18-07-2026      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो, या जुन्या दुनियेमध्ये मनुष्य ज्या प्रकारच्या इच्छा ठेवतात, त्या इच्छा तुम्हाला ठेवायच्या नाहीत, कारण ही दुनिया आता नष्ट होणार आहे”

प्रश्न:-
संगमयुगावर कोणती इच्छा ठेवाल तर सर्व इच्छा कायमच्या पूर्ण होतील?

उत्तर:-
‘आपण पावन बनावे, बाबांची आठवण करावी आणि त्यांच्याकडून पूर्ण वारसा प्राप्त करून घ्यावा’ - फक्त हीच एकमेव इच्छा असावी. या इच्छेने कायमसाठी सर्व इच्छा पूर्ण होतील. आयुष्मान भव, पुत्रवान भव, धनवान भव... सर्व वरदाने मिळतील. सतयुगामध्ये सर्व कामना पूर्ण होतील.

गीत:-
तुम्हीं हो माता, तुम्हीं पिता हो...

ओम शांती।
गोड-गोड रुहानी मुलांप्रती अर्थात आत्म्यांप्रती परमपिता परमात्मा हे समजावून सांगत आहेत. तुम्ही जाणता, बेहदचे बाबा आपल्याला वरदान देत आहेत. ते लोक आशीर्वाद देतात - पुत्रवान भव, आयुष्मान भव, धनवान भव. आता बाबा तुम्हाला वरदान देतात - आयुष्मान भव. तुमचे आयुष्य खूप दीर्घ असेल. तिथे तुम्हाला मुलगा जरी झाला तर तो देखील सुख देणारा असेल. इथे जी काही मुले आहेत, ती दुःख देणारी आहेत. सतयुगामध्ये जी मुले असतील, ती सुख देणारी असतील. आता तुम्ही मुले जाणता, बेहदचे बाबा बेहद सुखाचा वारसा देत आहेत. खरोखर, आपण आयुष्मान, धनवान सुद्धा बनणार आहोत. आता कोणतीही इच्छा मनामध्ये ठेवायची नाही. तुमच्या सर्व इच्छा सतयुगामध्ये पूर्ण होणार आहेत. या नरकामध्ये कोणतीही इच्छा ठेवायची नाही. धनाची देखील इच्छा ठेवू नका. खूप धन असावे, मोठी नोकरी मिळावी - ही देखील जास्त आशा ठेवायची नाही. पोट तर अर्धा तुकडा भाकरी खाते, अतिलोभ ठेवायचा नाही. जास्त धन असेल तर ते शेवटी नष्टच होणार आहे. मुले जाणतात, बाबा आपल्याला स्वर्गाचा मालक बनवत आहेत. आता बाबा म्हणतात - ‘दे दान तर सुटेल ग्रहण’. कोणते दान द्यायचे? हे ५ विकार आहेत. हे दान करायचे आहेत, तेव्हाच ग्रहचारी सुटेल आणि तुम्ही १६ कला संपूर्ण बनाल. तुम्ही जाणता, आपल्याला सर्वगुण संपन्न, १६ कला संपूर्ण... इथेच बनायचे आहे. ५ विकारांचे दान द्यावे लागते. बाबा मुलांना सांगतात - ‘गोड मुलांनो, बेहदच्या बाबांकडून बेहदचा वारसा घेण्या व्यतिरिक्त इतर कोणतीही आशा बाळगू नका. आता फार थोडा वेळ उरला आहे; गायले देखील जाते - ‘बहुत गई थोड़ी रही’. या विनाशासाठी फारच थोडा वेळ बाकी आहे, म्हणून या जुन्या दुनियेविषयी कोणतीही इच्छा ठेवू नका. फक्त बाबांची आठवण करत रहा. आठवणी द्वारेच मुलांना सतोप्रधान बनायचे आहे. या दुनियेमध्ये मनुष्य ज्या इच्छा बाळगतात, त्या कोणत्याही इच्छा तुम्ही बाळगू नका. फक्त हीच एक इच्छा बाळगायची आहे की, आपल्याला शिवबाबांकडून स्वर्गाचा वारसा प्राप्त करायचा आहे. कधीही कोणाला दुःख द्यायचे नाही. एकमेकांवर काम कटारी चालवणे - हे सर्वात मोठे दुःख देणे आहे, म्हणून संन्यासी लोक पत्नी पासून वेगळे होतात. म्हणतात, यांनी संसाराचा त्याग केला आहे. यावेळी रावण राज्यामध्ये सर्व पतित, पाप-आत्मे आहेत.

