19-10-25 अव्यक्त बापदादा
मराठी मुरली
31.03.2007 ओम शान्ति
मधुबन
“सुपुत्र बनून आपल्या
चेहेऱ्याद्वारे बाबांचा चेहरा दाखवा, निर्माण सोबत (सेवेसोबत) निर्मल वाणी, निर्मान
स्थितीचा बॅलन्स ठेवा”
आज बापदादा चोहो
बाजूच्या मुलांच्या भाग्याच्या रेषा पाहून हर्षित होत आहेत. सर्व मुलांच्या
मस्तकामध्ये चमकणाऱ्या ज्योतीची रेषा चमकत आहे. डोळ्यांमध्ये रुहानियतच्या (आत्मिकतेच्या)
भाग्याची रेषा दिसून येत आहे. मुखामध्ये श्रेष्ठ वाणीच्या भाग्याची रेषा दिसून येत
आहे. ओठांवर रुहानी स्मित (आत्मिक हास्य) बघत आहेत. हातामध्ये सर्व परमात्म
खजिन्याची रेषा दिसून येत आहे. प्रत्येक आठवणीच्या पावलामध्ये पद्मांची रेषा बघत
आहेत. प्रत्येकाच्या हृदयामध्ये बाबांच्या प्रेमामध्ये लवलीन झाल्याची रेषा बघत
आहेत. असे श्रेष्ठ भाग्य प्रत्येक मुलगा अनुभव करत आहे ना! कारण या भाग्याच्या रेषा
स्वयं बाबांनी प्रत्येकाच्या श्रेष्ठ कर्माच्या लेखणीने काढल्या आहेत. असे श्रेष्ठ
भाग्य जे अविनाशी आहे, केवळ या जन्मासाठी नाही परंतु अनेक जन्मांच्या अविनाशी
भाग्यरेषा आहेत. अविनाशी बाबा आहेत आणि अविनाशी भाग्याच्या रेषा आहेत. यावेळी
श्रेष्ठ कर्माच्या आधारावर सर्व रेषा प्राप्त होतात. यावेळचा पुरुषार्थ अनेक
जन्मांचे प्रारब्ध बनवतो.
सर्व मुलांना अनेक
जन्म जे प्रारब्ध मिळणार आहे, त्या पुरुषार्थाच्या प्रारब्धाची प्राप्ती बापदादा आता
यावेळी, या जन्मामध्ये पाहू इच्छित आहेत. केवळ भविष्यच नाही परंतु आता सुद्धा या
सर्व रेषा सदा अनुभवांमध्ये याव्यात कारण आताचे हे दिव्य संस्कार तुमचा नवीन संसार
बनवत आहेत. तर चेक करा, चेक करता येते ना! स्वतःच स्वतःचे चेकर बना. तर सर्व
भाग्याच्या रेषा आता देखील अनुभव होत आहेत का? असे तर समजत नाही ना की हे प्रारब्ध
नंतर शेवटी दिसून येईल? प्राप्ती देखील आता आहे तर प्रारब्धाचा अनुभव देखील आताच
करायचा आहे. भविष्य संसाराचे संस्कार आता प्रत्यक्ष जीवनामध्ये अनुभव होणार आहेत.
तर काय चेक करायचे आहे? तुम्ही भविष्य संसाराच्या संस्कारांचे गायन करता की भविष्य
संसारामध्ये एक राज्य असेल. लक्षात आहे ना तो संसार! किती वेळा त्या संसारामध्ये
राज्य केले आहे? लक्षात आहे की आठवण करून दिल्यानंतर आठवते? काय होता, ते
स्मृतीमध्ये आहे ना? परंतु तोच संस्कार आताच्या जीवनामध्ये प्रत्यक्ष रूपामध्ये आहे
का? तर चेक करा आता देखील मनामध्ये, बुद्धीमध्ये, संबंध-संपर्कामध्ये, जीवनामध्ये
एक राज्य आहे? का कधी-कधी आत्म्याच्या राज्यासोबत मायेचे राज्य सुद्धा तर नाहीये?
जसे भविष्य प्रारब्धामध्ये एकच राज्य आहे, दोन नाहीत. तर आता देखील दोन राज्य तर
नाही आहेत ना? जसे भविष्य राज्यामध्ये एका राज्यासोबतच एक धर्म आहे, तो धर्म कोणता
आहे? संपूर्ण पवित्रतेच्या धारणेचा धर्म आहे. तर आता चेक करा की पवित्रता संपूर्ण
आहे? स्वप्नामध्ये देखील अपवित्रतेचे नामोनिशाण नसावे. पवित्रता अर्थात संकल्प, बोल,
कर्म आणि संबंध-संपर्कामध्ये एकच धारणा संपूर्ण पवित्रतेची असावी. ब्रह्माचारी असावा.
