18-09-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - जेव्हा तुम्ही फूल बनाल, तेव्हा हा भारत काट्यांच्या जंगलापासून फुलांचा
बगीचा बनेल, बाबा आले आहेत तुम्हाला फूल बनविण्यासाठी”
प्रश्न:-
मंदिर लायक
बनण्यासाठी कोणत्या गोष्टींवर विशेष लक्ष द्यायचे आहे?
उत्तर:-
मंदिर लायक बनायचे असेल तर आपल्या आचरणाकडे विशेष लक्ष द्या - आचरण अतिशय मधुर आणि
रॉयल असले पाहिजे. इतका गोडवा असावा ज्याची इतरांनाही जाणीव व्हावी. अनेकांना
बाबांचा परिचय द्या. स्वतःचे कल्याण करण्यासाठी चांगल्यारितीने पुरुषार्थ करून
सेवेमध्ये मग्न रहा.
गीत:-
बदल जाए दुनिया
न बदलेंगे हम…
ओम शांती।
रुहानी मुले जाणतात की बाबा ब्रह्माद्वारे समजावून सांगत आहेत. ब्रह्माच्या
रथाद्वारेच समजावून सांगत राहतात. आम्ही अशी प्रतिज्ञा करतो की श्रीमतावर आम्ही या
भारत भूमीला पतितापासून पावन बनवू. भारत खास आणि दुनिया आम, सर्वांना आम्ही
पतितापासून पावन बनण्याचा रस्ता सांगतो. इतका विचार प्रत्येकाला आपल्या बुद्धीमध्ये
ठेवायचा आहे. बाबा म्हणतात - ड्रामा अनुसार जेव्हा तुम्ही फूल बनाल आणि जेव्हा वेळ
येईल तर संपूर्ण बगीचा बनेल. बागवान देखील निराकाराला म्हटले जाते, माळी देखील
निराकाराला म्हटले जाते, साकारला नाही. माळी देखील एक आत्मा आहे, शरीर नाही. बागवान
(बागेचा मालक) देखील आत्मा आहे. बाबा सांगतील तर जरूर शरीराद्वारेच ना. शरीरासोबत
असतानाच त्यांना माळी बागवान (फुलांची बाग बनविणारा माळी) म्हटले जाते, जे या
विश्वाला फुलांचा बगीचा बनवतात. बगीचा होता जिथे हे देवता राहत होते. तिथे कोणते
दुःखच नव्हते. इथे या काट्यांच्या जंगलामध्ये तर दुःख आहे, रावणाचे राज्य आहे,
काट्यांचे जंगल आहे. ताबडतोब काही कोणी फूल बनत नाही. देवतांसमोर जाऊन गातात देखील
की, आम्ही जन्म-जन्मांतरीचे पापी आहोत, अजामिल आहोत. अशी प्रार्थना करतात, आता येऊन
आम्हाला पुण्य आत्मा बनवा. समजतात आता आम्ही पाप आत्मा आहोत. कधी काळी पुण्य आत्मा
होतो. आता या दुनियेमध्ये पुण्य आत्म्यांची फक्त चित्रे राहिलेली आहेत. राजधानीच्या
प्रमुखांची (लक्ष्मी-नारायणाची) चित्रे आहेत आणि त्यांना असे बनविणारे आहेत -
निराकार शिव. त्यांचे चित्र आहे, बस्स. अजून कोणते चित्र नाहीये. यामध्ये देखील
शिवाचे तर मोठे लिंग बनवतात. म्हणतात देखील की आत्मा ताऱ्या प्रमाणे आहे, तर जरूर
बाबा देखील असेच असतील ना. परंतु त्यांची पूर्ण ओळख नाही आहे. या लक्ष्मी-नारायणाचे
विश्वामध्ये राज्य होते ना. यांच्याबद्दल कुठेही कोणी निंदात्मक गोष्ट लिहीत नाही.
