19-06-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - सर्वात मुख्य सेवा आहे बाबांच्या आठवणीमध्ये राहणे आणि दुसऱ्यांना आठवण करून देणे, तुम्ही कोणालाही बाबांचा परिचय देऊन त्यांचे कल्याण करू शकता”

प्रश्न:-
कोणती एक छोटीशी सवय सुद्धा खूप मोठी अवज्ञा करायला लावते? त्यापासून वाचण्यासाठी कोणती युक्ती आहे?

उत्तर:-
जर कोणामध्ये काही लपविण्याची किंवा चोरी करण्याची सवय असेल तरी सुद्धा खूप मोठी अवज्ञा ठरते. म्हटले जाते - ‘कख का चोर सो लख का चोर’. लोभामुळे भूक लागली म्हणून लपवून न विचारता खाणे, चोरी करणे - ही सवय खूप वाईट आहे. या सवयीपासून दूर राहण्यासाठी ब्रह्मा-बाबांसारखे ट्रस्टी बना. ज्या काही अशा सवयी आहेत, त्या बाबांना खऱ्या-खऱ्या सांगून टाका.

ओम शांती।
रुहानी बाबा बसून रुहानी मुलांना समजावून सांगत आहेत. मुले जाणतात आम्ही बेहदच्या बाबांसमोर बसलो आहोत. आम्ही ईश्वरीय परिवाराचे आहोत. ईश्वर निराकार आहेत. हे सुद्धा जाणतात, तुम्ही आत्म-अभिमानी होऊन बसले आहात. आता यामध्ये काही सायन्सचा अहंकार किंवा हठयोग वगैरे करण्याची गरज नाही. हे आहे बुद्धीचे काम. या शरीराचे काहीही काम नाही. हठयोगामध्ये शरीराचे काम असते. आम्ही इथे मुले समजून बाबांसमोर बसलो आहोत. जाणतो, की बाबा आम्हाला शिकवत आहेत. एक तर म्हणतात - ‘स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण केलीत तर गोड मुलांनो, तुमची सर्व पापे नष्ट होतील. आणि चक्र फिरवा, इतरांची सेवा करून त्यांना आपसमान बनवा’. बाबा बसून एका-एकाला बघतात की हे काय सेवा करत आहेत. स्थूल सेवा करतात, सूक्ष्म सेवा करतात की मुख्य सेवा करतात, प्रत्येकाला बघतात की, हा सर्वांना बाबांचा परिचय देतो का? मुख्य गोष्ट ही आहे. प्रत्येक मुलाला बाबांचा परिचय देतात, इतरांना समजावून सांगतात का की, बाबा म्हणतात - माझी आठवण कराल तर तुमची जन्म-जन्मांतरीची पापे नष्ट होतील. कितीसे या सेवेमध्ये राहतात? स्वतःशी तुलना करतात, सर्वात जास्त सेवा कोण करतात? मी यांच्यापेक्षाही जास्त सेवा का करू नये! यांच्यापेक्षाही जास्त आठवणीच्या यात्रेमध्ये धाव घेऊ शकतो की नाही? प्रत्येकाला बाबा बघत असतात. बाबा प्रत्येकाला समाचार विचारतात - काय-काय सेवा करता? कोणाला बाबांचा परिचय देऊन त्यांचे कल्याण करता का? वेळ वाया तर घालवत नाही ना? मुख्य गोष्ट हीच आहे, या वेळी सर्व अनाथ आहेत. बेहदच्या बाबांना कोणीही जाणत नाही. बाबांकडून वारसा तर जरूर मिळतो. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये मुक्ती-जीवनमुक्तिधाम दोन्ही आहेत. मुलांना हे देखील समजायला पाहिजे की आपण आता शिकत आहोत. मग स्वर्गामध्ये येऊन जीवन-मुक्तीचे राज्य-भाग्य घेऊ. बाकी इतर धर्माचे जे खंडीभर आत्मे आहेत, ते तर कोणीही रहाणार नाहीत. फक्त आपणच भारतामध्ये राहणार. बाबा मुलांना बसून शिकवतात - बुद्धीत काय-काय असायला पाहिजे! इथे तुम्ही संगमयुगामध्ये बसले आहात तर खाणे-पिणे देखील शुद्ध पवित्र अवश्य पाहिजे. तुम्ही जाणता की, आपण भविष्यामध्ये सर्वगुण संपन्न, १६ कला संपूर्ण, संपूर्ण निर्विकारी बनणार आहोत. ही महिमा शरीरधारी आत्म्यांची आहे, फक्त आत्म्याची तर महिमा नाहीये. प्रत्येक आत्म्याचा पार्ट आपला-आपला आहे, जो इथे येऊन बजावते. तुमच्या बुद्धीमध्ये एम-ऑब्जेक्ट आहे, आम्हाला यांच्यासारखे (लक्ष्मी-नारायणा सारखे) बनायचे आहे. बाबांचा आदेश आहे - ‘मुलांनो, पवित्र बना’. विचारतील - पवित्र कसे रहायचे? कारण मायेची वादळे खूप येतात. बुद्धी कुठे-कुठे भटकते. तिला कसे स्थिर करणार? मुलांची बुद्धी तर चालते ना. इतर कोणाचीही बुद्धी चालत नाही. पिता, टीचर आणि गुरू देखील तुम्हाला