17-11-24 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
30.11.2002 ओम शान्ति
मधुबन
“‘रिटर्न’ शब्दाच्या
स्मृतीद्वारे समान बना आणि रिटर्न-जर्नीच्या स्मृती स्वरूप बना”
आज बापदादा आपल्या
चोहो बाजूच्या दिल तख्तनशीन, भृकुटीचे तख्तनशीन, विश्वाच्या राज्याचे तख्तनशीन,
स्वराज्य अधिकारी मुलांना बघून हर्षित होत आहेत. परमात्म दिल तख्त (हृदय सिंहासन)
संपूर्ण कल्पामध्ये आता तुम्हा खूप खूप वर्षांनी भेटलेल्या मुलांना, लाडक्या
मुलांनाच प्राप्त होते. भृकुटीचे तख्त तर सर्व आत्म्यांना आहे परंतु परमात्म दिल
तख्त ब्राह्मण आत्म्यांशिवाय कोणालाही प्राप्त होत नाही. हे दिल तख्तच विश्वाचे
तख्त मिळवून देते. वर्तमान समयी स्वराज्य अधिकारी बनले आहात, प्रत्येक ब्राह्मण
आत्म्याचे स्वराज्य गळ्यातील हार आहे. स्वराज्य तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. असे
स्वतःला स्वराज्य अधिकारी अनुभव करता का? मनामध्ये हा दृढ संकल्प आहे की आमच्या या
बर्थ राइटला (जन्मसिद्ध अधिकाराला) कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्याच सोबत हा
देखील रुहानी नशा आहे की, आम्ही परमात्म दिल तख्तनशीन सुद्धा आहोत. मानवी जीवनामध्ये,
विशेषत: शरीरामध्ये देखील विशेषकरून हृदयाला महान मानले जाते. हृदय बंद पडले तर
जीवन समाप्त. तर अध्यात्मिक जीवनामध्ये देखील दिल तख्ताचे खूप महत्व आहे. जे दिल
तख्तनशीन आहेत तेच आत्मे विश्वामध्ये विशेष आत्मे म्हणून गायले जातात. तेच आत्मे
भक्तांसाठी माळेच्या मण्यांच्या रूपामध्ये जपले जातात. तेच आत्मे कोटींमध्ये कोणी,
कोणीमध्ये सुद्धा कोणी गायले जातात. तर ते कोण आहेत? तुम्ही आहात? पांडव सुद्धा
आहेत? माता देखील आहेत? (हात हलवत आहेत) तर बाबा म्हणत आहेत - ‘माझ्या लाडक्या
मुलांनो, कधी-कधी दिल तख्ताला सोडून देह रुपी मातीवर हृदय का गुंतवता? देह माती आहे.
तर लाडकी मुले कधीही मातीमध्ये पाय ठेवत नाहीत, सदैव तख्तावर, मांडीवर किंवा
अतींद्रिय सुखाच्या झोपाळ्यावर झोके घेत राहतात. तुमच्यासाठी बापदादांनी विविध
झोपाळे दिले आहेत, कधी सुखाच्या झोपाळ्यावर झोके घ्या, कधी खुशीच्या झोपाळ्यावर झोके
घ्या. कधी आनंदाच्या झोपाळ्यावर झोके घ्या.
तर आज बापदादा अशा
श्रेष्ठ मुलांना पाहत होते की कसे नशेमध्ये झोपाळ्यावर झोके घेत आहेत. झोके घेत
राहता का? झोके घेता? मातीमध्ये तर जात नाही ना! कधी-कधी असे वाटते का की, मातीमध्ये
पाय ठेवावा? कारण ६३ जन्म मातीमध्येच पाय ठेवता, मातीशीच खेळता. मग आता तर मातीशी
खेळत नाही ना? कधी-कधी मातीमध्ये पाय जातो कि नाही जात? कधी-कधी जातो ना. देहभान
सुद्धा मातीमध्ये पाय ठेवणे आहे. देह-अभिमान म्हणजे तर खूप खोलवर मातीमध्ये पाय आहे.
