18-11-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - बाबा आहेत अविनाशी वैद्य, जे एकाच महामंत्राने तुमची सर्व दुःखे दूर करतात”

प्रश्न:-
माया तुमच्या मार्गामध्ये विघ्न का निर्माण करते? कारणे सांगा?

उत्तर:-
१) कारण तुम्ही मायेचे मोठ्यात मोठे ग्राहक आहात. जेव्हा ती बघते की तिचे ग्राहक जात आहेत तर मग ती तुमच्या मार्गामध्ये विघ्न निर्माण करते. २) जेव्हा अविनाशी वैद्य तुम्हाला औषध देतात तर मायेचा आजार उलटतो त्यामुळे विघ्नांना घाबरायचे नाही. मनमनाभवच्या मंत्राने माया पळून जाईल.

ओम शांती।
बाबा बसून मुलांना समजावून सांगत आहेत, मनुष्य ‘मनाची शांती, मनाची शांती’ असे म्हणत हैराण होतात. रोज म्हणतात देखील ‘ओम् शांती’, परंतु याचा अर्थ न समजल्यामुळे शांती मागतच राहतात. म्हणतात देखील आय एम आत्मा अर्थात आय एम सायलेन्स (मी आत्मा आहे अर्थात मी शांत स्वरूप आहे). माझा स्वधर्म शांती आहे. मग जर का स्वधर्म शांती आहे तर मग मागायचे कशासाठी? अर्थ न समजल्यामुळे तरी देखील मागतच राहतात. तुम्ही समजता हे रावण राज्य आहे. परंतु हे देखील समजत नाहीत की रावण साऱ्या दुनियेचा सामान्य शत्रू आणि भारताचा खास शत्रू आहे म्हणून रावणाला जाळत राहतात. असा कोणता तरी मनुष्य आहे का, ज्याला कोणी वर्षानुवर्षे जाळतील? याला (रावणाला) तर जन्म-जन्मांतर, कल्प-कल्पांतर जाळत आले आहेत कारण हा तुमचा शत्रू खूप प्रबळ आहे. ५ विकारांमध्ये सर्वजण अडकून पडतात. जन्मच भ्रष्टाचारातून होतो तर रावणाचे राज्य झाले. यावेळी अथाह दुःख आहे. याला निमित्त कोण? रावण. हे कोणालाच माहिती नाही की दुःख कोणत्या कारणामुळे होते. हे तर राज्यच रावणाचे आहे. सर्वात मोठा शत्रू हा आहे. दरवर्षी त्याचा पुतळा बनवून जाळत राहतात. दिवसेंदिवस आणखीनच मोठा बनवत जातात. दुःख देखील वाढत जाते. इतके मोठे-मोठे साधू, संत, महात्मे, राजे इत्यादी आहेत परंतु एकालाही हे माहिती नाही की, रावण आपला शत्रू आहे ज्याला आपण वर्षानुवर्षे जाळतो आणि मग आनंद साजरा करतो. असे समजतात रावण मेला आता आपण लंकेचे मालक बनलो. परंतु मालक बनत नाहीत. किती पैसे खर्च करतात. बाबा म्हणतात तुम्हाला इतके अगणित पैसे दिले, सर्व कुठे गमावलात? दसऱ्याला लाखो रुपये खर्च करतात. रावणाला मारून मग लंकेला लुटतात. काहीच समजत नाहीत, आपण रावणाला का जाळतो. यावेळी सर्वजण या विकारांच्या जेलमध्ये अडकलेले आहेत. अर्धा कल्प रावणाला जाळतात कारण दुःखी आहेत. समजतात देखील रावणाच्या राज्यामध्ये आपण खूप दुःखी आहोत. हे समजत नाहीत की, सतयुगामध्ये हे ५ विकार असत नाहीत, हे असे रावणाला जाळणे वगैरे काही प्रकार असत नाही. तुम्ही विचारा - ‘हे केव्हापासून साजरे करत आहात!’ तर म्हणतील - ‘हे तर अनादि काळापासून चालत आलेले आहे’. रक्षाबंधन कधीपासून सुरू झाले? म्हणतील अनादि चालत आलेले आहे. तर या सर्व समजून घेण्याच्या गोष्टी आहेत ना. मनुष्यांची बुद्धी काय बनली आहे. ना पशु आहेत, ना मनुष्य आहेत. काहीच कामाचे राहिलेले नाहीत. स्वर्गाला अजिबात जाणत नाहीत. असे समजतात - बस्स, भगवंताने अशीच दुनिया बनवली आहे. तरीही दुःखामध्ये भगवंताची आठवण तर करतात, म्हणतात - ‘हे भगवान, या दुःखातून सोडवा’. परंतु कलियुगामध्ये काही कोणी सुखी होऊ शकत नाही. दुःख तर जरूर भोगायचेच आहे. शिडी उतरायचीच आहे. नव्या दुनियेपासून जुन्या दुनियेच्या अंतापर्यंतची सर्व रहस्ये बाबा समजावून सांगतात. मुलांकडे येतात आणि सांगतात की, ‘सर्व दु:खांचे औषध एकच आहे’. अविनाशी वैद्य आहेत ना. २१ जन्मांसाठी सर्वांना दुःखातून मुक्त करतात. ते वैद्य लोक तर स्वतः देखील आजारी पडतात. हे (बाबा) तर आहेत अविनाशी वैद्य. हे देखील समजता - दुःख देखील अथाह आहेत, सुख देखील अथाह आहेत. बाबा अथाह सुख देतात. तिथे (स्वर्गामध्ये) तर दुःखाचे नामोनिशाणही नसते. सुखी बनण्याचे औषधच आहे - फक्त माझी आठवण करा तर पावन सतोप्रधान बनाल, सर्व दुःख दूर होतील. मग सुखच सुख असेल. गायले देखील जाते - बाबा दुःखहर्ता, सुखकर्ता आहेत. अर्ध्या कल्पासाठी तुमची सर्व दुःखे दूर होतात. तुम्ही फक्त स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा.

