17-09-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - आठवण करून सतोप्रधान बनण्यासोबतच अभ्यास करून कमाई जमा करायची आहे, अभ्यासाच्या वेळी बुद्धी इकडे-तिकडे भटकू नये”

प्रश्न:-
तुम्ही डबल अहिंसक, अननोन वॉरियर्सचा कोणता विजय निश्चित आहे आणि का?

उत्तर:-
तुम्ही मुले जो मायेवर विजय प्राप्त करण्याचा पुरुषार्थ करत आहात, तुमचे ध्येय आहे की, आम्ही रावणाकडून आपले राज्य घेऊनच राहणार… ही देखील ड्रामामध्ये युक्ती रचलेली आहे. तुमचा विजय निश्चित आहे कारण तुमच्या सोबत साक्षात् परमपिता परमात्मा आहेत. तुम्ही योगबलाने विजय प्राप्त करता. मनमनाभव या महामंत्राने तुम्हाला राजाई मिळते. तुम्ही अर्धा कल्प राज्य करणार.

गीत:-
मुखड़ा देख ले प्राणी…

ओम शांती।
गोड-गोड मुले जेव्हा समोर बसलेली असतात तर ती समजतात की, बरोबर आमचा कोणी साकार टीचर नाही आहे, आम्हाला शिकवणारे ज्ञानाचा सागर बाबा आहेत. हा तर पक्का निश्चय आहे - ते आमचे बाबा सुद्धा आहेत, जेव्हा शिकत असतो तेव्हा अभ्यासावर अटेंशन राहते. स्टुडंट आपल्या स्कुलमध्ये बसले असतील तर त्यांना टीचरचीच आठवण येणार, पित्याची नाही; कारण स्कुलमध्ये बसले आहेत. तुम्ही देखील जाणता बाबा टीचर सुद्धा आहेत. नावाला तर पकडून राहायचे नाही ना. लक्षात ठेवायचे आहे - आपण आत्मा आहोत, बाबांकडून ऐकत आहोत. असे तर कधी होतच नाही. ना सतयुगामध्ये, ना कलियुगामध्ये होते. केवळ एकदाच संगमयुगावर होते. तुम्ही स्वतःला आत्मा समजता. आमचे बाबा यावेळी टीचर आहेत कारण शिकवत आहेत, दोन्ही कामे करावी लागतात. आत्मा शिकते शिवबाबांकडून. हा देखील योग आणि अभ्यास आहे. शिकते आत्मा, शिकवतात परमात्मा, यामध्ये आणखीनच जास्त फायदा आहे जेव्हा की तुम्ही सन्मुख आहात. अनेक मुले चांगल्या रीतीने आठवणीमध्ये राहतील. कर्मातीत अवस्थेमध्ये पोहोचाल तर ती देखील जणू पवित्रतेची ताकद मिळते. तुम्ही जाणता शिवबाबा आम्हाला शिकवत आहेत. हा तुमचा योग देखील आहे, कमाई देखील आहे. आत्म्यालाच सतोप्रधान बनायचे आहे. तुम्ही सतोप्रधान सुद्धा बनत आहात, धन देखील घेत आहात. स्वतःला आत्मा जरूर समजायचे आहे. बुद्धी भटकता कामा नये. इथे बसता तर बुद्धी मध्ये हे राहावे की शिवबाबा शिकवण्यासाठी टीचर रूपामध्ये आले की आले. तेच नॉलेजफूल आहेत, आम्हाला शिकवत आहेत. बाबांची आठवण करायची आहे. स्वदर्शन चक्रधारी देखील आपणच आहोत. लाइट हाऊस देखील आहोत. एका डोळ्यामध्ये शांतीधाम, एका डोळ्यामध्ये जीवनमुक्तीधाम आहे. या डोळ्यांची गोष्ट नाहीये, आत्म्याला तिसरा नेत्र म्हटले जाते. आता आत्मे ऐकत आहेत, जेव्हा शरीर सोडतील तेव्हा आत्म्यामध्ये हे संस्कार राहतील. आता तुम्ही बाबांशी योग लावत आहात. सतयुगापासून तुम्ही वियोगी होता अर्थात बाबांशी योग नव्हता. आता तुम्ही योगी बनता, बाबांच्या सारखे. योग शिकवणारे आहेत ईश्वर म्हणून त्यांना म्हटले जाते - ‘योगेश्वर’. तुम्ही देखील योगेश्वरची मुले आहात. त्यांना योग लावायचा नाहीये. ते आहेत योग शिकविणारे परमपिता परमात्मा. तुम्ही एक-एक योगेश्वर, योगेश्वरी बनता नंतर मग राज-राजेश्वरी बनणार. ते आहेत योग शिकविणारे ईश्वर. स्वतः शिकत नाहीत, शिकवतात. श्रीकृष्णाचीच आत्मा शेवटच्या जन्मामध्ये योग शिकून मग श्रीकृष्ण बनते, म्हणून श्रीकृष्णाला सुद्धा योगेश्वर म्हणतात कारण त्यांची आत्मा आता शिकत आहे. योगेश्वराकडून योग शिकून श्रीकृष्ण पद मिळवते, यांचे नाव मग