20-02-2025
प्रभात: मराठी मुरली
ओम शान्ति
बापदादा मधुबन
“गोड
मुलांनो - आता विकारांचे दान द्या तर ग्रहण सुटेल आणि ही तमोप्रधान दुनिया
सतोप्रधान बनेल”
प्रश्न:-
तुम्हा मुलांना
कोणत्या गोष्टीचा कधीही कंटाळा येता कामा नये?
उत्तर:-
तुम्हाला आपल्या आयुष्याचा कधीही कंटाळा येता कामा नये कारण हा हिऱ्यासमान जन्म
गायला गेला आहे, याची काळजी देखील घ्यायची आहे, निरोगी रहाल तर नॉलेज ऐकत रहाल. इथे
जितके दिवस जगाल तितकी कमाई होत राहील, हिशोब चुकता होत राहील.
गीत:-
ओम् नमः शिवाय…
ओम शांती।
आज गुरुवार आहे. तुम्ही मुले म्हणाल सतगुरुवार, कारण सतयुगाची स्थापना करणारे देखील
आहेत, आणि प्रॅक्टिकलमध्ये सत्य-नारायणाची कथा देखील ऐकवतात. नरापासून नारायण
बनवतात. गायले देखील जाते - सर्वांचा सद्गती दाता आणि मग वृक्षपती सुद्धा आहेत. हे
मनुष्य सृष्टीचे झाड आहे, ज्याला कल्पवृक्ष म्हटले जाते. कल्प-कल्प अर्थात ५ हजार
वर्षानंतर पुन्हा हुबेहूब रिपीट होते. झाड देखील बघा पुनर्जीवित होते ना. ६ महिने
फुले येतात, मग माळी लोक त्याची मुळे काढून ठेवतात आणि मग पुन्हा लावतात तर परत फुले
येऊ लागतात.
आता हे तर मुले
जाणतात - बाबांची जयंती देखील अर्धा कल्प साजरी करतात, अर्धा कल्प विसरून जातात.
भक्तिमार्गामध्ये अर्धा कल्प आठवण करतात. बाबा मग कधी येऊन गार्डन ऑफ फ्लावर्स (फुलांचा
बगीचा) स्थापन करतील? दशा तर खूप असतात ना. बृहस्पतीची दशा देखील आहे, उतरत्या
कलेच्या देखील दशा असतात. यावेळी भारतावर राहूचे ग्रहण बसले आहे. चंद्राला सुद्धा
जेव्हा ग्रहण लागते तर ओरडतात - ‘दे दान तो छूटे ग्रहण’. आता बाबा देखील म्हणतात -
हे ५ विकारांचे दान द्या तर ग्रहण सुटेल. आता संपूर्ण सृष्टीवर ग्रहण लागलेले आहे,
५ तत्वांवर देखील ग्रहण लागलेले आहे कारण तमोप्रधान आहेत. प्रत्येक वस्तू नवीन आणि
मग जुनी जरूर होते. नवीनला सतोप्रधान, जुन्याला तमोप्रधान म्हणतात. छोट्या मुलांना
देखील सतोप्रधान महात्म्या पेक्षाही श्रेष्ठ मानले जाते, कारण त्यांच्यामध्ये ५
विकार असत नाहीत. भक्ती तर संन्यासी देखील बालपणातच करतात. जसे रामतीर्थ
श्रीकृष्णाचे पुजारी होते आणि जेव्हा संन्यास घेतला तर पूजा संपली. सृष्टीवर
पवित्रता देखील पाहिजे ना. भारत पूर्वी सर्वात पवित्र होता मग जेव्हा देवता
वाममार्गामध्ये जातात तेव्हा मग धरणीकंप इत्यादीमध्ये स्वर्गाची सर्व सामग्री,
सोन्याचे महाल इत्यादी खलास होतात नंतर मग पुन्हा नव्याने बनायला सुरुवात होतात.
डिस्ट्रक्शन (विनाश) जरूर होते. उपद्रव तेव्हा सुरु होतात जेव्हा रावण राज्य सुरू
होते, यावेळी सर्व पतित आहेत. सतयुगामध्ये देवता राज्य करतात. असुर आणि देवतांचे
युद्ध दाखवले आहे, परंतु देवता तर असतातच सतयुगामध्ये. तिथे युद्ध कसे होऊ शकते.
