18-06-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - अवगुणांना काढून टाकण्याचा पुरुषार्थ करा, ज्या गुणाची कमी आहे त्याचा पोतामेल ठेवा, गुणांचे दान करा तर गुणवान बनाल”

प्रश्न:-
गुणवान बनण्यासाठी सर्वात पहिले कोणते श्रीमत मिळाले आहे?

उत्तर:-
गोड मुलांनो, गुणवान बनायचे असेल तर - १. कोणत्याही देहधारीला पाहू नका. स्वतःला आत्मा समजा. एका बाबांचेच ऐका आणि फक्त बाबांनाच पहा. मनुष्य मताला पाहू नका. २. देह-अभिमानवश असे कोणतेही कर्म करू नका ज्यामुळे बाबांचे अथवा ब्राह्मण कुळाचे नाव बदनाम होईल. उलटी चलनवाले (वाईट वर्तन असणारे) गुणवान बनू शकत नाहीत. त्यांना कुल कलंकित म्हटले जाते.

ओम शांती।
(बापदादांच्या हातामध्ये मोगऱ्याची फुले होती) असे सुगंधित फुल बनण्यासाठी बाबा दाखवून देत आहेत. मुले जाणतात, आपण फुल बनलो होतो जरूर. गुलाबाचे फुल, मोगऱ्याचे फुल सुध्दा बनलो होतो अथवा हिरे देखील बनलो होतो, आता पुन्हा बनत आहोत. ते आहेत खरे, या आधी खोटे होते. खोटेच खोटे, सत्याचा अंश सुद्धा नाही. आता तुम्ही सच्चे बनता तर खऱ्यामध्ये सर्व गुण देखील हवेत. तर ज्याच्यामध्ये जितके गुण आहेत, तितके इतरांना देखील देऊन आपसमान बनवू शकता; म्हणून बाबा मुलांना म्हणतात - ‘मुलांनो, आपल्या गुणांचा पोतामेल ठेवा’. माझ्यामध्ये कोणता अवगुण तर नाही ना? दैवी गुणांमध्ये काय कमी आहे? रोज रात्री आपला पोतामेल पहा. दुनियेतील मनुष्यांची तर गोष्टच वेगळी आहे. तुम्ही आता काही मनुष्य तर नाही आहात ना. तुम्ही आता ब्राह्मण आहात. भले मनुष्य तर सर्व मनुष्यच आहेत. परंतु प्रत्येकाच्या गुणांमध्ये आणि वर्तनामध्ये फरक आहे. मायेच्या राज्यामध्ये देखील काही-काही मनुष्य खूप चांगले गुणवान असतात परंतु ते बाबांना जाणत नाहीत. अतिशय धार्मिक वृत्तीवाले आणि विनम्र असतात. दुनियेमध्ये तर मनुष्यांच्या गुणांची विविधता आहे. आणि जेव्हा देवता बनतात तेव्हा दैवी गुण तर सर्वांमध्ये असतात. बाकी अभ्यासानुसार पदांचा दर्जा कमी होतो. एक म्हणजे अभ्यास करायचा आहे आणि दुसरे अवगुणांना काढून टाकायचे आहे. हे तर मुले जाणतात की आपण साऱ्या दुनियेपेक्षा वेगळे आहोत. इथे हे जसे कि एकच ब्राह्मण कुळ बसलेले आहे. शूद्र कुळामध्ये आहे - ‘मनुष्य मत’. ब्राह्मण कुळामध्ये आहे - ‘ईश्वरीय मत’. सर्व प्रथम तुम्हाला बाबांचा परिचय द्यायचा आहे, तुम्ही सांगता कि अमका वाद घालतो. बाबांनी सांगितले होते कि, तुम्ही लिहा - ‘आम्ही ब्राह्मण अथवा बी. के. आहोत ईश्वरीय मतावर, उच्च ते उच्च आहेत भगवान, तर आम्ही त्यांची मुले देखील त्यांच्या श्रीमतावर चालत आहोत. आम्ही मनुष्य मतावर चालत नाही, ईश्वरीय मतावर चालून आम्ही देवता बनतो. आम्ही मनुष्य मत पूर्णपणे सोडून दिले आहे’. तर समजतील कि यांच्या पेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही. आणि मग तुमच्याशी कोणी वाद घालू शकणार नाही. कोणी विचारले की, ‘हे तुम्ही कुठून ऐकले, कोणी शिकवले?’ तुम्ही सांगा - ‘आम्ही आहोत ईश्वरीय मतावर. प्रेरणेची गोष्टच नाही. बेहदचे पिता ईश्वराकडून आम्ही समजून घेतले आहे’. तुम्ही बोला, ‘भक्ती मार्गातील शास्त्रानुसार तर आम्ही खूप वेळ चाललो. आता आम्हाला ईश्वरीय मत मिळाले आहे. तुम्ही मुलांनी बाबांचीच महिमा करायची आहे. सर्वात पहिले हे बुद्धीमध्ये पक्के करायचे आहे कि, आम्ही ईश्वरीय मतावर आहोत. मनुष्य मतावर आम्ही चालत नाही, ऐकत नाही. ईश्वराने सांगितले आहे - ‘हियर नो ईविल, सी नो ईविल… (वाईट ऐकू नका, वाईट पाहू नका…)’ जे मनुष्य मत आहे. आत्म्याला पहा, शरीराला पाहू नका. हे तर पतित शरीर आहे. याला काय पहायचे आहे, या डोळ्यांनी हे पाहू नका. हे शरीर तर पतित ते पतितच आहे. इथली हि शरीरे तर सुधारणारी नाही आहेत आणखीनच जुनी होणार आहेत. दिवसेंदिवस सुधारते आत्मा. आत्माच अविनाशी आहे, म्हणून बाबा सांगतात कि, ‘सी नो ईविल’. शरीराला सुद्धा पाहू नका. देहा सहित देहाची जी काही नाती आहेत, त्यांना विसरायचे आहे. आत्म्यालाच बघा, एका परमात्म बाबांकडूनच ऐका, यामध्येच मेहनत आहे. तुम्हाला जाणीव होते कि हा मोठा विषय आहे. जे हुशार असतील, त्यांना पद देखील तेवढेच वरचे मिळेल. सेकंदामध्ये जीवनमुक्ती मिळू शकते. परंतु जर पूर्ण पुरुषार्थ केला नाहीत तर शिक्षा देखील खूप भोगावी लागेल.

