19-01-25    अव्यक्त बापदादा    मराठी मुरली   30.11.2003  ओम शान्ति   मधुबन


“चारही सब्जेक्टमध्ये अनुभवाची ऑथॉरिटी बनून समस्येला समाधान स्वरूपामध्ये परिवर्तन करा”


आज ब्राह्मण संसाराचा रचता आपल्या चोहो बाजूच्या ब्राह्मण मुलांना बघत आहेत. हा ब्राह्मण संसार छोटासा संसार आहे, परंतु अति श्रेष्ठ, अति सुंदर संसार आहे. हा ब्राह्मण संसार साऱ्या विश्वाच्या विशेष आत्म्यांचा संसार आहे. प्रत्येक ब्राह्मण कोटींमध्ये कोणी, कोणीमध्ये देखील कोणी आत्मा आहे कारण आपल्या पित्याला ओळखून, पित्याच्या वारशाचे अधिकारी बनले आहेत. जसे बाबा उच्च ते उच्च आहेत तर बाबांना ओळखून बाबांचे बनणारे आत्मे देखील विशेष आत्मे आहेत. प्रत्येक ब्राह्मण आत्म्याला जन्मताच भाग्य विधाता बाबांनी मस्तकावर श्रेष्ठ भाग्याची रेषा काढली आहे, अशी श्रेष्ठ भाग्यवान आत्मा आहे. तर स्वतःला असे भाग्यवान समजता का? इतका मोठा रुहानी (आत्मिक) नशा अनुभव होतो का? प्रत्येक ब्राह्मणाच्या हृदयामध्ये दिलाराम, हृदयापासून प्रेम, मनापासून प्रेम देत आहेत. हे परमात्म प्रेम साऱ्या कल्पामध्ये एका द्वारे आणि एकाच वेळेला प्राप्त होते. हा रुहानी नशा प्रत्येक कर्मामध्ये सदैव राहतो का? कारण की तुम्ही विश्वाला चॅलेंज करता की आम्ही कर्मयोगी जीवनवाले विशेष आत्मे आहोत. केवळ योग लावणारे योगी नाही, योगी जीवनवाले आहोत. जीवन चिरकाळासाठी असते. नॅचरल आणि निरंतर असते. ८ तास, ६ तासाचे योगी जीवनवाले नाही. योग अर्थात आठवण तर ब्राह्मण जीवनाचे लक्ष्य आहे. जीवनाचे लक्ष्य आपोआपच लक्षात राहते आणि जसे लक्ष्य असते तसे लक्षण देखील आपोआपच येते.

बापदादा प्रत्येक ब्राह्मण आत्म्याच्या मस्तकामध्ये चमकणारा भाग्याचा तारा बघतात. बापदादा सदैव प्रत्येक मुलाला श्रेष्ठ स्वमानधारी, स्वराज्यधारी म्हणून पाहत असतात. तर तुम्ही सर्वजण स्वतःला स्वमानधारी आत्मा आहे, स्वराज्यधारी आत्मा आहे - असाच अनुभव करता का? सेकंदामध्ये जर स्मृतीमध्ये आणले की मी स्वमानधारी आत्मा आहे, तर सेकंदामध्ये स्वमानाची किती मोठी लिस्ट येते! आत्ता देखील आपल्या स्वमानाची लिस्ट स्मृतीमध्ये आली? मोठी लिस्ट आहे ना! स्वमान, अभिमानाला नष्ट करून टाकतो कारण की स्वमान आहे श्रेष्ठ अभिमान. तर श्रेष्ठ अभिमान विभिन्न अशुद्ध देह-अभिमानाला नाहीसे करतो. जसा लाईटचा स्विच ऑन केल्याने सेकंदामध्ये अंधार पळून जातो, अंधाराला पळवले जात नाही अथवा अंधाराला काढण्याची मेहनत करावी लागत नाही परंतु स्विच ऑन केला आणि अंधार आपोआपच नाहीसा होतो. तसा स्वमानाच्या स्मृतीचा स्विच ऑन करा तर विविध प्रकारचे देह-अभिमान काढून टाकण्यासाठी मेहनत करावी लागणार नाही. मेहनत तेव्हा करावी लागते जोपर्यंत स्वमानाचे स्मृति स्वरूप बनत नाही. बापदादा मुलांचा खेळ बघत असतात - स्वमानाला मनातल्या मनात वर्णन करतात - “मैं बापदादा के दिल तख्तनशीन हूँ”, वर्णन देखील करत आहेत, विचार देखील करत आहेत परंतु अनुभवाच्या सीटवर सेट होत नाहीत. जो विचार करता त्याचा अनुभव होणे देखील जरुरी आहे कारण सर्वात श्रेष्ठ ऑथॉरिटी अनुभवाची ऑथॉरिटी आहे. तर बापदादा बघतात - ऐकतात खूप चांगल्या रीतीने, विचार देखील खूप चांगला करतात परंतु ऐकणे आणि विचार करणे वेगळी गोष्ट आहे, अनुभवी स्वरूप बनणे - हीच ब्राह्मण जीवनाची श्रेष्ठ ऑथॉरिटी आहे. हेच भक्ति आणि ज्ञानामध्ये अंतर आहे. भक्तीमध्ये देखील ऐकण्याच्या मस्तीमध्ये खूप तल्लीन होतात. विचार देखील करतात परंतु अनुभव करू शकत नाहीत. ज्ञानाचा अर्थच आहे, ज्ञानी तू आत्मा अर्थात प्रत्येक स्वमानाचे अनुभवी बनणे. अनुभवी स्वरूप रुहानी नशा चढवतो. जीवनामध्ये अनुभव हा कधीही विसरला जात नाही, ऐकलेले, विचार केलेले विसरू शकते परंतु अनुभवाची ऑथॉरिटी कधीही कमी होत नाही.

