20-01-2026
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - बेहदच्या बाबांची आठवण करणे - ही आहे गुप्त गोष्ट आठवणीला आठवण मिळते, जे
बाबांची आठवण करत नाहीत त्यांची बाबा देखील कसे आठवण करतील”
प्रश्न:-
संगमयुगावर
तुम्ही मुले कोणते शिक्षण शिकता जे पूर्ण कल्पामध्ये शिकवले जात नाही?
उत्तर:-
जिवंतपणी शरीरापासून न्यारे अर्थात मृत अवस्था होण्याचे शिक्षण आता शिकत आहात कारण
तुम्हाला कर्मातीत बनायचे आहे. बाकी जोपर्यंत शरीरामध्ये आहात तोपर्यंत कर्म तर
करायचेच आहे. मन देखील अमन तेव्हा होईल जेव्हा शरीर नसेल म्हणून मन जीते जगतजीत नाही,
परंतु माया जीते जगतजीत.
ओम शांती।
बाबा बसून मुलांना समजावून सांगत आहेत कारण हे तर मुले समजतात की अज्ञानी
असणाऱ्यालाच शिकवले जाते. आता बेहदचे बाबा उच्च ते उच्च भगवान येतात तर कोणाला
शिकवत असतील? जरूर जे सर्वात अति एकदम अडाणी असतील त्यांनाच शिकवतील; म्हणूनच म्हटले
जाते - ‘विनाश काले विपरीत बुद्धी’. विपरीत बुद्धी कसे झाले आहेत? ८४ लाख योनी
लिहिलेले आहे ना! तर बाबांना देखील ८४ लाख जन्मांमध्ये घेऊन आले आहेत. म्हणतात -
परमात्मा, कुत्रा, मांजर, जीव-जंतू सर्वांमध्ये आहे. मुलांना समजावून सांगितले जाते,
हा पॉईंट तर दुसऱ्या नंबरला सांगायचा आहे. बाबांनी समजावून सांगितले आहे जेव्हा कोणी
नवीन येतात तर सर्वप्रथम त्यांना हदच्या आणि बेहदच्या बाबांचा परिचय दिला पाहिजे.
ते बेहदचे मोठे बाबा आणि ते हदचे छोटे बाबा. बेहदचे पिता अर्थातच बेहद आत्म्यांचे
पिता. तो हदचा पिता जीव आत्म्याचा पिता झाला. ते आहेत सर्व आत्म्यांचे पिता. हे
नॉलेज देखील सर्व एकसमान धारण करू शकत नाहीत. कोणी १ टक्का धारण करतात तर कोणी ९५
टक्के धारण करतात. ही तर समजून घेण्याची गोष्ट आहे. सूर्यवंशी घराणे असेल ना!
राजा-राणी तथा प्रजा. हे आता बुद्धीमध्ये आहे ना. प्रजेमध्ये सर्व प्रकारचे मनुष्य
असतात. प्रजा अर्थात प्रजा. बाबा समजावून सांगत आहेत हे शिक्षण आहे. प्रत्येक जण
आपल्या बुद्धीनुसार शिकतात. प्रत्येकाला आपापला पार्ट मिळालेला आहे. ज्यांनी
कल्पापूर्वी जेवढा अभ्यास धारण केला असेल तेवढाच आता देखील धारण करतात. शिक्षण कधी
लपून राहू शकत नाही. अभ्यासानुसारच पद मिळते. बाबांनी समजावून सांगितले आहे - पुढे
चालून परीक्षा तर होणारच आहे. परीक्षेशिवाय ट्रान्सफर तर होऊ शकणार नाहीत. शेवटी
सर्व ठाऊक होईल. परंतु आताही समजू शकतात की, आपण कोणत्या पदाच्या लायक आहोत. भले
लाजेपोटी सर्वांसोबत हात उचलतात. मनातून समजतात की, आपण हे कसे काय बनू शकणार! तरी
देखील हात उचलतात. समजत असताना देखील हात उचलणे याला देखील अज्ञान म्हणणार. किती
अज्ञान आहे, बाबा तर लगेच समजून जातात. यांच्यापेक्षा तर त्या स्टुडंटमध्ये जास्त
अक्कल असते. ते समजतात तरी की, आम्ही स्कॉलरशिप घेण्याच्या लायक नाही, पास होणार
नाही. यांच्यापेक्षा तर ते अज्ञानी चांगले जे समजतात - टीचर जे शिकवत आहेत त्यामध्ये
आपण किती मार्क्स घेणार! असे थोडेच म्हणतील की, मी पास विद ऑनर होणार. तर हे सिद्ध
होते की इथे एवढी सुद्धा बुद्धी नाही आहे. देह-अभिमान खूप आहे. जर का तुम्ही असे (लक्ष्मी-नारायण)
बनण्यासाठी आला आहात तर वर्तणूक खूप चांगली पाहिजे. बाबा म्हणतात - कोणी तर विनाश
काले विपरीत बुद्धी आहेत कारण नियमानुसार बाबांशी प्रीत नाही आहे, तर काय हाल होईल.