आत्मा आणि जीव दोघांचा खेळ आहे. निराकारी आत्मा अविनाशी आहे आणि साकार शरीर विनाशी आहे, यांचा खेळ आहे. आता बाबा म्हणतात - ‘देहा सहित देहाच्या सर्व संबंधांना विसरून जा. गृहस्थ व्यवहारामध्ये राहत असूनही स्वतःला असे समजा की आपल्याला आता परत जायचे आहे. पतित तर जाऊ शकत नाहीत म्हणून मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर सतोप्रधान बनाल’. बाबांकडे औषध आहे ना. हे देखील सांगतो, माया जरूर विघ्न आणेल. तुम्ही रावणाचे ग्राहक आहात ना. त्याचे ग्राहक जर निघून गेले तर नक्कीच नाराज होईल. तर बाबा समजावून सांगत आहेत - हे तर शिक्षण आहे, हे काही कोणते औषध नाहीये. आठवणीची यात्रा हे आहे औषध. याच एकाच औषधाने तुमची सर्व दुःखे दूर होतील परंतु जर माझी निरंतर आठवण करण्याचा पुरुषार्थ कराल तर. भक्ती मार्गामध्ये असे खूप आहेत ज्यांचे सतत मंत्र पुटपुटणे चालूच असते. कोणता ना कोणता मंत्र, राम नाम जपतच राहतात, त्यांना गुरुकडून मंत्र मिळालेला असतो की, तुम्हाला इतका वेळ रोज जप करायचा आहे. त्याला म्हटले जाते - राम नामाची माळा जपणे. यालाच राम नामाचे दान म्हटले जाते. अशा बऱ्याच संस्था बनलेल्या आहेत. राम-राम जपत राहतील तर कोणीही भांडण इत्यादी करणार नाही, बिझी राहतील. जरी कोणी काही बोलले तरी देखील रिस्पॉन्स देणार नाहीत. फार थोडे असे करतात. इथे मग बाबा समजावून सांगतात - तोंडाने काही राम-राम म्हणायचे नाही. हा तर अजपाजप आहे, फक्त बाबांची आठवण करत रहा. बाबा म्हणतात मी काही राम नाही आहे. राम तर त्रेताचा होता, ज्याचे राज्य होते, त्याचा काही नामजप करायचा नाहीये. आता बाबा समजावून सांगतात भक्ती मार्गामध्ये या सर्वांचे स्मरण करत, पूजा करत तुम्ही शिडी खालीच उतरत आले आहात कारण ते सर्व आहेत अनरायटीयस (अपवित्र). रायटीयस (पवित्र) तर एक बाबाच आहेत. ते तुम्हा मुलांना बसून समजावून सांगतात की हा कसा भुल-भुलैय्याचा खेळ आहे. ज्या बाबांकडून इतका बेहदचा वारसा मिळतो त्यांची आठवण करतील तर त्यांचा चेहरा चमकत राहील. चेहरा आनंदाने चमकू लागतो. चेहऱ्यावर हसू उमटते. तुम्ही जाणता बाबांची आठवण केल्याने आपण हे (लक्ष्मी-नारायण) बनणार. अर्ध्या कल्पासाठी आमची सर्व दुःखे दूर होतील. असे नाही, बाबा काही कृपा करतील. नाही, हे समजून घ्यायचे आहे - आपण जितकी बाबांची आठवण करू तितके सतोप्रधान बनू. हे लक्ष्मी-नारायण विश्वाचे मालक किती हर्षितमुख आहेत तर असे बनायचे आहे. बेहदच्या बाबांची आठवण करून आतून आनंद होतो की पुन्हा एकदा आपण विश्वाचे मालक बनणार. हे आत्म्याचे आनंदाचे संस्कारच पुन्हा सोबत येतील. नंतर मग थोडे-थोडे कमी होत जातील. यावेळी माया तुम्हाला खूप हैराण करेल. माया आठवणीचा विसर पाडण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही निरंतर असे हर्षितमुख राहू शकणार नाही. मग काही काळ नक्कीच गोंधळून जाल. मनुष्य जेव्हा आजारी पडतात तर त्यांना म्हणत देखील असतील - शिवबाबांची आठवण करा; परंतु शिवबाबा कोण आहेत, हे कोणालाच माहिती नाही तर काय समजून आठवण करतील? कशासाठी आठवण करतील? तुम्ही मुले तर जाणता बाबांची आठवण केल्याने आपण तमोप्रधाना पासून सतोप्रधान बनणार. देवी-देवता सतोप्रधान आहेत ना, त्याला म्हटलेच जाते डीटी वर्ल्ड (दैवी दुनिया), मनुष्यांची दुनिया म्हटले जात नाही. तिथे ‘अमका मनुष्य’ असे कधी बोलले जात नाही परंतु ‘अमके देवता’ असे बोलले जाते. ती आहेच दैवी दुनिया, ही आहे मानवी दुनिया. या सर्व समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. बाबाच समजावून सांगतात, बाबांना म्हटले जाते ज्ञानाचा सागर. बाबा अनेक प्रकारचे स्पष्टीकरण देत राहतात. तरी देखील शेवटी हाच महामंत्र देतात - बाबांची आठवण करा तर तुम्ही सतोप्रधान बनाल आणि तुमची सर्व दुःखे दूर होतील. कल्पापूर्वी देखील तुम्ही देवी-देवता बनले होता. तुमचे आचरण देवतांप्रमाणे होते. तिथे कोणीही उलटे-सुलटे बोलत नव्हते. असे कोणते कामच होत नव्हते. ती आहेच दैवी दुनिया. ही आहे मानवी दुनिया. फरक आहे ना. हे बाबा बसून समजावून सांगतात. मनुष्य तर समजतात दैवी दुनियेला लाखो वर्षे झाली. इथे (जुन्या दुनियेमध्ये) तर कोणालाही देवता म्हणू शकत नाही. देवता तर स्वच्छ होते. महान-आत्मा तर देवी-देवतांना म्हटले जाते, मनुष्यांना कधी असे म्हणू शकत नाही. ही आहे रावणाची दुनिया. रावण अत्यंत शक्तिशाली शत्रू आहे. याच्यासारखा शत्रू कोणी असत नाही. दरवर्षी तुम्ही रावणाला जाळता. हा आहे कोण? हे कुणालाच माहित नाही. कोणता मनुष्य तर नाही आहे, हे आहेत ५ विकार म्हणून याला रावण राज्य म्हटले जाते. ५ विकारांचे राज्य आहे ना. सर्वांमध्ये ५ विकार आहेत. हा दुर्गती आणि सद्गतीचा खेळ बनलेला आहे. आता सद्गतीच्या वेळी बाबांनी तुम्हाला आदि (सुरुवाती) विषयी देखील समजावून सांगितले आहे. दुर्गती विषयी देखील समजावून सांगितले आहे. तुम्हीच उंच चढता आणि तुम्हीच खाली कोसळता (तुम्हीच श्रेष्ठ बनता आणि तुम्हीच पतित बनता). शिवजयंती देखील भारतामध्येच होते. रावण जयंती सुद्धा भारतामध्येच होते. अर्धा कल्प आहे दैवी दुनिया, लक्ष्मी-नारायण, राम-सीतेचे राज्य असते. आता तुम्ही मुले सर्वांच्या बायोग्राफीला (जीवन चरित्राला) जाणता. सारी महिमा तुमची आहे. नवरात्रीला पूजा इत्यादी सर्व तुमची होते. तुम्हीच स्थापना करता. श्रीमतावर चालून तुम्ही विश्वाला चॅलेंज करता तर श्रीमतावर पूर्ण चालले पाहिजे ना. नंबरवार पुरुषार्थ करत राहतात. स्थापना होतच राहते, यामध्ये युद्ध इत्यादीचा काही प्रश्नच नाही. आता तुम्ही समजता हे पुरुषोत्तम संगमयुग आहेच एकदम वेगळे. जुन्या दुनियेचा अंत, नवीन दुनियेची सुरुवात. बाबा येतातच जुन्या दुनियेला बदलण्याकरिता. तुम्हाला समजावून तर खूप सांगतात परंतु असे बरेच आहेत जे विसरून जातात. भाषण झाल्यानंतर आठवते की हे-हे पॉईंट्स समजावून सांगायचे होते. हुबेहूब कल्प-कल्प जशी स्थापना झाली आहे तशीच होत राहणार, ज्यांनी जे पद मिळवले आहे तेच मिळवतील. सर्वच काही एक सारखे पद प्राप्त करू शकत नाहीत. उच्च ते उच्च पद प्राप्त करणारे देखील आहेत तर कमीत कमी दर्जाचे पद मिळवणारे देखील आहेत. जी अनन्य मुले आहेत त्यांना पुढे चालून खूप जाणीव होईल - ही श्रीमंताची दासी बनेल, ही राजघराण्याची दासी बनेल. हे मोठे श्रीमंत बनतील, ज्यांना कधी-कधी आमंत्रण देत राहणार. सर्वांना थोडेच आमंत्रण देतील, सर्वजण लक्ष्मी-नारायणाचे मुख थोडेच बघतील.