स्वतःची चेकिंग करायला येते ना? ज्यांना स्वतःची चेकिंग करायला येते त्यांनी हात वर
करा. येते आणि करता देखील? करता का, करता ना? टीचर्सना येते? डबल फॉरेनर्सना येते?
कशासाठी? आताच्या पवित्रतेमुळे तुमच्या जड मूर्तीकडून देखील पवित्रतेची मागणी करतात.
पवित्रता अर्थात एक धर्म ही आताची स्थापना आहे जी भविष्यामध्ये देखील चालते. असेच
भविष्याचे काय गायन आहे? एक राज्य, एक धर्म आणि त्यासोबत सदैव सुख-शांती, संपत्ती,
अखंड सुख, अखंड शांती, अखंड संपत्ती. तर आताच्या तुमच्या स्वराज्याच्या जीवनामध्ये,
ते आहे विश्व राज्य आणि यावेळी आहे स्वराज्य, तर चेक करा अविनाशी सुख, परमात्म सुख,
अविनाशी अनुभव होते का? कोणते साधन किंवा कोणत्या सुविधांच्या आधारावर सुखाचा अनुभव
तर होत नाही ना? कधी कोणत्याही कारणाने दुःखाची लहर अनुभवास येता कामा नये. कोणते
नाव, मान-शान यांच्या आधारावर तर सुखाचा अनुभव होत नाही ना? का? हे नाव, मान-शान,
साधन, सुविधा हे स्वतःच विनाशी आहे, अल्पकाळाचे आहे. तर विनाशी गोष्टींच्या आधारावर
अविनाशी सुख मिळत नाही. चेक करत जा. आता देखील ऐकतही जा आणि स्वतःमध्ये चेकही करत
जा तर कळेल की आताचे संस्कार आणि भविष्य संसाराचे प्रारब्ध यामध्ये किती अंतर आहे!
तुम्ही सर्वांनी जन्मत:च बापदादांसोबत एक वायदा केला आहे, लक्षात आहे वायदा की
विसरून गेला आहात? हाच वायदा केला आहे की, आम्ही सर्व बाबांचे सोबती बनून, विश्व
कल्याणकारी बनून नवीन सुख-शांतीमय संसार बनवणार आहोत. लक्षात आहे? तुम्ही केलेला
वायदा लक्षात आहे? लक्षात असेल तर हात वर करा. पक्का वायदा आहे की थोडी गडबड होऊन
जाते? नवीन संसार आता परमात्म संस्कारांच्या आधारे बनवणार आहात. तर आता फक्त
पुरुषार्थ करायचा नाहीये परंतु पुरुषार्थाचे प्रारब्ध देखील आता अनुभव करायचे आहे.
सुखासोबत शांतीलाही चेक करा - अशांत सरकमस्टान्स (अशांत परिस्थिती), अशांत वायुमंडळ
यामध्ये सुद्धा तुम्ही शांतीच्या सागराची मुले सदैव कमल पुष्प समान अशांतीला देखील
शांतीच्या वायुमंडळामध्ये परिवर्तन करू शकता का? शांत वायुमंडळ आहे, त्यामध्ये
तुम्ही शांती अनुभव केलीत, तर ही काही मोठी गोष्ट नाहीये परंतु तुमचा वायदा आहे
अशांतीला शांतीमध्ये परिवर्तन करणारे आहोत. तर चेक करा - चेक करत आहात ना? परिवर्तक
आहात, परवश (अधीन) तर नाही आहात ना? परिवर्तक आहात. परिवर्तक कधी अधीन असू शकत नाही.
