18-03-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड-गोड सेवाभावी मुलांनो, असे कोणतेही काम करायचे नाही की ज्याच्यामुळे सेवेमध्ये कोणतेही विघ्न पडेल”

प्रश्न:-
संगमयुगावर तुम्हा मुलांना बिल्कुल ॲक्युरेट (अगदी बिनचूक) बनायचे आहे, अगदी ॲक्युरेट कोण बनू शकतात?

उत्तर:-
१. जे सच्च्या बाबांसोबत नेहमी सच्चे राहतात; आत एक, बाहेर दुसरे असे असू नये. २. जे शिवबाबांव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टींमध्ये जात नाहीत. ३. प्रत्येक पाऊल श्रीमतानुसार चालतात, कोणतीही चूक करत नाहीत, तेच ॲक्युरेट (बिनचूक) बनतात.

गीत:-
बचपन के दिन भुला न देना…

ओम शांती।
गोड-गोड रूहानी मुलांनी गाण्याचे दोन शब्द ऐकले; हा तर निश्चय करता की, बेहदचे बाबा आता बेहद सुखाचा वारसा देत आहेत. आपण अशा बाबांची मुले येऊन बनलो आहोत तर बाबांच्या श्रीमतावर देखील चालायचे आहे. नाहीतर काय होईल! आता तर हसत आहात, म्हणता - ‘आम्ही महाराजा-महाराणी बनणार’; आणि जर हात सोडलात तर मग जाऊन साधारण प्रजा बनाल. स्वर्गामध्ये तर जरूर याल. असे देखील नाही की सगळेच स्वर्गामध्ये येणार आहेत. जे सतयुग-त्रेतामध्ये येणारे असतील, तेच येतील. सतयुग आणि त्रेता दोन्हीला मिळून स्वर्ग म्हटले जाते. तरी देखील जे सर्वात पहिले नवीन दुनियेमध्ये येतात ते चांगले सुख प्राप्त करतात. बाकीचे जे नंतर येणारे आहेत ते काही ज्ञान घेणार नाहीत. ज्ञान घेणारे सतयुग-त्रेतामध्ये येतील. बाकीचे येतातच मुळी रावण राज्यामध्ये, ते थोडेसेच सुख प्राप्त करू शकतील. सतयुग-त्रेतामध्ये तर भरपूर सुख आहे ना म्हणून पुरुषार्थ करून बाबांकडून बेहद सुखाचा वारसा घेतला पाहिजे; आणि ही अतिशय आनंदाची बातमी लिहा - कार्ड जे छापता त्यामध्ये देखील हे लिहिले पाहिजे की, ‘उच्च ते उच्च बेहदच्या पित्याची आनंदाची वार्ता’. प्रदर्शनीमध्ये तुम्ही दाखवता नवीन दुनिया कशी स्थापन होते; तर हे क्लियर आणि मोठ्या अक्षरांमध्ये लिहिले पाहिजे की, ‘बेहदचे पिता ज्ञानाचा सागर, पतित-पावन, सद्गती दाता गीतेचे भगवान शिव कसे ब्रह्माकुमार-कुमारींद्वारे पुन्हा कलियुगी संपूर्ण विकारी, भ्रष्टाचारी पतित दुनियेला सतयुगी संपूर्ण निर्विकारी पावन श्रेष्ठाचारी दुनिया बनवत आहेत, ती खुशखबरी येऊन ऐका किंवा समजून घ्या’. गव्हर्मेंटला देखील तुमची ही प्रतिज्ञा आहे की, ‘आम्ही भारतामध्ये पुन्हा एकदा सतयुगी श्रेष्ठाचारी १०० टक्के पवित्रता सुख-शांतीचे दैवी स्वराज्य कसे स्थापन करत आहोत आणि या विकारी दुनियेचा विनाश कसा होईल ते येऊन समजून घ्या’. असे क्लियर लिहिले पाहिजे. कार्डमध्ये असे काही लिहा जेणेकरून मनुष्य चांगल्या रीतीने समजू शकेल. या प्रजापिता ब्रह्मा कुमार-कुमारी कल्पापूर्वी प्रमाणे ड्रामा प्लॅन अनुसार परमपिता परमात्मा शिवाच्या श्रीमतावर सहज राजयोग आणि पवित्रतेच्या बळाद्वारे, आपल्या तन-मन-धना द्वारे भारताला असे श्रेष्ठाचारी पावन कसे बनवत आहेत, ते येऊन समजून घ्या. क्लिअर करून कार्डमध्ये छापायला हवे जेणेकरून कोणीही समजू शकेल की, हे बी.