आता वेळ खूप कमी आहे. तुम्ही जर बाबांच्या श्रीमता वर चालणार नाही तर श्रेष्ठ बनणार नाही. मुलांना उच्च ते उच्च बनायचे आहे आणि म्हणूनच ५ विकारांचे दान द्यायचे आहे, तर हे ग्रहण सुटेल. सर्वांवर ग्रहचारी बसली आहे, अगदीच काळे बनले आहेत. बाबा म्हणतात - जर माझ्याकडून वारसा घ्यायचा असेल तर पावन बना. द्वापरपासून तुम्ही पतित बनत-बनत सतोप्रधानापासून तमोप्रधान बनले आहात, तेव्हाच तर गाता - ‘पतित-पावन या, येऊन आम्हाला पावन बनवा’. तर बाबा आदेश देत आहेत - ‘मुलांनो, आता पतित बनू नका. काम महाशत्रूवर विजय मिळवा, याच्यामुळेच तुम्ही आदि-मध्य-अंत दुःख झेलले आहे. बाबा म्हणतात - तुम्ही स्वर्गामध्ये संपूर्ण पवित्र होता. आता रावणाच्या मतावर तुम्ही पतित बनला आहात, तेव्हाच तर देवतांसमोर जाऊन त्यांची महिमा गाता की तुम्ही सर्वगुण संपन्न, संपूर्ण निर्विकारी आहात आणि आम्ही विकारी आहोत. निर्विकारी असल्याने सुखच सुख आहे. बाबा म्हणतात - ‘आता मी आलो आहे तुम्हा मुलांना निर्विकारी बनविण्याकरिता. आता तुम्हा मुलांना सर्व आकांक्षा सोडून द्यायच्या आहेत. आपला कामधंदा इत्यादी भले करा. आणि एकमेकांना ज्ञान अमृत पाजा. गायले देखील जाते - ‘अमृत छोड़ विष काहे को खाए’. बाबा म्हणतात, कोणतीही इच्छा ठेवू नका. आपण आठवणीच्या यात्रेद्वारे संपूर्ण सतोप्रधान बनणार आहोत. ६३ जन्मांमध्ये जी पापे केली आहेत, ती आठवणीनेच नष्ट होतील. आता निर्विकारी बनायचे आहे. भले मायेची वादळे येतील, परंतु पतित बनायचे नाही. मनुष्यापासून देवता बनायचे आहे. तुम्हीच सतोप्रधान पूज्य देवता होता, मग तुम्हीच पूज्य पासून पुजारी बनता. आपण निरोगी होतो, नंतर मग रोगी बनतो, आता पुन्हा निरोगी बनत आहोत. जेव्हा निरोगी होतो तेव्हा दीर्घायुष्य होते. आता तर बघा, बसल्या-बसल्या मनुष्य मरतात. तर कोणतीही आकांक्षा ठेवायची नाही. या सर्व छी-छी (घाणेरड्या) इच्छा आहेत. काट्यापासून फूल बनण्यासाठी तर एकच फर्स्टक्लास इच्छा आहे - बाबा म्हणतात, माझी आठवण करा तर तुम्ही पुण्य-आत्मा बनाल. यावेळी सर्वांवर राहूचे ग्रहण आहे. साऱ्या भारतावर राहूचे ग्रहण आहे. आता खरेतर बृहस्पतीची दशा पाहिजे. तुम्ही जाणता, आता आपल्यावर बृहस्पतीची दशा बसली आहे. भारत स्वर्ग होता ना. सतयुगामध्ये तुमच्यावर बृहस्पतीची दशा होती. यावेळी आहे राहूची दशा. आता पुन्हा बेहदच्या बाबांकडून बृहस्पतीची दशा मिळत आहे. बृहस्पतीच्या दशेमध्ये २१ जन्मांचे सुख असते. त्रेतामध्ये आहे शुक्राची दशा. जितकी जे आठवण करतील, खूप आठवण करतील तर बृहस्पतीची दशा प्राप्त होईल. हे देखील समजावून सांगितले आहे की, आता सर्वांना परत घरी जायचे आहे म्हणून बाबांची आठवण करत राहा, तर विकर्म विनाश होतील आणि तुम्ही उडण्यालायक बनाल. मायेने तुमचे पंख कापून टाकले आहेत.

