18-01-26 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
ओम शान्ति
मधुबन
(बापदादांची अनमोल
महावाक्ये - पिताश्रीजींच्या पुण्य स्मृति दिवसा निमित्त सकाळी क्लासमध्ये
ऐकविण्यासाठी)
“गोड मुलांनो, ज्ञान रत्नांनी झोळी भरून दान देखील करायचे आहे, जितका दुसऱ्यांना
रस्ता सांगाल तितका आशीर्वाद मिळेल”
ओम् शांती. गोड
मुलांनी हे पक्के लक्षात ठेवायचे आहे की, शिवबाबा आम्हाला शिकवत आहेत. शिवबाबा
पतित-पावन देखील आहेत, सद्गती दाता देखील आहेत. सद्गती अर्थात स्वर्गाची राजाई
देतात. बाबा किती गोड आहेत. किती प्रेमाने मुलांना बसून शिकवतात. बाबा,
दादांच्याद्वारे आम्हाला शिकवतात. बाबा किती गोड आहेत, किती प्रेम करतात. कोणताही
त्रास देत नाहीत. फक्त म्हणतात - ‘माझी आठवण करा आणि चक्राची आठवण करा’. बाबांच्या
आठवणीमध्ये हृदय एकदम शीतल झाले पाहिजे. एका बाबांचीच आठवण सतावायला पाहिजे कारण
बाबांकडून किती जबरदस्त वारसा मिळतो. स्वतःला बघायला हवे की माझे बाबांवर किती
प्रेम आहे? कुठपर्यंत माझ्यामध्ये दैवी गुण आहेत कारण तुम्ही मुले आता काट्यांपासून
फूल बनत आहात. जितके-जितके योगामध्ये रहाल तितके काट्यांपासून फूल, सतोप्रधान बनत
जाल. फूल बनलात की मग तुम्ही इथे राहू शकणार नाही. फुलांचा बगीचा आहेच मुळी स्वर्ग.
जे खूप जणांना काट्यांपासून फूल बनवतात त्यांनाच खरे सुगंधी फूल म्हणणार. ते कधी
कोणाला काटा लावणार नाहीत (दुःख देणार नाहीत). क्रोध देखील मोठा काटा आहे. खूप
जणांना दुःख देतात. आता तुम्ही मुले काट्यांच्या दुनियेपासून किनाऱ्यावर आला आहात,
तुम्ही आहात संगमावर. जसे माळी फुलांना काढून वेगळ्या पॉटमध्ये ठेवतात तसेच तुम्हा
फुलांना देखील आता संगमयुगी पॉटमध्ये वेगळे ठेवले आहे. मग तुम्ही फूल स्वर्गामध्ये
निघून जाल. कलियुगी काटे भस्म होतील.
गोड मुले जाणतात
पारलौकिक बाबांकडून आम्हाला अविनाशी वारसा मिळतो. जी खरी-खरी मुले आहेत ज्यांचे
बापदादांवर पूर्णपणे प्रेम आहे त्यांना खूप आनंद वाटेल. आम्ही विश्वाचे मालक बनतो.
हां, पुरुषार्थानेच विश्वाचा मालक बनता येते, केवळ बोलल्याने नाही. जी अनन्य मुले
आहेत त्यांना कायम हे लक्षात राहील की आम्ही आमच्यासाठी पुन्हा तीच सूर्यवंशी,
चंद्रवंशी राजधानी स्थापन करत आहोत. बाबा म्हणतात - गोड मुलांनो, जितके तुम्ही
अनेकांचे कल्याण कराल तितका तुम्हालाच उजूरा (प्रतिफळ) मिळेल. खूप जणांना रस्ता
सांगाल तर खूप जणांचे आशीर्वाद मिळतील. ज्ञान रत्नांनी झोळी भरून मग दान करायचे आहे.
ज्ञान सागर तुम्हाला रत्नांच्या थाळ्या भरभरून देत आहेत. त्या रत्नांचे जे दान
करतात तेच सर्वांना प्रिय वाटतात. मुलांना आतून किती आनंद झाला पाहिजे. जी सेन्सिबल
(हुशार) मुले असतील ती तर म्हणतील आम्ही बाबांकडून पूर्णच वारसा घेणार. एकदम
चिकटूनच राहतील. बाबांवर खूप प्रेम असेल, कारण जाणतात प्राण देणारे बाबा मिळाले
आहेत. नॉलेजचे वरदान असे देतात ज्यामुळे आम्ही कोणापासून कोण बनतो. इनसॉलव्हंट
पासून सॉलव्हंट (अपवित्र पासून पवित्र) बनतो. इतका भंडारा भरपूर करतात. जितकी
बाबांची आठवण कराल तितके प्रेम वाढेल, आकर्षण निर्माण होईल. सुई साफ असते तेव्हा
चुंबकाकडे खेचली जाते ना. बाबांच्या आठवणीने कट (गंज) निघत जाईल. एका बाबांशिवाय
इतर कोणाचीही आठवण येऊ नये.
