20-01-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - ज्ञानाच्या धारणे सोबतच सतयुगी राजाईसाठी आठवण आणि पवित्रतेचे बल देखील
जमा करा”
प्रश्न:-
आता तुम्हा
मुलांच्या पुरुषार्थाचे कोणते लक्ष्य असले पाहिजे?
उत्तर:-
सदैव आनंदामध्ये राहणे, खूप-खूप प्रेमळ बनणे, सर्वांसोबत प्रेमाने रहाणे… हेच
तुमच्या पुरुषार्थाचे लक्ष्य असावे. यानेच तुम्ही सर्वगुणसंपन्न १६ कला संपूर्ण
बनाल.
प्रश्न:-
ज्यांची कर्म
श्रेष्ठ आहेत, त्यांची लक्षणे कोणती असतील?
उत्तर:-
त्यांच्या द्वारे कोणालाही दुःख मिळणार नाही. जसे बाबा दुःख हर्ता, सुख कर्ता आहेत
त्यांच्याप्रमाणे श्रेष्ठ कर्म करणारे देखील दुःख हर्ता, सुख कर्ता असतील.
गीत:-
छोड़ भी दे
आकाश सिंहासन…
ओम शांती।
गोड-गोड रुहानी मुलांनी गाणे ऐकले. हे ‘गोड-गोड रुहानी मुलांनी’ असे कोणी म्हटले?
दोन्ही पित्यांनी म्हटले. निराकारने देखील म्हटले तर साकार ने देखील म्हटले म्हणून
यांना म्हटले जाते बाबा आणि दादा. दादा आहेत साकारी. आता ही गाणी तर भक्तिमार्गातील
आहेत. मुले जाणतात बाबा आलेले आहेत आणि बाबांनी साऱ्या सृष्टीचक्राचे ज्ञान
बुद्धीमध्ये पक्के केले आहे. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे - कि आम्ही ८४ जन्म
पूर्ण केले, आता नाटक पूर्ण होत आहे. आता आपल्याला पावन बनायचे आहे, योग अथवा
आठवणीद्वारे. आठवण आणि नॉलेज हे तर प्रत्येक गोष्टीमध्ये होत असते. बॅरिस्टरची जरूर
आठवण करतील आणि त्यांच्याकडून नॉलेज घेतील. याला देखील योग आणि नॉलेजचे बळ म्हटले
जाते. इथे तर ही आहे नवीन गोष्ट. या योग आणि ज्ञानाने हदचे बळ मिळते. इथे या योग आणि
ज्ञानाने बेहदचे बळ मिळते कारण सर्वशक्तिमान ऑथॉरिटी आहेत. बाबा म्हणतात - ‘मी
ज्ञानाचा सागर देखील आहे. तुम्ही मुलांनी आता सृष्टी चक्राला जाणले आहे. मूलवतन,
सूक्ष्मवतन… सर्व लक्षात आहे. जे नॉलेज बाबांमध्ये आहे, ते देखील मिळाले आहे. तर
नॉलेजला देखील धारण करायचे आहे; आणि राजाईकरिता बाबा मुलांना योग आणि पवित्रता
देखील शिकवतात. तुम्ही पवित्र देखील बनता. बाबांकडून राजाई सुद्धा घेता. बाबा
स्वतःपेक्षा उच्च पद देतात. तुम्ही ८४ जन्म घेत-घेत पद गमावून बसता. हे नॉलेज तुम्हा
मुलांना आता मिळाले आहे. सर्वश्रेष्ठ बनण्याचे नॉलेज सर्वश्रेष्ठ बाबांकडून मिळते.
मुले जाणतात आता आपण जणूकाही बापदादांच्या घरामध्ये बसलो आहोत. हे दादा (ब्रह्मा),
आई देखील आहेत. ते पिता तर वेगळे आहेत, बाकी ही आई देखील आहे. परंतु हा देह पुरुषाचा
असल्याकारणाने मग मातेची नियुक्ती केली जाते, यांना देखील ॲडॉप्ट केले जाते.
त्यांच्याद्वारे मग रचना तयार झाली आहे. रचना देखील ॲडॉप्टेड (दत्तक घेतलेली) आहे.
बाबा मुलांना ॲडॉप्ट करतात, वारसा देण्यासाठी. ब्रह्माला देखील ॲडॉप्ट केले आहे.