संगमावर तर देवता असतही नाहीत. तुमचे नावच आहे - पांडव. पांडव-कौरवांचे देखील युद्ध
होत नाही. या सर्व आहेत थापा. किती मोठे झाड आहे. किती अथाह पाने आहेत, त्याचा कोणी
हिशोब थोडाच काढू शकतात. संगमावर तर देवता असतही नाहीत. बाबा बसून आत्म्यांना
समजावून सांगतात, आत्माच ऐकून मान हलवते. ‘मी आत्मा आहे, बाबा आम्हाला शिकवत आहेत’,
हे पक्के करायचे आहे. बाबा आपल्याला पतितापासून पावन बनवतात. आत्म्यामध्येच चांगले
अथवा वाईट संस्कार असतात ना. आत्मा कर्मेंद्रियांद्वारे म्हणते - आम्हाला बाबा
शिकवतात. बाबा म्हणतात - मला देखील ऑर्गन्स (कर्मेंद्रिये) पाहिजेत, ज्याद्वारे
समजावून सांगेन. आत्म्याला आनंद होतो. बाबा दर ५ हजार वर्षानंतर आम्हाला ज्ञान
ऐकविण्यासाठी येतात. तुम्ही तर सन्मुख बसले आहात ना. मधुबनचीच महिमा आहे. आत्म्यांचे
पिता तर तेच आहेत ना, सर्व त्यांना बोलावतात. तुम्हाला इथे सन्मुख बसण्यामध्ये मजा
येते. परंतु इथे सगळेच काही राहू शकणार नाहीत. आपला कारभार, सर्व्हिस इत्यादी गोष्टी
सुद्धा बघायच्या आहेत. आत्मे सागराकडे येतात, धारण करून मग जाऊन इतरांना ऐकवायचे आहे.
नाही तर इतरांचे कल्याण कसे कराल? योगी आणि ज्ञानी तू आत्म्यांना छंद असतो की आपण
जाऊन इतरांना सुद्धा सांगावे. आता शिवजयंती साजरी केली जाते ना. भगवानुवाच आहे.
भगवानुवाच श्रीकृष्णासाठी म्हणू शकत नाही, तो तर आहे दैवी गुणवाला मनुष्य. डीटीज्म
(देवी-देवता धर्म) म्हटले जाते. आता मुले हे तर समजले आहेत की, आता देवी-देवता धर्म
नाही आहे, स्थापना होत आहे. तुम्ही असे म्हणणार नाही की, आता देवी-देवता धर्माचे
आहोत. नाही, आता तुम्ही ब्राह्मण धर्माचे आहात, देवी-देवता धर्माचे बनत आहात.
देवतांची सावली या पतित सृष्टीवर पडू शकत नाही, यामध्ये (पतित सृष्टीवर) देवता येऊ
शकत नाहीत. तुमच्यासाठी तर नवीन दुनिया पाहिजे. लक्ष्मीची देखील पूजा करतात तेव्हा
घर किती स्वच्छ करतात. आता या सृष्टीची देखील किती सफाई होणार आहे. संपूर्ण जुनी
दुनियाच नष्ट होणार आहे. मनुष्य लक्ष्मीकडे धनच मागतात. लक्ष्मी मोठी की जगत-अंबा
मोठी? (अंबा) अंबेची मंदिरे देखील पुष्कळ आहेत. लोकांना काहीच माहित नाही आहे.
तुम्ही समजता लक्ष्मी तर स्वर्गाची मालक आहे आणि जगत-अंबा जिला सरस्वती सुद्धा
म्हणतात, तीच जगत अंबा मग ही लक्ष्मी बनते. तुमचे पद उच्च आहे, देवतांचे पद कमी आहे.
उच्च ते उच्च तर ब्राह्मण शिखा आहेत ना. तुम्ही आहात सर्वात श्रेष्ठ. तुमची महिमा
आहे - सरस्वती, जगत-अंबा, यांच्याकडून काय मिळते? सृष्टीची बादशाही. तिथे तुम्ही
श्रीमंत बनता, विश्वाचे राज्य मिळते. नंतर मग गरीब बनता, भक्तीमार्ग सुरू होतो.