बाबा समजावून सांगतात
- ‘गोड मुलांनो, आता चुका करू नका. स्वदर्शन चक्रधारी बना, लाईट हाऊस बना. स्वदर्शन
चक्रधारी बनण्याची प्रॅक्टिस चांगली झाली की मग तुम्ही जणू ज्ञानाचा सागर बनाल. जसे
स्टुडंट शिकून टीचर बनतात ना. तुमचा धंदाच हा आहे. सर्वांना स्वदर्शन चक्रधारी बनवा
तेव्हाच चक्रवर्ती राजा-राणी बनाल म्हणून बाबा नेहमी मुलांना विचारतात - स्वदर्शन
चक्रधारी होऊन बसला आहात ना? बाबा देखील स्वदर्शन चक्रधारी आहेत ना. बाबा आलेले
आहेत तुम्हा गोड मुलांना परत घेऊन जाण्यासाठी. तुम्हा मुलांच्याशिवाय मला (बाबांना)
देखील जसे बेचैन वाटते. जेव्हा वेळ होते तेव्हा बेचैन वाटू लागते. बस आता आपण जावे.
मुले खूप बोलावत आहेत. खूप दुःखी आहेत. दया येते. आता तुम्हा मुलांना घरी यायचे आहे.
मग तिथून तुम्ही स्वतःच निघून जाल सुखधाममध्ये. तिथे मी तुमचा सोबती बनणार नाही.
आपल्या अवस्थेनुसार तुमची आत्मा निघून जाईल.
जितके तुम्ही मुले
बाबांच्या आठवणीमध्ये रहाल तितका दुसऱ्यांना ज्ञान समजावून सांगण्याचा परिणाम होईल.
तुमचे बोलणे जास्ती असता कामा नये. आत्म-अभिमानी होऊन थोडे जरी समजावून सांगाल तरी
तीर लागेल (ज्ञान काळजाला भिडेल). बाबा म्हणतात - मुलांनो, झाले ते झाले. आता अगोदर
स्वतःला सुधारा. स्वतः आठवण केली नाहीत आणि दुसऱ्यांना सांगत रहाल, ही फसवेगिरी
चालणार नाही. आतून मन जरूर खात राहील. बाबांवर पूर्णपणे प्रेम नसेल तर श्रीमतावर
चालणार नाहीत. बेहदच्या बाबांसारखे शिक्षण तर इतर कोणीही देऊ शकणार नाही. बाबा
म्हणतात - ‘गोड मुलांनो, या जुन्या दुनियेला आता विसरून जा. अखेरीला तर हे सर्व काही
विसरून जायचेच आहे. बुद्धी आपल्या शांतीधाम आणि सुखधाममध्ये रमते. बाबांची आठवण
करता-करता बाबांकडे निघून जायचे आहे. पतित आत्मा काही जाऊ शकणार नाही. ते आहेच पावन
आत्म्यांचे घर. हे शरीर ५ तत्वांनी बनलेले आहे. तर ५ तत्वे इथे रहाण्यासाठी आकर्षित
करतात कारण आत्म्याने जशी काही ही प्रॉपर्टी घेतली आहे, त्यामुळे शरीरामध्ये मोह
उत्पन्न झाला आहे. आता यामधून मोह काढून टाकून आपल्या घरी निघून जायचे आहे. तिथे तर
ही तत्वेच नाहीत. सतयुगामध्ये देखील शरीर योगबलाद्वारे बनते. सतोप्रधान प्रकृती असते
म्हणून आकर्षित करत नाही. दुःख होत नाही. या अतिशय सूक्ष्म गोष्टी समजून
घेण्यासारख्या आहेत. इथे ५ तत्वांचे बळ आत्म्याला आकर्षित करते म्हणून शरीर
सोडण्याची इच्छा होत नाही. नाहीतर यामध्ये खरेतर अजूनच आनंद झाला पाहिजे. पावन बनून
शरीर असे सोडाल जसा लोण्यातून केस निघावा. तर शरीरातून, सर्व गोष्टींमधून मोह
पूर्णपणे नष्ट करायचा आहे, याच्याशी आमचे कोणतेही कनेक्शन नाही. बस्स, आम्ही
बाबांकडे जातो. या दुनियेमधून आपले बॅग-बॅगेज तयार करून अगोदरच पाठवले आहे. सोबत तर
येऊ शकणार नाही. फक्त आत्म्यांना जायचे आहे. शरीराला देखील इथेच सोडायचे आहे.
