19-03-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - जसे बापदादा दोघेही निरहंकारी आहेत, देही-अभिमानी आहेत, असे फालो फादर
करा, म्हणजे मग कायम उन्नती होत राहील”
प्रश्न:-
उच्च पदाच्या
प्राप्तीसाठी कोणती दक्षता घेणे गरजेचे आहे?
उत्तर:-
१. उच्च पद प्राप्त करायचे असेल तर ही दक्षता घ्या की, माझ्याकडून कोणालाही
मन्साद्वारा सुद्धा दुःख होऊ नये. २. कोणत्याही परिस्थितीमध्ये राग येऊ नये. ३.
बाबांचे बनून बाबांच्या कार्यामध्ये, या रुद्र यज्ञामध्ये विघ्न रूप बनू नये. जर
कोणी मुखाद्वारे ‘बाबा-बाबा’ म्हणेल आणि वर्तन जर रॉयल नसेल तर उच्च पद मिळू शकणार
नाही.
ओम शांती।
मुले चांगल्या रीतीने जाणतात की, बाबांकडून वारसा जरूर मिळवायचा आहे. कसा?
श्रीमतावर. बाबांनी समजावून सांगितले आहे की, गीता शास्त्र एकच आहे ज्यामध्ये
श्रीमत् भगवानुवाच आहे. भगवान तर सर्वांचे पिता आहेत. श्रीमत् भगवानुवाच. तर जरूर
भगवंताने येऊन श्रेष्ठ बनविले असेल, तेव्हाच तर त्यांची महिमा आहे. श्रीमत् भगवत
गीता अर्थात श्रीमत् भगवानुवाच. भगवान तर जरूर उच्च ते उच्च आहेत. श्रीमत देखील
त्याच एका शास्त्रामध्ये गायले गेले आहे, इतर कोणत्याही शास्त्रामध्ये ‘श्रीमत्
भगवानुवाच’ नाही आहे. श्रीमत कोणाचे असले पाहिजे तेच लिहिणारे देखील समजू शकत नाहीत.
त्यामध्ये चूक का झाली आहे? ते देखील बाबा येऊन समजावून सांगतात. रावण राज्य सुरू
झाल्यानेच रावण मतावर चालू लागतात. पहिली सर्वात मोठ्यात मोठी चूक या रावण मत
असणाऱ्यांनी केली आहे. रावणाची थप्पड बसते. जसे म्हटले जाते शंकर प्रेरक आहेत,
बॉम्ब्स इत्यादी बनवून घेतले आहेत. तसेच मनुष्यांना पतित बनविण्यामध्ये ५ विकार रुपी
रावण प्रेरक आहे, तेव्हाच तर बोलावतात - ‘हे पतित-पावन या’. तर पतित-पावन एकच झाले
ना. यावरून सिद्ध होते की पतित बनविणारा कोणी दुसराच आहे, पावन बनविणारा वेगळा आहे.
दोघेही एक असूच शकत नाहीत. या गोष्टी तुम्हीच नंबरवार पुरुषार्थानुसार समजता. असे
समजू नका की सर्वांना निश्चय आहे. नंबरवार आहेत. जितका निश्चय आहे तितका आनंद वाढतो.
बाबांच्या मतावर चालावे लागते. श्रीमतावर आपल्याला हे स्वराज्याचे पद प्राप्त करायचे
आहे. मनुष्या पासून देवता बनण्यासाठी वेळ लागत नाही. तुम्ही पुरुषार्थ करता. मम्मा,
बाबांना फॉलो करता. जसे ते आप समान बनविण्याची सेवा करत आहेत, तुम्ही देखील समजता
आपण काय सेवा करत आहोत आणि मम्मा, बाबा काय सेवा करत आहेत. बाबांनी सांगितले होते
की शिवबाबा आणि ब्रह्मा दादा दोघेही एकत्रित आहेत. तर समजले पाहिजे की सर्वात जवळ
आहेत. यांचेच (ब्रह्मा बाबांचेच) संपूर्ण रूप सूक्ष्मवतनमध्ये बघतो तर जरूर हे
तीव्र (वेगाने पुढे जाणारे) असतील. परंतु जसे बाबा निरहंकारी आहेत, देही-अभिमानी
आहेत तसेच हे दादा देखील निरहंकारी आहेत. म्हणतात की, शिवबाबाच समजावून सांगत असतात.