परंतु देह भान अर्थात बॉडी कॉन्शसनेस ही देखील मातीच आहे. जितके संगम समयी जास्तीत
जास्त तख्तनशीन रहाल तितकेच अर्धा कल्प सूर्यवंशी राजधानीमध्ये आणि चंद्रवंशीमध्ये
देखील सूर्य-वंशीच्या राज घराण्यामध्ये असणार. जर आता संगमावर कधी-कधी तख्तनशीन
रहाल तर सूर्यवंशीच्या रॉयल फॅमिलीमध्ये तितकाच थोडा काळ रहाल. जरी तुम्ही तख्तनशीन
एकामागोमाग एक असाल परंतु नेहमी रॉयल फॅमिली, राजघराण्यातील आत्म्यांच्या
नात्यामध्ये असाल. तर चेक करा की संगमयुगाच्या आदि काळापासून आता पर्यंत भले मग १०
वर्षे झाली असतील, किंवा ५० नाहीतर ६६ वर्षे झाली असतील, परंतु जेव्हापासून
ब्राह्मण बनलात तेव्हापासून पासून आत्तापर्यंत किती वेळ दिल तख्तनशीन, स्वराज्य
तख्तनशीन राहिलात? खूपकाळ राहिलात, निरंतर राहिलात का कधी-कधी राहिलात? जो परमात्म
तख्तनशीन असेल त्याची निशाणी - त्याच्या प्रत्यक्ष वर्तनातून आणि चेहऱ्यावरून सदैव
बेफिक्र बादशाह (निश्चिंत बादशहा) असल्याचे दिसून येईल. आपल्या मनामध्ये, स्थूल ओझे
तर डोक्यावर असते परंतु सूक्ष्म ओझे मनात असते. तर मनामध्ये कोणते ओझे नसणार. काळजी
आहे - ओझे, निश्चिंत आहे - डबल लाइट. जर कोणत्याही प्रकारचे भले मग सेवेचे असो,
किंवा संबंध-संपर्काचे असो, किंवा स्थूल सेवेचे असो, आत्मिक सेवेचे सुद्धा ओझे नाही,
काय होईल, कसे होणार… यशस्वी होणार कि नाही होणार! विचार करणे, प्लॅन बनवणे वेगळी
गोष्ट आहे, ओझे वेगळी गोष्ट आहे. ओझे असणाऱ्यांची निशाणी - नेहमी त्याच्या
चेहेऱ्यावर थोडे-बहुत थकल्यासारखे चिन्ह दिसून येईल. थकायला होणे वेगळी गोष्ट आहे,
थोडेसे सुद्धा थकल्याचे चिन्ह दिसणे, ही देखील ओझे असल्याची निशाणी आहे. आणि
निश्चिंत बादशहा याचा अर्थ असा नाही की निष्काळजी रहाल, असेल निष्काळजीपणा आणि
म्हणाल आम्ही तर निश्चिंत राहतो. निष्काळजीपणा, हा खूप धोका देणारा आहे. तीव्र
पुरुषार्थाचे देखील तेच शब्द आहेत आणि निष्काळजीपणाचे देखील तेच शब्द आहेत. तीव्र
पुरुषार्थी सदैव दृढ निश्चय असल्या कारणाने हाच विचार करतो - प्रत्येक कार्य हिंमत
आणि बाबांच्या मदतीने यशस्वी झाल्यातच जमा आहे आणि अलबेलेपणाचे सुद्धा हेच शब्द
आहेत, होईल, होऊन जाईल, झालेलेच आहे. कोणते कार्य राहिले आहे का, होऊन जाईल. तर
शब्द एकच आहे परंतु रूप वेगवेगळे आहे.
वर्तमान समयी मायेची
विशेष दोन रूपे मुलांचा पेपर घेतात. एक व्यर्थ संकल्प, विकल्प नाहीत, व्यर्थ संकल्प.
दुसरा - “मीच राइट आहे”. जे केले, जे म्हटले, जो विचार केला… मी कमी नाही, राइट आहे.
