19-02-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - तुम्ही आत्तापर्यंत जे काही शिकला आहात त्याला विसरून जा, जिवंतपणी मरणे
अर्थात सर्व काही विसरणे, मागचे काहीही आठवू नये”
प्रश्न:-
जे पूर्णत:
जिवंतपणी मेलेले नाहीत त्यांचे लक्षण काय असेल?
उत्तर:-
ते बाबांशी देखील आरग्यु (तर्क-वितर्क) करत राहतील. शास्त्रांचे उदाहरण देत राहतील.
जे पूर्णत: मेले आहेत ते म्हणतील - बाबा जे ऐकवतात तेच सत्य आहे. आम्ही अर्धा कल्प
जे ऐकले ते खोटेच होते त्यामुळे आता त्याचा उच्चार सुद्धा करू नये. बाबांनी सांगितले
आहे - हियर नो ईव्हील...
गीत:-
ओम् नमो शिवाय…
ओम शांती।
मुलांना समजावून सांगितले गेले आहे की, जेव्हा शांतीमध्ये बसवता, ज्याला नेष्ठा
शब्द वापरला आहे, तर ही ड्रिल करवून घेतली जाते. आता बाबा बसून रुहानी (आत्मिक)
मुलांना समजावून सांगत आहेत की, जे जिवंतपणी मेलेले आहेत, म्हणतात आम्ही जिवंतपणी
मेलेले आहोत; जसे मनुष्य मरतो तेव्हा सर्वकाही विसरून जातो फक्त संस्कार राहतात. आता
तुम्ही देखील बाबांचे बनून दुनियेपासून मेला आहात. बाबा म्हणतात - तुमच्यामध्ये
भक्तीचे संस्कार होते, आता ते संस्कार बदलत आहेत तर जिवंतपणी तुम्ही मरता ना.
मेल्यावर मनुष्य शिकलेले सर्व काही विसरून जातो मग दुसऱ्या जन्मामध्ये नव्याने
शिकावे लागते. बाबा देखील म्हणतात - तुम्ही जे काही शिकला आहात ते विसरून जा. तुम्ही
तर बाबांचे बनला आहात ना. मी तुम्हाला नवीन गोष्ट ऐकवतो. तर आता वेद, शास्त्र,
ग्रंथ, जप, तप इत्यादी या सर्व गोष्टी विसरून जा; यासाठीच म्हटले आहे - हियर नो
ईव्हील, सी नो ईव्हील... हे तुम्हा मुलांसाठी आहे. बरेचजण खूप शास्त्रे इत्यादी
शिकलेले आहेत, पूर्ण मेलेले नाहीत तर फालतू तर्क-वितर्क करतील. मेले तर मग कधी
आरग्यु करणार नाहीत. म्हणतील बाबांनी जे ऐकवले आहे तेच खरे आहे, बाकीच्या गोष्टींचा
आम्ही उच्चार तरी का करावा! बाबा म्हणतात - याचा उच्चार सुद्धा करू नका. हियर नो
ईव्हील. बाबांनी डायरेक्शन दिले ना - काहीही ऐकू नका. बोला, आता आम्ही ज्ञान सागराची
संतान बनलो आहोत तर भक्तीची का बरे आठवण करावी! आम्ही एका भगवंताचीच आठवण करतो.
बाबांनी म्हटले आहे भक्तिमार्गाला विसरून जा. मी तुम्हाला सोपी गोष्ट ऐकवतो की, मज
बीजाची आठवण करा म्हणजे मग संपूर्ण झाड बुद्धीमध्ये आपोआपच येईल. तुमची मुख्य आहे -
गीता. गीतेमध्येच भगवंताची शिकवण आहे. आता या आहेत नवीन गोष्टी. नेहमी नवीन
गोष्टींवर जास्त लक्ष दिले जाते. आहे देखील अगदी सोपी गोष्ट. सर्वात मोठी गोष्ट आहे
आठवण करण्याची. वारंवार सांगावे लागते - मनमनाभव. बाबांची आठवण करा, याच खूप गूढ
गोष्टी आहेत, यामध्येच विघ्न पडतात. अशी बरीच मुले आहेत जी पूर्ण दिवसभरामध्ये दोन
मिनिटे सुद्धा आठवण करत नाहीत. बाबांचे बनून देखील चांगले कर्म करत नाहीत तर आठवण
देखील करत नाहीत, विकर्म करत राहतात. डोक्यातच शिरत नाही तर मग म्हणणार, हा
बाबांच्या आज्ञेचा अनादर आहे, शिकू शकणार नाहीत, ती ताकद मिळत नाही. भौतिक शिक्षणाने
देखील बळ मिळते ना. शिक्षण आहे सोर्स ऑफ इनकम. शरीर निर्वाह होतो तो देखील अल्प
काळासाठी. कितीतरी जण शिकता-शिकता मरून जातात तर ते शिक्षण थोडेच सोबत घेऊन जातील.