बाबांनी नवीन शरीराचा साक्षात्कार घडवला आहे. हिरे-माणकांचे महाल मिळतील. अशा
सुखधाममध्ये जाण्यासाठी किती मेहनत केली पाहिजे. थकायचे नाही. दिवसरात्र खूप कमाई
करायची आहे; म्हणून बाबा म्हणतात - झोपेला जिंकणाऱ्या मुलांनो, मामेकम् (मज एकाची)
आठवण करा आणि विचार सागर मंथन करा. ड्रामाच्या रहस्याला बुद्धीमध्ये ठेवल्यामुळे
बुद्धी एकदम शितल होते. जी महारथी मुले असतील ती कधीही डगमगणार नाहीत. शिवबाबांची
आठवण कराल तर ते तुमची काळजी देखील घेतील.
बाबा तुम्हा मुलांना
दुःखातून सोडवून शांतीचे दान देतात. तुम्हाला देखील शांतीचे दान द्यायचे आहे. तुमची
ही बेहदची शांती अर्थात योगबळ इतरांना देखील एकदम शांत करेल. तुम्ही बाबांच्या
आठवणीमध्ये राहून मग बघा ही आत्मा आपल्या कुळातील आहे की नाही! जर असेल तर एकदम
शांत होईल. जे या कुळातील असतील त्यांनाच या गोष्टींमध्ये रस वाटेल. मुले आठवण
करतात तर बाबा सुद्धा प्रेम करतात. आत्म्यावर प्रेम केले जाते. हे देखील जाणतात
ज्यांनी खूप भक्ती केली आहे तेच जास्त शिकतील. त्यांच्या चेहऱ्यावरून समजत जाईल की
बाबांवर किती प्रेम आहे. आत्मा बाबांना बघते. बाबा आम्हा आत्म्यांना शिकवत आहेत.
बाबा देखील समजतात की, मी इतक्या छोट्याशा बिंदू आत्म्याला शिकवत आहे. पुढे जाऊन
तुमची ती अवस्था होईल. समजतील - मी भाऊ-भावाला शिकवत आहे. चेहरा बहिणीचा असूनही
दृष्टी आत्म्याकडे जावी. शरीरावर अजिबात दृष्टी जाऊ नये, यामध्ये खूप मेहनत आहे. या
अतिशय सूक्ष्म गोष्टी आहेत. खूप उच्च शिक्षण आहे. वजन कराल तर या शिक्षणाचे पारडे
खूप वजनदार होईल. अच्छा!
गोड गोड खूप वर्षांनी
भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक
पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
अव्यक्त महावाक्ये:-
महावीर मुलांच्या संघटनची विशेषता - एकरस, एकटिक स्थिती:- (९-१२-१९७५)
महावीर अर्थात विशेष
आत्मा. अशा महावीर, विशेष आत्म्यांच्या संघटनची विशेषता वर्तमान समयी अशीच असली
पाहिजे की, सर्वांची एकाच वेळी एकरस, एकटिक स्थिती असावी अर्थात जितका वेळ, ज्या
स्थितीमध्ये राहू इच्छिता, तितका वेळ, त्या स्थितीमध्ये संघटीत रूपामध्ये स्थित
व्हावेत, संघटीत रूपामध्ये सर्वांचे संकल्प रुपी बोट एक असावे. जोपर्यंत संघटनची अशी
प्रॅक्टिस होत नाही, तोपर्यंत सिद्धी होणार नाही. संघटनमध्ये आता ऑर्डर झाली की ५
मिनिटांसाठी व्यर्थ संकल्प पूर्णपणे समाप्त करून बीजरूप पॉवरफुल स्थितीमध्ये एकरस
स्थित व्हा, तर असा अभ्यास आहे का? असे नाही कोणी मनन करण्याच्या स्थितीमध्ये आहे,
कोणी रुहरिहान करत आहे आणि कोणी अव्यक्त स्थितीमध्ये आहे. ऑर्डर आहे बीजरूप होण्याची
आणि करत आहेत रुहरिहान तर ऑर्डर मानली नाही ना! हा अभ्यास तेव्हा होईल जेव्हा पहिले
सर्व व्यर्थ संकल्पांची समाप्ती कराल. हलचल होतेच व्यर्थ संकल्पांची. या व्यर्थ
संकल्पांच्या समाप्ती साठी, आपल्या संघटनला शक्तिशाली आणि एकमत बनविण्यासाठी कोणती
शक्ती पाहिजे?