समयानुसार बापदादांची आता हिच इच्छा आहे की एक शब्द कायम लक्षात ठेवा - बाबांकडून
मिळालेल्या सर्व प्राप्तीचे, स्नेहाचे, सहयोगाचे रिटर्न करायचे आहे. रिटर्न करणे
अर्थात समान बनणे. दुसरे - आता आपली रिटर्न जर्नी (परतीचा प्रवास) आहे. एकच शब्द
‘रिटर्न’ सदैव लक्षात राहू दे. यासाठी खूप सोपे साधन आहे - प्रत्येक संकल्प, बोल आणि
कर्माला ब्रह्मा बाबांशी टॅली करा (जुळवून बघा). बाबांचे संकल्प कसे होते? बाबांचे
बोल कसे होते? बाबांचे कर्म कसे होते? यालाच म्हटले जाते फॉलो फादर. फॉलो करणे तर
सोपे असते ना! नवीन विचार करणे, नवीन करणे त्याची गरजच नाही, जे बाबांनी केले ते
फॉलो फादर. सोपे आहे ना!
टीचर्स हात वर करा -
फॉलो करणे सहज आहे कि
अवघड आहे? सोपे आहे ना. बस फॉलो फादर. अगोदर चेक करा, जशी म्हण आहे - आधी विचार करा
नंतर कर्म करा, आधी तोला मग बोला. तर सर्व टीचर्स या वर्षामध्ये, आता या वर्षाचा
शेवटचा महिना आहे, जुने वर्ष जाईल नवीन येईल. नवीन वर्ष येण्या अगोदर काय करायचे आहे,
त्याची तयारी करा. हा संकल्प करा की बाबांच्या पावलावर पाऊल ठेवण्या व्यतिरिक्त
दुसरे कोणतेही पाऊल उचलणार नाही. बस फूट स्टेप. पावलावर पाऊल ठेवणे तर सोपे आहे ना!
तर नवीन वर्षासाठी आतापासून संकल्पामध्ये प्लॅन बनवा, जसे ब्रह्मा बाबा सदैव
निमित्त आणि निर्माण राहिले, तसा निमित्त भाव आणि निर्माण भाव. फक्त निमित्त भाव
नाही, निमित्त भाव या सोबत निर्माण भाव, दोन्ही जरुरी आहेत कारण टीचर्स तर निमित्त
आहेत ना! तर संकल्पामध्ये देखील, बोलामध्ये देखील आणि कोणाच्याही संबंधामध्ये,
संपर्कामध्ये, कर्मामध्ये, प्रत्येक बोलामध्ये निर्माण. जे निर्माण आहेत तेच
निमित्त भाव मध्ये आहेत. जे निर्माण नाहीत त्यांच्यामध्ये थोडा-फार सूक्ष्म, महान
रूपामध्ये अभिमान जरी नसला तरी रोब (चिडचिडेपणा) असेल. हा चिडचिडेपणा, हा देखील
अभिमानाचा अंश आहे आणि बोलण्यामध्ये सदैव निर्मल भाषी, मधुर भाषी. जेव्हा
संबंध-संपर्कामध्ये आत्मिक रूपाची स्मृती असते तेव्हा सदैव निराकारी आणि निरहंकारी
राहतो. ब्रह्मा बाबांचे अखेरचे तीन शब्द आठवतात का? निराकारी, निरहंकारी तेच
निर्विकारी. अच्छा, फॉलो फादर. पक्के झाले ना!
पुढील वर्षाची मुख्य
लक्ष्य स्वरूपाची स्मृती आहे -
हे तीन शब्द, निराकारी, निरहंकारी, निर्विकारी. अंश देखील नसावा. मोठे-मोठे रूप तर
ठीक झाले आहे परंतु अंश देखील नसावा कारण अंशच धोका देतो. फॉलो फादरचा अर्थच आहे -
या तीन शब्दांना सदैव स्मृतीमध्ये ठेवा. ठीक आहे? अच्छा.
डबल फॉरेनर्स उठा -
चांगला ग्रुप आला आहे.
बापदादांना डबल फॉरेनर्सच्या एका गोष्टीबद्दल आनंद वाटतो, जाणता कोणती? पहा, किती
दूरदेशातून येता, डायरेक्शन मिळाले की या टर्नला देखील यायचे आहे तर पोहोचलात ना.