जेव्हा मुरली चालते तेव्हा बाबा स्वतः म्हणतात की नेहमी असेच समजा की शिवबाबा
यांच्याद्वारे सांगत आहेत. हे ब्रह्मा देखील जरूर ऐकत असतील. यांनी (ब्रह्मा बाबांनी)
जर ऐकले नाही आणि इतरांना ऐकवले नाही तर मग पद कसे प्राप्त करतील. परंतु आपला
देह-अभिमान सोडून म्हणतात की, ‘असेच समजा की शिवबाबाच ऐकवत आहेत. मी पुरुषार्थ करत
राहतो. शिवबाबाच समजावून सांगत आहेत’. हे (ब्रह्मा बाबा) तर अपवित्र होण्याच्या
अवस्थेमधून गेलेले आहेत. मम्मा तर कुमारी होती. तर मम्मा उच्च पदाला गेली. तुम्ही
देखील सर्व कुमारींनी मम्माला फॉलो करा. गृहस्थींनी बाबांना फॉलो केले पाहिजे.
प्रत्येकाने समजून घ्यायचे आहे की, मी पतित आहे, मला पावन बनायचे आहे. मुख्य गोष्ट
बाबांनी आठवणीची यात्रा शिकवली आहे. यामध्ये देह-अभिमान राहता कामा नये. अच्छा, कोणी
मुरली ऐकू शकत नाही तर आठवणीच्या यात्रेवर राहा. यात्रेवर राहून मुरली चालवू शकता.
परंतु यात्रा विसरलात तरी देखील काही हरकत नाही. मुरली चालवून मग यात्रेवर राहा (आठवणीमध्ये
रहा), कारण तीच वाणीपासून परे वानप्रस्थ अवस्था आहे. मुख्य गोष्ट आहे देही-अभिमानी
होऊन बाबांची आठवण करत राहणे आणि चक्राची आठवण करत राहणे. कोणालाही दुःख देऊ नये.
हेच सांगत राहा की, बाबांची आठवण करा. ही आहे यात्रा. मनुष्य जेव्हा मरतात तेव्हा
म्हणतात - स्वर्गवासी झाला. अज्ञान काळामध्ये कोणीही स्वर्गाची आठवण करत नाहीत.
स्वर्गाची आठवण करणे अर्थात इथून मरणे. असे तर कोणी आठवण करत नाही. आता तुम्ही मुले
जाणता आपल्याला परत जायचे आहे. बाबा म्हणतात - जितकी तुम्ही आठवण कराल तितका आनंदाचा
पारा चढेल, वारसा लक्षात राहील. जितकी बाबांची आठवण कराल तितके हर्षित राहाल.
बाबांची आठवण न केल्यामुळे गोंधळून जातात. घुसमटत राहतात. तुम्ही इतका वेळ आठवण करू
शकत नाही. बाबांनी आशिक-माशुकचे उदाहरण सांगितले आहे. ते भले काम-धंदा इत्यादी
करतात आणि ती चरखा जरी चालवत असली तरी देखील तिच्या समोर माशुक येऊन उभा राहतो.
आशिक माशुकची आठवण करते, माशुक मग आशिकची आठवण करतो. इथे तर तुम्हाला फक्त एका
बाबांची आठवण करायची आहे. ते सर्वांचे माशुक आहेत. तुम्ही मुले लिहिता की, ‘बाबा,
तुम्ही आमची आठवण करता का’? अरे, जो सर्वांचा माशुक आहे तो मग तुम्हा आशिकांची आठवण
कशी बरें करू शकेल? असे होऊ शकत नाही. तो आहेच माशुक. आशिक बनू शकत नाही. तुम्हालाच
माझी आठवण करायची आहे. तुम्हा प्रत्येकाला आशिक बनायचे आहे, त्या एका माशुकचे. जर
ते आशिक बनले तर कितीजणांची आठवण करावी लागेल. असे होऊ शकत नाही. म्हणतात की,
माझ्यावर पापांचे ओझे थोडेच आहे जे मी कोणाची आठवण करेन. तुमच्यावर ओझे आहे. बाबांची
आठवण केली नाहीत तर पापांचे ओझे उतरणार नाही. बाकी मला कशासाठी कोणाची आठवण करावी
लागेल. आठवण करायची आहे तुम्हा आत्म्यांना. जितकी आठवण कराल तितके पुण्य आत्मा बनाल,
पापे नष्ट होत जातील. लक्ष्य फार मोठे आहे. देही-अभिमानी बनण्यामध्येच मेहनत आहे.