आता तुम्हाला मिळत आहे - ईश्वरीय मत, ज्याद्वारे तुम्ही कायमचे सुखी बनता. ईश्वरीय मतावर तुम्ही स्वर्गाचे मालक बनता. विश्वाची बादशाही घेत आहात. ईश्वरीय मत मिळत आहे की, बाबांची आठवण करा तर अंत मती सो गती होईल. आठवणीद्वारेच विकर्म विनाश होतील, पवित्र बनाल. पवित्र आत्माच स्वर्गाच्या लायक बनेल. तिथे तुमचे शरीर देखील निरोगी असेल, दीर्घायुषी देखील असाल. धन देखील भरपूर असेल. तिथे कधी दत्तक पुत्र घेत नाहीत. बाबा म्हणतात - आयुष्मान भव, संपत्तीवान भव. एक पुत्र देखील जरूर असेल. यावेळी बाबा सर्वांना दत्तक पुत्र बनवतात. तर मग सतयुगामध्ये कोणीही दत्तक पुत्र नसतो. योगबलाद्वारे एक मुलगा, एक मुलगी असते. विचारतात - ‘तिथे मुले कशी जन्माला येतील?’ तिथे आहेच मुळी योगबल’. ड्रामामध्ये नोंदलेले आहे. सतयुगामध्ये सर्व योगी आहेत. श्रीकृष्णाला योगेश्वर म्हटले जाते. असे नाही की श्रीकृष्ण ‘योग’मध्ये (बाबांच्या आठवणीमध्ये) राहतात’. ते तर पूर्णता: पवित्र योगी आहेत. ईश्वराने सर्वांना योगेश्वर बनवले आहे, तर भविष्यामध्ये योगीच राहतात. बाबांनी योगी बनवले आहे. योगीचे आयुष्य जास्त राहते. भोगीचे आयुष्य कमी असते. ईश्वराने मुलांना पवित्र बनवून, योग शिकवून देवता बनवले आहे, याला म्हटले जाते - योगी. योगी किंवा ऋषी पवित्र असतात. तुम्हाला सांगितले आहे - तुम्ही राजऋषी आहात. राजाई पद प्राप्त करण्यासाठी राजयोग शिकत आहात. यावेळी बाबांची आठवण करायची आहे, इथे कोणतीही विपरीत इच्छा बाळगायची नाही की, अपत्याची प्राप्ती व्हावी. मग विकारामध्ये जावे लागेल ना, काम कटारी चालवावी लागेल. देह-अभिमानी काम कटारी चालवतात. देही-अभिमानी काम कटारी चालवत नाहीत. बाबा समजावून सांगतात - पवित्र बना. आत्म्यांशी बोलतात, आता ही काम कटारी चालवू नका. पवित्र बना तर तुमची सर्व दुःखे दूर होतील. तुम्हाला स्वर्गाचा मालक बनवतात. बाबा किती सुख देतात. बाबांकडून तर पूर्ण वारसा घेतला पाहिजे.