मिळतो. हे देखील तुम्ही जाणता - सर्वात उच्च ते उच्च भगवान आहेत. ते पिता, टीचर, ज्ञानाचा सागर देखील आहेत. बाबा आले आहेत आम्हा आत्म्यांना सोबत घेऊन जाण्यासाठी. सतयुगामध्ये फार थोडे देवी-देवता असतात. या गोष्टी तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाच्याही बुद्धीमध्ये नसणार. तुमच्या बुद्धीमध्ये आहे की विनाशानंतर आपणच थोडेसे असणार. बाकी इतके सर्व धर्म, खंड इत्यादी असणार नाहीत. आम्हीच विश्वाचे मालक असणार. आमचेच एक राज्य असेल. खूप सुखाचे राज्य असेल. बाकी त्यामध्ये विविध पदवाले असतील. माझे पद कोणते असेल? मी रुहानी सेवा किती करतो? बाबा देखील विचारतात. असे नाही की, बाबा अंतर्यामी आहेत. मुले प्रत्येकजण स्वतः समजू शकतात - आपण काय करत आहोत? जरूर समजत असतील की एक नंबरची सेवा तर श्रीमतावर हे दादाच करत आहेत. वारंवार बाबा समजावून सांगतात - ‘गोड-गोड मुलांनो, स्वतःला आत्मा समजा, देह-अभिमान सोडा. स्वतःला आत्मा किती वेळ समजता?’ हे पक्के करायचे आहे - आपण आत्मा आहोत. बाबांची आठवण करायची आहे. यातूनच बेडा (जीवन रुपी नाव) पार होतो. आठवण करता-करता जुन्या दुनियेतून नव्या दुनियेमध्ये निघून जाल. आता फार थोडा वेळ शिल्लक आहे. मग आम्ही आपल्या सुखधाममध्ये निघून जाऊ. मुख्य रुहानी सेवा आहे - सर्वांना बाबांचा परिचय देणे, ही आहे सर्वात सोपी गोष्ट. स्थूल सेवा करण्यासाठी, भोजन बनविण्यासाठी, भोजन करण्यासाठी देखील मेहनत घ्यावी लागते. यामध्ये तर मेहनतीची काही गोष्टच नाही. फक्त स्वतःला आत्मा समजायचे आहे. आत्मा अविनाशी, शरीर विनाशी आहे. आत्माच सर्व पार्ट बजावते. हे शिक्षण बाबा एकदाच येऊन देतात, जेव्हा विनाशाची वेळ असते. नवीन दुनिया आहेच देवी-देवतांची. तिथे जरूर जायचे आहे. बाकी सर्व दुनियेला शांतिधामला जायचे आहे, ही जुनी दुनिया रहाणार नाही. तुम्ही नव्या दुनियेमध्ये असाल तेव्हा जुन्या दुनियेची आठवण असेल? अजिबात नाही. तुम्ही स्वर्गातच असाल, राज्य करत असाल. हे बुद्धीमध्ये राहिल्याने आनंद होतो. स्वर्गाला अनेक नावे दिली जातात. नरकाला देखील अनेक नावे दिली आहेत - पापात्म्यांची दुनिया, हेल, दुःखधाम. आता तुम्ही मुले जाणता बेहदचे बाबा एकच आहेत. आपण त्यांची सिकीलधी (खूप-खूप वर्षांनंतर भेटलेली) मुले आहोत, तर अशा बाबांवर प्रेम देखील खूप असायला पाहिजे. बाबांचे देखील मुलांवर खूप प्रेम आहे, जे खूप सेवा करतात, काट्यांना फूल बनवतात. मनुष्यापासून देवता बनायचे आहे ना. बाबा आपण स्वतः बनत नाहीत, आम्हाला बनविण्यासाठी आले आहेत. तर आतून खूप आनंद झाला पाहिजे. स्वर्गामध्ये मला कोणते पद मिळेल? मी काय सेवा करतो? घरामध्ये नोकर-चाकर आहेत तर त्यांना देखील परिचय दिला पाहिजे. जे स्वतः संपर्कामध्ये येतात, त्यांना ज्ञान दिले पाहिजे. सर्वांची सेवा करायची आहे ना - अबलांची, गरीबांची, आदिवासी स्त्रियांची. गरीब तर खूप आहेत, ते सुधारतील, कोणी पाप वगैरे करणार नाहीत. नाही तर पापकर्मे करत राहतील. बघत आहात खोटेपणा, चोऱ्या देखील किती होत आहेत. नोकर माणसे सुद्धा चोरी करतात. नाही तर घरी मुले आहेत, कुलूप कशाकरता लावायचे? पण आजकालची मुले सुद्धा चोर बनतात. काही ना काही लपवून उचलतात. कोणाला भूक लागली तर लालचेमुळे उचलून खातात. लोभ असलेला नक्की काही चोरी करून खात असेल. हा तर शिवबाबांचा भंडारा आहे, इथे तर एका पैशाची सुद्धा चोरी करता कामा नये. ब्रह्मा तर ट्रस्टी आहे. बेहदचे बाबा भगवान तुमच्याकडे आले आहेत. भगवंताच्या घरी कधी कोणी चोरी करत असेल? स्वप्नात देखील नाही. तुम्ही जाणता उच्च ते उच्च आहेत शिव भगवान. त्यांची आपण संतान आहोत. त्यामुळे आपल्याला दैवी कर्म केली पाहिजेत.

