17-10-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - जसे बाबा २१ जन्मांसाठी सुख देतात तशी तुम्ही मुले देखील बाबांचे मदतगार बना, प्रीत-बुद्धी बना, दुःख देण्याचा कधी विचार सुद्धा येऊ नये”

प्रश्न:-
तुम्हा रूप-बसंत मुलांचे कर्तव्य काय आहे, तुम्हाला बाबांकडून कोणती शिकवण मिळाली आहे?

उत्तर:-
तुम्हा रूप-बसंत मुलांचे कर्तव्य आहे मुखातून सदैव रत्ने काढणे, तुमच्या मुखातून कधी दगड (कटू वचन) निघता कामा नयेत. सर्व मुलांप्रति बाबांची शिकवण आहे की मुलांनो - १. आपसामध्ये कधी एकमेकांना त्रास द्यायचा नाही, क्रोध करायचा नाही, हे आसुरी लोकांचे काम आहे. २. मनसामध्ये देखील कोणाला दुःख देण्याचा विचार येऊ नये. ३. निंदा-स्तुती, मान-अपमान सर्व काही सहन करायचे आहे. जर कोणी काही बोलत असेल तर शांत रहायचे आहे. कायदा हातामध्ये घ्यायचा नाही.

गीत:-
तू प्यार का सागर है…

ओम शांती।
ज्ञान आणि अज्ञान. तुम्हा मुलांमध्ये आता ज्ञान आहे - भक्त लोक कोणाची महीमा करतात आणि तुम्ही मुले जी इथे बसला आहात तुम्ही कोणाची महिमा ऐकता? रात्रं-दिवसाचा फरक आहे. ते तर असेच फक्त महिमा गात राहतात. इतके प्रेम नाही आहे कारण परिचय नाही आहे. तुम्हाला बाबांनी आपला परिचय दिला आहे की, मी प्रेमाचा सागर आहे आणि तुम्हाला प्रेमाचा सागर बनवत आहे. प्रेमाचे सागर बाबा सर्वांना किती प्रिय वाटतात. तिथे देखील सर्व जण एकमेकांवर प्रेम करतात. हे तुम्ही इथे शिकता. कोणाशीही वितुष्ट असता कामा नये, ज्याला बाबा लून-पाणी (खारट-पाणी) म्हणतात. मनामध्ये कोणाविषयी द्वेष असता कामा नये. द्वेष करणारे कलियुगी नरकवासी आहेत. जाणता आपण सर्व भाऊ-बहीणी आहोत. शांतीधाम मध्ये आहोत तर भाऊ-भाऊ आहोत. इथे जेव्हा कर्मक्षेत्रावर पार्ट बजावतो, तेव्हा बहीण-भाऊ आहोत. ईश्वरीय संतान आहोत. ईश्वराची महिमा आहे - ते ज्ञानाचे सागर आहेत, प्रेमाचे सागर आहेत, अर्थात सर्वांना सुख देतात. तुम्ही सर्व आपल्या मनाला विचारा - जसे बाबा २१ जन्मांसाठी सुख देतात तसे आपण देखील असे कार्य करतो का? जर बाबांचे मदतगार बनत नाहीत, प्रेम करत नाहीत, एकमेकांवर प्रेम नाही आहे, विपरीत-बुद्धी होऊन राहतात तर मग विनशन्ती होतात. विपरीत-बुद्धी होणे असुरांचे काम आहे. स्वतःला ईश्वरीय संप्रदायाचे म्हणवून एकमेकांना दुःख देणे त्यांना असुर म्हटले जाते. तुम्हा मुलांनी कोणालाही दुःख द्यायचे नाही. तुम्ही आहातच दुःख-हर्ता, सुख-कर्ता बाबांची मुले. तर दुःख देण्याचा विचार देखील तुम्हाला येता कामा नये. तो तर आहेच आसुरी संप्रदाय, ना की ईश्वरीय संप्रदाय कारण देह-अभिमानी आहेत. ते कधी आठवणीच्या यात्रेमध्ये राहू शकत