बाकी श्रीकृष्णाला कधी द्वापर मध्ये, कधी कुठे घेऊन जातात. लक्ष्मी-नारायणासाठी
सर्वजण म्हणतील स्वर्गाचे मालक होते. हे आहे तुमचे एम ऑब्जेक्ट. राधे-कृष्ण कोण
आहेत - मनुष्य बिचारे एकदम गोंधळून गेले आहेत, काहीच समजत नाहीत. ज्यांना
बाबांद्वारे समजते, ते मग इतरांना समजावून सांगण्यासाठी लायक देखील बनतात. नाहीतर
लायक बनू शकत नाहीत. दैवीगुण धारण करू शकत नाहीत. भले कितीही समजावून सांगा. परंतु
ड्रामा अनुसार असे होणारच आहे. तुम्ही आता स्वतः समजता आपण सर्व मुले बाबांच्या
श्रीमतावर भारताची रुहानी सेवा करत आहोत आपल्याच तन-मन-धनाने. प्रदर्शनी अथवा
म्युझियम इत्यादीमध्ये विचारतात की, तुम्ही भारताची काय सेवा करता? तुम्ही जाणता
आम्ही भारताची खूप चांगली सेवा करत आहोत, जंगलापासून बगीचा बनवत आहोत. सतयुग आहे
गार्डन. हे आहे काट्यांचे जंगल. एकमेकांना दुःख देत राहतात. हे तुम्ही चांगल्या
प्रकारे समजावून सांगू शकता. लक्ष्मी-नारायणाचे चित्र देखील खूप चांगले बनवले पाहिजे.
मंदिरांमध्ये अतिशय सुंदर चित्रे बनवतात. कुठे गोरे, कुठे सावळे चित्र बनवतात,
त्यांचे काय रहस्य आहे, हे देखील समजत नाहीत. तुम्हा मुलांना आता हे सर्व ज्ञान आहे.
बाबा म्हणतात - मी येऊन सर्वांना मंदिर लायक बनवतो, परंतु सर्वजण मंदिर लायक बनत
नाहीत. प्रजेला तर मंदिर लायक म्हणणार नाहीत ना. प्रजा त्यांची असेल जे पुरुषार्थ
करून खूप सेवा करतात.
तुम्हा मुलांना रुहानी
सोशल सर्विस (आत्मिक समाज सेवा) देखील करायची आहे, या सेवेमध्ये आपले जीवन सफल
करायचे आहे. वर्तन देखील अतिशय गोड आणि सुंदर असले पाहिजे, जेणेकरून इतरांना देखील
गोडव्याने सांगू शकाल. स्वतःच जर काटा असेल तर कोणाला फूल कसे बनवणार, त्याचा पूर्ण
तिर लागणार नाही. बाबांची आठवण करत नसतील तर तिर कसा लागणार. स्वतःच्या कल्याणासाठी
चांगल्याप्रकारे पुरुषार्थ करून सेवेमध्ये व्यस्त रहा. बाबा देखील सेवेवर आहेत ना.
तुम्ही मुले देखील दिवस-रात्र सेवेवर रहा.
दुसरी गोष्ट, स्पष्ट
करत आहेत की, शिवजयंतीला बरीच मुले तारा (टेलिग्राम) पाठवतात, त्यामध्ये देखील असे
लिखाण लिहिले पाहिजे जेणेकरून त्या तारा कोणालाही दाखवल्या तर समजतील. पुढच्यावेळी
काय करायचे आहे, त्याचा पुरुषार्थ केला जातो. सेमिनार देखील त्यासाठी करतात की
काय-काय सेवा करावी जेणेकरून अनेकांना बाबांचा परिचय मिळावा. तारा पुष्कळ ठेवल्या
आहेत, याच्याद्वारे खूप काम करू शकता. पत्ता टाकतात - शिवबाबा केयर ऑफ ब्रह्मा.
प्रजापिता ब्रह्मा देखील आहेत, ते रुहानी पिता, ते जिस्मानी. त्यांच्याद्वारे
जिस्मानी रचना रचली जाते. बाबा आहेत मनुष्य सृष्टीचे रचता. कशी रचना रचतात, हे
दुनियाभरामध्ये कोणीही जाणत नाहीत. बाबा ब्रह्माद्वारे आता नवीन रचना रचत आहेत.
ब्राह्मण आहेत शेंडी. सर्वप्रथम ब्राह्मण जरूर हवेत. विराट रूपाची ही आहे शेंडी.
