18-03-2025      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - यावेळी तुमचे हे जीवन खूप-खूप अमूल्य आहे कारण की तुम्ही हद मधून निघून बेहदमध्ये आला आहात, तुम्ही जाणता की आम्ही या जगताचे कल्याण करणारे आहोत”

प्रश्न:-
बाबांच्या वारशाचा अधिकार कोणत्या पुरुषार्थाने प्राप्त होतो?

उत्तर:-
सदैव भावा-भावाची दृष्टी रहावी. स्त्री-पुरुषाचे जे भान आहे ते निघून जावे, तेव्हा बाबांच्या वारशाचा पूर्ण अधिकार प्राप्त होईल. परंतु स्त्री-पुरुषाचे भान अथवा ही दृष्टी नाहीशी होणे हे खूप कठीण आहे. यासाठी देही-अभिमानी बनण्याचा अभ्यास पाहिजे. जेव्हा बाबांची मुले बनाल तेव्हा वारसा मिळेल. एका बाबांच्या आठवणीने सतोप्रधान बनणारेच मुक्ति-जीवनमुक्तीचा वारसा प्राप्त करतात.

गीत:-
आखिर वह दिन आया आज...

ओम शांती।
मुले हे जाणतात ओम् अर्थात अहम् आत्मा मम शरीर (मी आत्मा माझे शरीर). आता तुम्ही या ड्रामाला, सृष्टी चक्राला आणि या सृष्टी चक्राला जाणणाऱ्या बाबांना जाणले आहे कारण की चक्राला जाणणाऱ्याला रचताच म्हणणार. रचता आणि रचनेला इतर कोणीही जाणत नाहीत. भले शिकले-सवरलेले मोठे-मोठे विद्वान-पंडित इत्यादी आहेत. त्यांना आपली घमेंड तर असते ना. परंतु त्यांना हे माहिती नाही आहे, म्हणतात देखील ज्ञान, भक्ति आणि वैराग्य. आता या ३ गोष्टी झाल्या, यांचा देखील अर्थ समजत नाहीत. संन्याशांना वैराग्य येते घराचे. त्यांना देखील उच्च आणि नीच बद्दल दुजाभाव असतो. हा उच्च कुळातील आहे, हा मध्यम कुळातील आहे - यावरून त्यांचे खूप चालते. कुंभच्या मेळ्यामध्ये देखील त्यांची खूप वादावादी चालू असते की, सर्वात आधी कोणाची मिरवणूक निघावी. यावरून खूप भांडण करतात मग पोलीस येऊन सोडवतात. तर हा सुद्धा देह-अभिमान झाला ना. दुनियेमध्ये जे सुद्धा मनुष्य मात्र आहेत, सर्व आहेत देह-अभिमानी. तुम्हाला तर आता देही-अभिमानी बनायचे आहे. बाबा म्हणतात देह-अभिमान सोडा, स्वतःला आत्मा समजा. आत्माच पतित बनली आहे, त्यामध्ये भेसळ पडली आहे. आत्माच सतोप्रधान, तमोप्रधान बनते. जशी आत्मा तसे शरीर मिळते. श्रीकृष्णाची आत्मा सुंदर आहे त्यामुळे शरीर देखील खूप सुंदर असते, त्याच्या शरीरामध्ये खूप आकर्षकपणा असतो. पवित्र आत्माच आकर्षित करते. लक्ष्मी-नारायणाची इतकी महिमा नाही आहे, जशी श्रीकृष्णाची आहे कारण की श्रीकृष्ण तर पवित्र छोटा मुलगा आहे. इथे सुद्धा म्हणतात छोटा मुलगा आणि महात्मा एक समान आहेत. महात्मे तर तरीही जीवनाचा अनुभव करून मग विकारांना सोडतात. घृणा येते, बालक तर आहेच पवित्र. त्यांना उच्च महात्मा समजतात. तर बाबांनी समजावले आहे हे निवृत्ति मार्गवाले संन्यासी देखील थोडाफार आधार देतात. जसे घर अर्धे जुने होते तेव्हा मग दुरुस्ती केली जाते. संन्यासी देखील दुरुस्ती करतात, पवित्र असल्यामुळे भारत स्थिर राहतो. भारतासारखा पवित्र आणि धनवान खंड दुसरा कोणता असू शकत नाही. आता बाबा तुम्हाला रचता आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताची स्मृति देतात कारण हे पिता