दुसरा जन्म घेऊन मग नव्याने शिकावे लागेल. इथे तर तुम्ही जितके शिकाल, ते सोबत घेऊन
जाल; कारण तुम्ही प्रालब्ध प्राप्त करता दुसऱ्या जन्मामध्ये. बाकी तर तो सर्व आहेच
भक्ति मार्ग. काय-काय गोष्टी आहेत, हे कोणीही जाणत नाहीत. रुहानी (आत्मिक) बाबा
तुम्हा आत्म्यांना बसून ज्ञान देतात. एकदाच बाबा, सुप्रीम आत्मा येऊन आत्म्यांना
नॉलेज देतात, ज्यामुळे विश्वाचे मालक बनता. भक्ति मार्गामध्ये स्वर्ग थोडाच असतो.
आता तुम्ही धणीचे (ईश्वराचे) बनला आहात. माया बरेचदा मुलांना देखील निधनका (अनाथ)
बनवते, छोट्या-छोट्या गोष्टींवरून आपसामध्ये भांडू लागतात. बाबांच्या आठवणीमध्ये
रहात नाहीत म्हणजे मग अनाथ झाले ना. अनाथ बनला तर जरूर काही ना काही पाप कर्म करणार.
बाबा म्हणतात माझे बनून माझे नाव बदनाम करू नका. एकमेकांशी खूप प्रेमाने वागा,
उलटे-सुलटे बोलू नका.
बाबांना अशा
प्रकारच्या अहिल्या, कुब्जा, भिल्लीणींचा देखील उद्धार करावा लागतो. म्हणतात -
भिल्लिणीची बोरे खाल्ली. आता असेच भिल्लिणीचे थोडेच खाऊ शकतो. भिल्लिणीची जेव्हा
ब्राह्मणी बनते तर मग का नाही खाणार! म्हणून ब्रह्मा भोजनाची महिमा आहे. शिवबाबा तर
खाणार नाहीत. ते तर अभोक्ता आहेत. बाकी हा रथ (ब्रह्मा बाबा) तर खातो ना. तुम्हा
मुलांना कोणाशीही आरग्यु (वाद-विवाद) करण्याची गरज नाही. नेहमी आपली बाजू सेफ ठेवली
पाहिजे. शब्दच दोन बोला - ‘शिवबाबा म्हणतात’. शिवबाबांनाच ‘रुद्र’ म्हटले जाते.
रुद्र ज्ञान यज्ञामधून विनाश ज्वाळा प्रगटली तर रुद्र भगवान झाले ना. श्रीकृष्णाला
तर रुद्र म्हणणार नाही. विनाश देखील काही श्रीकृष्ण करत नाहीत, बाबाच स्थापना,
विनाश, पालना करवितात. स्वतः काही करत नाहीत, नाही तर दोष येईल. ते आहेत
करनकरावनहार. बाबा म्हणतात - मी काही सांगत नाही की विनाश करा. हे सर्व ड्रामामध्ये
नोंदलेले आहे. शंकर काही करतो काय? काहीही नाही. हे फक्त गायन आहे की, शंकराद्वारे
विनाश. बाकी विनाश तर ते आपणच करत आहेत. हा अनादि बनलेला ड्रामा आहे जो समजावून
सांगितला जातो. रचयिता बाबांनाच सर्व विसरून गेले आहेत. म्हणतात - गॉड फादर रचयिता
आहेत परंतु त्यांना ओळखतच नाहीत. समजतात की ते दुनिया क्रिएट करतात. बाबा म्हणतात -
‘मी क्रिएट करत नाही, मी चेंज करतो. कलियुगाला सतयुग बनवतो. मी संगमावर येतो,
ज्यासाठी गायन केले आहे - सुप्रीम ऑस्पिसिअस युग (सर्वश्रेष्ठ शुभ युग)’. भगवान
कल्याणकारी आहेत, सर्वांचे कल्याण करतात परंतु कसे आणि काय कल्याण करतात, हे काहीच
जाणत नाहीत. इंग्रजीमध्ये म्हणतात लिबरेटर, गाईड, परंतु त्याचा अर्थ थोडेच समजतात.
