18-01-25 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली ओम शान्ति
मधुबन
पिताश्रींच्या पुण्य
स्मृतिदिनानिमित्त प्रातः क्लास मध्ये ऐकविण्यासाठी बापदादांची अनमोल मधुर
महावाक्ये
ओम् शांती . रुहानी
बाबा आता तुम्हा मुलांसोबत रुहरिहान (आत्मिक संवाद) करत आहेत, शिकवत आहेत. टीचरचे
काम आहे शिकवणे आणि गुरुचे काम आहे अंतीम ध्येय सांगणे. ध्येय आहे मुक्ती,
जीवनमुक्तीचे. मुक्तीसाठी आठवणीची यात्रा अतिशय आवश्यक आहे आणि जीवन मुक्तीसाठी
रचनेच्या आदि-मध्य-अंताला जाणणे जरुरी आहे. आता ८४ चे चक्र पूर्ण होत आहे, आता परत
घरी जायचे आहे. स्वतःशीच अशा प्रकारे गोष्टी केल्याने खूप आनंद होईल आणि मग
इतरांनाही आनंदीत कराल. दुसऱ्यांना देखील मार्ग दाखवण्याची कृपा करायची आहे.
तमोप्रधानापासून सतोप्रधान बनविण्याची. बाबांनी तुम्हा मुलांना पुण्य आणि पाप याची
गुह्य गती समजावून सांगितली आहे. पुण्य काय आहे आणि पाप काय आहे! सर्वात मोठे पुण्य
आहे - बाबांची आठवण करणे आणि दुसऱ्यांना देखील बाबांची आठवण करून देणे. सेंटर उघडणे,
तन-मन-धन दुसऱ्यांच्या सेवेमध्ये लावणे, हे आहे पुण्य. संगदोषामध्ये येऊन व्यर्थ
चिंतन, परचिंतनामध्ये आपला वेळ बरबाद करणे हे आहे पाप. जर कोणी पुण्य करता-करता पाप
करतात तर केलेली सर्व कमाई संपून जाते. जे काही पुण्य केले आहे ते सर्व नष्ट होते,
मग जमा होण्या ऐवजी संपून जाते. पाप कर्माची सजा देखील ज्ञानी तू आत्मा मुलांसाठी
शंभर पट आहे कारण सद्गुरूचे निंदक बनतात म्हणून बाबा शिकवण देतात - ‘गोड मुलांनो,
कधीही पाप कर्म करू नका. विकारांच्या वारापासून दूर रहा.
बाबांचे मुलांवर प्रेम आहे त्यामुळे दया सुद्धा येते. बाबा अनुभव ऐकवत आहेत जेव्हा
एकांतामध्ये बसतात तेव्हा सर्वप्रथम अनन्य मुलांची आठवण होते. भले विदेशामध्ये आहेत
नाहीतर आणखी कुठेही आहेत. जेव्हा कोणी चांगला सेवाधारी मुलगा शरीर सोडून जातो तेव्हा
त्याच्या आत्म्याला देखील आठवण करून सर्चलाईट देतात. हे तुम्ही मुलेच जाणता इथे दोन
दिवे आहेत, दोन्ही दिवे एकत्र आहेत. हे दोघेही जबरदस्त शक्तिशाली दिवे आहेत. सकाळची
वेळ सर्वात चांगली आहे स्नान करून एकांतामध्ये निघून गेले पाहिजे. आतून खूप आनंद
देखील वाटला पाहिजे.
बेहदचे बाबा
बसून मुलांना समजावून सांगत आहेत
- ‘गोड मुलांनो,
स्वतःला आत्मा समजून मज पित्याची आणि आपल्या घराची आठवण करा. बाळांनो, या आठवणीच्या
यात्रेला कधीही विसरू नका. आठवणीनेच तुम्ही पावन बनाल. पावन बनल्याशिवाय तुम्ही घरी
परत जाऊ शकत नाही. मुख्य आहेच मुळी ज्ञान आणि योग. बाबांकडे हाच मोठा खजिना आहे जो
मुलांना देतात, यामध्ये योगाचा सर्वात महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. मुले चांगल्या
रीतीने आठवण करतात तर बाबांची देखील आठवण आठवणीला मिळते. आठवणीनेच मुले बाबांना
आकर्षित करतात. शेवटी येणारे जे उच्च पद प्राप्त करतात, त्याचा आधार देखील आठवणच आहे.