के. शिवबाबांच्या मतावर राम राज्य स्थापन करत आहेत, जी गांधीजींची इच्छा होती. वर्तमानपत्रांमध्ये देखील असे पूर्ण निमंत्रण लिहिले पाहिजे. हे जरूर समजावून सांगायचे आहे की, प्रजापिता ब्रह्माकुमार-कुमारी आपल्या तन-मन-धना द्वारे हे कार्य करत आहेत. म्हणजे मग मनुष्य असे कधीही समजणार नाहीत की, हे तर भिक किंवा डोनेशन इत्यादी मागत आहेत. दुनियेमध्ये तर सर्व डोनेशनवरच चालतात. इथे तुम्ही म्हणता की आम्ही बी.के. आमच्या तन-मन-धना द्वारे हे कार्य करत आहोत. ते आपण स्वतःच स्वराज्य घेतात तर जरूर स्वतःचाच खर्च करतील. जे मेहनत करतात त्यांनाच २१ जन्मांकरिता वारसा मिळतो. भारतवासीच २१ जन्मांकरिता श्रेष्ठाचारी डबल मुकुटधारी बनतात. हे लक्ष्मी-नारायण डबल मुकुटधारी आहेत ना. आता तर कोणताच ताज राहिलेला नाहीये. तर हे चांगल्या रीतीने समजावून सांगावे लागेल. बाबा म्हणतात अशा प्रकारे लिहा म्हणजे बिचाऱ्यांना माहीत होईल की बी.के. काय कार्य करत आहेत. मोठ्यांचा आवाज होईल तेव्हा मग गरिबांचे देखील ऐकतील. नाही तर गरिबांची कोणतीही गोष्ट ऐकून घेत नाहीत. श्रीमंतांचा आवाज लगेच पसरतो. तुम्ही सिद्ध करून सांगता की, आम्ही खास भारताला स्वर्ग बनवत आहोत. बाकी सर्वांना शांतीधाम मध्ये पाठवून देणार. समजावून देखील असे सांगायचे आहे. भारत ५ हजार वर्षांपूर्वी असा स्वर्ग होता. आता तर कलियुग आहे, ते सतयुग होते. आता सांगा सतयुगामध्ये किती जनसंख्या होती. आता कलियुगाचा अंत आहे. ही तीच महाभारत महाभारी लढाई आहे. इतर कोणत्याही वेळी तर असे युद्धच झालेले नाहीये. हे तिसरे महायुद्ध देखील नंतर झाले आहे. ट्राय करत राहतात ना. आता तर अणुबॉम्ब बनवत राहतात. कोणाचेही ऐकत नाहीत. ते म्हणतात - जे बॉम्ब्स बनवले आहेत ते सर्व समुद्रामध्ये फेकून द्या, म्हणजे मग आम्ही देखील बनवणार नाही. तुम्ही ठेवाल आणि आम्ही बनवू नये असे कसे होऊ शकते. परंतु तुम्ही मुले जाणता ही तर भावी बनलेली आहे. कितीही त्यांना सल्ला द्या समजूनच घेणार नाहीत. जर विनाशच झाला नाही तर मग तुम्ही राज्य तरी कसे कराल. तुम्हा मुलांना तर निश्चय आहे ना. जे संशय-बुद्धी आहेत ते भागन्ती होतात, ट्रेटर (विद्रोही) बनतात. बाबांचे बनून मग ट्रेटर बनायचे नाही. तुम्हाला तर आठवण करायची आहे शिवबाबांची, बाकीच्या गोष्टींनी फायदाच काय. सच्च्या बाबांसोबत सच्चे बनून राहायचे आहे. आत एक आणि बाहेर दुसरे असेल तर आपले पद भ्रष्ट कराल. आपलेच नुकसान कराल. कल्प-कल्पांतरासाठी कधीही उच्च पद प्राप्त करू शकणार नाही. त्यामुळे यावेळी खूप ॲक्युरेट बनायचे आहे. कोणतीही चूक करता कामा नये. जितके शक्य होईल तितके श्रीमतावर चालायचे आहे. निरंतर आठवण तर अखेरीला राहील. बाबांव्यतिरिक्त इतर कोणाचीही आठवण राहू नये. गायले देखील आहे - ‘अंतकाल जो स्त्री सिमरे…’ ज्याच्यामध्ये मोह असेल त्याचीच आठवण येत राहील. पुढे चालून जितके तुम्ही जवळ येत जाल, साक्षात्कार होत जातील. बाबा प्रत्येकाला दाखवतील की, ‘तू असे-असे काम केले आहेस’. अगदी सुरुवातीला देखील तुम्ही साक्षात्कार केले आहेत. जे सजा भोगत होते ते खूपच ओरडत होते. बाबा म्हणतात - तुम्हाला दाखविण्यासाठी त्यांची १०० पटीने सजा कमी केली.