म्हणतात भक्ती केल्याने भगवान भेटेल, सद्गती मिळेल. सर्वांची सद्गति काही कोणी
मनुष्य तर करू शकत नाही. नाहीतर मग परमात्म्याचे पतित-पावन, सर्वांचा सद्गती दाता
असे गायन का केले जाईल? बाबांना कोणीही जाणत नाहीत, निधण के (अनाथ) आहेत. बाबांशी
विपरीत-बुद्धी आहेत. मग आता बाबा तरी काय करणार. बाबा तर स्वतः मालक आहेत. त्यांची
शिवजयंती देखील भारतामध्ये साजरी करतात. बाबा म्हणतात - ‘मी येतो भक्तांना फळ
देण्यासाठी. येतो देखील भारतामध्ये. येण्यासाठी मला शरीर तर जरूर पाहिजे ना.
प्रेरणेने थोडेच काही होईल. यांच्यामध्ये (ब्रह्मा बाबांमध्ये) प्रवेश करून, यांच्या
मुखाद्वारे तुम्हाला ज्ञान देतो’. गोमुखाची गोष्ट नाही आहे. ही तर या मुखाची गोष्ट
आहे. मुख तर मनुष्याचे पाहिजे, ना की प्राण्याचे. एवढी सुद्धा बुद्धी काम करत नाही.
दुसऱ्या बाजूला मग भागीरथ दाखवतात, ते कसे आणि केव्हा येतात, जरा देखील कोणाला
माहिती नाही आहे. तर बाबा बसून मुलांना समजावून सांगतात की तुम्ही मेलात तर भक्ति
मार्गाला एकदम विसरून जा. शिव भगवानुवाच - माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील.
मीच पतित-पावन आहे. तुम्ही पवित्र बनलात की मग सर्वांना घेऊन जाईन. मेसेज घराघरात
द्या. बाबा म्हणतात - ‘माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील. तुम्ही पवित्र बनाल.
विनाश समोर उभा आहे. तुम्ही बोलावता देखील - ‘हे पतित-पावन या, पतितांना पावन बनवा,
रामराज्य स्थापन करा, रावण राज्यातून मुक्त करा’. ते प्रत्येक जण (दुनियेतील
साधू-संन्यासी) स्वतःसाठी प्रयत्न करतात. बाबा तर म्हणतात - ‘मी येऊन सर्वांची
मुक्ति करतो. सगळेच ५ विकाररूपी रावणाच्या जेलमध्ये पडले आहेत, मी सर्वांची सद्गती
करतो. मला म्हटले देखील जाते - दुःखहर्ता-सुखकर्ता’. रामराज्य तर जरूर नवीन
दुनियेमध्ये असेल.
तुम्हा पांडवांची आता
आहे प्रीत-बुद्धी. काहीजणांची तर लगेच प्रीत-बुद्धी बनते. काहीजणांची हळू-हळू प्रीत
जुळते. कोणी तर म्हणतात बस आम्ही सर्वकाही बाबांना सरेंडर करतो. या एकाशिवाय दुसरा
कोणी राहिलाच नाही. सर्वांचा सहारा एक गॉडच आहे. किती सोप्यात सोपी गोष्ट आहे.