बाबा तर गरीब निवाज आहेत. गायले देखील जाते, सुदाम्याने दोन मूठभर पोहे दिले तर त्याला महाल मिळाले. बाबा २१ जन्मांकरिता वारसा देतात. हे देखील तुम्ही समजता - आता सर्वांना परत जायचे आहे. शिवबाबांच्या स्थापनेच्या कार्यामध्ये जो जितकी मदत करेल. घरामध्ये युनिव्हर्सिटी अथवा हॉस्पिटल उघडा. बोर्डवर लिहा - बंधू आणि भगिनींनो, २१ जन्मांसाठी एव्हरहेल्दी आणि वेल्दी बनायचे असेल तर येऊन समजून घ्या. आम्ही एका सेकंदामध्ये एव्हरहेल्दी, वेल्दी बनण्याचा मार्ग सांगतो. तुम्ही सर्जन आहात ना. सर्जन बोर्ड तर जरूर लावतात, नाहीतर लोकांना कळणार तरी कसे. तुम्ही देखील आपल्या घरा बाहेर बोर्ड लावा. कोणीही आले तर त्याला दोन पित्यांचे रहस्य समजावून सांगा. हदच्या पित्याकडून हदचा वारसा घेत आले आहात. बेहदचे बाबा सांगतात - ‘मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर बेहदचा वारसा मिळेल’. प्रोजेक्टर, प्रदर्शनीमध्ये सर्वप्रथम हे समजावून सांगा. या पुरुषार्थाने तुम्ही असे बनाल. आता आहे संगम. कलियुग परिवर्तित होऊन सतयुग बनणार आहे. तुम्ही भारतवासी सतोप्रधान होता, आता तमोप्रधान बनला आहात. आता बाबा सांगत आहेत - ‘माझी आठवण करा तर तुम्ही स्वर्गाचे मालक बनाल’. दोनच शब्द आहेत. अल्फची आठवण करा तर बे बादशाही तुमची. या आठवणीने आनंदामध्ये राहाल, या छी-छी (पतित) दुनियेमध्ये कोणत्याही प्रकारची आशा बाळगू नका. इथे तुम्ही पुरुषार्थ करता - जिवंतपणी मरण्याकरिता. ते तर मृत्यू झाल्यानंतर म्हणतात - स्वर्गवासी झाला. तुम्ही सर्वांना सांगता - आम्ही स्वर्गवासी बनण्याकरिता बाबांची आठवण करतो. त्यांच्याकडून बेहदचे सुख मिळते. बाबांची आठवण केल्याने तुम्ही कधी रडणार अथवा छाती बडवणार नाही. मायेची वादळे येतात, त्याचा विचार करू नका. मायेची वादळे तर येतील. हे युद्ध आहे. संकल्प-विकल्प येतात, तर फुकटचा वेळ वाया जातो. वादळ तर निघून जाईल, कायम थोडेच राहील. पहाटे उठून बाबांची आठवण करायची आहे, बाबांकडून वारसा घ्यायचा आहे. हा आतून ध्यास लागून रहावा. बाबा अजून कोणता त्रास देत नाहीत. फक्त बाबांची आठवण करायची आहे. बाकी सर्वांना विसरून जा, हे सर्व मेलेले आहेत. आपसात याच गोष्टी करत राहा. बाबा, आता तर फक्त तुमचीच आठवण करू. तुमच्याकडून स्वर्गाचा वारसा घेऊ. वेळ ठरवा, आम्ही ३-४ वाजता जरूर उठून बाबांची आठवण करू. चक्र देखील लक्षात ठेवायचे आहे. बाबांनी आपल्याला रचयिता आणि रचनेचे नॉलेज दिले आहे. आपण या मनुष्य सृष्टीच्या झाडाला जाणतो. आपण २१ जन्म कसे घेतो - हे बुद्धीमध्ये आहे. आता पुन्हा आपण घरी जात आहोत, मग परत येऊन स्वर्गामध्ये पार्ट बजावणार. आपण आत्मा आहोत, आत्म्यालाच राज्य मिळते. बाबांची आठवण केल्याने वारशाचे हक्कदार बनतो. हा राजयोग आहे. बाबांची आठवण करतो. बेहदच्या बाबांद्वारे अनेकदा विश्वाचे मालक बनलो आहोत, मग नरकवासी बनलो आहोत. आता पुन्हा स्वर्गवासी बनतो - एका बाबांच्या आठवणीद्वारे. बाबांच्या आठवणीनेच पापे भस्म होतील म्हणून याला योग-अग्नी म्हटले जाते.