तेव्हा मग लक्ष्मीची आठवण करतात. दरवर्षी लक्ष्मीची पूजा देखील होते. लक्ष्मीला दर
वर्षी बोलावतात, जगत-अंबेला काही कोणी दरवर्षी बोलावत नाहीत. जगत-अंबेची तर कायम
पूजा होतच असते, जेव्हा पाहिजे तेव्हा अंबेच्या मंदिरामध्ये जावे. इथे देखील जेव्हा
पाहिजे, जगत-अंबेला भेटू शकता. तुम्ही देखील जगत-अंबा आहात ना. सर्वांना विश्वाचा
मालक बनण्याचा रस्ता सांगणारे आहात. सर्वकाही जगत-अंबेकडे जाऊन मागतात. लक्ष्मीकडे
फक्त धन मागतात. सर्व इच्छा तर तिच्याच समोर (जगत-अंबे समोर) ठेवतात, तर सर्वात
उच्च दर्जा तुमचा आत्ता आहे, जेव्हा येऊन बाबांची संतान बनला आहात. बाबा वारसा
देतात.
आता तुम्ही आहात
ईश्वरीय संप्रदाय, मग असाल दैवी संप्रदाय. यावेळी सर्व मनोकामना भविष्यासाठी पूर्ण
होतात. कामना (इच्छा) तर मनुष्याला असतातच ना. तुमच्या सर्व कामना पूर्ण होतात. ही
तर आहे आसुरी दुनिया. पाहा किती मुलांना जन्माला घालत असतात. तुम्हा मुलांना तर
साक्षात्कार घडवला जातो, सतयुगामध्ये श्रीकृष्णाचा जन्म कसा होतो? तिथे तर सर्व
नियमानुसार चालते, दुःखाचे नाव सुद्धा रहात नाही. त्याला म्हटलेच जाते सुखधाम.
तुम्ही अनेकदा सुखामध्ये पास झाला आहात, अनेकदा हार खाल्ली आहे आणि विजय देखील
प्राप्त केला आहे. आता स्मृती आली आहे की आम्हाला बाबा शिकवत आहेत. स्कूलमध्ये
नॉलेज शिकवतात. त्याचसोबत मॅनर्स सुद्धा शिकतात ना. तिथे काही या लक्ष्मी-नारायणा
सारखे मॅनर्स शिकत नाहीत. आता तुम्ही दैवी गुण धारण करता. महिमा देखील त्यांचीच
गातात - सर्व गुण संपन्न… तर आता तुम्हाला असे बनायचे आहे. तुम्हा मुलांना आता या
आयुष्याचा कंटाळा येता कामा नये, कारण हा हिऱ्याप्रमाणे जन्म गायला गेला आहे. याची
काळजी देखील घ्यायची आहे. निरोगी रहाल तर नॉलेज ऐकत रहाल. आजारपणातही ऐकू शकता.
बाबांची आठवण करू शकता. इथे जितके दिवस जगाल सुखी रहाल. कमाई होत राहील, हिशोब चुकता
होत राहील. मुले म्हणतात बाबा सतयुग कधी येणार? ही खूप घाणेरडी (विकारी) दुनिया आहे.
बाबा म्हणतात - ‘अरे, अगोदर कर्मातीत अवस्था तर बनवा’. जितका होईल तितका पुरुषार्थ
करत रहा. मुलांना शिकवले पाहिजे की, शिवबाबांची आठवण करा, ही आहे अव्यभिचारी आठवण.
एक शिवाची भक्ती करणे, ती आहे अव्यभिचारी भक्ती, सतोप्रधान भक्ती. आणि मग
देवी-देवतांना आठवण करणे, ती आहे सतो भक्ती. बाबा म्हणतात - ‘उठता-बसता मज पित्याची
आठवण करा’. मुलेच बोलावतात - ‘हे पतित-पावन, हे लिब्रेटर, हे गाईड…’ हे आत्म्याने
म्हटले ना.