प्रवेश करणे अथवा ॲडॉप्ट करणे गोष्ट एकच आहे. मुले समजतात आणि समजावून देखील
सांगतात - नंबरवार पुरुषार्थानुसार. सर्वांना हेच समजावून सांगायचे आहे की, आम्ही
आमच्या परमपिता परमात्म्याच्या श्रीमतावर या भारताला पुन्हा श्रेष्ठ ते श्रेष्ठ
बनवत आहोत, तर मग स्वतःला देखील बनावे लागेल. स्वतःला बघायचे आहे की, ‘मी श्रेष्ठ
बनलो आहे? कोणते भ्रष्टाचाराचे काम करून कोणाला दुःख तर देत नाही ना?’ बाबा म्हणतात
- मी तर आलो आहे मुलांना सुखी बनविण्यासाठी तर तुम्हाला देखील सर्वांना सुख द्यायचे
आहे. बाबा कधी कोणाला दुःख देऊ शकत नाहीत. त्यांचे नावच आहे दु:ख हर्ता, सुखकर्ता.
मुलांनी स्वतःला तपासायचे आहे - मनसा, वाचा, कर्मणा आपण कुणाला दुःख तर देत नाही
ना? शिवबाबा कधी कोणाला दुःख देत नाहीत. बाबा म्हणतात - मी कल्प-कल्प तुम्हा मुलांना
ही बेहदची कहाणी ऐकवतो. आता तुमच्या बुद्धीमध्ये आहे की, आम्ही आता आपल्या घरी
जाणार मग नवीन दुनियेमध्ये येणार. तुमच्या आताच्या शिक्षणानुसार मग अखेरीस तुम्ही
ट्रान्सफर व्हाल. परत घरी जाऊन मग नंबरवार पार्ट बजावण्यासाठी याल. ही राजधानी
स्थापन होत आहे.
मुले जाणतात आता जो पुरुषार्थ करणार तोच पुरुषार्थ तुमचा कल्प-कल्प सिद्ध होईल.
सर्वप्रथम तर सर्वांच्या बुद्धीमध्ये पक्के केले पाहिजे की, रचता आणि रचनेच्या
आदि-मध्य-अंताचे नॉलेज बाबांव्यतिरिक्त इतर कोणीही जाणत नाही. सर्वश्रेष्ठ बाबांचे
नावच नाहीसे केले आहे. त्रिमूर्ती नाव तर आहे, त्रिमूर्ती रस्ता देखील आहे,
त्रिमूर्ती हाऊस सुद्धा आहे. त्रिमूर्ती म्हटले जाते ब्रह्मा-विष्णू-शंकरला. या
तिघांचे रचयिता जे शिवबाबा आहेत त्या मुख्य असणाऱ्याचे नावच नाहीसे केले आहे. आता
तुम्ही मुले जाणता उच्च ते उच्च आहेत शिवबाबा, त्यानंतर मग आहेत त्रिमूर्ती.
बाबांकडून आपण मुले हा वारसा घेतो. बाबांचे नॉलेज आणि वारसा या दोन्ही गोष्टींची
आठवण राहिली तर सदैव हर्षित रहाल. बाबांच्या आठवणीमध्ये राहून जर तुम्ही कोणालाही
ज्ञानाचा बाण माराल तर चांगला परिणाम होईल. त्यामध्ये शक्ती येत जाईल. आठवणीच्या
यात्रेमुळेच शक्ती मिळते. आता शक्ती नष्ट झाली आहे कारण आत्मा पतित तमोप्रधान झाली
आहे. आता मुख्य चिंता या गोष्टीची करायची आहे की, आपल्याला तमोप्रधाना पासून
सतोप्रधान बनायचे आहे. मनमनाभवचा अर्थ देखील हाच आहे. गीता जे वाचतात त्यांना
विचारले पाहिजे - मनमनाभवचा अर्थ काय आहे? हे कोणी म्हटले की, ‘माझी आठवण करा तर
वारसा मिळेल?’ नवीन दुनिया स्थापन करणारा कोणता श्रीकृष्ण तर नाही आहे. तो तर
प्रिन्स आहे. हे तर गायले गेले आहे - ‘ब्रह्मा द्वारा स्थापना’. आता करनकरावनहार
कोण? विसरले आहेत. त्यांच्यासाठी सर्वव्यापी म्हणतात. असे म्हणतात ब्रह्मा, विष्णू,
शंकर इत्यादी सर्वांमध्ये तेच आहेत. आता याला म्हटले जाते अज्ञान. बाबा म्हणतात -
तुम्हाला ५ विकाररूपी रावणाने अडाणी बनवले आहे. तुम्ही जाणता बरोबर आपण देखील आधी
असे होतो. होय, आधी उत्तम ते उत्तम देखील आपणच होतो मग खाली घसरत महान पतित बनलो.