तुम्ही मुले आंधळ्यांची काठी बनता बाबांचा परिचय देण्यासाठी. आत्म्याला पाहू शकत नाही परंतु जाणून घेता येते. आत्मा किती छोटी आहे. या आकाश तत्वामध्ये (धरतीवर) पहा मनुष्याला किती जागा लागते. मनुष्य तर येत-जात राहतात. आत्मा कुठे येते-जाते का? आत्म्याची किती छोटीसी जागा असेल! विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आत्म्यांचा समूह असेल. शरीराच्या तुलनेमध्ये आत्मा किती छोटी आहे, ती किती कमी जागा घेते. तुम्हाला तर राहण्यासाठी खूप जागा पाहिजे. आता तुम्ही मुले विशाल-बुद्धी बनले आहात. बाबा नवीन गोष्टी सांगतात नवीन दुनियेसाठी आणि मग सांगणारा देखील नवीन आहे. मनुष्य तर सर्वांकडून दया मागत राहतात. त्यांच्या स्वतःमध्ये इतकी ताकद नाही आहे कि, स्वतःवर दया करू शकतील. तुम्हाला ताकद मिळते. तुम्ही बाबांकडून वारसा घेतला आहे बाकी कुणालाही दयाळू म्हटले जात नाही. मनुष्याला कधी देवता म्हणू शकत नाही. दयाळू फक्त एक बाबाच आहेत, जे मनुष्याला देवता बनवतात; म्हणूनच तर म्हणतात - परमपिता परमात्म्याची महिमा अपरंअपार आहे, त्याचा पारावार नाही. आता तुम्ही मुले जाणता कि, त्यांच्या दयेला पारावार (मर्यादा) नाही. बाबा जी नवीन दुनिया बनवत आहेत, त्यामध्ये सर्व काही नवीन असते. मनुष्य, पशु, पक्षी सगळे सतोप्रधान असतात. बाबांनी समजावून सांगितले आहे - तुम्ही श्रेष्ठ बनता तर तुमच्या फर्निचरचे (राहणीमानाचे) देखील असे श्रेष्ठ गायन आहे. बाबांना देखील श्रेष्ठ ते श्रेष्ठ म्हणतात, ज्यांच्याकडून विश्वाची बादशाही मिळते. बाबा स्पष्ट सांगतात कि, मी तळहातावर स्वर्ग घेऊन येतो. ते लोक हातातून केसर वगैरे काढतात, इथे तर अभ्यासाची गोष्ट आहे. हे आहे खरे शिक्षण. तुम्ही समजता की आपण शिकत आहोत. शाळेमध्ये आलो आहोत, अशा शाळा तुम्ही भरपूर उघडा ते तुमची ॲक्टिव्हीटी (उपक्रम) तरी बघतील. कुणाचे वाईट वर्तन असेल तर नावच खराब करतात. देह-अभिमानवाल्याची ॲक्टिव्हीटी (कर्मच) वेगळे असते. बघतील, असे कर्म आहे तर मग जसा काही सर्वांवर कलंक लागतो. समजतात कि यांच्या वर्तनामध्ये तर काहीच बदल होत नाही तर जणू बाबांची निंदा केली. वेळ लागतो. सर्व दोष त्याच्यावर येतो. मॅनर्स (शिष्टाचार) खूप