बाबांची आठवण करा आणि चक्राची आठवण करा तर चक्रवर्ती राजा-राणी बनाल. हे स्कुल आहेच
विश्वाचा मालक बनण्यासाठी, म्हणूनच चक्रवर्ती राजा नाव पडले आहे. चक्राला जाणल्याने
मग चक्रवर्ती बनतात. हे बाबाच समजावतात. बाकी वाद-विवाद काहीही करायचे नाहीत. बोला,
भक्तिमार्गाच्या सर्व गोष्टी सोडा. बाबा म्हणतात - ‘फक्त माझी आठवण करा’. मुख्य
गोष्टच ही आहे. जे तीव्र पुरुषार्थी असतात ते जोमाने अभ्यासाला लागतात, ज्यांना
अभ्यासाची आवड असते ते पहाटे उठून अभ्यास करतात. भक्ती वाले देखील पहाटे उठतात. नवधा
भक्ति किती करतात, जेव्हा डोके छाटून टाकण्याच्या बेतात असतात तेव्हा मग
साक्षात्कार होतो. इथे तर बाबा म्हणतात हा साक्षात्कार देखील नुकसानदायी आहे.
साक्षात्कारमध्ये गेल्याने अभ्यास आणि योग दोन्ही बंद होते. टाइम वेस्ट होतो
त्यामुळे ध्यान इत्यादीची आवड तर बिलकुल ठेवायची नाही. हा देखील मोठा आजार आहे,
ज्यामुळे मायेची प्रवेशता होते. जसे युद्धाच्या वेळी न्यूज ऐकवतात तेव्हा मध्येच अशी
काही खराबी करतात ज्यामुळे कोणी ऐकू शकणार नाही. माया देखील बऱ्याच जणांसमोर विघ्न
आणते. बाबांची आठवण करू देत नाही. समजले जाते यांच्या नशिबामध्ये विघ्न आहेत. बघितले
जाते की मायेची प्रवेशता तर नाही आहे. काही बेकायदा तर बोलत नाहीत ना तर मग ताबडतोब
बाबा खाली उतरवतील. असे बरेच मनुष्य म्हणतात की, ‘आम्हाला फक्त साक्षात्कार घडावा
म्हणजे मग इतके सर्व धन-संपत्ती आम्ही तुम्हाला देऊन टाकू’. बाबा म्हणतात - ‘हे
तुम्ही तुमच्या जवळच ठेवा. भगवंताला तुमच्या पैशाची काय गरज पडली आहे’. बाबा तर
जाणतात या जुन्या दुनियेमध्ये जे काही आहे, सर्व भस्म होणार आहे. बाबा काय करतील?
बाबांकडे तर फुरी-फुरी (थेंबे-थेंबे) तलाव होतो. बाबांच्या डायरेक्शनवर चाला,
हॉस्पिटल कम युनिव्हर्सिटी सुरु करा, जिथे कोणीही येऊन विश्वाचे मालक बनू शकेल. ३
पावले पृथ्वीवर बसून तुम्हाला मनुष्यांना नरापासून नारायण बनवायचे आहे. परंतु
पृथ्वीची ३ पावलेसुद्धा मिळत नाहीत. बाबा म्हणतात - ‘मी तुम्हाला सर्व
वेद-शास्त्रांचे सार सांगतो’. ही सर्व शास्त्रे आहेत भक्तिमार्गाची’. बाबा काही
निंदा करत नाहीत. हा तर खेळ बनलेला आहे. हे फक्त समजावून सांगण्याकरिता बोलले जाते.
आहे तर तरीही खेळच ना खेळाची आपण निंदा करू शकत नाही. आपण म्हणतो - ‘ज्ञान सूर्य,
ज्ञान चंद्रमा’, तर मग ते (दुनियावाले) चंद्रावर जाऊन शोध घेतात. तिथे कोणती राजाई
ठेवली आहे काय? जपानी लोक सूर्याला मानतात. आपण म्हणतो सूर्यवंशी, ते मग बसून
सूर्याची पूजा करतात, सूर्याला पाणी देतात. तर बाबांनी मुलांना समजावून सांगितले आहे
कोणत्या गोष्टीमध्ये जास्त वाद-विवाद करायचा नाही. गोष्टच एक ऐकवा - ‘बाबा म्हणतात
- मामेकम् (मज एकाची) आठवण करा तर पावन बनाल’. आता रावण राज्यामध्ये सर्व पतित आहेत.
परंतु स्वतःला कोणी पतित मानतात थोडेच.