नाहीत. आठवणीच्या यात्रे शिवाय कल्याण होणार नाही. वारसा देणाऱ्या बाबांची तर जरूर आठवण करायची आहे तेव्हाच विकर्म विनाश होतील. अर्धाकल्प तर एक-दोघांना दुःख देत आला आहात. एकमेकांसोबत भांडून त्रास देत राहतात, ते आसुरी संप्रदायामध्ये गणले जातात. भले पुरुषार्थी आहेत तरी देखील कधीपर्यंत दुःख देत रहाणार, म्हणून बाबा म्हणतात स्वतःचा चार्ट ठेवा. चार्ट ठेवल्यामुळे समजून येईल की, आपले रजिस्टर सुधारत जात आहे की तेच आसुरी वर्तन आहे? बाबा नेहमी सांगतात कधीही कोणाला दुःख देऊ नका. निंदा-स्तुती, मान-अपमान, थंडी-गर्मी सर्व काही सहन करायचे आहे. कुणी काही म्हटले तर शांत राहिले पाहिजे. असे नाही की त्यांच्यासाठी दोन गोष्टी आणखी बोलल्या पाहिजेत. कोणी कोणाला दुःख देत असतील तर बाबा त्यांना समजावून सांगतील ना. मुले, मुलांना सांगू शकत नाहीत. कायदा आपल्या हातामध्ये घ्यायचा नाही. काहीही गोष्ट असेल तर बाबांकडे यायचे आहे. गव्हर्मेंटचा देखील कायदा आहे - कोणी एकमेकांना ठोसा मारू शकत नाहीत. कंप्लेंट (तक्रार) करू शकतात. कायदा हातात घेणे गव्हर्मेंटचे काम आहे. तुम्ही देखील गव्हर्मेंटकडे जा. कायदा हातात घेऊ नका. हे तर आहेच आपले घर म्हणून बाबा म्हणतात रोज कचेरी करा. हे देखील समजत नाहीत की, शिवबाबा ऑर्डर देत आहेत. बाबांनी सांगितले आहे नेहमी असे समजा की शिवबाबा ऐकवत आहेत. असे समजू नका ब्रह्मा ऐकवत आहेत. नेहमी शिवबाबाच समजा तर त्यांची आठवण राहील. हा शिवबाबांनी रथ घेतला आहे, तुम्हाला ज्ञान ऐकविण्याकरिता. सतोप्रधान बनण्याचा रस्ता बाबा समजावून सांगत आहेत. ते आहेत गुप्त. तुम्ही आहात प्रत्यक्ष. जे पण डायरेक्शन्स (निर्देश) निघतात, असे समजा शिवबाबांची आहेत तर तुम्ही सुरक्षित रहाल. तुम्ही ‘बाबा-बाबा’ असे शिवबाबांनाच म्हणता. वारसा देखील त्यांच्याकडून मिळतो. त्यांच्यासोबत किती आदराने, रॉयल्टी ने राहिले पाहिजे. तुम्ही म्हणता ना - बाबा, आम्ही तर लक्ष्मी-नारायण बनणार. मग सेकण्ड बनू, थर्ड बनू, सूर्यवंशी नाही तर चंद्रवंशी बनू. असे तर नाही भले आपण दास-दासी बनू. प्रजा बनणे काही चांगले तर नाही. तुम्हाला तर इथेच दैवी गुण धारण करायचे आहेत. आसुरी चलन तर असता कामा नये. निश्चय नसेल तर बसल्या-बसल्या असे म्हणतात, यांच्यामध्ये शिवबाबा येतात - आम्हाला तर वाटत नाही. मायेचे भूत आल्यामुळे आपसामध्ये असे बोलतात. आसुरी स्वभावाचे एकत्र भेटतात तर आपसामध्ये असे बोलू लागतात, आसुरी गोष्टीच मुखातून निघतात. बाबा म्हणतात - तुम्ही आत्मा रूप-बसंत बनता. तुमच्या मुखातून रत्नेच निघाली पाहिजेत. जर दगड (कटू वचन) निघत असतील तर याचा अर्थ आसुरी-बुद्धी आहेत.