ते आकर्षित करतात. म्हणतात ना - ‘बाबा, दया करा, कृपा करा’; यासाठी देखील मुख्य
पाहिजे आठवण. आठवणीनेच करंट (सकाश) मिळत राहील, त्यामुळे आत्मा निरोगी बनते, संपन्न
होते. कधी-कधी बाबांना कुठल्या मुलाला जर करंट द्यायचा असतो, तेव्हा झोप सुद्धा
उडून जाते. ही काळजी लागून राहते की अमक्याला करंट द्यायचा आहे. तुम्ही जाणता करंट
मिळाल्याने आयुष्य वाढते, एव्हरहेल्दी बनतात. असे देखील नाही की एका जागी बसूनच
आठवण करायची आहे. बाबा समजावून सांगत आहेत चालता-फिरता, भोजन खाताना, काम करताना
सुद्धा बाबांची आठवण करा. दुसऱ्यांना करंट (सकाश) द्यायचा असेल तर रात्रीचे सुद्धा
जागे रहा. मुलांना समजावून सांगितले आहे - पहाटे उठून जितकी बाबांची आठवण कराल,
तितके आकर्षण वाढेल. बाबा देखील सर्चलाईट देतील. आत्म्याची आठवण करणे अर्थात
सर्चलाईट देणे, मग याला कृपा म्हणा, आशीर्वाद म्हणा.
तुम्ही मुले जाणता हा अनादि पूर्वनियोजित ड्रामा आहे. हा जय-पराजयाचा खेळ आहे. जे
होते ते चांगलेच होते. क्रियेटरला ड्रामा जरूर पसंत असणार ना. तर मग क्रियेटरच्या
मुलांना देखील पसंत असणार. या ड्रामामध्ये बाबा मुलांकडे फक्त एकदाच त्यांची
अंतःकरणापासून आणि उत्कट प्रेमाने सेवा करण्यासाठी येतात. बाबांना तर सर्वच मुले
प्रिय आहेत. तुम्ही जाणता सतयुगामध्ये देखील सर्व एकमेकांना खूप प्रेम देतात.
प्राण्यांमध्ये देखील प्रेम असते. असे कोणतेही प्राणी नाहीत जे प्रेमाने राहत नाहीत.
तर तुम्हा मुलांना इथे मास्टर प्रेमाचे सागर बनायचे आहे. येथे बनाल तर ते संस्कार
अविनाशी बनतील. बाबा म्हणतात - कल्पापुर्वीप्रमाणेच हुबेहूब मी पुन्हा तुम्हाला
प्रेमळ बनविण्यासाठी आलो आहे. कधी कुठल्या मुलाचा चिडलेला आवाज ऐकतात तर बाबा शिकवण
देतात - बाळा, क्रोध करणे योग्य नाही, यामुळे तू सुद्धा दुःखी होशील आणि इतरांना
सुद्धा दुःखी करशील. बाबा सदाकाळासाठी सुख देणारे आहेत तर मुलांना देखील बाप समान
बनायचे आहे. एकमेकांना कधीही दुःख द्यायचे नाही. अतिशय प्रेमळ बनायचे आहे. प्रेमळ
बाबांची खूप प्रेमाने आठवण कराल तर स्वतःचे देखील कल्याण, दुसऱ्यांचे देखील कल्याण
कराल.
आता विश्वाचे मालक तुम्हाकडे अतिथी बनून आले आहेत. तुम्हा मुलांच्या सहकार्यानेच
विश्वाचे कल्याण व्हायचे आहे. जसे तुम्हा रूहानी मुलांना बाबा अतिप्रिय वाटतात,
तसेच बाबांनाही तुम्ही रुहानी मुले अतिप्रिय वाटता कारण तुम्हीच श्रीमतावर संपूर्ण
विश्वाचे कल्याण करणारी आहात. आता तुम्ही इथे ईश्वरीय परिवारामध्ये बसले आहात. बाबा
सन्मुख बसले आहेत. ‘तुम्हीं से खाऊं, तुम्ही से बैठूँ…’ तुम्ही जाणता शिवबाबा
यांच्यामध्ये (ब्रह्माबाबांमध्ये) येऊन म्हणतात - ‘गोड मुलांनो, देहा सहित देहाच्या
सर्व नात्यांना विसरून मज एकाची आठवण करा’. हा अंतिम जन्म आहे, ही जुनी दुनिया, जुना
देह नष्ट होणार आहे. एक म्हण देखील आहे - ‘आप मुये मर गई दुनिया’. पुरुषार्थासाठी
संगम युगाचा थोडासा वेळ आहे. मुले विचारतात बाबा हा अभ्यास कधीपर्यंत चालणार!