तुम्ही चोरी करणाऱ्यांना देखील जेलमध्ये जाऊन ज्ञान देता. इथे काय चोरी करणार? कधी आंबा उचलला, कोणता पदार्थ उचलून खाल्ला - ही देखील चोरी आहे ना. कोणतीही गोष्ट न विचारता उचलता कामा नये. हात सुद्धा लावता कामा नये. शिवबाबा आमचे बाबा आहेत, ते ऐकतात, बघतात. विचारतात, मुलांमध्ये कोणता अवगुण तर नाहीये ना? जर काही अवगुण असेल तर सांगा. दान देऊन टाका. दान देऊन मग कोणी अवज्ञा केली तर खूप शिक्षा भोगतील. चोरीची सवय फार वाईट असते. समजा, कोणी सायकल पळवतात, पकडले जातात. कोणी दुकानात गेले, बिस्किटाचा पुडा लपवतात किंवा कोणत्या छोट्या-छोट्या वस्तू लपवतात. दुकानदार खूप काळजी घेतात. तर हे देखील खूप मोठे गव्हर्मेंट (सरकार) आहे, पांडव गव्हर्मेंट आपले दैवी राज्य स्थापन करत आहे. बाबा म्हणतात - ‘मी तर राज्य करत नाही. तुम्ही पांडवच राज्य करता’. त्यांनी मग पांडवपति श्रीकृष्णाला म्हटले आहे. पांडव पिता कोण आहे? तुम्ही जाणता - समोर बसले आहेत. प्रत्येकजण आतून समजू शकतो कि मी बाबांची काय सेवा करतो? बाबा आम्हाला विश्वाची बादशाही देऊन आपण स्वतः वानप्रस्थामध्ये निघून जातात. किती निष्काम सेवा करतात. सर्वजण सुखी आणि शांत होतात. ते तर फक्त म्हणतात विश्वामध्ये शांती व्हावी. शांतीसाठी बक्षीस देत राहतात. इथे तुम्ही मुले जाणता, आम्हाला तर खूप मोठे बक्षीस मिळते. जे चांगली सेवा करतात, त्यांना मोठे बक्षीस मिळते. सर्वश्रेष्ठ सेवा आहे - बाबांचा परिचय देणे, ही सेवा तर कोणीही करू शकतात. मुलांना हे (देवता) बनायचे असेल तर सेवा देखील केली पाहिजे ना. यांना (ब्रह्माला) बघा, हे सुद्धा लौकिक परिवारवाले होते ना. यांच्याकडून बाबांनी करवून घेतले. यांच्यामध्ये प्रवेश करून यांना देखील म्हणतात, तर तुम्हाला देखील म्हणतात की, ‘हे करा’. (ब्रह्मा बाबा म्हणाले) ‘मला कसे सांगतील? माझ्यात प्रवेश करून करवून घेतात. करन-करावनहार आहेत ना. बसल्या-बसल्या म्हणाले हे सोड, ही तर घाणेरडी दुनिया आहे, वैकुंठाला चल. आता वैकुंठाचा मालक बनायचे आहे. बस, वैराग्य आले’. सर्वांना वाटत होते - यांना काय झाले आहे. इतका चांगला जबरदस्त फायद्यातला व्यापारी हे काय करत आहे! त्यांना थोडेच माहित होते की हे पुढे काय करणार आहेत. सोडणे काही मोठी गोष्ट थोडीच आहे. बस, सर्वकाही सोडून दिले. इतर सर्वांना देखील त्याग करायला लावला. मुलीला देखील त्याग करायला लावला. आता ही रुहानी सेवा करायची आहे, सर्वांना पवित्र बनवायचे आहे. सर्व म्हणायचे - आम्ही ज्ञान-अमृत पिण्यासाठी जातो. नाव मातेचे घेत होते. ओम राधेकडे ज्ञान-अमृत पिण्याकरता जातो. ही युक्ती कोणी केली? शिवबाबांनी यांच्यामध्ये प्रवेश करून किती छान युक्ती केली. जो कोणी येईल, ज्ञान-अमृत पिईल. असे देखील गायन आहे - ‘अमृत छोड़ विष काहे को खाये’. विष सोडून ज्ञान-अमृत पिऊन पावन देवता बनायचे आहे. सुरुवातीला हीच गोष्ट सांगितली जात होती. कोणीही येत असे तर त्याला सांगत होते - ‘पावन बना’. अमृत प्यायचे आहे तर विष सोडून द्यायचे आहे. पावन वैकुंठाचा मालक बनायचे असेल तर एकाचीच आठवण करायची आहे. तर नक्की भांडणे होणार ना. सुरुवातीपासून कटकट अजूनपर्यंत चालू आहे. अबलांवर किती अत्याचार होतात. जितके तुम्ही जास्त पक्के होत जाल तेव्हा मग समजतील की, पवित्रता तर चांगली आहे. त्यांनाच बोलावतात - ‘बाबा, येऊन आम्हाला पावन बनवा’. अगोदर तुमचे देखील चारित्र्य कसे होते? आता काय बनत आहात? पूर्वी तर देवतांपुढे जाऊन म्हणत होता - ‘आम्ही पापी आहोत’. आता तुम्ही असे म्हणणार नाही कारण तुम्ही जाणता आता आपण असे बनत आहोत.