गाणे देखील मुलांनी ऐकले. बाबा म्हणतात - बाबा प्रेमाचा सागर आहेत, सुखाचा सागर आहेत. शिवबाबांचीच महिमा आहे. बाबा म्हणतात तुम्ही स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. यामध्ये खूप चांगली-चांगली मुले फेल होतात. देही-अभिमानी स्थितीमध्ये राहू शकत नाहीत. देही-अभिमानी बनाल तेव्हाच तर इतके उच्च पद प्राप्त कराल. बरीच मुले फालतू गोष्टींमध्ये खूप वेळ वाया घालवतात. ज्ञानाच्या गोष्टीच लक्षात येत नाहीत. असे देखील गायन आहे की घरच्या गंगेचा मान ठेवत नाहीत. घरच्या ज्या गोष्टी असतात त्याचा इतका मान ठेवत नाहीत. जेव्हा की श्रीकृष्ण इत्यादीचे चित्र घरामध्ये सुद्धा आहे तर मग श्रीनाथद्वारे इत्यादी ठिकाणी इतक्या दूर-दूर का जाता. शिव च्या मंदिरामध्ये देखील दगडाचेच तर लिंग आहे. पर्वतांमधून जे दगड निघतात, त्यांची झीज होऊन त्याचे शिवलिंग बनते, त्यामध्ये काही-काही दगडांना तर सोने देखील चिकटलेले असते. तर म्हणतात - सोन्याचा कैलास पर्वत. सोने पर्वतांमधून निघते ना. तर थोडे-थोडे सोने लागलेले दगड सुद्धा असतात जे खूप सुंदर गोल गुळगुळीत होतात, ते मग विकतात. खास मार्बलचे सुद्धा बनवितात. आता भक्तिमार्ग वाल्यांना जर म्हटले की तुम्ही इतके बाहेर भटकता कशाला तर चिडतील. बाबा स्वतः म्हणतात तुम्हा मुलांनी खूप पैसे बरबाद केले आहेत. हा देखील ड्रामामध्ये पार्ट आहे ज्यामुळे तुम्हाला ठोकरा खाव्या लागतात. हा आहेच ज्ञान आणि भक्तीचा खेळ. आता तुम्हा मुलांना सर्व समज (ज्ञान) मिळते. ज्ञान आहे सुखाचा रस्ता, ज्ञानाद्वारे सतयुगाची राजाई मिळते. यावेळी यथा राजा-राणी तथा प्रजा सर्वजण नरकाचे मालक आहेत. जेव्हा कोणाचा मृत्यू होतो तर म्हणतात - स्वर्गवासी झाला. या गोष्टी आता तुम्हाला समजल्या आहेत. आता तुम्ही म्हणता - ‘आम्ही स्वर्गवासी बनण्यासाठी स्वर्गाची स्थापना करणाऱ्या बाबांजवळ बसलो आहोत’. ज्ञानाचा थेंब मिळतो. थोडे जरी ज्ञान ऐकले तरी स्वर्गामध्ये जरूर येतील, बाकी आहे पुरुषार्थावर. समजतात की गंगाजलाची एक लोटी जरी मुखामध्ये गेली तरी पतितापासून पावन बनतात. लोटी भरून घेऊन जातात मग त्यातील रोज एक-एक थेंब पाण्यामध्ये टाकून स्नान करतात. ते जसे की गंगा स्नान होणार. परदेशात सुद्धा गंगा जल भरून घेऊन जातात. ही सर्व आहे भक्ती.