देखील आहेत, टीचर देखील आहेत, गुरु देखील आहेत. गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवानुवाच लिहीलेले आहे, त्यांना कधी बाबा म्हणणार काय! अथवा पतित-पावन म्हणणार काय! जेव्हा मनुष्य पतित-पावन म्हणतात तेव्हा श्रीकृष्णाची आठवण करत नाहीत ते तर ईश्वराची आठवण करतात, मग म्हणतात - ‘पतित-पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम’. किती गोंधळ आहे. बाबा म्हणतात - ‘मी येऊन तुम्हा मुलांना यथार्थ रीतीने सर्व वेद-शास्त्र इत्यादींचे सार सांगतो’. सर्वात पहिली मुख्य गोष्ट समजावून सांगतात की, तुम्ही स्वतःला आत्मा समजा आणि बाबांची आठवण करा तर तुम्ही पावन बनाल. तुम्ही आहात भाऊ-भाऊ, आणि मग ब्रह्माची संतान कुमार-कुमारी तर भाऊ-बहिणी झालात. हे बुद्धीमध्ये लक्षात रहावे. खरे तर आत्मे भाऊ-भाऊ आहेत, मग इथे शरीरामध्ये आल्याने भाऊ-बहिण होतात. एवढी सुद्धा बुद्धी नाही आहे समजण्याची. ते आम्हा आत्म्यांचे पिता आहेत तर आपण सर्व ब्रदर्स झालो ना. मग सर्वव्यापी कसे म्हणता. वारसा तर मुलांनाच मिळणार, पित्याला तर मिळत नाही. वारसा पित्याकडून मुलांना मिळतो. ब्रह्मा देखील शिवबाबांचा मुलगा आहे ना, यांना देखील वारसा त्यांच्याकडून मिळतो. तुम्ही होता नातवंडे. तुम्हाला देखील अधिकार आहे. तर आत्म्याच्या रूपामध्ये सर्व मुले आहात आणि जेव्हा शरीरामध्ये येता तेव्हा भाऊ-बहिणी म्हणता. दुसरे कोणतेही नाते नाही. सदैव भावा-भावाची दृष्टी रहावी, स्त्री-पुरुषाचे भान देखील निघून जावे. जेव्हा मेल-फिमेल दोघेही म्हणता - ‘ओ गॉड फादर’ तर भाऊ-बहिणी झालात ना. भाऊ-बहिण तेव्हा होता जेव्हा बाबा संगमावर येऊन रचना रचतात. परंतु स्त्री-पुरुषाची दृष्टी खूप मुश्किलीने निघते. बाबा म्हणतात - ‘तुम्हाला देही-अभिमानी बनायचे आहे. बाबांची संतान बनाल तेव्हाच वारसा मिळेल. मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर सतोप्रधान बनाल. सतोप्रधान बनल्याशिवाय तुम्ही परत मुक्ति-जीवनमुक्तीमध्ये जाऊ शकत नाही. ही युक्ती संन्यासी इत्यादी कधी सांगणार नाहीत. ते असे कधी म्हणणार नाहीत की, स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. बाबांना म्हटले जाते - परमपिता परम-आत्मा, सुप्रीम. आत्मा तर सर्वांना म्हटले जाते परंतु त्यांना परम-आत्मा म्हटले जाते. ते बाबा म्हणतात - मुलांनो, मी आलो आहे तुम्हा मुलांपाशी. मला बोलण्यासाठी मुख तर पाहिजे ना. आजकाल बघा जिथे-तिथे गोमुख जरूर बनवतात आणि मग म्हणतात गोमुखातून अमृत निघते. वास्तविक अमृत तर म्हटले जाते ज्ञानाला. ज्ञान अमृत मुखातूनच निघते. यामध्ये पाण्याची तर गोष्टच नाही. ही (ब्रह्मा बाबा) गोमाता देखील आहे. बाबा यांच्यामध्ये प्रवेश झाले आहेत. बाबांनी यांच्याद्वारे तुम्हाला आपले बनवले आहे, यांच्यामधून ज्ञान येते. त्यांनी तर दगडाचे बनवून त्यामध्ये मुख बनवले आहे, ज्यातून पाणी येते. तो तर भक्तीचा रिवाज झाला ना. यथार्थ गोष्टी तुम्ही जाणता. भीष्म पितामह इत्यादींना तुम्ही कुमारींनी बाण मारले आहेत.

