18-07-2024
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - सेवेचा समाचार ऐकण्याची, वाचण्याची देखील तुम्हाला आवड असली पाहिजे, कारण
यामुळे उमंग उत्साह वाढतो, सेवा करण्याचा संकल्प उत्पन्न होतो”
प्रश्न:-
संगम युगावर
बाबा तुम्हाला सुख देत नाहीत परंतु सुखाचा रस्ता सांगतात - असे का?
उत्तर:-
कारण सर्व मुले बाबांची आहेत, जर एका मुलाला सुख दिले तर हे देखील ठीक नाही. लौकिक
पित्याकडून मुलांना समान हिस्सा मिळतो, बेहदचे बाबा हिस्सा वाटत नाहीत, सुखाचा
मार्ग सांगतात. जे त्या मार्गावर चालतात, पुरुषार्थ करतात, त्यांना उच्च पद प्राप्त
होते. मुलांना पुरुषार्थ करायचा आहे, सर्व काही पुरुषार्थावर अवलंबून आहे.
ओम शांती।
मुले जाणतात बाबा मुरली चालवतात. मुरली सर्वांकडे जाते आणि जे मुरली वाचून सेवा
करतात त्यांचा समाचार मॅगझिनमध्ये येतो. मग जी मुले मॅगझिन वाचतात, त्यांना
सेंटरच्या सेवेच्या समाचारा विषयी माहिती होईल - अमक्या-अमक्या ठिकाणी अशी सेवा होत
आहे. जे मॅगझीन वाचणारच नाहीत त्यांना काहीही समाचार कळणार सुद्धा नाही आणि
पुरुषार्थ देखील करणार नाहीत. सेवेचा समाचार ऐकून मनामध्ये येते की आपण देखील अशी
सेवा करावी. मॅगझिनमुळे माहिती होते, आपले भाऊ-बहीणी किती सेवा करत आहेत. हे तर मुले
समजतात - जितकी सेवा, तितके उच्च पद मिळेल त्यामुळे मॅगझिन देखील सेवेचा उत्साह
वाढवते. हे काही असेच फालतू म्हणून बनत नाही. फालतू ते समजतात जे स्वतः वाचत नाहीत.
कोणी म्हणतात - आम्हाला अक्षर ओळख नाही, अरे रामायण, भागवत, गीता इत्यादी ऐकण्यासाठी
जाता ना, तसे हे देखील ऐकले पाहिजे. नाहीतर सेवेचा उत्साह वाढणार नाही. अमक्या
ठिकाणी ही सेवा झाली. आवड असेल तर कुणालातरी सांगा ते तुम्हाला वाचून दाखवतील.
बऱ्याच सेंटर्सवर असे देखील होत असेल जे मॅगझिन वाचतही नसतील. असे बरेच आहेत
ज्यांच्याकडे तर सेवेचे नामोनिशाण सुद्धा नसते. तर पद देखील तसेच मिळवतील. हे तर
समजता राजधानी स्थापन होत आहे, त्यामध्ये जे जितकी मेहनत करतात तितके पद प्राप्त
करतात. अभ्यासावर लक्ष दिले नाही तर नापास होतील. सर्व काही यावेळच्या अभ्यासावर
अवलंबून आहे. जितके शिकाल आणि शिकवाल तितका आपलाच फायदा आहे. अशी बरीच मुले आहेत
ज्यांना मॅगझिन वाचण्याचा विचार देखील येत नाही. ते दीड-दमडीचे पद मिळवतील. तिथे (सतयुगामध्ये)
हा विचार असत नाही की, ‘याने हा पुरुषार्थ केला आहे तेव्हा हे पद मिळाले आहे’. नाही.
कर्म-विकर्माच्या गोष्टी सर्व इथे (संगमावर) बुद्धीमध्ये आहेत.
कल्पाच्या
संगमयुगावरच बाबा समजावून सांगतात, जे समजत नाहीत ते तर जसेकाही पत्थर-बुद्धी आहेत.