जोपर्यंत दैवी राजधानी स्थापन होत नाही तोपर्यंत सांगत राहणार. मग नवीन दुनियेमध्ये
ट्रान्सफर व्हाल. बाबा किती निरहंकारी होऊन तुम्हा मुलांची सेवा करतात, तर तुम्हा
मुलांना देखील इतकी सेवा करायला हवी. श्रीमतावर चालले पाहिजे. कुठे आपले मत दाखवाल
तर भाग्याला लकीर लागेल. तुम्ही ब्राह्मण ईश्वरीय संतान आहात. ब्रह्माची मुले
भाऊ-बहिणी आहात. ईश्वराची नातवंडे आहात, त्यांच्याकडून वारसा घेत आहात. जितका
पुरुषार्थ कराल तितके उच्च पद प्राप्त कराल. यामध्ये साक्षी होऊन राहण्याचा देखील
खूप अभ्यास पाहिजे. बाबांचा पहिला आदेश आहे - अशरिरी भव, देही-अभिमानी भव. स्वतःला
आत्मा समजून मज पित्याची आठवण करा तेव्हाच आत्म्यामध्ये जी खाद पडली आहे ती निघून
जाईल, खरेखुरे सोने बनाल. तुम्ही मुले अधिकाराने सांगू शकता - ‘बाबा, ओ गोड बाबा,
तुम्ही मला आपले बनवून सर्व काही वारशामध्ये दिले आहे’. या वारशाला कोणीही हिरावून
घेऊ शकत नाही, इतका तुम्हा मुलांना आनंद झाला पाहिजे. तुम्हीच सर्वांना मुक्ती
जीवनमुक्तीचा मार्ग दाखवणारे लाईट हाऊस (दीपस्तंभ) आहात, उठता-बसता, चालता-फिरता
तुम्ही लाईट हाऊस होऊन रहा.
बाबा म्हणतात
- मुलांनो, आता
वेळ खूप कमी आहे, गायन देखील आहे - ‘एक घडी आधी घडी…’ शक्य होईल तितकी एका बाबांची
आठवण करणे चालू ठेवा आणि मग आठवणींचा चार्ट वाढवत रहा. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या भाग्यवान आणि सुंदर ज्ञान नक्षत्रांना मातापिता
बापदादांची अंत:करणा पासून आणि उत्कट प्रेमाने प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
अव्यक्त -
महावाक्ये - ‘ निरंतर योगी बना’
जसे एका सेकंदामध्ये
स्विच ऑन आणि ऑफ केला जातो, असेच एका सेकंदामध्ये शरीराचा आधार घेतला आणि पुन्हा एका
सेकंदामध्ये शरीरापासून दूर अशरीरी स्थितीमध्ये स्थित व्हा. आता-आता शरीरामध्ये आले
आणि आता-आता अशरीरी बनले, ही प्रॅक्टिस करायची आहे, यालाच कर्मातीत अवस्था म्हटले
जाते. जसे एखादे वस्त्र धारण करायचे किंवा नाही करायचे आपल्या हातात असते. गरज वाटली
धारण केले, गरज संपली तर काढून टाकले. असाच अनुभव हे शरीर रुपी वस्त्र धारण
करण्यामध्ये आणि उतरवण्यामध्ये असावा. कर्म करताना देखील असा अनुभव झाला पाहिजे जसे
कोणते वस्त्र धारण करून कार्य करत आहोत, कार्य पूर्ण झाले आणि वस्त्रा पासून वेगळे
झाले. शरीर आणि आत्मा दोघांचे वेगळेपण चालता-फिरता देखील अनुभवास यावे. जशी एखादी
सवय होऊन जाते ना, परंतु ही प्रॅक्टिस कोणाला होऊ शकते? जे शरीर आणि शरीराशी
संबंधीत ज्या काही गोष्टी आहेत, शरीराची दुनिया, नाती किंवा अनेक ज्या काही वस्तू
आहेत त्यांच्यापासून एकदम डिटॅच असतील, जरासुद्धा आकर्षण नसेल तेव्हाच न्यारे होऊ
शकतील. जर सूक्ष्म संकल्पांमध्ये देखील हलकेपणा नसेल, डिटॅच होऊ शकत नसाल तर तुम्ही