ब्राह्मण, देवता, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. अगोदर शूद्र तर असू शकत नाहीत. बाबा
ब्रह्माद्वारे ब्राह्मण रचतात, शूद्र कसे आणि कोणाद्वारे रचतील?
तुम्ही मुले जाणता
नवीन रचना कशी रचतात, हे ॲडॉप्शन आहे बाबांचे. कल्प-कल्प बाबा येऊन शूद्रापासून
ब्राह्मण बनवतात आणि मग ब्राह्मणा पासून देवता बनवतात. ब्राह्मणांची सेवा खूप उच्च
आहे. ते ब्राह्मण लोक स्वत:च पवित्र नाहीत तर दुसऱ्यांना तरी पवित्र कसे बनवतील.
कोणीही ब्राह्मण संन्याशांना कधी राखी बांधणार नाहीत. ते म्हणतील आम्ही तर आहोतच
पवित्र. तुम्ही स्वतःचे तोंड बघा. तुम्ही मुले देखील कोणाकडून राखी बांधून घेऊ शकत
नाही. दुनियेमध्ये तर सर्वजण एकमेकांना बांधतात. बहीण-भावाला बांधते, हा रिवाज आता
सुरु झाला आहे. आता तुम्ही शूद्रा पासून ब्राह्मण बनण्यासाठी पुरुषार्थ करता.
समजावून सांगावे लागते. मेल-फिमेल दोघेही पवित्रतेची प्रतिज्ञा करतात, दोघेही सांगू
शकतात की आम्ही कसे बाबांच्या श्रीमताने पवित्र राहतो. शेवटपर्यंत या कामविकारावर
विजय मिळवत रहाल तर पवित्र जगताचे मालक बनाल. पवित्र दुनिया सतयुगाला म्हटले जाते,
ती तर आता स्थापन होत आहे. तुम्ही सर्व पवित्र आहात. विकारामध्ये पडणाऱ्यांना राखी
बांधू शकता. प्रतिज्ञा करून पुन्हा जर पतित बनला आणि जर विचारले की, ‘तुम्ही राखी
बांधण्यासाठी आला होता मग काय झाले?’ तर म्हणतील - मायेसमोर हार खाल्ली, हे आहे
युद्धाचे मैदान. विकार फार मोठा शत्रू आहे. यावर विजय प्राप्त केल्यानेच जगतजीत
अर्थात राजा-राणी बनायचे आहे, प्रजेला जगतजीत म्हणणार नाही. मेहनत तर राजा-राणी
करतात ना. म्हणतात देखील आम्ही तर लक्ष्मी-नारायण बनणार. लक्ष्मी-नारायणानंतर
त्यांच्या तख्तावर विजय त्यांच्या मुलाचा होतो. ते लक्ष्मी-नारायण मग दुसऱ्या
जन्मामध्ये खाली जातील. वेगळ्या नावा-रूपाने मुलाला सिंहासन मिळते तर त्याचा उच्च
नंबर (वरचे पद) मानले जाईल. पुनर्जन्म तर घेतात ना. मुलगा तख्तावर बसेल तर तो
द्वितीय दर्जाचा होईल. वरचा खाली, खालचा वर येईल. तर आता मुलांना असे उच्च बनायचे
आहे तर सेवेमध्ये लागायचे आहे. पवित्र असणे देखील अत्यंत आवश्यक आहे. बाबा म्हणतात
- मी पवित्र दुनिया बनवतो. चांगला पुरुषार्थ थोडेजण करतात, पवित्र तर सर्व दुनिया
बनते. तुमच्यासाठी स्वर्गाची स्थापना करतात. हे ड्रामा अनुसार होणारच आहे, हा खेळ
बनलेला आहे. तुम्ही पवित्र बनता नंतर मग विनाश सुरु होतो. सतयुगाची स्थापना होते.
ड्रामाला तर तुम्ही समजू शकता. सतयुगामध्ये होते देवतांचे राज्य. आता नाही आहे
पुन्हा होणार आहे.
तुम्ही आहात रुहानी
मिलेट्री. तुम्ही ५ विकारांवर विजय प्राप्त केल्याने जगतजीत बनणार आहात.
