18-02-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुमची फर्ज-अदाई (जबाबदारी) आहे घराघरामध्ये बाबांचा संदेश देणे, कोणत्याही परिस्थितीमध्ये युक्ती करून प्रत्येकाला बाबांचा परिचय अवश्य द्या’’

प्रश्न:-
तुम्हा मुलांना कोणत्या एका गोष्टीचा छंद असला पाहिजे?

उत्तर:-
जे नवीन-नवीन पॉईंट्स निघतात, त्यांना आपल्याकडे नोट करून ठेवण्याचा छंद असला पाहिजे कारण इतके सर्व पॉइंट्स लक्षात राहणे कठीण आहे. नोट्स घेऊन मग कोणालाही समजावून सांगायचे आहे. असेही नाही की लिहून मग कॉपी पडून राहील. जी मुले चांगल्या रीतीने समजतात त्यांना नोट्स घेण्याचा खूप छंद असतो.

गीत:-
लाख जमाने वाले…

ओम शांती।
गोड-गोड रूहानी मुलांनी गाणे ऐकले. ‘रुहानी मुलांनो’ हे शब्द एक बाबाच म्हणू शकतात. रूहानी बाबांशिवाय कधी कोणी कोणाला ‘रूहानी मुलांनो’ असे म्हणू शकत नाही. मुले जाणतात, सर्व आत्म्यांचे एकच पिता आहेत, आपण सर्व भाऊ-भाऊ आहोत. गातात देखील ब्रदरहुड, तरी देखील मायेची प्रवेशता अशी आहे ज्यामुळे परमात्म्याला सर्वव्यापी म्हणतात तर फादरहूड होते. रावण राज्य जुन्या दुनियेमध्येच असते. नवीन दुनियेमध्ये राम राज्य किंवा ईश्वरीय राज्य म्हटले जाते. या समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. जरूर दोन राज्ये आहेत - ईश्वरीय राज्य आणि आसुरी राज्य. नवीन दुनिया आणि जुनी दुनिया. नवीन दुनिया जरूर बाबाच रचत असतील. या दुनियेमध्ये मनुष्य नवीन दुनियेला आणि जुन्या दुनियेला समजत सुद्धा नाहीत. अर्थात काहीच जाणत नाहीत. तुम्ही देखील काहीच जाणत नव्हता, अज्ञानी होता. नवीन सुखाची दुनिया कोण स्थापन करतात मग जुन्या दुनियेमध्ये दुःख का होते, स्वर्गाचा नरक कसा बनतो, हे कोणालाच माहित नाही आहे. या गोष्टींना तर मनुष्य जाणतील ना. देवतांची चित्रे देखील आहेत तर जरूर आदि सनातन देवी-देवतांचे राज्य होते. यावेळी नाही आहे. हे आहे प्रजेचे प्रजेवर राज्य. बाबा भारतामध्येच येतात. लोकांना हे माहीतही नाहीये की, शिवबाबा भारतामध्ये येऊन काय करतात. आपल्या धर्मालाच विसरून गेले आहेत. तुम्हाला आता परिचय द्यायचा आहे - त्रिमूर्ती आणि शिव बाबांचा. ब्रह्मा देवता, विष्णू देवता, शंकर देवता म्हटले जाते मग म्हणतात शिव परमात्माय नमः तर तुम्हा मुलांना ‘त्रिमूर्ती शिव’चाच परिचय द्यायचा आहे. अशा प्रकारे सेवा करायची आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये बाबांचा परिचय सर्वांना मिळेल तर बाबांकडून वारसा घेतील. तुम्ही जाणता आपण आता वारसा घेत आहोत. अजूनही पुष्कळ जणांना वारसा घ्यायचा आहे. आपल्यावर जबाबदारी आहे घरोघरी बाबांचा संदेश देण्याची. वास्तविक मेसेंजर एक बाबाच आहेत. बाबा स्वतःचा परिचय तुम्हालाच देतात. तुम्ही मग इतरांना बाबांचा परिचय द्यायचा आहे. बाबांचे नॉलेज द्यायचे आहे. मुख्य आहे - त्रिमूर्ती शिव, यांचे ‘कोट ऑफ आर्मस’ (राज्य चिन्ह) बनविले आहे. गव्हर्मेंट याचा यथार्थ अर्थ समजत नाहीत. त्यामध्ये चरख्या प्रमाणे चक्र देखील दाखवले आहे आणि त्यामध्ये लिहिले आहे - ‘सत्य मेव जयते’. याचा काही अर्थ तर निघत नाही. हे तर संस्कृत शब्द आहेत. आता बाबा तर आहेतच ट्रूथ. ते जे समजावून सांगतात त्याद्वारे तुमचा संपूर्ण विश्वावर विजय होतो. बाबा म्हणतात - ‘मी खरे सांगतो तुम्ही या शिक्षणा द्वारे खरे-खरे नारायण बनू शकता’. ते लोक काय-काय अर्थ काढतात. ते देखील त्यांना विचारले पाहिजे. बाबा तर विविध पद्धतीने समजावून सांगतात. जिकडे-तिकडे यात्रा भरतात तिथे नद्यांवर देखील जाऊन समजावून सांगा. पतित-पावन काही गंगा तर असू शकत नाही. नद्या सागरातून निघतात. तो आहे पाण्याचा सागर. त्यातून पाण्याच्या नद्या निघतात. ज्ञान सागरातून ज्ञानाच्या नद्या निघतील. तुम्हा मातांमध्ये आता ज्ञान आहे, गो-मुखावर जातात, त्याच्या मुखातून पाणी निघते समजतात हे गंगेचे पाणी आहे. इतके शिकले-सवरलेले मनुष्य समजत नाहीत की इथे गंगाजल कुठून येईल. शास्त्रांमध्ये आहे की, बाण मारला आणि गंगा उत्पन्न झाली. आता या तर आहेत ज्ञानाच्या गोष्टी. असे नाही की अर्जुनाने बाण मारला आणि गंगा उत्पन्न झाली. किती दूर-दूर तीर्थांवर जातात. म्हणतात शंकराच्या जटेतून गंगा निघाली, ज्यामध्ये स्नान केल्याने मनुष्या पासून परी बनतात. मनुष्यापासून देवता बनतात हे देखील परी बनल्यासारखेच आहे.