याच प्रकारे संपत्ती, अखूट संपत्ती, ती स्वराज्य अधिकारीची कोणती आहे? ज्ञान, गुण
आणि सर्व शक्ती ही स्वराज्य अधिकारीची संपत्ती आहे. तर चेक करा - ज्ञानाच्या साऱ्या
विस्ताराच्या साराला स्पष्टपणे समजले आहे ना? ज्ञानाचा अर्थ असा नाही की फक्त भाषण
केले, कोर्स घेतला, ज्ञानाचा अर्थ आहे - समज. तर प्रत्येक संकल्प, प्रत्येक कर्म
बोल, ज्ञान अर्थात समजदार, नॉलेजफूल बनून करता का? सर्व गुण प्रॅक्टिकल जीवनामध्ये
इमर्ज असतात का? सगळे आहेत की यथाशक्ती आहेत? याच प्रकारे सर्व शक्ती - तुमचे टायटल
आहे - मास्टर सर्वशक्तीवान, शक्तिवान नाहीये. तर सर्व शक्ती विपुल प्रमाणात आहेत?
आणि दुसरी गोष्ट सर्व शक्ती वेळेवर काम करतात का? वेळेवर हजर होतात का वेळ निघून
गेल्यानंतर मग आठवण होते? तर तीनही गोष्टी चेक करा - एक राज्य, एक धर्म आणि अविनाशी
सुख-शांती, संपत्ती; कारण नवीन संसारामध्ये या गोष्टी ज्या आता स्वराज्याच्या
काळातील अनुभव आहे, तो होऊ शकणार नाही. आता या सर्व गोष्टींचा अनुभव करू शकता.
आतापासून हे संस्कार इमर्ज होतील तेव्हा अनेक जन्म प्रारब्धाच्या रूपामध्ये चालतील.
असे तर समजत नाही ना की धारण करत आहोत, होऊन जाईल, अंतापर्यंत तर होऊनच जाऊ!
बापदादांनी या
पूर्वीच इशारा दिला आहे की आताचा दीर्घकालीन अभ्यास दीर्घकाळाच्या प्राप्तीचा आधार
आहे. अंतापर्यंत होऊन जाईल असा विचार करू नका; होऊन जाईल नाही तर होणारच आहे. का?
स्वराज्याचा जो अधिकार आहे त्याचा आता दीर्घकाळ अभ्यास पाहिजे. जर एका जन्मामध्ये
अधिकारी बनू शकत नाही, अधीन बनता तर अनेक जन्म कसे असतील! म्हणून बापदादा सर्व चोहो
बाजूच्या मुलांना वारंवार इशारा देत आहेत की आता काळाची गती तीव्रगतीने जात आहे
म्हणून सर्व मुलांना आता केवळ पुरुषार्थी बनायचे नाहीये परंतु तीव्र पुरुषार्थी
बनून, पुरुषार्थाच्या प्रारब्धाचा आता दीर्घकाळ अनुभव करायचा आहे. तीव्र
पुरुषार्थाची निशाणी बापदादांनी या आधी देखील सांगितली आहे. तीव्र पुरुषार्थी सदैव
मास्टर दाता असेल, घेणारा नाही देणारा, देवता. असे होईल तर माझा पुरुषार्थ होईल, हा
करेल तर मी ही करेन, हा बदलेल तर मी सुद्धा बदलेन, याने बदलावे, याने करावे, ही काही
दातापणाची निशाणी नाही आहे. कोणी करो किंवा न करो, परंतु मी बापदादा समान करेन,
ब्रह्मा बाप समान सुद्धा, साकारमध्ये देखील बघितले, मुले करतील तर मी करेन - असे
कधीच म्हटले नाही, मी करून मग मुलांकडून करून घेईन. तीव्र पुरुषार्थाची दुसरी निशाणी
आहे की, सदैव निर्मान, कार्य करत असताना देखील निर्मान, निर्माण आणि निर्मान
दोन्हीचा बॅलन्स हवा. का? निर्मान बनून कार्य केल्याने सर्वांकडून हृदयापासूनचा
स्नेह आणि आशीर्वाद मिळतात. बापदादांनी बघितले आहे की निर्माण अर्थात सेवेच्या
क्षेत्रामध्ये आजकाल सगळे चांगल्या उमंग-उत्साहाने नवनवीन प्लॅन बनवत आहेत. याची
बापदादा चोहो बाजूच्या मुलांना मुबारक देत आहेत.
बापदादांकडे
‘निर्माण’चे (रचनात्मक सेवेचे) आणि इतर सेवेचे खूप छान-छान प्लॅन आले आहेत. परंतु
बापदादांनी पाहिले की निर्माणच्या कार्यामध्ये तर खूप चांगले परंतु जितका सेवेच्या
कार्यामध्ये उमंग-उत्साह आहे तितका जर निर्मान स्टेजचा बॅलन्स असेल तर ‘निर्माण’
अर्थात सेवेच्या कार्यामध्ये सफलता आणखी जास्त प्रत्यक्ष रूपामध्ये होऊ शकते.