चांगले पाहिजे. तुमचा स्वभाव बदलायला किती वेळ लागतो. तुम्ही समजता कि काहींचा स्वभाव खूप छान फर्स्टक्लास असतो. ते दिसूनही येतात. बाबा बसून प्रत्येक मुलाला पाहतात की, याच्यामध्ये कोणता दोष आहे जो काढला पाहिजे. प्रत्येकाला तपासतात. दोष तर सर्वांमध्ये आहेत. तर बाबा सर्वांना बघत असतात. रिझल्ट पाहत राहतात. बाबांचे मुलांवर खूप प्रेम आहे ना. बाबा जाणतात कि यांच्यामध्ये हि कमतरता आहे त्यामुळे उच्च पद प्राप्त करू शकणार नाही. जर दोष काढले नाहीत तर खूप अवघड आहे. पाहिल्यावरच लक्षात येते. हे तर जाणतात अजून वेळ बाकी आहे. एकेकाला तपासून पाहतात, बाबांची नजर एकेकाच्या गुणांवर पडेल. विचारतील - तुमच्यामध्ये कोणता अवगुण तर नाही ना? बाबांसमोर तर खरे सांगतात. काहींना देह-अभिमान असतो तर ते सांगत नाहीत. बाबा तर सांगत राहतात कि स्वतःहून जो करेल तो देवता. सांगण्यावरून करेल तो मनुष्य, जो सांगून देखील करत नाही…! बाबा सांगत असतात कि या जन्मातील जी काही कमी कमजोरी आहे ती बाबांना आपणहून सांगा. बाबा तर सर्वांना सांगतात की आजार सर्जनला सांगितला पाहिजे. शरीराचा आजार नाही तर आतला आजार सांगायचा आहे. तुमच्यामध्ये काय-काय आसुरी विचार येत राहतात? तर त्यावर बाबा उपाय सांगतील. अशा परिस्थितीमध्ये जोपर्यंत अवगुण जात नाहीत, तोपर्यंत तुम्ही तितके उच्च पद प्राप्त करू शकणार नाही, अवगुण खूप बदनामी करतात. लोकांना तर शंकाच वाटते कि, ‘भगवान यांना शिकवतो! भगवान तर नावा-रूपापासून वेगळा आहे, सर्वव्यापी आहे, तो कसा काय यांना शिकवणार, यांचे वर्तन कसे आहे’. हे तर बाबा जाणतात - तुमचे गुण कसे फर्स्टक्लास असले पाहिजेत. जर अवगुण लपवाल तर कुणालाही तितकासा तीर लागणार नाही (तुम्ही सांगितलेले ज्ञान त्यांच्या काळजाला भिडणार नाही) त्यामुळे जितके होईल तितके आपल्यामध्ये जे अवगुण आहेत त्यांना काढून टाकत जा. लिहा कि, ‘माझ्यामध्ये हि-हि वाईट सवय आहे’, तर मन आतल्याआत खात राहील. नुकसान झाले कि जीवाला लागते. व्यापारी लोक आपले खाते रोज तपासतात - आज किती फायदा झाला, रोजचे खाते तपासतात. हे बाबा देखील सांगतात दररोज आपली वर्तणूक पहा. नाही तर आपलेच नुकसान कराल. बाबांची पत (इज्जत) गमावून बसाल.