शास्त्रांमध्ये दाखवले आहे राम भगवंताने वानर सेना घेतली, हे देखील ठीक आहे. तुम्ही
जाणता आपण खरोखर वानरासारखे होतो. आता जाणीव होते की, ही आहेच भ्रष्टाचारी दुनिया.
एकमेकांना शिव्या देत दुःख देत राहतात. हे आहे काट्यांचे जंगल. तो आहे फुलांचा बगीचा.
जंगल खूप मोठे असते. बगीचा खूप छोटा असतो. बगीचा मोठा असत नाही. मुले समजतात -
खरोखर आता यावेळी हे खूप मोठे काट्यांचे जंगल आहे. सतयुगामध्ये फुलांचा बगीचा किती
छोटा असेल. या गोष्टी तुम्हा मुलांमध्ये देखील नंबरवार पुरुषार्थानुसार समजतात.
ज्यांचा ज्ञान आणि योग नाही आहे, सेवेमध्ये तत्पर नाहीत तर मग त्यांना आतून इतका
आनंद देखील वाटत नाही. दान केल्याने व्यक्तीला आनंद होतो. समजतात याने आधीच्या
जन्मामध्ये दान-पुण्य केले आहे तेव्हाच इतका चांगला जन्म मिळाला आहे. कोणी भक्त
असतात, तर असे समजतील आपण भक्त चांगल्या भक्ताच्या घरामध्ये जाऊन जन्म घेणार.
चांगल्या कर्मांचे फळ देखील चांगले मिळते. बाबा बसून कर्म-अकर्म-विकर्माची गती
मुलांना समजावून सांगतात. दुनिया या गोष्टींना जाणत नाही. तुम्ही जाणता आता रावण
राज्य असल्याकारणाने मनुष्यांची कर्म सर्व विकर्म बनत आहेत. पतित तर बनायचेच आहे.
सर्वांमध्ये ५ विकारांची प्रवेशता आहे. भले दान-पुण्य इत्यादी करतात, त्याचे फळ
अल्पकाळासाठी मिळते. तरी देखील पाप तर करतातच. रावण राज्यामध्ये जी काही
देवाण-घेवाण होते ती आहेच पापाची. देवतांसमोर किती स्वच्छतेने भोग लावतात. स्वच्छ
बनून येतात परंतु जाणत काहीच नाहीत. बेहदच्या बाबांची देखील किती निंदा केली आहे.
ते समजतात की, ही तर आम्ही महिमा करतो की ईश्वर सर्वव्यापी आहे, सर्वशक्तीमान आहे;
परंतु बाबा म्हणतात हे यांचे उलटे मत आहे.
तुम्ही सर्वप्रथम बाबांची महिमा ऐकवता की सर्वश्रेष्ठ भगवान एकच आहेत, आम्ही
त्यांचीच आठवण करतो. राज योगाचे एम ऑब्जेक्ट देखील समोर उभे आहे. हा राजयोग बाबाच
शिकवतात. श्रीकृष्णाला पिता म्हणणार नाही, तो तर मुलगा आहे, ‘शिव’नाच ‘बाबा’
म्हणणार. त्यांना आपला देह नाही. हा मी लोन वर घेतो म्हणून यांना बापदादा म्हणतात.
ते आहेत उच्च ते उच्च निराकार पिता. रचनेला रचनेकडून वारसा मिळू शकत नाही. लौकिक
नात्यामध्ये मुलाला पित्याकडून वारसा मिळतो. मुलीला काही मिळू शकत नाही.