बाबा मुलांना समजावून सांगतात - मुलांनो, माया खूप जोरात थप्पड लगावते, विकर्म करायला लावते म्हणून कचेरी बसवा, आपणच आपली कचेरी करणे चांगले आहे. तुम्ही स्वतःला आपणच राज-तिलक देता तर स्वतःची तपासणी करायची आहे. तमोप्रधानापासून सतोप्रधान बनायचे आहे. बाबा श्रीमत देतात - अशा प्रकारे करा, दैवी गुण धारण करा. जे करतील ते मिळवतील. तुम्हाला तर आनंदाने रोमांच उभे राहिले पाहिजेत. बेहदचे बाबा मिळाले आहेत, त्यांच्या सेवेमध्ये मदतगार बनायचे आहे. आंधळ्यांची काठी बनायचे आहे. जितके जास्ती बनाल, तितके आपलेच कल्याण होईल. बाबांची तर निरंतर आठवण करायची आहे. एका जागी नेष्ठामध्ये बसण्याची गरज नाही. चालता-फिरता आठवण करायची आहे. ट्रेनमध्ये देखील तुम्ही सेवा करू शकता. तुम्ही कोणालाही समजावून सांगू शकता की उच्च ते उच्च कोण आहेत? त्यांची आठवण करा. वारसा त्यांच्याकडूनच मिळेल. आत्म्याला बाबांकडून बेहदचा वारसा मिळतो. कोणी दान-पुण्य केल्यामुळे राजाकडे जन्म घेतात ते देखील अल्पकाळासाठी. नेहमीच काही राजा बनू शकत नाहीत. तर बाबा म्हणतात - इथे तर २१ जन्मांची गॅरंटी आहे. तिथे तर हे कळणारही नाही की आपण बेहदच्या बाबांकडून हा वारसा घेऊन आलो आहोत. हे ज्ञान यावेळी तुम्हाला मिळते तर किती चांगल्या रीतीने पुरुषार्थ केला पाहिजे. पुरुषार्थ करत नाहीत तर जणू आपल्याच पायावर कुऱ्हाड मारतात. चार्ट लिहीत रहा तर भीती राहील. काहीजण लिहितात देखील, बाबा बघतील तर काय म्हणतील. चाल-चलनमध्ये (आचरणामध्ये) खूप फरक असतो. तर बाबा म्हणतात - चुका करणे सोडा. नाही तर खूप पश्चाताप करावा लागेल. शेवटी मग आपल्या पुरुषार्थाचा साक्षात्कार जरूर होईल मग खूप रडावे लागेल. कल्प-कल्प हाच वारसा मिळणार काय. जाऊन दास-दासी बनणार. पूर्वी तर ध्यानामध्ये जाऊन सांगत असत - अमकी दासी आहे, ही आहे. नंतर मग बाबांनी ते बंद केले. शेवटी पुन्हा तुम्हा मुलांना साक्षात्कार होतील. साक्षात्कारा शिवाय सजा कशी मिळू शकणार. तसा नियमच नाही.

मुलांना युक्त्या देखील खूप सांगितल्या जातात, तुम्ही आपल्या पतीला सांगा की, ‘बाबा म्हणतात मुलांनो, काम महाशत्रू आहे, त्यावर विजय मिळवा. माया जीते जगतजीत बना; आता आम्ही स्वर्गाचे मालक बनावे का तुमच्या मुळे अपवित्र बनून नरकात जावे’. खूप प्रेमाने, नम्रतेने समजावून सांगा. मला नरकात का ढकलता. अशा खूप मुली आहेत ज्या समजावून सांगून-सांगून शेवटी पतीला घेऊन येतात. मग पती म्हणतो की ही माझी गुरु आहे, हिने मला खूप चांगला रस्ता सांगितला. बाबांसमोर येऊन पायावर लोटांगण घालतात. कधी जय कधी पराजय सुद्धा होतो. तर मुलांना खूप-खूप गोड बनायचे आहे. जे सेवा करतील त्यांनाच जास्त प्रेम मिळेल. ईश्वर पिता मुलांकडे आले आहेत, त्यांच्या श्रीमतावर चालावे लागेल. श्रीमतावर चालत नाहीत तर वादळे आल्यामुळे मग कोसळतात; असे देखील आहेत - ते मग काय कामाचे राहणार. हे शिक्षण काही कॉमन नाही आहे, इतर सर्व सत्संग इत्यादीं मध्ये तर आहे - कनरस, ज्यामुळे अल्प काळाचे सुख मिळते. या बाबांद्वारे तर २१ जन्मांचे सुख मिळते. बाबा सुख-शांतीचे सागर आहेत, आपल्याला देखील बाबांकडून वारसा मिळणार आहे. सेवा कराल तेव्हाच तर मिळणार, म्हणून बॅज नेहमी लावलेला असावा. आपल्याला असे सर्वगुण संपन्न बनायचे आहे. तपासणी करायची आहे की आपण कोणाला दुःख तर देत नाही ना? आसुरी चलन तर नाही आहे ना? माया असे काही काम करायला लावते, काही विचारू नका. चांगल्या-चांगल्या घरातील देखील सांगतात, मायेने हे विकर्म करायला लावले. कोणी खरे सांगतात, कोणी खरे न सांगितल्यामुळे १०० पटीने दंड भोगतात. मग ती सवय वाढत जाईल. बाबांना ऐकवाल तर बाबा सावध करतील. बाबा म्हणतात - जर पाप केले असेल तर रजिस्टरमध्ये लिहा आणि बाबांना सांगा तर तुमची अर्धी पापे नष्ट होतील. जर सांगत नसाल, लपवून ठेवाल तर मग अजूनच करत रहाल. शाप मिळतो. न सांगितल्यामुळे एकदा करण्या ऐवजी शंभरदा करत रहाल. बाबा किती चांगला सल्ला देतात परंतु काहींवर तर जरा सुद्धा परिणाम होत नाही. आपल्या भाग्याला जणू लाथ मारत असतात. खूप-खूप नुकसान करून घेतात. अंताला सर्वांना साक्षात्कार होईल. हे-हे बनणार, पुढच्या क्लासमध्ये जेव्हा ट्रान्सफर होतात तेव्हा मार्क्स कळतात ना. ट्रान्सफर होण्याआधी रिजल्ट कळतो. तुम्ही देखील आपल्या क्लासमध्ये जाल तेव्हा मार्क्स कळतील आणि मग ढसाढसा रडाल. तेव्हा काय करू शकणार आहात? रिझल्ट तर लागला ना. जे भाग्यामध्ये होते ते मिळाले. बाबा सर्व मुलांना सावध करतात. कर्मातीत अवस्था आता एवढ्यात होऊ शकत नाही. कर्मातीत अवस्था झाली तर मग शरीर सोडावे लागेल, अजून काही ना काही विकर्म राहिलेली आहेत, हिशोब आहेत म्हणून पूर्ण योग लागत नाही. आता कोणीही म्हणू शकत नाही की, आम्ही कर्मातीत अवस्थेमध्ये आहोत. जवळ आल्यावर मग खूप चिन्हे दिसू लागतील. सर्व काही तुमच्या अवस्थेवर आणि विनाशावर अवलंबून आहे. तुमचे शिक्षण जेव्हा पूर्ण होईल तेव्हा बघाल की लढाई तर डोक्यावर उभी आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) मायेच्या वश होऊन कोणतेही आसुरी वर्तन करायचे नाही. आपल्या वर्तनाचे रजिस्टर ठेवायचे आहे. असे कोणतेही कर्म करायचे नाही ज्यामुळे पश्चाताप करावा लागेल.