बाबांनी ब्रह्मा ठेवले आहे. आधी तर लौकिक नाव होते नंतर मरजीवा बनले आहेत. आत्म्यालाच बाबांचे बनायचे आहे. बाबांचे बनला तर मरून गेलात ना. तुम्ही देखील बाबांकडून योग शिकता. या संस्कारांसोबतच तुम्ही जाणार शांतीधाममध्ये. आणि मग प्रारब्धचा नवीन पार्ट इमर्ज होईल. तिथे या गोष्टी आठवणार नाहीत. या आता बाबा समजावून सांगत आहेत. आता पार्ट पूर्ण होत आहे. नंतर मग नव्याने सुरु होईल. जसा बाबांना संकल्प उत्पन्न झाला की, आपण जावे, तर बाबा म्हणतात - मी येतो आणि माझी वाणी सुरु होते. तिथे तर शांतीमध्ये आहेत. मग ड्रामानुसार त्यांचा पार्ट सुरू होतो. येण्याचा तर संकल्प उत्पन्न होतो. मग इथे येऊन पार्ट बजावतात. तुमचे आत्मे देखील ऐकतात. नंबरवार पुरुषार्थानुसार कल्पा पूर्वीप्रमाणे. दिवसेंदिवस वृद्धी देखील होत जाईल. एक दिवस तुम्हाला मोठे रॉयल हॉल देखील मिळतील, ज्यामध्ये मोठ-मोठ्या व्यक्ती देखील येतील. सगळे एकत्र बसून ऐकतील. दिवसेंदिवस श्रीमंत देखील गरीब होत जातील, पोट पाठीला लागेल. अशी संकटे येणार आहेत, मुसळधार पाऊस पडेल तर संपूर्ण शेती इत्यादी पाण्यामध्ये बुडून जाईल. नॅचरल कॅलेमिटीज तर येणारच आहेत. विनाश होणार आहे, याला म्हटले जाते नैसर्गिक आपत्ती. बुद्धी म्हणते विनाश जरूर होणार आहे. तिकडच्या साठी (विदेशासाठी) बॉम्ब्स देखील तयार आहेत, आणि मग नॅचरल कॅलेमिटीज इत्यादी आहेत इथल्यासाठी (भारतासाठी). यामध्ये खूप हिंमत पाहिजे. अंगदचे देखील उदाहरण आहे ना, त्यांना कोणी हलवू शकले नाही. अशी अवस्था पक्की करायची आहे - मी आत्मा आहे, शरीराचे भान नाहीसे होत जावे. सतयुगामध्ये तर जेव्हा आपोआप वेळ पूर्ण होते तर साक्षात्कार होतो. आता आपल्याला हे शरीर सोडून जाऊन बाळ बनायचे आहे. एक शरीर सोडून दुसऱ्यामध्ये जाऊन प्रवेश करतात, सजा इत्यादी तर तिथे काही नाहीच आहे. दिवसेंदिवस तुम्ही जवळ येत जाल. बाबा म्हणतात - माझ्यामध्ये जो पार्ट भरलेला आहे, तो प्रकट होत जाईल. मुलांना सांगत राहतील. मग बाबांचा पार्ट पूर्ण होईल तेव्हा तुमचा देखील पूर्ण होईल. मग तुमचा सतयुगाचा पार्ट सुरु होईल. आता तुम्हाला आपले राज्य घ्यायचे आहे, हा ड्रामा अतिशय युक्तीने बनलेला आहे. तुम्ही मायेवर विजय प्राप्त करता, यामध्ये सुद्धा वेळ लागतो. ते लोक (दुनियावाले) तर एका बाजूला समजतात की, आपण स्वर्गामध्ये बसलो आहोत, हे सुखधाम बनले आहे, दुसऱ्या बाजूला मग गाण्यामध्ये भारताची हालत सुद्धा ऐकवतात. तुम्ही जाणता हे तर अजूनच तमोप्रधान झाले आहेत. ड्रामानुसार तमोप्रधान सुद्धा वेगाने होत जातात. तुम्ही आता सतोप्रधान बनत आहात. आता नजदीक येत आहात, शेवटी विजय तर तुमचा होणारच आहे. हाहाकारा नंतर जयजयकार होणार. तुपाच्या नद्या वाहतील. तिथे तूप इत्यादी विकत घ्यावे लागणार नाही. सर्वांकडे आपापल्या फर्स्टक्लास गायी असतात. तुम्ही किती उच्च बनता. तुम्ही जाणता वर्ल्डचा इतिहास-भूगोल पुन्हा रिपिट होतो. बाबा येऊन वर्ल्डचा इतिहास रिपीट करतात म्हणून बाबांनी सांगितले आहे की, असे देखील लिहा वर्ल्डचा इतिहास-भूगोल कसा रिपीट होतो, येऊन समजून घ्या. जो सेन्सिबल (हुशार) असेल तो म्हणेल - ‘आता आयरन एज आहे तर जरूर गोल्डन एज रिपीट होणार’. कोणी तर म्हणतील सृष्टीचे चक्र लाखों वर्षांचे आहे, आता कसे रिपीट होईल. इथे सूर्यवंशी-चंद्रवंशींची हिस्ट्री तर नाही आहे. शेवटपर्यंत हे चक्र कसे रिपीट होते. हे देखील जाणत नाहीत की यांचे