तुम्हा मुलांना आता बाबांचा परिचय द्यायचा आहे म्हणून बाबांनी ही चित्रे बनवली आहेत. ‘त्रिमूर्ती शिव’ यांच्या चित्रामध्ये संपूर्ण नॉलेज आहे. फक्त त्यांच्या त्रिमूर्तीच्या चित्रामध्ये नॉलेज देणाऱ्या शिवबाबांचे चित्र नाही आहे. नॉलेज घेणाऱ्याचे चित्र आहे. आता तुम्ही ‘त्रिमूर्ती शिव’च्या चित्रावर समजावून सांगता. वरती आहेत नॉलेज देणारे. ब्रह्माला त्यांच्याकडून नॉलेज मिळते जे मग प्रसार करतात. याला म्हटले जाते - ईश्वरीय धर्माच्या स्थापनेची मशिनरी. हा देवी-देवता धर्म खूप सुख देणारा आहे. तुम्हा मुलांना आपल्या सत्य धर्माची ओळख मिळाली आहे. तुम्ही जाणता आपल्याला भगवान शिकवत आहेत; तुम्ही किती आनंदीत होता. बाबा म्हणतात - तुम्हा मुलांच्या आनंदाला पारावार असता कामा नये कारण तुम्हाला शिकविणारे स्वयं भगवान आहेत, भगवान तर निराकार शिव आहेत, ना की श्रीकृष्ण. बाबा बसून समजावून सांगत आहेत - सर्वांचा सद्गती दाता एकच आहे. सद्गती सतयुगाला म्हटले जाते, दुर्गती कलियुगाला म्हटले जाते. नवीन दुनियेला नवीन, जुन्या दुनियेला जुनीच म्हणणार. मनुष्य समजतात आता दुनियेला जुने होण्यासाठी ४० हजार वर्षे पाहिजेत. किती गोंधळलेले आहेत. बाबांव्यतिरिक्त इतर कोणीही या गोष्टी सांगू शकणार नाही. बाबा म्हणतात - ‘मी तुम्हा मुलांना राज्यभाग्य देऊन बाकी सर्वांना घरी घेऊन जातो, जे माझ्या मतावर चालतात ते देवता बनतात. या गोष्टींना तुम्ही मुलेच जाणता, कोणी नवीन याला काय समजणार.