उच्च पद प्राप्त करू शकणार नाहीत.
बाबा बसून तुम्हा
मुलांना समजावून सांगतात - ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’, याचा अर्थ काय आहे; मुलेच जर
हे नीट समजू शकत नाहीत तर मग बाकीचे कसे काय समजतील! जी मुले समजतात की आपण
शिवबाबांची संतान आहोत तेच यथार्थ रित्या अर्थाला समजत नाहीत. बाबांची आठवण करणे -
ही तर आहे गुप्त गोष्ट. अभ्यास काही गुप्त नाही आहे ना. अभ्यासामध्ये नंबरवार आहेत.
सर्वजण एकसमान थोडेच शिकतील. बाबा तर समजतात ही तर अजून लहान बाळे आहेत. अशा
बेहदच्या पित्याची तीन-तीन, चार-चार महिने आठवण देखील करत नाहीत. समजणार तरी कसे की
आठवण करतात म्हणून? जेव्हा त्यांचे पत्र येईल आणि मग त्या पत्रामध्ये सेवा समाचार
देखील असेल की, ही-ही रूहानी सेवा करतो. पुरावा पाहिजे ना. असे देखील देह-अभिमानी
असतात जे ना कधी आठवण करतात आणि ना सेवेचा पुरावा दाखवतात. कोणी तर समाचार लिहितात
बाबा अमके-अमके आले त्यांना असे समजावून सांगितले, तर बाबा देखील समजतात मुलगा
जिवंत आहे. सेवा समाचार ठीक देतात. कोणी तर ३-४ महिने पत्रच लिहीत नाहीत. काहीच
समाचार नसेल तर समजतील मेला किंवा आजारी आहे! आजारी मनुष्य लिहू शकत नाही ना. असे
देखील कोणी लिहितात - आमचे स्वास्थ्य ठीक नव्हते म्हणून पत्र लिहिले नाही. काही जण
तर समाचारच देत नाहीत, ना आजारी आहेत. देह-अभिमान आहे. मग बाबा देखील आठवण कोणाची
करतील. आठवणीला आठवण मिळते, परंतु देह-अभिमान आहे. बाबा येऊन समजावून सांगतात - मला
सर्वव्यापी म्हणून ८४ लाखा पेक्षाही जास्त योनीमध्ये घेऊन जातात. मनुष्यांना म्हटले
जाते पत्थर-बुद्धी आहेत. भगवंतासाठी मग म्हणतात - दगडा-मातीमध्ये विराजमान आहेत. तर
या बेहदच्या शिव्या झाल्या ना! म्हणून बाबा म्हणतात - माझी किती ग्लानी (निंदा)
करतात. आता तुम्ही तर नंबरवार समजले आहात. भक्तीमार्गामध्ये गातात देखील - ‘तुम्ही
याल तेव्हा आम्ही बलिहार जाऊ. तुम्हाला वारसदार बनवू’. मला ते वारसदार बनवतात जे मला
म्हणतात - दगड-धोंड्यामध्ये आहात! किती निंदा करतात, तेव्हाच बाबा म्हणतात - ‘यदा
यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत…’ आता तुम्ही मुले बाबांना जाणता तर बाबांची किती
महिमा करता. काहीजण मग महिमाच तर काय परंतु कधी आठवण करून दोन शब्द सुद्धा लिहीत
नाहीत. देह-अभिमानी बनतात. तुम्ही मुले समजता आपल्याला बाबा मिळाले आहेत, आमचे बाबा
आम्हाला शिकवत आहेत. भगवानुवाच आहे ना! मी तुम्हाला राजयोग शिकवतो. विश्वाची राजाई
कशी प्राप्त होईल त्यासाठी राजयोग शिकवतो. आम्ही विश्वाची बादशाही घेण्याकरिता
बेहदच्या बाबांकडून शिकत आहोत - हा नशा असेल तर अपार आनंद होईल. भले गीता देखील
वाचतात परंतु जसे सामान्य पुस्तक वाचतात. परंतु गीता वाचणाऱ्यांना किंवा
ऐकविणाऱ्यांना इतका आनंद होत नाही, गीता वाचून पूर्ण केली आणि गेले धंद्याला.