मुले आठवण करतात, बाबा
आता आठवण करून देत आहेत, तुम्ही आठवण करत आले आहात - हे दु:ख-हर्ता, सुख-कर्ता या,
येऊन दुःखातून सोडवा, लिब्रेट करा, शांतीधाम मध्ये घेऊन जा. बाबा म्हणतात -
‘तुम्हाला शांतीधाममध्ये घेऊन जाईन, मग सुखधाममध्ये मी तुम्हाला सोबत देत नाही;
सोबत आताच देतो. सर्व आत्म्यांना घरी घेऊन जातो. आता माझी शिकविण्यासाठी तुम्हाला
सोबत आहे आणि मग परत घरी घेऊन जाण्यासाठी माझी सोबत आहे. बस्स, मी तुम्हा मुलांना
माझा व्यवस्थित परिचय करून देतो. जसा-जसा जो पुरुषार्थ कराल त्यानुसार मग तिथे
प्रारब्ध प्राप्त कराल. समज (शिकवण) तर बाबा खूप देतात. जितकी होईल तितकी माझी आठवण
करा तर विकर्म विनाश होतील आणि उडण्याचे पंख मिळतील. आत्म्याला काही असे स्थूल पंख
नाही आहेत. आत्मा तर एक छोटा बिंदू आहे. कोणालाच हे माहीत नाही आहे की आत्म्यामध्ये
कसा ८४ जन्माचा पार्ट नोंदलेला आहे. ना आत्म्याचा कोणाला परिचय आहे, ना परमात्म्याचा
परिचय आहे. म्हणूनच बाबा म्हणतात - ‘मी जो आहे, जसा आहे, मला कोणीही जाणू शकत नाही.
माझ्या द्वारेच मला आणि माझ्या रचनेला तुम्ही जाणू शकता. मीच येऊन तुम्हा मुलांना
माझा परिचय देतो’. आत्मा काय आहे, ते देखील समजावून सांगतो. याला सोल रीयलायझेशन (आत्म
अनुभूती) म्हटले जाते. आत्मा भृकुटीच्या मध्यभागी राहते. म्हणतात देखील - ‘भृकुटी
के बीच चमकता है अजब सितारा…’ परंतु आत्मा काय चीज आहे, हे अजिबातच कोणीही जाणत
नाहीत. जेव्हा कोणी म्हणतात की आत्म्याचा साक्षात्कार व्हावा तर त्यांना समजावून
सांगा की, तुम्ही तर म्हणता भृकुटीच्या मध्यभागी स्टार आहे, स्टारला काय बघणार?
तिलक सुद्धा स्टार सारखाच देतात. चंद्रामध्ये सुद्धा स्टार (तारा) दाखवतात.
वास्तविक आत्मा तारा आहे. आता बाबांनी समजावून सांगितले आहे - तुम्ही ज्ञान सितारे
आहात, बाकी ते सूर्य, चंद्र, तारे ते तर मंडपाला प्रकाश देणारे आहेत. ते काही देवता
नाही आहेत. भक्तिमार्गामध्ये सूर्याला देखील ओंजळीत पाणी घेऊन अर्ध्य देतात.
भक्तिमार्गामध्ये हे बाबा (ब्रह्मा बाबा) सुद्धा सर्व करत होते. सूर्य देवताय नमः,
चंद्रमा देवताय नमः असे म्हणून मग अर्ध्य देत होते. हा सर्व आहे भक्ती मार्ग. यांनी
तर खूप भक्ती केली आहे. नंबर वन पूज्य आणि मग नंबर वन पुजारी बनले आहेत. नंबर तर
मोजले जातील ना. रुद्रमाळेमध्ये देखील नंबर तर आहेत ना. भक्ती देखील सर्वात जास्त
यांनी केली आहे. आता बाबा म्हणतात लहान-थोर सर्वांची वानप्रस्थ अवस्था आहे. आता मी
सर्वांना घेऊन जाणार नंतर मग इथे येणारही नाही. बाकी शास्त्रांमध्ये जे दाखवतात -
प्रलय झाला, जलमय झाले आणि मग पिंपळाच्या पानावर श्रीकृष्ण आले… बाबा समजावून
सांगतात - सागराची काही गोष्ट नाहीये. तिथे तर ‘गर्भ महल’ आहे, जिथे मुले खूप
सुखामध्ये राहतात. इथे ‘गर्भ जेल’ म्हटले जाते. पापांची भोगना गर्भामध्ये मिळते. तरी
देखील बाबा म्हणतात - ‘मनमनाभव, माझी आठवण करा’. प्रदर्शनीमध्ये कोणी विचारतात
शिडीच्या चित्रामध्ये बाकीचे धर्म का नाही दाखवले आहेत? बोला, बाकीच्यांचे काही ८४
जन्म तर नाही आहेत. सर्व धर्म झाडामध्ये दाखवले आहेत, त्यावरून तुम्ही आपला हिशोब
काढा की, किती जन्म घेतले असतील. आम्हाला तर पूर्ण ८४ जन्मांची शिडी दाखवायची आहे.