हे सारे नॉलेज तुम्हाला मिळत आहे. तुम्ही नंबरवार पुरुषार्था नुसार त्रिकालदर्शी
बनत आहात. सारे चक्र तुमच्या बुद्धीमध्ये राहिले पाहिजे. बाबा म्हणतात - तुम्ही
लाईट हाऊस आहात ना. प्रत्येकाला शांतीधाम आणि सुखधामचा रस्ता सांगणारे आहात. या
सर्व नवीन गोष्टी तुम्हीच ऐकता. तुम्ही जाणता की खरोखर आपण आत्मे शांतीधामचे रहिवासी
आहोत. इथे पार्ट बजावण्याकरिता येतो. आपण ॲक्टर आहोत, हेच चिंतन बुद्धीमध्ये चालत
राहील तर मस्ती चढेल. बाबांनी समजावून सांगितले आहे - आदि पासून अंतापर्यंत तुमचा
पार्ट आहे. आता कर्मातीत अवस्थेमध्ये जरूर जायचे आहे आणि मग पुन्हा गोल्डन एज्डमध्ये
यायचे आहे. याच धूनमध्ये राहून आपले कल्याण करायचे आहे. केवळ पंडित बनायचे नाहीये.
दुसऱ्यांना शिकवत राहाल आणि स्वतः त्या अवस्थेमध्ये राहिला नाहीत तर प्रभाव पडणार
नाही. आपला देखील पुरुषार्थ करायचा आहे. बाबा (ब्रह्मा बाबा) देखील सांगतात की, ‘मी
देखील आठवण करण्याचा प्रयत्न करतो. एकदम मायेचे वादळ असे येते जे बुद्धीचा योग
तोडून टाकते. पुष्कळ मुले चार्ट लिहून पाठवतात. मला आश्चर्य वाटते की हे तर
माझ्यापेक्षा देखील तीव्र गतीने जात आहेत’. कदाचित आठवणीची गती वाढते तेव्हा चार्ट
लिहू लागतात परंतु अशी जर तीव्र गती असेल तर नंबर वन मध्ये जातील. परंतु नाही, ते
फक्त चार्ट लिहिण्यापर्यंतच. असे लिहीत नाहीत की, ‘बाबा, मी इतक्या जणांना आप समान
बनविले’. आणि त्याने देखील लिहावे की, ‘बाबा, आम्हाला यांनी हा रस्ता सांगितला आहे’.
असा काही समाचार येत नाही. तर मग बाबांनी काय समजावे? फक्त चार्ट पाठवून चालणार नाही.
आप समान देखील बनवायचे आहे. ‘रूप’ आणि ‘बसंत’ दोन्ही बनायचे आहे. नाही तर बाप समान
होणार नाही. रूप देखील आणि बसंत देखील दोन्ही ॲक्युरेट बनायचे आहे, यामध्येच मेहनत
आहे. देह-अभिमान मारून टाकतो. रावणाने देह-अभिमानी बनविले आहे. आता तुम्ही
देही-अभिमानी बनता. मग अर्ध्या कल्पानंतर माया रावण देह-अभिमानी बनवते. देही-अभिमानी
तर खूप गोड बनतात. संपूर्ण तर अजून कोणीही बनलेला नाही आहे; म्हणून बाबा नेहमी
म्हणतात की, कोणाच्याही मनाला नाराज करू नका, दुःख द्यायचे नाही. सर्वांना बाबांचा
परिचय द्या. बोलण्या-करण्यामध्ये देखील खूप रॉयल्टी पाहिजे. ईश्वरीय संतानाच्या
मुखातून सदैव रत्नच निघाली पाहिजेत. तुम्ही मनुष्यांना जीवनदान देता. रस्ता सांगायचा
आणि समजावून सांगायचे आहे. तुम्ही परमात्म्याची मुले आहात ना. त्यांच्याकडून
तुम्हाला स्वर्गाची राजाई मिळाली पाहिजे. तर मग आता ती राजाई का नाही आहे. आठवा
खरोखर बाबांकडून वारसा मिळाला होता ना. तुम्ही भारतवासी देवी-देवता होता, तुम्हीच
८४ जन्म घेतले. तुम्ही असे समजा की आम्हीच लक्ष्मी-नारायणाच्या कुळाचे होतो. स्वतःला
कमी का समजता. परंतु असे जर म्हणत असतील की, बाबा, सगळे थोडेच बनणार. तर बाबा
समजतात की हा या कुळातील नाही. आता पासूनच पाठ फिरवायला लागला आहे. तुम्ही ८४ जन्म
घेतले आहेत. बाबांनी २१ जन्मांचे प्रारब्ध जमा करवून दिले होते ते खाल्ले आणि मग ते
संपायला सुरूवात झाली. कट चढत-चढत तमोप्रधान कवडीसमान बनला आहात. भारतच १०० टक्के
सॉलव्हेंट (संपन्न) होता. यांना हा वारसा कुठून मिळाला? ॲक्टर्सच सांगू शकतील ना.