तुमच्या तर आता बुद्धीमध्ये आहे - बेहदचे बाबा आम्हाला शिकवत आहेत. इतर कोणाच्याही
बुद्धीमध्ये असे येणार नाही की आपल्याला भगवान शिकवत आहेत. तर कोणीही आले तर
सर्वप्रथम त्याला दोन पित्याची थिअरी समजावून सांगायची आहे. बोला, भारत स्वर्ग होता
ना, आता नरक आहे. असे तर कोणी म्हणू शकत नाही की आपण सतयुगामध्येही आहोत आणि
कलियुगामध्ये देखील आहोत. कोणाला दुःख झाले तर तो नरकामध्ये आहे, कोणाला सुख मिळाले
तर तो स्वर्गामध्ये आहे. असे अनेक जण म्हणतात - दुःखी मनुष्य नरकामध्ये आहेत, आम्ही
तर खूप सुखामध्ये बसलो आहोत, गाडी-बंगला इत्यादी सर्व काही आहे. बाह्य सुख खूप
बघतात ना. हे देखील तुम्ही आता समजता की, सतयुगी सुख तर इथे असू शकत नाही. असे
देखील नाही की, गोल्डन एज्डला आयरन एज्ड म्हणा किंवा आयरन एज्डला गोल्डन एज्ड म्हणा,
गोष्ट एकच आहे. असे समजणाऱ्याला देखील अडाणी म्हणणार. तर सर्वप्रथम पित्याची थिअरी
सांगायची आहे. बाबाच येऊन आपली ओळख देतात. बाकीचे कोणी तर त्यांना जाणतच नाहीत.
म्हणतात परमात्मा सर्वव्यापी आहेत. आता तुम्ही चित्रांमध्ये दाखवता - आत्मा आणि
परमात्म्याचे रूप तर एकच आहे. ते देखील आत्मा आहेत परंतु त्यांना परम-आत्मा म्हटले
जाते. बाबा बसून समजावून सांगतात की, मी कसा येतो! सर्व आत्मे तिथे परमधाममध्ये
राहतात. या गोष्टी बाहेरचा काही कोणी समजू शकत नाही. भाषा देखील खूप सोपी आहे.
गीतेमध्ये श्रीकृष्णाचे नाव लिहिले आहे. आता श्रीकृष्ण काही गीता ज्ञान ऐकवत नाहीत.
ते काही सर्वांना असे म्हणू शकत नाहीत की, मामेकम् (मज एकाची) आठवण करा. देहधारीच्या
आठवणीने पापे तर नष्ट होत नाहीत. श्रीकृष्ण भगवानुवाच - ‘देहाचे सर्व संबंध त्यागून
मामेकम् (मज एकाची) आठवण करा’; परंतु देहाची नाती तर श्रीकृष्णाला देखील आहेत शिवाय
तो तर छोटासा मुलगा आहे ना. ही देखील केवढी मोठी चूक आहे. एका चुकीमुळे किती फरक
पडतो. परमात्मा काही सर्वव्यापी असू शकत नाहीत. ज्यांच्यासाठी म्हणतात ‘सर्वांचे
सद्गती दाता आहेत’, तर त्यांची दुर्गती होईल का! परमात्मा कधी दुर्गतीला प्राप्त
होतील का? या सर्व विचार सागर मंथन करण्याच्या गोष्टी आहेत. वेळ वाया घालवण्याची
गोष्टच नाही. मनुष्य तर म्हणतात की आम्हाला फुरसत नाहीये. तुम्ही त्यांना सांगता
की, येऊन कोर्स करा तर म्हणतात - वेळ नाही. दोन दिवस येतील, पुन्हा चार दिवस येणारच
नाहीत… शिकला नाहीत तर मग असे लक्ष्मी-नारायण कसे बनू शकाल? मायेमध्ये किती ताकद आहे.