तुम्ही देखील समजता आपण तुच्छ-बुद्धी होतो मग त्यामध्ये देखील परसेंटेज असते. बाबा
मुलांना समजावून सांगत राहतात, आता कलियुग आहे, यामध्ये अपार दुःख असते. ही-ही दुःखे
आहेत, जे समजूतदार असतील त्यांना लगेच समजेल की हे तर बरोबर बोलत आहेत. तुम्ही
देखील जाणता, काल आपण किती दुःखी होतो, अपार दुःखामध्ये होतो. आता पुन्हा अपार
सुखामध्ये जात आहोत. हे देखील तुम्ही जाणता कि, हे आहेच रावण राज्य, कलियुग. जे
स्वतः जाणतात परंतु इतरांना समजावून सांगत नाहीत तर बाबा म्हणतील की, ते काहीच जाणत
नाहीत. जाणतात असे तेव्हा म्हणणार जेव्हा सेवा करतील, समाचार मॅगझिनमध्ये येईल.
दिन-प्रतिदिन बाबा अगदी सोपे पॉईंट्स सुद्धा सांगत राहतात. ते लोक तर समजतात कलियुग
अजून लहान बाळ आहे; जेव्हा संगम समजतील तेव्हा सतयुग आणि कलियुगामध्ये तुलना करू
शकतील. कलियुगामध्ये अपार दुःख आहे, सतयुगामध्ये अपार सुख आहे. तुम्ही बोला, ‘बाबा
आम्हा मुलांना अपार सुख देत आहेत ज्याचे आम्ही वर्णन करत आहोत’. बाकी दुसरे कोणी असे
समजावून सांगू शकणार नाही. तुम्ही नवीन गोष्टी ऐकवता, दुसरे कोणी तर हे विचारू
देखील शकणार नाहीत की, ‘तुम्ही स्वर्गवासी आहात का नरकवासी आहात?’ तुम्हा मुलांमध्ये
देखील नंबरवार आहेत, इतके सारे पॉईंट्स लक्षात ठेवू शकत नाहीत, समजावून सांगताना
देह-अभिमान येतो. आत्माच ऐकते अथवा धारण करते. परंतु चांगले-चांगले महारथी देखील हे
विसरून जातात. देह-अभिमानामध्ये येऊन बोलू लागतात, असे सर्वांचे होते. बाबा तर
म्हणतात सर्व पुरुषार्थी आहेत. असे नाही की आत्मा समजून बोलतात. नाही, बाबा आत्मा
समजून ज्ञान देतात. बाकी जे भाऊ-भाऊ आहेत, ते पुरुषार्थ करत आहेत - अशा अवस्थेमध्ये
टिकण्याचा. तर मुलांनी इतरांना देखील समजावून सांगायचे आहे - कलियुगामध्ये अपार
दुःख आहे, सतयुगामध्ये अपार सुख आहे. आता संगमयुग चालू आहे. बाबा मार्ग दाखवतात, असे
नाही की बाबा सुख देतात. सुखाचा रस्ता दाखवतात. रावण सुद्धा दु:ख देत नाही, दुःखाचा
उलटा रस्ता दाखवतो. बाबा ना दुःख देत, ना सुख देत, सुखाचा मार्ग दाखवतात. मग जो
जितका पुरुषार्थ करेल तितके सुख मिळेल. सुख देत नाहीत. बाबांच्या श्रीमतावर
चालल्याने सुख प्राप्त होते. बाबा तर फक्त मार्ग दाखवतात, रावणाकडून दुःखाचा रस्ता
मिळतो. जर बाबांनी दिला असता तर मग सर्वांना एक सारखा वारसा मिळाला पाहिजे. जसे
लौकिक पिता देखील वारसा वाटतात. इथे तर जो जसा पुरुषार्थ करेल. बाबा रस्ता खूप सोपा
सांगतात. असे-असे कराल तर इतके उच्च पद प्राप्त कराल. मुलांना पुरुषार्थ करायचा असतो
- आपण सर्वात जास्त चांगले पद मिळवावे, अभ्यास करायचा आहे. असे नाही, हे भले उच्च
पद मिळवू देत, मी बसूनच राहीन. नाही, पुरुषार्थ फर्स्ट. ड्रामा अनुसार पुरुषार्थ
जरूर करावा लागतो. कोणी तीव्र पुरुषार्थ करतात, कोणी कमी. सर्व काही पुरुषार्थावर
अवलंबून आहे. बाबांनी तर रस्ता सांगितला आहे - माझी आठवण करा. जेवढी आठवण कराल तेवढी
विकर्म विनाश होतील. ड्रामावर सोडून द्यायचे नाही. ही तर समजून घेण्याची गोष्ट आहे.