कसेही करून (खूप पुरुषार्थ करून) मोठा ग्रुपच पोहोचला आहे. दादीचे डायरेक्शन बरोबर
मानले आहे ना! यासाठी मुबारक असो. बापदादा एका-एकाला पाहत आहेत, दृष्टी देत आहेत.
असे नाही की स्टेजवरच दृष्टी मिळते. दुरून अजूनच छान दिसत आहे. डबल फॉरेनर्स ‘हां
जी’ चा धडा चांगला शिकले आहेत. बापदादांना डबल फॉरेनर्सवर प्रेम तर आहेच परंतु
अभिमान देखील आहे, कारण विश्वाच्या कानाकोपऱ्यात संदेश पोहोचवण्यासाठी डबल
फॉरेनर्सच निमित्त बनले आहेत. विदेशामध्ये आता अजून कोणते विशेष स्थान राहिले आहे,
गावे राहिली आहेत किंवा कोणते विशेष स्थान राहून गेले आहे का? गावे, कानाकोपऱ्यातील
छोटी ठिकाणे राहिली आहेत किंवा कोणते विशेष स्थान राहिले आहेका? कोणते स्थान राहिले
आहे? (मिडल ईस्टचे काही देश राहिले आहेत) तरीही पहा हा सुद्धा जो ग्रुप आला आहे,
किती देशांचा ग्रुप आहे? तरीही बापदादा जाणतात की विश्वाच्या अनेक भिन्न-भिन्न
देशामध्ये तुम्ही आत्मे निमित्त बनले आहात. बापदादा नेहमीच म्हणतात की बाबांचे
विश्व कल्याणकारीचे टायटल विदेशवाल्यांनीच प्रत्यक्ष केले आहे. छान आहे. प्रत्येक
जण आपापल्या स्थानावर स्वतः आपल्या पुरुषार्थामध्ये आणि सेवेमध्ये पुढे जात आहेत आणि
सदैव पुढे जात राहतील. सफलतेचे तारे आहातच. खूप छान.
कुमारांसोबत संवाद:-
मधुबनचे कुमार देखील आहेत. पहा, कुमारांची संख्या बघा किती आहे? अर्धा क्लास तर
कुमारांचा आहे. कुमार आता साधारण कुमार नाहीत. कोणते कुमार आहात? ब्रह्माकुमार तर
आहातच. परंतु ब्रह्माकुमारांची विशेषता कोणती आहे? कुमारांची विशेषता आहे की सदैव
जिथे पण अशांती असेल त्याठिकाणी शांती पसरविणारे शांतीदूत आहेत. ना मनाची अशांती,
ना बाहेरची अशांती. कुमारांचे कार्यच आहे अवघड काम करणे, हार्ड वर्कर असतात ना! तर
आज सर्वात हार्ड मध्ये हार्ड वर्क आहे - अशांती दूर करून शांतिदूत बनून शांती
पसरविणे. असे कुमार आहात? अशांतीचे नामोनिशाण सुद्धा राहू नये - ना विश्वामध्ये, ना
आपल्या संबंध-संपर्कामध्ये. असे शांतीदूत आहात? जसे आग विझविणारे कुठेही आग लागली
असेल तर आग विझवतात ना. तर शांतीदूताचे कामच आहे अशांतीला शांतीमध्ये बदलणे. तर
शांतीदूत आहात ना! नक्की! नक्की? नक्की? खूप छान वाटत आहे, बापदादा इतक्या कुमारांना
पाहून खुश होत आहेत. या अगोदर सुद्धा बापदादांनी प्लॅन दिला होता की दिल्लीमध्ये
जास्तीत जास्त कुमार, जे गव्हर्मेंट समजते कुमार (युथ) म्हणजे भांडण करणारे,
कुमारांना घाबरते. तर असे घाबरणारे गव्हर्मेंट जेव्हा प्रत्येक ब्रह्माकुमाराचे
‘शांतिदूत’ या उपाधीने स्वागत करेल, तर हाच आहे कुमारांचा चमत्कार. संपूर्ण
विश्वामध्ये किर्ती पसरू दे की ब्रह्माकुमार शांतिदूत आहेत. हे होऊ शकते ना?