मुलांनी स्वतःला विचारायला हवे - आम्ही कितपत सेवा करतो? जशी भंडारी आहे, तुमच्यासाठी किती सेवा करते! किती त्यांचे पुण्य बनते! खूप जणांची सेवा करते, तर सर्वांचे आशिर्वाद त्यांना मिळतात. खूप महिमा लिहितात. भंडारीची तर कमाल आहे, किती आयोजन करते. ही तर झाली स्थूल सेवा. सूक्ष्म देखील करायला हवी. मुले म्हणतात - ‘बाबा, ही ५ भुते फार कठोर आहेत, जी आठवणीत राहू देत नाहीत’. बाबा म्हणतात - मुलांनो, शिवबाबांची आठवण करत भोजन बनवा’. एका शिव बाबांशिवाय दुसरे कोणीच नाहीये. तेच मदत करतात. गायन देखील आहे ना - ‘शरण पड़ी मैं तेरे…’ सतयुगामध्ये असे थोडेच म्हणाल. आता तुम्ही शरण आले आहात. कोणामध्ये भूत शिरते, तर खूप छळते. ती अशुद्ध आत्मा येते. तुमच्यामध्ये तर किती भुते भरलेली आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह… ही भुते तुम्हाला खूप दुःखी करतात. ती अशुद्ध आत्मा तर कोणा-कोणाला त्रास देते. तुम्हाला माहीत आहे - ही ५ भुते तर २५०० वर्षांपासून त्रास देत आली आहेत. तुम्ही किती त्रासून गेले आहात. या ५ भुतांनी भिकारी बनवले आहे. देह-अभिमानाचे भूत एक नंबरचे भूत आहे. काम विकाराचे देखील मोठे भूत आहे. त्यांनी तुम्हाला किती सतावले आहे, हे देखील बाबांनी सांगितले आहे. कल्प-कल्प तुम्हाला ही भुते पछाडतात. यथा राजा-राणी तथा प्रजा, सर्वांना भूताने ग्रासलेले आहे. तर याला भुतांची दुनिया म्हणणार. रावण राज्य म्हणजे आसुरी राज्य. सतयुग-त्रेतायुगामध्ये भुते असत नाहीत. एक जरी भूत असेल तरी किती त्रास देते याचा कोणाला पत्ताच नाहीये. ५ विकार रूपी रावणाचे भूत आहे, ज्याच्यापासून बाबा येऊन सोडवतात. तुमच्यामध्ये देखील कोणी-कोणी हुशार आहेत, ज्यांच्या बुद्धीमध्ये हे बसते. या जन्मामध्ये तर असे कोणतेही काम करायचे नाही. चोरी केली, देह-अभिमान आला तर रिझल्ट काय लागेल? पद भ्रष्ट होईल. काही ना काही उचलतात. म्हणतात ना - ‘कख का चोर सो लख का चोर’. यज्ञामध्ये तर असे काम कधीही करायचे नाही. सवय लागली तर मग कधी सुटत नाही. किती डोके आपटतात. अच्छा!