बाबा देखील ब्रह्मा मुखाद्वारे समजावून सांगतात, सर्वजण सन्मुख थोडेच बघू शकतील. तुम्ही आता सन्मुख आले आहात, पवित्र बनले आहात. असे देखील होते की अपवित्र असणारे देखील इथे येऊन बसतात, थोडे ऐकतील तर मग देवता बनतील, काहीतरी ऐकल्याने परिणाम तर होईल. जर ऐकलेच नाही तर मग येणारच नाहीत. तर मुख्य गोष्ट बाबा सांगत आहेत - मनमनाभव. या एकाच मंत्राने तुमची सर्व दुःखे दूर होतील. ‘मनमनाभव’ - हे बाबा म्हणतात आणि टीचर होऊन म्हणतात - ‘मध्याजीभव’. हे पिता देखील आहेत, शिक्षक देखील आहेत, गुरु देखील आहेत. तिघेही जर आठवणीत राहिले तरी देखील खूप हर्षितमुख अवस्था राहील. बाबा शिकवतात आणि बाबाच सोबत घेऊन जातात. अशा बाबांची किती आठवण केली पाहिजे. भक्ती मार्गामध्ये तर बाबांना कोणी जाणतही नाहीत. फक्त इतकेच जाणतात भगवान आहेत, आपण सर्व बांधव आहोत. बाबांकडून काय मिळणार आहे, ते काहीच माहिती नाही आहे. तुम्ही आता समजता - बाबा एकच आहेत, आपण त्यांची मुले सर्व बांधव आहोत. ही बेहदची गोष्ट आहे ना. सर्व मुलांना शिक्षक बनून शिकवतात. मग सर्वांचा हिशोब चुकता करून परत घेऊन जातील. या घाणेरड्या दुनियेमधून परत जायचे आहे; नवीन दुनियेमध्ये येण्याकरिता तुम्हाला लायक बनवितात. जे लायक बनतात, ते सतयुगामध्ये येतात. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) आपल्या अवस्थेला सदैव एकरस आणि हर्षितमुख ठेवण्याकरिता पिता, शिक्षक आणि सद्गुरु तिघांचीही आठवण करायची आहे. आनंदाचे संस्कार इथूनच भरायचे आहेत. वारशाच्या स्मृतीने चेहरा सदैव चमकत रहावा.