मुलांनो, तुमच्या एका
डोळ्यात शांतीधाम, एका डोळ्यात सुखधाम; बाकी या दुःखधामाला विसरून जा. तुम्ही आहात
चैतन्य लाईट हाऊस. आता प्रदर्शनीमध्ये देखील नाव ठेवले आहे - ‘भारत दी लाईट हाऊस…’
परंतु ते थोडेच काही समजतील. तुम्ही आता लाईट हाऊस आहात ना. बंदरावर लाईट हाऊस
बोटीला रस्ता दाखवतात. तुम्ही देखील सर्वांना रस्ता दाखवता मुक्ति आणि जीवनमुक्ती
धामचा. जेव्हा कोणीही प्रदर्शनीमध्ये येतात तेव्हा अतिशय प्रेमाने बोला - गॉड फादर
तर सर्वांचा एक आहे ना. गॉड फादर अथवा परमपिता म्हणतात की, ‘माझी आठवण करा’, तर
जरूर मुखाद्वारेच सांगतील ना. ब्रह्माद्वारे स्थापना, आपण सर्व ब्राह्मण-ब्राह्मणी
आहोत ब्रह्मा मुख वंशावली. तुम्हा ब्राह्मणांची ते ब्राह्मण देखील महिमा गातात -
‘ब्राह्मण देवताय नमः’. उच्च ते उच्च आहेतच एक बाबा. ते म्हणतात मी तुम्हाला उच्च
ते उच्च राजयोग शिकवतो, ज्यामुळे तुम्ही सर्व विश्वाचे मालक बनता. ती राजाई तुमच्या
कडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. भारताचे विश्वावर राज्य होते. भारताची किती महिमा
आहे. आता तुम्ही जाणता की, आपण श्रीमतावर हे राज्य स्थापन करत आहोत. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) तीव्र
पुरुषार्थी बनण्यासाठी अभ्यासाची आवड असली पाहिजे. पहाटे उठून अभ्यास करायचा आहे.
साक्षात्काराची आशा ठेवायची नाही, यामध्ये देखील वेळ वाया जातो.
२) शांतीधाम आणि
सुखधामाची आठवण करायची आहे, या दुःखधामाला विसरायचे आहे. कोणाशीही वाद-विवाद करायचा
नाही, प्रेमाने मुक्ति आणि जीवनमुक्तीचा रस्ता दाखवायचा आहे.
वरदान:-
सदैव सुखाच्या
सागरामध्ये लवलीन राहणारे अंतर्मुखी भव म्हटले जाते - ‘अंतर्मुखी सदा सुखी’. जी मुले
सदैव ‘अंतर्मुखी भव’चे वरदान प्राप्त करतात ते बाप समान सदैव सुखाच्या सागरामध्ये
लवलीन राहतात. सुखदात्याची मुले स्वतः देखील सुखदाता बनतात. सर्व आत्म्यांना
सुखाचाच खजिना वाटतात. तर आता अंतर्मुखी बनून अशी संपन्न मूर्ति बना जेणेकरून
तुमच्याकडे कोणीही कोणत्याही भावनेने आला तरीही आपली भावना संपन्न करून जावा. जसे
बाबांच्या खजिन्यामध्ये अप्राप्त कोणती वस्तू नाही, तसे तुम्ही देखील बाप समान
भरपूर बना.
बोधवाक्य:-
रुहानी
शानमध्ये रहा तर कधीही अभिमानाची फिलिंग (भावना) येणार नाही.
अव्यक्त इशारे -
एकांतप्रिय बना आणि एकाग्रतेला धारण करा:-
अव्यक्त इशारे -
एकांतप्रिय बना एकता आणि एकाग्रतेला धारण करा:- स्वतःला सदैव अंडरग्राउंड अर्थात
अंतर्मुखी बनविण्याचा प्रयत्न करा. सर्व कारभार अंडरग्राउंड देखील चालतो तसे
अंतर्मुखी होऊन देखील कार्य करू शकता. अंतर्मुखी होऊन कार्य केल्याने एक तर
विघ्नांपासून बचाव, दुसरे वेळेची बचत, तिसरे संकल्पांचा बचाव अथवा बचत होईल.
एकांतवासी देखील आणि त्याचसोबत रमणिकता देखील तितकीच असावी.