात्कार इत्यादीमध्ये काहीही नाहीये. कोणी म्हणतात साक्षात्कार घडावा, तेव्हाच
बाबा समजून जातात की यांना काहीच समजलेले नाहीये. साक्षात्कार करायचा असेल तर जाऊन
नवधा भक्ती करा. त्याने तर काहीच मिळत नाही. फार-फार तर दुसऱ्या जन्मामध्ये कोणीतरी
चांगले बनाल. चांगला भक्त असेल तर चांगला जन्म मिळेल. ही तर गोष्टच निराळी आहे. ही
जुनी दुनिया बदलत आहे. बाबा आहेतच दुनिया बदलणारे. यादगार (स्मारक) उभे आहे ना. खूप
जुने मंदिर आहे. काही तुटले-फुटले तर मग डागडुजी करत राहतात. परंतु ते सौंदर्य तर
कमी होतेच होते. या तर सर्व विनाशी गोष्टी आहेत. तर बाबा समजावून सांगत आहेत -
‘मुलांनो, एकतर आपल्याच कल्याणासाठी स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा तर
विकर्म विनाश होतील’. हा अभ्यासाचा विषय आहे. बाकी हे जे मथुरामध्ये मधुबन, कुंज
गल्ली इत्यादी असेच बनवले आहे ते तसे काहीच नाही आहे. ना काही गोप-गोपिंचा खेळ आहे.
हे समजावून सांगण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. एक-एक पॉईंट अगदी व्यवस्थित
समजावून सांगा. कॉन्फरन्स इत्यादीमध्ये देखील जाणारा चांगला योगी पाहिजे.
तलवारीमध्ये धार (शक्ती) नसेल, तर कोणालाही तीर लागणार नाही (सांगितलेले काळजाला
भिडणार नाही). म्हणून बाबा देखील म्हणतात अजून वेळ आहे. आता जर त्यांनी मानले की
परमात्मा सर्वव्यापी नाही आहे तर गर्दी होईल. परंतु अजून ती वेळ आलेली नाही आहे. एक
मुख्य गोष्ट समजतील की राजयोग बाबांनी शिकवला होता, जो यावेळी शिकवत आहेत. याच्या
ऐवजी त्याचे नाव टाकले आहे जो की आता सावळा (पतित) आहे. किती मोठी चूक आहे. यामुळेच
तुमचा बेडा बुडाला आहे (जीवनरूपी नाव बुडाली आहे).
आता बाबा समजावून
सांगत आहेत - हे शिक्षण सोर्स ऑफ इन्कम आहे (कमाईचे साधन आहे), स्वतः बाबा मनुष्याला
देवता बनविण्यासाठी शिकवायला येतात, यामध्ये पवित्र देखील जरूर बनायचे आहे, दैवी
गुण सुद्धा धारण करायचे आहेत. नंबरवार तर असतातच. जी काही सेंटर्स आहेत सर्व
नंबरवार आहेत. ही सर्व राजधानी स्थापन होत आहे; काही मावशीचे घर थोडेच आहे. तुम्ही
बोला, ‘स्वर्ग म्हटले जाते सतयुगाला. परंतु तिथले राज्य कसे चालते, देवतांचा कळप
बघायचा असेल तर चला आबूला’. अजून कोणती अशी जागा नाही आहे जिथे अशी छतावर राजाई
दाखवली असेल. भले अजमेरमध्ये स्वर्गाचे मॉडेल आहे परंतु ती गोष्ट वेगळी आहे. इथे तर
आदि देव सुद्धा आहेत ना. सतयुग कोणी आणि कसे स्थापन केले, हे तर ॲक्युरेट यादगार आहे.
आता आपण ‘चैतन्य दिलवाला’ नाव लिहू शकत नाही. जेव्हा लोक स्वतः समजतील तेव्हा आपणच
म्हणतील की, ‘तुम्ही लिहा’. आता म्हणणार नाहीत. आता तर बघा छोट्याशा गोष्टीवरून काय
करून टाकतात. खूप क्रोधी असतात, देह-अभिमान आहे ना. देही-अभिमानी तर तुम्हा
मुलांशिवाय कोणी असू शकत नाही. पुरुषार्थ करायचा आहे. असे नाही की जे नशिबामध्ये
असेल. पुरुषार्थी असे म्हणणार नाहीत. ते तर पुरुषार्थ करत राहतील मग जेव्हा फेल
होतात तेव्हा म्हणतात - ‘नशिबात जे होते’. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१)
देही-अभिमानी बनण्याचा पूर्णपणे पुरुषार्थ करायचा आहे. असा कधीही विचार करायचा नाही
की जे नशिबात असेल. समजूतदार बनायचे आहे.
२) ज्ञान ऐकून त्याला
स्वरूपामध्ये आणायचे आहे, आठवणीची धार (शक्ती) धारण करून मग सेवा करायची आहे.
सर्वांना आबू महान तीर्थाची महिमा ऐकवायची आहे.
वरदान:-
एक ‘बाबा’ या
शब्दाच्या स्मृतीद्वारे आठवण आणि सेवेमध्ये राहणारे सच्चे योगी, सच्चे सेवाधारी भव
तुम्ही मुले मुखावाटे
अथवा मनामध्ये वारंवार ‘बाबा’ शब्द म्हणता, मुले आहात तर ‘बाबा’ शब्द आठवणे किंवा
विचार करणे हाच योग आहे आणि मुखावाटे वारंवार म्हणणे की, ‘बाबा असे म्हणतात, बाबांनी
हे सांगितले’ तर हीच सेवा आहे. परंतु या ‘बाबा’ शब्दाला कोणी मनापासून म्हणणारे
आहेत कोणी नॉलेजच्या आधारे बुद्धीद्वारे म्हणणारे. जे मनापासून म्हणतात त्यांना
प्रत्यक्ष प्राप्ती अंतःकरणामध्ये कायम खुशी आणि शक्ती मिळते. बुद्धीवाल्यांना फक्त
बोलताना खुशी होते परंतु कायमची खुशी राहत नाही.
बोधवाक्य:-
‘परमात्मा’
रुपी शमेवर फिदा होणारेच सच्चे परवाने आहेत.