गुरूंची निंदा करणारे उच्च पद प्राप्त करू शकत नाहीत. देह-आभिमानी उच्च पद प्राप्त करू शकणार नाहीत. देही-अभिमानी उच्च पद प्राप्त करतील. देही-अभिमानी बनण्यासाठीच सर्वजण पुरुषार्थ करतात. दिवसेंदिवस सुधारणा होत जाते. देह-अभिमानामुळे जी कर्तव्ये (वाईट कर्म) होतात, त्यांना नष्ट करत रहायचे आहे. देह-अभिमानामुळे नक्कीच पाप होते त्यामुळे देही-अभिमानी बनत रहा. हे तर समजू शकता की, जन्म घेताच कोणी राजा बनत नाही. देही-अभिमानी बनण्यासाठी वेळ तर लागतो ना. हे देखील तुम्ही समजता की, आता आपल्याला परत जायचे आहे. बाबांकडे मुले येतात. कोणी ६ महिन्यांनी येतात तर कोणी ८ महिन्यांनी येतात तर मग बाबा बघतात कि इतक्या वेळामध्ये किती उन्नती झाली आहे? दिवसेंदिवस काही सुधारणा होत आहे कि काही गडबड आहे? काहीजण तर चालता-चालता शिक्षणच सोडून देतात. बाबा म्हणतात - हे काय, स्वयं भगवान तुम्हाला शिकवत आहेत भगवान-भगवती बनविण्यासाठी, असे शिक्षण तुम्ही सोडून देता! अरे! वर्ल्ड गॉड फादर (विश्वाचा ईश्वर पिता) तुम्हाला शिकवत आहे आणि यामध्ये गैरहजर! माया किती शक्तिशाली आहे. फर्स्ट क्लास शिक्षणापासून तुम्हाला दूर ठेवते. असे बरेच आहेत जे चालत राहतात, आणि मग शिक्षणाला लाथ मारतात. हे तर तुम्ही समजता कि आता आमचे तोंड आहे स्वर्गाकडे आणि पाय आहेत नरकाकडे. तुम्ही संगमयुगी ब्राह्मण आहात. हि जुनी रावणाची दुनिया आहे. आम्ही व्हाया शांतीधाम, सुखधाममध्ये जाणार. मुलांना हेच लक्षात ठेवावे लागेल. वेळ फार कमी आहे, शरीर उद्या सुद्धा सुटू शकते. बाबांची आठवण नसेल तर मग ‘अन्तकाल…’. बाबा समजावून तर खूप सांगतात. या सर्व गुप्त गोष्टी आहेत. नॉलेज देखील गुप्त आहे. हे देखील जाणतात कि कल्पापूर्वी ज्याने जितका पुरुषार्थ केला आहे, तेवढाच करत आहेत. ड्रामा अनुसार बाबा देखील कल्पापूर्वी प्रमाणे समजावून सांगत राहतात, त्यामध्ये काही बदल होऊ शकत नाही. बाबांची आठवण करत रहा तर तुमची विकर्म विनाश होत जातील. शिक्षा भोगावी लागता कामा नये. बाबांच्या समोर बसून जर शिक्षा भोगाल तर बाबा काय म्हणतील! तुम्ही साक्षात्कारामध्ये देखील पाहिले आहे, बाबा तुम्हाला त्यावेळी माफ करू शकणार नाहीत. यांच्याद्वारे (ब्रह्माबाबांद्वारे) बाबा शिकवत आहेत तर यांचाच साक्षात्कार होणार. यांच्याद्वारे तिथे देखील तुम्हाला समजावून सांगण्यात येईल कि, ‘तू, हे-हे केले आहेस’; त्यावेळी खूप रडाल, ओरडाल, पश्चाताप सुद्धा कराल. कारण साक्षात्कारा शिवाय सजा देऊ शकत नाही. म्हणतील - ‘तुला इतके शिकवत होतो तरीही तू अशी काही कर्म केली आहेस.’ तुम्ही देखील समजता कि रावणाच्या मतावर आपण किती पापे केली आहेत. पूज्य पासून पुजारी बनलो आहोत. बाबांना सर्वव्यापी म्हणत आलो. हा तर एक नंबरचा अपमान आहे. याचा सुद्धा हिशोब खूप मोठा आहे. बाबा तक्रार करतात कि तुम्ही स्वतःला कसे चापट मारले आहे. भारतवासीच किती खाली आले आहेत. बाबा येऊन समजावून सांगतात. आता तुम्हाला किती समज आली आहे. ते देखील नंबरवार समजतात, ड्रामा अनुसार. अगोदर सुद्धा असाच या वेळेपर्यंतच्या क्लासचा हाच रिझल्ट होता. बाबा सांगतील तर जरूर ना. जेणेकरून मुले आपली उन्नती करत राहतील. माया अशी आहे जी देही-अभिमानी राहू देत नाही. हाच मोठा विषय आहे. स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा तर पापे भस्म होतील. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) देह-अभिमानामध्ये आल्याने नक्कीच पापे होतात, देह-अभिमानीला उच्च पद मिळू शकत नाही, त्यामुळे देही-अभिमानी बनण्याचा पूर्णतः पुरुषार्थ करायचा आहे. आपल्या कडून बाबांची निंदा होईल असे कोणतेही कर्म होऊ नये.