बाकी सारे सृष्टी चक्रामध्ये आणि झाडाच्या चित्रामध्ये दाखवले आहे. यामध्ये सर्व
गोष्टी समजावून सांगितल्या आहेत. नकाशा पाहिल्यावर बुद्धिमध्ये येते ना - लंडन कुठे
आहे, अमके शहर कुठे आहे. बाबा किती सोपे करून समजावून सांगतात. सर्वांना हेच सांगा
की ८४ चे चक्र असे फिरते. आता तमोप्रधानापासून सतोप्रधान बनायचे असेल तर बेहदच्या
बाबांची आठवण करा तर तुम्ही पावन बनाल आणि मग पावन बनून पावन दुनियेमध्ये निघून जाल.
काही त्रासाची गोष्ट नाहीये. जितका वेळ मिळेल बाबांची आठवण करा तर पक्की सवय लागेल.
बाबांच्या आठवणीमध्ये तुम्ही दिल्लीपर्यंत पायी चालत जाल तरी देखील थकणार नाही. खरी
आठवण असेल तर देहाचे भान नष्ट होईल, मग थकल्याची जाणीव होऊ शकत नाही. शेवटी येणारे
तर अजूनच जास्त आठवणीमध्ये फास्ट जातील. अच्छा!
गोड-गोड खूप-खूप
वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात.
आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते.
धारणेसाठी मुख्य
सारांश:-
१) एक
बाबांच्या अव्यभिचारी आठवणीमध्ये राहून देहभानाला नष्ट करायचे आहे. आपली कर्मातीत
अवस्था बनविण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. या शरीरामध्ये राहून अविनाशी कमाई जमा
करायची आहे.
२) ज्ञानी तू आत्मा
बनून इतरांची सेवा करायची आहे, बाबांकडून जे ऐकले आहे त्याला धारण करून इतरांना
ऐकवायचे आहे. ५ विकारांचे दान देऊन राहूच्या ग्रहणापासून मुक्त व्हायचे आहे.
वरदान:-
एकमत आणि एकरस
अवस्थेद्वारे धरणीला फलदायी बनविणारे हिंमतवान भव जेव्हा तुम्ही मुले हिंमतवान बनून
संघटनमध्ये एकमत आणि एकरस अवस्थेमध्ये राहता किंवा एकाच कार्यामध्ये गुंतता तर स्वतः
देखील नेहमी प्रफुल्लित राहता आणि धरणीला देखील फलदायी बनवता. ज्याप्रमाणे आज-काल
सायन्स द्वारे आता-आता बीज टाकले आणि आता-आता फळ मिळाले, असेच सायलेन्सच्या
बळाद्वारे सहज आणि तीव्रगतीने प्रत्यक्षता पहाल. जेव्हा स्वतः निर्विघ्न, एका
बाबांच्या प्रेमामध्ये मग्न, एकमत आणि एकरस राहाल तर अन्य आत्मे देखील स्वतः सहयोगी
बनतील आणि धरणी फलदायी होईल.
बोधवाक्य:-
जे अभिमानाला
शान समजतात, ते निर्मान (विनम्र) राहू शकत नाहीत.
अव्यक्त इशारे -
एकांत प्रिय बना एकता आणि एकाग्रतेला धारण करा:- एकांतवासी आणि रमणीकता! दोन्ही
शब्दांमध्ये खूप अंतर आहे, परंतु संपूर्णतेमध्ये दोघांचीही समानता असावी, जितके
एकांतवासी तितकीच मग सोबत रमणीकता देखील असावी, एकांतामध्ये रमणीकता गायब होता कामा
नये. दोन्ही समान आणि एकत्र असावेत. आता-आता एकांतवासी, आता-आता रमणीक, जितके गंभीर
तितकेच मिलनसार सुद्धा असावे. ‘मिलनसार’ अर्थात सर्वांच्या संस्कार आणि स्वभावाशी
जुळवून घेणारे.