मनुष्यच ॲक्टर आहेत. त्यांना हे माहीत असले पाहिजे की या लक्ष्मी-नारायणाला बादशाही
मिळाली कुठून? किती चांगले-चांगले पॉईंट्स आहेत. जरूर मागच्या जन्मामध्येच हे
राज्यभाग्य प्राप्त केले असेल.
बाबाच पतित-पावन आहेत.
बाबा म्हणतात की, मी तुम्हाला कर्म, अकर्म आणि विकर्माची गती समजावून सांगतो. रावण
राज्यामध्ये मनुष्याची कर्म विकर्म होतात. तिथे (स्वर्गामध्ये) तुमची कर्म अकर्म
होतात. ती आहे दैवी सृष्टी. मी रचयिता आहे तर जरूर मला संगमावर यावे लागेल. हे आहे
रावण राज्य. ते आहे ईश्वरीय राज्य. ईश्वर आता स्थापना करत आहेत. तुम्ही सर्व
ईश्वराची मुले आहात, तुम्हाला वारसा मिळत आहे. भारतवासीच सॉलव्हेंट (संपन्न) होते,
आता इनसॉलव्हेंट (गरीब) बनले आहेत. हा पूर्व-नियोजित ड्रामा आहे, यामध्ये फरक होऊ
शकत नाही. सर्वांचे झाड आपले-आपले आहे. व्हरायटी झाड आहे ना. देवता धर्मवालेच मग
देवता धर्मामध्ये येतील. ख्रिश्चन धर्मवाले आपल्या धर्मामध्ये खुश आहेत, इतरांना
देखील त्यांच्या धर्मामध्ये ओढून आणले आहे. भारतवासी आपल्या धर्माला विसरल्या
कारणामुळे तो धर्म चांगला समजून तिथे निघून जातात. परदेशामध्ये नोकरी करण्याकरिता
अनेक जण जातात कारण तिथे खूप कमाई आहे. ड्रामा खूप वंडरफुल बनलेला आहे. याला
समजण्यासाठी चांगली बुद्धी पाहिजे. विचार सागर मंथन केल्याने सर्व काही लक्षात येते.
हा पूर्व-नियोजित अनादि ड्रामा आहे. तर तुम्हा मुलांनी इतरांना आप समान कायमचे सुखी
बनवायचे आहे. पतितापासून पावन बनविणे हा तुमचा धंदा आहे. जसा बाबांचा धंदा तसा तुमचा
धंदा. तुमचा चेहरा सदैव देवतांप्रमाणे आनंदामध्ये हर्षित असला पाहिजे. तुम्ही जाणता
आपण विश्वाचे मालक बनतो. तुम्ही आहात लवली चिल्ड्रेन (लाडकी मुले). क्रोधाच्या
बाबतीत खूप दक्षता ठेवायची आहे. बाबा आले आहेत मुलांना सुखाचा वारसा देण्याकरिता.