तुम्ही ब्राह्मण आहात - राजऋषी. ऋषी नेहमी पवित्र असतात, बाबांची आठवण करतात आणि राजाईचा वारसा घेतात. आता थोडीच विकारासाठी इच्छा ठेवायची आहे! ही छी-छी (अशुद्ध) इच्छा आहे. आता तर पारलौकिक बाबांकडून वारसा घ्यायचा आहे. आजारी असतानाही आठवण करू शकता. बाबांना देखील मुले प्रिय असतात. बाबांना अनेक मुलांना पत्र इत्यादी लिहावी लागतात. शिवबाबा लिहून घेतात. तुम्ही देखील पत्र लिहिता - ‘शिवबाबा केअर ऑफ ब्रह्मा’. आपण सर्व शिवबाबांची मुले ब्रदर्स आहोत. रुहानी बाबा येऊन आम्हाला पावन बनवत आहेत, म्हणून म्हटले जाते - ‘पतित-पावन’. सर्व आत्म्यांना पावन बनवतात. कोणालाही सोडत नाही, प्रकृती देखील पावन बनते. तुम्ही जाणता, सतयुगामध्ये प्रकृती देखील पावन असेल. आता शरीर देखील पतित आहे, तेव्हाच तर गंगेमध्ये शरीर धुवायला जातात, परंतु आत्मा काही पावन बनत नाही. ती तर होईल योग-अग्नीने. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) या कलियुगी दुनियेमध्ये कोणतीही विपरीत इच्छा ठेवायची नाही. संपूर्ण सतोप्रधान बनण्यासाठी ईश्वरीय मतावर चालायचे आहे.

२) पावन बनून परत घरी जायचे आहे, हीच एक इच्छा ठेवायची आहे. अंत मति सो गति. मायेच्या वादळांमध्ये वेळ वाया घालवायचा नाही.

वरदान:-
नेहमी शक्तिशाली वृत्तीद्वारे बेहदच्या सेवेमध्ये तत्पर राहणारे हदच्या गोष्टींपासून मुक्त भव

जसे साकार बाबांना सेवेशिवाय दुसरे काहीही दिसत नव्हते, तसेच तुम्ही मुले देखील आपल्या शक्तिशाली वृत्तीद्वारे बेहदच्या सेवेवर सदैव तत्पर राहा, म्हणजे मग हदच्या गोष्टी आपोआपच नष्ट होतील. हदच्या गोष्टींमध्ये वेळ देणे - हा देखील बाहुल्यांचा खेळ आहे, ज्यामध्ये वेळ आणि एनर्जी वाया जाते, म्हणूनच अशा छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आपला वेळ अथवा जमा केलेल्या शक्ती व्यर्थ (वाया) घालवू नका.

बोधवाक्य:-
सेवेमध्ये सफलता प्राप्त करायची असेल तर बोल, व्यवहार आणि आचरण प्रभावशाली असावे.

हे अव्यक्त इशारे - ज्वालास्वरूप स्थितीमध्ये राहून शक्तिशाली आठवणीचा अनुभव करा.

समयानुसार आता सर्व ब्राह्मण आत्म्यांना जवळ आणत ज्वाला स्वरूपाचे वायुमंडळ बनविण्याची सेवा करा, त्यासाठी भले भट्ट्या करा अथवा आपसामध्ये संघटित होऊन रुहरिहान करा, परंतु ज्वाला स्वरूपाचा अनुभव करा आणि करवून घ्या. या सेवेमध्ये बिझी राहा, म्हणजे मग छोट्या-छोट्या गोष्टी आपोआप परिवर्तित होतील.