19-07-2024      प्रभात: मराठी मुरली        ओम शान्ति        बापदादा मधुबन


“गोड मुलांनो - तुम्हाला दुहेरी मुकुटधारी राजा बनायचे असेल तर भरपूर सेवा करा, प्रजा बनवा, संगमावर तुम्हाला सेवाच करायची आहे, यातच कल्याण आहे”

प्रश्न:-
जुन्या दुनियेच्या विनाशाच्या आधी प्रत्येकाने कोणता श्रृंगार करायचा आहे?

उत्तर:-
तुम्हा मुलांनी योगबलाने आपला श्रृंगार करा, या योगबलानेच संपूर्ण विश्व पावन बनेल. तुम्हाला आता वानप्रस्थ अवस्थेमध्ये जायचे आहे त्यामुळे या शरीराचा श्रृंगार करण्याची आवश्यकता नाही; तो तर वर्थ नॉट पेनी (कवडीतुल्य) आहे, त्यातून मोह काढून टाका. विनाशाच्या आधी बाप समान दयाळू बनून स्वतःचा आणि दुसऱ्यांचा श्रृंगार करा. आंधळ्यांची काठी बना.

ओम शांती।
आता हे तर मुलांना चांगल्या प्रकारे समजले आहे की, बाबा येतात पावन बनण्याचा मार्ग दाखविण्यासाठी. त्यांना बोलावले जाते या एकाच कारणासाठी की येऊन आम्हाला पतिता पासून पावन बनवा कारण पावन दुनिया पास्ट झाली (इतिहासजमा झाली), आता पतित दुनिया आहे. पतित दुनिया केव्हा होऊन गेली, किती वेळ झाला, हे कोणीही जाणत नाहीत. तुम्ही मुले जाणता, बाबा पुन्हा या तनामध्ये आलेले आहेत. तुम्हीच बोलावले आहे की बाबा येऊन आम्हा पतितांना रस्ता दाखवा, आम्ही पावन कसे बनायचे? हे तर जाणता आम्ही पावन दुनियेमध्ये होतो, आता पतित दुनियेमध्ये आहोत. आता ही दुनिया बदलत आहे. नवीन दुनियेचा कालावधी किती आहे, जुन्या दुनियेचा कालावधी किती आहे - हे कोणीही जाणत नाहीत. पक्के घर बांधल्यावर म्हणतील याचे आयुष्य इतकी वर्षे असेल. कच्चे घर बांधले तर म्हणतील याचे आयुष्य इतकी वर्षे असेल. समजू शकतात की हे किती वर्षापर्यंत टिकू शकेल. मनुष्यांना याचा पत्ताच नाही की हि जी सारी दुनिया आहे तिचा कालावधी किती आहे? तर मग नक्कीच बाबांना येऊन सांगावे लागेल. बाबा म्हणतात - मुलांनो, आता ही जुनी पतित दुनिया पूर्ण होणार आहे. नवीन पावन दुनिया स्थापन होत आहे. नव्या दुनियेमध्ये फार थोडे मनुष्य होते. नवी दुनिया आहे सतयुग, ज्याला सुखधाम म्हणतात. हे आहे दुःखधाम, याचा शेवट नक्की होणार आहे. मग पुन्हा सुखधामच्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे. सर्वांना हे समजावून सांगायचे आहे. बाबा डायरेक्शन देतात स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा आणि मग इतरांनासुद्धा हा मार्ग दाखवा. लौकिक पित्याला तर सर्वजण ओळखतात, पारलौकिक पित्याला मात्र कोणीही ओळखत नाहीत. सर्वव्यापी म्हणतात. कच्छ-मच्छ अवतार किंवा ८४ लाख