वर्ल्डची
हिस्ट्री-जिओग्राफी रिपीट होते. तर जरूर जो पार्ट बजावला होता तोच बजावावा लागेल.
सर्वधर्म पुन्हा आपल्या वेळेनुसार येतील. समजा ख्रिश्चन आता शंभर करोड आहेत मग
पुन्हा तितकेच पार्ट बजावण्यासाठी येतील. ना आत्म्याचा विनाश होत, ना तिचा पार्ट कधी
विनाश होऊ शकत. या समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. जे समजतील ते जरूर समजावून देखील
सांगतील. ‘धन दिये धन ना खुटे’. धारणा होत राहील, इतरांना देखील श्रीमंत बनवत
राहतील परंतु भाग्यामध्ये नसेल तर मग स्वतःला देखील लाचार समजतात. टीचर म्हणतील -
तू बोलू शकत नसशील तर तुझ्या भाग्यामध्ये दीड-दमडीचे पद आहे. भाग्यामध्ये नसेल तर
तदबीर (पुरुषार्थ) काय करू शकणार. ही आहे बेहदची पाठशाळा. प्रत्येक टीचरचा सब्जेक्ट
आपला-आपला असतो. बाबांची शिकविण्याची पद्धत बाबाच जाणे आणि तुम्ही मुले जाणो, दुसरा
कोणीही जाणू शकणार नाही. तुम्ही मुले किती प्रयत्न करता तरी देखील जेव्हा कोणी
समजेल तेव्हा ना. बुद्धीमध्ये राहतच नाही. जितके जवळ येत जाल, असे दिसून येते की ते
हुशार होत जातील. आता म्युझियम, रूहानी कॉलेज इत्यादी देखील उघडतात. तुमचे तर नावच
वेगळे आहे ‘रूहानी युनिव्हर्सिटी’. गव्हर्मेंट देखील बघेल. तुम्ही त्यांना बोला,
‘तुमची आहे भौतिक युनिव्हर्सिटी, ही आहे रूहानी’. आत्मा शिकते. पूर्ण ८४ च्या
चक्रामध्ये एकदाच रूहानी बाबा येऊन रूहानी मुलांना शिकवतात. जसे तुम्ही चित्रपट
बघाल आणि तीन तासानंतर पुन्हा हुबेहूब रिपीट होईल. हे देखील ५००० वर्षांचे चक्र
हुबेहूब रिपीट होते. हे तुम्ही मुले जाणता. ते तर भक्तीमध्ये फक्त शास्त्रांनाच
बरोबर समजतात. तुम्हाला तर कोणते शास्त्र नाही आहे. बाबा बसून समजावून सांगतात, बाबा
कोणते शास्त्र शिकले आहेत का? ते (दुनियावाले) तर गीता वाचून ऐकवतील. आईच्या
पोटातून काही शिकून सवरून तर येणार नाहीत. बेहदच्या बाबांचा पार्ट आहे शिकविण्याचा.
स्वतःचा परिचय देतात. दुनियेला तर माहित सुद्धा नाही आहे. गातात देखील - ‘बाबा
ज्ञानाचे सागर आहेत’. श्रीकृष्णासाठी असे म्हणत नाहीत - ज्ञानाचा सागर आहे. हे
लक्ष्मी-नारायण ज्ञानसागर आहेत का? नाही. हेच आश्चर्य आहे, आपण ब्राह्मणच श्रीमतावर
हे ज्ञान ऐकवतो. तुम्ही समजावून सांगता यावरून आम्ही ब्राह्मणच प्रजापिता ब्रह्माची
संतान आहोत. अनेक वेळा बनलो होतो, पुन्हा होणार. मनुष्यांना जेव्हा समजेल तेव्हा
मानतील. तुम्ही जाणता कल्प-कल्प आपण प्रजापिता ब्रह्माची संतान ॲडॉप्टेड (दत्तक)
मुले बनतो. जे समजतात ते निश्चय बुद्धी देखील होतात. ब्राह्मण बनल्याशिवाय देवता कसे
बनणार. प्रत्येकाच्या बुद्धीवर अवलंबून आहे. शाळेमध्ये असे होते - कुणी तर
स्कॉलरशिप घेतात, कोणी नापास होतात. परत नव्याने शिकावे लागते. बाबा म्हणतात -
विकारामध्ये गेलात तर केलेली कमाई वाया जाईल, मग बुद्धीमध्ये बसणार नाही. आतमध्ये
खात राहील.