यासाठी एक तर फेथ (विश्वास),
दुसरे - सामावण्याची शक्ती पाहिजे. संघटनला जोडण्याचा धागा आहे - विश्वास. एखाद्याने
जे काही केले, समजा रॉंग जरी केले, परंतु संघटन अनुसार अथवा आपल्या संस्कारानुसार
आणि समयानुसार त्याने जे काही केले त्याचा देखील जरूर काही भावार्थ असेल. संघटीत
रूपामध्ये जिथे सेवा आहे, तिथे त्याच्या संस्कारांना देखील दयाळूपणाच्या दृष्टीने
बघत, संस्कारांकडे न बघता यामध्ये देखील काही कल्याण असेल, याला सोबत घेऊन
चालण्यामध्येच कल्याण आहे. जेव्हा संघटनमध्ये एकमेकांप्रती असा विश्वास दृढ होईल
तेव्हाच सफलता मिळू शकते. अगोदरच व्यर्थ संकल्प करायला लागायचे नाही. जसे एखाद्याला
आपल्या चुकीची जाणीव देखील होते परंतु त्याला कधी पसरवणार नाहीत परंतु त्याला
सामावून घेतील. दुसऱ्या कोणी त्याला पसरवले तरी देखील वाईट वाटेल. याच प्रकारे
दुसऱ्याच्या चुकीला देखील आपली चुक समजून त्याला पसरवू नये. व्यर्थ संकल्प चालवता
कामा नयेत परंतु अशा व्यर्थ संकल्पांना देखील शांत केले पाहिजे. इतका एकमेकांवर
विश्वास असावा! स्नेहाच्या शक्तिने ठीक करायला हवे. जसे लौकिक रीतीने सुद्धा घरातील
गोष्ट बाहेर करत नाहीत, नाहीतर यामुळे घरालाच नुकसान होते. तर संघटनमध्ये साथीदाराने
जे काही केले त्यामध्ये जरूर काही रहस्य असणार, जरी त्याने रॉंग देखील केलेले असेल,
तरी सुद्धा त्याला परिवर्तन केले पाहिजे. हे दोन्ही प्रकारचे विश्वास ठेऊन
एकमेकांच्या संपर्काने चालल्यामुळे, संघटनची सफलता होऊ शकते, यामध्ये सामावण्याची
शक्ती जास्त पाहिजे. व्यर्थ संकल्पांना सामावून टाकायचे आहे (शांत करायचे आहे).
होऊन गेलेल्या संस्कारांना कधीही वर्तमान वेळेनुसार टॅली करू नका (जुळवू नका)
अर्थात पास्टला प्रेझेंट करू नका. जेव्हा पास्टला प्रेझेंटमध्ये मिसळता तेव्हाच
संकल्पांचा क्यू वाढत जातो आणि जोपर्यंत हा व्यर्थ संकल्पांचा क्यू आहे, तोपर्यंत
संघटीत रूपामध्ये एकरस स्थिती होऊ शकत नाही.
दुसऱ्याची चूक ती आपली
चुक समजणे - हे आहे संघटनला मजबूत करणे. हे तेव्हा होईल जेव्हा एकमेकांवर विश्वास
असेल. परिवर्तन करण्याचा विश्वास अथवा कल्याण करण्याचा विश्वास, यामध्ये सामावण्याची
शक्ती जरूर पाहिजे. बघितले आणि ऐकले त्याला पूर्णपणे सामावून, तीच आत्मिक दृष्टी आणि
कल्याणाची भावना रहावी. जेव्हा अज्ञानींसाठी म्हणता - अपकारींवर उपकार करायचे आहेत
तर संघटनमध्ये देखील एकमेकांप्रती दयेची भावना असावी. आता दयेची भावना कमी असते
कारण आत्मिक स्थितीचा अभ्यास कमी आहे.
