19-03-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - तुम्हाला या जुन्या दुनियेतून आणि जुन्या शरीरातून जिवंतपणी मरून घरी
जायचे आहे, त्यामुळे देह-अभिमान सोडून देही-अभिमानी बना”
प्रश्न:-
चांगल्या-चांगल्या पुरुषार्थी मुलांची खूण काय असेल?
उत्तर:-
जे चांगले पुरुषार्थी आहेत ते पहाटे उठून देही-अभिमानी होऊन राहण्याचा सराव करतील.
ते एका बाबांची आठवण करण्याचा पुरुषार्थ करतील. त्यांचे लक्ष्य असते की इतर
कोणत्याही देहधारीची आठवण येऊ नये, निरंतर बाबा आणि ८४ च्या चक्राची आठवण रहावी. हे
सुद्धा अहो सौभाग्य म्हणावे लागेल.
ओम शांती।
आता तुम्ही मुले जिवंतपणी मेलेले आहात. कसे मेले आहात? देह-अभिमानाला सोडले आहे तर
बाकी राहिली आत्मा. शरीर तर नष्ट होते. आत्मा मरत नाही. बाबा म्हणतात जिवंतपणी
स्वतःला आत्मा समजा आणि परमपिता परमात्म्यासोबत योग लावल्याने आत्मा पवित्र होईल.
जोपर्यंत आत्मा पूर्ण पवित्र बनत नाही तोपर्यंत पवित्र शरीर मिळू शकत नाही. आत्मा
पवित्र बनली तर मग हे जुने शरीर आपोआप सुटेल, जशी सापाची कात आपोआप सुटते,
त्याच्याबद्दलचा मोह नष्ट होतो, तो जाणतो आपल्याला आता नवीन खाल (कातडी) मिळाली आहे,
जुनी गळून जाईल. प्रत्येकाला आपापली बुद्धी तर असते ना. आता तुम्ही मुले समजता आम्ही
जिवंतपणी या जुन्या दुनियेतून, जुन्या शरीरातून मेलेले आहोत मग तुम्ही आत्मे देखील
शरीर सोडून कुठे जाल? आपल्या घरी. सर्व प्रथम तर हे पक्के लक्षात ठेवायचे आहे की,
आपण आत्मा आहोत, शरीर नाही. आत्मा म्हणते - ‘बाबा, आम्ही तुमचे झालो आहोत, जिवंतपणी
मेलो आहोत’. आता आत्म्याला आज्ञा मिळाली आहे की, मज पित्याची आठवण करा तर तुम्ही
तमोप्रधानापासून सतोप्रधान बनाल. हा आठवणीचा अभ्यास पक्का पाहिजे. आत्मा म्हणते -
‘बाबा, तुम्ही आला आहात तर आम्ही तुमचेच बनणार’. आत्मा मेल (पुरुष) आहे, फीमेल (स्त्री)
नाही. नेहमी म्हणतात - आपण सर्व भाऊ-भाऊ आहोत, असे थोडेच म्हणतात की, आपण सर्व बहिणी
आहोत; सर्व मुले आहेत. सर्व मुलांना वारसा मिळणार आहे. जर स्वतःला मुलगी म्हटले तर
वारसा कसा मिळेल? आत्मे सर्व भाऊ-भाऊ आहेत. बाबा सर्वांना म्हणतात - ‘रूहानी मुलांनो,
माझी आठवण करा’. आत्मा किती छोटी आहे. या अति सूक्ष्म समजून घेण्याच्या गोष्टी आहेत.