तर बापदादा मुलांना हीच आठवण करून देत आहेत की, प्रत्येक ऐकलेली गोष्ट जी ईश्वर पित्याकडून ऐकली, त्याचे अनुभवी मूर्त बना. अनुभव केलेली गोष्ट हजारो लोकांनी जरी पुसून टाकण्याचा प्रयत्न केला तरीही ती पुसली जाऊ शकत नाही. माया देखील अनुभवाला पुसून टाकू शकत नाही. जसे शरीर धारण करताच अनुभव करता की मी अमका आहे, तर किती पक्के लक्षात राहते! कधी आपल्या देहाचे नाव विसरायला होते का? जर तुम्हाला कोणी म्हटले की, ‘नाही, तुम्ही अमका किंवा अमकी नाही आहात’, तर मानू शकता का? अगदी तसेच प्रत्येक स्वमानाची लिस्ट अनुभव केल्याने कधी स्वमान विसरू शकणार नाही. परंतु बापदादांनी पाहिले की, अनुभव प्रत्येक स्वमानाचा आणि प्रत्येक पॉईंटचा; अनुभवी बनण्यामध्ये नंबरवार आहेत. जेव्हा अनुभव केला की मी आहेच आत्मा, आत्म्याशिवाय दुसरे काय आहात! देहाला तर माझे म्हणता परंतु मी आहेच आत्मा, जेव्हा आहातच आत्मा तर देहभान कुठून आले? कशामुळे आले? कारण, ६३ जन्मांचा अभ्यास, मी देह आहे, उलटा अभ्यास पक्का झाला आहे. खरा अभ्यास अनुभवामध्ये विसरायला होतो. बापदादा मुलांना जेव्हा मेहनत करताना बघतात तेव्हा मुलांविषयी प्रेम वाटते. परमात्म्याची मुले आणि मेहनत! कारण, अनुभव मूर्त होणे याची कमतरता आहे. जेव्हा देहभानाचा अनुभव काहीही झाले, कोणतेही कर्म करताना देहभान विसरायला होत नाही, तर ब्राह्मण जीवन अर्थात कर्मयोगी जीवन, योगी जीवनाचा अनुभव कसा विसरू शकतो!

तर चेक करा - प्रत्येक सब्जेक्ट्ला अनुभवामध्ये आणले आहे का? ज्ञान ऐकणे आणि ऐकवणे तर सोपे आहे परंतु ज्ञान स्वरूप बनायचे आहे. ज्ञानाला स्वरूपामध्ये आणले तर आपोआपच प्रत्येक कर्म नॉलेजफुल अर्थात नॉलेजच्या लाईट माइटवाले होईल. नॉलेजला म्हटलेच जाते लाइट आणि माइट. तसेच योगी स्वरूप, योगयुक्त, युक्तियुक्त स्वरूप. धारणा स्वरूप अर्थात प्रत्येक कर्म, प्रत्येक कर्मेंद्रिय, प्रत्येक गुणाचे धारणा स्वरूप असेल. सेवेचे अनुभवी मूर्त, सेवाधारी याचा अर्थच आहे निरंतर नैसर्गिक सेवाधारी, मन्सा असो, वाचा असो, कर्मणा असो, संबंध संपर्क असो प्रत्येक कर्मामध्ये सेवा नॅचरली होत रहावी, याला म्हटले जाते चारही सब्जेक्टमध्ये अनुभव स्वरूप. तर सर्वांनी चेक करा - कितपत अनुभवी बनलो आहोत? प्रत्येक गुणाचा अनुभवी, प्रत्येक शक्तीचा अनुभवी. तसेही एक म्हण आहे की, ‘अनुभव वेळेला खूप कामी येतो’. तर अनुभवी मूर्तचा अनुभव कशीही समस्या असो, अनुभवी मूर्त अनुभवाच्या ऑथॉरिटीने समस्येला सेकंदामध्ये समाधान स्वरूपामध्ये परिवर्तन करतो. समस्या, समस्या राहत नाही, समाधान स्वरूप बनेल. समजले.