आता बाबांनी समजावून सांगितले आहे - तुम्ही आत्मे माझी मुले आहात. प्रजापिता
ब्रह्माचे मुलगे-मुली आहात. ब्रह्माकडून वारसा मिळणार नाही. बाबांचे बनल्यानेच वारसा
मिळू शकतो. हे बाबा तुम्हा मुलांना सन्मुख बसून समजावून सांगतात. यांचे कोणते
शास्त्र तर बनू शकत नाही. भले तुम्ही लिहिता, लिटरेचर छापता तरीही टिचर शिवाय तर
कोणी समजावून सांगू शकणार नाही. टिचर शिवाय पुस्तकातील कोणीही समजावून सांगू शकणार
नाही. आता तुम्ही आहात रूहानी टिचर्स. बाबा आहेत बीजरूप, त्यांच्याकडे साऱ्या
झाडाच्या आदि-मध्य-अंताचे नॉलेज आहे. टिचरच्या रूपामध्ये बसून तुम्हाला समजावून
सांगतात. तुम्हा मुलांना तर सदैव आनंदात राहिले पाहिजे की, आम्हाला सुप्रीम बाबांनी
आपले संतान बनविले आहे, तेच आम्हाला टिचर बनून शिकवतात. खरे सद्गुरु देखील आहेत,
सोबत घेऊन जातात. सर्वांचे सद्गती दाता एक आहेत. उच्च ते उच्च बाबाच आहेत जे भारताला
दर ५००० वर्षानंतर वारसा देतात. त्यांची शिवजयंती साजरी करतात. वास्तविक शिवा सोबत
त्रिमूर्ती देखील असले पाहिजे. तुम्ही त्रिमूर्ती शिवजयंती साजरी करता. फक्त
शिवजयंती साजरी करण्याने कोणतीच गोष्ट सिद्ध होणार नाही. बाबा येतात आणि ब्रह्माचा
जन्म होतो. मुलगा बनला, ब्राह्मण बनले आणि एम ऑब्जेक्ट समोर उभे आहे. बाबा स्वतः
येऊन स्थापना करतात. एम ऑब्जेक्ट देखील एकदम क्लियर आहे फक्त श्रीकृष्णाचे नाव
घातल्यामुळे साऱ्या गीतेचे महत्व नाहीसे झाले आहे. हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले
आहे. ही चूक तरीसुद्धा होणारच आहे. पूर्ण खेळच ज्ञान आणि भक्तीचा आहे. बाबा म्हणतात
- ‘लाडक्या मुलांनो, सुखधाम, शांतीधामची आठवण करा’. अल्फ आणि बे (बाबा आणि बादशाही),
किती सोपे आहे. तुम्ही कोणालाही विचारा मनमनाभवचा अर्थ काय आहे? बघा ते काय म्हणतात?
तुम्ही बोला, भगवान कोणाला म्हणावे? सर्वोच्च तर भगवान आहेत ना. त्यांना सर्वव्यापी
थोडेच म्हणणार. ते तर सर्वांचे पिता आहेत. आता त्रिमूर्ती शिवजयंती येत आहे.
तुम्हाला त्रिमूर्ती शिवचे चित्र काढले पाहिजे. उच्च ते उच्च आहेत शिव, त्यानंतर मग
सूक्ष्म वतनवासी ब्रह्मा, विष्णू, शंकर. सर्वोच्च आहेत शिवबाबा. तेच भारताला स्वर्ग
बनवतात. त्यांची जयंती तुम्ही का साजरी करत नाही? नक्कीच भारताला वारसा दिला होता.
त्यांचे राज्य होते. यामध्ये तर तुम्हाला आर्य समाजाचे देखील मदत करतील कारण ते
देखील शिवाला मानतात. तुम्ही आपला झेंडा फडकवा. एका बाजूने त्रिमूर्ती गोळा, दुसऱ्या
बाजूने झाड. वास्तविक तुमचा झेंडा असा असला पाहिजे. बनू तर शकतो ना. झेंडा फडकवा
जेणेकरून सर्वजण बघतील. सारे स्पष्टीकरण यामध्ये आहे. या चित्रामध्ये तर कल्पवृक्ष
आणि ड्रामा एकदम क्लियर आहे. सर्वांना माहिती होईल की आपला धर्म पुन्हा केव्हा येईल.
आपणच आपापला हिशोब काढतील. सर्वांना हे चक्र आणि झाड या दोन चित्रांवर समजावून
सांगायचे आहे. क्राइस्ट केव्हा आला? इतका वेळ ते आत्मे कुठे राहतात? जरूर म्हणतील -
निराकारी दुनियेमध्ये राहतात. आपण आत्मे रूप बदलून इथे येऊन साकार बनतो. बाबांना
देखील म्हणतात ना - तुम्ही देखील रूप बदलून साकारमध्ये या. येतील तर इथेच ना.
सूक्ष्मवतनमध्ये तर येणार नाहीत. जसे आपण रूप बदलून पार्ट बजावतो, तुम्ही देखील या,
पुन्हा येऊन राजयोग शिकवा. राजयोग आहेच भारताला स्वर्ग बनविणारा. या तर खूप सोप्या
गोष्टी आहेत. मुलांना आवड असली पाहिजे. धारणा करून इतरांनाही त्यासाठी प्रेरित केले
पाहिजे. त्यासाठी अभ्यास केला पाहिजे. बाबा येऊन भारताला स्वर्ग बनवतात. म्हणता
देखील - खरोखर क्राइस्टच्या ३००० वर्षांपूर्वी भारत पॅराडाईज होता म्हणून
‘त्रिमूर्ती शिव’चे चित्र सर्वांना पाठवले पाहिजे. ‘त्रिमूर्ती शिव’चा स्टॅम्प बनवला
पाहिजे. असे स्टॅम्प बनविणाऱ्यांचे देखील डिपार्टमेंट असेल. दिल्लीमध्ये तर खूप
शिकलेले आहेत. हे काम करू शकतात. तुमची राजधानी देखील दिल्ली होणार आहे. आधी
दिल्लीला परिस्थान म्हणत होते. आता तर कब्रस्तान आहे. या सर्व गोष्टी मुलांच्या
डोक्यात आल्या पाहिजेत.