न्यारेपणाचा (अलिप्त असल्याचा) अनुभव करू शकणार नाही. तर आता प्रत्येकाला ही
प्रॅक्टिस करायची आहे, पूर्णतः न्यारेपणाचा अनुभव व्हावा. या स्टेजवर स्थित
राहिल्याने अन्य आत्म्यांना देखील तुम्हा मुलांकडून न्यारेपणाचा अनुभव होईल, त्यांना
देखील जाणीव होईल. जसे योगामध्ये बसताना कित्येक आत्म्यांना हा अनुभव होतो ना की,
हे ड्रिल करून घेणारे वेगळ्याच स्थितीमध्ये आहेत, असे चालता-फिरता फरिश्तेपणाचे
साक्षात्कार होतील. इथे (मधुबन) बसलेले असूनही अनेक आत्म्यांना, जे कोणी तुमच्या
सतयुगी परिवारामध्ये समीप येणारे असतील, त्यांना तुम्हा लोकांचा फरिश्ता रूपाचा आणि
भविष्य राज्यपदाचा दोन्ही साक्षात्कार एकाचवेळी होतील. जसे सुरुवातीला ब्रह्मा
बाबांमध्ये संपूर्ण स्वरूप आणि श्रीकृष्ण असे दोघांचेही साक्षात्कार एकाचवेळी होत
होते, असेच आता त्यांना तुमच्या दुहेरी रूपाचा साक्षात्कार होईल. जसे-जसे नंबरवार
या न्यारेपणाच्या स्टेज मध्ये स्थिर होत जाल तसे तुम्हा लोकांचे देखील हे डबल
साक्षात्कार होतील. आता ही प्रॅक्टिस पूर्ण होईल तेव्हा चहुबाजूने हेच समाचार येणे
सुरू होईल. जसे सुरुवातीला घरबसल्या अनेक समीप येणाऱ्या आत्म्यांना साक्षात्कार झाले
ना. तसेच आता देखील साक्षात्कार होतील. येथे बसून देखील बेहदमध्ये तुम्हा लोकांचे
सूक्ष्म स्वरूप सेवा करेल. आता हीच सेवा बाकी राहिली आहे. साकारमध्ये सर्व उदाहरणे
तर पाहिली. सर्व गोष्टी नंबरवार ड्रामा अनुसार होणारच आहेत. जितके-जितके तुम्ही
स्वतः आकारी फरिश्ता स्वरूपामध्ये रहाल तितके तुमचे फरिश्ता रूप सेवा करेल.
आत्म्याला संपूर्ण विश्वाची फेरी मारण्यासाठी कितीसा वेळ लागतो? तर आता तुमचे
सूक्ष्म स्वरूप देखील सेवा करेल परंतु जे या न्याऱ्या स्थितीमध्ये असतील. स्वतः
फरिश्ता स्वरूपामध्ये स्थित असतील. सुरुवातीला सर्व साक्षात्कार झाले आहेत. फरिश्ता
रूपामध्ये संपूर्ण स्टेज आणि पुरुषार्थी स्टेज दोन्हींचा वेगवेगळा साक्षात्कार होत
होता. जसे साकार ब्रह्मा आणि संपूर्ण ब्रह्मा यांचा वेगवेगळा साक्षात्कार होत होता,
तसेच अनन्य मुलांचे देखील साक्षात्कार होतील. जेव्हा विनाश होईल तेव्हा साकार
शरीराद्वारे तर काहीही करू शकणार नाही आणि प्रभाव देखील याच सेवेने पडेल. जसे
सुरुवातीला देखील साक्षात्कारांमुळेच प्रभाव पडला होता. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष
अनुभवांचा प्रभाव पडला. तसेच आता शेवटी देखील हीच सेवा होणार आहे. आपल्या संपूर्ण
स्वरूपाचा साक्षात्कार तुम्हाला स्वतःला होतो का? आता शक्तींचा धावा करणे सुरू झाले
आहे. आता परमात्म्याचा धावा कमी करतात, शक्तींचा धावा करण्याची गती वेगाने चालू झाली
आहे. तर मधून-मधून अशी प्रॅक्टिस करायची आहे. सवय लागल्याने मग खूप आनंद अनुभव कराल.
एका सेकंदामध्ये आत्मा शरीरापासून न्यारी (वेगळी) होईल, सराव होईल. आता हाच
पुरुषार्थ करायचा आहे.