जन्म-जन्मांतरीची पापे नष्ट होण्याकरिता बाबा युक्त्या सांगतात. बाबा एकदाच येऊन
युक्ती सांगतात. जोपर्यंत राजधानी स्थापन होत नाही तोपर्यंत विनाश होणार नाही.
तुम्ही अतिशय गुप्त योद्धे आहात. सतयुग होणारच आहे कलियुगा नंतर. सतयुगामध्ये मग कधी
युद्ध होत नाही. तुम्ही मुले जाणता. सर्व आत्मे जो काही पार्ट बजावतात, तो सर्व
नोंदलेला आहे. जशा कठपुतळ्या असतात ना, अशा नाचत राहतात. हा देखील ड्रामा आहे,
प्रत्येकाचा या ड्रामामध्ये पार्ट आहे. पार्ट बजावता-बजावता तुम्ही तमोप्रधान बनले
आहात. मग आता वर जाता, सतोप्रधान बनता. नॉलेज तर सेकंदाचे आहे. सतोप्रधान बनतात आणि
मग घसरत-घसरत तमोप्रधान बनतात. मग बाबा वर घेऊन जातात. खरेतर त्या मासोळ्या
तारेमध्ये लटकत असतात, या तारेमध्ये मनुष्यांना घातले पाहिजे. अशाप्रकारे उतरती कला
मग चढती कला होते. तुम्ही देखील असे चढता आणि मग उतरत-उतरत खाली येता. ५ हजार वर्षे
लागतात वर जाऊन परत उतरण्यामध्ये. हे ८४ चे चक्र तुमच्या बुद्धीमध्ये आहे. उतरती कला
आणि चढती कला याचे रहस्य बाबांनीच समजावून सांगितले आहे. तुमच्यातही नंबरवार जाणतात
आणि मग पुरुषार्थ करतात, जे बाबांची आठवण करतात ते लवकर वर जातात. हा प्रवृत्ती
मार्ग आहे. जसे जोडीने पळायला लावतात तेव्हा जोडीचा एक-एक पाय बांधतात आणि मग पळायला
लावतात. ही देखील तुमची दौड आहे ना. कोणाची प्रॅक्टिस नसते तर खाली पडतात, यातही असे
होते. एक पुढे जातो, तर दुसरा थांबवतो, कधी दोघेही खाली पडतात. बाबा आश्चर्य करतात
- म्हाताऱ्यांना देखील काम वासनेची आग लागते तर ते देखील कोसळतात (पतन होते). असे
थोडेच होते की त्याने पाडले. पडणे, न पडणे आपल्या हातात आहे. कोणी धक्का थोडाच
देतात, मी पडलो का? काहीही होवो आपण पडायचे नाही. पडलो तर खाना खराब होते (आपलाच
नाश होतो), जोराने चापट बसते. मग पश्चाताप देखील करतात, हाडन् हाड मोडून जाते. खूप
मार लागतो. बाबा भिन्न-भिन्न प्रकारे समजावून सांगत राहतात.