तुम्ही समजता या
जन्मामध्ये जी पापे केलेली आहेत, ती तर सर्वांना माहित आहेत. बाकी आधीच्या
जन्मांमध्ये काय केले त्याची आठवण नाहीये. पापे केलेली आहेत जरूर. जे पुण्य आत्मा
होते तेच परत मग पाप-आत्मा बनतात. हिशोब बाबा बसून समजावून सांगतात. अशी बरीच मुले
आहेत, विसरून जातात, अभ्यास करत नाहीत. जर नीट शिकतील तर जरूर शिकवतील देखील. कोणी
मंदबुद्धी वाले, चाणाक्ष बुद्धीचे बनतात, किती श्रेष्ठ शिक्षण आहे. या बाबांच्या
शिक्षणानेच सूर्यवंशी-चंद्रवंशी घराणे बनणार आहे. ते (दुनियावाले) याच जन्मामध्ये
शिकतात आणि पद मिळवितात. तुम्ही जाणता या शिक्षणाचे पद आपल्याला मग नवीन दुनियेमध्ये
मिळणार आहे. ते काही दूर नाही आहे. ज्याप्रमाणे कपडे बदलतात अगदी तसेच या जुन्या
दुनियेला सोडून नवीन दुनियेमध्ये जायचे आहे. विनाश देखील होणार जरूर. आत्ता तुम्ही
नवीन दुनियेचे बनत आहात. मग हा जुना चोला (देहरुपी वस्त्र) सोडून जायचे आहे.
नंबरवार राजधानी स्थापन होत आहे, जे चांगल्या रीतीने शिकतील तेच आधी स्वर्गामध्ये
येतील. बाकीचे मागून येतील. स्वर्गामध्ये थोडेच येऊ शकतील. स्वर्गामध्ये जे दास-दासी
असतील ते देखील बाबांच्या हृदयासिन असतील. असे नाही की सगळेच येतील. आता रूहानी
कॉलेज इत्यादी उघडत जातात, सर्वजण येऊन पुरुषार्थ करतील. जे अभ्यासामध्ये चांगले
प्राविण्य मिळवतील, ते उच्च पद प्राप्त करतील. मंद-बुद्धीवाले कमी दर्जाचे पद
प्राप्त करतील. असे होऊ शकते, पुढे चालून मंद-बुद्धीवाले सुद्धा चांगला पुरुषार्थ
करू लागतील. कोणी चाणाक्ष बुद्धी वाले खाली देखील जातात (पतन सुद्धा होते).
पुरुषार्थावरूनच समजून येते. हा सर्व ड्रामा चालू आहे. आत्मा शरीर धारण करून इथे
पार्ट बजावते, नवीन चोला (शरीररुपी वस्त्र) धारण करून नवीन पार्ट बजावते. कधी काय,
कधी काय बनते. संस्कार आत्म्यामध्ये असतात. बाहेरच्यांकडे ज्ञान जरा देखील कोणाकडे
नाही आहे. बाबा जेव्हा येऊन शिकवतील तेव्हाच ज्ञान मिळेल. टीचरच नाही तर ज्ञान
कुठून येणार. ते आहेत भक्त. भक्तीमध्ये अपार दुःख आहे, मीराला भले साक्षात्कार झाला
परंतु सुख थोडेच होते. ती काय कधी आजारी पडली नसेल. तिथे (सतयुगामध्ये) तर कोणत्याही
प्रकारच्या दुःखाची गोष्ट असतच नाही. इथे अपार दुःख आहे, तिथे अपार सुख आहे. इथे
सर्व दुःखी होतात, राजांना देखील दुःख आहे ना, नावच आहे दुःखधाम. ते आहे सुखधाम.
संपूर्ण दुःख आणि संपूर्ण सुखाचे हे आहे संगमयुग. सतयुगामध्ये संपूर्ण सुख,
कलियुगामध्ये संपूर्ण दुःख. दुःखाचे जे अनेक प्रकार आहेत त्या सर्वांची वृद्धी होत
राहते. पुढे चालून किती दुःख होत राहील. आता दुःखाचे डोंगर कोसळतील.