तुम्हा मुलांनी आता असे कोणतेही काम करायचे नाही ज्यामुळे बाबांच्या सेवेमध्ये विघ्न पडतील. अखेरीला देखील तुम्हाला साक्षात्कार होतील की, अशा प्रकारे तू बाबांच्या सेवेमध्ये खूप विघ्न टाकून नुकसान केले आहेस. आसुरी संप्रदाय आहे ना. ज्यांनी विघ्न टाकली आहेत त्यांना खूप सजा मिळते. शिवबाबांचा खूप मोठा दरबार आहे. राईट हँड म्हणून धर्मराज देखील आहे. त्या आहेत हदच्या सजा. इथे तर २१ जन्मांचे नुकसान होते, पद भ्रष्ट होते. प्रत्येक गोष्टीमध्ये बाबा समजावून सांगत राहतात. तर असे कोणी म्हणू नये की मला तर माहीतच नव्हते, म्हणून बाबा सर्व प्रकारे सावध करत राहतात. पाहतात प्रत्येक सेंटरमधले किती भागन्ती होतात. त्रास देतात. विकारी बनतात. स्कूलमध्ये तर चांगल्या रीतीने शिकले पाहिजे. नाहीतर तुम्हाला कोणते पद मिळेल. पदामुळे देखील खूप फरक पडतो. जसे इथे दुःखधाममध्ये कोणी प्रेसिडेंट आहेत, कोणी श्रीमंत आहेत, तर कोणी गरीब आहेत; तसेच तिथे सुखधाममध्ये देखील पदे तर नंबरवार असतील. जी रॉयल बुद्धिवान मुले असतील, ती बाबांकडून पूर्ण वारसा घेण्याचा प्रयत्न करतील. मायेची बॉक्सिंग आहे ना. माया खूप प्रबळ आहे. हार-जित होत राहते. कितीतरी येतात आणि मग ट्रेटर बनून निघून जातात. चालता-चालता फेल होतात. अनेकजण म्हणतात - असे होऊ तरी कसे शकते. असे तर कधी ऐकलेले नाही की, गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असताना पवित्र राहू शकतात. अरे, भगवानुवाच आहे ना - काम महाशत्रू आहे. गीतेमध्ये देखील हे शब्द आहेत ना. तुम्ही जाणता सतयुगामध्ये आहेत दैवी गुणवाले मनुष्य आणि कलियुगामध्ये आहेत आसुरी अवगुणवाले मनुष्य. आसुरी गुणवाले, दैवी गुणवाल्यांची महिमा गातात. किती फरक आहे. आता तुम्ही समजता आपण कोण होतो आणि आता काय बनत आहोत. इथे तुम्हाला सर्व गुणांची धारणा करायची आहे. खाणे-पिणे इत्यादी देखील सतोगुणी खायचे आहे. बघायचे आहे देवतांना काय खाऊ घालतात. श्रीनाथद्वारेमध्ये जाऊन पहा - किती पक्वान्ने अथवा शुद्ध भोजन बनते; तिथे आहेतच वैष्णव. आणि तिथे जगन्नाथपुरीमध्ये बघा काय मिळते? भात. तिथे वाममार्गातील खूप घाणेरडी चित्रे आहेत. जेव्हा राजाई होती तेव्हा ३६ प्रकारचे भोजन मिळत होते. तर श्रीनाथद्वारेमध्ये खूप पक्वान्ने बनतात. पुरी आणि श्रीनाथ मध्ये वेग-वेगळी पद्धत आहे. पुरीच्या मंदिरामध्ये देवतांच्या वेशामध्ये खूप घाणेरडी चित्रे आहेत. तर भोग देखील विशेष भाताचा लागतो. त्यामध्ये तूप सुद्धा टाकत नाहीत. हा फरक दाखवतात. भारत काय होता आणि आता काय बनला आहे. आता तर पहा काय हालत झाली आहे. पुरेसे अन्न देखील मिळत नाही. त्यांचे प्लॅन आणि शिवबाबांच्या प्लॅनमध्ये रात्रं-दिवसाचा फरक आहे. ते सर्व प्लॅन मातीमध्ये मिसळणार आहेत. नैसर्गिक आपत्ती येतील. धान्य इत्यादी काहीही मिळणार नाही, पाऊस तर पहा कुठे खूप पडतो आणि कुठे तर अजिबात पडतच नाही. किती नुकसान करतो. यावेळी तत्वे देखील तमोप्रधान आहेत तर पाऊस देखील उलट्या-सुलट्या वेळेला (कोणत्याही ऋतूमध्ये) पडत राहतो. वादळे देखील तमोप्रधान आहेत, सूर्य देखील अशी आग ओकेल काही विचारू नका. या नैसर्गिक आपत्ती ड्रामामध्ये नोंदलेल्या आहेत. त्यांची आहे विनाशकाले विपरीत बुद्धी. तुमची आहे बाबांसोबत प्रीत बुद्धी. अज्ञान काळामध्ये देखील सपुत मुलांवर आई-वडिलांचे प्रेम असते, म्हणून बाबा म्हणतात देखील नंबरवार पुरुषार्था नुसार प्रेमपूर्वक आठवण… जितकी-जितकी सेवा कराल… सेवा तर करायचीच आहे ना. भारताची खास आणि दुनियेची आम, भारताला स्वर्ग बनवायचे आहे. बाकी सर्वांना पाठवून द्यायचे आहे शांतीधामला. भारताला स्वर्गाचा वारसा मिळतो, बाकी सर्वांना मुक्तीचा वारसा मिळतो. सर्व निघून जातील. हाहाकारा नंतर जयजयकार होईल. किती हाहाकार माजेल. हा आहेच खुने नाहेक खेळ (रक्त रंजित खेळ) नैसर्गिक आपत्ती देखील येतील. मृत्यू तर सगळ्यांचाच होणार आहे.