राज्य पुन्हा कधी असेल. रामराज्याला जाणत नाहीत. आता तुमच्या सोबत बाबा आहेत. ज्यांच्या बाजूला साक्षात् परमपिता परमात्मा बाबा आहेत त्यांचा जरूर विजय होणार आहे. बाबा काही हिंसा थोडीच करायला सांगतील. कोणाला मारणे हिंसा आहे ना. सर्वांत मोठी हिंसा आहे काम कटारी चालवणे. आता तुम्ही डबल अहिंसक बनत आहात. तिथे आहेच अहिंसा परमो देवी-देवता धर्म. तिथे ना कधी युद्ध होत आणि ना कधी विकारामध्ये जात. आता तुमचे आहे योगबल, परंतु हे न समजल्यामुळे शास्त्रांमध्ये असुर आणि देवतांचे युद्ध लिहिले आहे, अहिंसेला कोणीही जाणत नाही. हे तुम्हीच जाणता. तुम्ही आहात इनकॉग्निटो वॉरियर्स (गुप्त योद्धे). अननोन बट व्हेरी वेल नोन (अज्ञात परंतु खूप प्रसिद्ध). तुम्हाला कोणी वॉरियर्स (योद्धे) समजतील काय? तुमच्या द्वारे सर्वांना मनमनाभवचा संदेश मिळेल. हा आहे महामंत्र. मनुष्य या गोष्टींना समजत नाही. सतयुग-त्रेता मध्ये असे होत नाही. मंत्राने तुम्ही राजाई प्राप्त केली नंतर त्याची गरज नाही. तुम्ही जाणता आपण कसे चक्र फिरून आलो आहोत. आता पुन्हा बाबा महामंत्र देतात. मग अर्धा कल्प राज्य कराल. आता तुम्हाला दैवीगुण धारण करायचे आहेत आणि इतरांना करावयाचे आहेत. बाबा मत देत आहेत - स्वतःचा चार्ट ठेवल्याने खूप मजा येईल. रजिस्टरमध्ये गुड, बेटर, बेस्ट अशी श्रेणी असते ना. स्वतःला देखील जाणीव होते. कोणी चांगले शिकतात, कोणाचे अटेंशन राहत नाही तर मग फेल होतात. हे मग आहे बेहदचे शिक्षण. बाबा टीचर देखील आहेत, गुरु देखील आहेत. एकत्र काम चालते. हे एकच बाबा आहेत जे म्हणतात - ‘मरजीवा बना’. तुम्ही स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. बाबा म्हणतात मी तुमचा पिता आहे. ब्रह्मा द्वारे राज्य देतो. हे (ब्रह्मा) झाले मधले दलाल, यांच्याशी योग लावायचा नाही. तुमची बुद्धी आता त्या आपल्या पतींचेही पती शिव साजण सोबत जोडली गेली आहे. यांच्याद्वारे ते (ब्रह्माद्वारे शिवबाबा) तुम्हाला आपले बनवतात. म्हणतात स्वतःला आत्मा समजून माझी आठवण करा. मी आत्म्याने पार्ट पूर्ण केला आता बाबांपाशी घरी जायचे आहे. आता तर संपूर्ण सृष्टी तमोप्रधान आहे. ५ तत्वे देखील तमोप्रधान आहेत. तिथे सर्व काही नवीन असेल. इथे तर पहा हिरे-माणके इत्यादी काहीही नाहीये. सतयुगामध्ये मग कुठून येतात? खाणी ज्या आता रिकाम्या झाल्या आहेत त्या सर्व आता पुन्हा भरल्या जातात. खाणींमधून खोदून घेऊन येतात. विचार करा सर्व नवीन वस्तू असणार ना. लाईट इत्यादी देखील जशी नॅचरल असते, सायन्समधून हे सर्व इथे शिकतात. तिथे हे देखील कामी येते. हेलिकॉप्टर उभी असतील, बटन दाबले आणि चालू झाले. कोणताही त्रास नाही. तिथे सगळे फुलप्रूफ असते, कधी मशीन इत्यादी बिघडू शकत नाही. घरामधून सेकंदामध्ये स्कुलमध्ये किंवा फिरायला जातात. प्रजेमध्ये मग त्यांच्यापेक्षा कमी असेल. तुमच्यासाठी तिथे सर्व प्रकारचे सुख असते. अकाली मृत्यू होऊ शकत नाही. तर तुम्हा मुलांना किती अटेंशन द्यायला हवे. मायेचा देखील खूप जोर आहे. हा आहे मायेचा अंतिम पॉम्प (शेवटचे आकर्षण). युद्धामध्ये बघा किती मरतात. युद्ध बंद होतच नाही. कुठे इतकी संपूर्ण दुनिया आणि कुठे केवळ एकच स्वर्ग असेल. तिथे असे थोडेच म्हणतील की, गंगा पतित-पावनी आहे. तिथे भक्ती मार्गाची कोणती गोष्टच नाही. इथे गंगेमध्ये बघा साऱ्या शहराचा कचरा पडत राहतो. मुंबईचा सारा कचरा समुद्रामध्ये वाहून जातो.