बापदादांनी या आधीही सांगितले आहे - निर्मान स्वभाव, निर्मान बोल आणि निर्मान
स्थितीने संबंध-संपर्कामध्ये या. देवतांचे गायन करतात परंतु आहे ब्राह्मणांचे गायन,
देवतांसाठी म्हटले जाते यांच्या मुखातून जे बोल निघतात ते जसे हिरे-मोती, अमूल्य,
निर्मल वाणी, निर्मल स्वभाव. आता बापदादा बघत आहेत, रिजल्ट ऐकवू ना, कारण हा सीझनचा
लास्ट टर्न आहे. तर बापदादांनी पाहिले की निर्मल वाणी, निर्मान स्थिती याकडे आता
लक्ष दिले पाहिजे.
बापदादांनी हे अगोदरच
सांगितले आहे की, खजिन्याची तीन खाती जमा करा. तर रिझल्टमध्ये काय बघितले? तीन खाती
कोणती आहेत? ते तर लक्षात असेल ना! तरीही रिवाइज (उजळणी) करत आहे - एक आहे आपल्या
पुरुषार्थाने जमेचे खाते वाढविणे, दुसरे आहे - नेहमी आपणही संतुष्ट रहा आणि
इतरांनाही संतुष्ट करा, वेगवेगळ्या संस्कारांचे आहेत हे माहित असून सुद्धा संतुष्ट
रहायचे आहे आणि संतुष्ट करायचे आहे, यामुळे आशीर्वादांचे खाते जमा होते. जर
कोणत्याही कारणाने संतुष्ट करण्यामध्ये काही कमतरता राहिली तर पुण्याच्या
खात्यामध्ये जमा होत नाही. संतुष्टता पुण्याची चावी आहे, तर मग संतुष्ट रहा नाहीतर
संतुष्ट करा. आणि तिसरे आहे - सेवेमध्ये देखील सदैव नि:स्वार्थ, ‘मी’पणा नाही. मी
केले, किंवा मी सांगितले तसे झाले पाहिजे, जिथे हा ‘मी’ आणि ‘माझे’पणा सेवेमध्ये
येतो तिथे पुण्याचे खाते जमा होत नाही. ‘माझे’पणा, तुम्ही अनुभवी आहात हा रॉयल
रूपातील ‘माझे’पणा सुद्धा खूप आहे. रॉयल रूपातील ‘माझे’पणाची लिस्ट सामान्य रूपातील
‘माझे’पणापेक्षाही मोठी आहे. तर जिथेकुठे ‘मी’ आणि ‘माझे’पणाचा स्वार्थ येतो,
नि:स्वार्थ नाहीये तिथे पुण्याचे खाते कमी जमा होते. ‘माझे’पणाची लिस्ट नंतर कधीतरी
ऐकवेन, खूप मोठी आहे आणि खूप सूक्ष्म आहे. तर बापदादांनी पाहिले की आपल्या
पुरुषार्थाने यथाशक्ती सगळे आपले-आपले खाते जमा करत आहेत परंतु आशीर्वादांचे खाते
आणि पुण्याचे खाते ते आता भरून काढण्याची गरज आहे त्यामुळे तीनही खाती जमा करण्याकडे
अटेंशन हवे. व्हरायटी संस्कार आता देखील पहायला मिळतील, सर्वांचे संस्कार अजून
संपन्न झालेले नाहीत परंतु आपल्यावर इतरांच्या कमजोर स्वभावाचा, कमजोर संस्कारांचा
प्रभाव पडता कामा नये. मी मास्टर सर्वशक्तीवान आहे, कमजोर संस्कार शक्तीशाली नाहीत.
मज मास्टर सर्वशक्तीवानावर कमजोर संस्कारांचा प्रभाव पडता कामा नये. सेफ्टीचे साधन
आहे बापदादांच्या छत्रछाये मध्ये राहणे. बाप-दादांसोबत कंबाइंड राहणे. छत्रछाया आहे
- श्रीमत.
आज बापदादा इशारा देत
आहेत की स्वयंप्रति प्रत्येकाने संकल्प, बोल, संपर्क-संबंध, कर्मामध्ये नवीनता
आणण्याचा प्लॅन बनवायचाच आहे. बापदादा अगोदर रिजल्ट बघणार की, कोणती नवीनता आणली
गेली आहे? जुना संस्कार दृढ संकल्पाद्वारे परिवर्तन केला आहे का? पहिला हा रिजल्ट
बघतील. काय विचार करता, असे करू? करू? हात वर करा जे म्हणत आहेत करणार, करणार? अच्छा.