तुम्ही तर ब्रह्माकुमार-कुमारी आहात. तर कुमारी कोणाची तरी असणारच ना. अधरकुमारी आणि कुमारी दोघींचीही मंदिरे आहेत. प्रॅक्टिकलमध्ये तुमचे यादगार मंदिर आहे ना. आता बाबा बसून समजावून सांगत आहेत - जर का तुम्ही ब्रह्माकुमार-कुमारी आहात तर क्रिमिनल एसॉल्ट (विकारांचे आक्रमण) होऊ शकत नाही. नाहीतर अतिशय कठोर सजा मिळेल. देह-अभिमानामध्ये आल्याने हे विसरायला होते की, आपण भाऊ-बहिणी आहोत. ही सुद्धा बी.के. आहेत, मी सुद्धा बी.के. आहे तर विकारी दृष्टी जाऊ शकत नाही. परंतु आसुरी संप्रदायाचे मनुष्य विकाराशिवाय राहू शकत नाहीत त्यामुळे विघ्न आणतात. आता तुम्ही ब्रह्माकुमार-कुमारींना बाबांकडून वारसा मिळतो. बाबांच्या श्रीमतावर चालायचे आहे, पवित्र बनायचे आहे. हा आहे या विकारी मृत्युलोक मधील अंतिम जन्म. हे देखील कोणी जाणत नाही. अमर-लोकमध्ये कोणतेही विकार असत नाहीत. त्यांना म्हटलेच जाते सतोप्रधान संपूर्ण निर्विकारी. इथे आहेत तमोप्रधान संपूर्ण विकारी. गातात देखील - ‘ते संपूर्ण निर्विकारी, आम्ही विकारी, पापी आहोत’. संपूर्ण निर्विकारी असणाऱ्यांची पूजा करतात. बाबांनी समजावून सांगितले आहे तुम्ही भारतवासीच पूज्य सो पुन्हा पुजारी बनता. यावेळी भक्तीचा प्रभाव खूप आहे. भक्त भगवंताची आठवण करतात की येऊन भक्तीचे फळ द्या. भक्तीमध्ये काय हालत झाली आहे. बाबांनी समजावून सांगितले आहे - मुख्य धर्म शास्त्र ४ आहेत. एक तर आहे डीटीज्म (देवी-देवता धर्म), यामध्ये ब्राह्मण, देवता, क्षत्रिय तिन्ही येतात. बाबा ब्राह्मण धर्म स्थापन करतात. ब्राह्मणांची शिखा आहे संगमयुगाची. तुम्ही ब्राह्मण आता पुरुषोत्तम बनत आहात. ब्राह्मण बनलात नंतर देवता बनता. ते ब्राह्मण सुद्धा आहेत विकारी. ते देखील या ब्राह्मणांसमोर नमस्ते करतात. ब्राह्मण, ‘देवी-देवता नमः’ म्हणतात कारण समजतात की, ते (देवी-देवता) ब्रह्माची संतान होते, आपण काही ब्रह्माची संतान नाही आहोत. आता तुम्ही ब्रह्माची संतान आहात. तुम्हाला सर्वजण नमः करतील. तुम्ही पुन्हा देवी-देवता बनता. आता तुम्ही ब्रह्माकुमार-कुमारी बनले आहात नंतर बनणार दैवी कुमार-कुमारी.