भक्तीमध्ये तुम्ही मोठ-मोठी मंदिरे बनवता. हिरे-माणकांचे सुख तर असते ना. पाऊण हिस्सा सुख आहे, बाकी क्वार्टर आहे दुःख. अर्धे-अर्धे असेल तर मग मजाच उरणार नाही. भक्ती मार्गामध्ये देखील तुम्ही खूप सुखी असता. मागाहून मंदिरे इत्यादींना येऊन लुटतात. सतयुगामध्ये तुम्ही किती श्रीमंत होता तर तुम्हा मुलांना खूप आनंद व्हायला हवा. तुमचे एम ऑब्जेक्ट तर समोर उभे आहे. माता-पित्यासाठी तर ते निश्चित आहे. गायले जाते - ‘ख़ुशी जैसी खुराक नही’. योगाने आयुष्य वाढते.

आता आत्म्याला स्वतःचे दर्शन झाले आहे की आपण ८४ चे चक्र फिरतो. इतका पार्ट बजावतो. सर्व आत्मे ॲक्टर्स खाली (साकार वतनमध्ये) येतील तेव्हा मग बाबा सर्वांना घेऊन जातील. शिवाची वरात म्हटले आहे ना. हे सर्व तुम्ही जाणता नंबरवार पुरुषार्थानुसार. जितके तुम्ही आठवणीमध्ये रहाल तितके आनंदात रहाल. दिवसेंदिवस अनुभव करत रहाल, कारण शिकविणारे तर तेच बाबा आहेत ना. हे (ब्रह्मा बाबा) देखील शिकवत राहतात. यांना (ब्रह्माला) विचारण्याची गरज नसते. तुम्हीच सर्व प्रश्न विचारता. हे तर फक्त ऐकतात. बाबा रिस्पॉन्ड (उत्तर) देतात आणि हे (ब्रह्मा) देखील ऐकतात, यांची ॲक्टिविटी किती वंडरफुल आहे (कृती किती अद्भुत आहे). हे देखील आठवणीमध्ये राहतात. आणि मग मुलांना वर्णन करून सांगतात - ‘बाबा मला खाऊ घालतात. मी त्यांना माझा रथ देतो, त्यावर स्वार होतात तर का नाही खाऊ घालणार. हा मानवी अश्व आहे’. शिवबाबांचा रथ आहे - हा विचार राहिल्याने सुद्धा शिवबाबांची आठवण राहील. आठवणीनेच फायदा आहे. भंडाऱ्यामध्ये भोजन बनवताना देखील असे समजा की, आम्ही शिवबाबांच्या मुलांसाठी बनवत आहोत. आपणही शिवबाबांची मुले आहोत, तर अशी आठवण केल्याने सुद्धा फायदाच आहे. सर्वात जास्ती पद त्यांना मिळेल जे आठवणीमध्ये राहून कर्मातीत अवस्थेला प्राप्त करतात आणि सेवा देखील करतात. हे बाबा (ब्रह्मा बाबा) सुद्धा खूप सेवा करतात ना. यांची बेहदची सेवा आहे तुम्ही हदची सेवा करता. सेवेद्वारेच यांना देखील पद मिळते. शिवबाबा म्हणतात - असे-असे करा, यांना सुद्धा सल्ला देतात. वादळे तर मुलांसमोर येतात, आठवणीशिवाय कर्मेंद्रिये वश होणे कठीण आहे. आठवणीनेच बेडा (जीवनरूपी नाव) पार होणार आहे, हे शिवबाबा सांगत आहेत की ब्रह्मा बाबा सांगत आहेत, हे समजणे सुद्धा अवघड होते. याकरिता अतिशय महिन बुद्धी पाहिजे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) यावेळी पूर्णत: मरजीवा बनायचे आहे. अभ्यास चांगल्या रीतीने करायचा आहे, आपला चार्ट अथवा रजिस्टर ठेवायचे आहे. आठवणीमध्ये राहून आपली कर्मातीत अवस्था बनवायची आहे.