बाबा म्हणतात - जो सेकंद, जे मिनिट पास झाले ते हुबेहूब रिपीट होते. अगणित वेळा
रिपीट होत राहील. आता तर बाबांकडून ऐकत आहात. बाबा काही जन्म-मरणामध्ये येत नाहीत.
तुलना केली जाते पूर्ण जन्म-मरणामध्ये येणारे कोण आहेत आणि न येणारे कोण आहेत? केवळ
एक बाबाच आहेत जे जन्म-मरणामध्ये येत नाहीत. बाकीचे तर सर्व येतात म्हणून चित्र
देखील दाखवले आहे. ब्रह्मा आणि विष्णू दोघेही जन्म-मरणामध्ये येतात. ब्रह्मा सो
विष्णू, विष्णू सो ब्रह्मा पार्टमध्ये येत-जात राहतात. अंत होऊ शकत नाही. तरीही
सर्वजण हे चित्र येऊन बघतील आणि समजून घेतील. अगदी सोपी समजण्यासारखी गोष्ट आहे.
बुद्धीमध्ये आले पाहिजे - हम सो ब्राह्मण आहोत, नंतर हम सो देवता, क्षत्रिय, वैश्य,
शूद्र बनणार. पुन्हा जेव्हा बाबा येतील तेव्हा आपण सो ब्राह्मण बनणार. याची जरी
आठवण कराल तरी देखील स्वदर्शन चक्रधारी झालात. असे बरेच आहेत ज्यांना आठवण राहत नाही.
तुम्ही ब्राह्मणच स्वदर्शन चक्रधारी बनता, देवता बनत नाहीत. हे नॉलेज आहे की,
सृष्टीचे चक्र कसे फिरते, या नॉलेजला प्राप्त केल्यानेच ते असे देवता बनले आहेत.
वास्तविक कोणताही मनुष्य स्वदर्शन चक्रधारी म्हणण्याच्या लायक नाही आहे. मनुष्यांची
सृष्टी मृत्यूलोकच वेगळा आहे. जसे भारतवासीयांचे रीती रिवाज वेगळे आहेत, सर्वांचे
वेगवेगळे आहेत. देवतांचे रीती-रिवाज वेगळे आहेत. मृत्यूलोकातील मनुष्यांचे
रीती-रिवाज वेगळे. रात्रं-दिवसाचा फरक आहे म्हणून सर्वजण म्हणतात - आम्ही पतित आहोत.
हे भगवान, आम्हा सर्व पतित दुनियेमध्ये राहणाऱ्यांना पावन बनवा. तुमच्या बुद्धीमध्ये
आहे पावन दुनिया आजपासून ५ हजार वर्षांपूर्वी होती, ज्याला सतयुग म्हटले जाते.
त्रेताला म्हणणार नाही. बाबांनी समजावून सांगितले आहे - ते सतयुग आहे फर्स्टक्लास,
हे त्रेता आहे सेकंड क्लास. तर प्रत्येक गोष्ट चांगल्या रीतीने धारण करायची आहे. जे
कोणी येतील त्यांनी ते ऐकून आश्चर्यचकित व्हावे. काहीजण तर आश्चर्यचकित होतात. परंतु
त्यांना वेळच मिळत नाही, जे पुरुषार्थ करतील. मग ऐकतात पवित्र जरूर राहायचे आहे. हा
कामविकारच आहे जो मनुष्याला पतित बनवतो, याला जिंकल्यानेच तुम्ही जगतजीत बनाल.