यावेळी तुमचे हे जीवन खूप-खूप अमूल्य आहे कारण तुमचे ‘जगत माता’ म्हणून गायन आहे. तुम्ही हद मधून निघून बेहदमध्ये आला आहात. तुम्ही जाणता आम्ही या जगाचे कल्याण करणारे आहोत. तर प्रत्येक जगत-अम्बा जगत-पिता झाले. या नरकामध्ये मनुष्य खूप दुःखी आहेत, आपण त्यांची रुहानी सेवा करण्यासाठी आलो आहोत. आम्ही त्यांना स्वर्गवासी बनवूनच सोडणार. तुम्ही आहात सेना, याला युद्ध-स्थळ देखील म्हटले जाते. यादव, कौरव आणि पांडव एकत्र राहतात. भाऊ-भाऊ आहेत ना. आता तुमचे युद्ध भाऊ-बहिणींशी नाही, तुमचे युद्ध आहे रावणाशी. भाऊ-बहिणींना तुम्ही मनुष्यापासून देवता बनवण्यासाठी समजावून सांगता. तर बाबा म्हणतात - देहा सहित देहाचे सर्व संबंध सोडायचे आहेत. ही आहे जुनी दुनिया. किती मोठ-मोठी धरणे, कालवे इत्यादी बनवतात, कारण पाणी नाही. प्रजा भरमसाठ वाढली आहे. तिथे तर तुम्ही फार थोडे असता. नद्यांना पाणी देखील पुष्कळ असते, धान्य देखील विपूल असते. इथे तर या धरतीवर करोडो मनुष्य आहेत. तिथे साऱ्या धरणीवर सुरुवातीला ९-१० लाख असतात, दुसरा कोणता खंड असतच नाही. तुम्ही फार थोडेजण तिथे असता. तुम्हाला कुठे जाण्याची देखील गरज भासत नाही. तिथे आहेच बहारदार मौसम. ५ तत्वे देखील काही त्रास देत नाहीत, ऑर्डर मध्ये राहतात. दुःखाचे नाव सुद्धा नाही. तो आहेच स्वर्ग. आता आहे दोजक (नरक). हा सुरु होतो अर्ध्या कल्पा नंतर. देवता वाममार्गामध्ये जातात तेव्हा मग रावण राज्य सुरु होते. तुम्हाला समजले आहे - आम्ही डबल सिरताज पूज्य बनतो नंतर सिंगल ताजवाले बनतो. सतयुगामधे पवित्रतेची सुद्धा निशाणी आहे. देवता तर सर्व आहेत पवित्र. इथे कोणी पवित्र नाहीत. तरीही जन्म तर विकारातून घेतात ना म्हणून याला भ्रष्टाचारी दुनिया म्हटले जाते. सतयुग आहे श्रेष्ठाचारी. विकारालाच भ्रष्टाचार म्हटले जाते. मुले जाणतात सतयुगामध्ये पवित्र प्रवृत्ती मार्ग होता, आता अपवित्र झाले आहेत. आता पुन्हा पवित्र श्रेष्ठाचारी दुनिया बनते. सृष्टीचे चक्र फिरते ना. परमपिता परमात्म्यालाच पतित-पावन म्हटले जाते. मनुष्य म्हणतात - भगवान प्रेरणा देतात, आता प्रेरणा म्हणजे विचार, यामध्ये प्रेरणेची तर गोष्ट नाही. ते स्वतः म्हणतात - ‘मला शरीराचा आधार घ्यावा लागतो. मी मुखाशिवाय शिकवण कशी देणार. प्रेरणेने काही कधी शिकवण दिली जाते का! ईश्वर प्रेरणेने काहीही करत नाहीत. बाबा तर मुलांना शिकवतात. प्रेरणेने शिक्षण थोडेच होऊ शकते. बाबांशिवाय सृष्टीच्या आदि, मध्य, अंताचे रहस्य कोणीही सांगू शकणार नाही. बाबांनाच जाणत नाहीत. कोणी म्हणते लिंग आहे, कोणी म्हणते अखंड ज्योती आहे. कोणी म्हणते ब्रह्मच ईश्वर आहे. तत्व ज्ञानी ब्रह्म ज्ञानी देखील आहेत ना. शास्त्रांमध्ये दाखवले आहे ८४ लाख योनी. आता जर ८४ लाख जन्म असते तर कल्प खूप मोठे असायला हवे. काही हिशोबच काढू शकणार नाही. ते तर सतयुगाचीच लाखो वर्षे म्हणतात. बाबा म्हणतात - सारे सृष्टीचक्रच ५ हजार वर्षांचे आहे. ८४ लाख जन्मांसाठी तर वेळ देखील तितका हवा ना. ही शास्त्रे सर्व आहेत भक्तिमार्गाची. बाबा म्हणतात - ‘मी येऊन तुम्हाला या सर्व शास्त्रांचा सार समजावून सांगतो’. ही सर्व भक्ती मार्गाची साम्रगी आहे, याने कोणीही मला प्राप्त करू शकत नाही. मी जेव्हा येतो तेव्हाच सर्वांना घेऊन जातो. मला बोलावतातच - ‘हे पतित-पावन या’. पावन बनवून आम्हाला पावन दुनियेमध्ये घेऊन चला. मग शोधण्यासाठी धक्के का खाता? किती दूर-दूर कडेकपारी इत्यादींवर जातात. आजकाल तर किती मंदिरे रिकामी पडली आहेत, कोणीही जात नाही. आता तुम्हा मुलांनी उच्च ते उच्च बाबांच्या बायोग्राफीला सुद्धा जाणून घेतले आहे. बाबा मुलांना सर्व काही देऊन साठीनंतर मग वानप्रस्थमध्ये जाऊन बसतात. हा रिवाज देखील आताचा आहे, सण-उत्सव देखील सर्व यावेळचे आहेत.