ते लोक तर तुम्हाला
भाषण करण्यासाठी खूप कमी वेळ देतात. दोन मिनिटे दिली तरी देखील समजावून सांगा,
सतयुगामध्ये अपार सुख होते जे बाबा देतात. रावणाकडून अपार दुःख मिळते. आता बाबा
म्हणतात काम विकारावर विजय प्राप्त करा तर जगतजीत बनाल. या ज्ञानाचा विनाश होत नाही.
थोडे जरी ऐकले तरी स्वर्गामध्ये येणार. प्रजा तर पुष्कळ बनते. कुठे राजा, कुठे रंक.
प्रत्येकाची बुद्धी आपली-आपली आहे. जे समजून घेऊन इतरांना समजावून सांगतात, तेच
चांगले पद मिळवतात. ही शाळा देखील सर्वात वेगळी आहे. भगवान येऊन शिकवतात. श्रीकृष्ण
तर तरीही दैवी गुणवाला देवता आहे. बाबा म्हणतात - ‘मी दैवी गुण आणि आसुरी
गुणांपासून वेगळा आहे’. मी तुमचा पिता शिकविण्यासाठी येतो. रूहानी नॉलेज सुप्रीम
रूहच देतात. गीतेचे ज्ञान कुणी देहधारी मनुष्य अथवा देवतांनी दिलेले नाहीये. विष्णू
देवता नमः म्हणतात, तर कृष्ण कोण? देवता कृष्ण तोच विष्णू आहे - हे कोणी जाणत नाही.
तुमच्यातील देखील विसरून जातात. स्वतःला पूर्णपणे समजलेले असेल तर इतरांना देखील
समजावून सांगतील. सेवा करून पुरावा घेऊन यावा तेव्हा समजणार की सेवा केली; म्हणूनच
बाबा म्हणतात - लांबलचक समाचार लिहू नका, ‘तो अमका येणार आहे, असे सांगून निघून गेला
आहे…’. हे लिहिण्याची आवश्यकता नाही. कमी लिहायचे असते. तुम्ही आधी बघा की, आला आणि
मग स्थिरावतो का? समजून घेईल आणि सेवा करू लागेल तेव्हा मग समाचार लिहा. काहीजण आपला
दिखावा खूप करतात. बाबांना प्रत्येक गोष्टीचा रिझल्ट पाहिजे. असे तर बाबांकडे
पुष्कळ येतात, नंतर मग निघून जातात, त्यांचा काय उपयोग. त्यांचे बाबा काय करणार. ना
त्यांना फायदा, ना तुम्हाला. तुमच्या मिशनची (कार्याची) वृद्धी काही झाली नाही.
अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) कोणत्याही
गोष्टीमध्ये लाचार व्हायचे नाही. स्वतःमध्ये ज्ञान धारण करून दान करायचे आहे.
इतरांचेही भाग्य बनवायचे आहे.
२) कोणाशीही बोलत
असताना स्वतःला आत्मा समजून आत्म्यासोबत बोलायचे आहे. जरा सुद्धा देह-अभिमान येऊ नये.
बाबांकडून जे अपार सुख मिळाले आहे, ते दुसऱ्यांना वाटायचे आहे.
वरदान:-
मन आणि बुद्धी
दोन्हीच्या बॅलन्सद्वारे सेवा करणारे सदा सफलता मूर्त भव
काही वेळा मुले
सेवेमध्ये फक्त बुद्धीचा वापर करतात परंतु मन आणि बुद्धी दोन्हीला मिळून सेवा कराल
तर सेवेमध्ये सफलतामूर्त बनाल. जे फक्त बुद्धीने काम करतात त्यांना बुद्धीमध्ये थोडा
वेळ बाबांची आठवण राहते की, ‘होय, बाबाच करणारे आहेत’; परंतु काही वेळानंतर पुन्हा
तोच ‘मी’पणा येईल. आणि जे मनापासून करतात त्यांच्या मनामध्ये बाबांची आठवण सदैव
राहते. फळ मिळतेच मुळी मनापासून सेवा केल्याचे. आणि जर दोन्हीचा बॅलन्स असेल तर सदा
सफलता आहे.
बोधवाक्य:-
बेहदमध्ये रहा
तर हदच्या गोष्टी स्वतः संपून जातील.