स्वर्गाचा रस्ता सर्वांना सांगायचा आहे. बाबा सुख कर्ता, दु:ख हर्ता आहेत, तर
तुम्हाला देखील सुख कर्ता बनायचे आहे. कोणालाही दुःख द्यायचे नाही. दुःख द्याल तर
तुमची सजा १०० पटीने वाढेल. कोणीही सजे पासून वाचू शकत नाही. मुलांकरिता तर खास
ट्रिब्युनल बसते. बाबा म्हणतात की तुम्ही विघ्न टाकाल तर खूप सजा खाल.
कल्प-कल्पांतरासाठी तुम्ही साक्षात्कार कराल की अमके हे-हे बनणार आहेत. अगोदर जेव्हा
पाहत होते तर बाबा मनाई करत होते की सांगू नका. अंतामध्ये तर ॲक्युरेट माहित होत
जाईल. पुढे चालून अनेक साक्षात्कार होतील. वृद्धी तर होत जाईल. आबू पर्यंत रांग
लागेल. बाबांना कोणीही भेटू शकणार नाही. म्हणतील अहो प्रभू तेरी लीला. हे देखील
गायले तर गेले आहे ना. विद्वान, पंडित इत्यादी देखील शेवटी येतील. त्यांची सिंहासने
देखील हलतील. तुम्ही मुले तर खूप आनंदामध्ये राहाल. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण. अशी
प्रेमपूर्वक आठवण एकदाच मिळते. जितकी तुम्ही आठवण करता तितके तुम्ही प्रेम प्राप्त
करता. विकर्म विनाश होतात आणि धारणा देखील होते. मुलांना आनंदाचा पारा चढायला हवा.
जो कोणी येईल त्याला रस्ता सांगावा. बेहदचा वारसा बेहदच्या बाबांकडून मिळवायचा आहे.
काही छोटी गोष्ट आहे काय? असा पुरुषार्थ केला पाहिजे. अच्छा!
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१)
बोलण्या-चालण्यामध्ये अतिशय रॉयल बनायचे आहे. मुखावाटे सदैव रत्न काढायची आहेत.
आपसमान बनवण्याची सेवा करायची आहे. कोणाच्याही मनाला नाराज करायचे नाही.
२) क्रोधावर खूप
दक्षता बाळगायची आहे. चेहरा सदैव देवतांप्रमाणे हर्षित ठेवायचा आहे. स्वतःला ज्ञान,
योगबळाद्वारे देवता बनवायचे आहे.
वरदान:-
पॉवरफुल
दर्पणाद्वारे सर्वांना स्वतःचा साक्षात्कार घडविणारे साक्षात्कारमूर्त भव
जसे दर्पणा समोर जो
कोणी जातो, त्याला स्वतःचा स्पष्ट साक्षात्कार होतो. परंतु जर आरसा पॉवरफुल नसेल तर
खऱ्या रूपा ऐवजी दुसरेच रूप दिसून येते. असेल हडकुळा आणि दिसेल जाडा, त्यामुळे
तुम्ही असे पॉवरफुल दर्पण बना, जेणेकरून सर्वांना स्वतःचा साक्षात्कार करू शकाल
अर्थात तुमच्या समोर येताच ते स्वतःच्या देहाला विसरून आपल्या देही रूपामध्ये स्थित
होतील - खरी सेवा तर हीच आहे, या द्वारेच जय-जयकार होईल.
बोधवाक्य:-
शिकवणीला
स्वरूपामध्ये आणणारेच ज्ञान स्वरूप, प्रेम स्वरूप आत्मा आहेत.
हे अव्यक्त इशारे -
“निश्चयाच्या फाउंडेशनला मजबूत करून सदैव निर्भय आणि निश्चिंत रहा”
बाबांमध्ये तर निश्चय
आहे परंतु स्वतःमध्ये देखील निश्चयबुद्धी होऊन कार्य करा, तर मग विजयच विजय आहे.
विजया समोर समस्या काहीच गोष्ट नाही. मग ती समस्या, समस्या वाटणार नाही परंतु एक
खेळ वाटेल. खेळ आनंदाने खेळला जातो. कोणतेही कार्य सहज होते तर म्हटले जाते हा तर
डाव्या हाताचा खेळ आहे अर्थात सोपे आहे. तर हा देखील बुद्धीचा खेळ होईल. खेळामध्ये
घाबरणार नाहीत.