मुलांना आठवण रहातच नाही. संन्यासी लोक दृष्टान्त देतात - ‘मी म्हैस आहे, मी म्हैस
आहे…’ असे म्हणत राहिल्यामुळे मग म्हैस बनतात. आता प्रत्यक्षात कोणी म्हैस थोडेच
बनतात. बाबा तर म्हणतात - स्वतःला आत्मा समजा. हे आत्मा आणि परमात्म्याचे ज्ञान
कोणालाच नाही आहे त्यामुळे कसल्या-कसल्या गोष्टी बोलत राहतात. आता तुम्हाला
देही-अभिमानी बनायचे आहे, मी आत्मा आहे, हे जुने शरीर सोडून मला जाऊन नवीन घ्यायचे
आहे. मनुष्य तोंडाने म्हणतात देखील आत्मा तारा आहे, भृकुटीच्या मध्यभागी रहाते आणि
मग म्हणतात - अंगुष्ठाकार आहे. आता तारा कुठे, अंगठा कुठे! आणि मग बसून मातीचे
शाळिग्राम बनवतात, इतकी मोठी आत्मा तर असू शकत नाही. मनुष्य देह-अभिमानी आहेत ना तर
बनवतात देखील मोठ्या रूपामध्ये. या तर अति सूक्ष्म बारकाईच्या गोष्टी आहेत. मनुष्य
भक्ती देखील एकांतामध्ये, देवघरात बसून करतात. तुम्हाला तर गृहस्थीमध्ये राहून,
कामधंदा इत्यादी करत असताना बुद्धीमध्ये हे पक्के करायचे आहे - आपण आत्मा आहोत. बाबा
म्हणतात - मी तुमचा पिता देखील अगदी छोटा बिंदू आहे. असे नाही की मी मोठा आहे.
माझ्यामध्ये सर्व ज्ञान आहे. आत्मा आणि परमात्मा दोन्ही एकसारखेच आहेत, फक्त त्यांना
सुप्रीम (सर्वोच्च) म्हटले जाते. हे ड्रामामध्ये नोंदलेलेच आहे. बाबा म्हणतात - मी
तर अमर आहे. मी अमर नसतो तर तुम्हाला पावन कसे बनवणार. तुम्हाला ‘गोड मुलांनो’
म्हणून हाक कशी मारू. आत्माच सर्व काही करते. बाबा येऊन देही-अभिमानी बनवतात,
यामध्येच मेहनत आहे. बाबा म्हणतात - माझी आठवण करा, इतर कोणाचीही आठवण करू नका. योगी
तर दुनियेमध्ये खूप आहेत. मुलीचा साखरपुडा झाला की तिचा योग पतीसोबत लागतो ना. आधी
थोडाच होता? पतीला बघते आणि मग त्याच्याच आठवणीमध्ये रहाते. आता बाबा म्हणतात -
मामेकम् (मज एकाची) आठवण करा. ही खूप चांगली प्रॅक्टिस केली पाहिजे. जी
चांगली-चांगली पुरुषार्थी मुले आहेत ती पहाटे उठून देही-अभिमानी रहाण्याची
प्रॅक्टिस करतील. भक्ती देखील पहाटे करतात ना. आपल्या-आपल्या इष्ट देवाची आठवण
करतात. हनुमानाची सुद्धा किती पूजा करतात परंतु जाणत काहीच नाहीत. बाबा येऊन
समजावून सांगत आहेत - तुमची बुद्धी माकडासारखी झाली आहे. आता पुन्हा तुम्ही देवता
बनत आहात. आता ही आहे पतित तमोप्रधान दुनिया. आता तुम्ही आला आहात बेहदच्या बाबांकडे.
मी तर पुनर्जन्मरहित आहे. हे शरीर या दादाचे (ब्रह्माचे) आहे. माझे काही शरीराचे
नाव नाही आहे. माझे नावच आहे कल्याणकारी शिव. तुम्ही मुले जाणता कल्याणकारी शिवबाबा
येऊन नरकाला स्वर्ग बनवतात. किती कल्याण करतात. नरकाचा एकदम विनाश करून टाकतात. आता
प्रजापिता ब्रह्माद्वारे स्थापना होत आहे. ही आहे प्रजापिता ब्रह्मा मुख वंशावली.
चालता-फिरता एकमेकांना सावध करायचे आहे - मन्मनाभव. बाबा म्हणतात - ‘माझी आठवण करा
तर विकर्म विनाश होतील’. पतित-पावन तर बाबा आहेत ना. त्यांनी चुकून भगवानुवाचच्या
ऐवजी श्रीकृष्ण भगवानुवाच लिहिले आहे. भगवान तर निराकार आहेत, त्यांना परमपिता
परमात्मा म्हटले जाते. त्यांचे नाव आहे - शिव. शिवाची पूजा देखील खूप होते. ‘शिव
काशी, शिव काशी’ असे म्हणत राहतात. भक्तीमार्गामध्ये अनेक प्रकारची नावे ठेवली आहेत.