करणार की दुसऱ्यांना बघत राहणार? काय करणार? दुसऱ्यांना पाहू नका, बापदादांना पहा,
आपल्या मोठ्या दादींना पहा. किती न्यारी आणि प्यारी स्टेज आहे. बापदादा म्हणत आहेत
जर कोणाला ‘मी’ आणि हदच्या ‘माझे’पणापासून न्यारे बघायचे असेल तर आपल्या
बापदादांच्या दिलतख्तनशीन दादींना पहा. संपूर्ण लाईफमध्ये हदचा ‘माझे’पणा, हदचा
‘मी’पणा यापासून न्याऱ्या राहिल्या, त्याचा रिजल्ट आजार कितीही असला परंतु दुःख,
वेदनेच्या जाणिवे पासून न्यारी आहे. एकच शब्द पक्का आहे, कोणीही विचारले दादी काही
दुखत आहे का, दादी काही होत आहे का? तर काय उत्तर मिळते? काही नाही कारण नि:स्वार्थ
आणि मोठे मन, सर्वांना सामावून घेणारी, सर्वांची लाडकी, याची प्रॅक्टिकल निशाणी बघत
आहात. तर जेव्हा ब्रह्मा बाबांची गोष्ट सांगतात, तर म्हणतात त्यांच्यामध्ये तर बाबा
होते ना, परंतु दादी तर तुमच्या सोबत प्रभू पालनेमध्ये राहिली, शिकण्यामध्ये राहिली,
सेवेमध्ये साथीदार होती, तर नि:स्वार्थ स्थितीमध्ये जर का एक बनू शकतो, तर काय
तुम्ही सर्वजण बनू शकत नाही काय? बनू शकता ना! बापदादांना निश्चय आहे की तुम्हीच
बनणारे आहात. कितीदा बनला आहात? लक्षात आहे? अनेक कल्प बाप समान बनला आहात आणि आता
देखील तुम्हीच बनणार आहात. याच उमंग-उत्साहाने उडत चला. बाबांना तुमच्यावर निश्चय
आहे तर तुम्ही सुद्धा स्वतःविषयी सदैव निश्चय-बुद्धी राहून, बनायचेच आहे असे
निश्चय-बुद्धी बनून उडत रहा. जर बाबांवर प्रेम आहे, प्रेमामध्ये १०० टक्के पेक्षाही
जास्त आहे, असे म्हणता. हे ठीक आहे? जे पण सगळे बसले आहेत किंवा जे पण आपापल्या
स्थानावर ऐकत आहेत, बघत आहेत ते सर्व प्रेमाच्या सब्जेक्टमध्ये स्वतःला १०० टक्के
समजता का? त्यांनी हात वर करा. १०० टक्के? (सर्वांनी हात वर केला) अच्छा. मागे
बसलेल्यांनी उंच हात वर करा, हलवा. (आज २२ हजाराहून जास्त भाऊ-बहिणी पोहोचले आहेत)
यामध्ये तर सर्वांनी हात वर उचलला. तर प्रेमाची निशाणी आहे - समान बनणे. ज्याच्यावर
प्रेम असते त्याच्या सारखे बोलणे, त्याच्या सारखे चालणे, त्याच्या सारखा
संबंध-संपर्क निभावणे, ही आहे प्रेमाची निशाणी.
आज बापदादा आता लगेच
पाहू इच्छित आहेत की एका सेकंदामध्ये स्वराज्याच्या सीटवर कंट्रोलिंग पॉवर, रुलिंग
पॉवरच्या संस्कारामध्ये इमर्ज रूपाने सेकंदामध्ये बसू शकता! तर एका सेकंदामध्ये
दोन-तीन मिनिटांकरिता राज्य अधिकाराच्या सीट वर सेट व्हा. अच्छा. (ड्रिल)
चोहो बाजूच्या मुलांची
प्रेमपूर्वक आठवणीची पत्रे आणि त्याच सोबत जी काही सायन्सची साधने आहेत
त्यांच्याद्वारे प्रेमपूर्वक आठवण बापदादांपाशी पोहोचली. आपल्या अंतःकरणातील समाचार
सुद्धा खूप मुले लिहितात देखील आणि रुहरिहानमध्ये ऐकवतात देखील. बापदादा त्या सर्व
मुलांना रिस्पॉन्ड (प्रतिसाद) देत आहेत की, सदा सच्च्या दिलावर साहेब राजी आहेत.