आता तुम्हाला नेहमी आनंदात रहायचे आहे, खूप-खूप प्रेमळ बनायचे आहे. सर्वांना
प्रेमाने वागवायचे आहे. सर्वगुण संपन्न, १६ कला संपूर्ण बनण्याचा पुरुषार्थ करायचा
आहे. तुमच्या पुरुषार्थाचे हेच लक्ष्य आहे परंतु आज पर्यंत कोणीही बनलेला नाही. आता
तुमची चढती कला होत जाते. हळूहळू चढता ना. तर बाबा सर्व प्रकारे शिवजयंतीला सेवा
करण्याचा इशारा देत राहतात. ज्यामुळे मनुष्य समजतील की, यांचे नॉलेज तर खूप श्रेष्ठ
आहे. लोकांना समजावून सांगण्यासाठी किती मेहनत करावी लागते. मेहनती शिवाय राजधानी
थोडीच स्थापन होणार. वर चढतात, खाली कोसळतात पुन्हा चढतात. मुलांसमोर देखील कोणते
ना कोणते वादळ येते. मुख्य गोष्ट आहेच आठवण करण्याची. आठवणीनेच सतोप्रधान बनायचे आहे.
नॉलेज तर सोपे आहे. मुलांना अतिशय गोड बनायचे आहे. एम ऑब्जेक्ट तर समोर उभे आहे. हे
लक्ष्मी-नारायण किती गोड आहेत. यांना बघून किती आनंद होतो. आम्हा स्टुडंटचे हे एम
ऑब्जेक्ट आहे. शिकविणारे आहेत स्वयं भगवान. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक
आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) बाबांकडून
मिळालेल्या नॉलेजला आणि वारशाला स्मृतीमध्ये ठेवून सदैव हर्षित रहायचे आहे. ज्ञान
आणि योग असेल तर सेवेमध्ये तत्पर रहायचे आहे.
२) सुखधाम आणि
शांतीधामची आठवण करायची आहे. या देवतांसारखे गोड बनायचे आहे. अपार खुशीमध्ये राहायचे
आहे. रुहानी टिचर बनून ज्ञानाचे दान करायचे आहे.
वरदान:-
देह,
नातेसंबंध आणि वैभवाच्या बंधनापासून स्वतंत्र बाप समान कर्मातीत भव
जे निमित्त मात्र
डायरेक्शन अनुसार प्रवृत्तीला सांभाळत आत्मिक स्वरूपामध्ये राहतात, मोहा मुळे नाही,
त्यांना जर आत्ताच्या आत्ता ऑर्डर झाली की, निघून या तर निघून येतील. घंटा वाजेल आणि
विचार करण्यामध्येच वेळ निघून जाऊ नये - तेव्हा म्हणणार - नष्टोमोहा; म्हणून नेहमी
स्वतःला चेक करायचे आहे की देहाचे, नातेसंबंधाचे, वैभवाचे बंधन आपल्याकडे आकर्षित
तर करत नाही ना. जिथे बंधन असेल तिथे आकर्षण असेल. परंतु जे स्वतंत्र आहेत ते बाप
समान कर्मातीत स्थितीच्या समीप आहेत.
बोधवाक्य:-
स्नेह आणि
सहयोगासोबतच शक्ती रूप बना राजधानीमध्ये पुढचा नंबर मिळेल.
आपल्या शक्तिशाली मनसा
द्वारे सकाश देण्याची सेवा करा:-
जितका आता तन, मन, धन
आणि वेळ देता, त्यापेक्षा मनसा शक्तींद्वारे सेवा केल्याने खूप थोड्या वेळामध्ये
जास्त सफलता मिळेल. आता कधी-कधी स्वतःसाठी जी मेहनत करावी लागते - आपल्या स्वभावाला
परिवर्तन करण्यासाठी किंवा संघटनमध्ये चालण्यासाठी किंवा कधी सेवेमध्ये सफलता कमी
पाहून निराश होणे, हे सर्व संपेल.