वर्तमान समयी मनन शक्तीद्वारे आत्म्यामध्ये सर्व शक्ती भरण्याची आवश्यकता आहे
तेव्हाच मग्न अवस्था होईल आणि विघ्न टळतील. विघ्नांची लाट तेव्हा येते जेव्हा
रुहानियतपणाची (आत्मिक भावनेची) ताकद कमी होते. तर वर्तमान समयी शिवरात्रीच्या
सेवेपूर्वी स्वतःमध्ये शक्ती भरण्यावर भर दिला पाहिजे. भले योगाचे प्रोग्राम ठेवता
परंतु योगाद्वारे शक्तींचा अनुभव करणे आणि करविणे आता अशा क्लासेसची आवश्यकता आहे.
प्रत्यक्षात आपल्या बळाच्या आधारे दुसऱ्यांना बळ द्यायचे आहे. फक्त बाहेरील सेवेचे
प्लॅन आखायचे नाहीत परंतु चहुकडे पूर्णपणे नजर असायला हवी. जे निमित्त बनले आहेत
त्यांनी हा विचार केला पाहिजे की आपल्या बगीच्यामध्ये कोणत्या गोष्टीची कमतरता आहे.
कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या बगीच्यामधील कमजोरीवर बारीक नजर ठेवली पाहिजे. खास
वेळ देऊन त्या कमतरता काढून टाकायच्या आहेत.
जसे साकार रूपाला पाहिले, कोणताही असा आपत्तीचा काळ असे तेव्हा रात्रं-दिवस सकाश
देण्याची विशेष सेवा, विशेष प्लॅन करत होते. निर्बल आत्म्यांमध्ये शक्ती भरण्याकडे
विशेष लक्ष असायचे ज्यामुळे अनेक आत्म्यांना अनुभव देखील होत असे. रात्र-रात्र
सुद्धा वेळ काढून आत्म्यांना सकाश देण्याची सेवा चालत होती. तर आता विशेष सकाश
देण्याची सेवा करायची आहे. लाईट हाऊस, माईट हाऊस बनून ही खास सेवा करायची आहे,
तेव्हाच चहुकडे लाईट-माईटचा प्रभाव पसरेल. आता याचीच आवश्यकता आहे. जसे कोणी
श्रीमंत असतो तर तो आपल्या जवळच्या नातेवाईकांना मदत देऊन त्यांची उन्नती करतो,
असेच वर्तमान समयी जे कोणी कमजोर आत्मे संपर्कामध्ये आणि नात्यामध्ये आहेत, तर
त्यांना विशेष सकाश द्यायची आहे. अच्छा-
वरदान:-
हजार
भुजावाल्या ब्रह्मा बाबांच्या सोबतीचा निरंतर अनुभव करणारे सच्चे स्नेही भव
वर्तमान समयी हजार
भुजावाले ब्रह्मा बाबांच्या रूपाचा पार्ट चालू आहे. जसे आत्म्याशिवाय भुजा काहीच करू
शकत नाहीत, तसेच बापदादांशिवाय भुजा रुपी मुले काहीच करू शकत नाहीत. प्रत्येक
कार्यामध्ये सर्वप्रथम बाबांचा सहयोग आहे. जोपर्यंत स्थापनेचा पार्ट चालू आहे
तोपर्यंत बापदादा मुलांच्या प्रत्येक सेकंदाला आणि संकल्पा सोबत आहेत म्हणूनच कधीही
वियोगाचा पडदा टाकून वियोगी बनू नका. प्रेमाच्या सागराच्या लाटांमध्ये तरंगत रहा,
गुणगान करा परंतु घायाळ होऊ नका. बाबांच्या स्नेहाचे प्रत्यक्ष स्वरूप सेवेचे स्नेही
बना.
सुविचार:-
अशरीरी स्थितीचा
अनुभव आणि अभ्यास हाच पुढे नंबर जाण्याचा आधार आहे.
आपल्या शक्तिशाली
मन्सा शक्ती द्वारे सकाश देण्याची सेवा करा :-
प्रत्येक क्षण,
प्रत्येक आत्म्याप्रति आपणहून शुभभावना आणि शुभकामनेची शुद्ध व्हायब्रेशनवाली मनसा
स्वतःला आणि दुसऱ्यांना अनुभव व्हावी. मनापासून प्रत्येक वेळी सर्व आत्म्यांप्रती
आशीर्वाद निघत रहावेत. मन सदैव याच सेवेमध्ये व्यस्त रहावे. जसे वाचा सेवेमध्ये
व्यस्त राहण्याचे अनुभवी झाले आहात. जर सेवा मिळाली नाही तर स्वतःला रिकामे असल्याचा
अनुभव करता. असेच प्रत्येक क्षण वाणी सोबतच मन्सा सेवा देखील आपोआप होत राहिली
पाहिजे.