आता वेळेची समीपता, बाप समान बनण्याची समीपता, समाधान स्वरूपाचा अनुभव होऊ द्या. खूप वेळ समस्येचे येणे, समाधान करणे ही मेहनत केलीत, आता बापदादा प्रत्येक मुलाला स्वमानधारी, स्वराज्य अधिकारी, समाधान स्वरूपामध्ये पाहू इच्छित आहेत. अनुभवी मूर्त सेकंदामध्ये परिवर्तन करू शकतो. अच्छा.

सर्व बाजूंचे पोहोचले आहेत. डबल फॉरेनर्स देखील प्रत्येक ग्रुपमध्ये आपला चान्स चांगला घेत आहेत. अच्छा - या ग्रुपमध्ये पांडव देखील कमी नाहीत. सर्व पांडव हात वर करा. माता, कुमारी, टीचर्स हात वर करा. पहिल्या ग्रुपमध्ये माता जादा होत्या परंतु या ग्रुपमध्ये पांडवांनी देखील चांगली शर्यत केली आहे. पांडवांचा नशा आणि निश्चय अजूनपर्यंत स्तुतीमध्ये देखील गायला गेला आहे. काय गायले गेले आहे? जाणता का? ५ पांडव परंतु नशा आणि निश्चयाच्या आधारावर विजयी बनले, हे गायन अजूनपर्यंत आहे. तर असे पांडव आहात का? अच्छा - नशा आहे? तर पांडव जेव्हापण ऐकत असतील की, तुम्ही पांडव आहात, तर पांडवांना पांडवपतीचा विसर तर पडत नाही ना! कधी-कधी विसरायला होते? पांडव आणि पांडवपती, पांडव पांडवपतीला कधीही विसरू शकत नाहीत. पांडवाना हा नशा असला पाहिजे, आम्ही कल्प-कल्पाचे पांडव, पांडवपतीचे लाडके आहोत. यादगारमध्ये पांडवांचे नाव देखील काही कमी नाहीये. पांडवांचे टायटलच आहे विजयी पांडव. तर असे पांडव आहात? बस्स, आम्ही विजयी पांडव आहोत, फक्त पांडव नाही, विजयी पांडव. विजयाचा तिलक अविनाशी मस्तकावर लागलेलाच आहे.

मातांना असा नशा राहतो का? खूप नशा असतो! माता नशेमध्ये म्हणतात की, ‘बाबा आलेच आहेत आमच्यासाठी’. असे आहात ना! कारण अर्ध्या कल्पामध्ये मातांना मान मिळालेला नाही, आता संगमावर राजनीतीमध्ये देखील मातांना अधिकार मिळाला आहे. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये तुम्हा शक्तींना बाबांनी पुढे ठेवले आहे ना, तर संसारामध्ये देखील प्रत्येक क्षेत्रामध्ये आता मातांना अधिकार मिळतो. असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे माता नसतील. हा संगमयुगातील मान आहे. तर मातांना वाटते - आमचा बाबा. असे वाटते - माझे बाबा? नशा आहे? माता हात हलवत आहेत. चांगले आहे. भगवंताला आपले बनवले, तर माता जादुगारिणी झाल्या ना! बापदादा बघतात माता, भले पांडव, बापदादांशी सर्व नात्यांनी, प्रेम तर सर्व नात्यांनी आहे परंतु कोणाला कोणते विशेष नाते आवडते, ते देखील बघतात. बऱ्याच मुलांना खुदाला दोस्त बनवणे जास्त आवडते, म्हणूनच ‘खुदा दोस्त’ची कहाणी देखील आहे. बापदादा हेच म्हणतात, ज्या वेळी ज्या नात्याची आवश्यकता असेल त्या वेळी भगवंताला त्या नात्याने आपले बनवू शकता. सर्व नाती निभावू शकता. मुलांनी म्हटले - ‘माझे बाबा’, आणि बाबांनी काय म्हटले - ‘मी तुमचा’.