बापदादांचे हृदयापासूनचे आशीर्वाद आणि हृदयापासूनचे प्रेम विशेष त्या आत्म्यांप्रती
आहे. चोहो बाजूचे जे पण समाचार देतात, सगळे चांगले-चांगले उमंग-उत्साहाचे जे काही
प्लॅन बनवले आहेत, त्याची बापदादा मुबारक सुद्धा देत आहेत आणि वरदान देखील देत आहेत,
पुढे जात रहा, आणि इतरांना ही पुढे घेऊन जात रहा.
चोहो बाजूच्या
बापदादांच्या कोटींमधून कोणी, कोणी मधून सुद्धा कोणी श्रेष्ठ भाग्यवान मुलांना
बापदादांची विशेष प्रेमपूर्वक आठवण, बापदादा सर्व मुलांना हिंमत आणि उमंग-उत्साहाची
मुबारक सुद्धा देत आहेत. तसेच पुढच्यासाठी तीव्र पुरुषार्थी बनण्याची, बॅलन्सची
पद्मा-पदमगुणा ब्लेसिंग सुद्धा देत आहेत. सर्वांचा भाग्याचा तारा सदैव चमकत राहो आणि
इतरांचे भाग्य बनवत रहावे यासाठी देखील आशीर्वाद देत आहेत. चोहो बाजूची मुले
आपल्या-आपल्या स्थानावर बसून ऐकत देखील आहेत, बघत देखील आहेत आणि बापदादा सुद्धा
सर्व चोहो बाजूच्या दूर बसलेल्या मुलांना पाहून आनंदीत होत आहेत. बघत रहा आणि
मधुबनची शोभा सदैव वाढवत रहा. तर सर्व मुलांना अंतःकरणापासूनच्या आशीर्वादांसोबत
नमस्ते.
वरदान:-
अटेंशन रुपी
घृतद्वारा आत्मिक स्वरूपाच्या ताऱ्याची चमक वाढविणारे आकर्षण मूर्त भव
जेव्हा की बाबांद्वारे,
नॉलेज द्वारे आत्मिक स्वरूपाचा तारा तेजस्वी बनला आहे त्यामुळे विझू शकत नाही, परंतु
त्या तेजाचे परसेंटेज कमी-जास्त होऊ शकते. हा तेजाने चमकणारा तारा सर्वांना सदैव
आकर्षित तेव्हा करेल जेव्हा रोज अमृतवेलेला अटेंशन रुपी घृत टाकत रहाल. जसे
दिव्यामध्ये घृत (तूप) टाकतात तेव्हा तो सतत पेटत राहतो. तसे संपूर्ण अटेंशन देणे
अर्थात बाबांच्या सर्व गुणांना आणि शक्तींना स्वतःमध्ये धारण करणे. याच अटेंशनने
आकर्षण मूर्त बनाल.
सुविचार:-
बेहदच्या वैराग्य
वृत्ती द्वारे साधनेच्या बीजाला प्रत्यक्ष करा.
अव्यक्त इशारे:- स्वयं
प्रति आणि सर्वांप्रती मनसा द्वारे योगाच्या शक्तींचा प्रयोग करा.
योगाची शक्ती जमा
करण्यासाठी कर्म आणि योग यांचा बॅलन्स अजून वाढवा. कर्म करत असताना योगाची पॉवरफुल
स्टेज रहावी - याचा अभ्यास वाढवा. जसे सेवेसाठी इन्व्हेन्शन करता तसे या विशेष
अनुभवांच्या अभ्यासासाठी वेळ काढा आणि नवीनता आणून सर्वांच्या समोर उदाहरण बना.
सूचना:- आज महिन्याचा
तिसरा रविवार आहे, सर्व राजयोगी तपस्वी भाऊ-बहिणींनी सायंकाळी ६.३० ते ७.३०
वाजेपर्यंत, विशेष योग अभ्यासाच्या वेळी मास्टर सर्वशक्तीवानच्या शक्तीशाली
स्वरूपामध्ये स्थित होऊन प्रकृती सहित सर्व आत्म्यांना पवित्रतेची किरणे द्या,
सतोप्रधान बनविण्याची सेवा करा.