कमाईसाठी अनेक मंदिरे बनवली आहेत. खरे नाव आहे - शिव. आणि मग सोमनाथ ठेवले आहे,
सोमनाथ सोमरस पाजतात, ज्ञान-धन देतात. मग जेव्हा पुजारी बनतात तेव्हा त्यांचे मंदीर
बनवण्यासाठी किती खर्च करतात कारण सोमरस दिला आहे ना. सोमनाथा सोबत सोमनाथीनी सुद्धा
असेल! यथा राजा-राणी तथा प्रजा सर्व सोमनाथ सोमनाथिनी आहेत. तुम्ही सोन्याच्या
दुनियेमध्ये जाता. तिथे सोन्याच्या विटा असतात. नाही तर भिंती इत्यादी कशा बनतील!
पुष्कळ सोने असते म्हणून तिला सोन्याची दुनिया म्हटले जाते. ही आहे लोखंड आणि
दगडांची दुनिया. स्वर्गाचे नाव ऐकूनच तोंडाला पाणी सुटते. विष्णूची दोन रूपे
लक्ष्मी-नारायण वेगवेगळी बनतील ना. तुम्ही विष्णूपुरीचे मालक बनता. आता तुम्ही आहात
रावणपुरीमध्ये. तर आता बाबा म्हणतात - फक्त स्वत:ला आत्मा समजून मज पित्याची आठवण
करा. बाबा देखील परमधाममध्ये रहातात, तुम्ही आत्मे देखील परमधाममध्ये राहता. बाबा
म्हणतात तुम्हाला काही त्रास देत नाही. खूप सोपे आहे. बाकी हा रावण शत्रू तुमच्या
समोर उभा आहे. तो विघ्न (अडचणी) उत्पन्न करतो. ज्ञानामध्ये कधी अडचणी येत नाहीत,
अडचणी येतात आठवण करण्यामध्ये. घडोघडी माया आठवण विसरायला लावते. देह-अभिमानामध्ये
आणते. बाबांची आठवण करू देत नाही, हे युद्ध चालते. बाबा म्हणतात - तुम्ही कर्मयोगी
तर आहातच. अच्छा, दिवसभरामध्ये आठवण करू शकत नसाल तर रात्रीची आठवण करा. रात्रीचा
अभ्यास दिवसा उपयोगी पडेल.
निरंतर स्मृती रहावी
- जे बाबा आम्हाला विश्वाचे मालक बनवतात, त्यांची आम्ही आठवण करत आहोत! बाबांची
आठवण आणि ८४ जन्मांच्या चक्राची आठवण राहिली तरी अहो सौभाग्य. इतरांना देखील ऐकवायचे
आहे - बंधू आणि भगिनींनो, आता कलियुग पूर्ण होऊन सतयुग येत आहे. बाबा आले आहेत,
सतयुगासाठी राजयोग शिकवत आहेत. कलियुगानंतर सतयुग येणार आहे. एका बाबांव्यतिरिक्त
इतर कोणाचीही आठवण करायची नाही. जे वानप्रस्थी असतात ते जाऊन संन्याशांची संगत
करतात. वानप्रस्थ, तिथे बोलण्याची गरज नाही. आत्मा शांत असते. लीन तर होऊ शकत नाही.
ड्रामा मधून कोणताही ॲक्टर बाहेर पडू शकत नाही. बाबांनी हे देखील समजावून सांगितले
आहे एका बाबांव्यतिरिक्त इतर कोणाचीही आठवण करायची नाही. बघितले तरीही आठवण करू नका.
ही जुनी दुनिया तर विनाश होणार आहे, कब्रस्थान आहे ना. मेलेल्यांची कधी आठवण केली
जाते का! बाबा म्हणतात - हे सगळे मरून पडलेले आहेत. मी आलो आहे, पतितांना पावन
बनवून घेऊन जातो. इथे हे सगळे नष्ट होणार आहेत. आजकाल बॉम्बस् इत्यादी जे काही
बनवतात ते खूप शक्तीशाली आणि वेगवान बनवत रहातात. म्हणतात - इथे बसून ज्यांच्यावर
टाकू त्यांच्यावरच पडतील. हे नोंदलेले आहे, पुन्हा विनाश होणार आहे. भगवान येतात,
नवीन दुनियेकरिता राजयोग शिकवत आहेत. हे महाभारत युद्ध आहे, ज्याचे वर्णन
शास्त्रांमध्ये आहे. खरोखर भगवान आलेले आहेत - स्थापना आणि विनाश करण्याकरिता.