तुम्ही जाणता आता आपण संगमावर उभे आहोत. रात्रीनंतर पुन्हा दिवस होईल. आता तर घोर अंधार आहे. गातात देखील - ‘ज्ञान सूर्य प्रगटा…’ तुम्ही बाबांना आणि रचनेच्या आदि-मध्य-अंताला आता जाणता. जसे बाबा नॉलेजफुल आहेत, तुम्ही देखील मास्टर नॉलेजफुल बनला आहात. तुम्हा मुलांना बाबांकडून वारसा मिळतो बेहदच्या सुखाचा. लौकिक पित्याकडून तर हदचा वारसा मिळतो, ज्यामुळे अल्पकाळाचे सुख मिळते, ज्याला संन्यासी काग विष्ठा समान सुख म्हणतात. ते मग इथे येऊन सुखासाठी पुरुषार्थ करू शकत नाहीत. ते आहेतच हठयोगी, तुम्ही आहात राजयोगी. तुमचा योग आहे बाबांसोबत, त्यांचा आहे तत्त्वा सोबत. हा देखील ड्रामा बनलेला आहे. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) पावन बनण्याकरिता आपण आत्मा भाऊ-भाऊ आहोत, मग ब्रह्मा बाबांची संतान भाऊ-बहिणी आहोत, ही दृष्टी पक्की करायची आहे. आत्मा आणि शरीर दोघांनाही पावन सतोप्रधान बनवायचे आहे. देह-अभिमान सोडायचा आहे.

२) मास्टर नॉलेजफुल बनून सर्वांना रचता आणि रचनेचे ज्ञान ऐकवून घोर अंधारातून बाहेर काढायचे आहे. नरकवासी मनुष्यांची रुहानी सेवा करून स्वर्गवासी बनवायचे आहे.

वरदान:-
मास्टर ज्ञान सागर बनून ज्ञानाच्या गुह्यतेमध्ये जाणारे अनुभव रुपी रत्नांनी संपन्न भव

जी मुले ज्ञानाच्या गुह्यतेमध्ये जातात ते अनुभव रुपी रत्नांनी संपन्न बनतात. एक आहे ज्ञान ऐकणे आणि ऐकवणे, दुसरे आहे अनुभवीमूर्त बनणे. अनुभवी सदैव अविनाशी आणि निर्विघ्न राहतात. त्यांना कोणीही हलवू शकत नाही. अनुभवी असणाऱ्यासमोर मायेचा कोणताही प्रयत्न यशस्वी होत नाही. अनुभवी कधीही धोका खाऊ शकत नाही. त्यामुळे अनुभवांना वाढवत प्रत्येक गुणाचे अनुभवी मूर्त बना. मनन शक्तिद्वारे शुद्ध संकल्पांचा स्टॉक जमा करा.

बोधवाक्य:-
फरिश्ता तो आहे जो देहाच्या सूक्ष्म अभिमानाच्या संबंधापासून देखील न्यारा आहे.

अव्यक्त इशारे - सत्यता आणि सभ्यता रुपी कल्चरला धारण करा:- संपूर्ण सत्यता देखील पवित्रतेच्या आधारावर होते. पवित्रता नाही तर सदैव सत्यता राहू शकत नाही. फक्त काम विकार म्हणजे अपवित्रता नाही आहे, परंतु त्याचे इतरही साथीदार आहेत. तर महान पवित्र अर्थात अपवित्रतेचे नामो-निशाण नसावे तेव्हा परमात्म प्रत्यक्षतेच्या निमित्त बनू शकाल.