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
१) स्थूल सेवेबरोबरच सूक्ष्म आणि मुख्य सेवा देखील करायची आहे. सर्वांना बाबांचा परिचय देणे, आत्म्यांचे कल्याण करणे, आठवणीच्या यात्रेमध्ये राहणे ही आहे खरी सेवा. या सेवेमध्ये व्यस्त रहायचे आहे, स्वतःचा वेळ वाया घालवायचा नाही.

२) बुद्धीवान बनून ५ विकाररूपी भुतांवर विजय मिळवायचा आहे. चोरी करण्याची किंवा खोटे बोलण्याची सवय काढून टाकायची आहे. दान केलेली गोष्ट परत घ्यायची नाही.

वरदान:-
शरीराच्या व्याधीच्या चिंतनापासून मुक्त, ज्ञान चिंतन आणि स्वचिंतन करणारे शुभचिंतक भव

एक आहे शरीराची व्याधी येणे, एक आहे व्याधीमुळे डगमगणे. व्याधी येणे हि तर भावी (नियती) आहे परंतु श्रेष्ठ स्थिती डगमग होणे - ही बंधनयुक्त असल्याचे चिन्ह आहे. जे शरीराच्या व्याधीच्या चिंतनापासून मुक्त राहून स्व-चिंतन, ज्ञान चिंतन करतात तेच शुभचिंतक आहेत. प्रकृतीचे चिंतन जास्त केल्याने चिंतेचे रूप बनते. या बंधनातून मुक्त होणे यालाच कर्मातीत स्थिती म्हटले जाते.

बोधवाक्य:-
स्नेहाची शक्ती समस्या रूपी पर्वताला पाण्यासारखी हलकी बनवते.