चित्र देखील स्पष्ट आहे, तुम्ही साक्षात्कार करत आहात - आम्ही हे बनणार. इथला हा
अभ्यास संपून जाईल. तिथे तर बॅरिस्टर, डॉक्टर वगैरेंची गरजच नसते. तुम्ही तर इथला
वारसा घेऊन जाता. कौशल्यसुद्धा (कला, देखील) सर्व इथून घेऊन जाल. घरे इत्यादी
बनवणारे उत्तम दर्जाचे असतील तर तिथे देखील बनवतील. बाजार इत्यादी सुद्धा असतील ना.
काम तर चालेल. इथून शिकलेली हुशारी घेऊन जातात. विज्ञानापेक्षाही जास्त चांगले
कौशल्य आत्मसात करतात. ते सर्व तिथे उपयोगी पडेल. प्रजेमध्ये जातील. तुम्हा मुलांना
काही प्रजेमध्ये यायचे नाहीये. तुम्ही आला आहात बाबा-मम्माच्या तख्तनशीन बनण्याकरिता.
बाबा जे श्रीमत देतात त्यानुसार चालायचे आहे. सर्वोत्तम श्रीमत तर एकच देतात की,
माझी आठवण करा. कोणाचे भाग्य अनायसे सुद्धा उघडते. कुणीतरी कारण निमित्त बनतात.
कुमारींना सुद्धा बाबा म्हणतात - लग्नामुळे तर सर्वनाश होईल. या गटारात पडू नका.
काय तुम्ही बाबांचे ऐकणार नाही काय! स्वर्गाची महाराणी बनणार नाही! स्वतःशीच
प्रतिज्ञा केली पाहिजे की आम्ही त्या दुनियेमध्ये कधीही जाणार नाही. त्या दुनियेची
आठवणसुद्धा करणार नाही. स्मशानाची कधी आठवण काढतात का! इथे तर तुम्ही म्हणता कधी
एकदा हे शरीर सुटेल म्हणजे मग आम्ही आमच्या स्वर्गामध्ये जाऊ. आता ८४ जन्म पूर्ण
झाले, आता आम्ही आपल्या घरी जात आहोत. इतरांना देखील हेच ऐकवायचे आहे. तुम्ही हे
देखील समजता - सतयुगाचे राज्य बाबांशिवाय इतर कोणीही देऊ शकत नाही.
या रथाला (ब्रह्मा
तनाला) देखील कर्मभोग तर भोगावा लागतोच. बापदादांची सुद्धा आपसामध्ये रुहरिहान चालते
(आत्मिक गप्पा चालतात) - हे बाबा (ब्रह्मा बाबा शिवबाबांना) म्हणतात - ‘बाबा,
आशिर्वाद द्या. खोकल्यासाठी काही औषध द्या किंवा छू मंत्राने नाहीसा करा’. शिवबाबा
ब्रह्माबाबांना म्हणतात - नाही, हे तर भोगायचेच आहे. हा तुमचा रथ घेतला त्याच्या
मोबदल्यात तर देतोच, बाकी हा तर तुमचा हिशोब आहे. शेवटपर्यंत काही ना काही होत
राहील. तुम्हाला आशिर्वाद दिला (कृपा केली) तर सर्वांना द्यावा लागेल. आज ही छोटी
मुलगी इथे बसली आहे, उद्या रेल्वेचा ॲक्सिडेंट झाला आणि मेली, तर बाबा म्हणतील -
ड्रामा. असे थोडेच म्हणू शकता की बाबांनी आधी का नाही सांगितले. तसा नियमच नाही. मी
तर येतो पतितापासून पावन बनविण्यासाठी. हे सांगण्यासाठी थोडाच आलो आहे. हा हिशोब तर
तुम्हाला आपापला चुकता करायचा आहे. यामध्ये आशिर्वादाचा काही प्रश्नच नाही.
याच्यासाठी संन्याशांकडे जा. बाबा तर एकच गोष्ट सांगतात. मला तर बोलावलेच आहे यासाठी
की, येऊन आम्हाला नरकातून स्वर्गामध्ये घेऊन जा. गातात देखील - ‘पतित-पावन सीताराम’.