मधुबनचे सौंदर्य छान वाटते ना! भले कितीही दूर बसून जरी ऐकले, बघितले तरीही मधुबनचे सौंदर्य आपले आहे. मधुबनमध्ये बापदादा तर भेटतातच परंतु आणखी किती प्राप्ति होतात? जर लिस्ट काढली तर किती प्राप्ति आहे? सर्वात मोठ्यात मोठी प्राप्ति - सहजयोग, स्वतः योग लागून राहतो. मेहनत करावी लागत नाही. जर कोणी मधुबनच्या वायुमंडळाचे महत्व ठेवले, तर मधुबनचे वायुमंडळ, मधुबनची दिनचर्या सहजयोगी स्वतः योगी बनविणारी आहे. असे का? मधुबनमध्ये बुद्धीमध्ये फक्त एकच काम आहे, सेवाधारी ग्रुप येतो ती वेगळी गोष्ट आहे परंतु जे रिफ्रेश होण्यासाठी येतात तर त्यांना मधुबनमध्ये काय काम आहे? कोणती जबाबदारी आहे का? खा, प्या, मजा करा, अभ्यास करा. तर मधुबन, मधुबनच आहे. परदेशामध्ये देखील ऐकत आहेत. परंतु ते ऐकणे आणि मधुबनमध्ये येणे, यामध्ये रात्रं-दिवसाचा फरक आहे. बापदादा साधनांद्वारे ऐकणाऱ्यांना किंवा बघणाऱ्यांना देखील प्रेमपूर्वक आठवण तर देतात, काही मुले तर रात्री जागूनही ऐकतात. काहीच नसण्यापेक्षा हे साधनांद्वारे ऐकणे, बघणे नक्कीच चांगले आहे; परंतु चांगल्यात चांगले मधुबन उत्तम आहे. मधुबनमध्ये येणे चांगले वाटते, की तिथे बसून मुरली ऐकणे चांगले वाटते! काय चांगले वाटते? तिथे देखील मुरली तर ऐकणार ना. इथे देखील सर्वात मागचे टी. व्ही. वरच तर बघतात. तर जे समजतात मधुबनमध्ये येणेच चांगले आहे, त्यांनी हात वर करा. (सर्वांनी हात वर केला) अच्छा. तरी देखील बघा भक्तिमध्ये सुद्धा कोणते गायन आहे? ‘मधुबन में मुरली बाजे’. असे नाहीये की, ‘लंडन में मुरली बाजे’. कुठेही असा, मधुबनच्या महिमेचे महत्व जाणणे अर्थात स्वतःला महान बनवणे.

अच्छा - जे कोणी आले आहेत ते सर्व योगी जीवन, ज्ञानी तू आत्मा जीवन, धारणा स्वरूपाचा अनुभव करत आहेत. आता पहिल्या टर्नमध्ये या सीझनसाठी विशेष अटेन्शन दिले होते की हा पूर्ण सीझन संतुष्टमणी बनून रहायचे आहे आणि संतुष्ट करायचे आहे. फक्त बनायचे नाही आहे, करायचे देखील आहे. त्याच सोबत आता वेळेनुसार कधीही काहीही होऊ शकते, प्रश्न विचारू नका कधी होईल, एका वर्षात होईल, ६ महिन्यात होईल. अचानक काहीही कोणत्याही वेळी होऊ शकते म्हणून आपल्या स्मृतीचा स्विच खूप पॉवरफुल बनवा. सेकंदामध्ये स्विच ऑन आणि अनुभव स्वरूप बना. स्विच जेव्हा लूज होतो ना तेव्हा मग वारंवार ऑन-ऑफ करावा लागतो आणि मग ठीक होण्यासाठी वेळ लागतो. परंतु सेकंदामध्ये स्वमानाचा, स्वराज्य अधिकाराचा, स्विच ऑन अंतर्मुखी होऊन अनुभव करत रहा. अनुभवाच्या सागरामध्ये सामावून जा. अनुभवाच्या ऑथॉरिटीला दुसरी कोणतीही ऑथॉरिटी जिंकू शकत नाही. समजले, काय करायचे आहे? बापदादा इशारा तर देत आहेत परंतु वाट पाहू नका, केव्हा-केव्हा-केव्हा नाही, आत्ता. एव्हररेडी. सेकंदामध्ये स्मृतीचा स्विच ऑन करू शकता का? करू शकता? कसेही सरकमस्टांस असो, कोणतीही समस्या असो, स्मृतीचा स्विच ऑन करा. हा अभ्यास करा कारण की फायनल पेपर सेकंदाचाच असणार आहे, मिनटाचा सुद्धा नाही. विचार करणारा पास होऊ शकणार नाही, अनुभव असणारा पास होईल. तर आत्ता सेकंदामध्ये सर्वजण “मी परमधाम निवासी श्रेष्ठ आत्मा आहे”, या स्मृतीच्या स्विचला ऑन करा इतर कोणतीही स्मृती नसावी. बुद्धीमध्ये कोणतीही हलचल नसावी, अचल. (ड्रिल करवून घेतली) अच्छा.