बाबांनी सांगितले देखील आहे - कामविकाराला जिंकून जगतजीत बना. मनुष्य म्हणतात - ‘मन
जीते जगतजीत बना’. मनाला वश करा. आता मन तर अमन (शांत) तेव्हा होईल जेव्हा शरीरच
नसेल. बाकी मन अमन कधी होतच नाही. देह मिळतोच कर्म करण्याकरिता तर मग कर्मातीत
अवस्थेमध्ये कसे राहतील? कर्मातीत अवस्था म्हटले जाते मृत अवस्थेला. जिवंतपणी मृत
अवस्था, शरीरापासून न्यारा. तुम्हाला देखील शरीरापासून न्यारे बनण्याचा अभ्यास
शिकवतात. शरीरापासून आत्मा वेगळी आहे. आत्मा परमधाम मध्ये राहणारी आहे. आत्मा
शरीरामध्ये येते तेव्हा त्याला मनुष्य म्हटले जाते. शरीर मिळतेच मुळी कर्म
करण्याकरिता. एक शरीर सुटले की मग दुसरे शरीर आत्म्याला घ्यायचे आहे कर्म
करण्याकरिता. शांत तर तेव्हाच रहाल जेव्हा कर्म करायचे नसेल. मूलवतनमध्ये कर्म तर
घडत नाही. सृष्टीचे चक्र इथेच फिरते. बाबांना आणि सृष्टी चक्राला जाणून घ्यायचे आहे,
यालाच नॉलेज म्हटले जाते. हे डोळे जोपर्यंत पतित क्रिमिनल आहेत, तोपर्यंत या
डोळ्यांनी पवित्र वस्तू पाहू शकत नाही यासाठी ज्ञानाचा तिसरा नेत्रच पाहिजे. जेव्हा
तुम्ही कर्मातीत अवस्थेला प्राप्त कराल अर्थात देवता बनाल तेव्हाच मग या डोळ्यांनी
देवतांना बघत रहाल. बाकी या शरीरामध्ये या डोळ्यांनी श्रीकृष्णाला तुम्ही पाहू शकत
नाही. केवळ साक्षात्कार घडला तर त्याने काही मिळते थोडेच. अल्प काळासाठी आनंद होतो,
इच्छा पूर्ण होते. ड्रामामध्ये साक्षात्काराची देखील नोंद आहे, याद्वारे प्राप्ती
मात्र काहीच होत नाही. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) या
शरीरापासून न्यारी मी आत्मा आहे, जिवंतपणी या शरीरामध्ये असून जणूकाही मृत अवस्था
आहे - या स्थितीच्या अभ्यासाद्वारे कर्मातीत अवस्था बनवायची आहे.
२) सेवेचा पुरावा
द्यायचा आहे. देहभानाला सोडून आपला खरा-खरा समाचार द्यायचा आहे. पास विद् ऑनर
होण्याचा पुरुषार्थ करायचा आहे.
वरदान:-
आपल्या शांत
स्वरूप स्टेज द्वारे शांतीची किरणे पसरविणारे मास्टर शांती सागर भव
वर्तमान समयी
विश्वातील बहुसंख्य आत्म्यांना सर्वात जास्त आवश्यकता आहे - खऱ्या शांतीची.
दिवसेंदिवस अशांतीची अनेक कारणे वाढत आहेत आणि वाढतच जातील. भले स्वतः अशांत नसतीलही
तरी देखील इतरांचे अशांतीचे वायुमंडळ, वातावरण, शांत अवस्थेमध्ये बसू देणार नाही.
अशांतीच्या तणावाचा अनुभव वाढेल. अशा वेळी तुम्ही मास्टर शांतीचे सागर असणाऱ्या
मुलांनी अशांतीच्या संकल्पांना मर्ज करून विशेष शांतीची व्हायब्रेशन्स पसरवा.
बोधवाक्य:-
बाबांच्या
सर्व गुणांचा अनुभव करण्यासाठी नेहमी ज्ञान सूर्याच्या सन्मुख रहा.
अव्यक्त इशारे:- या
अव्यक्ती महिन्यामध्ये बंधनमुक्त राहून जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करा.
आता वेळेची बचत,
संकल्पांची बचत, शक्तींच्या बचतीची योजना बनवून बिंदू रूपाच्या स्थितीला वाढवा.
तुमची जितकी जास्त बिंदू रूपाची स्थिती असेल तितके कोणतेही इव्हील सोल किंवा वाईट
संस्कारांचा हल्ला तुम्हा लोकांवर वार करणार नाही, तुम्ही देखील त्याच्या पासून
मुक्त रहाल आणि तुमचे शक्तिरूप त्यांना देखील मुक्त करेल.