बाबा मुलांना समजावून सांगतात की, चांगल्या रीतीने पुरुषार्थ करा. बाबांसोबत सदैव फरमानबरदार, वफादार (आज्ञाधारक, प्रामाणिक) राहायचे आहे. सेवाभावी बनायचे आहे. ज्यांनी कल्पापूर्वी जशी सेवा केली आहे, त्याचा साक्षात्कार होत राहील. तुम्ही साक्षी होऊन बघत राहाल. तुम्ही आता स्वदर्शन चक्रधारी बनला आहात. सदैव बुद्धीमध्ये स्वदर्शन चक्र फिरत राहिले पाहिजे. आपण असे-असे ८४ जन्म घेतले आहेत. आता आपण परत घरी जात आहोत. बाबा देखील लक्षात रहावेत, घर देखील लक्षात रहावे, सतयुग देखील लक्षात रहावे. संपूर्ण दिवस बुद्धीमध्ये हेच चिंतन करायचे आहे - आता मी विश्वाचा महाराजकुमार बनणार आहे. मी श्री लक्ष्मी अथवा श्री नारायण बनणार आहे. नशा चढला पाहिजे ना. बाबांना (ब्रह्मा बाबांना) नशा असतो. बाबा रोज या लक्ष्मी-नारायणाच्या चित्राला बघत राहतात, आतून नशा आहे ना. बस्स, उद्या मी जाऊन हा श्रीकृष्ण बनणार. मग स्वयंवरानंतर श्री नारायण बनणार. ततत्वम्. तुम्ही देखील बनणार ना. हा आहेच मुळी राजयोग, प्रजा योग नाहीये. आत्म्यांना पुन्हा आपले राज्य-भाग्य मिळते. मुलांनी राज्य गमावले होते. आता पुन्हा ते राज्य घेत आहेत. बाबा ही चित्रे इत्यादी बनवतातच यासाठी की तुम्हा मुलांना ती पाहून आनंद व्हावा. २१ जन्मांकरिता आपण स्वर्गाचे राज्य-भाग्य प्राप्त करत आहोत. किती सोपे आहे. हे शिवबाबा, हे प्रजापिता ब्रह्मा यांच्याद्वारे हा राजयोग शिकवत आहेत. पुन्हा आपण असे जाऊन बनणार. पाहिल्यानेच आनंदाचा पारा चढतो. आपण बाबांच्या आठवणीमध्ये राहिल्याने विश्वाचे राजकुमार बनणार. किती आनंद झाला पाहिजे. मी (ब्रह्मा बाबा) देखील शिकत आहे, तुम्ही देखील शिकत आहात. या शिक्षणा नंतर आपण जाऊन असे बनणार. सर्व काही शिक्षणावर अवलंबून आहे. जितके शिकाल तेवढी कमाई होईल ना. बाबांनी सांगितले आहे - काही सर्जन तर इतके हुशार असतात जे एका केसवर लाख रुपये देखील कमावतात. बॅरिस्टर मध्ये देखील असे असतात. कोणी तर खूप कमावतात, आणि कोणाचा तर पहा कोट सुद्धा फाटलेला असतो. हे देखील असेच आहे म्हणून बाबा वारंवार सांगतात - ‘मुलांनो, कोणतीही चूक करू नका. नेहमी श्रीमतावर चाला’. श्री श्री शिवबाबांद्वारे तुम्ही श्रेष्ठ बनता. तुम्हा मुलांनी बाबांकडून अनेकदा वारसा घेतला आहे आणि गमावला आहे. २१ जन्मांचा वारसा अर्ध्या कल्पासाठी मिळतो. अर्धे कल्प २५०० वर्षे सुख प्राप्त करता. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) आतून बाहेरून सच्चे होऊन राहायचे आहे. अभ्यासात कधीही चूक करायची नाही. कधीही संशय बुद्धी बनून शिक्षण सोडायचे नाही. सेवेमध्ये विघ्न रूप बनायचे नाही.