हे देखील समजावून
सांगितले आहे - शिवजयंतीला अशा तारा (टेलिग्राम) आल्या पाहिजेत ज्या माणसे वाचूनच
समजून जातील. विचार सागर मंथन करण्यासाठी बाबा वेळ देतात. कुणी बघेल तर आश्चर्यचकित
होईल. किती चिट्ठ्या येतात, सर्वजण लिहितात - बापदादा. तुम्ही समजावून देखील सांगू
शकता शिवबाबांना ‘बाप’, ब्रह्माला ‘दादा’ म्हणतात. एकाला कधी कोणी बापदादा म्हणतात
का? ही तर वंडरफूल गोष्ट आहे, यामध्ये खरे-खुरे ज्ञान आहे. परंतु आठवणीमध्ये राहील
तेव्हाच तर कोणाला तिर लागेल. घडोघडी देह-अभिमानामध्ये येतात. बाबा म्हणतात -
आत्म-अभिमानी बना. आत्माच शरीर धारण करून पार्ट बजावते. कोणी मेला तरी देखील कोणताही
विचार नको. आत्म्यामध्ये ज्या पार्टची नोंद आहे त्याला आपण साक्षी होऊन बघतो. त्याला
एक शरीर सोडून दुसरे घेऊन पार्ट बजावायचा आहे. यामध्ये आपण तरी काय करू शकतो? हे
ज्ञान देखील तुमच्या बुद्धीमध्ये आहे. ते देखील नंबरवार. कित्येकांच्या बुद्धीमध्ये
तर रहातच नाही त्यामुळे कोणाला समजावून देखील सांगू शकत नाहीत. आत्मा एकदम गरम तवा,
तमोप्रधान पतित आहे. त्याच्यावर ज्ञान अमृत टाकले जाते तर ते टिकत नाही. ज्याने खूप
भक्ती केली आहे, त्यांनाच तिर लागेल, लगेच धारणा होईल. हिशोबच वंडरफूल आहे - पहिल्या
नंबरमध्ये पावन, तेच मग पतित बनतात. या देखील किती समजून घेण्यासारख्या गोष्टी
असतात. कोणाच्या नशीबात नसते तर शिक्षणच सोडून देतात. जर लहानपणापासूनच ज्ञानात
चालतील तर धारणा होत जाईल. समजतील याने खूप भक्ती केली आहे, खूप हुशार बनेल, कारण
कर्मेंद्रिये मोठी झाल्याने (शरीर मोठे झाल्याने) समज देखील जास्त येते. भौतिक आणि
रुहानी दोन्हीकडे लक्ष दिल्याने मग तो परिणाम नाहीसा होतो. हे आहे ईश्वरीय शिक्षण.
फरक आहे ना. परंतु जेव्हा तो ध्यास देखील लागेल तेव्हा ना. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) रुहानी
मिलेट्री बनून ५ विकारांवर विजय प्राप्त करायचा आहे, पवित्र जरूर बनायचे आहे.
श्रीमतावर भारताला पावन बनविण्याची सेवा करायची आहे.
२) या बेहद नाटकामध्ये
प्रत्येक पार्ट आत्म-अभिमानी होऊन बजावायचा आहे, कधीही देह-अभिमानामध्ये यायचे नाही.
साक्षी होऊन प्रत्येक ॲक्टरचा पार्ट बघायचा आहे.
वरदान:-
सदैव आनंदी आणि
सुखाच्या स्थितीमध्ये राहणारे कंबाइंड स्वरूपाचे अनुभवी भव
बापदादा मुलांना नेहमी
सांगतात - ‘मुलांनो, बाबांच्या हातात हात देऊन चाला, एकटे चालू नका. एकटे चालल्याने
कधी कंटाळून जाल, कधी कोणाची नजर देखील पडेल. बाबांसोबत कंबाइंड आहे - या स्वरूपाचा
अनुभव करत राहा तर कधीही मायेची नजर पडणार नाही आणि सोबत असल्याचा अनुभव असल्या
कारणाने आनंदाने मजेत खाताना, चालताना मजा लुटत रहाल. धोका आणि दुःख देणाऱ्या
नात्यांमध्ये अडकण्यापासून देखील वाचाल.
बोधवाक्य:-
योग रुपी कवच
घालून रहा तर मायारूपी शत्रूचा वार होणार नाही.
अव्यक्त इशारे:- आता
लगनच्या (उत्कटतेच्या) अग्नीला प्रज्वलित करून योगाला ज्वाला रूपी बनवा.
जसे दुःखी
आत्म्यांच्या मनामध्ये हा आवाज सुरु झाला आहे की आता विनाश व्हावा, तसाच तुम्हा
विश्व-कल्याणकारी आत्म्यांच्या मनामध्ये हा संकल्प उत्पन्न व्हावा की आता लवकरच
सर्वांचे कल्याण व्हावे तेव्हाच समाप्ती होईल. विध्वंस करणाऱ्यांना कल्याणकारी
आत्म्यांच्या संकल्पाचा इशारा पाहिजे त्यामुळे आपल्या एव्हररेडी बनण्याच्या पॉवरफूल
संकल्पाने ज्वाला रूप योगाद्वारे विनाश ज्वाळेला प्रखर करा.