दिल्लीमध्ये करायचे आहे. करायचे आहे ना - दादी करतील? एका ग्रुपमध्ये इतके कुमार
आहेत तर सर्व ग्रुपमध्ये किती असतील? (जवळ-जवळ १ लाख) तर कुमार करा कमाल.
गव्हर्मेंटच्या मनामध्ये कुमारांबद्दल (युवकांबद्दल) जे उलटे भरलेले आहे ते सुलटे
करा. परंतु मनामध्ये सुद्धा अशांती नाही, साथीदारांमध्ये देखील अशांती नाही आणि
आपल्या ठिकाणी सुद्धा अशांती नाही. आपल्या शहरामध्ये देखील अशांती नाही. बस
कुमारांच्या चेहेऱ्यावर पाटी लावण्याची गरज नाही परंतु आपणहून असा अनुभव व्हावा की,
यांच्या मस्तकावर लिहिलेलेच आहे की हे शांतिदूत आहेत. बरोबर आहे ना!
कुमारींसोबत संवाद:-
कुमारी देखील भरपूर
आहेत. या सर्व कुमारींचे लक्ष्य काय आहे? नोकरी करायची आहे का विश्व सेवा करायची आहे?
डोक्यावर मुकुट ठेवायचा आहे की टोपली ठेवायची आहे? काय ठेवायचे आहे? पहा, सर्व
कुमारींना दयाळू बनायचे आहे. विश्वातील आत्म्यांचे कल्याण व्हावे, कुमारींचे गायन
आहे २१ कुळांचा उद्धार करणारी, तर अर्धाकल्प २१ कुळे होतील. तर अशा कुमारी आहात का?
ज्या २१ कुळांचे कल्याण करणार त्यांनी हात वर करा. एका परिवाराचे नाही, २१
परिवारांचे. करणार? पहा, तुमचे नाव नोंदले जाईल आणि मग पाहिले जाईल की दयाळू आहेत
का काही हिशोब बाकी राहिला आहे? आता काळ सूचना देत आहे की वेळेच्या अगोदर तयार व्हा.
वेळेकडे बघत रहाल तर वेळ निघून जाईल, त्यामुळे लक्ष्य ठेवा की आम्ही सर्व विश्व
कल्याणी दयाळू बाबांची मुले दयाळू आहोत. ठीक आहे ना? दयाळू आहात ना! अजून दयाळू बना.
थोडे जास्त वेगाने बना. कुमारींना तर बाबांचा तख्त अगदी सहज मिळतो. नवीन वर्षामध्ये
काय चमत्कार करून दाखवता ते पाहूया. अच्छा.
मीडियाचे १०८ रत्न
आलेले आहेत:-
चांगले आहे, मीडियावाल्यांनी चमत्कार करून दाखवा जेणेकरून सर्वांच्या बुद्धीमध्ये
येईल की, बाबांकडून वारसा घ्यायचाच आहे. कोणीही वंचित राहू नये. मीडियाचे कामच आहे
आवाज पसरवणे. तर हा आवाज पसरवा की, ‘बाबांकडून वारसा घ्या’. कोणीही वंचित राहू नये.
आता परदेशातही मीडियाचे प्रोग्राम चालूच असतात ना! चांगले आहे. जे विविध प्रकारे
कार्यक्रम करतात त्यामुळे चांगले इंटरेस्टेड होतात. चांगले करत आहेत आणि करत राहतील
आणि सफलता तर आहेच. सर्व प्रभागवाले (विंग्जवाले) जी काही सेवा करत आहेत त्याचा
बापदादांकडे समाचार येत राहतो. प्रत्येक विंगची आपली-आपली सेवेची साधने आणि सेवेची
रूपरेषा आहे; परंतु असे दिसून आले आहे की, वेगळे-वेगळे प्रभाग झाल्याने प्रत्येक
प्रभाग एकमेकांशी स्पर्धा देखील करतात, चांगले आहे. रीस करू नका, रेस भले करा (ईर्षा
करू नका, स्पर्धा भले करा). प्रत्येक विंगचा रिझल्ट, विंगच्या सेवेनंतर बरेच आई.