योनीमध्ये घेऊन गेले आहेत. दुनियेमध्ये कोणीही बाबांना जाणत नाहीत. बाबांना जाणतील तेव्हाच तर समजेल. जर दगड-धोंड्यात आहेत असे म्हटले तर मग वारशाचा प्रश्नच येत नाही. देवतांची सुद्धा पूजा करतात, परंतु कोणाचेही जीवनचरित्र माहीत नाही, या गोष्टींबद्दल अगदीच अनभिज्ञ आहेत. तर सर्वात पहिली मुख्य गोष्ट समजावून सांगितली पाहिजे. फक्त चित्रांवरून कोणी समजू शकणार नाही. मनुष्य बिचारे ना पित्याला जाणत, ना रचनेला जाणत की सुरुवातीपासून हि रचना कशी रचली. ज्यांची पूजा करतात, त्या देवतांचे राज्य कधी होते, काहीही माहीत नाही. समजतात की लाखो वर्षे सूर्यवंशी राजधानी चालली, मग चंद्रवंशी राजधानी लाखो वर्षे चालली, याला म्हटले जाते अज्ञान. आता तुम्हा मुलांना बाबांनी समजावून सांगितले आहे, तुम्ही मग परत सांगता. बाबा देखील पुन्हा सांगतात ना - अशा प्रकारे समजावून सांगा, संदेश द्या, नाहीतर राजधानी कशी स्थापन होणार? इथे बसून राहिल्याने काही होणार नाही. हो, घरी राहणारे सुद्धा हवे आहेत. ते तर ड्रामा अनुसार आहेतच. यज्ञाचा सांभाळ करणारे देखील पाहिजेत. बाबांकडे किती मुले भेटण्यासाठी येतात कारण वारसा शिवबाबांकडूनच घ्यायचा आहे. लौकिक पित्याकडे मुलगा आला तर तो समजेल मला वडिलांकडून वारसा घ्यायचा आहे. मुलगी तर जाऊन हाफ पार्टनर (अर्धांगिनी) बनते. सतयुगामध्ये कधी संपत्ती इत्यादीवरून भांडण होतच नाही. इथे भांडण होते काम विकारावरून. तिथे तर हि ५ भुते असतच नाहीत, त्यामुळे दुःखाचे नामोनिशाण सुद्धा नाही. सर्व नष्टोमोहा असतात. हे तर समजतात स्वर्ग होता, जो पूर्वी होऊन गेला. चित्रे देखील आहेत परंतु हे विचार तुम्हा मुलांना आता येतात. तुम्ही जाणता हे चक्र दर ५ हजार वर्षांनंतर रिपीट होते. शास्त्रांमध्ये काही हे लिहिलेले नाहीये की सूर्यवंशी-चंद्रवंशी घराणी २५०० वर्षे चालली. वर्तमानपत्रात आले होते की बडोद्याच्या राजभवनामध्ये रामायण ऐकत आहेत. काहीही संकटे आली की मनुष्य भगवंताला प्रसन्न करण्यासाठी भक्ती करू लागतात. असा काही भगवान प्रसन्न होत नाही. हे तर ड्रामामध्ये आधीच नोंदलेले आहे. भक्तीने कधी भगवान प्रसन्न होत नाही. तुम्ही मुले जाणता अर्धा कल्प भक्ती चालते, स्वतःच दुःख ओढवून घेतात. भक्ती करता-करता सर्व पैसे संपवून टाकतात. या गोष्टी तर कोणी विरळेच समजू शकतील जी मुले सेवेमध्ये व्यस्त आहेत, ते समाचार सुद्धा देत राहतात. समजावून सांगितले जाते हा ईश्वरीय परिवार आहे. ईश्वर तर दाता आहेत, ते घेणारे नाहीत. त्यांना तर कोणीही देत नाहीत, अजूनच सर्व वाया घालवतात.