तुम्हा माळ्यांचे कर्तव्य आहे बगीचा लावून तयार करणे. बागवान (बगीच्याचा मालक) तर डायरेक्शन देतात. असे नाही, बाबा काही नवीन लोकांना भेटून त्यांना ज्ञान देतील. हे काम माळ्यांचे आहे. समजा, बाबा कलकत्त्याला गेले तर मुले समजतील आपण आपल्या ऑफिसरला, अमक्या मित्राला बाबांकडे घेऊन जावे. बाबा म्हणतील, त्यांना तर काहीच समजणार नाही. हे तर जसे अडाण्याला आणून समोर बसवल्यासारखे आहे; म्हणून बाबा म्हणतात नवीन लोकांना कधीही बाबांसमोर घेऊन येऊ नका. हे तर तुम्हा माळ्यांचे काम आहे, ना की बागवानाचे. माळ्याचे काम आहे बगीचा लावणे. बाबा तर डायरेक्शन देतात - असे-असे करा म्हणून बाबा कधीही नवीन लोकांना भेटत नाहीत. परंतु कधी पाहुणे होऊन घरामध्ये येतात तर म्हणतात दर्शन करावे. तुम्ही आम्हाला भेटू का देत नाही? शंकराचार्य इत्यादींकडे किती जातात. आज-काल शंकराचार्यांचा खूप मर्तबा आहे. शिकले-सवरलेले आहेत, तरी देखील जन्म तर विकारातूनच घेतात ना. ट्रस्टी लोक गादीवर कोणालाही बसवतात. सर्वांचे मत आपले-आपले आहे. बाबा स्वतः येऊन मुलांना आपला परिचय देतात की, ‘मी, कल्प-कल्प या जुन्या शरीरामध्ये येतो. हे (ब्रह्मा) देखील आपल्या जन्मांना जाणत नाहीत. शास्त्रांमध्ये तर कल्पाचा कालावधीच लाखो वर्षे लिहिला आहे. मनुष्य काही इतके जन्म घेऊ शकत नाहीत मग पशु-पक्षी इत्यादींच्या देखील योन्या मिळून ८४ लाख बनवल्या आहेत. मनुष्य तर जे ऐकतात सर्व सत्-सत् करत राहतात. शास्त्रांमध्ये तर सर्व आहेत भक्तिमार्गाच्या गोष्टी. कलकत्त्यामध्ये देवींच्या खूप शोभिवंत, सुंदर मुर्त्या बनवतात, सजवतात. आणि नंतर मग त्यांना बुडवतात (पाण्यात विसर्जित करतात). हे म्हणजे देखील बाहुल्यांची पूजा करणारी बाळं झाली. अगदीच इनोसंट. तुम्ही जाणता हा आहे नरक. स्वर्गामध्ये तर भरपूर सुख होते. आता देखील कोणाचा मृत्यू झाला तर म्हणतात - अमका स्वर्गामध्ये गेला; तर जरूर कधी काळी स्वर्ग होता, आता नाही आहे. नरकानंतर मग जरूर स्वर्ग येईल. या गोष्टींना देखील तुम्ही जाणता. मनुष्य तर किंचितही जाणत नाहीत. तर नवीन कोणी बाबांच्या समोर बसून काय करणार यासाठी म्हणून माळी पाहिजे जो नीट पालना करेल. इथे तर माळी देखील भरपूर पाहिजेत. मेडिकल कॉलेजमध्ये कोणी नवीन जाऊन बसला तर समजणार काहीच नाही. इथे नॉलेज देखील आहे नवीन. बाबा म्हणतात - ‘मी आलो आहे सर्वांना पावन बनविण्यासाठी. माझी आठवण करा तर पावन बनाल’. यावेळी सर्व आहेत तमोप्रधान आत्मे, तेव्हाच तर म्हणतात - आत्मा सो परमात्मा, सर्वांमध्ये परमात्मा आहे. तर बाबा थोडेच अशा लोकांसोबत बसून डोकेफोड करतील. हे तर तुम्हा माळ्यांचे काम आहे - काट्यांना फूल बनवणे.

तुम्ही जाणता, भक्ती आहे - रात्र, ज्ञान आहे - दिवस. गायले देखील जाते ब्रह्माचा दिवस, ब्रह्माची रात्र. प्रजापिता ब्रह्माची तर जरूर मुले देखील असतील ना. काहींना तर एवढी देखील अक्कल नाहीये जे विचारतील की इतके ब्रह्माकुमार-कुमारी आहेत, यांचा ब्रह्मा कोण आहे? अरे, प्रजापिता ब्रह्मा तर प्रसिद्ध आहे, त्यांच्या द्वारेच ब्राह्मण धर्म स्थापन होतो. म्हणतात देखील - ब्रह्मा देवताय नमः. बाबा तर मुलांना ब्राह्मण बनवून मग देवता बनवतात.