२) आपल्यातील आजार (अवगुण) बाबांना खरे-खरे सांगायचे आहेत, अवगुण लपवायचे नाहीत. आपल्याला चेक करायचे आहे कि माझ्यामध्ये काय-काय अवगुण आहेत? अभ्यासाने स्वतःला गुणवान बनवायचे आहे.

वरदान:-
हदच्या रॉयल इच्छांपासून मुक्त राहून सेवा करणारे निःस्वार्थ सेवाधारी भव

जसे ब्रह्मा बाबांनी कर्म बंधनापासून मुक्त, न्यारे बनण्याचा पुरावा दिला. सेवेव्यतिरिक्त स्नेहाचे दुसरे कोणतेही बंधन नाही. सेवेमध्ये ज्या हदच्या रॉयल इच्छा असतात त्या देखील हिशोबाच्या बंधनामध्ये बांधून टाकतात. सच्चे सेवाधारी या हिशोबापासून सुद्धा मुक्त राहतात. जसे देहाचे बंधन, देहाच्या संबंधाचे बंधन आहे, तसेच सेवेमध्ये स्वार्थ - हे देखील बंधन आहे. या बंधनातून किंवा रॉयल हिशोबातून देखील मुक्त, नि:स्वार्थ सेवाधारी बना.

बोधवाक्य:-
आश्वासनांना फाईलमध्ये ठेऊ नका, तुम्ही फायनल बनून दाखवा.