बाबा तुम्हा मुलांना विचारत आहेत - तुम्हाला किती अथाह पैसे दिले, तुम्हाला स्वर्गाचा मालक बनवले, मग ते सर्व गेले कुठे? इतके गरीब कसे बनलात? आता मी पुन्हा आलो आहे, तुम्ही किती पद्मापद्म भाग्यवान बनत आहात. कोणीही मनुष्य या गोष्टींना तर जाणत नाहीत. तुम्ही जाणता, आता या जुन्या दुनियेमध्ये इथे रहायचेच नाहीये. ही तर नष्ट होणार आहे. लोकांकडे जो अमाप पैसा आहे तो कोणाच्या हाती सुद्धा लागणार नाही. विनाश झाल्यावर सर्व खलास होतील. किती मोठ-मोठे बंगले इत्यादी बनवले आहेत. अमाप संपत्ती आहे, सर्व नष्ट होणार कारण तुम्ही जाणता जेव्हा आमचे राज्य होते तेव्हा इतर कोणीही नव्हते. तिथे अथाह धन होते. तुम्ही पुढे जाऊन बघत रहाल काय-काय होते. त्यांच्याकडे किती सोने, किती चांदी, नोटा इत्यादी आहेत, सर्व अंदाजपत्रक काढतात, जाहीर करतात इतके अंदाजपत्रक आहे तर इतका खर्च होणार. दारू-गोळ्यावर किती खर्च होणार. आता दारू-गोळ्यावर इतका खर्च करतात, त्यातून कमाई तर काहीच नाही. ही काही ठेवून देण्याची वस्तू तर नाहीये. ठेवायचे असते सोने आणि चांदी. दुनिया गोल्डन एज (स्वर्णिम युग) असते तेव्हा सोन्याची नाणी असतात. सिल्वर एज (त्रेतायुगामध्ये) चांदी आहे. तिथे तर अपार धन असते, मग कमी होत-होत आता बघा काय आले आहे! कागदाच्या नोटा. परदेशातसुद्धा कागदाच्या नोटा काढल्या आहेत. कागद काही उपयोगी वस्तू नाही. बाकी काय राहणार? या मोठ-मोठ्या इमारती वगैरे सर्व नष्ट होतील म्हणून बाबा म्हणतात - ‘गोड-गोड मुलांनो, हे जे काही बघत आहात, असे समजा हे अस्तित्वातच नाही आहे. हे तर सर्व नष्ट होणार आहे’. शरीर देखील कवडीतुल्य आहे. भले कोणी कितीही सुंदर असेल. ही दुनियाच आता थोडा काळ आहे. काही निवास स्थान थोडेच आहे. बसल्या-बसल्या माणसाचे काय होते. हृदय बंद पडते. माणसाचा काही भरवसा नाही. सतयुगामध्ये थोडेच असे काही होईल. तिथे तर योगबलामुळे काया कल्पतरू समान (शरीर चिरतरुण) असते. आता तुम्हा मुलांना बाबा मिळाले आहेत, म्हणतात या दुनियेमध्ये तुम्हाला रहायचे नाहीये. ही घाणेरडी दुनिया आहे. आता तर योगबलाने आपला श्रृंगार करायचा आहे. तिथे तर मुले देखील योगबलाने होतात. तिथे विकाराची गोष्टच नसते. योगबलाने तुम्ही साऱ्या विश्वाला पावन बनवता तर बाकीच्या गोष्टी मोठ्या आहेत का? या गोष्टींना सुद्धा तेच समजतील जे आपल्या घराण्यातील असतील. बाकी सर्वांना तर शांतीधाम मध्ये जायचे आहे, ते तर आहे घर. परंतु मनुष्य त्याला घर सुद्धा समजत नाहीत. ते तर म्हणतात एक आत्मा जाते, दुसरी येत राहते. सृष्टीची वाढ होत राहते. रचयिता आणि रचनेला तुम्ही जाणता म्हणून इतरांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करता; हे समजून की, हा देखील बाबांचा स्टुडंट बनावा, सर्व काही जाणून घेईल तर खुश होईल. आम्ही तर आता अमरलोकमध्ये जातो. अर्धा कल्प तर आम्ही खोट्या कथा ऐकल्या आहेत. आता तर खूप आनंद झाला पाहिजे की, आपण अमरलोकमध्ये जाणार. या मृत्यू-लोकचा आता शेवट आहे. आम्ही आनंदाचा खजिना इथे भरून जातो. तर मग ही कमाई करण्यामध्ये, झोळी भरण्यामध्ये चांगल्या प्रकारे व्यस्त झाले पाहिजे. वेळ वाया घालवता कामा नये. बस्स, आता तर आम्हाला दुसऱ्यांची सेवा करायची आहे, झोळी भरायची आहे. बाबा, दयाळू कसे बनायचे हे शिकवतात, आंधळ्यांची काठी बना. हा प्रश्न तर कोणी संन्यासी, विद्वान इत्यादी विचारू सुद्धा शकत नाहीत. त्यांना काय माहीत स्वर्ग कुठे आहे, नरक कुठे असतो. भले कितीही मोठ-मोठ्या पदावरचे, वायुदलाचे कमांडर चीफ आहेत, पायदळाचे कमांडर चीफ आहेत, नौदलाचे आहेत, परंतु तुमच्यापुढे हे सर्व काय आहेत! तुम्ही जाणता बाकी वेळ फार थोडा आहे. स्वर्गा विषयी तर कोणाला माहित सुद्धा नाहीये. या वेळी तर सगळीकडे हाणामारी चालू आहे, मग त्यांना विमानांची किंवा सैन्य इत्यादीची आवश्यकता राहणार नाही. हे सर्व संपून जातील. थोडेच मनुष्य शिल्लक राहतील. हि वीज, विमाने इत्यादी असतील परंतु जग किती छोटे असेल, भारतच राहील. जसे मॉडेल (प्रतिकृती) छोटे बनवतात ना. इतर कोणाच्याही बुद्धीत नसेल की शेवटी मृत्यू कसा येणार आहे. तुम्ही तर जाणता मृत्यू समोर उभा आहे. ते म्हणतात आम्ही इथे बसल्या-बसल्या बॉम्ब्स (मिसाईल्स) सोडू. जिथे पडतील ते सर्व नष्ट होतील. काही सैन्य वगैरेची आवश्यकता नाही. एका-एका विमानासाठी सुद्धा करोडोनी खर्च होत असतो. सर्वांकडे सोने किती असते. टनच्या टन सोने आहे, ते सर्व समुद्रामध्ये बुडून जाईल.