चोहो बाजूंचे श्रेष्ठ स्वमानधारी, अनुभवी आत्म्यांना, सदैव प्रत्येक सब्जेक्टला अनुभवामध्ये आणणारे, सदैव योगी जीवनामध्ये चालणारे निरंतर योगी आत्म्यांना, सदैव आपल्या विशेष भाग्याला प्रत्येक कर्मामध्ये इमर्ज स्वरूपामध्ये ठेवणारे कोटींमध्ये कोणी, कोणीमध्ये सुद्धा कोणी विशेष आत्म्यांना बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते.

दादींसोबत संवाद:- सर्वांना उमंग-उत्साहामध्ये आणण्याचे चांगले कार्य करत आहेस. (आता तर करोडोंना संदेश देण्याचा प्लॅन चालू आहे) करोडच काय परंतु विश्वातील सर्व आत्म्यांना संदेश मिळणार आहे. ‘अहो प्रभू’ तरी म्हणतील ना! ‘अहो प्रभू’ म्हणण्यासाठी तरी तयार तर करायचे आहे ना! (दादींसोबत) या देखील सहयोग देत आहेत. चांगले आहे, मधुबनला सांभाळत आहेत. चांगला सहयोगी ग्रुप मिळाला आहे ना! प्रत्येकाची विशेषतः आहे. तरी देखील आदि रत्नांचा प्रभाव पडतो. भले कितीही वय होऊ देत, नविन असलेले देखील पुढे जात आहेत परंतु तरी सुद्धा आदि रत्नांची पालना आपली आहे, म्हणून ग्रुप छान आहे.

वरदान:-
विघ्न प्रूफ चमकणारा फरिश्ता ड्रेस धारण करणारे सदा विघ्न-विनाशक भव

स्वयं प्रति आणि सर्वांप्रति नेहमी विघ्न-विनाशक बनण्यासाठी प्रश्नचिन्हाला निरोप द्या आणि फुलस्टॉप द्वारे सर्व शक्तींचा फुल स्टॉक करा. नेहमी विघ्न प्रूफ चमकता फरिश्ता ड्रेस घालून रहा, मातीचा ड्रेस घालू नका. त्याच सोबत सर्व गुणांच्या दागिन्यांनी सजून रहा. सदैव अष्ट शक्ति शस्त्रधारी संपन्न मूर्ति बनून रहा आणि कमलपुष्पाच्या आसनावर आपल्या श्रेष्ठ जीवनाचे पाय ठेवा.

सुविचार:-
अभ्यासावर पूर्णपणे अटेन्शन द्या तेव्हाच फर्स्ट डिव्हिजन मध्ये नंबर येईल.

आपल्या शक्तीशाली मनसा द्वारे सकाश देण्याची सेवा करा:-

जशी वाचा सेवा नॅचरल झाली आहे, तशी मन्सा सेवा देखील एकत्र आणि नॅचरल व्हावी. वाणीसोबत मन्सा सेवा देखील करत रहा तर तुम्हाला कमी बोलावे लागेल. बोलण्यासाठी जी एनर्जी लावता ती मन्सा सेवेच्या सहयोगामुळे वाणीची एनर्जी जमा होईल आणि मन्साची शक्तिशाली सेवा जास्त सफलता अनुभव करवेल.

सूचना:- आज आंतरराष्ट्रीय योग दिवस महिन्याचा तिसरा रविवार आहे, सायंकाळी ६.३० ते ७.३० वाजे पर्यंत सर्व भाऊ-बहिणींनी संघटित रूपामध्ये एकाच शुद्ध संकल्पाने प्रकृती सहित विश्वातील सर्व आत्म्यांना शांती आणि शक्तीची सकाश देण्याची विशेष सेवा करा. अनुभव करा की बापदादांच्या मस्तकातून शक्तिशाली किरणे निघून माझ्या भृकुटीवर येत आहेत आणि माझ्यामधून संपूर्ण ग्लोबवर जात आहेत.