२) खूप-खूप प्रेमाने आणि नम्रतेने सेवा करायची आहे. गोड बनायचे आहे. मुखावाटे आसुरी बोल काढायचे नाहीत. संगतीची खूप-खूप काळजी घ्यायची आहे. श्रीमतावर चालत रहायचे आहे.

वरदान:-
संघटित रूपामध्ये एकरस स्थितीच्या अभ्यासाद्वारे विजयाचा नगाडा वाजविणारे एव्हररेडी भव

विश्वामध्ये विजयाचा नगाडा तेव्हा वाजेल जेव्हा सर्वांचे संकल्प एका संकल्पामध्ये सामावून जातील. संघटित रूपामध्ये जेव्हा एका सेकंदामध्ये सर्व एकरस स्थितीमध्ये स्थित होतील तेव्हा म्हणणार - एव्हररेडी. एका सेकंदामध्ये एकमत, एकरस स्थिती आणि एका संकल्पामध्ये स्थित होण्याचीच निशाणी हे एक बोट दाखवले आहे, ज्या बोटावर कलियुगी पर्वत उचलला जातो, म्हणून संघटित रूपामध्ये एकरस स्थिती बनविण्याचा अभ्यास करा तेव्हाच विश्वामध्ये शक्ती-सेनेचे नाव प्रसिद्ध होईल.

बोधवाक्य:-
श्रेष्ठ पुरुषार्थामध्ये थकावट येणे - ही देखील आळशीपणाची निशाणी आहे.

अव्यक्त इशारे:- स्वयं प्रति आणि सर्वांप्रती मनसा द्वारे योगाच्या शक्तींचा प्रयोग करा.

तुम्ही आपल्या आत्मिक दृष्टीद्वारे आपल्या संकल्पांना सिद्ध करू शकता. ती (दुनियावाल्यांची) रिद्धी-सिद्धी आहे - अल्पकाळाची, परंतु आठवणीच्या विधीने संकल्पांची आणि कर्मांची सिद्धी ही आहे - अविनाशी. ते रिद्धी-सिद्धी यूज करतात आणि तुम्ही आठवणीच्या विधीद्वारे संकल्पांची आणि कर्मांची सिद्धी प्राप्त करा.