हे सर्व रावणराज्य एक बेट आहे. अगणित मनुष्य आहेत. तुम्ही सर्व आपले राज्य स्थापन करत आहात. तर सेवेमध्ये व्यस्त राहिले पाहिजे. कुठे पूर इत्यादी येतो तर बघा कसे बिझी होऊन जातात. सर्वांना जेवण इत्यादी पुरविण्याच्या सेवेमध्ये व्यस्त होतात. पाणी येण्याच्या अगोदरच पळायला सुरुवात करतात. तर विचार करा सर्व कसे मरतील. पृथ्वीच्या चहू बाजूंनी समुद्र आहे. विनाश झाल्यावर तर जलमय होईल, सर्वत्र पाणीच पाणी होईल. हे लक्षात असते जेव्हा आमचे राज्य होते तेव्हा हि मुंबई, कराची इत्यादी तर काहीच नव्हते. भारत किती छोटासा बाकी राहील, तो देखील गोड्या पाण्याच्या नदीकाठी. तिथे विहिरी इत्यादींची गरजच नाही. पिण्याचे पाणी अत्यंत स्वच्छ असते. नद्यांच्या काठावर तर खेळतात-बागडतात. अस्वच्छतेची कोणती गोष्टच नसते. नावच आहे स्वर्ग, अमरलोक. नाव ऐकूनच मनात येते की, आपण पूर्ण शिकून लवकरात लवकर बाबांकडून वारसा घ्यावा. शिकून मग शिकवावे. सर्वांना संदेश द्यावा. कल्पापूर्वी ज्यांनी वारसा घेतला आहे ते घेतील. पुरुषार्थ करत राहतात कारण बिचारे बाबांना जाणतच नाहीत. बाबा म्हणतात पवित्र बना, ज्यांना तळहातावर स्वर्ग मिळणार आहे ते का नाही पवित्र राहणार! सांगा, जर आम्हाला विश्वाची बादशाही मिळते आहे तर आम्ही का नाही एका जन्मासाठी पवित्र बनणार. भगवानुवाच - तुम्ही या अंतिम जन्मामध्ये पवित्र बनलात तर २१ जन्मांसाठी पवित्र दुनियेचे मालक बनाल. फक्त हा एक जन्म माझ्या श्रीमतानुसार चाला. हे रक्षाबंधन देखील याची खूण आहे. तर का नाही आम्ही पवित्र राहू शकणार. बेहदचे बाबा गॅरंटी देतात. बाबांनी भारताला स्वर्गाचा वारसा दिला होता, ज्याला सुखधाम म्हणतात. अपार सुख होते, हे आहे दुःख धाम. एका कोणत्यातरी मोठ्या व्यक्तीला तुम्ही असे समजावून सांगा तर सर्वजण ऐकत राहतील. योगयुक्त होऊन सांगा तर सर्वजण काळ-वेळ इत्यादी सर्व काही विसरून जातील. कोणी काहीही बोलू शकणार नाही. १५-२० मिनिटांऐवजी तासभरही ऐकत रहातील. परंतु ती ताकद पाहिजे. देह-अभिमान असता कामा नये. इथे तर सेवाच सेवा करायची आहे, तेव्हाच कल्याण होईल. राजा बनायचे असेल तर प्रजा कुठे बनवली आहे? बाबा असाच डोक्यावर मुकुट थोडाच ठेवतील. प्रजा डबल मुकुटधारी बनते का? तुमचे एम ऑब्जेक्टच आहे डबल मुकुटधारी बनण्याचे. बाबा तर मुलांना उमंग देतात. जन्म-जन्मांतरीची पापे डोक्यावर आहेत, ती योगबलानेच नष्ट होऊ शकतात. बाकी या जन्मामध्ये काय-काय केले आहे हे तर तुम्ही समजू शकता ना. पापे नष्ट करण्यासाठी योग इत्यादी शिकवला जातो. बाकी या जन्माची तर काही गोष्ट नाही. तमोप्रधाना पासून सतोप्रधान बनण्याची युक्ती बाबा बसून सांगतात, बाकी कृपा इत्यादी तर जाऊन साधू लोकांकडून मागा. अच्छा.

गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.

धारणेसाठी मुख्य सारांश:-
तळहातावर स्वर्ग घेण्यासाठी जरूर पवित्र बनायचे आहे. स्वतःला सतोप्रधान बनविण्याच्या युक्त्या शोधून काढून आपणच आपल्यावर कृपा करायची आहे. योगबल जमा करायचे आहे.

वरदान:-
हजूरला (शिवबाबांना) सतत सोबत ठेवून कंबाइंड स्वरूपाचा अनुभव करणारे विशेष पार्टधारी भव मुले जेव्हा मनापासून म्हणतात ‘बाबा’, तेव्हा दिलाराम हजर होतात, म्हणूनच म्हणतात हजूर हाजिर आहेत (प्रभू उपस्थित आहेत). आणि विशेष आत्मे तर आहेतच कंबाइंड. लोक म्हणतात जिकडे पाहतो तिकडे तुम्हीच तुम्ही आहात; आणि मुले म्हणतात आम्ही जे काही करतो, जिथे कुठे जातो बाबा सोबतच आहेत. म्हटले जाते करनकरावनहार, तर करनहार आणि करावनहार कंबाइंड झाले. या स्मृतीमध्ये राहून पार्ट बजावणारे विशेष पार्टधारी बनतात.

बोधवाक्य:-
स्वतःला या जुन्या दुनियेमध्ये पाहुणा समजून रहा तर जुन्या संस्कारांना आणि संकल्पांना गेट आऊट करू शकाल.