पी. आणि व्ही. आई. पी. संपर्कामध्ये आले आहेत, अजून माईक आणलेले नाहीत परंतु
संबंध-संपर्कामध्ये आलेले आहेत. अच्छा.
बापदादा वाली
एक्सरसाइज लक्षात आहे? आत्ता-आत्ता निराकारी, आत्ता-आत्ता फरिश्ता… हे आहे
चालता-फिरता बाबा आणि दादांच्या प्रेमाचे रिटर्न. तर आता लगेचच ही रुहानी एक्सरसाइज
करा. सेकंदामध्ये निराकारी, सेकंदामध्ये फरिश्ता. (बापदादांनी ड्रिल करवून घेतली)
अच्छा - चालता-फिरता पूर्ण दिवसभरामध्ये ही एक्सरसाइज बाबांची सहजच आठवण करून देईल.
चोहो बाजूंच्या
मुलांची आठवण सर्व बाजूंनी बापदादांना मिळाली आहे. प्रत्येक मुलाला वाटते की,
बाबांना आमची आठवण द्यावी, आमची आठवण द्यावी. कोणी पत्राद्वारे पाठवतात, कोणी
ग्रीटिंगकार्ड द्वारे, कोणी मुखाद्वारे परंतु बापदादा चोहो बाजूंच्या मुलांना,
प्रत्येकाला डोळ्यांमध्ये साठवत आठवणीचा प्रतिसाद म्हणून पद्मगुणा प्रेमपूर्वक आठवण
देत आहेत. बापदादा पहात आहेत की या वेळी कितीही जरी वाजले आहेत तरीही मेजॉरिटी
सर्वांच्या मनामध्ये मधुबन आणि मधुबनचे बापदादा आहेत. अच्छा!
चोहो बाजूंच्या तीनही
तख्तनशीन, स्वराज्य अधिकारी मुलांना, सदैव बापदादांना रिटर्न म्हणून बाप समान
बनणाऱ्या मुलांना, सदैव रिटर्न जर्नीच्या स्मृति स्वरूप मुलांना, सदैव संकल्प, वाणी
आणि कर्मामध्ये फॉलो फादर करणाऱ्या प्रत्येक मुलाला बापदादांची खूप-खूप-खूप
प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.
वरदान:-
सर्व
आत्म्यांमध्ये आपल्या शुभ भावनेचे बीज टाकणारे मास्टर दाता भव
फळाची वाट न पहाता
तुम्ही आपल्या शुभ भावनेचे बीज प्रत्येक आत्म्यामध्ये टाकत चला. वेळेनुसार सर्व
आत्म्यांना जागे व्हायचेच आहे. कोणी विरोध जरी करत असेल तरी देखील तुम्ही दयेची
भावना सोडायची नाही, हा विरोध, इन्सल्ट, शिव्या हे खताचे काम करतील आणि चांगले फळ
येईल. जितक्या शिव्या देतात तितकेच गुणही गातील, त्यामुळे प्रत्येक आत्म्याला आपल्या
वृत्ती द्वारे, व्हायब्रेशन द्वारे, वाणीद्वारे मास्टर दाता बनून देत चला.
सुविचार:-
सदैव प्रेम, सुख,
शांती आणि आनंदाच्या सागरामध्ये सामावलेली मुलेच सच्चे तपस्वी आहेत.
सूचना:- आज महिन्याचा
तिसरा रविवार आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे, सर्व ब्रह्मा वत्स संगठीत रूपामध्ये
संध्याकाळी ६.३० ते ७.३० वाजेपर्यंत विशेष वरदाता भाग्य विधाता बापदादांसोबत
कम्बाइन्ड स्वरूपामध्ये स्थित होऊन, अव्यक्त वतनमधून सर्व आत्म्यांना सुख-शांतीचे
वरदान देण्याची सेवा करा.