२) श्रीमतावर चालून साऱ्या विश्वाला परिवर्तित करण्याची सेवा करायची आहे. ५ विकारांमध्ये जे अडकून पडले आहेत, त्यांना काढायचे आहे. त्यांना आपल्या स्व-धर्माची ओळख करून द्यायची आहे.

वरदान:-
सर्वांच्या प्रति आपली दृष्टी आणि भावना प्रेमाची ठेवणारे सर्वांचे आवडते फरिश्ता भव

स्वप्नात जरी कोणाजवळ फरिश्ता आला तर किती आनंदीत होतात. फरिश्ता अर्थात सर्वांचे आवडते. हदचे आवडते नाही, बेहदचे आवडते. जे प्रेम करतील त्यांचेच आवडते असे नाही परंतु सर्वांचे आवडते. कोणी कशीही आत्मा असेल परंतु तुमची दृष्टी, तुमची भावना प्रेमाची असावी - याला म्हटले जाते सर्वांचे आवडते. कोणी अपमान केला, घृणा केली तरी देखील त्यांच्या प्रति प्रेमाची अथवा कल्याणाची भावना उत्पन्न व्हावी कारण त्यावेळी ते परवश आहेत.

बोधवाक्य:-
जे सर्व प्राप्तींनी संपन्न आहेत तेच सदैव हर्षित, सदा सुखी आणि भाग्यशाली आहेत.