२) सर्वांना हीच आनंदाची बातमी सांगा की, आम्ही पवित्रतेच्या बळाद्वारे, श्रीमतावर आपल्या तन-मन-धनाच्या सहयोगाने २१ जन्मांकरिता भारताला श्रेष्ठाचारी डबल मुकुटधारी बनविण्याची सेवा करत आहोत.

वरदान:-
नेहमी पुण्याचे खाते जमा करणारे आणि करवून घेणारे मास्टर शिक्षक भव

आपण मास्टर शिक्षक आहोत, मास्टर म्हटल्याने आपोआप बाबांची आठवण होते. बनविणाऱ्याची आठवण आल्याने, ‘मी निमित्त आहे’ हे स्वतः स्मृतीमध्ये येते. विशेष ही स्मृती राहावी की, ‘मी पुण्य आत्मा आहे’, पुण्याचे खाते जमा करणे आणि करविणे हीच विशेष सेवा आहे. पुण्य आत्मा कधीही पापाचा एक टक्का संकल्प सुद्धा करू शकत नाही. मास्टर शिक्षक अर्थात नेहमी पुण्याचे खाते जमा करणारे आणि करविणारे बाप समान.

बोधवाक्य:-
संघटनच्या महत्त्वाला जाणणारे संघटनमध्येच आपल्या सेफ्टीचा अनुभव करतात.

हे अव्यक्त इशारे - “निश्चयाच्या फाउंडेशनला मजबूत करून सदैव निर्भय आणि निश्चिंत रहा”

जो जितका निश्चय बुद्धी असेल तितकाच सर्व गोष्टींमध्ये विजयी असेल. निश्चय बुद्धीची कधीही हार होत नाही. जर हार होत असेल तर समजले पाहिजे की, निश्चयाची कमी आहे. निश्चय बुद्धी विजयी रत्नांमधील मी एक रत्न आहे, असे स्वतःला समजायचे आहे. कोणतेही विघ्न आले तर त्याला पेपर समजून पास करायचे आहे. गोष्टींना पाहायचे नाही परंतु पेपर समजून पास व्हायचे आहे.