असे पॉवरफुल संघटन
झाल्यानेच सिद्धी होईल. आता तुम्ही सिद्धीचे आवाहन करता, परंतु नंतर सिद्धी तुमच्या
समोर स्वतः झुकेल. जसे सतयुगामध्ये प्रकृती दासी बनते, तशी सिद्धी तुमच्या समोर
स्वतः नतमस्तक होईल. सिद्धी तुम्हा लोकांचे आवाहन करेल. जर श्रेष्ठ नॉलेज आहे,
स्टेज देखील पॉवरफुल आहे तर सिद्धी कोणती मोठी गोष्ट आहे? निरंतर एकरस स्थितीमध्ये
राहणाऱ्यांना सिद्धी प्राप्त होणार नाही, असे होऊ शकत नाही परंतु यासाठी संघटनची
शक्ती हवी. एकाने काही म्हटले, दुसऱ्याने स्वीकार केले. सामना करण्याची शक्ती
ब्राह्मण परिवारासमोर यूज करायची नाही. ती मायेसमोर यूज करायची आहे. परिवाराशी सामना
करण्याची शक्ती यूज केल्याने संघटन पॉवरफुल होत नाही. कोणतीही गोष्ट आवडली नाही तरी
देखील एकमेकांना सन्मान दिला पाहिजे. त्यावेळी कोणाचे संकल्प किंवा बोलणे मध्येच
तोडता कामा नये म्हणून आता सामावण्याच्या शक्तीला धारण करा.
संघटित रूपामध्ये
तुम्हा ब्राह्मण मुलांची आपसामध्ये संपर्काची भाषा देखील अव्यक्त भाव वाली असली
पाहिजे. जसे फरिश्ते किंवा आत्मे आत्म्यांशी बोलत आहेत. कोणाच्या ऐकलेल्या चुकीला
संकल्पामध्ये सुद्धा स्वीकार करायचे नाही आणि करवायचे देखील नाही. अशी जेव्हा स्थिती
असेल तेव्हाच बाबांची जी शुभ कामना आहे - संघटनची, ती प्रॅक्टिकलमध्ये होईल. यासाठी
विशेष पुरुषार्थ किंवा विशेष अनुभवांची आपसामध्ये देवाण-घेवाण करा. संघटित रूपामध्ये
विशेष योगाचे प्रोग्राम चालत राहतील तर विनाश ज्वाळेला देखील हवा लागेल.
योग-अग्नीद्वारे विनाशाची अग्नी प्रज्वलित होईल. अच्छा. ओमशांती.
वरदान:-
व्यक्तमध्ये
राहून अव्यक्त फरिश्ते रूपाचा साक्षात्कार करविणारे सफेद वस्त्रधारी आणि सफेद
लाइटधारी भव
जसे आता चोहो बाजूला
हा आवाज पसरत आहे की हे सफेद वस्त्रधारी कोण आहेत आणि कुठून आले आहेत! असे आता चोहो
बाजूला फरिश्ते रूपाचा साक्षात्कार करवा - याला म्हटले जाते डबल सेवेचे रूप. जसे ढग
चोहो बाजूला भरून राहतात, असे चोहो बाजूला फरिश्ते रूपाने प्रकट व्हा, जिथे कुठे
पाहतील तिथे फरिश्तेच दिसून येतील. परंतु हे तेव्हा होईल जेव्हा शरीरापासून डिटॅच
होऊन अंतवाहक शरीराने फेरी मारण्याचे अभ्यासी व्हाल. मनसा पॉवरफुल होईल.
सुविचार:-
सर्व गुणांचे किंवा
सर्व शक्तींचे अधिकारी बनण्यासाठी आज्ञाधारक बना.
अव्यक्त इशारे:- या
अव्यक्ती महिन्यामध्ये बंधनमुक्त राहून जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करा.
जसे बाबा सदैव
स्वतंत्र आहेत - तसे बाप समान बना. बापदादा आता मुलांना परतंत्र पाहू शकत नाहीत. जर
स्वतःला स्वतंत्र करू शकत नसाल, स्वतःच आपल्या कमजोरींमुळे पडत रहाल तर विश्व
परिवर्तक कसे बनाल! आता या स्मृतीला वाढवा की, मी मास्टर सर्वशक्तीमान आहे, याने
सहजच सर्व पिंजऱ्यांमधून मुक्त उडता पक्षी बनाल.