जे नवीन-नवीन पॉईंट्स निघतात, ते आपल्या जवळ नोट करण्याचा छंद मुलांमध्ये असला पाहिजे. ज्या मुलांना चांगल्या प्रकारे समजते त्यांना तर नोट्स घेण्याचा खूप छंद असतो. नोट्स घेणे चांगले आहे, कारण इतके सर्व पॉईंट्स लक्षात राहणे मुश्कील आहे. नोट्स घेऊन मग कोणाला समजावून सांगायचे आहे. असे नाही की लिहून मग कॉपी पडून राहील. नवीन-नवीन पॉईंट्स मिळत राहतात तेव्हा मग जुन्या पॉईंट्सच्या वह्या तशाच पडून राहतात. शाळेमध्ये देखील शिकत पुढे जातात, तर पहिल्या इयत्तेचे पुस्तक पडून राहते. जेव्हा तुम्ही समजावून सांगता तेव्हा शेवटी मग हे समजावून सांगा की, मनमनाभव. बाबांची आणि सृष्टी चक्राची आठवण करा. मुख्य गोष्ट आहे मामेकम् (मज एकाची) आठवण करा, यालाच योग अग्नी म्हटले जाते. भगवान आहेत - ज्ञानाचे सागर. मनुष्य आहेत - शास्त्रांचे सागर. बाबा काही कोणते शास्त्र ऐकवत नाहीत, त्यांनी देखील जर शास्त्र ऐकवले तर मग भगवान आणि मनुष्य यांच्यामध्ये फरक तो काय राहिला? बाबा म्हणतात - या भक्तिमार्गाच्या शास्त्रांचे सार मी तुम्हाला समजावून सांगतो.

ते मुरली (पुंगी) वाजवणारे सापाला पकडतात आणि त्याचे दात काढून टाकतात. बाबा देखील तुमची विष पिण्यापासून सुटका करतात. याच विषामुळे मनुष्य पतित बनले आहेत. बाबा म्हणतात याला सोडा तरी देखील सोडत नाहीत. बाबा गोरा बनवतात तरी देखील घसरून (विकारात जाऊन) काळे तोंड करतात. बाबा आले आहेत तुम्हा मुलांना ज्ञान चितेवर बसविण्याकरिता. ज्ञान चितेवर बसल्याने तुम्ही विश्वाचे मालक, जगत जीत बनता. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) नेहमी खुशी असावी की आपण सत्य धर्माची स्थापना करण्यासाठी निमित्त आहोत. स्वयं भगवान आम्हाला शिकवतात. आमचा देवी-देवता धर्म खूप सुख देणारा आहे.

२) माळी बनून काट्यांना फूल बनविण्याची सेवा करायची आहे. पूर्ण पालना करून मग बाबांच्या समोर आणायचे आहे. मेहनत करायची आहे.

वरदान:-
जुन्या देहाला आणि दुनियेला विसरणारे बापदादांचे दिलतख्तनशीन भव संगमयुगी श्रेष्ठ आत्म्यांचे स्थान आहे बापदादांचे दिलतख्त. असे तख्त साऱ्या कल्पामध्ये मिळू शकणार नाही. विश्वाच्या राज्याचे किंवा स्टेटच्या राज्याचे तख्त मिळत राहील परंतु हे तख्त मिळणार नाही - हे इतके विशाल तख्त आहे की ज्यावर तुम्ही चाला, फिरा, खा-झोपा परंतु कायम तख्तनशीन राहू शकता. जी मुले नेहमी बापदादांच्या दिलतख्त नशीन होऊन राहतात ते या जुन्या देहाला आणि देहाच्या दुनियेला विसरून जातात, याला बघत असताना देखील पाहत नाहीत.

बोधवाक्य:-
हदच्या नाव, मान, शानच्या मागे धावणे अर्थात सावलीच्या मागे लागणे आहे.

अव्यक्त इशारे - एकांतप्रिय बना एकता आणि एकाग्रतेला धारण करा:- ज्याप्रमाणे कोणतेही नवीन इन्व्हेन्शन (आविष्कार) भूमिगत राहिल्याने करू शकतात. तसे तुम्ही देखील जितके अंडरग्राउंड अर्थात अंतर्मुखी रहाल तितके नवीन-नवीन इन्व्हेन्शन किंवा योजना शोधून काढू शकाल. अंडरग्राउंड राहिल्याने (अंतर्मुखी राहिल्याने) एक म्हणजे - वायुमंडळापासून सुरक्षित रहाल, दुसरे - एकांत प्राप्त झाल्याने मनन शक्ती देखील वाढेल. तिसरे - मायेच्या कोणत्याही विघ्नांपासून सेफ्टीचे साधन बनेल.