परंतु अर्थ उलटा घेतला आहे. मग बसून रामाची महिमा करतात - ‘रघुपती राघव राजा राम…’
बाबा म्हणतात या भक्तीमार्गामध्ये तुम्ही किती पैसा घालवला आहे. एक गाणे देखील आहे
ना - ‘काय कौतुक बघितले…’ देवींच्या मुर्त्या बनवून पूजा करतात आणि मग समुद्रात
बुडवतात (विसर्जित करतात). आता समजते आहे की, किती पैसा बरबाद करतात, तरीही हे
पुन्हा होणार. सतयुगामध्ये तर असे काम होतच नाही. सेकंदा-सेकंदाची नोंद आधीच झालेली
आहे. कल्पानंतर पुन्हा हीच गोष्ट रिपीट होणार. ड्रामाला अगदी चांगल्या प्रकारे
समजून घ्यायचे आहे. अच्छा, कोणी जास्त आठवण करू शकत नसतील तर बाबा सांगतात फक्त अलफ
आणि बे, बाबा आणि बादशाहीची आठवण करा. आतल्याआत हीच धून लावा की, मी आत्मा कशी ८४
चे चक्र फिरून आली आहे. चित्रांवरून समजावून सांगा, खूप सोपे आहे. ही आहे रूहानी
मुलांसोबत रुहरिहान (आत्मिक गप्पा) आहेत. बाबा रुहरिहान करतातच मुळी मुलांसोबत. इतर
कोणाशी तर करू शकत नाहीत. बाबा म्हणतात - स्वतःला आत्मा समजा. आत्माच सर्व काही करते.
बाबा आठवण करून देतात, तुम्ही ८४ जन्म घेतले आहेत. मनुष्यच बनले आहात. जसे बाबा
वटहुकूम काढतात की विकारामध्ये जायचे नाही, तसा हा सुद्धा वटहुकूम काढतात की, कोणीही
रडायचे नाही. सतयुग-त्रेतामध्ये कधी कोणी रडत नाहीत, छोटी मुलेसुद्धा रडत नाहीत.
रडण्याचा कायदा नाही. ती तर आहेच हर्षित राहण्याची दुनिया. त्याची पूर्ण प्रॅक्टिस
आत्ता करायची आहे. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) बाबांकडून
आशिर्वाद मागण्याऐवजी आठवणीच्या यात्रेने आपला सर्व हिशोब चुकता करायचा आहे. पावन
बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. या ड्रामाला व्यवस्थित जाणून घ्यायचे आहे.
२) या जुन्या दुनियेला
बघत असताना सुद्धा त्याची आठवण करायची नाही. कर्मयोगी बनायचे आहे. सदैव हर्षित
रहाण्याचा अभ्यास करायचा आहे. कधीही रडायचे नाही.
वरदान:-
प्रवृत्तीमध्ये
राहत असताना ‘मी’पणाचा त्याग करणारे सच्चे ट्रस्टी, मायाजीत भव
जशी घाणीमध्ये
किड्यांची पैदास होते तसेच जेव्हा ‘माझे’पणा येतो तेव्हा मायेचा जन्म होतो. मायाजीत
बनण्याचा सोपा उपाय आहे - स्वतःला कायम ट्रस्टी समजा. ब्रह्माकुमार अर्थात ट्रस्टी,
ट्रस्टीला कधीच कशाचे आकर्षण वाटत नाही कारण त्यांच्यामध्ये ‘माझे’पणा असत नाही.
गृहस्थी समजाल तर माया येईल आणि ट्रस्टी समजाल तर माया पळून जाईल. त्यामुळे न्यारे
होऊन (त्रयस्थ होऊन) मग प्रवृत्तीची कार्ये कराल तर मायाप्रूफ रहाल.
बोधवाक्य:-
जिथे अभिमान
असतो तिथे अपमानाची भावना नक्की येते.
अव्यक्त इशारे -
सत्यता आणि सभ्यता रुपी कल्चरला (संस्कृतीला) धारण करा:- आपली आंतरिक स्वच्छता,
सत्यता उठण्यामध्ये, बसण्यामध्ये, बोलण्यामध्ये, सेवा करण्यामध्ये लोकांना अनुभव
व्हावी तर परमात्म प्रत्यक्षतेचे निमित्त बनू शकाल; यासाठी पवित्रतेची ज्योत सदैव
पेटती ठेवा, जरासुद्धा चलबिचल व्हायला नको, जितकी पवित्रतेची ज्योत स्थिर असेल तितके
सर्वजण सहजपणे बाबांना ओळखू शकतील.