२) अंतिम विनाशाचा सीन बघण्यासाठी हिंमतवान बनायचे आहे. मी आत्मा आहे - या अभ्यासाने शरीराचे भान नष्ट होत जावे.

वरदान:-
देहभानाचा त्याग करून निक्रोधी (क्रोधरहित) बनणारे निर्मानचित्त भव

जी मुले देहभानाचा त्याग करतात त्यांना कधीही क्रोध येऊ शकत नाही कारण क्रोध येण्याची दोन कारणे असतात:- एक - जेव्हा कोणी खोटे बोलतो आणि दुसरे - जेव्हा कोणी निंदा करतो. याच दोन गोष्टी क्रोधाला जन्म देतात. अशा परिस्थितीमध्ये ‘निर्मानचित्त’च्या वरदानाद्वारे अपकारीवर सुद्धा उपकार करा, शिव्या देणाऱ्याला आपलेसे करा, निंदा करणाऱ्याला खरा मित्र माना - तेव्हा म्हटले जाईल चमत्कार. जेव्हा असे परिवर्तन दाखवाल तेव्हा विश्वासमोर प्रसिद्ध व्हाल.

बोधवाक्य:-
आनंदाचा अनुभव करण्यासाठी मायेच्या अधिनतेला सोडून स्वतंत्र बना.

अव्यक्त इशारे:- आता लगनच्या (उत्कटतेच्या) अग्नीला प्रज्वलित करून योगाला ज्वाला रूपी बनवा.

आता ज्वालामुखी बनून आसुरी संस्कार, आसुरी स्वभाव सर्व काही भस्म करा. जसे देवींच्या यादगारमध्ये दाखवतात की, ज्वाळेने असुरांचा संहार केला. असुर काही कोणती व्यक्ती नाहीये परंतु आसुरी शक्तींना नष्ट केले. हे आताच्या तुमच्या ज्वाला-स्वरूप स्थितीचे यादगार आहे. आता अशी योगाची ज्वाळा प्रज्वलीत करा ज्यामध्ये हा कलियुगी संसार जळून भस्म व्हावा.